अमेरिकेची आणि ‘अमेरिकेच्या लोकशाही’ची धोक्याची घंटा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुर्दैवी पुनरागमनाने वाजली आहे...
पडघम - विदेशनामा
निखिल कुलकर्णी
  • हरलेल्या कमला हॅरिस आणि जिंकलेले डोनाल्ड ट्रम्प
  • Sat , 23 November 2024
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump जो बायडन Joe Biden कमला हॅरिस Kamala Harris

१.

नुकतीच अमेरिकेतली राष्ट्रीय निवडणूक पार पडली. भारतीय वंशाची आई आणि कृष्णवर्णीय वडील लाभलेल्या कमला हॅरिस आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा अत्यंत दारुण पराभव झाला. २०२०मध्ये जो बायडेन यांनी जिंकलेल्या सर्वच्या सर्व swing states हॅरिस यांनी गमावल्या. २०२०मध्ये जो बायडेन यांना ८१ दश लक्ष मते मिळाली होती. ती घटून हॅरिस यांना केवळ ६५ दश लक्ष मते मिळाली.

२०२०मध्ये जो बायडेन यांचा सामना डोनाल्ड ट्रम्प यांच्याच बरोबर झाला होता. तेव्हा ट्रम्प यांना साधारण ७४ दश लक्ष मते मिळाली होती. २०२४मध्येदेखील ट्रम्प यांना ७५ दश लक्ष मते मिळाली. म्हणजे ट्रम्प यांच्या मतांमध्ये २०२०पासून २०२४पर्यंत केवळ १ दश लक्ष (७५ - ७४ = १) मतांची वाढ झाली. आणि याच्या उलट हॅरिस यांची किंवा पर्यायाने त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाची १६ दश लक्ष (८१ - ६५ = १६) मते कमी झाली. एक पक्ष म्हणून हा एक अत्यंत मोठा पराभव आहे, हे मान्यच करावे लागेल.

असे का झाले असावे? नेमके कुणाचे चुकले? हॅरिस कमी पडल्या, जो बायडेन, बराक ओबामा कमी पडले की, त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष कमी पडला?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एका बाजूला एक अत्यंत नावाजलेल्या वकील आणि दुसऱ्या बाजूला धनाढ्य उद्योगपती, असा हा सामना होता. वास्तविक हॅरिस यांची संपूर्ण कारकीर्द दृष्ट लागावी अशी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात भारतीय वंशाची आई आणि कृष्णवर्णीय वडिलांच्या पोटी त्या जन्माला आल्या. त्यांच्या आई अमेरिकेत कॅन्सरवरती संशोधन करत होत्या, आणि त्यांचे वडील अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. कमलाजी खूप लहान असताना त्यांचे आई-वडील त्यांना Civil Rights movementच्या मोर्चाला घेऊन जात. तेव्हापासूनच हॅरिस यांच्यावर राजकारणाचे आणि पीडितांच्या आणि शोषितांच्या समाजकारणाचे संस्कार होत गेले. दुःखितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या बाजूला उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करण्याची त्यांची आंतरिक तळमळ त्यांच्या आई-वडिलांनी जोपासली.

पुढे वडील विभक्त झाल्यावरदेखील त्यांच्या भारतीय माउलीने हॅरिस यांचे संगोपन एखाद्या भारतीय मुलीसारखे न करता त्यांना कृष्णवर्णीय नागरिक म्हणूनच मोठे केले. कदाचित या समाजाला त्यांची आणि त्यांच्या लढवय्या बाण्याची जास्त गरज आहे असे त्यांना वाटले असेल. पण समस्त भारतीय समाजालादेखील अभिमान वाटावा असाच तो निर्णय ठरला. आणि त्यातून एक वादळी, झंझावाती आणि तितकेच हळवे, विचारशील आणि सर्जनशील नेतृत्व उभे राहिले.

अमेरिकेच्या district attorney पदापासून अगदी थोड्या काळात त्या California राज्याच्या Attorney Gerenal झाल्या. या काळात त्यांनी घेतलेले काही निर्णय अतिशय वादळी ठरले. ते पोलिसांच्या हत्येचे आणि त्यातल्या गुन्हेगाराला देहान्त शिक्षा देण्याचे प्रकरण असो किंवा किरकोळ गुन्हेगाराना कठोर शिक्षेऐवजी समुपदेशनातून सुधारण्याचा निर्णय असो. प्रस्थापितांनी त्यांना हरेक तऱ्हेने एकटे पाडण्याचा आणि नामोहरम करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण पीडितांच्या न्यायासाठी उभे राहण्याची त्यांची आंतरिक तळमळ वाढतच गेली. आणि त्यातूनच एक खंबीर नेतृत्व उभे राहिले.

पुढे त्या अमेरिकेच्या सिनेटर म्हणून निवडून आल्या. तिथेदेखील त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि लढाऊ बाण्याने अनेकांची पाचावर धारण बसली होती. याच्या मध्ये सध्याचे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ब्रेट कवाना यांचीदेखील बोबडी वळली होती. (ही चौकशी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी ही लिंक पहा.)

हॅरिस congressional hearing करणार, या बातमीनेच अनेक नेत्यांना, उद्योगपतींना, आणि धेंडांना सुटलेला घाम अमेरिकेने पाहिलेला आहे.

तर असे हे घमासान व्यक्तिमत्त्व एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी उभे होते. आणि दुसऱ्या बाजूला होते ट्रम्प. हा मनुष्य तोंडात चांदीचा नाहीतर सोन्याचा हिरे लावलेला चमचा घेऊन जन्माला आला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांचे वडील एक मोठे landlord होते. त्यांच्या न्यू यॉर्कमध्ये अनेक इमारती होत्या. नव्या बांधल्या जात होत्या. त्यांच्या इमारतीमध्ये हजारो लोक भाडेकरू म्हणून राहत होते. पैशाचा अगम्य ओघ घराकडे सुरू होता. ददात अशी कशाचीच नव्हती. मुलांनी आपल्या व्यवसायात यावे, तो वाढवावा यासाठी त्यांचे वडील विशेष आग्रही होते.

ट्रम्प यांच्या मोठ्या भावाने थोडा वेगळा मार्ग निवडला आणि तो घरातून बाहेर पडला. त्यामुळे आता वडिलांचे सगळे लक्ष डोनाल्डकडे होते. त्यांनी ट्रम्प यांना पुढे येणाऱ्या सर्व धोक्यांची कल्पना करून दिली. व्यावसायिक गणिते शिकवली. भावना आणि व्यवहार यात नेमका काय फरक आहे? आणि आपल्यासाठी भावने पेक्षा व्यवहार कसा महत्त्वाचा आहे, याची पक्की शिकवणी दिली. आणि त्यातून एक अत्यंत shrud असा उद्योगपती तयार होत गेला.

त्यांच्या एका प्रकल्पात अमेरिकन सरकारने त्यांना notice बजावली. आणि त्याचा खटला उभा राहिला. आणि या वेळेला ट्रम्प यांची गाठ पडली ती रॉय कॉन नावाच्या एका अत्यंत भांडकुदळ आणि तितक्याच यशस्वी वकिलाशी. रॉय कॉन यांनी ट्रम्पना त्यांची केस जिंकून तर दिलीच, पण त्याचबरोबर तरुण ट्रम्पचा त्यांनी विश्वासदेखील संपादित केला. आणि then they became the best friends forever.

रॉय कॉनचा भांडकुदळपणा आणि ‘कितीही खोटे बोला पण रेटून बोला’ ही हातोटी पाहून ट्रम्प इतके प्रभावित झाले की, खरे तर त्यांनी रॉय कॉन यांचे शिष्यत्वच पत्करले. आणि त्यांच्यासारखेच होण्याचा निश्चय केला. ज्याला रॉय कॉन playbook म्हणतात, ते ट्रम्पनी संपूर्णपणे अंगिकारले.

आणि तिथून एका अत्यंत उन्मत्त, फटकळ, आणि आत्मकेंद्रित नेतृत्वाचा उदय झाला. वास्तविक ट्रम्प हे उद्योगपती. त्यांना राजकीय नेतृत्व करण्याची फारशी मनीषादेखील नव्हती. त्यामुळे त्यांच्या उद्योगविश्वातून त्यांचा उन्मत्तपणा, फटकळपणा, उद्दामपणा वाढतच राहिला. सतत खोटे बोलणे आणि ते टिकवण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवणे, हेच त्यांचे सर्वांत मोठे शास्त्र झाले. अनेक अनधिकृत बांधकामे केली. त्यांचे misleading valuations सरकारला सादर केले. म्हणजे कर्ज मिळवताना अधिक valuation दाखवून कर्जे घेतली. आणि tax भरताना अत्यंत कमी valuations दाखवून सरकारची लाखो डॉलरची फसवणूक केली. अनेक सरकारी आणि खाजगी जमिनींवर अनधिकृत कब्जा केला.

...........................................................................................................................................

डोनाल्ड ट्रम्पला ‘अमीर बाप की बिगडी हुई औलाद’ असे लेबल लावून हे सगळे खपूनदेखील गेले असते. पण २०१६ साली जेव्हा त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मानस जाहीर केला, तेव्हा एक राजकीय नेतृत्व किंवा एक public figure म्हणून चारित्र्याशी संबंधित असलेल्या या सगळ्या खाजगी गोष्टींची चर्चा होणेदेखील स्वाभाविकच होते. आणि ती झालीसुद्धा. जवळ जवळ सर्वच प्रस्थापित माध्यमांनी त्यांना रोखठोक प्रश्न विचारले. त्यांनी ते त्यांच्या शिरस्त्यानुसार सपशेल धुडकावून लावले. माध्यमांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वालादेखील असला चारित्र्यहीन उमेदवार दिल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले. त्यांनीच रिपब्लिकन नेतृत्वाला शांत ठेवून, पक्ष म्हणून स्वत:च उत्तरे दिली आणि सगळे आक्षेप धुडकावून लावले.

