माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ हे पुस्तक नुकतंच मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्या तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातला लिहिलेल्या मनोगतात ते म्हणतात - “हे आत्मकथन म्हणजे काही माझ्या आजवरच्या संपूर्ण आयुष्याची दास्ताँ नाहीय. हे एका विशिष्ट कालमर्यादेतील कथन आहे आणि हा कालखंड आहे फक्त २३ महिन्यांचा (फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२२). म्हणजे जेमतेम दोन वर्षांचा काळ; पण माझ्या संपूर्ण आयुष्यालाही पुरून उरेल असा हा कालखंड आहे, म्हणूनच मी माझं हे आत्मकथन लिहिलं आहे. तेवढं महत्त्वाचं नसतं, तर कदाचित हे आत्मकथन मी लिहिलंही नसतं. किंबहुना, असंही म्हणता येईल की, या जेमतेम दोन वर्षांच्या काळात मी ज्या परिस्थितीला सामोरा गेलो, तशी परिस्थिती अन्य कुणाच्या राजकीय आयुष्यात आलीच नसेल असं नाही. कदाचित माझ्याहीपेक्षा वाईट अनुभव त्यांना आले असतील; मात्र आपला अनुभव जगाला ओरडून सांगण्याइतपत धाडस त्यांना झालं नसेल. ते धाडस मी केलंय; कारण माझी बाजू सत्याची होती, आहे आणि राहील! त्या सत्याला स्मरूनच मी हे आत्मकथन लिहिलंय.”
या पुस्तकातील हे एक प्रकरण...
.....................................................................................
एंजल नंबर - ४२२
नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता डोळे उघडले... आणि समोरच्या भिंतीवर लिहिलेला ४२२ आकडा मला दिसला. तेव्हा तो एखाद्या एंजलचा (देवदूत) नंबर असावा, असं मला उगाचच वाटलं; कारण ४२२ हा अंकगणितातील केवळ एक आकडा नव्हता. तो यातनेचं, संघर्षाचं, निर्दोषत्व-निरपराधपणाचं आणि एका लढाईचं ज्वलंत प्रतीक होता.
ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे शुभ-अशुभ काळाविषयी सूचन केलेलं असतं, त्याप्रमाणेच अंकशास्त्रात (न्यूमरोलॉजी) आकड्यांच्या प्रभावाविषयी सांगितलं गेलं आहे. काही आकड्यांना अंकशास्त्रात शुभ मानलं जातं. त्यांना ‘एंजल नंबर’ असं म्हटलं जातं. हा भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी सूचन करतो.
अंकशास्त्रात ४२२ हा आकडा ‘एंजल नंबर’ म्हणून ओळखला जातो. हा नंबर सकारात्मकतेचं प्रतीक आहे, अशी सकारात्मकता, जी एक प्रकारे आतून संदेश देते की- आजवर केलेल्या मेहनतीचं-श्रमाचं फळ मिळण्याची वेळ आता आलेली आहे... जर तुमचा हेतू शुद्ध आणि स्वच्छ असेल, कृती निष्कलंक असेल, तर यश नक्कीच प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या निश्चित केलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने, दृढपणे चालत राहावं, याचं स्मरण संपूर्ण ब्रह्मांडच तुम्हाला देत राहील.
माझं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या त्या सगळ्या दिवसांचा हिशेब मी तुरुंगात ठेवत होतो. सोबतच ज्यांच्यामुळे माझं हे स्वातंत्र्य हिरावलं गेलं, त्यांचाही हिशेब ठेवत होतो नि पुढेही ठेवत राहीन. नीचपणाची अगदी खालची पातळी गाठून येनकेनप्रकारेण आपल्या विरोधकाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांना पाहिलं की, नेहमीच मला एक शेर आठवतो-
‘न मैं गिरा, और न मेरे उम्मीदों के मीनार गिरे...!
पर कुछ लोग मुझे गिराने मे कई बार गिरे...
सवाल जहर का नहीं था,
वो तो मैं पी गया,
तकलीफ लोगों को तब हुई,
जब मैं फिर भी जी गया...!!’
मी तुरुंगातील प्रत्येक दिवसाची नोंद ठेवत होतो. एकेक दिवस गेला... नि बघताबघता १३ महिने, २७ दिवस झाले, म्हणजेच- ४२२! रोज अर्धी रात्र सरायची आणि कालगणनेत तारीख बदलायची, मी अंधारातच भिंतीवर लिहिलेला नंबर कुर्त्याच्या बाहीने पुसायचो आणि कोळशाच्या तुकड्याने नवीन नंबर लिहायचो, आदल्या दिवशीच्या संख्येत एकने भर घालणारा. त्यामुळे रोज सकाळी डोळे उघडताच सर्वप्रथम मला नजरेसमोर तो नंबरच दिसायचा; मात्र आज माझ्यासाठी तो केवळ एक नंबर किंवा आकडा नव्हता, तर आज माझ्यासाठी तो ‘एंजल नंबर’ होता- ४२२!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
रोजच्या प्रमाणेच व्यायाम, स्नान, पूजा करून मी कुर्ता-पायजमा घातला. नेहमीप्रमाणेच वर जॅकेट घातलं आणि माझ्या सुटकेची बातमी येण्याची वाट पाहत राहिलो. नाश्ता करावा किंवा काही खावं-प्यावं असं वाटत नव्हतं. किंबहुना भुकेची जाणीवच होत नव्हती; कारण बाहेर पडण्याचा झालेला आनंद- खुशी, उत्सुकता, अद्यापही थोडी शिल्लक असलेली अस्वस्थता... या साऱ्या संमिश्र भावनांमुळे माझं पोट आधीच भरून गेलं होतं... तरीही ज्या वास्तूत आपण एवढे दिवस जेवलो, तिथे आज सुटकेच्या दिवशी थोडंतरी खाल्लं पाहिजे, म्हणून मी अगदी थोडंच काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. आता पोटात जे आंदोलन सुरू होतं, तेच आंदोलन बाहेरच्या दुनियेतही सुरू होतं. एकतर नागपूरमध्ये आणि दुसरं मुंबईच्या न्यायालयात!
माझ्यासाठी सरकारने विरोधी पक्षाला दिलं उडतं जहाज...
