‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’ : ‘मॉडर्न’ किंवा ‘आधुनिक’ म्हणजे काय नेमकं?
‘Four More Shots Please!’च्या नायिकांचं जगणं हे अनेक (बहुतांश म्हणायला हवं खरं तर) बायकांचं फँटसीमधलं लाईफ आहे. मलाही आवडेल आयुष्याचा काही भाग या पद्धतीनं जगायला. भरपूर पैसा, तो येत राहण्यातलं सातत्य, दक्षिण मुंबईत कुटुंबापासून स्वतंत्र राहणं, मैत्रिणींसोबत धमाला शॉट्सवर शॉट्स मारायचे, एखाद वेळेस गोव्याला फिरायला जायचं त्यांच्यासोबत, कधीतरी परदेशातही... आणि सतत सेक्स. खरंच हे फँटसी लाईफ असू शकतं अनेक बायकांसाठी!.......