यात्रांची रणधुमाळी व युद्धांची अंदाधुंदी अर्थात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग, देश आणि राज्य...
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • अयोध्येच्या दिशेने निघालेले रामभक्त, जरांगे पाटील, राहुल गांधी आणि युक्रेन-रशिया व पॅलेस्टाइन-इस्राईल संघर्षाची छायाचित्रं
  • Sat , 13 January 2024
  • पडघम देशकारण राम Ram राममंदिर Ram Mandir राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो न्याय यात्रा Bharat Jodo Nyay Yatraमनोज जरांगे Manoj Jarange मराठा समाज Maratha Samaj मराठा आरक्षण Maratha Reservation

२०२४च्या लोकसभा निवडणुका ध्यानात घेऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या २२ जानेवारी अयोध्येतील मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा देशभर जोरात प्रचार चालू आहे.  

भाजप-संघ यांनी ते जेव्हा सत्तेत नव्हते, तेव्हापासून राममंदिराच्या मुद्द्याचा उपयोग करून घेतला आहे. तो अजूनही चालू आहे. त्या वेळचे भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे सरकार असताना ‘मंडल आयोगा’च्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावावर रथयात्रा काढली होती. त्याची अंतिम परिणती बाबरी मज्जिद पाडण्यात झाली. परिणामी देशभर दंगेधोपे, जाळपोळ इत्यादी प्रकार घडले.

काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव, गृहमंत्री शंकरराव चव्हाण, संरक्षणमंत्री शरद पवार आणि काँग्रेसच्या मंत्रीमंडळातील इतरही सहकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले, किंबहुना असे करून त्यांनी त्याला एक प्रकारे प्रोत्साहनच दिले होते. लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना अटक करून ही रथयात्रा अडवली होती. त्याचे भोग ‘चारा घोटाळ्या’च्या निमित्ताने अजूनही त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत..

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

तेव्हापासून अयोध्येतील रामाचा राजकारणासाठी वापर करायला सुरुवात झाली, तोच प्रकार आजही चालूच आहे. आता गावोगावी श्री प्रभू रामचंद्राच्या कलश यात्रा व मिरवणुका काढल्या जात आहेत, घरोघरी अक्षता वाटल्या जात आहेत. २२ जानेवारीच्या अयोध्येतील कार्यक्रमासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’ने कोणाकोणाला निमंत्रणपत्रिका दिल्या, का दिल्या, कोणाला दिल्या नाहीत, का दिल्या नाहीत, त्याला कोण जाणार व जाणार नाही, कोणाची काय प्रतिक्रिया आहे, याबद्दलचे रसभरीत वर्णन सर्वच प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहे.

या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची मोफत सोयही केली आहे. तरीही काही लोक आपल्या खाजगी वाहनांतून, तर काही जण मोठ्या भक्तीभावाने पायीच जथ्याजथ्याने बॅनर लावून व खांद्यावर झेंडे घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत..

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

न्यायालय केवळ ‘निवाडा’ करते, ‘निकाल’ देते, मात्र ‘न्याय’ देतेच असे नाही!

दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

‘भारत जोडो यात्रा’ : राहुल ‘सत्ता’ नाही, ‘राजकारण’च बदलायला निघालाय!

‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी एक प्रकारे ‘social listening’चं काम करत आहे…

..................................................................................................................................................................

एकीकडे ही यात्रा वा पदयात्रा चालू असताना दुसरीकडे काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई अशा ‘भारत न्याय यात्रे’ला उद्यापासून सुरुवात होईल. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर त्यांनी कर्नाटक राज्य पदरात पाडून घेतले आणि राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही राज्ये गमावली. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भारत न्याय यात्रे’ला सुरुवात करत आहेत. मात्र या त्यांच्या ‘न्याय यात्रे’पेक्षा ‘राममंदिर यात्रे’चाच गाजावाजा भारतीय प्रसारमाध्यमे करतील. क्योंकी वहीं टीआरपी होगा...

लोक ‘राममंदिर यात्रे’हून परत येईपर्यंत राहुल गांधी यांची ‘न्याय यात्रा’ सुरू होणार आहे. जनतेच्या विरुद्ध दिशेला राहुल गांधींची यात्रा आहे की, राहुल गांधींच्या यात्रेच्या विरुद्ध दिशेला जनता जात आहे, हे ज्याने त्याने ठरवावे.