त्या वेळी महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होतं. आदल्या दिवशी माझ्या जामिनाच्या आदेशाची बातमी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशन होण्याची शक्यता जवळजवळ दिसत नव्हती; मात्र नागपूर-मुंबई दरम्यान असलेल्या विमानांची संख्या अगदीच मर्यादित आहे आणि अधिवेशनाच्या दरम्यान तर ही विमानसेवा कायमच Fully booked असते. त्यामुळे अनेक आमदार आणि कार्यकर्ते अधिवेशन संपल्यावर संध्याकाळीच मुंबईकडे बाय-रोड यायला निघाले होते, जेणेकरून माझ्या सुटकेच्या वेळी त्यांना मला भेटता यावं.
हा बाय-रोड प्रवास तब्बल १५ तासांचा आहे. तर मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानाचं तिकीट आधीच काढून ठेवलेलं होतं; मात्र त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सरकारची औद्योगिक सल्लागार समितीची महत्त्वाची बैठकही होती आणि त्या बैठकीला विरोधी पक्षनेत्याची उपस्थितीही आवश्यक असते (इथे हे स्पष्ट करायला हवं की, या घटनेपर्यंत महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला होता. भाजपने शिवसेनेत फूट पाडून हा सत्ताबदल घडवून आणला होता. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. माझा पक्ष असलेली राष्ट्रवादी पार्टी आता विरोधी पक्ष झालेली होती आणि तेव्हा अजित पवार विरोधी पक्षनेता होते.)
विरोधी पक्षनेता असलेले अजित पवार मुंबईला यायला निघाले होते, साहजिकच औद्योगिक सल्लागार समितीची बैठक होणार की नाही होणार, असा प्रश्न निर्माण झाला. राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना बैठकीसाठी थांबण्याची विनंती केली, तेव्हा अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं- ‘सकाळी ७ नंतर थेट संध्याकाळपर्यंत नागपूरहून मुंबईला जाणारं एकही विमान नाहीय... आणि अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या वेळी मी तिथे असणं अत्यावश्यक आहे. तेव्हा मी या बैठकीला हजर राहू शकत नाही.’
यावर मुख्यमंत्री शिंदे लगेच अजितदादांना म्हणाले- “तुम्ही सकाळी ११ वाजताच्या औद्योगिक सल्लागार समितीच्या बैठकीला हजर राहा. बैठक संपल्यासंपल्या तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना राज्य सरकारच्या विमानाने मुंबईला पाठवण्याची व्यवस्था मी करतो.”
मग तसंच झालं. औद्योगिक सल्लागार समितीची ती महत्त्वाची बैठक पार पडली आणि माझ्या सुटकेच्या वेळी हजर राहायची इच्छा असलेल्यांना नागपुरातून थेट मुंबईला पोचवण्यासाठी राज्य सरकारने आपलं खासगी विमान उपलब्ध करून दिलं. अनेक नेते त्याच विमानाने मुंबईला आले (अर्थात काही काळाने अजित पवार विरोधी पक्षनेता राहिले नाहीत, ते भाजपच्या महायुती सरकारात उपमुख्यमंत्री बनले.)
तुरुंगातील प्रशासकीय कार्यालयात टीव्ही असल्यामुळे वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून तुटक का होईना, परंतु माझ्यापर्यंत माहिती पोचत होती. घड्याळाचे काटे पुढे-पुढे सरकत होते. मागे पडणाऱ्या एकेका क्षणाबरोबर माझ्या मनात येत होतं की, देव करो नि आपली अवस्था शाहरुख खानच्या मुलासारखी, आर्यनसारखी न होवो... कारण, सुटकेच्या संदर्भात ‘रिलीज मेमो’ला तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्व असतं!
...........................................................................................................................................
तब्बल ४२२ दिवसांनी आज मला घरचं जेवण मिळत होतं. मुद्दाम माझ्या आवडीच्या भाज्या आणि श्रीखंड बनवण्यात आलं होतं. पहिला घास तोंडात टाकण्यासाठी मी हात उचलला आणि डोळ्यांच्या कोनांतून पाहिलं, तर घरातील सगेळ जण माझ्याकडेच पाहत होते. जणू काही ४२२ दिवसांनी घरचं जेवण जेवताना, पहिला घास घेतल्यावर माझी काय प्रतिक्रिया येतेय, त्याचीच त्यांना प्रतीक्षा असावी... हे मला थोडं विचित्र वाटलं आणि हास्यास्पदही; पण मी विचार केला की, माझ्या प्रतिक्रियेच्या रूपात अपेक्षित असलेल्या आनंदापासून मी माझ्या कुटुंबाला का बरं वंचित ठेवावं? मी असं भासवलं की, ते सारे मला पाहत आहेत हे माझ्या गावीही नाही... मी अगदी काही ठाऊक नसल्यासारखाच श्रीखंड-पुरीचा तो पहिला घास तोंडात टाकला आणि समाधानाने डोळे बंद करून घेतले. त्या बंद डोळ्यांआडून माझी सारी स्वाद-इंद्रियं जणू सांगू लागली- ही लज्जत, जन्नतच्या स्वादाचीच अनुभूती!
...........................................................................................................................................
‘रिलीज मेमो’
ही एक कारकुनी स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या सुटकेसाठीची अंतिम पायरी. न्यायालयाने जामीन दिल्यावर जामिनाची रक्कम भरली जाते. गमतीची गोष्ट म्हणजे ही रक्कम रोख स्वरूपात भरली जाते आणि प्रत्येक नोटेवरचा नंबर लिहून द्यावा लागतो. न्यायालयातील कर्मचारी जामीन म्हणून आपल्याकडे आलेल्या रोख रकमेतील नोटांची आणि आपण लिहून दिलेल्या नोटांवरच्या नंबरांची पडताळणी करतात. उदाहरणार्थ, समजा माझ्या केसमध्ये एक लाख रुपये भरले, म्हणजे ५०० रुपयांच्या २०० नोटा. तर त्या २०० नोटांतील प्रत्येक नोटेवर छापलेला नंबर लिहून द्यावा लागतो. त्यानंतर जमा केलेल्या दोनशे नोटांतील प्रत्येक नोटेवरचा नंबर न्यायालयातील कर्मचारी त्यांना आपण लिहून दिलेल्या नंबराशी जुळवून बघतात. ते सगळे नंबर एकमेकांशी नीट जुळल्यावरच जामीन रक्कम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि न्यायालयातून ‘रिलीज मेमो’ काढला जातो.
त्यानंतर न्यायालयाकडून मिळालेला हा ‘रिलीज मेमो’ संबंधित आरोपी ज्या तुरुंगात असेल त्या तुरुंगाच्या दरवाज्याला टांगलेल्या एका बॉक्समध्ये टाकला जातो. महत्त्वाचं म्हणजे हा ‘रिलीज मेमो’ संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच त्या बॉक्समध्ये पडावा लागतो. त्यानंतर एक मिनिटाचाही उशीर झाला, तरी मग आरोपीची त्या दिवशी सुटका होत नाही, ती एकदम दुसऱ्या दिवसावर जाते.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (ज्याला केंद्रातील भाजप सरकारची तपासयंत्रणा असलेल्या एनसीबीने खोट्या प्रकरणात अडकवलं होतं.) जामीन मिळाला होता, त्या दिवशी गुरुवार होता; मात्र त्यांची कायदेशीर सल्ला देणाऱ्यांची एवढी मोठी फौज असतानाही दुसऱ्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी त्यांचे न्यायालयीन सोपस्कार वेळेत पूर्ण झाले नाहीत. परिणामी, आर्यन शुक्रवारी तुरुंगाबाहेर येण्याऐवजी शनिवारी सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.
सुटकेची वाट पाहत घालवलेला एकेक क्षण हा एखाद्या युगासारखा कसा भासतो, हे तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीलाच समजू शकतं. अर्थात त्या व्यक्तीच्या कुटुंबाची आणि शुभचिंतकांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नसते... म्हणूनच तुरुंगाबाहेर माझं कुटुंब, माझे मित्र आणि कायदेविषयक मार्गदर्शन करणारी माझी टीम, या साऱ्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती.
मात्र, न्यायालयीन प्रक्रिया त्या दिवशी काहीशी धिम्या गतीने सुरू होती. मी घड्याळाकडे नजर टाकली. वेळ बघून माझ्या ध्यानात आलं की, न्यायालयाची जेवणाची सुट्टीही आता संपलेली आहे; मात्र अद्याप ‘रिलीज मेमो’ घेऊन तिकडून वकील निघालेले नाहीत. त्यात आणखी ‘टी-२०’ मॅचची शेवटची ओव्हर असल्यावर मैदानावर जशी जोरजोरात आरडाओरड सुरू असते, त्याप्रमाणे माझ्या सुटकेला होणाऱ्या विलंबाबाबत वृत्तवाहिन्यांवरील निवेदक स्वत:चे असे काही वेगळेच अंदाज तावातावाने वर्तवत होते... आणि त्यामुळे तुरुंगाच्या आत माझं, तर तुरुंगाच्या बाहेर माझ्या कुटुंबीयांचं टेन्शन वाढत चाललं होतं.
न्यायालयाच्या बाहेर मोटरबाईक तयारच ठेवण्यात आली होती. मुंबईत बहुतांशी वेळेला ट्रॅफिक जाम असतं. अशा वेळी ट्रॅफिकमुळे गाडीने तुरुंगात ‘रिलीज मेमो’ पोचायला उशीर होईल म्हणून बाईक ठेवली होती; कारण बाईकमुळे प्रवासाची वीसेक मिनिटं वाचतात. वेळेचा नेमका अंदाज येण्यासाठी बाईकवाल्याने न्यायालय ते आर्थर रोड तुरुंग या दरम्यानच्या रस्त्यावर कित्येकदा तालीमही केली होती; कारण सुटकेसाठी ती १५-२० मिनिटंही महत्त्वाची होती. म्हणूनच ‘रिलीज मेमो’ घेऊन येणाऱ्या वकिलाला न्यायालयातून तुरुंगापर्यंत घेऊन येण्यासाठी गाडीऐवजी खास बाईकची व्यवस्था करण्यात आली होती.
...........................................................................................................................................
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला आणि उघड्या खिडकीतून त्याने ठकठक केलं. अक्षरश: कितीतरी महिन्यांनी मी सूर्योदय पाहत होतो. सकाळी सूर्यामुळेच कळतं की, रात्रीचा अंधार कितीही गडद असला, तरी तो सरतोच आणि पहाटे प्रकाशाचा सडा पडतोच. माझीही अंधारी रात्र सरली होती. आजपासून माझ्याही आयुष्याला एक प्रकारे नव्याने सुरुवात होत होती. मनामध्ये पक्का विश्वास होता, की राजकीय लढाई असो किंवा न्यायालयीन, शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. पुन्हा एकदा जनतेसमोर जायचं होतं आणि माझ्या विरोधात कारस्थान रचणाऱ्या प्रत्येकालाच चांगला धडाही शिकवायचा होता. त्या सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे. कुणालाच सोडणार नाही. मात्र ही सुडाची भावना नाही, तर ही न्यायासाठीची लढाई आहे...
...........................................................................................................................................
एवढंच कशाला, एका बाईकला काही झालं तर, आपत्कालीन व्यवस्था म्हणून दुसरी एक बाईकही तैनात ठेवण्यात आली होती. जेणेकरून ‘रिलीज मेमो’चा प्रवास खंडित होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे मी आता एका क्षणासाठीही तुरुंगात राहू नये, असं माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं!
शेवटी संध्याकाळी ४ वाजता बातमी आली की- ‘रिलीज मेमो’ मिळाला आहे आणि तो घेऊन बाईकवाल्याच्या पाठीमागे बसून माझे वकील इंद्रपाल सिंह कोर्टातून निघालेले आहेत. कोणत्याही प्रकारे संध्याकाळी पाचच्या आत तो ‘रिलीज मेमो’ तुरुंगाच्या दरवाज्याला टांगलेल्या बॉक्समध्ये टाकायचा, हेच त्यांचं आता मुख्य उद्दिष्ट होतं. त्यांच्या बाईकच्या सोबतीने आमची अजून एक बाईक चाललेली होती आणि या दोन बाईकचा पाठलाग वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या कितीतरी गाड्या करत होत्या; कारण वृत्तवाहिन्यांच्या त्या गाड्या ‘रिलीज मेमो’च्या बाईक यात्रेचं थेट प्रक्षेपण करत होत्या. अर्थात त्यामुळे त्या गाड्या खतरनाक पद्धतीने चालवल्या जात होत्या.
गंमत म्हणजे किमान त्या दिवशी तरी न्यायालय ते आर्थर रोड तुरुंग हे अवघ्या आठ किमीचं अंतर नागपूर ते मुंबई या ८०० किलोमीटरच्या अंतरापेक्षा जास्त भासत होतं. प्रत्यक्षात बाईकवाला कधी अतिशय वेगाने, कधी ट्रॅफिकमध्ये फसलेल्या गाड्यांच्या मधून बाईक काढत, तर कधी थेट रस्त्याच्या बाजूच्या निमुळत्या रस्त्याने मार्ग काढत आपली बाईक दौडवत होता.
एवढं सारं करूनही वाटेत एक अडथळा आलाच. आर्थर रोड तुरुंगाच्या तीनशे मीटर अलीकडे सात रस्ता सर्कलला प्रचंड ट्रैफिक लागलं; कारण या सर्कलला तब्बल सात रस्ते एकत्र येतात. त्यामुळे सात रस्ता सर्कल आणि ट्रॅफिक हे एक समीकरणच बनलं आहे. त्याशिवाय त्या दिवशी मला नेण्यासाठी वेगवेगळे राजकीय नेते आणि कार्यकर्ते आलेले असल्यामुळे त्यांच्या गाड्यांमुळे जरा जास्तच आणि किचकट ट्रॅफिक झाला होता. गाड्या सोडाच, त्यातून बाईक पुढे काढणंही अशक्यच होतं.
माझे वकील इंद्रपाल सिंह त्यामुळे आणखीच दुविधेत सापडले होते की, ट्रॅफिक क्लिअर होण्याची वाट पाहावी की, बाईकवरून उतरून तुरुंगाच्या दिशेने चालू पडावं? चालत जायचं, तर हाताशी तेवढा वेळ नव्हता आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळेही उशीर होण्याची शक्यता होतीच... तेवढ्यात, कस्तुरबा इस्पितळाची (हे इस्पितळ आर्थर रोड तुरुंगाच्या बरोबर समोरच आहे.) एक रुग्णवाहिका सायरन वाजवत पुढे आली. या रुग्णवाहिकेसाठी साहजिकच रस्ता मोकळा करून देण्यात आला, त्याबरोबर आमच्या बाईकवाल्याने हुशारीने त्या रुग्णवाहिकेच्या पाठोपाठ बाईक काढली आणि ट्रॅफिकमधून सुटका करून घेतली.
शेवटी ५ वाजायला काही मिनिटंच बाकी असताना बाईकवाला आर्थर रोड तुरुंगात पोचला. वकील इंद्रपाल सिंह घाईघाईतच बाईकवरून उतरले आणि धावतधावत तुरुंगाच्या दरवाज्याला लटकवलेल्या बॉक्सपर्यंत पोचले... ज्या बॉक्समध्ये ‘रिलीज मेमो’ टाकायचा होता. माझ्या कुटुंबातील काही सदस्य माझ्या सुटकेच्या आशेने, तर माध्यमांतील काही मंडळी वार्तांकनासाठी त्या बॉक्सजवळ उभं राहून ‘रिलीज मेमो’ची वाटच पाहत होते.
खरं तर ‘रिलीज मेमो’ ज्यात टाकायचा तो बॉक्स माझे वकील इंद्रपाल सिंह यांनी यापूर्वी हज्जारदा पाहिला असेल; मात्र तरीही या वेळी त्यांनी काही क्षण थांबून तो बॉक्स नीट न्याहाळला, त्यानंतर त्यावर लिहिलेला मजकूर त्यांनी बारकाईने वाचला आणि मगच आपल्या हातातला माझ्या सुटकेचा ‘रिलीज मेमो’ त्या बॉक्समध्ये टाकला.
तिकडे तो ‘रिलीज मेमो’ बॉक्समध्ये पडला आणि इकडे तुरुंगातील एक कैदी धावतच माझ्याजवळ आला नि म्हणाला- ‘पाच वाजायच्या आत तुमचा ‘रिलीज मेमो’ बॉक्समध्ये टाकला गेलाय, आज तुमची सुटका नक्की होणार!’
ते शब्द ऐकल्यावर मी एकदम रिलॅक्स झालो... मुंबईतली चालती लोकल धावत-धावत पकडल्यावर किंवा त्या लोकलमध्ये चढल्यावर शांतपणे जो एक दीर्घ निःश्वास सोडला जातो, अगदी तसाच... निर्धास्तपणाचा-शांतपणाचा अनुभव!
...........................................................................................................................................
माझ्या डोक्यात विचारांचं असं वादळ सुरू असतानाच माझी पावलं तुरुंगातून बाहेर पडताना शेवटची निशाणी असलेल्या त्या महाकाय दरवाज्याजवळ येऊन थबकली. या दरवाज्याला एक छोटा दिंडी दरवाजा आहे. ज्यातून एका वेळी एकच व्यक्ती ये-जा करू शकते. तुरुंगात येण्या-जाण्यासाठी लोकांना सहसा याच दरवाज्याचा वापर करावा लागतो. साहजिकच मलाही याच दिंडी दरवाज्याचा वापर करावा लागणार होता. माझी उंची साधारणपणे सहा फूट आहे. त्यामुळे बाहेर पडताना खाली वाकून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा तुरुंगाबाहेर जायचं म्हणून खाली वाकून मी दरवाज्यातून बाहेर आलो. बाहेर येऊन मान वर करून पाहिलं, तर... माझ्या संपूर्ण शरीरात जणू एक नवीन ऊर्जाच संचारली. चैतन्याची एक लाटच माझ्या आत उसळली...
...........................................................................................................................................
केव्हापासून सुरू असलेला अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव आता संपत आला होता. तुरुंगातील कैद्यांनी, तुरुंगाच्या आत असलेल्या झाडांच्या पानाफुलांपासून एक छान गुच्छ तयार केला होता. तो गुच्छ भलेही एरव्हीच्या गुच्छांप्रमाणे आकर्षक नसेल; परंतु तुरुंगात सगळ्याचाच अभाव असतानाही त्या कैद्यांनी तो अतिशय आत्मीयतेने बनवला होता. साहजिकच त्याची तुलना महागड्या आणि भारदस्त गुच्छांशी करणं, हा त्यांच्या भावनांचा केलेला अपमान ठरला असता. काहींनी शुभेच्छा देतानाच विनंती केली की, बाहेर गेल्यावर तुम्ही आमच्यासाठीही चांगला वकील करा, तर कुणी आपल्या कुटुंबीयांसाठी माझ्याकडे संदेश दिला. (महत्त्वाचं म्हणजे मी कुणालाच निराश केलं नाही.)
हा अभिनंदन-शुभेच्छांचा कार्यक्रम सुरू असतानाच ‘रिलीज मेमो’ बॉक्समधून काढून तो तुरुंगाधिकाऱ्यांच्या कार्यालयात देण्यात आला होता. ‘रिलीज मेमो’वर तुरुंग प्रशासनाकडून केली जाणारी कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली होती. त्यामुळे तुरुंग अधीक्षकांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तिथे उपस्थित असलेले अनेक पोलीस कर्मचारी या वेळी अतिशय भावुक झाले होते. त्यांचं म्हणणं होतं- आम्हाला पहिल्यापासूनच ठाऊक होतं की, तुमची लवकरच सुटका होईल...
मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांनी तुरुंगात केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेवटची राहिलेली एक सही केली आणि मी उठून बाहेरच्या गेटच्या दिशेने चालायला सुरुवात केलीच होती की, माझी चालणारी पावलं अचानक थबकली. माझ्या कानांच्या पाळ्या एकाएकी गरम झाल्या आणि चेहरा क्षणात रागीट झाला. मी पटकन वळलो आणि पुन्हा माझ्या बरॅककडे चालू पडलो. तिथे जे उपस्थित होते, ते सर्व जण माझ्याकडे चकित होऊन पाहायला लागले. त्यांना धक्का बसणं स्वाभाविक होतं; कारण निरपराध असतानाही तुरुंगात राहावं लागलं म्हणून माझा जो संघर्ष सुरू होता, तो त्यांनी अनुभवला होता. मी तुरुंगाबाहेरची मोकळी हवा घेण्यासाठी किती उत्सुक आहे, ते त्यांनी पाहिलं होतं. अर्थात ही गोष्ट त्या प्रत्येकच निरपराधी व्यक्तीसाठी लागू होते, ज्याला निर्दोष असतानाही खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्यात येतं.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काही समजण्याच्या आतच किंवा त्यांनी काही अंदाज लावण्याच्या आतच मी क्षणार्धात माझ्या बरॅकमध्ये दाखल झालो होतो. खिशातून रुमाल काढला आणि भिंतीवर लिहिलेला आकडा पुसायला सुरुवात केली. भिंतीचा तो भाग एकदम मलिन झाला होता; कारण एकावर एक असे कितीतरी नंबर तिथे आधी लिहिले गेले होते आणि नंतर पुसून टाकण्यात आले होते. मी पूर्ण ताकदीनिशी रुमालाने भिंतीवर घासत होतो. ही आकड्यांची भिंत म्हणजे जणू निरपराध असतानाही मला झालेल्या कैदेची प्रतिमाच होती... आणि या भिंतीवर माझ्याशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निशाणी आता मला पुसून टाकायची होती... आता मला नवा अध्याय लिहायचा होता.
...........................................................................................................................................
न्यायालयाकडून मिळालेला हा ‘रिलीज मेमो’ संबंधित आरोपी ज्या तुरुंगात असेल त्या तुरुंगाच्या दरवाज्याला टांगलेल्या एका बॉक्समध्ये टाकला जातो. महत्त्वाचं म्हणजे हा ‘रिलीज मेमो’ संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच त्या बॉक्समध्ये पडावा लागतो. त्यानंतर एक मिनिटाचाही उशीर झाला, तरी मग आरोपीची त्या दिवशी सुटका होत नाही, ती एकदम दुसऱ्या दिवसावर जाते. सुटकेची वाट पाहत घालवलेला एकेक क्षण हा एखाद्या युगासारखा कसा भासतो, हे तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीलाच समजू शकतं. अर्थात त्या व्यक्तीच्या कुटुंबाची आणि शुभचिंतकांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नसते... म्हणूनच तुरुंगाबाहेर माझं कुटुंब, माझे मित्र आणि कायदेविषयक मार्गदर्शन करणारी माझी टीम, या साऱ्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया त्या दिवशी काहीशी धिम्या गतीने सुरू होती.
...........................................................................................................................................
भाजपच्या इशाऱ्यानुसार माझ्यावर खोटे आरोप करणारा सचिन वाझे तुरुंगात होता, मात्र भाजपच्या मेहरबानीमुळे परमबीर सिंह वाचला होता. हा तोच माणूस होता, ज्याला ‘अंबानी विस्फोटक कांड’ आणि ‘मनसुख हिरेन हत्याकांड’ प्रकरणात केव्हाच अटक व्हायला हवी होती; परंतु तो अगदी आश्चर्यकारकरीत्या त्या अटकेपासून वाचला होता. उच्च न्यायालयाने इशारा करूनसुद्धा वरील दोन प्रकरणांचा खरा सूत्रधार असलेल्या परमबीर सिंह याला अटक झाली नव्हती.
म्हणूनच आता मला तुरुंगात व्यतीत केलेल्या माझ्या दिवसांची मोजदाद पुसायची होती आणि माझ्या अटकेचं कारस्थान रचणाऱ्यांसाठी उलट्या दिशेने अंक मोजायला सुरुवात करायची होती. भिंतीवर जे काही लिहिलं होतं ते पुसता-पुसता सारा रुमाल काळा होऊन गेला. घासून घासून पुसल्यामुळे अनेक ठिकाणी तो फाटलादेखील. त्या रुमालाची आता एक साधी चिंधी झाली होती. ती चिंधी मी एका कोपऱ्यात फेकून दिली.
सेलच्या दुसऱ्या एका कोपऱ्यात मी वह्यांचा एक दस्ता बांधून ठेवला होता. हा या पुस्तकाचा पहिला कच्चा खर्डा होता, जे आता तुम्ही आता वाचत आहात. मी पुन्हा सेलच्या बाहेर आलो, आता माझ्या चेहऱ्यावर छान मिश्कील हास्य होतं आणि चालण्यात ऐट-रुबाब. मी असा रुबाबात चालत असतानाच तो ‘टरबूजा’ उंदीर माझ्या पायाखाली येता-येता वाचला आणि बघता-बघता दुसऱ्या कोपऱ्याच्या दिशेने तो पळत सुटला (या टरबूजा नावाच्या उंदराबद्दल मी १६व्या प्रकरणात सांगितलंच आहे.). तो टरबूजा मला इतका घाबरलेला होता की, त्याच्या नजरेत त्याचे नेहमीचे ते भावही नव्हते, जे सतत सांगू पाहायचे- ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...!’
...........................................................................................................................................
तुरुंगाच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या आधीच मी स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे विचार आणि चिंतन करायला सुरुवात केली होती. त्या मनन- चिंतनाच्या बळावर मी काही निष्कर्षाप्रत पोचण्याचा प्रयत्न करत होतो- तुरुंगात घालवलेल्या ४२२ दिवसांच्या दरम्यान बाहेर काय काय आणि कसं कसं बदललं असेल... लोकांचं पहिल्यासारखंच समर्थन मिळेल की, काळाबरोबर आता ते कमी झालं असेल? स्वतंत्रपणे विचार करणारा आणि चिंतन-मनन करणारा माणूस सांगोवांगीच्या गोष्टीही तर्काच्या कसोटीवर घासून पाहतो. जवळच्यांनी कितीही दिलासादायक शब्द उच्चारले, तरी तो त्यांवर डोळे झाकून विश्वासही ठेवत नाही आणि आनंदूनही जात नाही.
