दै. ‘कैसरी’ने रूढ केलेले, घडवलेले मराठी प्रतिशब्द
पडघम - माध्यमनामा
आबा चांदोरकर
  • दै. केसरीचे बोधचिन्ह
  • Wed , 12 April 2017
  • पडघम माध्यमनामा केसरी Kesri केसरी-प्रबोध मराठी भाषा Marathi Bhasha नोकरशाही Bureaucracy मध्यमवर्ग Middle Class आबा चांदोरकर Aaba Chandorkar

काल प्रसिद्ध बालसाहित्यिका माधुरी पुरंदरे यांच्याविषयी ‘माधुरी पुरंदरेंचा सांगावा आणि ‘अशी ही बनवाबनवी!’ या संपादकीय लेखात वर्तमानपत्रांनी एकेकाळी कशा प्रकारे नवनवे मराठी प्रतिशब्द घडवले याविषयी उल्लेख केला होता. दै. केसरी या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि बहुधा सध्या चालू असलेल्यांपैकी सर्वाधिक जुन्या वर्तमानपत्राने सुरुवातीच्या काळात कोणकोणते मराठी प्रतिशब्द रूढ केले याविषयीचा हा लेख इथे मुद्दाम संपादित स्वरूपात पुनर्मुद्रित करत आहोत. ’या लेखाचे मूळ शीर्षक ‘केसरीनें प्रसृत केलेली परिभाषा’ असे आहे.  – संपादक

..............................................................................................................

केसरीनें आतांपर्यंत प्रसृत केलेली निरनिराळ्या विषयांवरील परिभाषा या लेखांत संक्षेपत: देत आहें. गेल्या अर्धशतकांत केसरीनें अनेकविध चळवळींवर लेख लिहिले. त्या त्या ठिकाणीं, त्या त्या चळवळींचें स्पष्टीकरण करितांना महाराष्ट्रांतील सामान्य जनतेस समजेल अशा सोप्या भाषेंत आपलें लेखन करण्याची केसरीची नेहमींची रीत होती. त्यामुळें पुष्कळ वेळां त्याला नवीन शब्दसृष्टि निर्माण करावी लागली तर कांहीं ठिकाणीं पूर्वी प्रचारांत असलेल्या शब्दांना नवीन अर्थाचा पेहराव द्यावा लागला. कित्येक लेखकांनीं केसरीद्वारां पारिभाषिक शब्द पुढें आणून केसरीच्या कार्याला हातभार लावला. असल्या सर्व शब्दसंग्रहाची वर्गवारी करणें सोयीचें दिसल्यावरून, त्याची पुढीलप्रमाणें विल्हे लाविली – १) आर्थिक-औद्योगिक. २) कायदा-कायदेमंडळ. ३) धार्मिक. ४) भाषा. ५) मद्यपान. ६) मवाळ पक्ष व त्याचें राजकारण. ७) यांत्रिक. ८) यौद्धिक. ९) राष्ट्रीय पक्ष व त्याचें राजकारण. १०) राष्ट्रीय सभा. ११) व्यापार. १२) वृत्तपत्रीय. १३) शास्त्रीय. १४) शिक्षण. १५) शेती. १६) सरकार. १७) सामाजिक. १८) स्थानिक स्वराज्य, ग्रामसंस्था. १९) किरकोळ. २०) कोटीवाक्प्रचार-म्हणी. या वर्गांतील निवडून काढलेल्या शब्दांची एकंदर संख्या २८७० म्हणजे जवळ जवळ तीन हजार भरली. इतके शब्द व म्हणी वगैरे दिल्यास लेखाची मर्यादा ओलांडली जाईल म्हणून निवडक शब्द पुढे दिले आहेत. कांहीं ठिकाणीं शब्दांचें स्पष्टीकरण होण्यासाठीं ते ते शब्द ज्यांत आले आहेत अशीं केसरीनेंच लिहिलेलीं वाक्यें घेतलीं आहेत. सारांश, अशा निरनिराळ्या विषयांच्या परिभाषेचा त्रोटक संग्रह या लेखांत केला आहे. परंतु, लेखकाला ही जाणीव आहे कीं, हा संग्रह पूर्ण नाहीं, तें काम पुढें कोणींतरी करावें.

या संग्रहांत सर्वांत कमी (म्हणजे ५०) शब्द ‘आर्थिक’ विभागांत असून सर्वांत जास्त (म्हणजे ४८०) शब्द ‘राष्ट्रीय पक्ष व त्याचें राजकारण’ या विभागांत आहेत. असें होणें साहजिक आहे. कारण, देशांत राजकीय जागृति उत्पन्न करण्याचें ध्येय केसरीनें आपल्यापुढें ठेविलें आहे व तें तो अव्याहत पाळीत आला आहे.

या संग्रहाचे बहुश:  चार प्रकार पडतात. पहिला – मूळच्या इंग्रजी शब्दास किंवा म्हणीस मुद्दाम बनविलेला मराठी शब्द किंवा म्हण; उदा. इंग्रजी ‘ब्युरोक्रसी’ या इंग्रजी शब्दासाठीं बनविलेला ‘नोकरशाही’ हा मराठी पारिभाषिक शब्द आणि ‘गुड गव्हर्नमेंट इज नो सबस्टिट्यूट फॉर सेल्फ गव्हर्नमेंट’ या इंग्रजी म्हणीची छायारूप ‘स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं’ ही मराठी म्हण. दुसरा- इंग्रजी शब्दांना आपल्या इकडे पूर्वी वापरण्यांत असलेला समानार्थक शब्द हुडकून ते देणें; उदा. ‘रिप्रेशन’ शब्दासाठीं ‘सोटेबारगिरी’ किंवा ‘दडपशाही’ हे शब्द वापरणें. तिसरा – पूर्वीं प्रचारांत असलेल्या शब्दांना चालू परिस्थितींत उपयोगी पडेल असा निराळा अर्थरूपी पेहराव चढविणे; उ. ‘आगंतुक बहुमत’, ‘चातकवृत्ति’ इत्यादि. चौथा – स्वतंत्रच शब्द बनविणें.

इंग्रजी शब्दांना जे मराठी पारिभाषिक शब्द दिले आहेत त्यांच्या पुढें मूळ इंग्रजी शब्द द्यावयास पाहिजेत, पण त्यामुळें लेखविस्तार होईल म्हणून ही रीत सर्वत्र अमंलांत आणिली नाहीं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१) आर्थिक व औद्योगिक

अर्थशास्त्र, अर्थशास्त्रसाधु (आपला स्वार्थ साधणारा अर्थशास्त्री); आर्थिक स्वातंत्र्य, आ. व्यवस्था; औद्योगिक स्वातंत्र्य, चलन, व्यापारी मंडळ, हुंडणावळ, कृत्रिम किंमत, श्रमसंयोग, संघशक्ति, स्वदेशी, गंगाजळी.

२) कायदा व कायदेमंडळ

अंदाजपत्रक, मागासलेला वर्ग, बहुसंख्याक वर्ग, मध्यम व कनिष्ठ वर्ग, पुढारलेला वर्ग, फडणीस, कायदेकानुमंडळ, आमदार, खासदार, मंत्री, लोकनियुक्त, जातवार, एकतंत्री, कायदा, प्रांतिक, दुतोंडी, प्रमाणपत्र, प्रतोद, हुकूम, सनद.

३) धार्मिक

व्याजोनारायण, मुद्दलनारायण (संन्यास घेऊन सावकारी करणारा), तत्त्वज्ञपुंगव, धर्महित, उपासक, उत्सव, उपाधि.

४) भाषा

भाषोत्कर्ष, भाषान्वय, उच्चारसंकर, आर्ष, भाषावृद्धि, मातृभाषा.

५) मद्यपाननिषेध

मद्य, पान, सुराग्रह, पहारा, निरोधन, रंभी, अबकारी.

६) मवाळ पक्ष व राजकारण

आर्जव, भैध्यवृत्ति, भिक्षांदेही, मंदगामी, सरकारजमा, होयबा पुढारी, नेमस्तपणा.

७) यांत्रिक

चित्रयंत्र (फोटो कॅमेरा), चलच्चित्र (सिनेमा)-पट, छायाचित्र (फोटो), तेलाड्या (जमिनींतील तेलाचे झरे शोधणारा), दूरदर्शक यंत्र, दूरध्वनिवाहक-यंत्र (टेलिफोन), ध्वनिप्रक्षेपक यंत्र (ब्रॉडकास्टिंग), पाणाड्या, बिनतारी तारायंत्र, बैठक (बेस), लोहमार्ग (रेल्वे), वाटाड्या (पायलट), वातोदक (सोडा वॉटर), सृष्टिगत शक्ति, शिल्पचितारी (ड्राफ्ट्समन), धावता धोटा- (त्यांतील) बाण्याची किंवा आडवणीची कांडी, ताकदीचें सूत, (ताण्याच्या) गुंडाळ्या, कमान (स्प्रिंग), पांजणयंत्र.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

८) यौद्धिक

अग्निजलवृष्टि, हुकमतीची जागा, आकाशयान-विद्या, आरमारी लढाई, कुलपी गोळा, खडी फौज, खंदकाची किंवा चराची चढाई, गणवेष (युनिफॉर्म), गरनाळ (हावित्झर), चिलखती गाडा-रणगाडा (टँक), गनिमी कावा, विषारी वायू-धूर, नाविक दळ, निरोप्या (डिस्पॅच रायडर), फुंकणी (केपाची बंदुक), बचावाचें धोरण, मनुष्यबल, महायुद्ध, युद्धमंत्री, लढाऊ जात, लष्करी भूत, शुश्रूषा पथक, तात्पुरता तह, सरकती सरहद्द, सरदार (सेनापती), फौजी किंवा जंगी (लाट) कमांडर इन चीफ, सर सेनापति, सैन्यभरती, स्वयंसैनिक.

९) राष्ट्रीय पक्ष व राजकारण

अखेर किंवा अंतिम फळ किंवा साध्य (गोल), अडवणूक-मार्ग, अंतर्व्यवस्था-मागणी, अप्रत्यक्ष प्रतिकार, अदृष्ट साधन (मॉरल फोर्स), असंतोष, अराजक, आत्ममहत्त्व (स्वाभिमान), उदारपक्ष, हुजूरपक्ष, एकमत, उदारमतवादी, एक व्यक्त पाऊल (ए डेफिनेट स्टेप), एतद्देशीय, एकमुखी-सत्ता, कमाल (मॅक्झिमम), किमान, कायदेशीर मार्ग, क्रांतिकारक चळवळ, जहाल, सणसणीत, ना मत ना कर, बेगडी सुधारणा, लोकशाही (डेमॉक्रसी), संघ (लीग), सनदशीर (कॉन्स्टिट्यूशनल), सार्वजनिक सभा, सामुदायिक शहाणपण.

१०) राष्ट्रीय सभा

अधिवेशन, अंतरराष्ट्रीय, अनत्याचारी, असहकारिता, असहकारवाद, अर्धे स्वातंत्र्य, असंदिग्ध मागणी, आगंतुक बहुमत, एकगठ्ठा, एकमुखी रुद्राक्ष (एकहाती सत्ता, एकमत), लोकशाही पक्ष (डेमोक्रॅटिक पार्टी), कार्यक्रमपत्रिका, कंठाळी ठराव, खुला अर्ज, खादी-चळवळ, गैरसनदशीर, गण (कोरम), गीतावाक्य (पालुपद), घटक (यूनिट), चर्चात्मक (डेलिबरेटिव्ह), जाहिरनामा (मॅनिफेस्टो), जोर (स्ट्रेस), दर्जा (स्टेटस), दुही, ध्येय, नागरिक हक्क, नाफेर पक्ष, प्रचारक, प्रांतिक सभा, मुखत्यार (डेलिगेट), सत्याग्रह, सविनय कायदेभंग, सर्वाधिकारी, संमेलन, सामुदायिक चळवळ, स्वयंनिर्णय, स्वागतमंडळ, स्वसत्ताक, स्वयंशासित, स्वावलंबन, स्मशानगीत, हस्तपत्रक.

११) व्यापार

नाकेबंदी, कमताना (बट्टा), पतपेढी, विलायती कापड, देशबुडवी दलाली, हुंडी.

