परमेश्वर आहे का? विचार करा. एक अथवा अनेक देव असल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही, हेच खरे!
संकीर्ण - पुनर्वाचन
डॉ. अब्राहम कोवूर
  • डॉ. अब्राहम कोवूर आणि त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 22 January 2024
  • संकीर्ण पुनर्वाचन देव God ईश्वर परमेश्वर डॉ. अब्राहम कोवूर Abraham Kovoor Begone Godmen

माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत व या कक्षा रुंदावत आहेत, तसतसा देव हा खूपच विवाद्य विषय होत आहे.

एक रोमन कॅथलिक धर्मगुरू होते. त्यांचं नाव टेइलीहार्ड डी. चार्डीन (Teilhard de Chardin). हे एक पॅलिऑन्टॉलॉजिस्ट (Palaeontologist) होते. म्हणजे हे जुने अवशेष निःशेप प्राणीशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ या विषयांचे अभ्यासक होते. यांनी ‘दी फिनॉमिनन ऑफ मॅन’ (मानव चमत्कार) नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पृथ्वीवर माणूस उत्क्रांत (Organic evolution) होत अस्तित्वात आला. या उत्क्रांतीमागे सर्वशक्तिमान बुद्धिमत्ता (Supreme intelligence) आहे. त्यालाच ते ‘परमेश्वर’ मानतात.

डॉ. रॉबिन्सन (Dr. Robinson) हे वूलविकचे बिशप (Bishop of Woolwhich) होते. ते एक सुप्रसिद्ध ‘थिऑलॉजीअन’ (Science of Religion) होते. त्यांनी ‘ऑनेस्ट टू गॉड’ (Honest to God, देवाशी प्रामाणिक) नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी स्वर्गात बसलेल्या देवाची कल्पना नाकारली. त्यांच्या मते अदृश्य निरपेक्ष (impersonal) परमेश्वर हा बुद्धिमान आहे व तो निसर्गातल्या सर्वच गोष्टीवर नियंत्रण करतो व तो प्रत्येक वस्तूतही असतो.

रेव्ह. फ्रेड डी. सिल्व्हा (Rev. Fred de Silva) हे मेथॉडिस्ट चर्चचे अनुयायी. त्यांनी ‘डझ सायन्स लिव्ह रूम फॉर गॉड’ (Does Science Leave room for God, देवाला विज्ञानात स्थान आहे काय?) या पुस्तकात विचार मांडले आहेत. परमेश्वरांची निरनिराळी अंगे विज्ञानाच्या विविध शाखा मांडत असतात. थोडा बहुत रसायन तर वनस्पतीमध्ये वेगळा, शरीरविज्ञानात आणखीन काही, अशा तऱ्हेने निरनिराळी अंगे कळतात. खरा धर्म हे सर्व दृष्टीकोन एकत्र करतो व आध्यात्मिक भागांची भर घालतो. चंद्र हा अमुक एका परिघातच कसा असतो? चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिघांच्या चुंबकीय शक्तीमुळे तो चंद्र त्याच स्थितीत फिरतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला वाटतं याही पलीकडे एक कारण आहे. याही मागे एक नियोजन (intelligence) आहे. हा पूर्वसमन्वय साधला जातो. मी त्यालाच ‘सुप्रीम इन्टलिजन्स’ (Superme intelligence) सर्वोच्च बुद्धी मानतो, म्हणजेच देव मानतो.

आता आपण डॉ. रॉबिन्सन यांच्या म्हणण्याचा विचार करू. बुद्धी ही मेंदूच्या अस्तित्वाखेरीज स्वतंत्ररित्या असूच शकत नाही. ‘बायोनिक्स’ (Bionics) ही विज्ञानाची नवी शाखा आहे. या शाखेत मानसिक क्रियांचा व वागणुकीचा (mental activities) अभ्यास करतात. या शास्त्रात शारीरिक व मानसिक वागणुकीचा अभ्यास (electronic behaviour) करतात.

शरीर व चेतना (life) यांचा अतूट संबंध आहे. मन अथवा बुद्धी ही चेतना (जीव) किंवा शरीराशिवाय असूच शकत नाही. इंधनाखेरीज आग अथवा अग्नी असू शकत नाही, तितकच चेतना ही शरीराखेरीज असू शकत नाही. तितकीच अव्यक्त बुद्धी (impersonal intelligence)- व्यक्तिनिरपेक्ष बुद्धी ही कल्पना म्हणजे खुळी कल्पना आहे.

चेतना (जीव) म्हणजे मन नाही, हे लक्षात घ्या. बटाटा अथवा शरीरातून काढलेलं हृदय हे योग्य परिस्थितीत जगू शकतं, पण त्यात मन असू शकणार नाही. रेव्ह. डी. सिल्व्हा ‘स्पिरिच्युअल डायमेन्शन’ (Spiritual Dimension) आध्यात्मिक अंग ‘आध्यात्मिक परिमाण’ म्हणतात ते काय? सर्व वस्तूंत विनाश न पावणारा अमर आत्मा असतो. या कल्पनेतून वरील कल्पना फोफावतात. आध्यात्मिक लोक असं मानतात की, शरीरविरहित आत्म्याला चेतना (जीव) व मन असतं. श्वासोश्वास करणाऱ्या देहाखेरीज चेतना (जीव) व मन असूच शकत नाही. देहविरहित आत्मे कपड्यांसकट प्रकट होतात, अर्थात फक्त मनोविकृत लोकांना दिसू शकतात. हे आत्मे फुप्फुसाखेरीज व कंठ स्वर असल्याखेरीज बोलूच कसे शकतात? ते आत्मे स्नायूयुक्त शरीराशिवाय काम कसे करू शकतात? तसंच या आत्म्यांना पूर्ण शरीर झाकण्यासाठी कपडे कुठून येतात, याचा अंधश्रद्ध विचारही करत नाहीत.

जर मृत माणसे आत्मे मागे ठेवतात व त्याच घराच्या भोवती घोटाळतात, हे खरं असतं, तर चंद्र हे भुताटकीचं घर बनेल. कारण अंतराळवीरांचा मृत्यू तेथे होण्याची शक्यता आहे. आणि जर ही आपत्ती ओढवलीच, तर अमेरीकन व रशियन लोकांना सिलोनमधून कत्तादीयांना चंद्रावर न्यावे लागेल व त्यांच्याकडून ‘थोविल’चा प्रयोग करून घ्यावा लागेल. म्हणजे चंद्रावर उतरणे सहज शक्य होईल.

विज्ञानाच्या कसोटीवर संपूर्ण जगातील वस्तू जड (material) आहेत. पूर्वी ‘मॅटर’ (Matter) जडवस्तू व शक्ती, जड वस्तू व मन यांत भिन्नता मानत असत, पण आधुनिक विज्ञान हा फरक मानत नाही.

डॉ. वॉल्टर हेस (Walter Hess, Neurologist) हे एक मस्तिक-शास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिकही (Nobel Prize) मिळालं आहे. माणसात अनेक भावना असतात. उदा. प्रेम, राग, मत्सर, करूणा, दुःख, वेदना, आवड-निवड. या सर्व भावना मेंदूतील ते ते भाग उद्दिपित करताच तयार करता येतात. या भावनांत आध्यात्मिक, दैवी (Divine) काहीच नाही. या भावना म्हणजे मेंदूतील न्यूरॉन्सच्या ‘इलेक्ट्रो केमिकल’ (Electro Chemical) चेताकोशात घडून येणारे विद्युत रासायनिक बदल किंवा क्रिया आहेत.

जगातील ‘मॅटर’ जडवस्तू कधीच नष्ट होत नाहीत किंवा तयारही होत नाहीत. तेव्हा कर्ता असण्याची जरुरीच नाही. व्यक्तिस्वरूप अथवा अदृश्य, अव्यक्त (personal or imper-sonal) अशा निर्मात्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही.