...........................................................................................................................................

२.

हे वर्षानुवर्षे चालू होते. आणि त्यांचा उद्दामपणा कलेकलेने (किंवा कळेकळेने) वाढत गेला. यातूनच मग कायद्याची भीती नाहीशी झाली. सामाजिक, राजकीय, वैचारिक व्यवस्थेचा आदर नाहीसा झाला. Disrespect breeds more disrespect and disregard breed utter disregard. Legalची भीती संपलीच होती. आता Moral, ethical valuesदेखील नाहीशा झाल्या. आपले कुणीही काहीही वाकडे करू शकात नाही, याची मनस्वी खात्री पटली. हात जणू आकाशाला टेकले. मग यातूनच एकदा स्त्री वश झाली की, तिला तिच्या गुप्तांगाला धरून ओढणेदेखील किती सोपे असते, याची रसभरीत वर्णने त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितली. (याचा ऑडिओ त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी ही लिंक पहा.)

अनेक स्त्रियांबरोबर उघडपणे शरीरसंबंध प्रस्थापित केले. यांच्यात काही त्यांच्या थोड्या काळासाठी पत्नीदेखील होऊन गेल्या, तर काही वेश्या होत्या, काही porn stars होत्या. आवडलेली प्रत्येक स्त्री धारण करण्याची सवयच लागली. पाठीशी प्रचंड पैसा होता. प्रचंड स्थावर मालमत्ता होती. अमेरिकाच नव्हे, तर चीन, भारत, रशिया, युरोपमधले अनेक देश इथेदेखील त्यांची अगणित मालमत्ता होती. अगणित मनुष्यबळ पाठीशी होते. या सगळ्या भांडवलावरती ते केवळ उद्योगपती राहिले असते, तर त्यांच्या या अवगुणांची (किंवा गुणांची?) कदाचित कुणी चर्चादेखील केली नसती.

‘अमीर बाप की बिगडी हुई औलाद’ असे लेबल लावून हे सगळे खपूनदेखील गेले असते. पण २०१६ साली जेव्हा त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मानस जाहीर केला, तेव्हा एक राजकीय नेतृत्व किंवा एक public figure म्हणून चारित्र्याशी संबंधित असलेल्या या सगळ्या खाजगी गोष्टींची चर्चा होणेदेखील स्वाभाविकच होते. आणि ती झालीसुद्धा. जवळ जवळ सर्वच प्रस्थापित माध्यमांनी त्यांना रोखठोक प्रश्न विचारले. त्यांनी ते त्यांच्या शिरस्त्यानुसार सपशेल धुडकावून लावले. माध्यमांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वालादेखील असला चारित्र्यहीन उमेदवार दिल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले. त्यांनीच रिपब्लिकन नेतृत्वाला शांत ठेवून, पक्ष म्हणून स्वत:च उत्तरे दिली आणि सगळे आक्षेप धुडकावून लावले.

अमेरिकन राजकारणासाठी हा सगळाच प्रकार अभूतपूर्व होता. या मनुष्याचे गुण ऐकून कित्येकांनी मना फिरवल्या. अमेरिकन स्त्रिया तर या विषयावर बोलायचे राहू द्या, पण या मनुष्याचे नावदेखील घेण्याचे टाळू लागल्या. अमेरिकन विचारवंत, राजकारणी, उद्योगपती, आणि जनतेसाठी अत्यंत लाजिरवाणा प्रकार होऊन बसला. पण ‘अर्थातुराणां न सुहृन् न बन्धुः आणि कामातुराणां न भयं न लज्जा ॥’.

ट्रम्प यांना त्यांचे काहीही सोयरसुतक नव्हते. प्रचंड पैसा आणि अर्वाच्य भाषा वापरून आधी त्यांनी त्यांना रिपब्लिकन पक्षात असलेला विरोध मोडून काढला. आणि तीच अर्वाच्य भाषा अजूनच गडद करत त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर निवडणूक लढवली. एक स्त्री म्हणून हिलरी यांनी त्यांच्या मर्यादा सांभाळत त्यांना जबरदस्त आव्हान उभे केले. अहोरात्र प्रचार केला. आणि शेवटी क्लिंटन यांना ६५ दश लक्ष मते मिळाली, तर ट्रम्प यांना ६२ दश लक्ष मते मिळाली.

वास्तविक क्लिंटन यांना ३ दश लक्ष मते जास्त मिळाली होती. तरी देखील या पॉप्युलर वोटचे electoral collegeमध्ये परिवर्तन करण्यात क्लिंटन सपशेल अपयशी ठरल्या. कित्येक swing statesमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने ट्रम्प यांनी electoral seat जिंकल्या. आणि बघता बघता, बागेत फुललेले प्रत्येक फुल हे माझ्या शय्येसाठीच तयार झाले आहे आणि ते कसेही कुस्करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, अशी ठाम धारणा असलेला हा ‘अमेरिकेचा ययाति’ राष्ट्राध्यक्ष झाला. 

या निकालाने केवळ क्लिंटन आणि त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हरला असे नाही, तर त्यांच्या रूपाने कित्येक शतके जोपासलेली न्यायाची, नीतीची, आणि मानवी संस्कृतीची मूल्येदेखील सपशेल हरली. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, आणि विचारी अमेरिका हळहळली. अंतर्बाह्य हादरली. आपापल्या घरात डोळे मिटून रडलीदेखील.

शरीराच्या रथाचे वासनेचे लगाम स्वैर सोडून देऊन इंद्रियांच्या घोड्यांना बेफामपणे ययाती दौडत होता. आणि यती मात्र त्याच्या गुहेच्या दाराशी विषण्ण होऊन भरल्या डोळ्यांनी त्याची दौड पाहात होता. गेली कित्यके शतके मनुष्यमात्राने जोपासलेली मूल्ये समाप्त होण्याची ही सुरुवात होती.

पुढची ४ वर्षे ययातीचीच होती. उद्दामपणा, राज्यांच्या अधिकारांचे उल्लंघन, घटनात्मक संस्थांचे पद्धतशीर खच्चीकरण याचे पेव फुटले. सर्वोच्च न्यायालयात आपल्या पक्षाच्या आणि आपल्याला मानणाऱ्या न्यायाधीशांची नेमणूक केली गेली. यातले एक न्यायाधीश महाराज तर इतके गुणाचे होते की, त्यांच्या नेमणुकीच्या वेळी त्यांच्या समकालीन वर्गमैत्रिणीने त्यांच्यावर sexual assaultचे आरोप केले. हे आरोप इतके गंभीर होते की, त्यांची congressional enquiry झाली. या congressional hearingमध्ये कमलादेखील सेनेटर म्हणून सहभागी होत्या. त्यांनी या न्यायाधीश (?) महोदयांना आपल्या प्रशांनी रक्तबंबाळ केले. अनुत्तरित होऊन इकडे-तिकडे पाहत असलेला त्यांचा दिङ्मुढ चेहरा जगातल्या जवळ जवळ सर्व प्रसारमाध्यमांवर झळकला.

हे म्हणजे भर चौकात चौकशी होण्यासारखेच होते. अमेरिकन व्यवस्थेचे आणि वेगाने घसरत चाललेल्या मूल्यांचे जागतिक स्तरावर वाभाडे निघाले. पण पुढे त्या चौकशीचे काहीच झाले नाही. आश्चर्य म्हणजे काही काळाने त्यांची काही कारणानं निर्दोष मुक्तता करण्यात आली. असे म्हणतात की, ट्रम्प प्रशासनाने काही अत्यंत महत्त्वाची माहिती hearing committeeपासून दडवून ठेवली आणि त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूकदेखील झाली. (धिक माहितीसाठी ही लिंक पहा.)

(या विषयावर सध्या काय चालू आहे, ते वाचण्यासाठी ही लिंक पहा.)

विजयाच्या उन्मादाने ययाती दौडतच होता. आणि ते असह्य होऊन यती डोळे मिटून घेत होता.

देशाचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी त्यांचे Tax Returns जनतेसाठी खुले करण्याची मागणी जोर धरू लागली. याला ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणेच जोरदार विरोध केला. कोर्टकचेऱ्या झाल्या. निदर्शने झाली. माध्यमांनी जळजळीत लेख आणि अग्रलेख लिहून मागणी लावून धरली. याचा कशाचाही ट्रम्प यांच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. माझे आणि माझ्या कंपन्यांचे tax  returns मी सार्वजनिक करणार नाही. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा, असा अतिशय निखळ दमदेखील त्यांनी न्यायव्यवस्थेला, पत्रकारितेला, संसदेला आणि अमेरिकन जनतेला भरला.

त्या गोंडस दमदाटीपुढे सर्वांनी त्यांची हत्यारे म्यान केली. मांजराचे पिलू सुरुवातीला मालकाला हळूहळू चावून बघते. मालकाला किती सोसतंय याची ते चाचपणी करत असते. त्याला वेळीच सांगितले नाही, तर ते त्याचे दात घुसवायलादेखील मागे पुढे पाहत नाहीत. ट्रम्प यांचे हेच सुरू होते. कायदा मोडून बघायचा. नियम तोडून बघायचा. बघू तरी काय होतंय? आणि होणार तरी काय आहे? २-४ लोक डिस्ट्रिक्ट कोर्टात जातील. तिथे त्याच्या बाजूने न्याय जरी झाला, तरी आपण त्याला स्टेट नाहीतर फेडरल कोर्टात आव्हान देऊ. तिथे जरी त्यांच्या बाजूने निकाल लागला तर पुढे सुप्रीम कोर्टात जाऊ. आणि तिथे काय आपलेच भाई लोग बसलेले आहेत. त्यातले २-३ तर आपणच बसवलेले असल्याने ते आपण सांगू तसाच निकाल देतील. कोण मला अडवू शकतो ते मी पाहे...विषय संपला!