...........................................................................................................................................
जेव्हा कधी एखाद्याच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जातो, तेव्हा तो साहजिकच चिडून उठतो. असं होतं कारण निसर्गाने सर्वच जिवांना स्वातंत्र्य बहाल केलं आहे. असं असताना जेव्हा एखाद्याला बंदिस्त केलं जातं, त्याच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच तो विरोध करतो. ज्याप्रमाणे वाहणं हा नदीचा नैसर्गिक गुणधर्म आहे... मात्र, जेव्हा आपण बांध घालून नदीचा प्रवाह अडवायचा प्रयत्न करतो, तेव्हा नदी चिडून, एक तर बांध तोडूनफोडून टाकते किंवा आपल्या स्वभावधर्मानुसार वाहण्यासाठी नवा मार्ग शोधून काढते.
अगदी असंच माझ्या स्वातंत्र्याच्या दिशेने माझं पहिलं पाऊल आता पडलं होतं. तुरुंगाच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या आधीच मी स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे विचार आणि चिंतन करायला सुरुवात केली होती. त्या मनन- चिंतनाच्या बळावर मी काही निष्कर्षाप्रत पोचण्याचा प्रयत्न करत होतो- तुरुंगात घालवलेल्या ४२२ दिवसांच्या दरम्यान बाहेर काय काय आणि कसं कसं बदललं असेल... लोकांचं पहिल्यासारखंच समर्थन मिळेल की, काळाबरोबर आता ते कमी झालं असेल? स्वतंत्रपणे विचार करणारा आणि चिंतन-मनन करणारा माणूस सांगोवांगीच्या गोष्टीही तर्काच्या कसोटीवर घासून पाहतो. जवळच्यांनी कितीही दिलासादायक शब्द उच्चारले, तरी तो त्यांवर डोळे झाकून विश्वासही ठेवत नाही आणि आनंदूनही जात नाही.
उलट, स्वतंत्रपणे विचार करून आणि स्वत:चे तर्क लढवून तो आशा नि आशंका यांत नेमकं किती अंतर आहे, याचा आढावा घेतो. म्हणूनच एकीकडे मला माझ्या न्यायालयीन विजयाची जाणीव होती, तरीही पुढे वाढून ठेवलेल्या आव्हानांचा माग काढण्याचे माझे प्रयत्नही सुरूच होते.
माझ्या डोक्यात विचारांचं असं वादळ सुरू असतानाच माझी पावलं तुरुंगातून बाहेर पडताना शेवटची निशाणी असलेल्या त्या महाकाय दरवाज्याजवळ येऊन थबकली. या दरवाज्याला एक छोटा दिंडी दरवाजा आहे. ज्यातून एका वेळी एकच व्यक्ती ये-जा करू शकते. तुरुंगात येण्या-जाण्यासाठी लोकांना सहसा याच दरवाज्याचा वापर करावा लागतो. साहजिकच मलाही याच दिंडी दरवाज्याचा वापर करावा लागणार होता. माझी उंची साधारणपणे सहा फूट आहे. त्यामुळे बाहेर पडताना खाली वाकून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा तुरुंगाबाहेर जायचं म्हणून खाली वाकून मी दरवाज्यातून बाहेर आलो. बाहेर येऊन मान वर करून पाहिलं, तर... माझ्या संपूर्ण शरीरात जणू एक नवीन ऊर्जाच संचारली. चैतन्याची एक लाटच माझ्या आत उसळली...
बाहेर पडताच मला माझं संपूर्ण कुटुंब दिसलं. मुलगी पूजा, मुलगे सलील आणि ऋषिकेश, जावई गौरव, सुना रिद्धी आणि राहत... यांच्यासोबत इतरही कितीतरी नातेवाईक आलेले होते. कुणाच्या डोळ्यांत अश्रू होते, तर कुणाच्या डोळ्यांत आनंद. माझ्या पक्षाची तमाम बडी नेतेमंडळीही तिथे उपस्थित होती- प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुप्रियाताई... यांच्याशिवाय राजकारणातील इतरही कितीतरी सहकाऱ्यांचे चेहरे मला त्या गर्दीत दिसले. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं- ‘अनिलबाबू, तुम्ही आधी जसे होतात तसेच आताही आहात...’
...........................................................................................................................................
हे सारं सुरू असतानाच प्रेमाने एकमेकांना धक्काबुक्की करणं सुरू झालं आणि मला सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांच्यासमवेत एका ओपन जीपमध्ये चढवलं गेलं. त्या जीपमध्ये उभं राहिल्यावर मला उंचावरून ते पाहता आलं जे मला खालून दिसू शकत नव्हतं. खाली उभा असताना लोकांची गर्दी दिसत होती; मात्र ती गर्दी किती अफाट आणि अचाट आहे, ते मला जीपमध्ये चढल्यावरच कळलं. आडवा-उभा उसळलेला जनसागर मला जीपमध्ये उभा राहिल्यावरच दिसला. हजारोंच्या संख्येने समर्थक-कार्यकर्ता जमले होते. मला जीपमध्ये उभं राहिलेलं पाहताच त्या गर्दीने एकच जल्लोष केला. ढोल-नगारे वाजायला लागले. घोषणांबरोबरच हार-फुलांची उधळण व्हायला सुरुवात झाली... एका नेत्याला यापेक्षा वेगळं आणखी काय हवं असतं? उत्साहाने फसफसलेल्या त्या गर्दीसाठी एकच शब्द पुरेसा होता- ‘जन-समर्थन’. क्वचित कुणाला ही गोष्ट उटपटांग वाटू शकते; परंतु खरंच सांगतो, हा शक्तिशाली शब्द मला तेव्हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात क्रांतिकारी आणि स्फोटक शब्द असल्यासारखं वाटत होतं.
...........................................................................................................................................
