विनय हर्डीकर हा माणूस विलक्षण ‘मनस्वी’ आहे, पण ‘दुटप्पी’ आणि ‘दांभिक’ नाही!
पडघम - सांस्कृतिक
देवेंद्र शिरुरकर
  • विनय हर्डीकर
  • Sat , 15 June 2024
  • पडघम सांस्कृतिक विनय हर्डीकर Vinay Hardikar

लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समीक्षक, संपादक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता-अभ्यासक, संगीतसमीक्षक आणि ट्रेकर श्री. विनय हर्डीकर २४ जून २०२४ रोजी अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात २३ जून रोजी ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तर २४ जून रोजी हर्डीकरांच्या ‘एक्सप्रेस पुराण : माझी शोध पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस हे हर्डीकरांची मुलाखत घेणार आहे. या निमित्ताने हर्डीकरांविषयीचा हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

साधारणपणे कुठल्याही मोठ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या मनात जेवढे म्हणून प्रवाद, समज-गैरसमज असतात, तेवढेच विनय हर्डीकर यांच्याबद्दलही आहेत. मात्र माझ्या मनात त्यांच्याबद्दल असे कुठलेही प्रवाद वा गैरसमज नव्हते. कारण कुठल्याही माणसाला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय, जाणून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल कसलंही मत बनवायचं नाही, हा माझा खाक्या.

हर्डीकरांचे पत्रकारितेत कैक विद्यार्थी आहेत. पत्रकारिता करायला लागल्यावरही सुमारे वर्षभर माझा-त्यांचा परिचयच काय साधी तोंडओळखही नव्हती. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं, तर मी त्यांचा ‘चुलत’ विद्यार्थी! माझे आवडते प्राध्यापक स्वर्गीय डॉ. राजेंद्र व्होरा सर आणि हर्डीकर मित्र आहेत, हे हर्डीकरांची ओळख झाल्यावर समजलं, तोपर्यंत माझं औपचारिक शिक्षण संपलं होतं.

मी पहिल्यांदा हर्डीकरांना भेटलो, त्यालाही आता जवळपास १७ वर्षं होतील. पत्रकारसंघात ‘शेतकरी संघटने’ची एक पत्रकार परिषद होती. रघुनाथदादा पाटील ‘रास्त आणि किफायतशीर दर’ (एफआरपी) वाढवून मिळावा, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देत होते. त्या वेळी मी शेतकरी संघटनेची मागणी मान्य होईल का? कारण संघटनेच्या आंदोलनांचा प्रभाव ओसरत चाललाय, परिणामकारकता कमी झालीय, असा प्रश्न उपस्थित केला होता. दादांनी त्यांच्या आक्रमक शैलीत मला उत्तर दिलं. त्या वेळी त्यांच्या शेजारी एक मध्यम उंचीचे, पण करारी चेहरा असलेले एक गृहस्थ बसले होते. माझ्या प्रश्नांवर ते काही बोलले नाहीत, पण माझे सूक्ष्म निरीक्षण करत असावेत. परिषद संपल्यावर त्यांनी माझी चौकशी सुरू केली. पहिलाच प्रश्न विचारला - ‘काय रे, तू माझा दुर्दैवी विद्यार्थी का?’ हर्डीकरांशी झालेला हा पहिला संवाद.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तोपर्यंत ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागा(‘रानडे इन्स्टिट्यूट)मध्ये शिकवतात, हे ठाऊक नव्हते अन् माझ्याकडेही पत्रकारितेची पदवीही नव्हती. कोण-कुठला चौकशी झाल्यावर त्यांनी मोबाईल नंबर दिला आणि ‘देशमुख कंपनी’त येऊन भेटायला सांगितलं. पण ते मी विसरून गेलो. एके दिवशी रात्री आठच्या सुमारास त्यांचाच फोन आला. मी गेलो, भेटलो. भरभरून बोललो, वाचनाच्या आवडीविषयी सांगितलं... माझी स्वप्नं, इच्छा यांविषयी खरं तर बरंच भाबडेपणानं बोललो... ‘व्यवस्था परिवर्तन’ हे माझं ध्येय आहे वगैरे...

हर्डीकरांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं, काहीही प्रतिक्रिया न देता. त्यांचा एक विद्यार्थी माझा मित्र क्लासमेट आणि रूममेट होता. त्याला बोललो, तर त्याने सावध केलं. “सांभाळून रे बाबा, फार मोठा माणूस आहे, पण विक्षिप्त आहे! कधी सटकेल त्यांचं डोकं सांगता येत नाही!” मनात म्हणालो, ‘असेना ना का, मला काही तसं जाणवलं नाही. नाहीतरी आपण कुठे सरळमार्गी आहोत! आपलं नक्की जमणार या माणसाशी!’

त्या मित्रानं मला हर्डीकरांच्या ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पहिल्यावहिल्या पुस्तकाबद्दल सांगितलं. मी ते लगोलग वाचून काढलं. नंतर हर्डीकरांना भेटल्यावर पुस्तक आवडल्याचं सांगितलं. त्यांनी ‘का आवडलं?’ हा ठेवणीतला प्रश्न विचारला. त्यावर मी मला जमेल तशी उत्तरं दिली.

आता अधून-मधून त्यांना भेटायला लागलो, तोवर ही असामी थोडी थोडी कळायला लागली होती. मी काय-काय वाचलंय, हे समजल्यावर ‘काय काय वाचायचं राहिलंय’, याची यादी तयार झाली अन् त्या यादीनुसार माझं वाचन सुरू झालं. त्याबरोबरच माझ्यातला संकोच, आत्मसंतुष्टताही संपली. स्वत:च्या भाबडेपणावर मला हसू आलं.

हर्डीकरांची बौद्धिक तलवार उगारली गेली की, भल्या-भल्यांची कशी तारांबळ उडते, हेही ठाऊक झालं आहे. एकदा वैचारिक मंथन करायचं म्हटल्यावर त्यांच्याकडून कोणालाही दयामाया दाखवली जात नाही! कदाचित अनेकांना त्यांची ही भूमिका पचनी पडत नाही. त्यामुळे काही जण दुखावले जाऊन दुरावतात. हर्डीकर उजव्यांना डावे वाटतात, तर डाव्यांना त्यांची गणती आपल्यात करता येत नाही. हर्डीकर नेमके आहेत तरी कसे? त्यांचे पत्रकारितेतले विद्यार्थी असलेल्या माझ्या समवयस्क मित्रांच्या गप्पा रंगल्या की, हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. हा अष्टावधानी, एकाच वेळी विविध विषयांवर अधिकार असणारा कृतिशील विचारवंत आणि सुहृदयी माणूस आहे.

मी तसा लवकर वाचनाची सवय लागलेला आणि ती जोपासणारा होतो, पण या प्रक्रियेत प्रश्न उपस्थित करणं, त्याकडे साधक-बाधक, तटस्थपणे पाहण्याची सवय लागलेली नव्हती. मनात विचार आला, या फाटक्या माणसाकडे केवढी श्रीमंती आहे, एकाच माणसाला एवढे पैलू असू शकतात? भौतिक संसाधनांचा सोस आणि ती मिळवण्यातच मानवी अस्तित्वाची इतिकर्तव्यता समजल्या जाणाऱ्या आजच्या काळात हा माणूस फाटकाच म्हणायचा! पण या जगण्यातला ‘डोल’, ताठ कणा भल्या-भल्यानांही जमणारा नाही.

सतत नव्याचा शोध, सतत काहीतरी नवं धुंडाळण्याची आसक्ती, जे आहे त्याची परखड मीमांसा (चिरफाडच) असा हर्डीकरांचा बाणा! ट्रेकिंग, शास्त्रीय संगीत, राजकारण, समाजकारण, इंग्रजी-मराठी साहित्य, शेतकरी संघटना, पत्रकारिता, अर्थकारण आणि काय काय... चर्चेला विषयांची कमीच नाही. अट केवळ एकच, कुठल्याही विषयावरील चर्चेत (गप्पासुद्धा) सहभागी होता येईल एवढा अभ्यास असायला हवा. कुठल्याही प्रभावाखाली न येता, डोळसपणे त्या-त्या विषयाकडे पाहण्याची स्वतंत्र बुद्धी हवी.

‘इंडियन एक्सप्रेस’, ‘शेतकरी संघटना’, ‘न्यू क्वेस्ट’, ‘देशमुख आणि कंपनी’ असा विविध क्षेत्रांत लीलया प्रवास करणाऱ्या हर्डीकरांनी किती लिहिलं असेल, याबाबतचा माझा अंदाज चुकला. त्याबाबत विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं : ‘जगणं मोठं, लिहिणं खोटं! आधी अनुभव घे, समजून घे, त्यावर विचार कर आणि मगच त्यावर बोल.’

यासंदर्भातली माझी एक आठवण मजेशीर आणि माझ्या विचारांना कलाटणी देणारी ठरली. मी त्या वेळी सदाशिव पेठेत पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. अधूनमधून देशमुख कंपनीत हर्डीकरांना भेटायला जात होतो. नवीन काय वाचलं, लिहिलं त्याबद्दल सांगत होतो. दरम्यान त्यांच्यासोबत एखाद्या ट्रेकिंगलाही जात होतो.

एखादी चूक घडली वा दिलेला शब्द पाळता आला नाही की, हर्डीकर संतापून बोलतात. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे, हे जसे खरे आहे, तसेच हेही की, एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करतानाही त्यांनी कधी हात आखडता घेतल्याचं आठवत नाही. हातचं राखून वागणं-बोलणं हा हर्डीकरांचा स्वभावच नाही. हर्डीकर हेकट मात्र नक्की नाहीत. वाद-विवादात हार जायचे नाहीत. पण त्यांचा मुद्दा सप्रमाण खोडून काढल्यावर ते स्वीकारण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. मित्र-परिवारातील घरातला त्यांचा नित्याचा वावरही अगदी सहजपणाचा असतो. त्यात कुठलाही बडेजाव नसतो. आवडत्या विषयावर गप्पा रंगल्या अथवा त्यांचा एखादा आवडता कवी, लेखक असा विषय निघाला की, हर्डीकरांच्या बोलण्यात जी सटीक निरीक्षणं येतात की बस्स! ऐकणारा थक्क आणि तृप्त होतो!!

एकदा मोठ्या धाडसानं माझ्या कवितांचं बाड त्यांना पाहायला म्हणून दिलं. आठ-पंधरा दिवस झाले, हर्डीकर त्याबद्दल काहीच बोलेनात. मी मनात म्हटलं, विसरले असतील. आणखी काही दिवस वाट पाहिली. एके रात्री कंपनीत त्यांना भेटायला गेलो. आज काहीही झालं, तरी कवितांचा विषय काढायचाच असं ठरवूनच गेलो होतो. देशमुख आणि कंपनीचे श्री. रवींद्र गोडबोले आणि हर्डीकर बोलत होते, म्हणून थोडा वेळ तिथंच वाचत बसलो. काही वेळाने गोडबोले यांच्याशी त्यांचं ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ कसं वाटलं त्याबद्दल बोललो. नंतर ते बाहेर गेले.

मग मी हर्डीकरांकडे कवितांचा विषय काढला. त्यावर त्यांनी ‘हे बाड घे अन् त्यासकट भिडे पुलावरून उडी मार, म्हणजे तू सुटशील अन् मराठी साहित्यविश्वही सुटेल... कविता म्हणजे काय लघवी आहे का, मनात आलं आणि सोडून दिलं?’ असं सांगितलं.

त्यांच्या या हल्ल्याने मला रडू कोसळलं. मी हुंदके आणि बाड आवरत खाली आलो, तेवढ्यात गोडबोले भेटले. त्यांना काय घडलं असावं, याचा अंदाज आला. त्यांनी मला शांत केलं. एक दिवस विनयला आवडेल अशी कादंबरी लिहिशील, असं सांगून धीरही दिला. त्या वेळी हर्डीकरांचा खूप राग आला होता, पण तो फार काळ टिकला नाही. मी पुन्हा ‘आता काय वाचू?’ असं विचारत त्यांच्याकडे जायला लागलो. दरम्यान एक गोष्ट लक्षात आली. हे व्यक्तिमत्त्व फटकळ, विक्षिप्त, तापट असलं तरी, त्याच्या आत एक सुहृदय, प्रेमळ माणूसही दडलेला आहे. तो माणूस विलक्षण मनस्वी आहे, पण दुटप्पी आणि दांभिक नाही. आत एक, बाहेर एक असं नाही. जे आहे ते आहे, असा रोखठोक स्वभाव. मग मनाशी ठरवलं, हा माणूस आपल्याला हवाच हवा.

एखादी चूक घडली वा दिलेला शब्द पाळता आला नाही की, हर्डीकर संतापून बोलतात. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे, हे जसे खरे आहे, तसेच हेही की, एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करतानाही त्यांनी कधी हात आखडता घेतल्याचं आठवत नाही. हातचं राखून वागणं-बोलणं हा हर्डीकरांचा स्वभावच नाही.

मी गेली काही वर्षं हर्डीकरांना भेटतो, हे ठाऊक असलेल्यांपैकी किमान दोघा-तिघांनी तरी मला विचारलेलं आहे, ‘अशात त्यांना भेटलास का?’ अर्थात या प्रश्नामागे याची विकेट अजून कशी पडली नाही, हाच हेतू असतो. दुरून उद्दाम वाटणारे (काहींना ते अहंमन्यही वाटतात) हर्डीकर हे एक अजब रसायन आहे. नावात ‘विनय’ असला तरी तो आपल्या नशिबात येईलच, याची कुठलीच शाश्वती नसते. अनेकदा तो येत नाही आणि आला तरी इतका दुर्मीळ असतो की, त्याचं नंतर आठवणही राहत नाही.

हर्डीकर हेकट मात्र नक्की नाहीत. वाद-विवादात हार जायचे नाहीत. पण त्यांचा मुद्दा सप्रमाण खोडून काढल्यावर ते स्वीकारण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. मित्र-परिवारातील घरातला त्यांचा नित्याचा वावरही अगदी सहजपणाचा असतो. त्यात कुठलाही बडेजाव नसतो. आवडत्या विषयावर गप्पा रंगल्या अथवा त्यांचा एखादा आवडता कवी, लेखक असा विषय निघाला की, हर्डीकरांच्या बोलण्यात जी सटीक निरीक्षणं येतात की बस्स! ऐकणारा थक्क आणि तृप्त होतो!!

बोलणं तिखट (आणि खाणं तर त्याहूनही!). नित्याच्या कामामुळे, पत्रकारितेमुळे म्हणा वा अन्य कारणांनी खूप जणांना भेटत होतो. माणसं न्याहाळत होतो. या पार्श्वभूमीवर हा माणूस निराळा आहे, हे कळत होतं. ‘वन अँड ओन्ली’ असणाऱ्या हर्डीकरांबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून, टीकाकारांकडूनही बोललं जाणारं ऐकत होतो. आपल्याला कुठल्याही क्षेत्रात काही करता आलं नाही तरी चालेल, पण आपली गणना ‘सुमारांच्या सद्दी’त होऊ द्यायची नाही, एवढं मी हर्डीकरांच्या संपर्कात, सहवासात नक्की ठरवू शकलो.

दरम्यानच्या काळात मी मराठीतून इंग्रजीत जाण्याचा खटाटोप करून पाहिला, पण ते काही जमलं नाही. तेव्हा साहजिकच थोडासा दुखावला गेलो होतो. तेव्हा त्यांनी माझ्यातल्या इतर आवडी, क्षमतांकडे लक्ष वेधत त्यावर लक्ष केंद्रित करायला लावले. मी वाचक होतोच, पण लिहिताही झालो. कुठल्याही प्रभावाखाली न येता स्वतंत्र विचार करायला शिकलो. सुरुवातीला हे सगळं जमवताना त्रास झाला, पण नंतर ते अंगवळणी पडत गेलं.

२०११ला मी पुण्याहून लातूरला गेलो. हर्डीकरांशी फारसा संपर्क राहिला नाही. त्यांच्या मराठवाड्यातल्या कार्यक्रमानिमित्त जेवढं भेटणं-बोलणं होईल तेवढंच. पण या काळात मी त्यांच्या संपर्कात असताना जे काही निरीक्षण केलं, आकलन करता आलं, तसा वागण्याचा प्रयत्न केला. एखाद्या घटनेकडे, गोष्टीकडे, प्रक्रियेकडे हर्डीकरांनी कसं पाहिलं असतं, कसा विचार केला असता, याचा विचार करायला लागलो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेले हर्डीकरांचे काही निवडक लेख

दुर्गा भागवत : स्वाधीन विदुषीचे मनोज्ञ चिंतन

कवि, कुछ ऐसी तान सुनाओ

गोविंदराव, आय मिस यू!

