‘पैस पर्यावरणसंवादाचा’ : मिलब्राथच्या ‘राजकीय सहभागा’च्या प्रारूपात उंचावणाऱ्या स्तरागणिक कृतीची परिणामकारकता वाढत जाते…
ग्रंथनामा - झलक
संतोष शिंत्रे
  • ‘पैस पर्यावरणसंवादाचा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 29 June 2024
  • ग्रंथनामा झलक पैस पर्यावरणसंवादाचा Pair Paryavaransanvadacha संतोष शिंत्रे Santosh Shintre

पर्यावरणीय संवादाचं विज्ञान समजावून देणारा, विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते व पत्रकार यांना उपयुक्त ठरणारे ‘पैस पर्यावरणसंवादाचा’ हे संतोष शिंत्रे लिखित पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील हा एक संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१९६५मध्ये मिलब्राथने एखाद्या व्यक्तीच्या ‘राजकीय सहभागा’(पोलिटिकल ॲक्टीव्हिझम)चं प्रारूप सर्वप्रथम जगासमोर मांडलं. उतरंड (पिरॅमिड) अशा स्वरूपात त्यानं ते पेश केलं. यात सर्वांत तळाला होते, ते spectator activities. त्याला मराठीत आपण ‘त्रोटक सहभाग’ म्हणू. या प्रकारातील व्यक्तींचा सहभाग सर्वांत कमी आणि अप्रत्यक्ष असतो. त्याच्या नंतर ‘transitional activities’. त्याला आपण मराठीत ‘मध्यम/माफक सहभाग’ म्हणू. हे लोक ‘त्रोटक’च्या वरच्या पातळीवरचे बांधील असतात, पण त्यांनी पूर्ण झोकून दिलेले  नसते. पण राजकीय हालचाली, उपक्रमांमध्ये ते सहभागी होऊ लागलेले असतात.

आणि तिसरा, ज्याला मिलब्राथ ‘Gladiatorial activities’ म्हणतो, त्या सर्वांत उच्च पातळीवरील सहभाग देणाऱ्या व्यक्ती. मराठीत आपण त्यांना ‘सर्वाधिक’ सहभाग असलेल्या व्यक्ती म्हणू. (प्राचीन रोमन साम्राज्यातल्या अत्यंत शूर, पण व्यावसायिक योद्ध्यांना ‘gladiator’ म्हणत.)

मिलब्राथची उतरंड खालून वर जाताना, त्या त्या व्यक्तीने केलेले प्रयत्न आणि त्या व्यक्तीची चळवळीप्रती बांधीलकी यावर लक्ष केंद्रित करते. अर्थातच सर्वांत वरील स्तरातील म्हणजे सर्वाधिक सहभाग असणाऱ्यांची बांधीलकी सर्वोच्च असते. 

त्रोटक, मध्यम आणि सर्वाधिक सहभाग, हेच मूळ प्रकार ‘डिजिटल ॲक्टीव्हिझम’च्या प्रारूपामध्येही, तसेच पर्यावरण चळवळीतही वापरले गेले. पण हे साम्य वगळता, दोन्ही प्रारूपांमध्ये तपशीलाचे फरक आहेत. ‘डिजिटल ॲक्टीव्हिझम’चे प्रारूप निव्वळ व्यक्तींसाठी नाही, तर सहभागी व्यक्ती आणि संस्था/संघटना यांच्यासाठीही विकसित झाले आहे.

हे प्रारूप डिजिटल ॲक्टीव्हिझममधील विविध व्यक्ती आणि संस्था यांचे डिजिटल साधनांवर, माध्यमांवर असणारे अवलंबित्व उतरंडीचे विविध स्तर आणि त्यांचे प्रयत्न मोजण्यासाठी वापरते. दोन्ही प्रारूपांचे अंतिमतः होणारे परिणाम आणि पडणारे प्रभावही वेगवेगळे आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मिलब्राथच्या मूळ प्रारूपात उंचावणाऱ्या स्तरागणिक कृतीची परिणामकारकता वाढत जाते; म्हणजे त्रोटक सहभाग असलेल्या व्यक्ती सर्वांत कमी परिणाम घडवून आणतात आणि सर्वाधिक सहभाग असलेल्या व्यक्तींच्या कृतींची परिणामकारकतादेखील सर्वोच्च असते. तर डिजिटल ॲक्टीव्हिझममध्ये मात्र प्रत्येक स्तर परिणामकारक ठरू शकतो.

उदाहरणार्थ, एखादा हॅकर- जो सर्वाधिक सहभाग या स्तरातला आहे - तो त्याच्या एखाद्या कृतीने कमीत कमी वेळात फार मोठा परिणाम साधू शकतो किंवा फक्त आंदोलनाचे ठिकाण आणि वेळ ही फक्त योग्य वेळेत री-ट्वीट करून (जी त्रोटक सहभाग असलेली कृती आहे) एखादी व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी कैक हजार लोक अत्यंत परिणामकारक रितीने गोळा करून मोठा प्रभाव पाडू शकते.

मिलब्राथच्या पारंपरिक प्रारूपात व्यक्तीचे प्रयत्न आणि उद्दिष्टाप्रत बांधीलकी, ही खालून वर असणाऱ्या स्तरांगणिक वाढत जाते, तर डिजिटल ॲक्टीव्हिझममध्ये ती व्यक्ती अथवा संस्था/संघटना यांच्याकडील उपलब्ध डिजिटल संसाधनांनुसार पडणाऱ्या प्रभावाचे अथवा परिणामकारकतेचे स्तर भिन्न असतात. अशा संसाधंनांमध्ये  व्यक्ती अथवा संस्था/संघटना यांच्याकडील डिजिटल कौशल्ये, त्यांना उपलब्ध तंत्रज्ञानाचे आयाम, त्यांचा सोशल नेटवर्क्समधील सहभाग, त्यांची इंटरनेटची उपलब्धता आणि वेग, या सर्वांचा समावेश होतो.

डिजीटल सहभागांचे उपप्रकार

डिजिटल ॲक्टीव्हिझमच्या प्रारूपामध्ये त्रोटक, मध्यम आणि सर्वाधिक सहभाग हे मूळ प्रकार असले, तरी त्यांपैकी प्रत्येक प्रकारात सहभाग कसकसा होऊ शकतो, याचे उपप्रकार संशोधकांनी दर्शवले आहेत.

सर्वप्रथम त्रोटक डिजिटल सहभाग (Digital spectator activities)चे उपप्रकार पाहू.

डिजिटल ॲक्टीव्हिझमच्या एकूण उठाठेवींमध्ये सर्वाधिक भाग व्यापणारा हा उपप्रकार आहे. सर्वाधिक लोक चळवळीत समाविष्ट करून घेणाराही उप-प्रकार हाच आहे. समाज-माध्यमांच्या एकूण वापरकर्त्या लोकांपैकी दोन तृतीयांश इतके लोक कधी ना कधी अशा कुठल्या तरी उपक्रमात सहभागी झालेले दिसतात

त्रोटक सहभागातील तीन उपप्रकार असे आहेत. (पुढील सर्व संज्ञा, संकल्पना प्रथमतः मूळ इंग्रजी भाषेमध्ये विकसित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रतिशब्द शोधण्याचा खटाटोप हेतुतः केलेला नाही.)

पहिला आहे ‘क्लिक्टिव्हीझम’. यालाच समांतर अर्थाचा ‘स्लॅक्‌‍टिव्हीजम’ असाही शब्द वापरला जातो. काहीसा निष्क्रिय प्रकारचा, अंतर राखून नोंदवलेला असा हा सहभाग म्हणता येईल. आवडत्या पोस्ट्‌‍स, नोंदी ‘लाईक’ करणे, त्यात दिलेला मजकूर उचलून धरणे (Up-voting) अथवा त्यातील माहिती अनुसरणे, तिचा माग ठेवणे/पाठपुरावा करणे, अथवा एखाद्या चळवळीच्या अथवा कार्यकर्त्या व्यक्तीचा ब्लॉग, ट्वीटर खाते ‘फॉलो’ करत राहणे, अशा गोष्टींचा त्यात समावेश होतो.

या प्रकारातला सहभाग त्या त्या व्यक्तीने केलेले एखाद्या गोष्टीचे समर्थन/भलावण (Advocacy) दर्शवतो, पण त्यात सदर व्यक्तीला स्वतःची त्याबाबतची मते-मतांतरे प्रसृत करण्याची मुभा देत नाही. एका अर्थी असे समर्थक हे मूक अनुयायी असतात किंवा राहहातात. व्यक्ती-व्यक्तींना ‘क्लिक्टिव्हीझम’ ते कोणत्या विषयाशी जोडले गेले आहेत, किंवा त्यांना स्वारस्य वाटणारे विषय कोणते आहेत, त्यांची मते काय आहेत, हे अत्यंत दूरस्थ, तटस्थ पद्धतीने दर्शवतो. तेही अत्यंत सुरक्षित, सार्वजनिक, अ-व्यक्तिगत स्वरूपात.

‘क्लिक्टिव्हीझम’साठी संसाधनेही खूप मर्यादित लागतात. फारशा तांत्रिक कौशल्यांची  गरज त्यासाठी नसते. सोशल मीडियावर अकाऊंट असणारी, हाताशी स्मार्टफोन किंवा संगणक असलेली आणि इंटरनेट जोडणी असलेली कोणीही व्यक्ती ह्या प्रकाराने सहभागी होऊ शकते. अर्थात ‘क्लिक्टिव्हीझम’चे स्वतःचे म्हणून संस्थात्मक पातळीवरील महत्त्व दुर्लक्षिता येण्यासारखे नाही. प्रचंड, बहुसंख्य क्लिक्स आणि लाईक्स त्या चळवळीच्या हेतूला प्राथमिक पातळीवर एक हक्काचे  स्थान, वैधता आणि कायदेशीरता मिळवून देतात. ‘अन-फ्रेंड कोल’ या ग्रीनपीसच्या फेसबुकवरच्या आंदोलनाला मिळालेल्या ७,००,००० लाईक्समुळे फेसबुक नमले, आणि त्यांनी आपले ऊर्जास्रोत अपारंपरिक केले.

त्रोटक सहभागातील दुसरा उपप्रकार म्हणजे ‘मेटा-व्हॉइसिंग’ (Meta voicing). ‘क्लिक्टिव्हीझम’च्या एक पातळी वर असणारा सहभाग. अन्य कोणीतरी निर्माण केलेली सोशल मीडियावरील पोस्ट, अथवा संदेश आपल्या समाज-माध्यमाच्या ‘भिंती’वर त्या संदेशाच्या समर्थनार्थ पुढे पाठवणे, सामायिक करणे (शेअर करणे), अथवा री-ट्वीट करणे, तसेच त्यावर आपली प्रतिक्रिया (आपल्या नावासह) देणे म्हणजे ‘मेटा-व्हॉइसिंग’.

इंटरनेट अथवा सोशल मीडियावरील प्रतिध्वनीचे दालन व्यापणारा सहभाग, असेही त्याचे वर्णन करता येईल. इतरेजनांनी प्रसृत केलेल्या संकल्पना, मूल्ये आणि माहिती स्वतः हातभार लावून बळकट करणे. असा सहभाग देणाऱ्याचे स्वतःचे समाज-माध्यमाचे, संपर्कात असलेल्या लोकांचे ‘जाळे’ किती मोठे आहे, त्यावर ‘मेटा-व्हॉइसिंग’चा प्रभाव किती पडणार आहे, अथवा परिणाम कितपत होणार आहे, हे अवलंबून असते.

एखादे प्रभावी व्यक्तिमत्व जर संपर्कजालात असेल आणि अशा व्यक्तीने जर तुमची पोस्ट शेअर केली, तर स्वाभाविकरित्या तिच्यातील संदेश प्रचंड प्रमाणात ध्वनीवर्धित होऊन सदर व्यक्तीच्या चाहत्यांतर्फे सर्वदूर पोहोचणार आहे. उदाहरणार्थ हिंदी सिनेअभिनेता अमिताभ बच्चन यांनी जर माझी पोस्ट शेअर अथवा री-ट्वीट केली, तर त्यातला संदेश त्यांच्या लाखो, करोडो चाहत्यांमार्फत अनेक पटीने आपसूक, सर्वदूर पोहोचेल.

‘मेटा-व्हॉइसिंग’मधील ‘प्रतिक्रिया देणे’ हा भाग मात्र दुधारी तलवारीसारखा आहे. प्रतिक्रिया जर तोलून मापून, अभ्यासूपणे दिली असेल, तर तिचा मूळ संदेशाला फायदा होईल. पण ती जर उथळ, वितंडवाद घालणारी, खोडसाळ अथवा टीका करणारी, मूळ मुद्दा नाकारणारी अथवा खोडून काढणारी असेल, तर ज्या सर्व व्यक्ती ती प्रतिक्रिया वाचतील, त्यांच्यावर अत्यंत नकारात्मक परिणाम होऊन मूळ संदेशाला ते हानिकारकच ठरेल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

हाताशी भरपूर वेळ (आणि डेटा!) असणाऱ्यांचे असे कित्येक अर्थहीन वाद आपण समाज-माध्यमांवर कितीतरी वेळा पहातोही. ट्रोलिंग म्हणजे जल्पक रिकामटेकडे मागे लागणे, हेदेखील एका अर्थी ‘मेटा-व्हॉइसिंग’च आहे.

त्रोटक सहभागातील तिसरा उपप्रकार म्हणजे एखाद्या विषयावर ठाम, सुनिश्चित, विधान अथवा प्रतिपादन करणे. इंग्रजीत ‘Assertion’. पहिल्या दोन्ही उप-प्रकारांपेक्षा हे वेगळे आहे, कारण यात सहभागी व्यक्ती, मूळ संदेशाच्या समर्थनार्थ स्वतः काही आशय, मजकूर निर्माण करते. अन्य वापरकर्त्यांना अथवा सभासदांना स्वतः निर्माण केलेले दृक, श्राव्य अथवा मजकुराच्या स्वरूपातील संदेश, माहिती अशा माध्यमांतून माहिती देणे यात समाविष्ट आहे.

उदाहरणार्थ, भटक्या कुत्र्यांना सरसकट मारणे अयोग्य आहे, असा काही विषय चर्चेत असेल, तर तो वाचून मी स्वतः अशी कुत्री फोफावण्याचे कारण आपण निर्माण करत असलेला घन-कचरा हेच आहे, अशी माहितीपूर्ण पोस्ट स्वतःच्या शब्दात आणि नेमक्या आकडेवारीनिशी लिहितो आणि काही माहितीची त्या विषयात भर टाकतो, ज्यामुळे संबंधित चर्चा अधिक आशयघन होते.

‘पैस पर्यावरणसंवादाचा’ - संतोष शिंत्रे

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ३६० | मूल्य - ४८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......