सगळ्यांनीच हार घालून आणि गळ्यात गळे घालून माझं स्वागत केलं. तेवढ्यात सुप्रियाताईंनी आपला फोन माझ्या कानाला लावला. पलीकडे राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख आणि माझे मेंटॉर मा. शरद पवार होते. ‘तुमच्या सुटकेचं दृश्य मी टीव्हीवर लाईव्ह पाहतोय’, असं त्यांनी मला सांगितलं. तसंच पुढे म्हणाले- तुम्ही काळजी घ्या, आपण लवकरच भेटू. आम्ही सगळे पूर्ण ताकदीनिशी तुमच्याबरोबर आहोत... पवारसाहेबांशी हे बोलणं सुरू होतं, तेव्हा आम्हा सगळ्यांची गळाभेट सुरूच होती. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता. सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
हे सारं सुरू असतानाच प्रेमाने एकमेकांना धक्काबुक्की करणं सुरू झालं आणि मला सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांच्यासमवेत एका ओपन जीपमध्ये चढवलं गेलं. त्या जीपमध्ये उभं राहिल्यावर मला उंचावरून ते पाहता आलं जे मला खालून दिसू शकत नव्हतं. खाली उभा असताना लोकांची गर्दी दिसत होती; मात्र ती गर्दी किती अफाट आणि अचाट आहे, ते मला जीपमध्ये चढल्यावरच कळलं. आडवा-उभा उसळलेला जनसागर मला जीपमध्ये उभा राहिल्यावरच दिसला. हजारोंच्या संख्येने समर्थक-कार्यकर्ता जमले होते. मला जीपमध्ये उभं राहिलेलं पाहताच त्या गर्दीने एकच जल्लोष केला. ढोल-नगारे वाजायला लागले. घोषणांबरोबरच हार-फुलांची उधळण व्हायला सुरुवात झाली...
एका नेत्याला यापेक्षा वेगळं आणखी काय हवं असतं? उत्साहाने फसफसलेल्या त्या गर्दीसाठी एकच शब्द पुरेसा होता- ‘जन-समर्थन’.
क्वचित कुणाला ही गोष्ट उटपटांग वाटू शकते; परंतु खरंच सांगतो, हा शक्तिशाली शब्द मला तेव्हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात क्रांतिकारी आणि स्फोटक शब्द असल्यासारखं वाटत होतं. अहाहा - जन-समर्थन... किती सुंदर, किती जोरकस, किती वजनदार आणि किती अद्भुत शक्तींनी भारलेला नि भरलेला असा हा शब्द आहे! हा शब्द म्हणजे कोणत्याही नेत्यासाठी जणूकाही पॉवरहाउसच... केवळ या एकाच शब्दामुळे कोणत्याही नेत्याच्या शारीरिक- मानसिक समस्या एका झटक्यात दूर होतात आणि त्याच्या रोमारोमात जणू काही वीज दौडू लागते. माझ्याबाबत आता अगदी असंच घडत होतं.
ओपन जीपबरोबर हजारोंचा हा काफिला पुढे निघाला... विविध माध्यमांचे प्रतिनिधीही कॅमेरे घेऊन सोबत होते. ढोल-नगाऱ्यांच्या आवाजाबरोबरच लोकांनी दिलेल्या ‘अनिल देशमुख आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं।’ या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. क्षणाक्षणाला लोक हात हातात घेत होते, हार घालत होते आणि फुलांचा वर्षावही करत होते. हा सिलसिला बराच काळ सुरू होता. मी त्या गर्दीतील चेहरे ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या नजरेला नजर भिडवूनच माझा त्यांच्याशी जणू संवाद सुरू होता. सोबतच कधी हात हलवून, कधी हसून तर कधी केवळ नजरेनेच त्यांच्या शुभेच्छांना उत्तर देत होतो.
एवढ्या साऱ्या सामान्य लोकांना त्या गर्दीत बघून मी खरोखरच भारावून गेलो; कारण मला त्या गर्दीत माझे केस कापणारा अलीदेखील दिसला. मी केवळ इशाऱ्यानेच त्याला विचारलं की, इकडे कुठे? तर तो जोरात ओरडून म्हणाला- ‘तुमच्यासाठीच सुट्टी घेऊन आलोय. गेले पाच तास इथे वाट बघत उभा आहे...’ अलीसारख्याच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना मी त्या गर्दीत ओळखलं आणि त्यांना अभिवादनही केलं. हा सारा एवढा जबरदस्त माहौल होता की, तुरुंगाच्या बाहेरच्या रस्त्यावरच आम्ही एक तासाहून अधिक काळ होतो.
शेवटी धिम्या गतीने का होईना, परंतु आमचा काफिला सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचला. आता आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करायची होती. आणि जेव्हा नवीन कार्याला सुरुवात केली जाते, तेव्हा सर्वप्रथम श्रीगणेशाचेच आशीर्वाद घेतले जातात. माझी बायको आरती मंदिरात आधीपासूनच माझी वाट पाहत होती. सुटकेनंतरची ही आमची पहिली भेट होती. दुनियेसाठी मी भलेही गृहमंत्री राहिलो असेन, मात्र माझी ‘होम मिनिस्टर’ नेहमी आरतीच राहिली आहे. मला समोर बघून तिला तिच्या अश्रूंना आवर घालणं कठीण गेलं. हळूच जवळ येऊन माझ्या कुशीत शिरून ती हमसाहमशी रडू लागली. त्या वेळी माझ्या बाकीच्या साथीदारांनी सहकाऱ्यांनी समजून-उमजून काही काळासाठी आम्हाला एकटं सोडलं. आम्हाला आमची प्रायव्हेट स्पेस दिली.
...........................................................................................................................................
अंकशास्त्रात ४२२ हा आकडा ‘एंजल नंबर’ म्हणून ओळखला जातो. हा नंबर सकारात्मकतेचं प्रतीक आहे, अशी सकारात्मकता, जी एक प्रकारे आतून संदेश देते की- आजवर केलेल्या मेहनतीचं-श्रमाचं फळ मिळण्याची वेळ आता आलेली आहे... जर तुमचा हेतू शुद्ध आणि स्वच्छ असेल, कृती निष्कलंक असेल, तर यश नक्कीच प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या निश्चित केलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने, दृढपणे चालत राहावं, याचं स्मरण संपूर्ण ब्रह्मांडच तुम्हाला देत राहील. माझं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या त्या सगळ्या दिवसांचा हिशेब मी तुरुंगात ठेवत होतो. सोबतच ज्यांच्यामुळे माझं हे स्वातंत्र्य हिरावलं गेलं, त्यांचाही हिशेब ठेवत होतो नि पुढेही ठेवत राहीन.
...........................................................................................................................................
मी कुठेतरी वाचलं होतं की, अमेरिकेच्या इलिनॉयस युनिव्हर्सिटीतील ‘नातेसंबंध’ विषयातील तज्ज्ञांनी असा शोध लावला होता की- आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोचल्यावर नवरा-बायको दोघांच्या हृदयाचे ठोके सारख्याच गतीने पडायला सुरुवात होते. इतर कुणी या शोधावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, मी मात्र त्यांच्या संशोधनाशी शंभर टक्के सहमत आहे.
माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या ‘क्लिक क्लिक’ आवाजाने आमच्या प्रायव्हेट स्पेसची तंद्री भंगली आणि आम्ही पुन्हा सार्वजनिक अवकाशात परतलो. आधी आम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून जवळच असलेल्या चैत्यभूमीवर जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथे बाबासाहेबांच्या समाधीवर आम्ही श्रद्धापुष्पं अर्पण केली.
त्यानंतरच मी माझ्या राजकीय मित्रांचा सहकाऱ्यांचा निरोप घेतला. तिथून मी घरी पोचणारच होतो, मला अचानक काहीतरी आठवलं. मी एका दुकानाजवळ गाडी थांबवली. गाडीतून उतरून दुकानात गेलो आणि माझ्या दोन नातींसाठी- सारा आणि तारिकासाठी दोन चॉकलेट्स विकत घेतली; कारण त्या दोघी केव्हापासून मी घरी येण्याची वाट पाहात होत्या. त्यांच्यासाठी चॉकलेट्स घेऊन मी पैसे देण्यासाठी खिशात हात घातला, तर खिसा रिकामा होता. मनात आलं- असाही दिवस पाहायचा होता की, नातींसाठी चॉकलेट्स घ्यायची, तर त्यासाठीही खिशात पैसे नसावेत... शेवटी मी ड्रायव्हरकडून पैसे घेतले आणि दुकानदाराला दिले.
जसं मी घरात पाऊल ठेवलं, माझ्या दोन्ही नातींनी धावत येऊन मला मिठी मारली. अगदी भावुक होऊन कितीतरी वेळ आम्ही तिघेही एकमेकांच्या मिठीत तसेच होतो. घरी माझ्या बहिणी आणि इतर नातेवाईक मंडळीही उपस्थित होती. सगळ्यांसाठीच हा एक अतिशय भावनिक क्षण होता.
कोणत्याही घरातलं सौंदर्य कशात असेल, तर ते भावनिक उबदारपणात आणि आपलेपणात असतं. घर म्हणजे जिवंतपणा, ऊर्जा, आशा, आपलेपणा आणि प्रेमाचा अक्षय स्रोत. जेव्हा एखादं कुटुंब प्रेमाच्या आणि आपुलकीच्या मूल्यांची जपणूक करतं, तेव्हा त्या मूल्यांमागील ताकद जणू काही स्प्रिंगबोर्ड होते आणि आपलं लक्ष्य-उद्दिष्ट साध्य कारण्यासाठी व्यक्तीला वर उचलते. एका नव्या दृष्टिकोनामुळे मला आता तसं अगदी आतून जाणवत होतं.
तब्बल ४२२ दिवसांनी आज मला घरचं जेवण मिळत होतं. मुद्दाम माझ्या आवडीच्या भाज्या आणि श्रीखंड बनवण्यात आलं होतं. पहिला घास तोंडात टाकण्यासाठी मी हात उचलला आणि डोळ्यांच्या कोनांतून पाहिलं, तर घरातील सगेळ जण माझ्याकडेच पाहत होते. जणू काही ४२२ दिवसांनी घरचं जेवण जेवताना, पहिला घास घेतल्यावर माझी काय प्रतिक्रिया येतेय, त्याचीच त्यांना प्रतीक्षा असावी... हे मला थोडं विचित्र वाटलं आणि हास्यास्पदही; पण मी विचार केला की, माझ्या प्रतिक्रियेच्या रूपात अपेक्षित असलेल्या आनंदापासून मी माझ्या कुटुंबाला का बरं वंचित ठेवावं? मी असं भासवलं की, ते सारे मला पाहत आहेत हे माझ्या गावीही नाही... मी अगदी काही ठाऊक नसल्यासारखाच श्रीखंड-पुरीचा तो पहिला घास तोंडात टाकला आणि समाधानाने डोळे बंद करून घेतले. त्या बंद डोळ्यांआडून माझी सारी स्वाद-इंद्रियं जणू सांगू लागली- ही लज्जत, जन्नतच्या स्वादाचीच अनुभूती!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
रात्र झाल्यावर शेवटी झोपायला गेलो. खरं तर काळोखही होता आणि झोपण्यासाठी आरामदायी बिछानादेखील... मात्र, कितीही प्रयत्न केला तरी आज झोप येत नव्हती. माझं शरीर सतत दोन गोष्टींची तक्रार माझ्याकडे करत होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुरुंगात लाइट सुरू ठेवूनच झोपण्याचा नियम होता आणि शरीराला आता त्याची सवय झाली होती. तर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील बिछान्यावरील गादी मऊ नि आरामदायी होती आणि शरीराला तर आता कडक फरशीच्या जमिनीवरच झोपण्याची सवय झाली होती. शेवटी मी ५० टक्क्यांच्या तडजोडीवर प्रश्न मिटवला. म्हणजे झोपलो आरामदायी गादीवरच, पण लाइट चालू ठेवून!
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला आणि उघड्या खिडकीतून त्याने ठकठक केलं. अक्षरश: कितीतरी महिन्यांनी मी सूर्योदय पाहत होतो. सकाळी सूर्यामुळेच कळतं की, रात्रीचा अंधार कितीही गडद असला, तरी तो सरतोच आणि पहाटे प्रकाशाचा सडा पडतोच. माझीही अंधारी रात्र सरली होती. आजपासून माझ्याही आयुष्याला एक प्रकारे नव्याने सुरुवात होत होती. मनामध्ये पक्का विश्वास होता, की राजकीय लढाई असो किंवा न्यायालयीन, शेवटी सत्याचाच विजय होणार आहे.
पुन्हा एकदा जनतेसमोर जायचं होतं आणि माझ्या विरोधात कारस्थान रचणाऱ्या प्रत्येकालाच चांगला धडाही शिकवायचा होता. त्या सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे. कुणालाच सोडणार नाही. मात्र ही सुडाची भावना नाही, तर ही न्यायासाठीची लढाई आहे...
‘आँधियों को जिद है जहाँ बिजलियाँ गिराने की,
मुझे भी जिद है वहीं आशियाँ बसाने की...
हिम्मत और हौसले बुलंद है, खडा हूँ अभी गिरा नही हूँ!!
अभी जंग बाकी है, और मैं हारा भी नही हूँ!’
अन्यायाच्या विरोधातली माझी ही लढाई अजून संपलेली नाही. आताशी कुठे एक ठाणं काबीज केलंय...
लढाई अजूनही सुरूच आहे...
‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ - अनिल देशमुख
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने - २८० (हार्डबाउंड) | मूल्य - ६९९ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment