अजूनकाही
२५ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या वतीने खास पत्रकारांसाठी ‘जीएसटी कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली होती. त्यात केंद्र सरकारचे रेव्हेन्यू सेक्रेटरी हसमुख अधिया यांनी जीएसटी विविध तपशीलवार माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तरे उत्तरे दिली. हा जवळपास दोन तास, तीन मिनिटांचा व्हिडिओ आहे. त्याची भाषा हिंदी आहे. सुरुवातीला अधिया जीएसटी म्हणजे नेमकं काय हे सविस्तर समजावून सांगतात आणि त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकलात तर जीएसटीबद्दल तुम्हाला सर्व काही जाणून घेता येईल. हिंदी सिनेमाच्या कृपेने हिंदी भाषा आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे अवगत आहे. किमान चांगल्या प्रकारे समजू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ समजावून घ्यायला फारशी अडचण येत नाही. अधिया यांनी या कार्यक्रमाला ‘कार्यशाळा’ म्हटलं आहे. ही जीएसटीविषयीची कार्यशाळा पत्रकारांसाठी आयोजित केलेली असली तरी ती सर्वसामान्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे.
‘I am CA Student’ या नावाने फेसबुक पेज चालवणाऱ्या एका तरुणाने बनवलेला हा इंग्रजी भाषेतला व्हिडिओ. यातून जीएसटी म्हणजे नेमकं काय हे साध्या, सोप्या पद्धतीने सांगितले आहे. हा व्हिडिअो सात मिनिटांचा आहे. या व्हिडिओची भाषा इंग्रजी असली तरी ती थोडीशी लक्षपूर्वक ऐकली तर सहज समजू शकते. हा ग्राफिक, चित्रं यांच्या माध्यमातून जीएसटी समजावून सांगणारा अतिशय चांगला व्हिडिओ आहे. जरूर पहा. तुमचा गोंधळ त्यामुळे नक्की कमी होऊ शकेल.
हसमुख अधिया आणि सीए स्टुडण्ट यांच्याकडून अनुक्रमे हिंदी व इंग्रजी भाषेमधून जीएसटीविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्ही लगेच हा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल. थोडीशी विश्रांती घेऊन तासा दोन तासाने हा व्हिडिओ पहा. मात्र जरूर पहा. जवळपास २६ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अर्थतज्ज्ञ अरविंद दातार यांचं जीएसटीविषयीचं भाषण आहे. या करामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या परस्परसंबंधांमध्ये कशा प्रकारे वाद निर्माण होऊ शकतात, करविभाग आणि करदाते यांच्यातील समज-गैरसमज, कर चांगल्या मार्गाने चुकवण्याचा प्रयत्न करणं ही माणसाची कशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, अशा विविध गोष्टी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने दातार यांनी समजावून दिल्या आहेत. जीएसटीमुळे कायदेशीर व घटनात्मक स्वरूपाचे कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचीही मांडणी दातार यांनी उत्तम प्रकारे केली आहे. त्यामुळे जीएसटी समजावून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितक्याच महत्त्वाच्या आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment