भाजपचा नक्षा उतरवणारा कौल!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 04 June 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

संसदीय लोकशाहीत मतदारच निर्णायक असतो, कुणी ईश्वरानं पाठवलेला ‘अंश’ किंवा ‘मंदिर-निर्माता’ नाही, असा इशाराच जणू नरेंद्र मोदी आणि भाजपला या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिला आहे.

केवळ ‘चारशे पार’च नाही, सोबतच नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ‘धर्मांध अहंकारा’चा फुगाच भारतीय मतदारांनी फोडला आहे,

...आणि सत्ता मिळाली म्हणून यापुढे उतू नका, मातू नका, अन्यथा पुढच्या निवडणुकीत सरळ घरचा रस्ता दाखवू, असं स्पष्टपणे बजावलं आहे.

खरं तर, या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, तेव्हा निवडणुकीचा कौल सुरुवातीपासूनच मोदी आणि भाजपला अनुकूल असल्याचं वातावरण होतं. स्थिर सरकार यावं, अशा मताचं आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र होतं, म्हणजेच हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे मोदींना अनुकूल होते.

गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या जागांचा संख्या शास्त्रीय कौल बाजूनं होता, मध्यमवर्गीय बहुसंख्येनं मोदींच्या प्रेमात होते, माध्यमं अंकित होती, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ट्रोल्सच्या टोळ्या हाती होत्या, रामाच्या नावानं माजवलेला धर्मांध उन्माद सोबतीला होता आणि समोर एकसंघ प्रबळ विरोधी पक्ष नाही, अशी स्थिती असल्यानं भाजप पुन्हा सत्तेत येणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट होतं.

‘हिंदुत्वा’चा उरलेला ‘अजेंडा’ अमलात आणण्यासाठी त्यामुळे सभागृहात तीन चतुर्थांश बहुमताची महत्त्वाकांक्षा बळावली. ती संधी होण्यासाठी विरोधी पक्षाला खिंडार पाडण्याचे उद्योग केले गेले आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या चौकशी यंत्रणांचा खुले आम वापर झाला.

गेल्या दहा वर्षांत संसदीय लोकशाहीला साजेसे वर्तन मोदी यांच्याकडून घडले नाही, यात कोणताही संशय नाही. लोकशाहीला मुळीच अपेक्षित नसलेला एक वेगळा अजेंडा नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना साथीला घेऊन वापरला.

‘अंकित व्हा नाही, तर कारागृहात जाण्याची तयारी करा’, हे धोरण अवलंबून या काळात किती राजकीय नेत्यांना कारागृहात पाठवण्यात आलं, त्याची यादी मोठी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे.

महाराष्ट्रात अजित पवार ते हर्षवर्धन देशमुख अशी ती फार मोठी साखळी आहे. राज्य व  देशातील जे राजकीय नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपसोबत गेले, ते एका रात्रीत ‘स्वच्छ’ ठरले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याच काळात सरकार आणि पक्ष या पातळीवरही नरेंद्र मोदी (आणि अर्थातच अमित शहा) यांनी हेच धोरण अवलंबलं. विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्यात धन्यता मानली जाऊ लागली. लोकशाहीत विरोध हे लोकशाही सुदृढ करणारे हत्यार असते, पण मोदी-पर्वात त्यावर ‘देशद्रोहीपणा’चे शिक्के मारले जाऊ लागले.

जळणारं माणिपूर न विझवण्याची मग्रुरी दाखवली, करोनाच्या काळातील मृतांच्या तळतळाटाकडे दुर्लक्ष केलं. (त्याचा फटका उत्तर प्रदेशात बसला आहेच.) पक्षातही त्यांनी विरोधक शिल्लक ठेवला नाही. भाजप राजकीय पक्ष न राहता ‘मोदी परिवार’ झाला. पक्षातले सर्व लोक त्या परिवाराचे सदस्य झाले. सर्वांच्या ‘टॅगलाईन’मध्ये तो पक्षाचा नव्हे, तर मोदी परिवाराचा सदस्य, असा उल्लेख आला. सरकार देशाचे ना राहता मोदी सरकार झाले आणि सरकारची हमी ‘मोदी की गॅरंटी’ झाली...

नरेंद्र मोदी यांचं वर्तन ते जणू या देशाचे सर्वेसर्वा आहेत असं होत गेलं. ‘मी, माझं आणि माझं’च असा त्यांचा प्रवास होत गेला. स्वत:ला ईश्वराचा अंश मानण्यापर्यंत मोदी यांनी मजल मारली. हे ‘व्यक्तीमाहात्म्य’ संघपरिवारालाही पसंत नव्हतं. त्याबद्दल संघपरिवारानं उघड व्यक्त केली नसली, तरी त्याबद्दल नाराजी होती आणि तो खाजगीत बोलूनही दाखवली जात होती.