१२) वृत्तपत्रीय

अग्रलेख, आन्हिक पत्र (डेली), आरती (टीका), इशारत, कर्णधार (संपादक), खेप (अंक), चरचरीत लेख, चाळणी (टीका), छेदक (प्यारा), बातमीदार, मथळा, मुद्रित (प्रूफ), राजद्रोह, लेखनस्वातंत्र्य, लेखणीहाक्ये, लेखणीपांडित्य, वहिवाटदार (मॅनेजर), वाचिक प्रतिकार, वाटोळी जुडकीं, वार्ताहर, व्यवसायबंधु, शीर्षक (हेडिंग), शिरोलेख, सदर (कॉलम), सरकाजरजमा, स्फूट सूचना, सहसंपादक, सहकारी, सूतउवाच, सरस्वतीदान (कडक टीका), स्थलसंकोच, स्थानिक, ज्ञानाचा खंदक, इहवृत्त.

१३) शास्त्रीय

रसायनशाळा, पंचांग-शोधन, उत्क्रमणतत्त्व (इव्होल्यूशन), नियमबद्धतेची सार्वत्रिकता (यूनिफॉर्मिटी ऑफ लॉ), ज्ञेयशास्त्र, मनोधर्म (मॉरल इन्टेन्शन), सुखवाद (हिडॉनिझम), सत्यबोध, द्रव्य (मॅटर), गतिशक्ति (फोर्स), संवेदनशक्ति (कान्शसनेस), प्रयोगसिद्ध, किरणपट्टा (स्पेक्ट्रम), शास्त्रकलामंदिर, शब्दव्युत्पत्तिशास्त्र (फायलॉलजी), भुवनसंस्था, अंकपाश, पाण्यानें मलमूत्र वाहून नेणारा मोठा नाला (ड्रेनेज), चालक (डायरेक्टर), मर्की (प्लेग), संसर्गविरोध (सेग्रिगेशस), सरकपडदा (ड्रॉप), गोस्तनसीतला.

१४) शिक्षण

विशारद (ग्रॅज्युएट), माध्यम, महाविद्यालय, विश्वविद्यालय, उदार शिक्षण, सार्वजनिक शिक्षण, शास्तेमंडळी (गव्हर्निंग बॉडी), पुस्तकीविद्या, हस्तलिखित, ऐच्छिक, राष्ट्रीय वळण.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१५) शेती

फेरपाहणी, मालकी हक्क, सरकारी शेतवाडी (फार्म), सावकारी पेढी, कारागीर मंडळी, मदतीचा अर्ज, शेतपेढी, कुणबाऊ धाड, चारणफी, गोरक्षण.

१६) सरकार

अटक, अडथळा, अंतस्थ राज्यव्यवस्था, एकसत्ताक राज्य, एकमुखी सत्ता, कडक उपाय, कोठवळे, कोल्हेशाई, गट (पार्टी), गाव पोलीस (रामोशी), गुमास्ता (एजंट, व्हाइसराय, नोकरशाही), चिटणीस कचेरी, झारशाही, झोटिंगपातशाही, ताम्रपट, दडपशाही, नागडा स्वार्थ, पाशवी शक्ति (ब्रूटफोर्स), पांढरा हत्ती, प्रधानमंत्रि, प्रांतिकसरकार, फोडा व झोडा, भाषणबंदी, भारतमंत्री, शिक्केबाजी (व्हेटो, सर्टिफिकेशन), सनद (चार्टर), सभाबंदी कायदा, सामान्य लोकप्रतिनिधिसभा (हाऊस ऑफ कॉमन्स), सुभेदार (गव्हर्नर), सोटेशाही, सोटेबारगिरी, सुधारणा (रिफॉर्म), हडेलहप्पी राज्यव्यवस्था.

१७) सामाजिक

अंध-सुधारक, अस्पृश्य-वर्ग, मध्यमवर्ग, अति-मनुष्य (सुपरमॅन), अनुकरणेच्छा (फॅशन), नवविद्वेषी, पक्षाभास, मानपत्र, संमतिवय-बिल.

१८) स्थानिकस्वराज्य-ग्रामसंस्था

गावपंचायत-ग्रामसंस्था-स्वराज्याचा पाया, लोकनियुक्त पंच-पंचायत, स्थानिक-कमेटी (म्युनि.)-स्वराज्य-स्व.मळमळीत सौभाग्य-नियामक मंडळ, (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट)-सभासद (कार्पोरेटर), नगरसभा, नगराध्यक्ष, घरपट्टी, स्थानिकसंस्था, कंपू (कॉकस), ग्रामपद्धति, ग्रामसंघटना.

