अजूनकाही
जर्मनीच्या इतिहासात हिटलर विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या चळवळींचा आणि संघटन बांधणीचा विचार करताना ‘व्हाईट रोझ’चं नाव अग्रक्रमी राहतं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर म्युनिक येथील विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी हिटलरच्या महायुद्धासंबंधीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी स्थापन केलेलं ‘व्हाईट रोझ’ हे संघटन. या गटाच्या कामाचा कालावधी तसा कमीच म्हणजे १९४२ ते १९४३ चा काळ. जेव्हा जर्मन नागरिकांच्या मनामध्ये महायुद्धामध्ये जर्मनीचाच विजय होणार ही भावना पेरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न नाझींकडून करण्यात येत होता. हजारो सैनिक जर्मनीसाठी आपला जीव पणाला लावत होते. हिटलरच्या भाषणांनी लोकांच्या मनावर ताबा मिळवला होता. कोणतंही राजकीय भाष्य करण्यास जर्मन नागरिक धजावत नव्हता. सैन्याबद्दल काही बोलणं हे समाजात राहण्याच्या लायकीचं नसल्याची भावनिक अवस्था टोकाला पोहचवण्यात नाझी यशस्वी ठरलेला हा काळ. पण या सगळ्या बाबी झुगारत हिटलरच्या युद्धखोरीमुळेच त्यांच्या सैन्याच्या रक्ताचे पाट वाहत आहेत आणि हिटलर कोणत्याच परिस्थितीमध्ये युद्ध जिंकणार नाही, त्यामुळे तो फक्त युद्ध जास्त काळापर्यंत लांबवू शकतो ही मांडणी करताना ‘फ्रीडम’ची मागणी करणारा विद्यार्थ्यांचा गट म्हणजे ‘व्हाईट रोझ.’
‘व्हाईट रोझ’संबंधीचं लिखाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून व्हाईट रोझच्या कामावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. पण २००५मध्ये प्रदर्शित झालेला ‘सोफी शॉल : द फायनल डेज’ हा सिनेमा त्यातल्या त्यात अधिक महत्त्वाचा आहे. सोफी शॉल २१ वर्षीय तरुणी, ‘व्हाईट रोझ’ गटाची सदस्य. विद्यापीठात हिटलरविरोधी पत्रकं वाटल्यामुळे सोफी शॉल आणि तिचा भाऊ हॅन्स शॉल यांच्यावर खटला चालवण्यात येतो. त्यात त्यांच्यावर सैन्याचं मनोबल कमी करणं, शत्रूला मदत करणं आणि देशद्रोहाचा आरोप लावण्यात येऊन मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात येते आणि अधिक गतीनं त्याची अंमलबजावणीही करण्यात येते. गिलेटिनच्या सहाय्याने २१ वर्षीय सोफी शॉल, हॅन्स शॉल आणि व्हाईट रोझच्या आणखीन एका सदस्याचा १९४३ मध्ये शिरच्छेद करण्यात येतो.
‘सोफी शॉल : द फायनल डेज’ हा सिनेमा सोफी शॉलच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त भर न देता तिच्यावर चालवण्यात आलेला खटला, चौकशी आणि ‘व्हाईट रोझ’ची भूमिका यावर आधारित आहे. चौकशी आणि खटल्या दरम्यान तपास अधिकारी आणि शॉल यांच्यात झालेला संवाद हा या सिनेमाचा केद्रबिंदू. त्यात आलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याने सिनेमाचे कलात्मकदृष्ट्या विश्लेषण न करता मुद्दे मांडणं हा या लेखाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
एकीकडे स्टॅलिनग्राडमध्ये झालेली जर्मन सैन्याची पिछेहाट आणि १९४३ मध्येच त्याच विद्यापीठात विद्यार्थिनींनी केलेली निदर्शने यामुळे जर्मनीमध्ये गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झालेली असते. व्हाईट रोझ संस्था १९४२ पासून हिटलरच्या युद्धखोरीबद्दलची पत्रकं काढून ती वाटण्याचं काम करत असते. सहाव्या पत्रकाच्या वितरणासंबंधीची घटना सिनेमामध्ये मांडण्यात आली आहे. पत्रकं अधिक छापली गेल्यामुळे ती विद्यापीठाच्या परिसरात जाऊन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात येतो आणि त्याच वेळी सोफी आणि हॅन्स शॉल यांना जर्मन गुप्तचर संस्था गेस्टापो अटक करते.
आज एकंदरीत जागतिक परिस्थिती पाहताना सोफी शॉल आणि तपास अधिकारी यांच्यातील चर्चा महत्त्वाची आहे. कारण आजही असेच समांतर मुद्दे वारंवार समोर येताना दिसतात. उदाहरणार्थ
“युद्ध चालू असतानादेखील तुमच्यासारख्या वीकर सेक्सच्या लोकांना विद्यापीठांमधून शिक्षण मिळतंय.”
“तरुण मुलींनी विद्यापीठामध्ये शिक्षण न घेता फक्त मुलं सांभाळावीत.”
“तुमच्या गरिब आई-वडिलांचा तरी विचार करा.”
“विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन तुम्ही अशा प्रकारचे शिक्षण घेत असाल तर तुम्हाला चुकीच्या प्रकारचे शिक्षण मिळतंय.”
“बेरोजगारी, गरिबी या सर्व बाबी हिटलर दूर करत आहे तरी तुम्ही त्याच्याविरोधात कारवाया करता. त्यामुळं तुम्हांला या समाजात राहण्याचा अधिकार नाही.”
“तुम्ही केलेली कृती ही समाजाविरुद्धचं षडयंत्र आहे.”
या सर्वांत एक मजेशीर बाब म्हणजे व्हॉईट रोझच्या पत्रकातून हिटलरच्या युद्धखोरीविरोधातील मजकूर असतो. त्याच्या युद्धखोरीमुळे २,००,००० सैन्यांना आपला जीव गमवावा लागल्याची मांडणी हा गट करत असतो. यात सैन्याचा अवमान किंवा मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा कोणताच हेतू नसतो. उलट सैन्याच्या बाजूचाच हा मजकूर असतो. पण त्यांच्यावरच सैन्याचे मनोधैर्य खच्चीकरण केल्याचा आरोप ठेवत शिरच्छेद करण्यात येतो.
जेव्हा जेव्हा विद्यार्थी संघटनांनी जगातील कोणत्याही राज्यसत्तेविरूद्ध किंवा त्याच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांना मिळणारे मोफत किंवा कमी खर्चातील विद्यापीठातील शिक्षण याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. भारतातही आपण याचा अनुभव घेतलाच आहे. देशद्रोहाचे आरोपही लावण्यात आले आहेत. त्यामुळेच सोफी शॉलचा हा खटला एका विद्यार्थी संघटनांविरोधी मानसिकतेचं उगमस्थान म्हणून पाहता येईल.
हिटलरविरोधी जसा हा संघर्ष आहे तसाच त्यात मास्टर रेस आणि वीकर सेक्स यांच्यासंबंधीचे येणारे संदर्भही हदरावून टाकणारे आहेत. जर्मन नागरिकांनाच युद्ध हवंय असं जेव्हा ठासून सांगण्याचा प्रयत्न पब्लिक कोर्टात करण्यात येतो, त्यावेळी सध्या जगात चालू असणाऱ्या तणावाच्या वातावरणांकडं संशयानं पाहण्याची गरज वाटते. अनेक वेळा आता दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होणार अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तेथील नागरिकांचीच तशी इच्छा आहे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात येतो.
तपास यंत्रणांकडून उपस्थित करण्यात आलेले हे सर्व मुद्दे सोफी कुठेही न डगमगता खोडून काढते. खटल्याच्या शेवटी शिक्षा सुनावल्यानंतर सोफी व हॅन्स शॉलची वाक्यं खूप महत्त्वाची आहेत. ते म्हणतात, ‘We fight with words, You will soon be standing where we stand now. You may hang us today but you will hanged tomorrow.’ मला वाटतं सध्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या, आपलं मत मांडण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागतोय, ज्यांना शांतता हवीये त्याच परंपरेतील सोफी शॉल होती.
भारतात जेएनयू प्रकरणात जे झालं ते जगाच्या इतिहासात १९४३ मध्ये पूर्वीही एकदा घडलंय याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आणि सोफी शॉलचा खटला आहे.
पुढे शॉलच्या मृत्यूनंतर ‘व्हाईट रोझ’चं हे सहावं पत्रक (लेखाच्या शेवटी त्यातील मजकूर इंग्रजीमध्ये दिला आहे.) इंग्लंडपर्यंत पोहचवण्यात यश आलं. इंग्लंडने विमानांमधून या पत्रकाच्या हजारो प्रती जर्मनीमध्ये फेकल्या. आज हे सहावं पत्रक जगाच्या इतिहासात ‘A German Leaflet, Manifesto of the Students of Munich’ या नावाने प्रसिद्ध आहे.
हुकूमशाही प्रवृत्तीविरोधी लढणाऱ्या चळवळीतील लोकांनी आवर्जून पाहावा असा हा सिनेमा आहे.
……………………………………………………………………………………………
व्हाईट रोझच्या सहाव्या पत्रकातील मजकूर खालीलप्रमाणे -
“The German people stands aghast before the destruction of the men of Stalingrad. 330,000 German men have been irresponsibly and uselessly hounded to their death by the brilliant strategy of the World‐War‐Corporal. Führer, we thank you.
“Students, our people is in ferment. Are we going to continue to entrust an amateur with the fate of our Armies? Are we going to sacrifice the remainder of German youth to the lowest power instincts of a Party clique? Never!
“The day of reckoning has come, the reckoning of our German youth with the most detestable tyranny which our people has ever had to suffer. In the name of the whole German nation we demand from the State of Adolf Hitler the restitution ofpersonal freedom, that most precious possession of the Germans, out of which we have been cheated.
“We have grown up in a State of brutal oppression of all free expression of opinion. The Hitler Youth, the S.A. and the S.S. have tried to regiment, revolutionise and stun us during the most impressionable years of youth. Weltanschauliche Schulung (political training) was the term used for the contemptible method of killing the development of individual thought and judgment in a mass of platitudes. In a most devilish and stupid manner future Party chiefs are turned, in Ordensburgen (Party Schools) into godless, shameless and irresponsible exploiters and murderers, into blind stupid followers of a leader. It would suit the Party bosses if we, the young intellectuals, were to become their willing tools. Soldiers who have seen active fighting are ordered about likeschoolboys by Student Leaders and Gauleiter candidateʹs who have never seen the front. Gauleiters attack the honour of girl students by means of filthy jokes. German girl students at Munich University have given a dignified answer to these attacks on their honour.
German students have made a stand on behalf of their girl colleagues. That is a beginning of a fight for our free self‐determination, without which spiritual values cannot be created. We thank the brave students of either sex who have set such an excellent example.
“We have only one duty; to fight against the Party. Leave the Party organisations whichtake from us the right of political expression! Boycott the lectures of the Party professors!
We are concerned with true learning and real freedom of thought! No threats can frighten us, not even the closing of our universities! For each one of us it is a fight for our future, our freedom and honour in a nation conscious of its moral responsibility!
“Freedom and Honour! Hitler and his confederates have for the past ten years used, abused and twisted these two beautiful German words until they have become loathsome. They have thrown the highest ideals of a nation into the gutter! What they mean by freedom and honour they have shown only too well in ten years of destruction of all personal freedom, all freedom of thought and all moral principles of the Germanpeople. The eyes of even the most stupid German have been opened by the terrible blood bath in which they endeavour to drown all Europe in the name of freedom and honour of the German nation. The German name will remain for ever dishonouredif German youth does not at last arise, revenge and atone, destroy its tormentors and help build up a new spiritual concept of Europe.
……………………………………………………………………………………………
लेखक मुक्त पत्रकार म्हणून काम करतात.
bhosaleabhi90@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment