बुक्सनामा : अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • http://www.booksnama.com/client/home
  • Sun , 23 April 2017
  • पडघम साहित्यिक बुक्सनामा ‌Booksnama अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर

सहा महिन्यापूर्वी डायमंड पब्लिकेशन्सने ‘अक्षरनामा’ हे मराठीतलं पहिलंवहिलं ‘डिजिटल डेली फीचर्स पोर्टल’ सुरू केलं. गेल्या सहा महिन्यांच्या काळात या पोर्टलने चांगले विषय, चांगला मजकूर, नवे लेखक आणि योग्य-परखड विश्लेषण यांच्या बळावर आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. लवकरच ‘अक्षरनामा’चे आय फोन अॅपही सुरू होईल. वेबसाइटही अधिक आकर्षक आणि सुटसुटीत होईल. त्याचबरोबर आणखी नवे लेखक आणि नवे विषय यांचाही समावेश होईल. चालू घटना-घडामोडींवरील लेखन शक्य तितक्या तत्परतेनं देण्याचा ‘अक्षरनामा’चा प्रयत्न असतो. त्यात प्रत्येक वेळीच यश येत असं नाही, पण तरीही रोज काही महत्त्वाच्या घडामोडींवरील लेख दिले जातात. कुणाच्याही बाजूने नाही आणि कुणाच्याही विरोधात नाही, अशी ‘अक्षरनामा’ची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे, यापुढेही राहील. कारण भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संकल्पनांशी बांधीलकी हे ‘अक्षरनामा’चं ब्रीद आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात ‘अक्षरनामा’ने आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे.

आजपासून ‘बुक्सनामा’ हे ‘अक्षरनामा’चं नवं भावंड ऑनलाईन माध्यमात दाखल होत आहे. मराठी पुस्तकं घरबसल्या ऑनलाईन खरेदी करता यावीत आणि तीही आकर्षक सवलतीमध्ये करता यावीत, हा ‘बुक्सनामा’चा उद्देश आहे. ऑनलाईन ग्रंथखरेदीसाठी खरं तर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इन्फीबिम या इंग्रजी बेवसाईटपासून बुकगंगा, मॅजेस्टिक ऑन द नेट, रसिक या मराठी बेवसाईटपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही आम्ही ‘बुक्सनामा’ ही ऑनलाईन ग्रंथखरेदीसाठीची वेबसाईट सुरू केली आहे. त्याची काही खास कारणं आहेत. ती तुम्हाला आमच्या या वेबसाईटला भेट दिल्यावर लक्षात येतीलच.

मराठीतल्या आघाडीच्या बहुतेक प्रकाशकांच्या स्वत:च्या बेवसाईटस आहेत. त्यावरून त्या त्या प्रकाशनसंस्थांची पुस्तकं घरबसल्या विकत घेता येतात. शिवाय बुकगंगा, मॅजेस्टिक ऑन द नेट, रसिक या बेवसाईटसवरूनही हवी ती पुस्तके विकत घेता येतात. ‘बुक्सनामा’ हा मराठीतील आघाडीच्या, नामवंत आणि लोकप्रिय लेखकांची पुस्तकं एकत्र उपलब्ध करून देईल. आघाडीच्या सर्व प्रकाशकांची पुस्तकंही इथं विक्रीसाठी उपलब्ध असतील. शिवाय ही पुस्तकं विशेष सवलतीमध्ये असतील. २५ टक्क्यांपर्यंत पुस्तक खरेदीवर सवलत दिली जाईल. एक हजाराच्या वरील पुस्तक खरेदीसाठी टपाल\कुरिअर खर्च आकारला जाणार नाही.

त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार सुटसुटीत आणि पारदर्शक पद्धतीने करता यावेत यासाठी Payumoney च्या सुरक्षित पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे द्वारा नेटबँकिंग, तसंच सर्व प्रकारच्या क्रेडीट, डेबिट कार्ड मार्फत व्यवहार करण्याची सुविधा असेल.

लवकरच ‘बुक्सनामा’वर मराठीमधील दुर्मीळ, दुर्लक्षित आणि विस्मरणात गेलेली पुस्तकंही आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ग्रंथवेड्या, ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथोपासक रसिकांसाठी ती पर्वणी असेल.

‘अक्षरनामा’प्रमाणेच ‘बुक्सनामा’चंही वेगळेपण तुम्हाला वेबसाईट पाहिल्यानंतर जाणवलेच. ‘अक्षरनामा’प्रमाणेच विश्वासार्हता, दर्जा आणि तत्परता हा ‘बुक्सनामा’चाही विशेष असेल. तेव्हा तुम्हाला हवी असलेली पुस्तकं पहा, त्याविषयी जाणून घ्या आणि आवडलेली पुस्तकं आकर्षक सवलतीमध्ये विकत घ्या.

ट्रेंड येतात आणि जातात, पण परंपरांचं तसं नसतं. त्यांची मुळं मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. डायमंड पब्लिकेशन्सच्या माध्यमातून गेली ३० वर्षं आम्ही मराठी-इंग्रजी ग्रंथप्रकाशन आणि वितरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या या साहित्यसेवेची ‘बुक्सनामा’ व ‘अक्षरनामा’ ही या नव्या पारंब्या आहेत.

तुमचा अभिप्राय, सूचना आणि मतं आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत.

‘बुक्सनामा’ हे अल्टिमेट ऑनलाईन बुक स्टोअर आहे!

……………………………………………………………………………………………

‘बुक्सनामा’ला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/home

……………………………………………………………………………………………

नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी पहा -

 http://www.booksnama.com/client/authors

……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......