सुरांच्या शतकातले ‘किशोरी’ नाम संवत्सर

‘भारतातील मुस्लिम राजकारण’ : सेक्युलरायझेशनचा मूर्तिमंत जाहीरनामा

शरद पवार नावाच्या ‘सत्तेच्या गुलामा’चा ‘संशयकल्लोळ’!

.................................................................................................................................................................

मग लक्षात आलं, ही अलिप्तता, तटस्थता हळूहळू माझ्या जगण्याचा एक भाग बनलीय. हेच तर हर्डीकर मला सांगत आले आहेत, हे खरं असलं तरी अंगी बाणवणं सोपं नव्हतं, हे मान्य करावं लागेल.

करोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात मी पोटापाण्यासाठी पुन्हा पुण्यात दाखल झालो आणि हर्डीकरांशी पुनश्च भेटी-गाठी सुरू झाल्या. या सात-आठ वर्षांनंतरच्या गॅपनंतरही त्यांच्याशी पूर्वीसारखाच विविध विषयांवर संवाद सुरू झाला. अर्थात त्यांच्याशी बोलताना ‘घेशील किती दो कराने’ हीच भूमिका प्रामुख्यानं उत्तम वठवत राहिलो. डिजिटल माध्यमात दोन वर्षं काम केल्यावर पुन्हा छापील माध्यमामध्ये काम करायला लागलो. त्यादरम्यान मी शेती आणि ग्रामीण राजकारण या विषयावर एक कादंबरी लिहिली. खरं तर शेती, शेतकरी संघटना, शरद जोशी हे विषय हर्डीकरांशी बोलताना नेहमीच चर्चेत असतात. मी शेतकरी कुटुंबातला, त्यामुळे या विषयावर लिहीत होतोच.

विचारपूर्वक शेतकरी संघटनेसाठी काम करण्याचा निर्णय घेऊन संघटनेची वैचारिक, सैद्धान्तिक भूमिका मांडणाऱ्या हर्डीकरांना मात्र या विषयावर मी कादंबरी लिहिलीय, हे सांगण्याचं धाडस काही होत नव्हतं. पण प्रत्यक्षात त्यांना माझी मांडणी पटली, माझा जीव भांड्यात पडला. कारण त्यांच्यासमोर पाट्या टाकून चालत नाही. गृहपाठ पक्का असला, तरच निभाव लागतो, हे इतक्या वर्षांत शिकलो. कादंबरी त्यांना आवडली आणि देशमुख कंपनीने ती प्रकाशितही केली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

मी गेली काही वर्षं हर्डीकरांना भेटतो, हे ठाऊक असलेल्यांपैकी किमान दोघा-तिघांनी तरी मला विचारलेलं आहे, ‘अशात त्यांना भेटलास का?’ अर्थात या प्रश्नामागे याची विकेट अजून कशी पडली नाही, हाच हेतू असतो. दुरून उद्दाम वाटणारे (काहींना ते अहंमन्यही वाटतात) हर्डीकर हे एक अजब रसायन आहे. नावात ‘विनय’ असला तरी तो आपल्या नशिबात येईलच, याची कुठलीच शाश्वती नसते. अनेकदा तो येत नाही आणि आला तरी इतका दुर्मीळ असतो की, त्याचं नंतर आठवणही राहत नाही.

हर्डीकरांची बौद्धिक तलवार उगारली गेली की, भल्या-भल्यांची कशी तारांबळ उडते, हेही ठाऊक झालं आहे. एकदा वैचारिक मंथन करायचं म्हटल्यावर त्यांच्याकडून कोणालाही दयामाया दाखवली जात नाही! कदाचित अनेकांना त्यांची ही भूमिका पचनी पडत नाही. त्यामुळे काही जण दुखावले जाऊन दुरावतात.

हर्डीकर उजव्यांना डावे वाटतात, तर डाव्यांना त्यांची गणती आपल्यात करता येत नाही. हर्डीकर नेमके आहेत तरी कसे? त्यांचे पत्रकारितेतले विद्यार्थी असलेल्या माझ्या समवयस्क मित्रांच्या गप्पा रंगल्या की, हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो.

हा अष्टावधानी, एकाच वेळी विविध विषयांवर अधिकार असणारा कृतिशील विचारवंत आणि सुहृदयी माणूस आपल्याला दोस्त मानतो, ही मला माझी श्रीमंती वाटते!

..................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......