शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...
ग्रंथनामा - झलक
धनंजय श्रीराम सानप
  • लेखक धनंजय सानप आणि ‘ज्वारीची कहाणी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 November 2024
  • ग्रंथनामा झलक धनंजय सानप Dhananjay Sanap ज्वारीची कहाणी JWARICHI KAHANI ज्वारी JWARI

तरुण पत्रकार धनंजय सानप यांचं ‘ज्वारीची कहाणी’ हे पहिलंवहिलं संशोधनपर पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत मिळालेल्या फेलोशिपसाठी या शेतकऱ्याच्या मुलाने विषय निवडला, तो ‘ज्वारी’ या पिकाबद्दलचा. त्यासाठी तो महाराष्ट्रभर फिरला. अनेक शेतकऱ्यांशी, शेतीअभ्यासकांशी बोलला. ग्रंथालयात बसून अभ्यास केला, म्हणजे ‘फिल्ड वर्क’ आणि ‘लायब्ररी वर्क’, यातून हे पुस्तक तयार झालं आहे. अलीकडच्या काळातलं ‘ज्वारी’ या पिकाबद्दलचं हे अशा स्वरूपाचं पहिलंच पुस्तक असावं. या पुस्तकाला या पत्रकाराने लिहिलेलं हे मनोगत...

.................................................................................................................................................................

‘फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स’च्या आकडेवारीनुसार भारतातील ७० टक्के लोकांचं वास्तव्य ग्रामीण भागात आहे. एकूण शेतकऱ्यांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आहे; तर एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषिक्षेत्राचा वाटा १५ ते १६ टक्के आहे. भारतात कृषिक्षेत्रातील समस्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.

मानवाला शेतीचा शोध दहा हजार वर्षांपूर्वी लागला, असं मानलं जातं. गुहेत राहून शेती करणारा माणूस आणि आधुनिक युगामध्ये शेती करणारा माणूस यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. कालानुरूप शेतीत अनेक स्थित्यंतरं येत गेली. ‘औद्योगिक क्रांती’ने अनेक क्षेत्रांची भरभराट झाली. पुढे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात मोठमोठे बदल घडले. माहिती तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सनं भविष्यातील जगाची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे.

या सर्व प्रकारच्या बदलांचा शेती क्षेत्रावर कमी-अधिक असा सकारात्मक प्रभाव कायम राहिला आहे. भारत स्वातंत्र्यानंतर अन्नधान्यासाठी अन्य राष्ट्रांवर अवलंबून होता. ७०च्या दशकात ‘हरित क्रांती’च्या प्रयोगामुळे भारत अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. पुढे ‘धवल क्रांती’ने दूधक्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणले. जागतिकीकरणाचा फायदाही शेती क्षेत्रातला कमी-अधिक प्रमाणात झाला. मात्र आजही भारतात शेती क्षेत्रातील हजारो वर्षे जुनाट म्हणाव्यात, अशा समस्यांवर ठोस उपाययोजना अमलात आलेल्या नाहीत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शेती कसण्यासाठी सुपीक जमीन, पुरेसा पाणीसाठा, दर्जेदार शेती निविष्ठा, शेतमाल बाजारपेठा, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यांची आवश्यकता असते. शेतीचे प्रश्न बहुआयामी म्हणावेत, असे आहेत. प्रत्येक प्रश्नावर एकच अंतिम उत्तर असू शकत नाही. उत्तम पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या वरील घटकांची पूर्तता झालीच आणि त्यातून गुणवत्तापूर्ण दर्जाचा शेतमाल तयार झाला, तरीदेखील बाजारात शेतमालाला किती दर मिळेल, याची खात्री शेतकऱ्यांना नसते.

त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा चारही बाजूंनी समजून घेणे आवश्यक असते. अन्यथा शेतीवर प्रत्यक्ष अवलंबून असलेल्या शेतकरीवर्गाची उपेक्षा होतच राहते आणि शेतीक्षेत्राची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच्या मार्गाने वाटचाल होऊ लागते.

शेती स्थित्यंतराच्या प्रकियेत अनेक पिकं आली. शेतकऱ्यांनी कालानुरूप विविध पिकांची त्या-त्या वेळी उत्पनाचा प्रमुख स्रोत म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड केली, कालांतराने संबंधित पिकांच्या उत्पादनातून उत्पन्नाची शाश्वती मिळाली नाही किंवा कमी उत्पादन, बाजारपेठ, दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आणि निसर्गाचा लहरीपणा अशा कारणांनी त्या-त्या पिकांची लागवड करणं बंद केलं आणि त्याऐवजी उत्पन्नाची हमी देणारी पिकं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे पीकपद्धतीत बदलसुद्धा झाले, पण आर्थिक मोबदला मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांना फायदेशीर असलेल्या पिकांकडेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

अर्थात यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका योग्यच आहे. मुळात खर्च आणि नफा यांचं गणित जुळलं नाही, तर शेती तोट्यात येते. पिकांवर केलेला खर्चदेखील उत्पन्नातून मिळत नसेल, तर शेतकरी तोटा करणारं पीक शेतात घेणार नाही, हा तार्किक विचार त्यामागे आहे. त्यामुळे शेतकरी म्हणजे आळशी, फुकटखाऊ, अज्ञानी अशी धारणा बाळगणे, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.

...........................................................................................................................................

राज्यात ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. दिवसेंदिवस वातावरणीय बदलांमुळे भूजलपातळी कमी होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी इतर व्यवसायांकडे वळू लागला आहे. त्यात शेतीक्षेत्राशी संबंधित मुख्य समस्येत सततचा दुष्काळ ही प्रमुख समस्या असतानाही कमी पाण्यात आणि कमी खर्चात चार-पाच महिन्यांत हातात येणाऱ्या ‘ज्वारी’सारख्या पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. यामागे नेमकी कारणं काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा ज्वारीकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी काय करावं लागेल, या दोन्ही गोष्टींचा विचार सुरू होता.

...........................................................................................................................................

साधारणत दहा वर्षांपूर्वी विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे आणि सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील कोरडवाहू शेतकरी ‘ज्वारी’ पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड करत. सोलापूरला तर ‘ ‘ज्वारी’चं कोठार’ मानलं जात होतं. पण अलीकडच्या २० वर्षांत ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली आहे, ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.

राज्यात ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. दिवसेंदिवस वातावरणीय बदलांमुळे भूजलपातळी कमी होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी इतर व्यवसायांकडे वळू लागला आहे. त्यात शेतीक्षेत्राशी संबंधित मुख्य समस्येत सततचा दुष्काळ ही प्रमुख समस्या असतानाही कमी पाण्यात आणि कमी खर्चात चार-पाच महिन्यांत हातात येणाऱ्या ‘ज्वारी’सारख्या पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. यामागे नेमकी कारणं काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा ज्वारीकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी काय करावं लागेल, या दोन्ही गोष्टींचा विचार सुरू होता.

गावी गेल्यानंतर शेतकऱ्यांकडून याबद्दल जुजबी माहिती मिळत होती. पण नेमकं पाणी मुरतं कुठं, याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळत नव्हतं. यादरम्यान ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी शेती क्षेत्राच्या अवस्थेबद्दल चर्चा होत होती. त्याच वेळी ज्वारी पिकावरसुद्धा चर्चा होऊ लागली. कारण चार वर्षांपूर्वी ‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या’ या लेखमालेच्या निमित्ताने कांदापट्ट्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन एक अहवाल तयार केला होता. तो ‘साधना’ साप्ताहिकाने पाच भागांमध्ये प्रसिद्ध केला. कांद्याप्रमाणेच ज्वारीचा पिकाचा अभ्यास करता येईल का, याचा अंदाज घेत होतो.

दरम्यान ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप’ची जाहिरात आली. ज्वारीबद्दल विचार सुरू असल्याने फेलोशिपसाठी अर्ज केला. प्रतिष्ठानने ‘वैचारिक-ललितेतर’ या विभागातून अर्ज फेलोशिपसाठी निवडला. आणि त्यानंतर संपादक विनोद शिरसाठ यांनी या विषयाच्या हाताळणीची रूपरेखा आखून दिली. फेलोशिपचा कालावधी एक वर्षाचा होता.

या वर्षभरात राज्यातील प्रमुख ज्वारी उत्पादक जिल्ह्यांना भेटी दिल्या. ज्वारी उत्पादक शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार, अभ्यासक, आणि ग्राहक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. विविध कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना भेटी दिल्या.