पंजाबमधल्या काही आतंकवाद्यांनी खलिस्तांनच्या मागणीसाठी सुवर्ण मंदिराचा जसा वापर केला होता, तसाच संघ-भाजप आपल्या ‘हिंदुत्ववादी’ उद्दिष्टपूर्तीसाठी राममंदिराचा वापर करत आहेत. त्यामुळे केवळ काँग्रेसच नव्हे, तर संघ-भाजप विरोधात असणाऱ्या सर्व विरोधी पक्षांची - ते स्वतःही हिंदूधर्मीयच असल्याने - एक प्रकारे कोंडीच झाली आहे. उदा., राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची कलश पूजा, लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या घरावर लावलेले पोस्टर इ.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

या झाल्या देशपातळीवरील दोन यात्रा. आता महाराष्ट्रातील एका यात्रेबद्दल.

मराठा समाजाने ट्रॅक्टर, ट्रॉली, टेम्पो, मेट्याडोर, जीप गाड्या असे जमेल त्या वाहनाने २० जानेवारी रोजी मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलेले आहे. राज्यातील ‘मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे’, या मागणीसाठीची नवी रणनीती म्हणून जरांगे २० जानेवारीपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज मुंबईच्या दिशेने लवकरच कूच करेल. अर्थात त्यांना अडवण्यासाठी मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरले जातीलच.

जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरुवातीला झालेल्या दोन्ही उपोषणाच्या वेळेस राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्या आहेत. त्यानुसार दोन्ही वेळा हे उपोषण मागे घेण्यात आले. अजूनही सरकारकडून जरांगे यांची मिनतवारी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण त्यांची मागणीच अशी आहे की, त्यामुळे सरकारसुद्धा पेचात सापडले आहे. ती मागणी न्यायालयीन निकालांना, निरनिराळ्या आयोगांच्या शिफारशींना, संविधानातील विद्यमान तरतुदींना न जुमानता केलेली असल्यामुळे सरकारचीही अडचण झालेली आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा हा प्रश्न राज्यकर्त्यांनी वेळोवेळी राबवलेल्या धोरणामुळे आणि सत्तेवर येण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आखलेल्या डावपेचांतून निर्माण झाला आहे. असे प्रश्न एका मर्यादेनंतर हाताबाहेर जातातच.

पण तरीही दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात केंद्र सरकारने जसे विविध प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता, तसा काही प्रकार महाराष्ट्र सरकार या मराठा आंदोलनात करेल असे वाटत नाही. पण या आंदोलनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघणार आहे, हे नक्की.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मराठा आरक्षण : दुखणे खरे आहे, पण उपाय चुकतोय... मराठे, इतर मागास वर्गीय समूह एकाच जात्यात दळले जात आहेत

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, याबरोबरच त्यांच्या पुढे काय, याही प्रश्नाचा विचार व्हावा…

महाराष्ट्राचं ‘सामाजिक स्वास्थ्य’ फार काही बाळसेदार नाही, पण जे आहे तेही मराठ्यांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनांनी धोक्यात येण्याची शक्यता आहे!

मराठ्यांची ‘शोकांतिका’ ही सबंध महाराष्ट्राचीच ‘शोकांतिका’ आहे, हे समजून घेण्याची गरज आहे!

..................................................................................................................................................................

जागतिक पातळीवर...

आपल्या राज्यात व देशात हे प्रकार घडत असताना, जागतिक पातळीवरही असेच काही घडत आहे. अर्थात जे जास्त भयानक आहे. रशिया-युक्रेन युद्ध अजून थांबलेले नाही. दुसरीकडे इस्रायलने पॅलेस्टिनींवर अमानुष हल्ले करून त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यांची घरेदारे बॉम्ब वर्षावांनी उदध्वस्त केली आहेत. ते उपचार व आश्रय घेत असलेल्या शाळा, दवाखान्यांवरसुद्धा हल्ले केले आहेत. अनेक देशांनी हे युद्ध थांबवावे म्हणून युनोत, सुरक्षा परिषदेत प्रयत्न केले, पण अमेरिकादी साम्राज्यवादी देशांनी ते हाणून पाडले आणि इस्रायल तर अशा बाबींना जुमानतच नाही. उलट हे युद्ध आणखी कित्येक महिने चालू राहील, असे जाहीर केले आहे.

नुकत्याच बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार अमेरिकादी साम्राज्यवादी देशांनी व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे.

थोडक्यात, आपले राज्य व देश यात्रांच्या रणधुमाळीत आहे, जग युद्धाच्या अंदाधुंदीत. केंद्र सरकारपुरस्कृत राममंदिर उदघाटन सोहळा असो वा जरांगे पाटलांची राज्यातील आरक्षण यात्रा असो किंवा मग जागतिक पातळीवरील युद्धं असोत, आपण काहीच थांबवू शकत नाही...

आपल्या राज्यात, देशात आणि जगात एक प्रकारची अंदाधुंदी माजली आहे असे वाटावे, अशी परिस्थिती आहे.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......