या आधुनिक दैववाद्यांना उत्तरं देणं कठीण आहे, पण यांनाच एक उलटा बिकट प्रश्न विचारून उत्तर देता येईल. हा परमेश्वरच कोठून तयार झाला? आपल्याला तर्क, बुद्धी व मिळालेली माहिती यांच्याद्वारे काय कळतं ते पाहू.

प्रथम आपल्याभोवतीचं जग पाहू. नंतर तारे, सूर्य मालिका व आपल्या मालिकेहून दूर असलेल्या आकाशगंगा (Galaxies) व क्वासार यांचा विचार करू. अवकाशात सर्व दिशांना पाहताच खगोलशास्त्रज्ञांना आपल्याच सूर्यासारखे अगणित तारे इतस्त्रतः पसरलेले आढळले. सर्वच तारे विकसित होत आहेत. तेव्हा आपल्या सूर्याची जी पूर्वी उत्क्रान्तीची स्थिती होती, त्या स्थितीमधील तारेही दिसतात. अगदी हजारो वर्षांपूर्वी जी स्थिती होती, ती आपण पाहू शकतो. त्यांची एकमेकांतील अंतरं कल्पनातीत आहेत.

आपण जे अंतराळातील जग पाहू शकतो, ते कित्येक कोटी (एक बिलीयन) प्रकाशवर्षांइतके पाहू शकतो. हे पूर्ण नाही. टेलिस्कोपच्या मर्यादेपलीकडे खूप आहे. कित्येक आकाशगंगा या ‘रेडिओ टेलिस्कोप’च्या माध्यमातून शोधल्या आहेत. त्या आकाशगंगेतून येणारे किरण पकडून हा शोध घेण्यात आला आहे.

आपली आकाशगंगा केवळ एक ठिपकाच शोभावी एवढ्या प्रचंड, कित्येक पट आपल्या आकाशगंगेहून मोठ्या आकाशगंगा आहेत.

असा एक अंदाज आहे की, एक कोट ग्रहगोल या एका आकाशगंगेत आहेत व ते सर्व आपल्या पृथ्वीच्याच तत्त्वाचे बनले आहेत. जर पृथ्वी सदृश्य परिस्थिती असेल, तर तेथेही जीव सृष्टी असावी, हे मानण्यास काहीच हरकत नाही.

सतत एकत्र येणं (re-formation) व विभाजन होणं (breaking down) या प्रचंड प्रमाणात घडणाऱ्या घटनांमागे कोणी इंजिनिअर - स्थापत्य विशारद असावा की, ज्याने हे सर्व अफाट विश्व बनवलं, याचा आपण केवळ अंदाज (Speculate) करू शकतो. पण फक्त ‘नाही’ एवढंच उत्तर मिळेल.

आपण असाही विचार करू -

या निर्मितीमागे हेतू आहे काय? आपण निसर्गाचं अवलोकन करा, म्हणजे असं लक्षात येईल की, या विचारांवर विश्वास ठेवण्याजोगं काही नाही. या ठिपक्याएवढ्या पृथ्वीवर काही घटना घडतात व सुंदर जंगली झाडं तयार होतात. ही वाढ कित्येक शतकांच्या वाटचालीनंतर प्रगत होत गेली. सूर्यप्रकाशामुळे झाडांची वाढ झाली, तसंच निसर्गातील विनाशकारक (Tornado) वादळ या घणाघाती कारणांचीही वाढ होते व सर्व झाडे झुडपं, रानं नष्ट होतात.

आपण परत विचार करू, या मागे काही हेतू होता का? परत मागच्यासारखं उत्तर ‘नाही’ असंच येईल. वरील उत्क्रांती व नाश हा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुरूप घडत गेला.

लाखो वर्षांनी माणूस रानटी अवस्थेतून प्रगत होत गेला. प्रथम आजचा माणूसही ‘रानटी माणूस’ म्हणून याच अवस्थेत होता. तोही दगड, काठी यांच्या साहाय्यानं भक्ष्य पकडत असे. प्रगत होता होता तो चंद्रावरही जाऊन पोहोचला. त्या मनुष्यप्राण्याच्या पूर्वजांना आधुनिक माणूस ‘देवासमान’ झाला.

पृथ्वीचं वय तीन ते साडे चार मिलियन वर्षं (३ हजार दश लक्ष वर्षे) आहे. ‘बायबल’ पृथ्वी सुमारे ५,९७५ वर्षांपूर्वीची आहे असं म्हणतं. म्हणजेच पृथ्वीच्या वयाच्या कितवा हिस्सा झाला? दोन दशलक्षांशाएवढा.

आपण पृथ्वीवरील सुंदर वस्तू पाहून अचंबा व्यक्त करतो, पण सभोवताली नीट पहा व निसर्गामधील चांगल्या व वाईट वस्तूही पहा. जर या सर्वांमागे निर्माता आहे, तर चांगल्या व वाईट वस्तू या त्यानेच, म्हणजे देवानेच निर्माण केल्या. मग या दयाळू परमेश्वराने वाईट गोष्टी का निर्माण केल्या बरं?

परमेश्वर संकेतानुसार जर सर्वच घटना घडत असतील, तर जगातील युद्ध, हिंसा, दुष्काळ, पूर, खून, दरोडे व अनेक अनाचारांचं खापरही त्याच्याच माथी येईल, पण याबाबत सर्व धर्मीय दुहेरी भाषा करतात. दोन्ही दगडांवर पाय ठेवतात. देव सर्वशक्तीमान व बुद्धिमान असला (omnipotent) तरी माणूसही त्या घटनांना जबाबदार आहे. त्याला स्वयंप्रेरणा, इच्छाबळ (free-will) आहे व वाईट विचार व कृतीस तोच जबाबदार आहे. मग मला अशी स्वयंप्रेरणा, इच्छाबळ व बुद्धी देणारा परमेश्वरच अप्रत्यक्षरित्या जबाबदार नाही का?

एखादा विमान अपघात होतो. अनेक स्त्री-पुरुष मृत्यू पावतात. मग ज्यांची पत्नी वा पती वारला त्यांनी मृत्यू ओढवून अपघातात मारणाऱ्या देवालाच शाप नकोत का द्यायला? जर निर्माता देव आहे, तर कॉलरा रोगाचे जिवाणू तयार करून हजारो बंगलावासियांना जिवे परमेश्वरच मारतो. त्याचे उत्तरदायित्वही त्याच्याकडेच जात नाही का?

आपण दृश्य बघतो. डोळ्यातून मेंदूपर्यंत प्रतिमा जाते व आपण सौंदर्याचा आस्वाद घेतो. या घटना परमेश्वरानेच माणसाच्या चांगल्यासाठी केल्या असंही आपण मानतो. त्याच न्यायानं नागाची डंख करण्याची रित पहा. त्याच्या अणुकूचीदार दातांचा दंश होताच हवालदिल माणसांच्या शरीरात भयानक विषाचा प्रवेश होतो व तो मरतो. हजारो लोक पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखीच्या तोंडी पडतात. मग त्या जगनिर्मात्या परमेश्वरानेच या मृत्यूची जबाबदारी उचलावयास नको का? हजारो स्त्री-पुरुष, बालके या नैसर्गिक आपत्तीत सापडतात.

मग आता विचार करा की, ‘तेईलहार्ड द शारदँ’ (Teilhard de Chardin) यांचा विचार बरोबर आहे का? त्यांचा विचार असा होता की, सर्व शक्तीमान, बुद्धिमान माणूस हाच सेंद्रिय उत्क्रान्तीचा प्रेरक किंवा मार्गदर्शक आहे. प्राकृतिक (organic) उत्क्रान्ती ही इतर सर्व उत्क्रान्तीप्रमाणेच आहे. जगण्यास योग्य (fit) व अयोग्य (misfit) असे दोन्ही विरोधी वर्ग वाढीस लागतात. जे जगण्यास लायक आहेत, ते तग धरून जगतात.. हा सृष्टीचा नियम आहे. पृथ्वीच्या पोटातील गाडलेले प्राणीअवशेष (fossils) हीच कथा सांगतात. ही उत्क्रान्ती जडणघडणीतून पुढे जात असते. चुका टाळत टाळत हे घडत असतं. ही उत्क्रान्ती अदृश्य बुद्धिमान परमेश्वराची कृती मानणं मूर्खपणा आहे.

