मला ‘मांजरांची आई’ होण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे!
मांजराला आपल्याच कुटुंबाचा भाग मानून आपण त्याला जीव लावला तरच त्याचा लळा लागतो. मांजराचा लडिवाळपणा खरं तर शब्दात काय, भावनेतही पकडणं शक्य नाही. इतकं लाडकं, जवळचं मांजर असणं म्हणजे काय ते अनुभवावंच लागतं. तेही आजारी पडू शकतं, वेड्यासारखं वागू शकतं आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, हे पक्कं असलं की मांजर आपल्याला खूप प्रेम देतं. अगदी डोळ्यात डोळे घालून बघतं. त्यालाही भावना समजतात.......