शेतकर्यांची आजची अवस्था आणि त्यांचे लढे पाहता भगतसिंग खूप प्रासंगिक आहे!
आपल्या लक्ष्यप्रती स्पष्टता, शास्त्रीय- ऐतिहासिक दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नाचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता, अफाट चौफेर वाचन, वीरता, धाडस, देशभक्ती आणि त्याग या गुणांनी भरलेला कार्यकर्ता व नेता भगतसिंग भारताच्या वर्तमान परिस्थित आजही योग्य दिशा दाखवत आहे. शेती, सांप्रदायिकता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, राजकारण व धोरणांच्या बाबतीत यामुळेच तो प्रासंगिक असा दीपस्तंभ आहे.......