विज्ञान आणि स्पेक्युलेटिव्ह कथा, दिवाळी २०२३ : काही अपवाद वगळले, तर या वर्षीच्या कथा बऱ्याच अंशी समाधान देऊन गेल्या
पडघम - विज्ञाननामा
मेघश्री दळवी, स्मिता पोतनीस
  • लेखात उल्लेख असलेल्या काही दिवाळी अंकांची मुखपृष्ठं
  • Tue , 02 January 2024
  • पडघम विज्ञाननामा दिवाळी अंक Diwali Ank विज्ञानकथा Science Fiction

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून विज्ञानकथेतील विश्व आता अधिकाधिक जवळचं वाटायला लागलं आहे. अनेक नवीन कल्पना आणि नजीकच्या भविष्यकाळाचं रेखाटन त्यातून समोर येत आहे. विज्ञानावर आधारित कथांचं प्रमाण वाढत आहे. सोबत विज्ञानकथेच्या काटेकोर व्याख्येत न बसणाऱ्या ‘स्पेक्युलेटिव्ह’ कथाही लिहिल्या जात आहेत. दरवर्षी दिवाळी अंकांत येणाऱ्या विज्ञान आणि स्पेक्युलेटिव्ह कथांचा आढावा आम्ही गेली पाच वर्षं घेतो आहोत. त्यातून या लेखनप्रकाराचा प्रवास, व्याप्ती आणि ट्रेंड्स लक्षात येतात.

नव्या विषयांचं वैविध्य 

मराठी स्पेक्युलेटिव्ह कथांचे विषय झपाट्यानं बदलतायत यात शंका नाही. आशिष महाबळ यांची ‘क्वांटम हाइस्ट’ ही २००३च्या ‘नवल’मधली कथा ‘क्वांटम एनक्रिप्शन’वर आधारित आहे; तर ‘दीपावली’तली ‘ड्रोनाचार्य’ ही असीम चाफळकर यांची कथा ‘ड्रोन तंत्रज्ञाना’च्या पार्श्वभूमीवर मानवी मनाच्या गुंत्याचं चित्र ठसठशीतपणे रेखते. याच अंकात ‘लाव्हा आणि फुलं’ या कथेत लेखक उज्ज्वल राणे रहस्याचा उलगडा करण्यासाठी रासायनिक गुणधर्माचा वापर करताना दिसतात.

स्मिता पोतनीस यांनी ‘नवल’मधल्या ‘शक्यतेतलं मांजर’ कथेत श्रोडींजरच्या सिद्धान्ताचा आधार घेतला आहे, आणि डॉ. बाळ फोंडके यांची ‘वसंत’मधली कथा ‘मनी वसे ते…’ डिप्रेशनवर सिम्युलेशन उपचार डिजिटल ट्वीनकडून करवून घेतले जातात, या संकल्पनेवर आधारित आहे.

‘नवल’मधल्या ‘गिनीपिग’ या कथेत सरिता आठवले यांनी बरेच नवे विषय एकत्रित करून भविष्याचं चित्रण केलं आहे. ते थोडं विस्कळीत असलं, तरी त्यातून प्रत्येक वाचकाला काही मिळू शकतं. ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकात ‘बॉम्ब देम’ ही नील यांची वेगळ्या विषयावरची अफलातून कथा अत्यंत रोचक प्रकारे पेश केलेली आहे. ‘सृष्टीज्ञान’च्या अंकात ‘सोयरी वनचरी’ या फॅंटसी कथेत सुरेश भावे भविष्यात आपल्यासोबत कोणकोण काय असू शकेल, याचा एक रंजक पैलू दाखवतात. ‘धनंजय’मधल्या ‘त्यानंतर’ या कथेत मेघश्री दळवी मूलकणांच्या संशोधनाचा वापर करतात, तर याच अंकात ‘सुखावितो मधुमास हा’ या कथेत गिरीश पळशीकर औषधांच्या विस्मयकारक परिणामांना हात घालतात, आणि यश मिळवताना मेहनत मोठी की, अवलंबलेला कोणता सोपा मार्ग मोठा, यावर विचार करायला लावतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘मराठी विज्ञान पत्रिके’तली संजीव कुलकर्णी यांची ‘बेरीज वजाबाकी’ ही कथा माणसाच्या मृत्यूच्या वेळच्या विचारांचा शोध आधुनिक तंत्रज्ञानातून घेते. प्रमोद कोलवाडकर यांनी याच अंकात ‘अवतार बाबा’ या कथेत अनाकलनीय गोष्टी चमत्कार नसून त्यामागील वैज्ञानिक सत्य समजून घ्यायला हवं, असा अप्रोच घेतला आहे. तो पोचतो, पण कथा म्हणून ती अधिक भरीव हवी होती. ‘ज्ञानपथ’मध्ये स्मिता पोतनीस यांची ‘ऑफिस’ ही कथा तंत्रज्ञानाच्या तावडीत सापडलेल्या माणसाच्या जीवनावर भाष्य करते.

या सर्व कथा नव्या विषयांमुळे नक्कीच लक्षात राहण्याजोग्या आहेत. त्यात आजच्या विज्ञानाचं आणि समाजाचं ‘स्पेक्युलेटिव्ह’ प्रक्षेपण कधी पटण्यासारखं वास्तव आहे, तर कधी अतिरंजित पण विचारात पाडणारं आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता उर्फ एआय हा विषय यावर्षी दिवाळी अंकांनी उचलून धरलेला दिसतो. त्यावर आधारित लिहिलेल्या कथा भविष्याची झलक दाखवणाऱ्या आहेत. ‘मोहिनी’मध्ये ‘टॅकीकार्डिया’ या कथेत निलेश मालवणकर एआयचा खुसखुशीतपणे वापर करून गंमत आणतात, तर मेघश्री दळवी यांची ‘महाअनुभव’मधील ‘सानगावकरांचा दिवस’ ही कथा एआयची झेप दाखवते. ‘हसवंती नवलकथा’ या अंकातील ‘आभासी’ ही गिरीश पळशीकर यांची एआयवर आधारलेली कथा समाजव्यवस्थेवर उत्कृष्ट भाष्य करते. चॅटजीपीटीचं चटचट लेखन बघून एआयमुळे एकूणच साहित्याचं काय होणार, यावर वर्षभर चर्चा सुरू होत्या. ‘लोकसत्ता’मध्ये मेघश्री दळवी यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रयोग मांडला आहे.

आजच्या आणि उद्याच्या पर्यावरण समस्यांना अनेक लेखकांनी विचारात घेतलेलं दिसतं. संजीव कुलकर्णी यांची ‘नवल’मधली ‘पाऊलवाटा’ ही कथा हा विषय समर्थपणे हाताळते. याच अंकातील ‘झाली शीतल भूमी’ ही श्रीनिवास शारंगपाणी यांची कथा एक चांगली कल्पना मांडते. मात्र त्या कल्पनेवरील उभारणी तितकीशी पकड घेत नाही. ‘धनंजय’मधील स्मिता पोतनीस यांची ‘बंदी’ ही कथा पर्यावरण प्रश्नामुळे बदललेलं जग आणि त्यातले सामाजिक प्रश्न यांचं चित्र उभं करते.

ढोबळ मानानं बघायला गेल्यास एक मतप्रवाह असा दिसतो की, कथा ही केवळ कथा म्हणून वाचली जावी. पण एक विचारप्रवाह असाही आहे की, विज्ञानकथा ललित असली, तरी तिला वेगळं ‘लेबल’ असण्याची गरज आहे. विज्ञानकथा नाती, भावभावना यातून माणसांच्या आयुष्यावर भाष्य करत मनोरंजन करत असली, तरी ती आणखीही बरंच काही देते. त्यातून विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांची माहिती मिळते. भविष्यविषयक जाणीवेतून आजच्या जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळतो. हे वेगळेपण कळण्यासाठी कथेला ‘लेबल’ असावं. समीक्षा आणि संशोधन यासाठीही ते उपयोगी ठरतं, पण त्यामुळे वाचक काही पूर्वग्रह करून कथा वाचायला घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीनं विज्ञानकथा वेगळी पहावी का, यावर अभ्यास व्हायला हवा.

