महायुतीची ‘लाडकी बहीणभाऊ’ जोमात, महाविकास आघाडी कोमात!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुतीची बाेधचिन्हे
  • Sat , 23 November 2024
  • पडघम राज्यकारण देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis एकनाथ शिंदे Eknath Shinde अजित पवार Ajit Pawar महायुती Maha Yuti शरद पवार Sharad Pawar उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नाना पटोले Nana Patole महाविकास आघाडी MVA

‘धक्कादायक अन् अनपेक्षित’ या दोन शब्दांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करावं लागेल. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हाच महायुतीला विजयाची संधी असल्याचा कल जाणवत होता, मात्र महायुतीचा असा अभूतपूर्व विजय होईल, याचा अंदाज कुणालाच आलेला नव्हता.

महायुतीतल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची ‘शिवसेना’ आणि अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’नं या निवडणुकीत संपादन केलेलं यश विरोधकांचा अक्षरक्ष: धुव्वा उडवणारा आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेचे निकाल लागत नाहीत, असं प्रतिपादन या स्तंभातून करण्यात आलं होतं, त्याला पुष्टी देणारा हा निकाल आहे. लग्नाच्या पंगतीत जेवायला पोहोचावं, तर अन्न संपलेलं आणि परत जाण्यासाठी बाहेर यावं, तर चपला-बूट चोरीला गेलेले, अशी अवस्था विरोधकांची झालेली आहे!

या निवडणुकीच्या निकालाचे तीन महत्त्वाचे निर्णय असे आहेत – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेने’ला जनतेचा पाठिंबा आहे आणि हेच म्हणणं अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’लाही लागू आहे. याचा अर्थ खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती, यावर महाराष्ट्रातील मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे दोन्ही पक्ष राज्यस्तरीय असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जर जनतेचा कौल अनुकूल मिळाला नसता, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षच ‘दस नंबरी’ आहेत, असा दावा करता आला असता, पण मतदारांनी ती संधी नाकारली आहे.

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे खडबडून जागे झाले आणि त्यांनी अतिशय चतुराईनं मतदारांना आकर्षित करणारे निर्णय घेतले. त्यात ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ यासारख्या योजनांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केडर महायुतीच्या बाजूनं ठोसपणे उभं राहिलं. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा महायुतीचा विजय आहे.

काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष विधानसभा निवडणुकीत महायुती इतके नियोजनबद्ध नव्हते, हे वारंवार दिसून आलं.

राजकारण हा जसा अनिश्चितेचा खेळ आहे तसाच तो अनेक शक्यतांचाही खेळ असतो (politics is game of possibilities) आणि त्या सगळ्या शक्यता आपल्या पदरात पाडून घेण्यात महायुतीनं निर्णायक धोरणीपणा दाखवला. जागा वाटपासपासून ते प्रचारापर्यंत महायुतींच्या नेत्यांमध्ये संवाद असल्याचं दिसत होतं. महाआघाडीत मात्र नेमक्या याच राजकीय समंजसपणाचा अभाव होता. जागा वाटपापासून महायुतीत खडाखडी सुरू झाली, ती शेवटपर्यंत थांबलीच नाही. 

...........................................................................................................................................

चाळीस वर्षं आक्रमक ‘हिंदुत्व’ मांडणाऱ्या कार्यकर्त्याला एका रात्रीतून समोरच्याशी हातमिळवणी करणं कठीण जात होतं. भावनेच्या भरात नेतृत्वासोबत हा शिवसैनिक लोकसभा निवडणुकीत राहिला खरा, पण ती लाट ओसरताच विधानसभा निवडणुकीत तो एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला आहे, हाही या निकालाचा एक अर्थ आहे. भाजपला विरोध करण्याच्या नादात शिवसेनेचा संकोच होत आहे, हे ठाकरे यांच्या लक्षातच आलं नाही आणि या निकालानं त्यांच्या शिवसेनेला राज्यात पाचव्या क्रमांकावर ढकललं आहे

...........................................................................................................................................

निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री कोण असा कलगीतुरा महाआघाडीत रंगला आणि तो ‘बाजारात तुरी…’ला साजेसा होता. प्रचारातही महाआघाडीकडून जेवढा काही वाचाळपणा झाला, त्याचा शिक्षित मतदारांवर निश्चितच विपरित परिणाम झाला. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ यांसारख्या महायुतीच्या योजनांवर उधळपट्टी म्हणून टीका करणाऱ्या महाविकास आघाडीनं नंतर या योजना जशाच्या तशा उचलाव्यात, हा ‘आदर्श विराधाभास’ होता आणि तो चाणाक्ष मतदारांच्या लक्षातही आला.

