हिंदुत्व व मार्क्सवाद हे भारतीय समाजकारण आणि राजकारणातले दोन ध्रुव आहेत, आणि गेली शंभर वर्षे समाजकारण-राजकारण हे या दोन ध्रुवांमध्ये फिरते आहे...
ग्रंथनामा - झलक
विजय आपटे
  • ‘हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 20 October 2024
  • ग्रंथनामा झलक हिंदुत्व मार्क्सवाद आणि भारत Hindutva Marxvaad aani Bharat विजय आपटे Vijay Apte

हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार या दोन्ही विचारधारा शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहेत. गेली १०० वर्षांत त्यांच्यावर चांगल्या–वाईटाचे शिक्के बसले, पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा मागोवा लेखक विजय आपटे यांनी ‘हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ या पुस्तकात घेतला आहे. नुकत्याच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पक्ष हे माझ्या लहानपणापासून कुतूहलाचे विषय होते. कारण माझ्या आयुष्याची सुरुवातीची बरीच वर्षे मुंबईतील दादरच्या चाळीतील मध्यमवर्गीय वातावरणात गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित अशी अनेक माणसे माझ्या आजूबाजूला होती आणि त्यातील काही जण माझ्या नात्यातील होते. त्या वेळी रात्री जेवणे झाल्यावर अनेक वेळा नोकरीपेशातील लोक एकत्र येऊन गप्पा मारत असत. त्या गप्पांमध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांचाही समावेश असे. नंतर व्हिएतनाम आणि चीनचे भारतावरील आक्रमण हेही विषय चर्चेत आले. त्या गप्पा ऐकताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही माहिती समजत होती.

माझ्या वयाच्या दहा वर्षांच्या आसपास संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती. साम्यवादी पक्ष हा त्या चळवळीचा महत्त्वाचा घटक होता. शिवाजी पार्क घराच्या जवळ असल्यामुळे तेथे जाणेयेणे होत असे आणि मला भाषणे ऐकण्याची हौस असल्यामुळे आचार्य अत्रे, एस. एम. जोशी वगैरे वक्त्यांच्या बरोबरच कॉ. डांगे यांची घणाघाती भाषणे आणि शाहीर अमरशेख यांची ज्वलंत कवने कानावर पडत असत. गोळवलकरगुरुजींचे भाषण मी एकदा शिवाजी पार्कवर ऐकले होते. इंदिराजी आणि यशवंतराव चव्हाण यांचीही भाषणे ऐकली.

नाथ पै यांचे भाषण मुंबईत कुठेही असले, तरी मी आवर्जून ते ऐकायला जात असे. गोलकनाथ केसवर नाथ पै यांचे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधील भाषण, भिवंडीतील दंगलीनंतर वाजपेयींचे वल्लभभाई पटेल स्टेडियमवर झालेले भाषण आणि १९७७ साली निवडणुका जाहीर झाल्यावर जयप्रकाशांचे शिवाजी पार्कवर झालेले भाषण आजसुद्धा मला आठवते. जयप्रकाशजींनी त्या सभेत रामधारी सिंह दिनकर यांची कविता म्हटली होती, त्यातले शेवटचे कडवे होते, ‘फावडे और हल राजदंड बनने को हैं। धूसरता सोने से शृंगार सजाती हैं। दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो। सिंहासन खाली करो की जनता आ रही हैं।’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बॅ. नाथ पै आणि डॉ. राममनोहर लोहिया यांचे समाजवादी विचार मला आकर्षित करत होते. अवांतर वाचनाचीही आवड असल्यामुळे सर्व प्रकारचे वैचारिक साहित्याचे वाचन होत होते. आर्थिक विषमता आणि मानवी समूहाचे शोषण याबद्दलचे कार्ल मार्क्सचे विचार मनाला पटले होते, परंतु भारतातील साम्यवादी पक्षांबद्दल आपुलकी वाटत नव्हती, कारण चिनी आक्रमणाच्या वेळी काही कम्युनिस्ट नेत्यांनी संदिग्ध भूमिका घेतली होती.

फाळणीच्या वेळी असो की तेलंगणातील लढ्याच्या वेळी, साम्यवादी पक्ष हा मुस्लिमांशी जवळीक साधताना दिसला होता. त्याच वेळी हिंदू-मुस्लीम संघर्षात मतांसाठी मुस्लिमांचे चाललेले लांगुलचालन, शाहा बानो प्रकरणात राजीव गांधीनी टेकलेले गुडघे आणि दहशतवादी घटना या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. यांच्यामुळे हिंदूंचे संघटन असण्याची गरजही माझ्या मनाला पटत होती.

त्यातच तथाकथित बुद्धिवाद्यांचे नेहमी हिंदूंना झोडपत राहणे, हेसुद्धा मनात सलत होते. कोणीही सारासारविचार करणारा हिंदू असे मानत नाही की, हिंदू धर्मात कोणतेही दोष नाहीत. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, जगात असा कोणताही धर्म नाही, ज्याच्यात दोष नाहीत, मग भले त्या धर्माचे अनुयायी ते दोष कबूल करोत अथवा न करोत. ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्ममार्तंडांची त्यांच्या धर्मातील लोकांच्या व्यतिरिक्त इतर धर्मांतील लोकांना गुलाम करण्याची संमती होती.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ग्रीसमधील अँथेन्समध्ये ख्रिस्तपूर्व काळात गुलामांची संख्या ही एकंदर लोकसंख्येच्या ४० टक्क्यापेक्षा जास्त असे. प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांतसुद्धा एकोणिसाव्या शतकापर्यंत गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इंग्लंड, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांतसुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. अशा अनेक गोष्टी लिहिता येतील. पण इतर धर्मांबद्दल 'ब्र'सुद्धा उच्चारण्याची हिंमत नसलेले तथाकथित विचारवंत हिंदू धर्माला झोडपून काढायला मागेपुढे बघत नाहीत.

परंतु अलीकडच्या काळात काही पुरोगामी विचारवंत याचा फेरविचार करू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. श्री. योगेंद्र यादव यांनी त्यांच्या ५ ऑगस्ट २०२०च्या लेखात त्यांची या विषयावरील मते परखडपणे मांडली आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “...पण आज अप्रिय प्रश्नांना टाळणे आपल्याला परवडणार नाही; विचारवंत हे इतर कोणत्याही धर्मांपेक्षा हिंदू धर्माचा उपहास करणे, हे आपले परम कर्तव्य मानत होते की नाही? हिंदू धर्म हा केवळ त्यातील सर्वांत त्याज्य असलेल्या जातिव्यवस्थेपर्यंत सीमित असल्याचे गृहीत धरणे हे आजही फॅशनेबल आहे की नाही? धर्मनिरपेक्ष गटाची हिंदू धर्माबाबतची प्रतिक्रिया ही वासाहतिक प्रतिक्रियेशी मिळतीजुळती आहे की नाही?”

हिंदुत्व आणि मार्क्सवाद / समाजवाद या विषयांवर व्यक्त होणारी मते-मतांतरे मी जाणून घेत होतो आणि वस्तुस्थिती अनुभवत होतो. त्यामुळे माझे विचार हिंदुत्व आणि समाजवाद यामध्ये हेलकावे खात राहिले. त्याचवेळी मला हेही जाणवले की, भारतातील समाजकारण आणि राजकारणसुद्धा हिंदुत्व आणि मार्क्सवाद यात हेलकावे खात राहिले आहे.

.................................................................................................................................................................

जेव्हा मी या दोन संघटनांचा तात्त्विक पाया आणि त्यांचे कार्य या विषयावर लिहिण्याचे ठरवले, तेव्हा माझ्यापुढे असा प्रश्न उभा राहिला की, पुस्तकात केवळ आणि केवळ संघपरिवार आणि मार्क्सवादी परिवार यांच्यापुरतेच लिहायचे की, त्यांच्याबरोबरच देशातील तत्कालीन परिस्थिती आणि महत्त्वाच्या घटनासुद्धा विचारात घ्यायच्या? दुसरा पर्याय स्वीकारला तर पृष्ठसंख्या आणि पुस्तकाची किंमत वाढण्याचा धोका होता. परंतु एक गोष्ट लक्षात येत होती की, कोणतेही विचार आणि घटना हे संपूर्णपणे स्वतंत्र नसतात. कोणताही नवा विचार शून्यातून प्रकट होत नाही. अनेकांच्या वैचारिक मंथनातून नवा विचार पुढे येतो.

.................................................................................................................................................................

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा भारतीय जनता पक्ष व इतर सहयोगी संस्था या सर्वांचा मिळून संघपरिवार निर्माण झाला आहे. हा परिवार हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच निरनिराळ्या स्वरूपातील साम्यवादी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संस्था व मार्क्सवादी विचारांच्या इतर संस्था या सर्वांचा मिळून मार्क्सवादी परिवार निर्माण झाला आहे. हा परिवार मार्क्सवादाचे प्रतिनिधित्व करतो. आपल्याकडे कधी मार्क्सवादी परिवाराचे पारडे जड झाले (जसे श्रीमती इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या काळात) तर कधी संघपरिवाराचे पारडे जड झाले (जसे वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या काळात).

त्यामुळे हिंदुत्व व मार्क्सवाद आणि पर्यायाने संघपरिवार आणि मार्क्सवादी परिवार हे माझ्या मते, भारतीय समाजकारण आणि राजकारणातले दोन ध्रुव आहेत आणि गेली शंभर वर्षे भारतातील समाजकारण आणि राजकारण हे या दोन ध्रुवांमध्ये फिरते आहे. या दोन ध्रुवांच्यामध्ये काँग्रेस नावाचे विषुववृत्त आहे, पण ते या दोन ध्रुवांसारखे स्थिर नाही. ते कधी कर्कवृत्ताकडे सरकते, तर कधी मकरवृत्ताकडे. त्याशिवाय इतर अनेक छोटे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे अक्षांश-रेखांशसुद्धा साथीला आहेत. हे पुस्तक या दोन ध्रुवांत फिरलेल्या गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील भारतातील राजकारण आणि समाजकारणाचा इतिहास आहे. साहजिक या काळात घडलेल्या सर्वच महत्त्वाच्या घटनांची चर्चा इथे होणे स्वाभाविकच आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याची वेगवेगळी रूपे आणि साम्यवादी पक्ष व त्यांची वेगवेगळी रूपे यांच्यात जरी दोन ध्रुवांइतके अंतर असले, तरी त्यांच्यात काही साम्यस्थळेदेखील आहेत. सर्वांत प्रथम म्हणजे दोघांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे या दोघांना असा समाज अभिप्रेत आहे, ज्यात राज्य किंवा शासन यांना काहीही स्थान नाही. फरक इतकाच आहे की, हिंदुत्वामध्ये या समाजाला धर्म एकत्र बांधतो, तर कम्युनिझममध्ये साम्यवाद समाजाला एकत्र बांधतो.

दुसरे म्हणजे दोघेही काही तत्त्वांच्या भक्कम पायावर उभे आहेत आणि त्यांच्यापासून ते कधीही विचलित होत नाहीत. तिसरे साम्य म्हणजे दोघांनाही भक्कम कॅडर बेस आहे. कार्यकर्ते हे या दोघांचे खरे वैभव आहे. आपल्याकडे साधारणपणे असे चित्र दिसते की, एखादा चांगले काम करणारा माणूस संस्था स्थापन करतो, परंतु तो माणूस काळाच्या पडद्याआड गेल्यावर संस्था उतरणीला लागते. महाराष्ट्रातील कर्तबगार व्यक्तींनी स्थापन केलेल्या संस्थांची त्यांच्या पश्चात झालेली वाताहात याचीच साक्ष देतात. यांना लाभलेल्या कॅडर बेसमुळे आज शंभराव्या वर्षीसुद्धा हे दोघे टिकून आहेत.

चौथे साम्य म्हणजे या दोन्ही संस्था शिस्त, त्याग आणि सेवाभावना जपतात. पाचवे साम्य म्हणजे या दोन्ही संस्थांच्या सहयोगी संस्थांचे बळ यांच्या उपयोगात येते. भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर अनेक सहयोगी संस्था आणि किसान सभा, कामगार संघटना, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, तसेच इप्टासारख्या सांस्कृतिक संघटना या डाव्यांच्या सहयोगी संस्था, यांचा मोठा फायदा या दोन्ही संघटनांना झाला. सहावे साम्य म्हणजे या दोन्ही संस्थाना वेळोवेळी कठोर टीकेला सामोरे जावे लागले आहे.

तसेच या दोन्ही संस्थांना कधी ना कधी बंदीच्या दिव्यातून जावे लागले होते. सातवे साम्य म्हणजे दोघांचाही प्रभाव सुरुवातीला वाढला तो त्यांना अनुकूल असलेल्या भागात. संघाचा सुरुवातीला प्रभाव वाढला तो उत्तर भारतात, जेथे मुसलमानानी केलेल्या अत्याचारात हिंदू भरडले जात होते. बंगाल आणि आंध्र प्रदेशात जमीनदारांच्या अत्याचारात रयत भरडली जात होती, तेथे कम्युनिस्ट पक्षाच्या वाढीला सुपीक जमीन मिळाली. आठवे साम्य म्हणजे काही कारणांमुळे या संघटनांचे जे सभासद बाहेर पडले, त्यांचे नामोनिशाण या संघटनानी त्यांच्यापुरते त्यांच्या इतिहासातून पुसून टाकले.

बलराज मधोक आणि एम. एन. रॉय ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. नववे साम्य म्हणजे दोन्ही संस्थांचे नेतृत्व हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत उच्चवर्णियांच्या हातात होते. केरळमधील साम्यवादी पक्ष हे काही प्रमाणात याला अपवाद आहेत. दहावे साम्य म्हणजे दोन्ही संस्थांचे नेतृत्व हे पुरुषांच्या हातात होते. अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातसुद्धा १९९८ साली वृंदा करात पॉलिट ब्यूरोच्या सदस्य बनेपर्यंत सर्वोच्च स्तरावरील नेतृत्वात कोणाही स्त्रीचा सहभाग नव्हता.

.................................................................................................................................................................

हिंदुत्व हा संघपरिवाराचा पाया आहे. तसेच मार्क्सवाद हा मार्क्सवादी परिवाराचा पाया आहे. आपल्याला जर संघपरिवार आणि त्याच्या अनुषंगाने घडलेल्या घटना, तसेच मार्क्सवादी परिवार आणि त्याच्या अनुषंगाने घडलेल्या घटना जर समजून घ्यायच्या असतील, तर आपल्याला हिंदुत्व आणि मार्क्सवाद या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. प्राचीन काळातील कथा पाहिल्या, तर आपल्याला महाभारतातील शकुंतला आणि कालिदासाची शकुंतला, तसेच महाभारतातील ययाती आणि वि. स. खांडेकर यांचा ययाती यांत फरक दिसतो. तसेच ऐतिहासिक काळ लक्षात घेतला, तर इतिहास आणि विजय तेंडुलकरांचे नाटक यात फरक दिसतो. समकालीन घटनांविषयीही अनेकांना सखोल माहिती नसते. म्हणून मी या पुस्तकात वस्तुनिष्ठ चित्र उभे केले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला परिस्थिती किंवा घटना योग्य प्रकारे समजून घेता येतील.

.................................................................................................................................................................

या दोन्ही संघटनांत ज्याप्रमाणे अनेक साम्यस्थळे आहेत, त्याप्रमाणे काही विरोधाभासही आहेत. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सचे तत्त्वज्ञान हे इहवादी तत्त्वज्ञान आहे, तर हिंदू तत्त्वज्ञान हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांवर आधारित तत्त्वज्ञान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्यासाठी संघाला माणूस घडवायचा आहे, तर कम्युनिस्टांना समाज बदलायचा आहे. कम्युनिस्टांच्या मते, वर्गविरहित समाज अस्तित्वात आल्यावर आणि हिंदुत्ववाद्यांच्या मते, लोक धर्माने म्हणजे नीतिनियमाने वागू लागल्यावर राज्याची आणि शासनाची आवश्यकता राहणार नाही.

एक गोष्ट मान्य करायला हवी की, संघ आणि साम्यवादी पक्ष यांच्या कॅडरने अनेक वेळा कौतुकास्पद कामे केली आहेत. पंजाबमधील खलिस्तानी उद्रेकाच्या काळात उग्रवाद्यांना जर कोणी धैर्याने आणि प्रसंगी हातात शस्त्र घेऊन तोंड दिले असेल, तर ते मार्क्सवादी पक्षाच्या कॅडरनी. तरणतारण जिल्ह्यात शासनयंत्रणा नावापुरतीसुद्धा शिल्लक राहिली नसताना भिखीविंद गावातील बलविंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्याप्रकारे उग्रवाद्यांचा सामना केला, त्याला तोड नाही. सरकारने त्यांच्या कुटुंबातील चौघांचा शौर्यचक्र देऊन सन्मान केला होता. त्याचप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी १९४७ साली देशाच्या फाळणीच्या वेळी प्राणांची शर्थ करून अनेकांचे जीव वाचवले आणि त्यानंतर निर्वासित लोकांना मदत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. तसेच अनेक नैसर्गिक आपत्तींमध्येसुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी मदतकार्य केले आहे.

हिंदुत्ववादी विचारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ साली विजयादशमीच्या मुहुर्तावर स्थापन झाला आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी मार्क्सवादी विचारांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापन झाली. आज ते शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहेत. हे पुस्तक संघपरिवार, मार्क्सवादी परिवार आणि भारत यांचा मागील जवळजवळ शंभर वर्षांचा इतिहास आहे. इतिहास या शब्दाचा अर्थ आहे ‘इति अ हास’ म्हणजे ‘असे झाले’. जे झाले, ते सांगताना महत्त्वाच्या घटना विस्ताराने सांगाव्या लागतात आणि कमी महत्त्वाच्या घटनांची केवळ नोंद घ्यावी लागते.

जेव्हा मी या दोन संघटनांचा तात्त्विक पाया आणि त्यांचे कार्य या विषयावर लिहिण्याचे ठरवले, तेव्हा माझ्यापुढे असा प्रश्न उभा राहिला की, पुस्तकात केवळ आणि केवळ संघपरिवार आणि मार्क्सवादी परिवार यांच्यापुरतेच लिहायचे की, त्यांच्याबरोबरच देशातील तत्कालीन परिस्थिती आणि महत्त्वाच्या घटनासुद्धा विचारात घ्यायच्या? दुसरा पर्याय स्वीकारला तर पृष्ठसंख्या आणि पुस्तकाची किंमत वाढण्याचा धोका होता. परंतु एक गोष्ट लक्षात येत होती की, कोणतेही विचार आणि घटना हे संपूर्णपणे स्वतंत्र नसतात.

कोणताही नवा विचार शून्यातून प्रकट होत नाही. अनेकांच्या वैचारिक मंथनातून नवा विचार पुढे येतो. हिंदू धर्म एखाद्या झाडासारखा सातत्याने विकसित होत गेला. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या विचारांचे आणि तत्त्वज्ञानाचे धुमारे फुटत राहिले. त्याचबरोबर वठलेल्या फांद्या तोडाव्या लागल्या. मार्क्सच्या विचारांचे धागेदोरे हे त्याच्या पूर्वीच्या फ्रेंच समाजवादी विचारांत आणि जर्मन तत्त्वज्ञानात सापडतात. तसेच हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचे धागेदोरे हे वर्षानुवर्षे चालत आलेला धार्मिक हिंसाचार आणि तथाकथित उदारमतवादी लोकांकडून सातत्याने होणारी हिंदू धर्माची अवहेलना यांत सापडतात. तसेच कोणतीही नवी घटना शून्यातून निर्माण होत नसते. तो इतर अनेक घटनांच्या मधला दुवा असतो. त्याचे धागेदोरे त्याच्या पूर्वी आणि नंतर पसरलेले असतात.

त्याचे एक उदाहरण म्हणजे १९६७ ते १९७३ या काळात देशाच्या आर्थिक आणि शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारांचे प्राबल्य निर्माण झाले. त्याचे श्रेय हक्सर यांचे होते. परंतु केवळ इतकीच नोंद करणे पुरेसे नाही. ‘सिंडिकेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसमधील एका गटाने इंदिराजींच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंदिराजींना एखादा विश्वासू माणूस हवा होता. म्हणून त्यांनी हक्सर यांची नियुक्ती केली. त्यामुळे जर त्या काळातील डाव्या वळणाबद्दल लिहायचे असेल, तर सिंडिकेटच्या कारवाया, इंदिराजींच्या मनातील असुरक्षिततेची भावना, हक्सर यांची नियुक्ती आणि या वळणाचा भविष्यात अर्थव्यवस्थेवर झालेला प्रतिकूल परिणाम या सर्वांबद्दल लिहावे लागते, नाहीतर समग्र चित्र उभे राहणार नाही. म्हणून मी पृष्ठसंख्या आणि पुस्तकाची किंमत यांत वाढ होण्याचा धोका पत्करून समग्र चित्र उभे करण्याचे ठरवले.

.................................................................................................................................................................

हल्लीच्या काळातसुद्धा संघावर केल्या जाणाऱ्या टीकेमध्ये संघाच्या सामाजिक शक्तीचे आकलन हे जुन्याच चौकटीत होताना दिसते. ज्येष्ठ विचारवंत सुहास पळशीकर यांनी लोकसत्ता दैनिकाच्या १३/८/२०१७च्या अंकात जयदेव डोळे यांच्या ‘आरेसेस’ या पुस्तकाच्या परीक्षणात लिहिले आहे की, ‘संघाची आणि त्याच्या कार्याची परखड आणि निःपक्षपाती समीक्षा फारशी कुठे झालेली दिसत नाही...विचार, संघटन आणि पक्षीय राजकारण या तिन्ही बाबतीत संघ बदललेला आहे आणि त्या बदलामध्ये त्याची आत्ताची ताकद आहे.’ सप्टेंबर २०१८मध्ये सरसंघचालक भागवतांनी तीन दिवसांच्या सत्रात ‘भविष्यातील भारत’ या विषयावर संघाचे विचार मांडले होते. त्यावर टिपणी करताना सुहास पळशीकर यांनी लिहिले होते की, ‘इतक्या दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या या अजस्र संघटनेत काही स्थित्यंतरे होणे स्वाभाविक आहे आणि अशी काही स्थित्यंतरे झालेलीही आहेत.

.................................................................................................................................................................

हिंदुत्व हा संघपरिवाराचा पाया आहे. तसेच मार्क्सवाद हा मार्क्सवादी परिवाराचा पाया आहे. आपल्याला जर संघपरिवार आणि त्याच्या अनुषंगाने घडलेल्या घटना, तसेच मार्क्सवादी परिवार आणि त्याच्या अनुषंगाने घडलेल्या घटना जर समजून घ्यायच्या असतील, तर आपल्याला हिंदुत्व आणि मार्क्सवाद या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून मी हिंदुत्व आणि मार्क्सवाद या विषयांवर स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत.

आजकाल पुस्तकांचे वाचन कमी झाले आहे आणि समाजमाध्यमांवरील वाचन वाढले आहे. परंतु समाजमाध्यमांवरील लेखन हे अनेक वेळा एकांगी, चुकीचे आणि काहीवेळा तर सरळसरळ खोटे असते. त्यामुळे केवळ तरुण वर्गच नव्हे, तर सर्व थरातील लोकांना भूतकाळातील घटनांबद्दल योग्य माहिती नसते. एखाद्या विशिष्ट घटनेचे अनेक पैलू, त्यामागची पार्श्वभूमी, तत्कालीन वाद-प्रवाद यांच्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते किंवा त्यांचा परस्परसंबंध लावण्यास ते कमी पडतात. तसंच घटना जशा जुन्या होत जातात, तसा त्याच्या नोंदीमध्ये फरक पडू लागतो.

काही वेळा असा फरक हा लेखकाच्या लेखनस्वातंत्र्याचा भाग असतो, तर काही वेळा हा फरक हेतुपूर्वक केलेला असतो. प्राचीन काळातील कथा पाहिल्या, तर आपल्याला महाभारतातील शकुंतला आणि कालिदासाची शकुंतला, तसेच महाभारतातील ययाती आणि वि. स. खांडेकर यांचा ‘ययाती’ यांत फरक दिसतो. तसेच ऐतिहासिक काळ लक्षात घेतला, तर इतिहास आणि विजय तेंडुलकरांचे नाटक यांत फरक दिसतो. समकालीन घटनांविषयीही अनेकांना सखोल माहिती नसते. म्हणून मी या पुस्तकात वस्तुनिष्ठ चित्र उभे केले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला परिस्थिती किंवा घटना योग्य प्रकारे समजून घेता येतील.

मी हे पुस्तक तटस्थ भूमिकेतून लिहिले आहे, परंतु तरीदेखील माझ्या हेतूबद्दल शंका घेतली जाईल, हे मला माहीत आहे आणि मी याचा पूर्वीसुद्धा अनुभव घेतला आहे. चार वर्षांपूर्वी मी एका मंचामध्ये मारिचझांपी, सिंगुर, नंदिग्राम आणि लालगढ येथील हत्याकांडांबद्दल लिहिले होते, तेव्हा एका व्यक्तीने माझी ‘फॅसिस्ट आणि संघिस्ट’ अशी संभावना केली होती आणि उच्च जातीत जन्मलेल्या माझ्याकडून सत्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे लिहिले होते. सत्य हे नेहमीच कडू असते, त्यामुळे त्या बिचाऱ्याला ते गिळणे जमले नसेल. माझ्यावर टीका करणे त्याच्यासाठी सोपे आहे. परंतु ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत प्रफुल्ल बिडवई आणि एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्डहोल्डर सदस्या असलेल्या मोनोबीना गुप्ता यांच्या पुस्तकांतील मजकूर तो कसा काय पुसून टाकणार?

संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना २०२५ साली शंभर वर्षे पूरी होतील. त्यानिमित्ताने हिंदुत्व आणि मार्क्सवाद या दोन तत्त्वज्ञानांचा, कार्याचा आणि भारतातील गेल्या शंभर वर्षांतील समाजकारण आणि राजकारण यांच्यावर झालेल्या त्यांच्या परिणामांचा आढावा घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे. इतक्या दीर्घकाळ सातत्याने कार्यरत असलेल्या संस्था देशात आज अभावानेच आढळतात. या दोन संस्था आज शंभराव्या वर्षीसुद्धा जोमाने काम करत आहेत. पण त्याचबरोबर आज शंभराव्या वर्षात या दोन्ही संस्था अवघड वळणावर उभ्या आहेत. म्हणून त्यांच्या भूतकाळाबरोबरच त्यांच्या भविष्याचा वेध घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादाचा विषय होऊन राहिला आहे. त्यामुळे लेख आणि पुस्तकांच्या रूपाने संघावर नेहमी लेखन होत राहिले. आधी गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात न्यायालयाने निकाल दिल्यावरसुद्धा संघाचे टीकाकार या विषयावर संघाला झोडपत राहिले. त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलन आणि गुजरातमधील दंगलींनंतर टीकेची तीव्रता वाढत गेली. त्यातच २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्यापासून संघ अधिक ठळकपणे सर्वांच्या नजरेसमोर आला आणि त्यामुळे संघाबद्दलच्या मतमतांतराला आणि लेखनाला आणखी जोर चढला. ते वाचताना असे दिसून येते की, हे बहुतेक सर्व लेखन एकतर संघाचे गौरवगान करणारे असते किंवा संघावर तडाखेबंद टीका करणारे असते, परंतु तटस्थपणे केलेले लेखन क्वचितच पाहण्यात येते.

.................................................................................................................................................................

मी हे पुस्तक तटस्थ भूमिकेतून लिहिले आहे, परंतु तरीदेखील माझ्या हेतूबद्दल शंका घेतली जाईल, हे मला माहीत आहे आणि मी याचा पूर्वीसुद्धा अनुभव घेतला आहे. चार वर्षांपूर्वी मी एका मंचामध्ये मारिचझांपी, सिंगुर, नंदिग्राम आणि लालगढ येथील हत्याकांडांबद्दल लिहिले होते, तेव्हा एका व्यक्तीने माझी ‘फॅसिस्ट आणि संघिस्ट’ अशी संभावना केली होती आणि उच्च जातीत जन्मलेल्या माझ्याकडून सत्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे लिहिले होते. सत्य हे नेहमीच कडू असते, त्यामुळे त्या बिचाऱ्याला ते गिळणे जमले नसेल. माझ्यावर टीका करणे त्याच्यासाठी सोपे आहे. परंतु ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत प्रफुल्ल बिडवई आणि एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्डहोल्डर सदस्या असलेल्या मोनोबीना गुप्ता यांच्या पुस्तकांतील मजकूर तो कसा काय पुसून टाकणार?

.................................................................................................................................................................

हल्लीच्या काळातसुद्धा संघावर केल्या जाणाऱ्या टीकेमध्ये संघाच्या सामाजिक शक्तीचे आकलन हे जुन्याच चौकटीत होताना दिसते. ज्येष्ठ विचारवंत सुहास पळशीकर यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या १३/८/२०१७च्या अंकात जयदेव डोळे यांच्या ‘आरेसेस’ या पुस्तकाच्या परीक्षणात लिहिले आहे की, ‘संघाची आणि त्याच्या कार्याची परखड आणि निःपक्षपाती समीक्षा फारशी कुठे झालेली दिसत नाही...विचार, संघटन आणि पक्षीय राजकारण या तिन्ही बाबतीत संघ बदललेला आहे आणि त्या बदलामध्ये त्याची आत्ताची ताकद आहे.’

सप्टेंबर २०१८मध्ये सरसंघचालक भागवतांनी तीन दिवसांच्या सत्रात ‘भविष्यातील भारत’ या विषयावर संघाचे विचार मांडले होते. त्यावर टिपणी करताना सुहास पळशीकर यांनी लिहिले होते की, ‘इतक्या दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या या अजस्र संघटनेत काही स्थित्यंतरे होणे स्वाभाविक आहे आणि अशी काही स्थित्यंतरे झालेलीही आहेत. संघाचे विरोधक ती एक स्थिर आणि अपरिवर्तनीय वस्तू मानतात व तिच्या जुन्या वैशिष्ट्यांच्या आधारे तिच्यावर टीका करतात, त्यामुळेच संघावरची टीका काही वेळा गैरलागू आणि संदर्भविहीन ठरते. ते अर्थात संघाला सोयीचे ठरते, कारण अशा टीकेला समाजात मान्यता मिळत नाही.’ परंतु झापडबंद वृत्तीचे टीकाकार त्याची दखल घेताना दिसत नाहीत.

डाव्या चळवळीवरसुद्धा इंग्लिश आणि मराठी भाषेत अनेक पुस्तके आणि लेख लिहिले गेले आहेत. यातील बहुतेक लेखन हे डाव्या चळवळीच्या बाजूने लिहिले आहे. कारण विसाव्या शतकात विचारवंतांवर डाव्या विचारांचा पगडा होता. याचा परिणाम असा झाला की, लेखनात अनेक वेळा वस्तुस्थितीचा विपर्यास केलेला आढळतो. प्रसिद्ध विचारवंत आणि संपादक गोविंद तळवलकर यांनी त्यांच्या ‘गांधीपर्व’ या द्विखंड पुस्तकाच्या प्रास्तविकात याची काही उदाहरणे दिली आहेत. तसेच डाव्या पक्षांचा वैचारिक गोंधळ आणि हिंसाचार हे विषय एक तर नजरेआड केले जातात किंवा त्यांचे केविलवाणे समर्थन केले जाते. परंतु डाव्या पक्षांनी केलेल्या हिंसाचारावर आणि त्यांच्यातील वैचारिक गोंधळावर अलीकडच्या काळात, आणि त्यातही विशेषतः डाव्या आघाडीच्या बंगालमधील निवडणुकीतील पराभवानंतर काही पुस्तकांतून परखड टीका केली गेलेली आहे. ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक प्रफुल्ल बिडवई यांच्या ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ या पुस्तकात अशी परखड टीका केलेली दिसते.

वेगवेगळ्या रूपातील कम्युनिस्ट पक्ष हेसुद्धा वादाचे विषय झाले आहेत. बेचाळीसच्या लढ्याच्या वेळची त्यांची भूमिका, १९४७ सालातील फाळणीच्या वेळची त्यांची भूमिका, तेलंगणातील आंदोलन, चिनी आक्रमणाच्या वेळची त्यांची भूमिका, नक्षलवादी आंदोलन हे त्यातील काही वादाचे विषय होते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मी जेव्हा या विषयावरील पुस्तके वाचू लागलो, तेव्हा त्यांनी केलेला हिंसाचार वाचून मला मोठाच धक्का बसला. ही माहिती मला ज्या पुस्तकांतून मिळाली, ती पुस्तके मार्क्सवादी विचारसरणीच्या लोकांनीच लिहिली आहेत. त्यामुळे ती सर्व माहिती खरीच असणार यात शंका नाही. पहिल्यापासून माझे वाचन चांगले असल्यामुळे मला साधारणपणे चांगली माहिती असते. परंतु सुंदरबनातील मारीचझांपी बेटावर मार्क्सवादी पक्षाने १९७७ साली केलेल्या हत्याकांडाची केवळ मलाच नव्हे, तर डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनासुद्धा काही माहिती नसावी, ही खरंच आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे. साधारणपणे सर्वांना माहीत असलेल्या सिंगुर, नंदीग्राम आणि लालगढमधील हिंसाचारानंतर त्याचे वर्णन पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतपूर्व राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी 'राजकीय हिंसेचे तांडव' असे केले होते.

त्याचबरोबर त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान असलेला जो मार्क्सवाद आहे, तोसुद्धा वादाचा विषय आहे. आधी मुळात किती लोकांनी मार्क्सवादाचा खरोखर अभ्यास केला आहे ते समजायला मार्ग नाही. प्रसिद्ध मार्क्सवादी नेते ए. के. गोपालन यांनी एकदा म्हटले होते की, त्यांनी मार्क्स वाचला नाही; कारण तो वाचून त्यांना समजला नसता. ‘दास कॅपिटल’ हा आकाराने मोठा आणि समजायला क्लिष्ट असा ग्रंथ आहे. त्याशिवाय मार्क्स आणि एंगेल्स यांचे शेकडो पानांचे इतर लेखन इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. परंतु त्याचे भारतीय भाषांमधील अनुवाद सहजासहजी उपलब्ध नाहीत. मार्क्सवाद्यांचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ‘दास कॅपिटल’चा बंगाली भाषेतील अनुवाद खूप उशिरा म्हणजे १९८४ साली प्रकाशित झाला, ही गोष्ट मूलगामी अभ्यासाबद्दल असलेली उदासीनता दर्शवते. त्यामुळे सामान्य वाचक हा बहुतेक करून मार्क्सवाद थोडक्यात समजावून सांगणाऱ्या उपलब्ध असलेल्या लेखांचा आणि पुस्तकांचाच आधार घेतो. इंग्लिश भाषेत मार्क्सवादाची चिकित्सा करणारी अनेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु तशी चिकित्सा करणारी भारतीय भाषांतील पुस्तके मात्र फारशी दिसत नाहीत.

या पुस्तकासाठी अभ्यास आणि लेखन करण्यासाठी मला सात वर्षे लागली. अर्थात या काळात माझी कौटुंबिक कर्तव्ये आणि कामे, प्रवास, इतर वाचन, आजारपण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईहून बंगलोरला स्थलांतर या गोष्टींसाठीसुद्धा मला वेळ द्यावा लागत होता. संघ आणि कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष २०२४ साली सुरू होत असल्यामुळे त्याच वर्षी या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण होत आहे, याचा मला आनंद आहे.

‘हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ - विजय आपटे

राजहंस प्रकाशन, पुणे | मूल्य - १००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......