अजूनकाही
भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व देशभर पसरल्यानंतर समाजात सर्वच पातळीवर गोवंश हत्या, गोरक्षक, गोपालन वगैरे मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. गाईचे हिंदू धर्मातील महत्त्व, गोपालनातील अर्थकारण आणि एकूणच त्यामागील समाजकारण आणि राजकारणाचे विश्लेषण करणारी चार पुस्तके ‘बुक्सनामा’वर उपलब्ध झाली आहेत.
‘कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही’ अशी एक मराठीमध्ये म्हण आहे, पण गेल्या काही दिवसांत मात्र ‘गायीच्या नावाखाली’ काही माणसांना टार्गेट केलं जात आहे. गायीच्या पोटीत ३३ कोटी देव राहतात, हे हिंदू संस्कृतीतील मिथक आता ‘गायीच्या पोटात केवळ माणसांचा मृत्यू राहतो’ या थराला पोहचले आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या संदर्भातील गायीविषयीच्या पूर्वपरंपरेपासून व्यावहारिक कारणांपर्यंतच्या विविध प्रश्नांची चर्चा करणारी ही पुस्तके महत्त्वाची आहेत. या पुस्तकांच्या वाचनातून गोहत्याबंदीपासून गायीच्या उपयुक्ततेपर्यंत अनेक प्रश्नांच्या विविध बाजू समजून घ्यायला मदत होते.
१. गाईचे अर्थशास्त्र - वि. म. दांडेकर
केंद्र आणि काही राज्य सरकारांनी केलेली गो हत्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून सप्रमाण मांडले आहे. केंद्र सरकारने गोहत्याबंदीचा विचार केला, तेव्हा त्या पार्श्वभूमीवर प्रा. वि.म. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. यात दांडेकर यांनी आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून गायीच्या प्रश्नाची चर्चा केली आहे.
सुगावा प्रकाशन, पुणे
पाने – ७५, मूल्य – ७० रुपये. सवलत - १० टक्के
ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/316
……………………………………………………………………………………………
२. गोहत्या : एक यक्ष प्रश्न – संपा. अ. भि. शहा
या संपादित पुस्तकात ‘भारतातील गोसंप्रदाय’ (मुकंदी लाल), ‘गुरांचा प्रश्न’ (वि.म.दांडेकर), ‘गायींची कत्तल : आर्थिक बाजू’ (एम.एम. शहा) आणि ‘गायींची कत्तल : कायद्याची बाजू’ (एल.पी. साठे) असे चार विचारप्रवर्तक लेख आहेत. या पुस्तकाला अ.भि. शहा यांनी विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद दीपक उपाध्ये व नंदकुमार पुरोहित यांनी केली आहे.
सुगावा प्रकाशन, पुणे
पाने – ९६, मूल्य – ८० रुपये. सवलत - १० टक्के
ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688
……………………………………………………………………………………………
३. गाईचे मिथक - द्विजेंद्रनारायण झा
हा ‘मिथ ऑफ होली काऊ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. मूळ इंग्रजी पुस्तक बहुचर्चित असून त्यावर काही काळ बंदीही घातली गेली होती. या पुस्तकात गायीच्या पवित्र्यातील फोलपणा, गायीच्या मिथकाचा ऐतिहासिक वापर आणि वास्तव यावर भाष्य केले आहे. तसेच गाईचे ‘माता’ म्हणून असलेले मिथक, त्यातून निर्माण झालेली उग्र अस्मिता व गाईच्या मांसावरून दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांच्यावर झालेले हल्ले यांचा धर्मातील पितृसत्ता आणि जात वास्तवाशी कसा संबंध आहे याचीही चर्चा केली आहे.
सुगावा प्रकाशन, पुणे
पाने - १५८, मूल्य – १६० रुपये. सवलत - १० टक्के
ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688
……………………………………………………………………………………………
४. हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण - एस. एल. सागर
हिंदू कधीही गोमांस भक्षण करत नव्हते असा दावा केला जातो. मात्र हा या पुस्तकात लेखकांनी साधार खोडून काढला आहे. लेखकांनी वैदिक काळापासून हिंदू गोमांस भक्षण करत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करत होते, असे लेखक पुराव्यानिशी दाखवून देतात. गोरक्षा आंदोलनावरही यात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले, या प्रश्नाच्या उत्तराचाही शोध घेतला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे.
सुगावा प्रकाशन, पुणे
पाने - ९२ , मूल्य – १०० रुपये. सवलत – १० टक्के
ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2701
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment