‘एकवीस’, ‘सत्तावीस’ असे उच्चार व्यवहारातून बाद करा, असा कुठलाही फतवा कोणीही काढलेला नाहीये!
सुरुवातीलाच स्मरणाचा अडथळा न येता कळू देणं, कळलेली गोष्ट कळलेल्या प्रकारेच व्यक्त करू देणं, ही गोष्ट संख्यानामांत सुचवलेल्या बदलानं साध्य होईल असं वाटतं. त्यातून मराठी भाषेचं सौंदर्य घटेल, कोणाला जोडाक्षरं लिहिताच येणार नाहीत, असं काही होणार नाही. होईल हेच की, अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास स्मरणाच्या परीक्षाप्रक्रियेत खच्ची होतो, तो व्हायची शक्यता जरा कमी होईल.......