असीम चाफळकर यांची ‘लोकमंगल मैत्र’ या अंकातली ‘नाव आहे चाललेली’ ही कथा पर्यावरणीय समस्यांमुळे काय होणार आहे, याचा वास्तववादी अनुभव देते. सोबत रूपकांचा उत्तम वापर करते. गिरीश देसाई यांची ‘राणीचा चंद्रहार’ ही ‘धनंजय’मधली कथा पर्यावरणाच्या समस्येच्या पायावर उभी आहे. अशा विषयांवर जगात अनेक ठिकाणी संशोधन होत आहे, मॉडेल्स काटेकोरपणे तपासली जात आहेत. बहुतांश माहिती ऑनलाइन किंवा ओपन जर्नल्समध्ये उपलब्ध आहे. ती चूक की बरोबर, हे तपासणाऱ्या शेकडो साइट्स आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण जागरूकता रुक्षतेनं आणता येत नाही, तेव्हा विज्ञानकथांनी भविष्यातलं यथोचित दर्शन घडवलं तर त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि म्हणूनच या व्यापक पार्श्वभूमीचा विचार कथेत व्हायला हवा आहे.

‘धनंजय’मध्ये डॉ. बाळ फोंडके यांच्या ‘हनीट्रॅप’ या कथेत डॉ. कौशिक आणि अमृतराव ही जोडगोळी गुन्हेगारांनी वापरलेली हेरगिरी करण्यासाठीची वेगळीच साधनं शोधून गुन्हेगार शोधून काढते, ते मनोरंजक आहे. असीम चाफळकर यांच्या ‘बहुरूपी’ या कथेत भविष्यातील विज्ञानाच्या प्रगतीचं एक भयानक चित्र रेखाटलेलं आहे. माणूस म्हणजे माणसासारखा दिसणारा मांसाचा गोळा. बाकी त्याच्यात त्याचं म्हणून काहीही न ठेवता त्याचा उपयोग करून घेतला जातो.

सुनील विभूते यांची याच अंकातली ‘पासवर्ड’ ही कथा हायड्रोजन इंधनाच्या उल्लेखानं आश्वासकरित्या सुरू होते. परंतु पुढे ती पारंपरिक वळण घेते. ‘मनशक्ती’तली ‘मेंदू विकत घेणे आहे’ ही निरंजन घाटे या ज्येष्ठ लेखकांची कथा त्यांच्या लौकिकाला साजेशी आगळी कल्पना मांडते. मात्र या प्रभावी कल्पनेचा अधिक विस्तार हवा होता.

विज्ञानकथांची समीक्षा पुरेशा प्रमाणात होत नाही, ही तक्रार बऱ्याचदा होते. काही मोजक्या समीक्षकांनी मराठी विज्ञानकथांवर समीक्षात्मक लेखन केलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये दिवाळी अंकात या विषयावर लेख होते. या वर्षी समीक्षा वा आढावा घेणारे लेख दिसले नाहीत. कथांसोबत येणारी रेखाटनं हीसुद्धा एक भाषा आहे. कथा, लेख लिहिताना वा कविता लिहिताना जशी अचूक शब्दयोजना करायला लागते. तशीच रेखाटनात कथेचा गाभा ओळखून पण रहस्योत्घाटन न करता वाचकाला कथेकडे आकर्षित करण्यासाठी अचूक चित्रयोजना करायला लागते. रेखाटन करणारे चित्रकार मुळात उत्तम वाचक असायला लागतात. कारण त्यांना कथा वाचकासारखी नाही, तर समीक्षकासारखी वाचावी लागते.

‘चौफेर समाचार’ या अंकातली असीम चाफळकर यांची ‘बेस्ट बायोलॉजिस्ट’ ही कथा विज्ञानकथा नसली, तरी विज्ञान आणि संशोधन याची एक बाजू समोर आणते. मात्र या कथेत सकस नाट्य हवं होतं. उज्ज्वल राणे यांच्या ‘साद’ या ‘नवल’मधली कथेत गणित, साहित्य, चित्रपट यांचे अनेकरंगी संदर्भ जमून आलेले आहेत. रूढार्थानं ती विज्ञानकथा नसेलही, हा वेगळा प्रकार ‘दिल’ आणि ‘दिमाग’, दोघांनाही चांगला भिडतो. निराळ्या विषयांमुळे किंवा ‘ट्रीटमेंट’मुळे अशा कथांमध्ये ताजेपणा नक्कीच जाणवतो.

जुन्या विषयांचं काय?

लेखक-वाचकांचं वाढतं एक्सपोजर, पर्यावरणाचे प्रश्न आणि तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती, यापुढे कदाचित कालप्रवास, एलियन, अवकाशातल्या साहसकथा हे जुने विषय बाजूला पडल्यासासारखे झाले आहेत. त्यांच्यावर आधारित काही कथा या वर्षी वाचायला मिळाल्या, पण त्यात अपेक्षित रंजन कमी पडल्याचं जाणवलं. उदाहरणार्थ, ‘नवल’मधली गजानन परब यांची ‘जस्ट हायजॅक्ड’ ही कथा. यात अवकाशात घडणारं एक हायजॅक नाट्य मांडण्याचा प्रयत्न खूपच अपुरा पडतो. ओटीटीवर वेगवान, अॅक्शन-पॅक्ड सायफाय कंटेंट पाहणाऱ्यांना तो अधिकच कच्चा वाटेल.

‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकात ‘जित्याची खोड’ ही झंपुराव तंबुवाले यांनी भाषांतर केलेली बेन बोवाची कथा आहे. विज्ञानाबाबत बरंच स्वातंत्र्य घेऊनही चंद्रावर घडणाऱ्या या कथेतलं नाट्य उभं राहू शकत नाही. उलट पदोपदी तार्किक प्रश्न पडत राहतात. ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तील ‘पेटंट’ या सुजीत पुरोहित यांच्या कथेतदेखील टेलिपोर्टेशनवरून सुरुवात होऊन पुढे भलतंच वळण लागतं,  तेव्हाही असे प्रश्न पडतात.

‘धनंजय’मधली प्रतिभा सराफ यांची ‘अधिवास’ ही कथाही रूळलेल्या विषयावर आहे. ‘पद्मगंधा’मधली कालप्रवासावर आधारित संजय भास्कर जोशी यांची ‘टाईममशीन आणि वांग्याची भाजी’ ही कथा रुळलेल्या विषयावरची काहीशी अतिरंजित कथा म्हणावी लागेल. ‘किस्त्रीम’मधली शशिकांत काळे यांची ‘धर्मराज हवा होता’ ही कथा जेनेटिक इंजिनीरिंग संकल्पनेवर आधारित आहे, पण तेवढीशी सशक्त वाटत नाही. ‘लीलाई’मधली जोसेफ तुस्कानो यांची ‘पितळ उघडे पडले’ ही कथा उडत्या तबकडीसारख्या बातम्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

तुलनेने अशा स्टँडर्ड विषयांना हटके किंवा समकालीन विषयांची जोड दिली, तर कथा थोड्या प्रमाणात खुलू शकते. गिरीश पळशीकर यांची ‘नवल’मधली ‘निर्वासित’ ही कथा या दिशेनं जाते. शेवट कमी भावनिक करून जास्त वास्तवदर्शी केला असता, तर ही कथा अधिक परिणामकारक झाली असती. रोबॉटवर मराठीत बऱ्याच कथा येऊन गेल्या असल्या, तरी ‘रणांगण’मधली ‘ग ची बाधा’ ही स्वरा मोकाशी यांची कथा एक वेगळा पैलू सादर करते.

