भाजपच्या कोंडीचं गुऱ्हाळ!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, Eknath Shinde
  • Sat , 30 November 2024
  • पडघम राज्यकारण महायुती Maha Yuti देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis एकनाथ शिंदे Eknath Shinde अजित पवार Ajit Pawar

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राज्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांच्या ‘महायुती’ला मिळून सव्वादोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या... म्हणजे अतिशय स्पष्ट बहुमत मिळालं आहे. निकाल लागून नऊ दिवस होत आहेत, तरी अजून मुख्यमंत्री ठरतच नाहीये. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, हे कळत नाहीये.

‘महायुती’त सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात सर्व काही आलबेल नाही, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं, तरी अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही, असा याचा अर्थ आहे. माध्यमांच्या आणि त्यातही प्रकाश वृत्तवाहिन्यांच्या बातम्यावर जाऊ नका. त्यांची घाई सर्वश्रुत आहे. राज्याचे सर्व निकाल हाती येण्याच्या आधीच वाहिन्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या शपथविधीची तारीख व स्थळ जाहीर करून टाकलं, आणि आतापर्यंत ते तीन वेळा बदललं.

मतदार कधीही मुख्यमंत्री, मंत्री किंवा विरोधी पक्षनेता निवडून देत नाहीत, तर ते विधानसभेचा सदस्य निवडून देतात. विजयी उमेदवारानं सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर तो अधिकृत आमदार होतो. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक होते आणि तो (पक्षश्रेष्ठींनी ठरवलेला!) नेता मग मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो, अशी ती प्रक्रिया असते.

इथे तर तीन पक्ष (महा)युतीत आहेत आणि त्यापैकी केवळ राष्ट्रवादीच्याच विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन अजित पवार यांचं नाव नेता म्हणून निश्चित झालेलं आहे. भाजप आणि शिवसेनेची विधिमंडळ बैठक अजून बाकी आहे; (अद्याप निवड न झालेल्या) विधानसभा अध्यक्षाचा विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार स्वत:च्या हाती घेत सरकार स्थापनेच्या एकापाठोपाठ बातम्या देण्याची नुसती घाई आणि स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार नक्कीच आहेत, पण त्यांची निवड त्या पदावर अजूनही झालेली नसताना त्यांचा जणू काही ‘भोंगा’ असल्याची वाहिन्यांची घाई अनेक संशय निर्माण करण्यास वाव देणारी आहे, हे निश्चित. 

निकालानंतरच्या गेल्या नऊ दिवसांतील राजकीय घटनांचं सखोल विश्लेषण (swot analysis) केलं, तर लक्षात येतं की, एवढ्या मोठ्या आणि अनपेक्षित विजयानं भाजपच कोंडीत सापडला आहे-

१) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे सर्वांत प्रबळ दावेदार आहेत.

२) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.

३) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पाठिंबा आहे. ही बातमी क्षणभर खरी मानूयात, पण भाजपच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत संघ सतत हस्तक्षेप करत नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

४) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही, तर सशर्त पाठिंबा आहे (त्या अटी अजून अटकळबाजीच आहेत) तरी महाराष्ट्रात अजून सरकार का स्थापन होऊ शकलेलं नाही!

...........................................................................................................................................

देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विनाअट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनं साथ सोडली, तरी भाजप-राष्ट्रवादी ही युती सत्ताप्राप्तीसाठी पुरेशी बहुमतात आहे. तरी भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देतो, या म्हणण्याला पुष्टी नको, असा मतप्रवाह प्रभावी आहे... म्हणून शिंदे गट दुरावेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत. या सर्व चर्चा आहेत, हे खरं असलं तरी, याचा एक अर्थ भाजपश्रेष्ठींत अजून महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत एकमत झालेलं नाही.

...........................................................................................................................................

दिल्लीतून मिळालेली आणि संघाशी संबंधित काहींशी बोलल्यावर हाती आलेली माहिती अशी-

१) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत भाजप श्रेष्ठी अजून एकमतावर आलेले नाहीत. मराठा आणि बहुजन समाजाच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एखादा नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा आणि फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी घ्यावं, असा  एक मतप्रवाह दिल्लीत आहे, पण यातील एक अडथळा असा की, नवा चेहरा राष्ट्रवादी तसंच शिवसेनेला मान्य व्हावा लागेल आणि तसा चेहरा (यातील काही नावंही समजली आहेत.) अजून तरी भाजपला सापडलेला नाही. म्हणूनच महायुतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली असू शकते.

२) भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जे सात-आठ संख्याबळ कमी पडते, त्याची चाचपणी या दोन/तीन दिवसांत होऊ शकते, पण ही स्वबळाची शक्यता कमी आहे.

३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विनाअट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनं साथ सोडली, तरी भाजप-राष्ट्रवादी ही युती सत्ताप्राप्तीसाठी पुरेशी बहुमतात आहे. तरी भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देतो, या म्हणण्याला पुष्टी नको, असा मतप्रवाह प्रभावी आहे... म्हणून शिंदे गट दुरावेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या सर्व चर्चा आहेत, हे खरं असलं तरी, याचा एक अर्थ भाजपश्रेष्ठींत अजून महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत एकमत झालेलं नाही. याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणं राजकारण हा अनेक शक्यतांचा खेळ असतो (politics is game of possibilities) म्हणूनच सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी, भाजपश्रेष्ठींकडून सरकार स्थापनेला विलंब होत असावा, असं म्हणण्यास जागा आहे.

अर्थात एक निर्विवाद आहे, आणि ते म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि अर्थात त्यात आघाडीवर नाव नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे, कारण भाजपच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे. मात्र ते मुख्यमंत्रीपदावर फार फार तर अडीच-तीन वर्षंच असतील. पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांना केंद्रात एखादं बडं पद दिलं जाईल आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे सोपवलं जाईल, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

अर्थात नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी गुऱ्हाळं अहोरात्र पेटलेलीच असतात. या चर्चा खोट्या, एकतर्फी नसतात आणि त्या लगेच खऱ्या ठरतात असंही नसतं. कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नसतो. काही चर्चा खऱ्या ठरण्यासाठी तीन-चार वर्षांचा अवधी लागतो असा अनुभव आहे.

थोडक्यात, सध्या महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचं निर्णय केंद्र नवी दिल्ली झालेलं आहे. आणि तिथं चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. गुऱ्हाळात गूळ पूर्ण तयार होईपर्यंत शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......