...........................................................................................................................................

देशातील शेतकऱ्यांनी ‘हरित क्रांती’चा प्रयोग यशस्वी करून दाखवला. परंतु अन्नधान्यात स्वयंपूर्णता गाठल्यानंतर मात्र या प्रयोगाच्या पुढच्या टप्प्याकडील वाटचाल ठप्प झाली. खरं म्हणजे ज्वारी आणि एकूणच भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हरित क्रांती’चा पॅटर्न राबवता येऊ शकतो. पण त्यासाठी शासनव्यवस्था अनुकूल दिसत नाही.

...........................................................................................................................................

याच दरम्यान शेती विषयाची आवड असल्याने ‘अ‍ॅग्रोवन डिजिटल’मध्ये पूर्ण वेळ पत्रकारितेला सुरुवात केली. ‘ॲग्रोवन’चे निवासी संपादक आणि ‘पोशिंद्याचे आख्यान’ या पुस्तकाचे लेखक रमेश जाधव यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळू लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यापुरतं मर्यादित न राहता उपायाच्या दिशेनं जायला हवं, याची जाणीव अधिक तीव्रतेने झाली. परिणामी अन्य राज्यांत, देशांत ज्वारी पिकाची परिस्थिती काय आहे, याबद्दलसुद्धा अभ्यासाला सुरुवात केली.

या सर्व प्रक्रियेत प्रतिष्ठानकडून ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके आणि साहित्य समीक्षक रणधीर शिंदे यांची मेंटॉर म्हणून मोलाची भूमिका राहिली. त्यामुळे अभ्यासाला गती मिळाली. प्रतिष्ठानमुळे शेती क्षेत्रातील अभ्यासक, जाणकार यांची दालनं खुली झाली. अभ्यासक, जाणकार यांची मतं, विचार आणि अनुभवामुळे माझ्या आकलनात भर पडली. त्याचे पुस्तकात संदर्भ दिलेले आहेत. आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांनी दैनंदिन कामातून वेळ काढून मला पडलेल्या प्रश्नांची निस्संकोच उत्तरं तर दिलीच, पण प्रत्येक वेळी चर्चा करण्यासाठी तयारी दाखवली आणि वेळही दिला. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक आणि धन्यवाद.

देशातील शेतकऱ्यांनी ‘हरित क्रांती’चा प्रयोग यशस्वी करून दाखवला. परंतु अन्नधान्यात स्वयंपूर्णता गाठल्यानंतर मात्र या प्रयोगाच्या पुढच्या टप्प्याकडील वाटचाल ठप्प झाली. खरं म्हणजे ज्वारी आणि एकूणच भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हरित क्रांती’चा पॅटर्न राबवता येऊ शकतो. पण त्यासाठी शासनव्यवस्था अनुकूल दिसत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ आणि २०२३ या दोन वर्षी ‘भरडधान्य वर्षं’ साजरी केली गेली. पण या दोन्ही वर्षांतून फारसं काही हाती लागलं नाही. कारण यामध्ये शेतकरी मध्यवर्ती नव्हता. एखाद्या पिकाला प्रोत्साहन द्यायचं असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांना मध्यवर्ती ठेवून धोरण आखावं लागतं. परंतु त्याची जाणीवच शासनाला नाही, असं दोन्ही वर्षांतील सोहळे पाहिल्यानंतर खेदाने म्हणावं लागतं.

या पुस्तकात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पुस्तक पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची कालमर्यादा होती. त्यामुळे या पुस्तकात काही उणिवा असू शकतात किंवा काही विषयांना स्पर्श करायचं राहून गेलं, असं वाचकांना वाटू शकतं. कारण मर्यादित वेळेत पुस्तक पूर्ण करणं बंधनकारक होतं.

दुसरं म्हणजे या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. परंतु त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या प्रत्येक विषयांवर संशोधन करता येईल. शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं.

ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तकात सुचवलेल्या उपाययोजनांनुसार धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, आणि ज्वारीसारख्या पिकाला पसंती देतील, असा विश्वास वाटतो.

‘ज्वारीची कहाणी’ - धनंजय सानप

साधना प्रकाशन, पुणे | पाने - १२३ | मूल्य - १५० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......