...........................................................................................................................................

Vaccine Modernaने काढले. Dr. Fauciने जनतेला दिले. पॉवेलनी नोटा छापल्या आणि स्टॉक मार्केट सावरले. मग मी काय केले, असा अतिशय सालस प्रश्न ट्रम्प यांना पडला असावा, म्हणून मग त्यांनी चीनमुळे हा रोग पसरला आणि त्यांना याचा धडा शिकवलाच पाहिजे, अशी नवी टूम काढली. म्हणजे हा दोषारोप नक्की झाला की, मी किती देशाभिमानी आहे, हे यांना दाखवता येणार होते. म्हणून त्यांनी नवीन शक्कल काढली. असे करत करत अमेरिकेतल्या सगळ्या समस्यांना फक्त आणि फक्त चीन जबाबदार आहे, असा प्रचार सुरू केला. कोविडमुळे नोकरी गमवावी लागलेल्या, एखाद-दुसरा नातेवाईक गमावलेल्या आणि १७ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त personal credit debtच्या ओझ्याखाली कंबरडे मोडलेल्या बिचाऱ्या अमेरिकन नागरिकाला त्याच्या सर्व दु:खासाठी फक्त आणि फक्त चीन जबाबदार आहे. आणि त्या चीनशी भांडण काढून त्यांना माझ्या टाचेखाली ठेवणारा मीच तुमचा तारणहार आहे, हे दाखवण्याचा ट्रम्प यांचा हा किळसवाणा प्रकार होता.

...........................................................................................................................................

३.

मांजराची भीती चेपत होती आणि त्याचे चावे अजूनच खोल खोल जात होते. अर्थात अजून रक्त यायचे होते. ते आले कोविडनंतर.

कोविडने चीन आणि इटलीमध्ये हाहाकार उडवून दिला. हजारो माणसे मारायला लागली. माणसे पुरायला जागा पुरेनाशी झाली. १९१८च्या enfluenza pandemicपेक्षा भयानक परिस्थिती होणार याची कल्पना यायला लागली. जग भर lockdown सुरू झाले. जागतिक आरोग्य संघटना झटून कामाला लागली. पण आमचा ययाती अजून कुस्करलेल्या फुलांना हुंगत गादीवरच पडून होता. असे काही नाहीच. आणि असेल तर अमेरिकेला त्याचा काहीही उपद्रव होणार नाही, असा उद्दाम आत्मविश्वास त्यांनी बोलूनदेखील दाखवला.

अमेरिकेतली आरोग्य यंत्रणा आणि त्यांचे प्रशासकीय अधिकारीदेखील हा बोटचेपेपणा पाहून चक्रावले. तर त्यांनी त्यांनाच वेड्यात काढले. वरतून असेही सांगितले की, अमेरिकेत फक्त ५-६ लोकांना लागण झालेली आहे आणि ते लोक पण लवकरच बरे होतील. आणि याच्या वरताण म्हणजे त्यांनी असेही सांगितले कि जर थोडेसे स्यानिटायझर लावल्याने हा विषाणू मरत असेल तर मग स्यानिटायझर तोंडावाटे घेतले, तर पोटातला विषाणूदेखील एका झटक्यात मारून पडेल. हे म्हणजे आपल्या युवराजांच्या ‘खतम’ styleमध्येच आमचे ययाती बोलत होते. (वैदू बुवा डिसइन्फेक्टन्टचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला देताना ऐकण्यासाठी ही लिंक पहा.)

त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या काही भक्तलोकांनी वाटी वाटी सॅनिटायझर तोंडावाटे घेऊनदेखील पाहिले. आणि अहो आश्चर्यम, या लोकांनी कोविड होण्याचे टाळलेदेखील. कारण कोविड होण्याआधीच ते स्वर्गीय सेवेला रुजूदेखील झाले. दवाखाने रुग्णांनी भरून वाहू लागले. मृतदेह नेण्यासाठी गाड्या पुरेनात. मृतदेह ठेवण्यासाठी AC truck बोलवावे लागले. तोंडाला लावायला मास्क मिळेनात. Doctor, Nurses २४-२४ तास घातलेल्या मास्कमध्ये राहून रुग्णसेवा देऊ लागले. कित्येक तिथेच धारातीर्थी पडले.

बघता बघता अमेरिका, अमेरिकेची सुमार आरोग्य व्यवस्था आणि एकूणच अमेरिकेचा जागतिक महासता म्हणून असलेला तोरा समाप्त झाला. माशी उडवायला ठेवलेल्या माकडाने हातातल्या तलवारीने राजाचेच नाक रक्तबंबाळ झाले होते. एका अत्यंत अपरिपक्व आणि बेफिकीर नेतृत्वाचा अनुभव अमेरिका घेत होती. मांजराचे दात आता पार आतपर्यंत घुसले होते. आपण नेमके काय करून बसलो याची कुणकुण लागायला लागली होती.

याच दरम्यान अमेरिकेचे शेअर मार्केट सपाटून पडले. जवळ जवळ बहुतेक सगळे stocks ३०-५० टक्क्यांपर्यंत खाली गेले. हाहाकार झाला. आता पुढे काय होणार याने सगळे अर्थविश्व गळाठून गेले. पण सॅनिटायझर तोंडावाटे प्यायला देणाऱ्या आमच्या वैदूकडे त्याचेदेखील उत्तर तयार होते. त्यांनी जेरेमी पॉवेल या federal reserveच्या प्रमुखांना रातोरात २ ट्रिलियन डॉलरच्या नोटा छापायची आज्ञा दिली. आणि गांगरून गेलेल्या पॉवेल महाराजांनी टॉवेलदेखील न लावता आज्ञा मान्यदेखील केली. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या कोंबडीला २ ट्रिलियन डॉलरच्या नव्या नोटांचे steroid देण्यात आले. आणि मरगळून पडलेली कोंबडी परत एकदा तरतरीत होती उभी राहिली.

ट्रम्प आणि त्यांच्या खुशमस्कऱ्यानी एकमेकांच्या पाठी थोपटवून घ्यायला सुरुवात केली. वास्तविक ही एक घोडचूक होती आणि त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणि अमेरिकन डॉलरवर होणार होते. अमेरिकेची पत घसरणार होती. या नव्या नोटांमुळे अमेरिकेत प्रचंड अशी भाववाढ होणार होती. वास्तविक एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून पॉवेल महाराजांनी याची कल्पना लक्षात घेऊन, या आत्मघातकी धोरणाला कडाडून विरोध करायला हवा होता. त्यांनी मनात आणले असते, तर ते या कृतीला संपूर्ण नकार देऊ शकले असते. आणि त्यांना असलेल्या घटनादत्त अधिकारामुळे ट्रम्पदेखील त्यांचे काहीही वाकडे करू शकले नसते. त्यांना नोकरीवरून काढण्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनादेखील अधिकार नाही. तरीदेखील पॉवेल यांनी असा आत्मघातकी निर्णय का घेतला असावा? त्यांच्या वर कुणी आणि कशा प्रकारे दडपण आणले असावे? तलवार फक्त एकाच माकडाकडे होती. आणि ते ती अगदी मनसोक्त चालवत होते. अर्थातुराणां न सुहृन् न बन्धुः।   

शेवटी Dr. Fauci आणि त्यांच्या departmentने पुढाकार घेतला. सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. vaccine तयार करायला सुरवात केली. पुढे ८-१० महिन्यांनी कर्मधर्म संयोगाने Moderna नावाच्या companyने vaccine विकसित केले. आणि मग त्याचे वितरण होऊन शेवटी या रोगावर काहीसा इलाज तयार झाला. अत्यंत ढिसाळ नियोजन, अत्यंत बेमुर्वत वागणूक, आणि वैद्यकीय व्यवसायिकांविषयी असलेला अगम्य disrespect असे गुण असलेले नेतृत्व लाभलेल्या अमेरिकी जनतेची वाताहत तूर्तास थांबली.

इतकी वर्षे ज्यांना ‘Third world countries’ अशी शेलकी विशेषणे लावून हिणवले, अशा भारतासारख्या देशानेही कमालीच्या धीरोदात्तपणे ही परिस्थिती हाताळली. आणि स्वत: ला विकसित म्हणवणाऱ्या अमेरिकेची आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि प्रशासनव्यवस्था किती कुचकामी आहे, याचे विश्वरूप दर्शन जगाला करून दिल्याबद्दल खरे तर ट्रम्प यांचे आभारच मानायला हवेत. 

Vaccine Modernaने काढले. Dr. Fauciने जनतेला दिले. पॉवेलनी नोटा छापल्या आणि स्टॉक मार्केट सावरले. मग मी काय केले, असा अतिशय सालस प्रश्न ट्रम्प यांना पडला असावा, म्हणून मग त्यांनी चीनमुळे हा रोग पसरला आणि त्यांना याचा धडा शिकवलाच पाहिजे, अशी नवी टूम काढली. म्हणजे हा दोषारोप नक्की झाला की, मी किती देशाभिमानी आहे, हे यांना दाखवता येणार होते. म्हणून त्यांनी नवीन शक्कल काढली.

चीनशी त्यांनी व्यापारी तंटा उभा केला. अमेरिकेतल्या कोविडसाठी चीन जबाबदार आहे इथून सुरु झालेला हा दोषारोपणाचा समारोह अमेरिकेतले उद्योग चीनमुळे बंद झाले. अमेरिकेतले नागरिक चिनी मालामुळे बेरोजगार झाले. आणि ते बेरोजगार झाल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर खालावला.