राजकारण म्हटलं की, नेतृत्वाबद्दल राजी-नाराजी, पक्षात फूट, आमदार-खासदार इकड-तिकडं जाणं, हे अपरिहार्यच असतं आणि त्यामुळे भावानाक्षुब्ध होणं अपरिहार्यच असतं. पक्षफुटीचा तो वार मोठी जखम करणारा असला, तरी झालेली जखम बाजूला ठेवून राजकारण पुढे नेणारा नेता लोकांना आवडतो. भावनांची ही लाट फार काळ टिकत नाही, याचं भान पक्ष नेतृत्वाला ठेवावंच लागतं.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मात्र हे भान पूर्णपणे सुटलं. ठाकरेंसह त्यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे सर्वच नेते मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची ‘मिंधे’, ‘खोके’, ‘गद्दार’ अशी हेटाळणी करत बसले. अशी हेटाळणी भावनेची लाट ओसरल्यावर लोकांना ऐकायला नकोशी वाटते, हे ठाकरे गटाला कळलं नाही आणि त्यांच्या आक्रस्ताळ्या प्रचाराचा फटका शिवसेनेला बसला.

चाळीस वर्षं आक्रमक ‘हिंदुत्व’ मांडणाऱ्या कार्यकर्त्याला एका रात्रीतून समोरच्याशी हातमिळवणी करणं कठीण जात होतं. भावनेच्या भरात नेतृत्वासोबत हा शिवसैनिक लोकसभा निवडणुकीत राहिला खरा, पण ती लाट ओसरताच विधानसभा निवडणुकीत तो एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला आहे, हाही या निकालाचा एक अर्थ आहे.

...........................................................................................................................................

या विधानसभा निवडणुकीत पवार ज्या तडफेनं फिरले, ज्या कुशलतेनं त्यांनी पक्ष पुन्हा उभा केला, प्रचाराला गती दिली, ते सगळंच स्तिमित करणारं होतं. पवारांची साथ सोडलेले पुन्हा निवडून येत नाही, हा आजवरचा समज ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवणार, अशी हवाही निर्माण झाली होती. मात्र मतदारांनी पवारांना पूर्वीसारखी साथ दिली नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष सहाव्या नंबरवर फेकल्या गेला.

...........................................................................................................................................

भाजपला विरोध करण्याच्या नादात शिवसेनेचा संकोच होत आहे, हे ठाकरे यांच्या लक्षातच आलं नाही आणि या निकालानं त्यांच्या शिवसेनेला राज्यात पाचव्या क्रमांकावर ढकललं आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादाच या निकालातून उघड झाल्या आणि त्याचा अचूक फायदा एकनाथ शिंदे यांनी उचलला.

राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचं असो, मुख्यमंत्री कोणीही असो, गेल्या पाच दशकांत महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार यांच्याभोवती केंद्रित झालेलं आहे. पवारांशी पंगा म्हणजे आत्मघात, असं समीकरण रूढ झालेलं आहे. पवारांचं राजकारण भाजपनुकूल आहे, हे प्रस्तुत पत्रकाराचं लाडकं प्रतिपादन आहे आणि त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही डगरीवर पाय ठेवत पवारांची राजकीय वाटचाल सुरू आहे. तरी त्यांची प्रतिमा ‘सेक्युलर’ अशीच रंगवली गेली.

अजित पवार फुटून निघाल्यावर मात्र पवारांनी भाजपशी केलेली चुंबाचुंबी प्रकाशात येत गेली आणि त्यांच्या महाराष्ट्रावरील एकछत्री अंमलाला तडे जाऊ लागले. अर्थात पवारांची राष्ट्रवादी फुटण्याचं हे एकमेव कारण नाही, तर केंद्र सरकारच्या चौकशी यंत्रणांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना निर्दयपणे कोंडीत पकडलेलं होतं, हेही तेवढंच खरं.  

वयाच्या या टप्प्यावर या विधानसभा निवडणुकीत पवार ज्या तडफेनं फिरले, ज्या कुशलतेनं त्यांनी पक्ष पुन्हा उभा केला, प्रचाराला गती दिली, ते सगळंच स्तिमित करणारं होतं. पवारांची साथ सोडलेले पुन्हा निवडून येत नाही, हा आजवरचा समज ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवणार, अशी हवाही निर्माण झाली होती. मात्र मतदारांनी पवारांना पूर्वीसारखी साथ दिली नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष सहाव्या नंबरवर फेकल्या गेला.

...........................................................................................................................................

राहुल गांधी नावाच्या वृक्षाखाली ‘वाढ खुंटलेले बोन्साय’ म्हणजे राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य नेते आहेत. हे ना राज्याचे नेते, ना विभागाचे, ना जिल्ह्याचे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते त्या त्या मतदारसंघाचे सुभेदार आहेत आणि त्यांची ही सुभेदारी मोडीत निघाल्याचं जमा आहे. त्यातच राज्यातल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडलेली आहेत. हे म्हणजे सैन्याशिवाय लढणाऱ्या सरदारासारखं आहे.