पक्षाच्या संघटन सचिवपदावरून संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. ‘भाजपला आता संघाच्या मदतीची गरज नाही’, अशी उद्दाम भाषा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ‘पोपट’ अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली सरकार आणि पक्षात जुने-जाणते बाजूला पाडले गेले. राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासारख्यांनी मोदींच्या या वर्चस्वासमोर अक्षरक्ष: नांग्या टाकल्यावर बाकीच्या अंतर्गत टिकाकरांनी मौन बाळगलं, यात आश्चर्य नव्हतं.  (नुकत्याच झालेल्या नागपूरच्या चकरेत हे अनेकांकडून ऐकायला मिळालं. संघ आणि मोदी यांच्यातले संबंध पूर्वीसारखे मधुर राहिलेले नाहीत, हेही ऐकायला मिळालं.)

‘पप्पू’ म्हणून ज्याची हेटाळणी केली गेली, त्या राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना अक्षरक्ष: जेरीस आणलं. देशात हजारो किलोमीटर्सची पदयात्रा राहुल गांधी यांनी काढली. पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाबाहेर सोपवत ‘इंडिया’ ही आघाडी बांधली. एकेक काडी जोडत ही मोळी बळकट केली. परिणामी या लोकसभेत काँग्रेसचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

महाराष्ट्रात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले, त्यातून भाजप ( पक्षी : अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस) विरोधात नाराजी आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही विशिष्ट उद्योगपतीचे हित जोपासते, हे सरकार ‘शेतकरीविरोधी’ आहे, असे जे विरोधी पक्षांनी वारंवार सांगितलं, त्याबद्दल विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची खात्री पटत गेली. शहरी माणूस भाजप म्हणजे मोदींच्या बाजूने, तर ग्रामीण जनता विरोधात, अशी विभागणी होत गेली.

आताही जिंकलेल्या जागा बघा, भाजपनं जिंकलेल्या ८० टक्के जागा शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात भाजपविरोधात सुप्त लाट आहे, हे माझ्या लक्षात आणून दिलं, ते वाशीमच्या हरिष सारडा यानं. जसजशी माहिती मिळवत गेलो, तसतसं लक्षात आलं की, भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात मार पडणार आहे. कारण आता लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे आणि घडलंही तसंच. विदर्भ आणि मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला जोरदार पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

आता लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय, नरेंद्र मोदी आणि भाजपला सभागृहात बहुमत मिळालेलं नाही. या पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा कसाबसा का असेना विजय झाला आहे आणि तो मिळवताना मतदारांनी भाजपचा नक्षा पार उतरवला आहे. भाजप सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी आता इतर पक्षांच्या कुबड्या घेत या पक्षाला देशाचा कारभार हाकावा लागणार आहे. खरं तर भाजपला न मिळालेल्या बहुमताची ‘ईश्वराचा अंश’ असण्याला साजेशी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाचा त्याग करायला हवा, पण तशी कोणतीही ‘गॅरंटी ’नरेंद्र मोदी घेणार नाहीत!

शेवटी, राज्याच्या राजकारणावरचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम राखणारा आणि काँग्रेसला नवसंजीवनी देणाराही लोकसभा निवडणुकीचा हा मतदारांचा कौल आहे. येणारी विधानसभा निवडणूक त्यामुळे भाजपसाठी फार मोठे आव्हान ठरणार आहे. कदाचित भाजपच्या नेतृत्वाखालील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीला विरोधी पक्षात बसवणारी ही निवडणूक ठरेल!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 04 June 2024

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर!

मुस्लीम मतांची मदत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपला पाया शाबूत ठेवलाय. हा धोका कुणालाच कसा दिसंत नाही ?आज मुंबईचं जनमान ( डेमोग्राफिक्स ) बदलतंय. मुस्लीम लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. दोन दिवसांपूर्वी रवीना टंडनला कसं घेरलं होतं त्या बुरखेवाल्या बायकांनी आणि दाढीधारी माणसांनी, ते दिसतं ना सगळ्यांना ! २०२४ चा लोकसभा निकाल ही कसली नांदी समजायची ? समस्त हिंदूंचा रवीना टंडन होणार का ?

आपला नम्र,
गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......