असे करत करत अमेरिकेतल्या सगळ्या समस्यांना फक्त आणि फक्त चीन जबाबदार आहे, असा प्रचार सुरू केला. कोविडमुळे नोकरी गमवावी लागलेल्या, एखाद-दुसरा नातेवाईक गमावलेल्या आणि १७ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त personal credit debtच्या ओझ्याखाली कंबरडे मोडलेल्या बिचाऱ्या अमेरिकन नागरिकाला त्याच्या सर्व दु:खासाठी फक्त आणि फक्त चीन जबाबदार आहे. आणि त्या चीनशी भांडण काढून त्यांना माझ्या टाचेखाली ठेवणारा मीच तुमचा तारणहार आहे, हे दाखवण्याचा ट्रम्प यांचा हा किळसवाणा प्रकार होता. आणि याच उद्देशाने त्यांनी चीनबरोबर व्यापारी वाटाघाटीसाठी शिखर बैठक बोलावली. आणि कित्येक चायनीज उत्पादनावरचे सीमा शुल्क अनाठायी वाढवून ठेवले.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सीमा शुल्क वाढवून तुम्ही कधीही वस्तूची भाववाढ थांबवू शकत नाही. कारण सीमा शुल्क वाढले की, आयात केलेल्या मालाची किंमत तर वाढतेच. पण त्याचबरोबर त्याच प्रकारच्या देशी मालाची किंमतसुद्धा त्या वाढलेल्या किमतीशी स्पर्धा करू लागते. आणि एक वेळ अशी येते की, देशी उत्पादनाची किंमत ही आयात केलेल्या उत्पादनाच्या वाढीव किमतीइतकीच होऊन बसते. एका बाजूला २ ट्रिलियन डॉलरच्या नोटा छापल्या गेल्या आणि दुसरीकडे अवाढव्य सीमा शुल्क वाढवले.

या सीमा शुल्काचा अजून मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. एकदा वाढवलेले सीमा शुल्क पुन्हा कमी करणे हे बहुतेक वेळा अति किचकट आणि strategicदृष्ट्या अशक्य होऊन बसते. त्यामुळे सीमा शुल्क वाढवणे हा एक प्रकारचा ‘वन-वे’ आहे. त्याला माघार नाही. त्यामुळे पुढे जो बायडेनच्या कारकिर्दीत प्रचंड भाववाढ का झाली आणि इतकी भाववाढ होऊनदेखील जो बायडेन यांनी ट्रम्प यांनी भरमसाट वाढवून ठेवलेले सीमा शुल्क तसेच का ठेवले, याची उत्तरे आपल्याला इथे मिळतात.

२०२४ च्या निवडणुकीत दुर्दैवाने अमेरिकन जनतेने या दोन्ही गोष्टींचा (भाववाढ आणि continuation of trade policy with China) जो बायडेन यांना दोष दिला. आणि वाढीव किमतीचे खापर हॅरिस यांच्यावर फोडले. ते किती तर्कविसंगत होते आणि या दोन्ही गोष्टीसाठी आमच्या गबरू माकडाची तलवार कशी कारणीभूत होती, याची आपण कल्पना करू शकाल.

अर्थात जो बायडेन असोत किंवा ट्रम्प, या अगम्य चुकीचे परिणाम अमेरिकन नागरिकांना पुढची अनेक वर्षे भोगावे लागणार आहेत, हे मात्र खरे.

...........................................................................................................................................

६ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार निकालावर सही करून ते निकाल अधिकृत करणार होते. त्याच दिवशी ट्रम्प यांनी White houseच्या सामोर त्यांच्या पाठीराख्याना हजारोंच्या संख्येने बोलावले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका बेबंद आणि उन्मत्त हुकूमशहाने लोकशाहीचाच गळा करकचून आवळला. तेव्हा त्याच लोकशाहीच्या काही अज्ञात मुलांनी त्यांच्या तुटपुंज्या साधनांनी तिची त्या आडदांडाच्या तावडीतून सुटका करून दिली होती. त्या दिवशी रात्री उपाध्यक्षांनी मोठ्या धैर्याने निवडणुकीचे निकाल अधिकृत केले. आणि ट्रम्प यांची सत्ता संपुष्टात आली. हा सगळा घटना क्रमच इतका अशोभनीय आणि घृणास्पद होता की, ट्रम्प विरोधकांनीच काय पण ट्रम्प समर्थकांनीदेखील सुटकेचा निश्वास टाकला. यतीने डोळे उघडले, तेव्हा ययातिचा रथ थांबला होता. विदग्ध होऊन तो रक्तमांसाच्या चिखलात रुतलेले चाक काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ती अवस्था पाहून यतीची खात्री पटली की, निदान आता तरी ययाती बेलगाम रथ चालवणार नाही.  

...........................................................................................................................................

४.

ट्रम्प त्यांच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर २ वेळा महाभियोग आणला गेला. गेल्या २५० वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात एकूण ४ वेळा राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग आणला गेला. त्यातील २ वेळा तो ट्रम्प यांच्यावर केवळ ४ वर्षांच्या कालखंडात आणला गेला. यावरून त्यांचे वागणे किती बेमुर्वत, बेलगाम होते आणि अमेरिकन जनता त्यांना किती विटली होती, याची आपण कल्पना करू शकतो.

२०२०च्या निवडणुकांची घोषणा झाली. ट्रम्प यांच्या विरोधात अनेक कायदेशीर खटले कोर्टात चालूच होते. त्यात त्यांच्या वर एक महाभियोगदेखील चालवण्यात आला. असे असूनदेखील रिपब्लिकन पक्षाच्या नेभळट नेतृत्वाने परत एकदा अध्यक्षपदासाठी ट्रम्प यांचेच नाव पुढे केले. या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाने देखील विजयाचा निश्चय केला. त्यांनी अतिशय अनुभवी अशा जो बायडेन यांची उमेदवारी निश्चित केली. जो बायडेन यांनी उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांना निवडले. अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. डेमोक्रॅटिक पक्षाने शर्थ केली. आणि विक्रमी ८१ दक्ष लक्ष मते घेऊन जो बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ट्रम्प यांच्या जुलमी जोखडातून मुक्त झाल्याचा अमेरिकन जनतेने जल्लोष सुरू केला.

पण ट्रम्प यांनी निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांच्या ४ वर्षांच्या राजवटीत त्यांनी काही कडव्या उजव्या विचारांच्या संघटना उभ्या केल्या. त्यांना आर्थिक आणि राजकीय पाठबळ पुरवले. आणि निवडणुकीत पराभव दिसू लागताच त्यांनी या संघटनांना सशस्त्र उठाव करण्याची अलिखित आज्ञा केली. ६ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार निकालावर सही करून ते निकाल अधिकृत करणार होते. त्याच दिवशी ट्रम्प यांनी White houseच्या सामोर त्यांच्या पाठीराख्याना हजारोंच्या संख्येने बोलावले. Washington DCच्या पोलिसांना Capitol Buildingच्या सुरक्षेसाठी न बोलावण्याचा निर्णय घेतला. आणि एका अत्यंत उत्तेजक भाषणाला सुरुवात केली. (त्यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्यासाठी ही लिंक पहा. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष हल्लादेखील पाहता येईल.)

निवडणूक कशी चुकीची झाली, मतमोजणीमध्ये कसे घोळ घातले गेले, याच्या कपोलकल्पित कहाण्या सांगितल्या. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपल्याला लढायचे आहे. आणि आज कुठल्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. असे म्हणून तुम्ही capitol buildingवर चाल करून जा अशी आज्ञा दिली. त्या झुंडीने Capitol Buildingवर हल्ला चढवला. तिथे जे तुटपुंजे पोलीस होते, त्यांच्यावर मात केली. हजारो लोक Capitol Buildingमध्ये घुसले. तिथे संसदेचे निवडणूक अधिवेशन चालू होते. बहुतेक सगळे सेनेटर आणि काँग्रेसमन तिथे मतदानासाठी उपस्थित होते. उपराष्ट्रपती होते. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष होते. मोठा अनाठायी प्रसंग उभा राहिला. लोकांनी पोलिसांची फळी केव्हाच भेदली होती. दारे, खिडक्या फोडत लोकांचे लोंढे Capitol Buildingमध्ये घुसत होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. काठ्या होत्या. दांडकी होती. कित्येकांच्या हातात फाशी देण्याचे गळ होते. आणि ते त्यांच्यात उपाध्यक्षांना मारण्याच्या घोषणा देत होते.

ज्या Capitol Buildingमध्ये अमेरिकेच्या वॉशिंग्टन, लिंकन, जेफरसन, रूझवेल्ट, रेगन अशा एकाहून एक महापराक्रमी पूर्व अध्यक्षांचे पुतळे ठेवले होते, त्या corridorमधून ही टोळी उत्पात करत अमेरिकेच्या राजकीय गंडस्थळाकडे चाल करून निघाली होती. अमेरिकेच्या सभ्यतेचा, अमेरिकेच्या पराक्रमाचा आणि अमेरिकेच्या चारित्र्याचा हा सर्वांत दारुण पराभव होता.

तिकडे मोठे मोठे पत्रकार, राजकीय नेते ट्रम्प यांना विनंती करत होते की, या झुंडीला थांबण्याची आज्ञा करा. पण त्याकडे ट्रम्प यांनी ढुंकूनदेखील पाहिले नाही. कित्येक तास त्यांनी हा धुडगूस चालू दिला. त्या झुंडीने दोन्ही सभागृहांचा ताबा घेतला. त्यातले काही सभागृहांच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून Selfie काढत होते. काही खासदारांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांच्या टेबलावर पाय ठेवून सिगारेट ओढत होते. माकडाच्या हाती तलवार दिल्यावर नेमके काय होते, याचा अनुभव अमेरिका श्वास रोखून घेत होती. एखाद्या वेळेला मुठी वळतही असतील. पण या दारुण पराभवाचे आपणही तितकेच भागीदार असल्याची जाणीव होऊन त्या मुठी सुटतही होत्या. अमेरिकन मानस विषण्ण झाले होते. मांजराच्या चाव्यातून येणारे रक्त आता भळाभळा वाहू लागले होते.

सुदैवाने Capitol Buildingच्या security staffने सर्व सिनेटर आणि काँग्रेसमन ना भुयारी मार्गातून गुप्त ठिकाणी हलवले. पुढचे कित्येक तास आपल्या तुटपुंज्या पिस्तुलांच्या जोरावर तो बेफाम हल्ला थोपवून धरला.

शेवटी दुपारी ४नंतर हे नाट्य संपुष्टात आले. पोलिसांची आणि राजधानी सुरक्षा दलाची भली मोठी फौज तिथे पोचली. त्यांनी संपूर्ण जागेला वेढा घातला. हवेत गोळीबारदेखील केला. अनेकांची धरपकड केली. आणि परत एकदा भवाच्या भये तळघरात लपून बसलेल्या लोकशाहीला आणि स्वातंत्र्य देवतेला तिच्या देव्हाऱ्यात आणून बसवले.

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका बेबंद आणि उन्मत्त हुकूमशहाने लोकशाहीचाच गळा करकचून आवळला. तेव्हा त्याच लोकशाहीच्या काही अज्ञात मुलांनी त्यांच्या तुटपुंज्या साधनांनी तिची त्या आडदांडाच्या तावडीतून सुटका करून दिली होती. ‘अहिंसा परमो धर्म:’ याची कितीही जाहिरातबाजी केली तरी ‘धर्म हिंसा तथैव च’ हे तितकेच आवश्यक याचीदेखील खात्री पटावी...

त्या दिवशी रात्री उपाध्यक्षांनी मोठ्या धैर्याने निवडणुकीचे निकाल अधिकृत केले. आणि ट्रम्प यांची सत्ता संपुष्टात आली. हा सगळा घटना क्रमच इतका अशोभनीय आणि घृणास्पद होता की, ट्रम्प विरोधकांनीच काय पण ट्रम्प समर्थकांनीदेखील सुटकेचा निश्वास टाकला. यतीने डोळे उघडले, तेव्हा ययातिचा रथ थांबला होता. विदग्ध होऊन तो रक्तमांसाच्या चिखलात रुतलेले चाक काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ती अवस्था पाहून यतीची खात्री पटली की, निदान आता तरी ययाती बेलगाम रथ चालवणार नाही.

जो बायडेन यांचा मोठा थाटात शपथविधी झाला. घरातल्या आत्याबाईच्या खोलीत शिरून, बराच वेळ गुंगारा देणाऱ्या नागाला जेव्हा गारुडी पिशवीत घालून घेऊन जातो, अगदी तशीच, सुटलेपणाची भावना आलम अमेरिकेची झाली होती. हजारो लोक बायडेन यांच्या शपथविधीला हजर होते. लोकांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना अमेरिकेचे हृदय आणि डोळे भरून वाहिले. झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा ही चूक नको म्हणून त्या रात्री अमेरिका शांत झोपायला गेली.

 ...........................................................................................................................................

डेमोक्रॅटिक पक्ष हा नेहमीच समाजातल्या minority घटकांना आपलासा वाटत आलेला आहे. याच्यात कृष्णवर्णीय आहेत, मुसलमान आहेत, भारतीय आहेत, मेक्सिकन/स्पॅनिश आहेत. immigrants आहेत. या पक्षाची स्थापनाच सर्व समावेशासाठी झालेली आहे. समाजातल्या आर्थिक मागासांना हा पक्ष आपलासा वाटतो. प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. उद्देश अतिशय चांगला आणि उदात्त आहे. पण मग इतके सगळे असून बायडेनला झालेले ८१ दशलक्ष मतदान कमलापर्यंत येईपर्यंत ६५ दशलक्ष का झाले असावे? गेल्या ४ वर्षांत नक्कीच काहीतरी बिनसलंय.

...........................................................................................................................................

५.

हे सगळे मी का सांगतोय? तर त्या २० जानेवारीच्या रात्री ‘आता पुन्हा हि चूक नको’ अशी स्वतः:शी पक्की खूणगाठ बांधणाऱ्या अमेरिकेने परत एकदा त्याच ट्रम्प यांना तेच पॅड देऊ केलंय, Doland J. Trump, The President of The United States of America.

मनसोक्त मार खाल्यावर बेवड्याची बायको रोज रात्री मनाशी म्हणते- ‘उद्या सकाळी मी घर सोडणार’. आणि सकाळ झाली की, बेवडा म्हणतो- ‘मी आज रात्रीपासून दारू सोडणार’. अमेरिका आणि ट्रम्प यांची अशीच अवस्था झालेली दिसते. चार वर्षांपूर्वी जो माणूस जावा, अगदी कायमचा जावा, म्हणून ज्या अमेरिकेने देव पाण्यात घातले, त्याच अमेरिकेने त्याला ‘न भूतो न भविष्यती’ असे भरघोस मताधिक्य देऊन परत अध्यक्ष म्हणून बोलावले.

५ नोव्हेंबर रोजी मी निवडणुकीचा निकाल पाहिला आणि माझा ‘दिगू टिपणीस’ झाला. उगाच हसावंसं वाटायला लागलं. रस्त्यात भिकाऱ्यासमोर आपणपण हात पसरावा, असं वाटायला लागलं. ३९ कलमाखाली न्यायालयाने दोषी ठरवलेले आणि शिक्षेच्या सुनावणीची वाट पाहणारे सर डोनाल्ड ट्रम्प आता परत अमेरिकेचे अध्यक्ष होणार.

नेमका दोष कुणाचा? नेमकं बरोबर काय? त्यांना हाकलून लावणारी अमेरिका बरोबर का परत बोलावणारी? त्यांच्यावर केस चालवणारे धडाकेबाज पब्लिक प्रॉसिक्युटर जॅक स्मिथबरोबर की, ट्रम्प यांची केस चालवणारे त्यांचे धुरंधर वकील? एका convicted felonला मत देणारे ७५ डॅश लक्ष अमेरिकन नागरिक बरोबर की, एका बुद्धिमान आणि चारित्र्यसंपन्न Attorney Generalला नाकारणारे ७५ दश लक्ष अमेरिकन बरोबर? भरमसाट सीमा शुल्क वाढवून आणि अवाढव्य नोटा छापून अमेरिकन माणसाच्या तोंडातला घास पळवणाऱ्याला परत अध्यक्ष करणारे ७५ दश लक्ष अमेरिकन बरोबर की, हाताबाहेर गेलेल्या अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीत न जाऊ देता तिचे सॉफ्ट लँडिंग करून देणाऱ्या जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना हरवणारे ७५ दश लक्ष अमेरिकन बरोबर? डोनाल्ड ट्रम्प यांना मत देणारे बरोबर की, कमला हॅरिस यांना नाकारणारे बरोबर?

‘Make America Great Again’वगैरे सारख्या भावनिक आरोळ्या सोडल्या, तर न्यायालयाने शिक्षा दिलेल्या एखाद्या अपराध्याला राष्ट्राचा अध्यक्ष करावे, असे एकही काम ट्रम्प यांनी केलेले मला आठवेना. पण मग याना ७५ दश लक्ष लोकांनी मत का दिले असेल? ६ जानेवारीचा २०२१चा प्रकार आठवला नसेल त्यांना? एका गुन्हेगाराला मत देताना त्यांची बोटे थरथरली कशी नाहीत? कोविदमध्ये उडालेली दैना आठवून हृदय कसे काय पिळवटले नाही, या ७५ दश लक्ष लोकांचे? प्रश्नच प्रश्न...असंख्य प्रश्न... ट्रम्प ना का मत दिले असेल, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

दुसरी शक्यता अशी वाटायला लागली की, कदाचित या ७५ दश लक्ष लोकांनी ट्रम्प ना मत दिलेच नसेल. पण त्यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस आणि एका अर्थाने डेमोक्रॅटिक पार्टी नको असे मत दिले असावे, आणि मग ती शक्यता तपासायला घेतली.

अमेरिकन जनमानस इतके विरोधात का गेले असेल? जो बायडेन यांचे काय चुकले? तसा विचार केला तर त्यांचे काहीच चुकलेले दिसत नाही, उलट त्यांनी भाववाढ नियंत्रित केली. Stock market was at all time high. Employment situation was good. इकॉनॉमी चे सॉफ्ट लँडिंग केले. इंटरेस्ट रेट परत कमी करायला घेतले. एखाद्याला पडावे इतके काही बायडेन यांचे चुकले असे वाटत नाही.

मग कमला हॅरिस चुकल्या का? अर्थात त्यांना उपाध्यक्ष म्हणून फारसे अधिकार तसेही नव्हते. सगळे निर्णय तर अध्यक्ष महाराजांनी घेतले. शिवाय त्यांना निवडणूक लढवण्याची संधी जेमतेम १०७ दिवस आधी मिळाली. या १०७ दिवसांत त्यांनी उत्तम narrative set केले. टीम तयार केली. ट्रम्पपेक्षा जास्त निधी गोळा केला. ट्रम्पबरोबर जे एकमेव debate झाले, त्यात त्यांना निष्प्रभ करून ठेवले. झंझावाती दौरे केले. उत्तमोत्तम आणि अतिशय सभ्य भाषेत भाषणे केली. White House च्या समोर च्या त्यांच्या सभेला ७५००० लोक उपस्थित होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांचे काम चोख केले. एक अत्यंत कडवी आणि अटीतटीची लढत केवळ १०७ दिवसांत उभी केली. भारतीय किंवा कृष्णवर्णीय यांच्यापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण अमेरिकेचं नेतृत्व म्हणून त्यांनी त्यांची प्रतिमा उभी केली. मग चुकलं काय?