काही जण ‘बायबल’मधील देवाचा एक दिवस म्हणजे लाखो वर्षांच्या काळाबरोबर आहे, असा हिशेब सांगतात. आधुनिक उत्क्रान्तीबरहुकूम तो ‘बायबल’मधील काळ सुसंगत ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे.

‘अॅडॅम’ (Adam)ला ‘ईव्ह’ (Eve) ही पत्नी मिळायला हजारो लाखो वर्षं ताटकळत बसावं लागलं. कारण तिला अॅडमबरोबर तयार केली नव्हती. आपली पृथ्वी २४ तासांत स्वतःभोवती भ्रमण करते. म्हणजेच ‘जेनेसिस’ (Genesis)च्या काळात हा पृथ्वी भ्रमणाचा काळ लाखो वर्षांचा असणार.

या जीवाश्मविज्ञ (Paleontology) शारदा प्रभुतींचं असंही म्हणणं आहे की, माणूस हा सेंद्रिय उत्क्रान्तीचा अखेरचा टप्पा आहे. हे स्वतः एक श्रेष्ठ जीवश्मविज्ञ शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा पृथ्वीच्या गर्भात सापडणाऱ्या प्राण्यांच्या अवशेषाचा विशेष अभ्यास आहे, पण ‘कॅथलिक’ परंपरेतील शिक्षणाचा पगडा ते पुसू शकत नाहीत. माणसाने देव हा आपल्याच प्रतिमेचा केला, ही वस्तुस्थिती आहे.

म्हणजेच आता माणूस तयार झाला, उत्क्रान्ती थांबली, हे चुकीचे विधान आहे. खरंच पृथ्वी एवढी महत्त्वाची आहे की, परमेश्वराने माणूस तयार करून देवसदृश्य उत्क्रान्तीच थांबवावी. पृथ्वी हा ग्रह एवढा महत्त्वाचा आहे काय?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

या अफाट विश्वात यःकश्चित पृथ्वी व त्या वरील मानव यांना एवढं महत्त्व तो जनक (Creator) देईल, असं वाटत नाही. मग त्या निर्मात्यानं एवढं अफाट विश्वच का तयार करावं की, जे मानवाला दिसूही शकत नाही. या विचारसरणीचा अर्थबोधच होत नाही.

हा आधुनिक मानव, जगण्यास योग्य नाहीत अशांना केवळ संशोधनाच्या जोरावर आयुष्य प्रदान करून परमेश्वरालाच आव्हान अथवा खोटा पाडत आहे. सर्वांत कडी म्हणजे प्रजोत्पादनच हाती घेऊन हा मानव संततीची पैदास अधिक चांगली करू लागला आहे. ‘टेस्टट्यूब’ बेबी, शुक्रजंतूची बँक, अतिशय थंड स्थितीत अवयवांचं जतन (cryogenic prolongation) ही सर्व माध्यमं परमेश्वरालाही ठाऊक नव्हती.

धार्मिक लोकांना आवडो अथवा न आवडो - खरं तर त्यांच्या पसंतीचा प्रश्नच येणार नाही - नजीकच्या काळात एखादं मंत्रीपदच- ‘प्रजननमंत्री’ निर्माण होईल. प्रजोत्पादन कोणी करावं अथवा नाही, हे त्याच्याद्वारे ठरवण्यात येईल. मग जे जगण्यास योग्य नाहीत, अपात्र आहेत (misfits) त्यांना लैंगिक आनंद उपभोगता येईल, पण प्रजोत्पादनात भाग घेता येणार नाही.

परमेश्वर आहे का? विचार करा. एक अथवा अनेक देव असल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही, हेच खरे.

डॉ. अब्राहम कोवूर यांच्या ‘Begone Godmen’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद भालचंद्र साठे यांनी ‘बुवा बाबा मांत्रिकांचा अस्त’ या नावाने केला असून तो तीसेक वर्षांपूर्वी मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातून हा मजकूर घेतला आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......