१९) किरकोळ

उपनगर, उखळबेरी, कोकरउडी (वायफळ प्रयत्न, आनंद), खेदप्रदर्शन, खेळखाना (स्पोर्टिंग ब्लब), गळपट्टी (नेक टाय), दारिद्रयगृह (पुअर हाऊस), पराक्रम (कॅरेक्टर), बकाली (कॉस्मापॉलिटन), शार्मण्य (जर्मन), शृंगापत्ति, सामना (मॅच), गोरे उडाणटप्पू, दवदव (त्रास), रोजनामा (डायरी), फर्माईष (फॅशनेबल), हस्तांदोलन, शिष्टाचाराचा खून, साखरावगुंठित, भीस (लोकर), औत्पादिक, मजलीस नशीन (अध्यक्ष), अनुध्यां, एकांडेपणा, ऐतिहासिक ठेच.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२०) कोटी-वाक्प्रचार-म्हणी

अठरापगड जातींत ही टोपीवाल्यांची जात एकोणिसावी आली, आई (हुंडणावळाई), आधीं मैत्रिणी मग सोबतिणी व शेवटी ख्रिस्तिणी करून टाकणे, आमच्या पायगतची नदी उशागतीं नेऊन ठेविली, संस्थानिकांच्या हक्काची उतरती श्रेढी, भरल्या पोटी पांडित्य, करदीपिका भार्या (म्हातारा नवरा-लहान नवरी), गणेशचतुर्थीचे चंद्रनिरीक्षण (राजद्रोहाचा आरोप), उजाडले पण सूर्य कोठें आहे, घाबळींतील खबुतरें (बगलबच्चे), शहाणपण सत्तेंत आहे दैन्यांत नाही, रात्रीं खा तूप आणि सकाळीं बघ रूप, वरच्यास हात खालच्यास लाथ.

याप्रमाणें २० विभागांत एकंदर शब्द विभागले. शक १८०२ (केसरी) पूर्वीं मराठीत वर्तमानपत्रें व मासिकें निघत होतीं. तेव्हां त्यांनीं कांहीं पारिभाषिक शब्द निर्माण केले असतीलहि. पण अशांची संख्या फार थोडी असावी, कारण हे संपादक बहुश: इंग्रजी शब्द वापरीत. राष्ट्रीय सभेचें जीवन यापुढें सुरूं झालें आणि त्यामुळें राष्ट्रीय विचारांचा ओघ देशात वाहूं लागला. या ओघात परकीय भाषेंत विचार करण्याची, बोलण्याची व लिहिण्याची विद्वानांची सवय वाहून जाऊं लागली आणि स्वभाषेंतील शब्दसृष्टीस प्रारंभ झाला. तिचें त्रोटक स्वरूप वर दाखिवलें आहे. केसरीनें स्वत: निर्माण केलेले शब्द जसे यांत आहेत तसेच अनेक लेखकांनाहि तयार केलेले शब्द आहेत. केसरीनें त्यांच्या शब्दांची आपण होऊन प्रसृति केली. त्यामुळें या लेखाला ‘केसरीनें प्रसृत केलेली परिभाषा’ असें नांव दिलें आहे. पूर्वीं सांगितल्याप्रमाणे हा पारिभाषिक लेख वेळेच्या व स्थलाच्या अभावीं अपुरा झाल्यानें यांत भर घालून जास्त मोठा करण्यास कोणासहि सवड ठेविली आहे. कारण केसरीनें म्हटलेंच आहे कीं, ‘देशांत संपत्ति कितीहि विपुल असली तरी तिचा एके ठिकाणीं ज्याप्रमाणें व्यवस्थित संग्रह करावा लागतो, तद्वतच…शब्दरत्नें मोठ्या काळजीनें आणि व्यवस्थित रीतीनें संग्रहित करावीं लागतात.’ (के.१९०३ अं.४२)

(प्रस्तुत लेख ‘केसरी-प्रबोध’ या द.वि. आपटे, श्री.म. माटे, स.वि. बापट, पां.मा. चांदोरकर, रा.ग. हर्षे, श्री.रा. टिकेकर, शं.ना. जोशी यांनी संपादित केलेल्या आणि केसरी-महोत्सव-मंडळ, पुणे, यांनी शके १८५३, सन १९३१ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे.)

 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......