बायडेन नाही, कमला नाही, मग चुकलं कुणाचं? जनता चुकली? ते तर अगदीच शक्य नाही. Public हैं वो सब जानती है. Stock Market always predicts the exact price for a stock and elections predicts the exact leader for the society. याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मग चुकलं कुठं?

मग डेमोक्रॅटिक पक्ष चुकला का?

गेल्या काही वर्षांतल्या घटना बघितल्या, तर असे म्हणायला नक्कीच वाव आहे. डेमोक्रॅटिक पक्ष हा नेहमीच समाजातल्या minority घटकांना आपलासा वाटत आलेला आहे. याच्यात कृष्णवर्णीय आहेत, मुसलमान आहेत, भारतीय आहेत, मेक्सिकन/स्पॅनिश आहेत. immigrants आहेत. या पक्षाची स्थापनाच सर्व समावेशासाठी झालेली आहे. समाजातल्या आर्थिक मागासांना हा पक्ष आपलासा वाटतो. प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. उद्देश अतिशय चांगला आणि उद्दात्त आहे.

पण मग इतके सगळे असून बायडेनला झालेले ८१ दशलक्ष मतदान कमलापर्यंत येईपर्यंत ६५ दशलक्ष का झाले असावे? गेल्या ४ वर्षांत नक्कीच काहीतरी बिनसलंय, ज्याने डेमोक्रॅटिक पक्षाने १६ दशलक्षांपेक्षा जास्त मतदार गमावला आहे. कुठे गेले हे मतदान? ट्रम्प यांचे मतदान पाहिले तर २०१६ साली ६२ दशलक्ष, २०२० साली ७५ दशलक्ष आणि २०२४ सालीदेखील ७५ दशलक्ष राहिलेले आहे. याचा अर्थ डेमोक्रॅटिक पक्षाची हरवलेली १६ दशलक्ष मते ट्रम्प यांना मिळालेली नाहीत. मग ही मते गेली कुठे? हे मतदार मतदानाला गेलेच नसावेत? गेले नसतील तर का गेले नसतील?

कदाचित याचे उत्तर गेल्या ४ वर्षांत जे काही झाले, त्यामुळे ते डेमोक्रॅटिक पक्षापासून दूर गेले असावेत. आणि ट्रम्प यांना तर नाहीच, पण डेमोक्रॅटिक पक्षालाही मत देण्याची इच्छा नसावी. आणि असे असेल तर ते पक्ष म्हणून अतिशय काळजी करण्यासारखे आहे.

...........................................................................................................................................

अमेरिकेत फक्त पॅलेस्टिनी राहत नाहीत, ज्यू, हिंदू, बौद्ध... जगातल्या सर्व धर्माचे लोक राहतात. जगातल्या सर्व देशांचे लोक राहतात. त्यांची मुले याचuniversityमध्ये शिकण्यासाठी जातात. बऱ्याचदा ते डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदार असतात. अशा परिस्थितीत इतक्या राष्ट्र विघातक आंदोलनात बोटचेपी आणि नेभळट भूमिका घेऊन डेमोक्रॅटिक पक्षाने नेमके काय सध्या केले? विद्यापीठांमध्ये शिक्षणाची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवणे, हे त्या त्या गावातील डेमोक्रॅटिक नेतृत्वाचे कर्तव्य नाही का? जगभरात अनेक मुद्द्यांवर तंटे चालूच असतात. त्या प्रत्येक तंट्याची असली बीभत्स प्रतिक्रिया जर अमेरिकेत उमटायला लागली आणि त्या त्या देशाच्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांनी अशीच विद्यापीठे बंद पाडायची ठरवली, तर? आणि असल्या मुस्लिमेतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला डेमोक्रॅटिक पक्षाचा असाच पाठिंबा असेल का? म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच आणि काळ सोकावतो, याचेही दु:ख आहे.

...........................................................................................................................................

६.

गेल्या ४ वर्षांतला पक्षाचा प्रवास बघितला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा पक्ष दिवसेंदिवस डावीकडे झुकत चालला आहे. एक उदाहरण बघू.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्राएलवर अतिरेकी हल्ला केला. इस्राएलच्या सीमेवरील गावावर छापा मारून तिथल्या महिला, पुरुष, मुले यांचे अमानुष खून केले. बलात्कार केले. मृतदेहांची विटंबना केली. यांच्यात सुमारे १२०० निष्पाप इस्राएली नागरिकांचा मृत्यू झाला. हमास या अतिरेकी संघटनेने केलेला हा काही पहिला हल्ला नाही. पण या वेळी इस्रायली सरकारने याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. आणि हमासचे west stripमध्ये असलेले तळ शोधून ते नष्ट करायचे ठरवले. त्यासाठी त्यांचे सैन्य त्यांनी west strip घुसवले आणि निकराचा हल्ला केला. सैन्याच्या हल्ल्यात जे नुकसान व्हायचे ते होत गेले. या हल्ल्यात त्यांना अनेक भुयारी मार्ग सापडले. हे भुयारी मार्ग नागरिकांच्या घराच्या खालून जायचे. त्या घरात राहणारे लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या अतिरेक्यांना मदत करत. सुक्याबरोबर ओलेही जळते. अतिरेक्यांचा ठाव काढत असताना काही नागरिकांचेही बळी गेले.

हे बरोबर की चूक हा मुद्दाच नाही. अमेरिकेच्या दृष्टीने याला खरे तर काहीही महत्त्व नाही. अमेरिकेसाठी एका राष्ट्राने त्यांच्यावरच्या अतिरेकी हल्याचा घेतलेला बदला इतकीच त्याची व्याप्ती असणे अपेक्षित. पण याचा विरोध करण्यासाठी आणि अमेरिकेवर दबाव आणून इस्राएलवर दबाव आणण्याचा अमेरिकेतील काही पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी आखला. या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शांततेच्या मार्गानी मोर्चे काढले. त्याचा काही फारसा परिणाम दिसेना. म्हणून आंदोलन तीव्र होत गेले. Columbia Universityसारख्या नामांकित विद्यापीठात धरणे-आंदोलने सुरू झाली. कॉलेजच्या मोकळ्या lawnवर या विद्यार्थ्यांनी तंबू ठोकून राहायला सुरुवात केली. १, २, ३, ४ करत करत तंबूंची संख्या वाढतच गेली. कॉलेजची lawns तंबूंनी भरून गेली. प्रशासनाने काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आंदोलन अजून उग्र होत गेले.

आता पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांना कॉलेजमधील इतर मुस्लिम विद्यार्थीदेखील सामील झाले. त्यांनी मिळून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या इस्रायली विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. याची पुढची पायरी म्हणजे या आंदोलन कर्त्यांना आता काही professional rioters जॉईन झाले. त्यांनी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. हळूहळू कॉलेजमधले वर्ग ओस पडायला लागले. यांच्यात भरीस भर म्हणून विद्यार्थ्यांच्या घोषणा ‘Free Free Free Palestine’पासून ‘Death to America’पर्यंत पोचल्या. (याचा व्हिडिओ बघण्यासाठी ही लिंक पहा.)

(पॅलेस्टिन आंदोलकांनी अमेरिकेचा झेंडा काढून तिथे पॅलेस्टिनचा झेंडा लावला, त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक पहा.)

(पॅलेस्टिन आंदोलक अमेरिकेचा झेंडा जाळतानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक पहा.)

आणि बघता बघता या प्रकारच्या आंदोलनाचे लोण अमेरिकेतल्या इतर नामांकित विद्यापीठांत पोचले. याच्यात Harvard, MIT, Cornell, NYU यांसारख्या अत्यंत नामांकित universityमध्ये हे लोण पोचले. सुमारे १००पेक्षा जास्त विद्यापीठे आणि कॉलेजेसमध्ये वर्ग बंद पडले. प्रयोगशाळा बंद पाडल्या. (कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये हा प्रकार झाला, याची माहिती मिळवण्यासाठी ही लिंक पहा.)

आणि हे सगळे चालू असताना त्या गावातले पोलीस हातावर हात ठेवून बघत बसले होते. त्यांचे हात कुणी बांधले होते? का बांधले होते? जिथे जिथे ही कॉलेजेस बंद पाडली गेली, तिथे तिथे बहुतेक ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता होती. ही आंदोलने हाताळण्यात डेमोक्रॅटिक पक्ष सपशेल अपयशी ठरला.

या विद्यापीठांत जगातल्या सर्वच देशातून विद्यार्थी येतात. त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित करण्याचा अधिकार या आंदोलन कर्त्यांना कोणी दिला? अमेरिकेच्या सर्व नाशाच्या घोषणा देणाऱ्या या आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी सत्वर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही? या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यात उभे राहून अमेरिकेचे झेंडे खुलेआम जाळले. यांच्यावर देशद्रोहाचे खटले का भरले नाहीत?

या सर्व विद्यापीठांमध्ये आंदोलनाच्या वेळेला पोलीस उपस्थित असायचे. आणि बाजूला उभे राहून ते प्रेक्षक म्हणून अमेरिकेच्या नाशाच्या घोषणा ऐकत राहायचे. आणि अमेरिकेचे झेंडे जळताना पाहायचे. या मुलांचा नेमका उद्देश काय होता? त्यांना काय अमेरिकेबरोबर युद्ध सुरू करायचे होते का? शेवटी इतर विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा प्रचंड दबाव आल्यावर जेव्हा पोलिसांनी दंडुका हाती घेतला, तेव्हा या आंदोलनकर्त्यांनी एखाद्या योध्यासारखा विरोध केला. पोलिसांना विरोध करण्यासाठी या आंदोलन कर्त्यांनी कॉलेजमधल्या मोठ्या मोठ्या हॉलचा ताबा घेतला. ते हॉल आतून बंद करून घेतले. पोलिसांना आत येता येऊ नये म्हणून दाराच्या आडवे टेबल आणि बेंचेस रचून ठेवली. शेवटी कित्येक ठिकाणी पोलिसांनी गॅस कटरचा वापर करत दरवाजे तोडले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही काही ठिकाणी तर टेसरचा मारा करत मुलांना ताब्यात घेतले. हे काय आहे?

