‘रामा’बाबत काँग्रेसचा गाफीलपणा!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चं बोधचिन्ह आणि एक छायाचित्रं
  • Sat , 20 January 2024
  • पडघम देशकारण भाजप BJP काँग्रेस Congress राम Ram राममंदिर Rammandir राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो न्याय यात्रा Bharat Jodo Nyay Yatra

सध्या बहुतांशी देश राममय झालाय. खरं तर तो भारतीय जनता पक्षानं तसा केलाय, असं म्हणणं जास्त योग्य होईल. (यात लक्ष्मण आणि सीता मात्र कुठे दिसत नाहीत; रामालाही भाजपनं ‘एकटं’ पाडलं आहे!) २२ जानेवारीला ‘राजकीयीकरण’ झालेल्या ‘रामभक्ती’चा कळस साधला जाईल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारेही कटिबद्ध आहेत. आणि त्याला पर्याय नाही, कारण सत्ताधारीच रामभक्त असल्यावर प्रशासनाला त्यांच्यापुढे मान तुकवण्याशिवाय पर्याय कुठे असतो! शिवाय पुन्हा हेच रामभक्त पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत आत्तापासून सर्वच व्यक्त होत असताना रामभक्तीचं राजकारण करू नका, असं निर्भीडपणे सांगणारा कुणी ‘राम’ प्रशासनात असण्याची शक्यता नाहीच.

रामाच्या या भाजपपुरस्कृत माहोलमध्ये काँग्रेसची अवस्था फारच बिकट, गोंधळाची झालेली आहे. भाजप रामाचं राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे, काँग्रेसमध्ये मुत्सद्दी राजकारणी आता शिल्लक राहिलेले नाहीत किंवा भविष्याचा वेध घेणाऱ्या राजकारण्यांना आता काँग्रेसमध्ये निर्णायक स्थान उरलेलं नाही.

मुळात राम हा राजकारणाचा मुख्य मुद्दा होऊ शकतो, याची जाणीव भाजपला करून देणारी काँग्रेसच आहे, हे विसरता येणार नाही. ‘मंदिर वही बनाएंगे’ हा काही भाजपचा मूळ अजेंडा नव्हता, तर केवळ ती काही हिंदुत्ववादी संघटनांची आणि तीही खूप जुनी मागणी होती. ‘ती’ जागा वादग्रस्त होती आणि तेथील मंदिराचे दरवाजे बंद करून ठेवण्यात आलेले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

म्हणजे रामाला बंद कुलूपातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारनं घेतला आणि भारतीय जनता पक्षाला राजकारणात सर्वार्थानं ‘राम’ आणण्याची संधी मिळवून दिली, हे विसरता येणार नाही. याचा दुसरा अर्थ आज रामाच्या नावानं जो काही उन्माद उसळला म्हणा की, भाजपनं उसळवला म्हणा, त्याला भाजप इतका काँग्रेस पक्षही जबाबदार आहे…

भाजपनं केलेल्या रामाच्या ‘राजकीयीकरणा’ला रोखण्याचे कठोर प्रयत्न काँग्रेसकडून मुत्सद्दीपणा आणि प्रशासकीय पातळीवर झाले नाहीत, हेही तितकंच खरं. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा काँग्रेसशासित राज्यातून बिनधोक प्रवास करती झाली आणि देशात जो धर्मांध उन्माद निर्माण झाला, त्याची जबाबदारी भाजपइतकीच काँग्रेसची आहे.

ही यात्रा रोखण्याचं धाडस दाखवणारे एकमेव तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव होते. त्याची राजकीय किंमत त्यांनी पुढे मोजलीही आणि कणखरपणा न दाखवणाऱ्या काँग्रेसलाही ती मोजावी लागली. पुढे काय घडलं, यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, कारण ते सर्वांनाच ठाऊक आहे.

आत्ताही रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी गैरहजर राहण्याची काँग्रेसची भूमिका हा पक्ष राजकीय मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर किती गोंदलेला आहे, याचं लक्षण आहे आणि त्याचा फायदा समाजमाध्यमांच्या माध्यमातून भाजपनं उचलला आहे. मदर टेरेसा यांच्या ‘संत’पद प्रदानच्या व्हॅटिकन सिटीत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती मार्गारेट अल्वा आणि लुजिन्हो या दोघांना अधिकृतपणे कसं पाठवलं होतं, ते ३० जानेवारी २०१६चे पत्रच समाज माध्यमांवर फिरवलं जात आहे. देशातील त्या एका अल्पसंख्य (म्हणजे ख्रिश्चन) समुदायासाठी भारतीय प्रतिनिधी पाठवता येतो, पण रामाच्या म्हणजे कोट्यवधी हिंदूच्या कार्यक्रमाला काँग्रेस हजर राहत नाही, असा प्रचार केला जात आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

कोंडीत सापडलेले उद्धव ठाकरे...

सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील ‘पळवाटा’ बंद करत आपल्या विशेषाधिकारांचा वापर लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी करायला हवा

महाविकास आघाडीच्या ‘बाजारात तुरी...’!

बंड : एक फसलेलं आणि एक अधांतरी!

..................................................................................................................................................................

रामाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमालाही या दोघांना किंवा यापैकी एक आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसनं पाठवायला हवं होतं, म्हणजे मंदिरात या दोघांना प्रवेश दिला, तर पंचाईत आणि नाही दिला, तर  महापंचाईत अशा कोंडीत भाजप व तमाम हिंदुत्ववादी सापडले असते. या दोघांना मंदिरात प्रवेश दिला नसता तर ‘हिंदू सहिष्णू आहेत’ या हिंदुत्ववाद्यांच्या दाव्यातील हवा निघून गेली असती. त्यांना प्रवेश दिला असता, तर ‘आमचा राम सेक्युलर आहे’ आणि नसता दिला, तर प्रचाराचा जोरदार मुद्दा काँग्रेसला मिळाला असता. पण असा मुत्सद्दीपणा काँग्रेसला दाखवता आला नाही.

काँग्रेसनं एक फार चांगली राजकीय संधी गमावली आहे, असंच म्हणायला हवं आणि याला ‘गाफीलपणा’ हा एकच शब्द चपखल आहे. याचा दुसरा अर्थ, राम जेवढा राजीव गांधी यांना राजकीयदृष्ट्या समजला होता, तेवढा तो नंतरच्या काँग्रेस नेत्यांना समजला नाही, असाही काढता येईल.

भाजपनं रामाच्या नावानं देशभर निर्माण केलेल्या राजकीय आणि धार्मिक उन्मादी वातावरणाला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करून संयतपणे उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या योग्यच आहे. मणिपूर ते मुंबई म्हणजे पूर्व ते पश्चिम भारत अशी ही ८३३ किलोमीटर्सची यात्रा आहे आणि देशाच्या १७ जिल्ह्यातून जाणाऱ्या या यात्रेचं नेतृत्व अर्थातच राहुल गांधी करत आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

राहुल गांधी यांच्या गेल्या पदयात्रेला फार मोठा प्रतिसाद मिळाला होता, पण तो पाठिंब्यात परावर्तित करून घेण्यात काँग्रेसला यश आलं नाही, असं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निंवडणुकांच्या निकलावरून दिसलं आहे. ही यात्रा तर लोकसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर आलेली असताना निघाली आहे. मागच्या पदयात्रेला प्रतिसाद तर फार मोठा मिळाला, पण पाठिंबा का मिळाला नाही, याबद्दल काँग्रेसनं नक्कीच आत्मपरीक्षण केलं असणार आणि नंतरच ही यात्रा काढली असणार असं समजायला हरकत नसावी.

मणिपूर-मुंबई यात्रा निघण्याच्या दिवशीच काँग्रेसचे मुंबईतील एक तरुण नेते मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील उद्योगपती आणि उद्योजकांचा पाठिंबा असलेलं देवरा कुटुंबीय आहे. मिलिंद  आणि त्यांचे वडील (आता दिवंगत) मुरली या दोघांचं काँग्रेसशी असणारं घट्ट नातं ६० वर्षांचं होतं. मुंबई काँग्रेस म्हणजे मुरली देवरा, असं समीकरण एकेकाळी होतं.

भाजपच्या सांगण्यावरूनच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. निवडणूक आली की, अशी पक्षांतरे तर होतातच, असे मानून घेण्याइतका मिलिंद देवरा यांचा पक्षत्याग सहज नाही, असा याचा अर्थ आहे. शिवाय महाराष्ट्रात तर काँग्रेसची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे, असाही याचा अर्थ आहे. यात्रा करतानाच काँग्रेसची विस्कटलेली ही घडी राहुल गांधी यांना घट्ट करावी लागणार आहे. 

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......