...........................................................................................................................................

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काँग्रेसची दैना उडाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत असलेल्या ४४ जागांवरून काँग्रेस पक्ष निम्म्यावर घसरला आहे. मुळात काँग्रेसला राज्यात एकमुखी लोकप्रिय नेतृत्वच नाही. राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा वाडी-तांड्यापर्यंत थेट संपर्क नाही. राहुल गांधी नावाच्या वृक्षाखाली ‘वाढ खुंटलेले बोन्साय’ म्हणजे राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य नेते आहेत. हे ना राज्याचे नेते, ना विभागाचे, ना जिल्ह्याचे.

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते त्या त्या मतदारसंघाचे सुभेदार आहेत आणि त्यांची ही सुभेदारी मोडीत निघाल्याचं जमा आहे. त्यातच राज्यातल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडलेली आहेत. हे म्हणजे सैन्याशिवाय लढणाऱ्या सरदारासारखं आहे.

राहुल गांधींच्या भांडवलावर या नेत्यांनी निवडणुका तर लढवल्या, पण ते भांडवल तुटपुंजं आहे, हेही या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे. मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्या नाना पटोलेंचा अवघ्या काहीशे मतांनी विजय या म्हणण्याला पुष्टी देणारा आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या अनेक मातब्बरांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं.

महायुतीच्या विजयानं काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी, हे तिन्ही पक्ष इतके दिवाळखोरीत निघाले आहेत की, स्वबळावर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही यापैकी एकाही पक्षाच्या वाट्याला येऊ शकत नाही.

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढला आणि या निवडणुकीत सगळ्यात जास्त बॅकफूटवर फडणवीसच होते. ‘मराठ्यांचा शत्रू’, ‘पेशवा’, ‘टरबुज्या’ अशा शेलक्या विशेषणांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या भक्तांनी फडणवीस यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली. शिवाय लोकसभा निवडणुकीतील पराभवही फडणवीस यांच्या नेतृत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या निवडणुकीत फडणवीस हे खलनायक क्रमांक एक ठरवले गेले होते. समाजमाध्यमांवरून त्यांना अवमानाची लाखोळीच वाहिली गेली होती. थोडक्यात परिस्थिती खूपशी प्रतिकूल आणि प्रतिस्पर्धांत शरद पवार यांच्यासारखा कसलेला मल्ल होता. या निकालात भारतीय जनता पक्षानं आजवर कधी नव्हे एवढं यश महाराष्ट्रात संपादन केलं आहे. विरोधी पक्षातील पक्षांचं बळ भाजपच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्तबद्ध साथ, हेही फडणवीस यांच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे.

या वेळेची निवडणूक वाढता सामाजिक द्वेष वृद्धिगंत करेल, अशी भीती संवेदनशील माणसांकडून व्यक्त केली जात होती. महाराष्ट्र जात आणि धर्माच्या आधारावर विभागला  जाणार असाही धोका होता. मात्र मतदारांनी ही भीती आणि धोका उधळून लावला आहे. आता जनतेच्या विश्वासाला उतरण्याची जबाबदारी महायुतीतल्या तिन्ही पक्षांची आहे. महायुतीच्या या यशातून काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष प्रगल्भपणे वेध घेऊन पुन्हा सावरतील, अशी आशा बाळगू या.

निवडणूक म्हटल्यावर जय-पराजय चालणारच. महायुतीतील तिन्ही पक्षांनी अभूतपूर्व यश मिळवलं आहे, हे काही विरोधी पक्षाला उमदेपणानी मान्य करता आलं नाही. निकोप लोकशाहीचं हे लक्षण नव्हे. मतमोजणी सुरू झाल्यावर मतदान ‘मॅनेज’ करता येत नाही, इतकंही प्राथमिक ज्ञान विरोधी पक्षांना नसावं, हे फारच बौद्धिक दारिद्रयाचं लक्षणं आहे. त्यापेक्षा ‘बचेंगे हैं तो और लढेंगे’ असा सकारात्मक पवित्रा जर विरोधी पक्षांनी घेतला असता, तर ते शोभून दिसलं असतं!

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आणि ‘वंचित’ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बुडबुडे आहेत, हेही या निकालानं सिद्ध केलं आहे .

जाता जाता – कोणत्याही निवडणुकीतील लोकप्रियतेचे निकष पूर्णपणे मतदारांच्या हाती कसे असतात याची एक गंमत – कुणी अझहर खान नावाचा एक नट आहे! इन्टाग्रामवर त्याचे ५.६ मिलियन फॉलोअर आहेत म्हणे!! त्याला या निवडणुकीत ९२ मतं पडली आहेत!!!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......