यांच्यात आणि ६ जानेवारी २०२१ला ट्रम्प यांच्या समर्थकांनी capitol buildingवर केलेल्या हल्ल्यात काय फरक आहे? हे डेमोक्रॅटिक पक्षाने ठरवून केले का? त्या आंदोलनकर्त्यांना त्यांचा धर्म बघून कारवाईत टाळाटाळ केली का? त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली तर आपला मुस्लीम मतदार आपल्यापासून दुरावेल, अशी भीती डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाला वाटत होती का?

तसे असेल तर एक पक्ष म्हणून ते अतिशय घातक धोरण आहे. अमेरिकेत फक्त मुस्लीम राहत नाहीत. अमेरिकेत फक्त पॅलेस्टिनी राहत नाहीत, ज्यू, हिंदू, बौद्ध... जगातल्या सर्व धर्माचे लोक राहतात. जगातल्या सर्व देशांचे लोक राहतात. त्यांची मुले याचuniversityमध्ये शिकण्यासाठी जातात. बऱ्याचदा ते डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदार असतात. अशा परिस्थितीत इतक्या राष्ट्र विघातक आंदोलनात बोटचेपी आणि नेभळट भूमिका घेऊन डेमोक्रॅटिक पक्षाने नेमके काय सध्या केले? विद्यापीठांमध्ये शिक्षणाची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवणे, हे त्या त्या गावातील डेमोक्रॅटिक नेतृत्वाचे कर्तव्य नाही का?

जगभरात अनेक मुद्द्यांवर तंटे चालूच असतात. त्या प्रत्येक तंट्याची असली बीभत्स प्रतिक्रिया जर अमेरिकेत उमटायला लागली आणि त्या त्या देशाच्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांनी अशीच विद्यापीठे बंद पाडायची ठरवली, तर? आणि असल्या मुस्लिमेतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला डेमोक्रॅटिक पक्षाचा असाच पाठिंबा असेल का? म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच आणि काळ सोकावतो, याचेही दु:ख आहे. या आंदोलनांचा आणि त्यातल्या डेमोक्रॅटिक नेतृत्वाच्या बोटचेप्या भूमिकेचा परिणाम या मुलांची भीड चेपण्यात झाला.

यातल्याच काही मुलांनी मग याचा प्रताप University of California Berkeleyमधल्या एका नामांकित प्राध्यापकाला दिला. या प्राध्यापकाने त्याच्या वर्गातल्या काही मुलांना त्यांच्या घरी सहज रात्रीच्या जेवणाला बोलावले. त्यातले काही पॅलेस्टिन सपोर्टर होते. सगळे विद्यार्थी जेव्हा त्या प्राध्यापकाच्या घरी जमले, तेव्हा त्यातल्याच एका पॅलेस्टिनी विद्यार्थिनीने तिच्याबरोबर आणलेला माईक आणि स्पीकर काढला. आणि तिने पॅलेस्टीन सपोर्टवर भाषण द्यायला सुरुवात केली. प्राध्यापकांनी त्याला आक्षेप घेतला. तरीही त्या मुलीने तिचा propaganda चालूच ठेवला. जेव्हा प्राध्यापकाच्या पत्नीने तिच्या हातातला माईक हिसकावून घेतला, तेव्हा त्या मुलीने सरळ त्यांच्यावर physical man handlingचा आरोप केला. दुसऱ्याचा घरी, विशेषतः आपल्या प्राध्यापकाच्या घरी जाऊन, त्यांचे आभार वगैरे मानायचे राहिले बाजूलाच. हे विद्यार्थी त्या प्राध्यापकाच्या अंगावर धावून गेले. जेव्हा प्राध्यापकांनी त्यांना तिथून हाकलून लावले, तेव्हा बाहेर जाऊन त्यांनी Freedom of speechच्या कलमाखाली पोलिसात तक्रार दाखल केली. (हा व्हिडिओ बघण्यासाठी ही लिंक पहा.)

हा काय प्रकार? इतकी मग्रुरी या विद्यार्थ्यांमध्ये कुठून आली? याचे एकमेव कारण म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षानी दाखवलेला अक्षम्य चालढकलपणा.

या पॅलेस्टिनी आंदोलकांचे मांजर आता पासूनच त्याचे दात घुसवायला लागले आहे. आणि उद्या जर त्यातून रक्त आले, तर त्याची जबाबदारी घ्यायला डेमोक्रॅटिक पक्ष तयार आहे का? आणि ते रक्त निघालेलेदेखील याच वर्षी दिसले. यातल्याच काही अति उत्साही आंदोलकांनी मिशिगनमधल्या आपल्या मराठी काँग्रेसमनच्या घरावर रात्री ३ वाजता मोर्चा नेला. १००पेक्षा जास्त गाड्या घेऊन ही नतद्रष्ट मंडळी त्यांच्या घरासमोर गेली. आणि रात्री ३ वाजता त्यांनी गाड्यांचे हॉर्न वाजवायला घेतले. आणि वरतून जोपर्यंत पॅलेस्टिन स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही अशा घोषणा दिल्या. (अधिक माहितीसाठी ही लिंक पहा. )

विशेष म्हणजे ते काँग्रेसमनदेखील डेमोक्रॅट आहेत. मिशिगनमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे राज्य आहे. तिथल्या गव्हर्नर डेमोक्रॅट आहेत. या मुलांवर डेमोक्रॅट पक्षाने काय ऍक्शन घेतली? त्यांना यापुढे असली झुंडशाही खपवून घेतली जाणारा नाही, असा संदेश दिला गेला का? नसेल तर का दिला नाही? आणि दिला नसेल तर या मांजराचा चावा पुढच्या वेळेला अधिक खोल होत जाणार आहे, हे डेमोक्रॅटिक पक्षाने निदान आता तरी लक्षात घ्यावे. या प्रश्नांची उत्तरे डेमोक्रॅटिक नेतृत्वाला शोधावीच लागतील.

याच्यानंतरचा मुद्दा आहे illegal immigrationचा. आणि त्यातून वाढलेल्या बेसुमार गुन्हेगारीचा. Department of Homeland Security नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट मध्ये २०२१ ते २०२४ या काळात नेमके किती illegal immigratnts अमेरिकेत आले, याची आकडेवारी दिली आहे. यांच्यात त्यांनी नमूद केले आहे की, या काळात सुमारे १० दशलक्ष encounters नोंदवण्यात आली. (अधिक माहितीसाठी ही लिंक पहा.) गेल्या ४ वर्षांत एका अमेरिकन सिनेटरच्या मते एकूण ११. दशलक्ष बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत दाखल झाले. (अधिक माहितीसाठी ही लिंक पहा. )

हे लोक कोण होते? ते सध्या कुठे राहतात? त्यांचे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? या लोकांपासून अमेरिकन लोकांना धोका निर्माण होऊ शकतो का? वास्तविक बॉर्डर प्रोटेक्शन हे सरकारचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य आहे. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर लोकांना अमेरिकेत प्रवेश का दिला गेला? यातले कित्येक लोक त्यांच्या देशात गुंड म्हणून कार्यरत होते. आणि त्यातल्या काही लोकांनी अमेरिकेत आल्यावरदेखील त्यांचा आवडता व्यवसाय सुरूच ठेवला. यातल्या काही महाठगांनी न्यू यॉर्क शहरात पोलिसांवर हल्ला केला. १२ जणांच्या टोळीने २ पोलिसांना अक्षरश: लाथा बुक्क्यांनी तुडवले. त्यातला एक पोलीस गतप्राण झाला. आणि इतके होऊनदेखील हे गुंड न्यू यॉर्क मधून पळून जाण्यात यशस्वी झाले. (याचा व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक पहा.)

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. न्यू यॉर्क शहराचे महापौर डेमोक्रॅट आहेत. न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नर डेमोक्रॅट आहेत. असे असताना असे प्रकार तिथेच का घडले? असे प्रकार परत घडू नयेत म्हणून तिथल्या डेमोक्रॅटने काय स्टेप्स घेतल्या? हा भोंगळ कारभार नव्हे काय? तुमच्या ढिसाळ धोरणामुळे हे गुंड अमेरिकेत येऊन राहिले. तुम्ही राज्य करत असलेल्या राज्यापर्यंत पोचले. आणि त्यांनी तिथल्या सुविद्य आणि कायदेशीर नागरिकांना धोका उत्पन्न केला.

...........................................................................................................................................

अमेरिकेसारख्या एका विकसित देशात, कायदेशीरदृष्ट्या स्थलांतरित झालेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाची मुलगी आज पराभूत झालेली आहे. एक मध्यमवर्गातून पुढे आलेली कर्तबगार व्यक्ती एका चारित्र्यहीन धनदांडग्याकडून पराभूत झालेली आहे. आयुष्यभर केवळ न्यायाची बूज राखण्यासाठी लढत राहिलेली ही तेजस्वी स्त्री आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या ढिसाळ आणि व्यक्तीसापेक्ष आणि धर्मसापेक्ष धोरणामुळे एका गुन्हेगाराकडून पराभूत झालेली आहे. हा तिच्या शिक्षणाचा, तिच्या अनुभवाचा, तिच्या मेहनतीचा उपमर्द आहे. आणि तिचाच नाही तर तिला जन्म देणाऱ्या, तिला strollerमध्ये घालून civil rights movementला नेणाऱ्या तिच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचाही अपमान आहे. 

...........................................................................................................................................

७.

आमच्यासारखा माणूस eingeeringची पदवी घेऊन, व्हिसा घेऊन येतो. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करतो. केंद्र आणि राज्य सरकारला लाखो डॉलरचा टॅक्स देतो. आणि अशा माणसाला ग्रीनकार्ड देण्यासाठी तुम्हाला २०-२० वर्षे लागतात. आणि या २० वर्षांत तुम्ही त्या माणसाच्या जन्मतारखेपासून त्याच्या आई-बापाची जन्मतारीख आणि त्यांच्या जन्माचे ठिकाणदेखील तपासून बघता. आणि बारीकशी जरी विसंगती दिसली, तरी त्याला वर्षानुवर्षे झुलवता. आणि बॉर्डरच्या भिंतीवर चढून आलेल्या या सर्वस्वी नालायक गुंडाना अमेरिकेत आल्या आल्या employment authorization देता? त्यांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध करून देता? तुमचे डोके ठिकाणावर आहे का? तुम्हाला आम्ही तुमचे मतदार वाटत नाही का?

आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ‘defund police’ सारखे प्रोग्रॅम रन करता? तुम्हाला पोलीस का नको आहेत? तुमच्या पोलिसांविषयी असलेल्या अगम्य आकसाने अमेरिकेतल्या समस्त पोलिसांच्या संघटनेने या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला. (सविस्तर बातमीसाठी ही लिंक पहा.) पोलिसांच्या संघटनेने एका procesucutor पाठिंबा देण्याऐवजी एका गुन्हेगाराला पाठिंबा दिला. याची खरे तर डेमोक्रॅट नेतृत्वाला लाज वाटायला हवी.

तुमच्या असल्या नेभळट वृत्तीमुळे आज सॅन फ्रान्सिस्कोसारखे सोन्यासारखे शहर हातातून गेले आहे. १० वर्षांपूर्वी या गावातला union square युवकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण होता. इथे जगभरातल्या मोठ मोठ्या brandsची भली मोठी दुकाने होती. कित्येक दशलक्ष डॉलर ची दिवसाची उलाढाल होती. तुमच्या राज्यात या गावाची अक्षरश: राखुंडी झाली आहे. या शहराचा महापौर तुमचाच आहे. या राज्याचा गव्हर्नरदेखील तुमचाच आहे. पोलिसांचा वाचक राहिलेला नाही. मोठमोठ्या ड्रगच्या गँग्सचा सुळसुळाट झाला आहे. जवळ जवळ प्रत्येक फुटपाथ होमलेस लोकांच्या राहुट्यांनी भरून गेलेला आहे.

तिथे राहणाऱ्या घरमालकांनादेखील आता त्यांच्या घरी जाण्याची वाट बंद झालेली आहे. तुम्हाला कल्पना आहे का ती घरे ज्यांनी घेतली, त्यांनी त्यांच्या रक्ताचे पाणी करून, पै पै साठवून, एक वेळ जेवून ती घरे घेतली होती. आणि त्यांनी तुमच्या पक्षाच्या अधिपत्याखाली असलेल्या मुनिसिपालटीला वेळच्या वेळेला property taxदेखील दिला होता. मग त्यांचा हक्क हिरावून घेताना तुम्हाला लाज वाटली नाही? घरमालकापेक्षा तुम्हाला त्याच्या घरासमोर तंबू ठोकून राहणाऱ्या व्यसनी होमलेस माणसाचा कळवळा वाटतो?

तो union square तर केव्हाच रिकामा झालेला आहे. तिथले सगळे flagship business केव्हाच तिथून निघून गेलेले आहेत. आता तिथल्या मोकळ्या इमारतींमध्ये सर्रास देहविक्रय चालतो. Fentanylसारखे महाविषारी ड्रग गल्लोगल्ली मिळत आहे. तुम्हाला कल्पना तरी आहे की, हे ड्रग कोणा कोणाच्या हातात पडू शकते? हे ड्रग घेऊन चांगल्या चांगल्या घरातली मुले आणि मुली मृत्युमुखी पडत आहेत, याची तुमच्या लेखी नोंद तरी आहे का? (सॅन फ्रान्सिस्कोच्या अध:पतनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक पहा.) नसेल तर करून घ्या. नाहीतर सॅन फ्रान्सिस्को शहरासारखाच तुमचादेखील सर्वनाश अटळ आहे, हे लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे.

असो. मी हे तुम्हाला काय सांगतोय? कारण अमेरिकेचा एक कायदेशीर स्थलांतरित नागरिक म्हणून मला कमला हॅरिस यांचा पराभव जिव्हारी लागला आहे.

अमेरिकेसारख्या एका विकसित देशात, कायदेशीरदृष्ट्या स्थलांतरित झालेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाची मुलगी आज पराभूत झालेली आहे. एक मध्यमवर्गातून पुढे आलेली कर्तबगार व्यक्ती एका चारित्र्यहीन धनदांडग्याकडून पराभूत झालेली आहे. आयुष्यभर केवळ न्यायाची बूज राखण्यासाठी लढत राहिलेली ही तेजस्वी स्त्री आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या ढिसाळ आणि व्यक्तीसापेक्ष आणि धर्मसापेक्ष धोरणामुळे एका गुन्हेगाराकडून पराभूत झालेली आहे.

हा तिच्या शिक्षणाचा, तिच्या अनुभवाचा, तिच्या मेहनतीचा उपमर्द आहे. आणि तिचाच नाही तर तिला जन्म देणाऱ्या, तिला strollerमध्ये घालून civil rights movementला नेणाऱ्या तिच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचाही अपमान आहे.

कमला हॅरिस यांनी त्यांचे सर्वस्व पक्षाला दिलेले आहे. आता त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्याची जबाबदारी पक्षाची आहे.

जगभरातल्या आणि अमेरिकेतल्यादेखील निवडणुका आणि त्यांचे निकाल लक्षात घेतले, तर एक गोष्ट निश्चित आहे की, अल्पसंख्याकांच्या राजकारणाचे दिवस आता संपले आहेत. कुठल्या एका धर्माचे, कुठल्या एका वर्णाचे, कुठल्या एखाद्या जातीचे लांगूलचालन करून, एकगठ्ठा मते आणि सत्ता मिळवणे आता जवळ जवळ अशक्य आहे. भारतासारख्या देशाला ही गोष्ट कळायला ७० वर्षे लागली, पण अमेरिकेला ते ४ वर्षांतच समजले आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

८.

तेव्हा बघा. विचार करा. या धर्मासाठी हा चेहरा, त्या धर्मासाठी तो चेहरा, या जातीसाठी हा चेहरा आणि त्या जातीसाठी तो चेहरा हा पंक्तीप्रपंच सोडून द्या. मतदारांच्या संख्येपेक्षा त्या मतदाराचे चारित्र्य विचारात घ्या. शेवटी एकेका माणसाच्या चारित्र्यावर त्या गावाचे, राज्याचे आणि देशाचे चारित्र्य ठरत असते. आणि ज्या देशाचे चारित्र्य संपुष्टात येते, तो देशदेखील संपुष्टात येतो, याचाही विचार करा.

५०० वर्षे मोठ्याच मोठ्या भूभागावर अधिराज्य गाजवणारे, संगीत, कला, नाट्य यांनी संपन्न असलेले, रोमन साम्राज्यदेखील तिथल्या राज्यकर्त्यांच्या चारित्र्यावरच उभे होते. ज्या क्षणी या राष्ट्रीय चारित्र्याला उतरती कळा लागली, तशी या राज्याची शेवटी घटिका जवळ येत गेली.

ट्रम्प यांच्या दुर्दैवी पुनरागमनाने अमेरिकेची आणि अमेरिकेच्या लोकशाहीची धोक्याची घंटा वाजलेलीच आहे. अमेरिकेचीच नाही, तर अमेरिकेचे जागतिक व्यवस्थेमधले स्थान बघता ही खरे तर जगातल्या प्रत्येक देशासाठी आणि जगातल्या प्रत्येक चारित्र्यवान व्यक्तीसाठी धोक्याची घंटा आहे. तरी अगदीच निराश होण्याचे काही कारण नाही. Rome did not fall in a day. पण अजूनही वेळ गेलेली नाही.

गरज आहे ती चारित्र्य निर्माणाच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि समाजाच्या, धर्माच्या, भाषेच्या, वर्णाच्या आणि जातींच्या चौकटीच्या बाहेर जाऊन एक राष्ट्र म्हणून विचार करण्याची... आणि आजची परिस्थिती पाहता हे डेमोक्रॅटिक पक्षच करू शकेल, याची मला आशा आहे. शेवटी इतकच म्हणेन की,

‘विदेशेषु धनं विद्या, व्यसनेषु धनं मतिः ।

परलोके धनं धर्मः, शीलं सर्वत्र वै धनम् ॥’

(परदेशात तुमचे ज्ञान हेच तुमचे धन असते. व्यसनात तुमची मती तुमचे धन असते. परलोकामधे तुमचे कर्तव्य हे तुमचे धन असते. पण तुमचे चारित्र्य हे सर्वत्र तुमचे धन असते.)

If money is lost, nothing is lost. If health is lost, something is lost. If character is lost, everything is lost

चारित्र्य निर्माणाच्या तुमच्या हरेक कृतीस अनेकानेक शुभेच्छा!!

.................................................................................................................................................................

लेखक निखिल कुलकर्णी गेली २५ वर्षे अमेरिकेत राहत आहेत. ते अमेरिकेचे नागरिक असून कॅलिफोर्निया राज्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. अमेरिकेतील अनेक शासकीय आस्थापनांसाठी त्यांनी महत्त्वाचे धोरणात्मक प्रकल्प यशस्वीरित्या हाताळले आहेत.

nskulkarni@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......