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तील ‘कृष्ण सागराच्या उदरात’ ही असीम चाफळकर यांची कथा कृष्णविवराचा अनोखा वापर करते. याच अंकातली अंजोली पुरात यांची ‘तुझा विश्वास आहे ना माझ्यावर’ ही कथा ओळखीचा वैज्ञानिक विषय मध्यवर्ती ठेवून, त्यावर मानवी रागलोभाचा चांगला साज चढवतात. असाच अनुभव ‘पुरुष’ या निरंजन घाटे यांच्या कथेत येतो. ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या अंकातली ही खुसखुशीत कथा वरवर यंत्रमानवाची असली, तरी मानवी स्वभाव त्यात मध्यवर्ती आहे.

‘संवादसेतू’मधली ‘ताऱ्यांचा चुरा’ ही असीम चाफळकर यांची कथा ओळखीचा विषय घेते, पण त्याचं निराळं अंग समोर आणते. विज्ञानाची घोडदौड सुरू असताना अनभिज्ञ सामान्य माणूस त्यात किती प्रभावित होऊ शकतो, हे तिथं उत्तम प्रकारे दिसतं. ‘धनंजय’मधील ‘चलो रतन’ ही आशिष महाबळ यांची कथादेखील प्रभावी पार्श्वभूमी आणि काही मूलभूत प्रश्नांवरील चर्चेमुळे लक्षात राहते.

कुमारवयीन वाचकांसाठी

गेल्या तीन-चार वर्षांपासून कुमार दिवाळी अंकांमध्ये विज्ञानावर कथा असतात, ही आशादायक गोष्ट आहे. विज्ञान शिकणं वेगळं आणि त्यातला थरार साहित्यातून अनुभवणं वेगळं. या वर्षी ‘वयम’ या अंकात डॉ. बाळ फोंडके यांची ‘पाणीबाबाकी जय हो’ ही कथा विज्ञानातली गंमत आणि अंधश्रद्धेवर प्रश्न, दोन्ही कुमार वाचकापर्यंत खुबीनं पोहोचवण्यात यशस्वी होते. याच अंकात राजीव तांबे यांची ‘सीरॉम’ ही कथा कृत्रिम बुद्धिमत्ता खूप गंमतीशीर प्रकारे पेश करते. फारूक काझी यांची ‘एसपी 13’ ही कथा फॅंटसी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. अवकाशात घडणारी ही कथा त्याच प्रकारे रंजन करते.

मागील वर्षी नोंद केली होती, तशी याही वर्षी काही कथांमध्ये बरीच कृत्रिम भाषा पाहायला मिळते. दर वेळी शब्दाला शब्द असं न करता वाक्य सुटसुटीत करून नाही का लिहिता येणार? मराठीला समृद्ध करणारे काही बदल होत जाणं ठीक आहे, पण कृत्रिम शब्द वाचल्यावर आपण मूळ इंग्रजी शब्द शोधावा आणि त्यातून अर्थ समजून घ्यावा, असा द्राविडी प्राणायाम कशासाठी? तसंच देवनागरी लिपीतल्या मराठी कथेत मध्येच रोमन लिपीत इंग्रजी शब्द दिसले. कथेच्या ओघात येणारे चिनी, तामिळ, बंगाली शब्द आपण देवनागरीत लिहीत असू, तर इंग्रजी शब्दही देवनागरी लिपीत हवे. तरच खंड न पडता वाचनाचा आनंद घेता येतो.

तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात कुठकुठवर पोहोचलं आहे, याची झलक ‘छात्र प्रबोधन’ या अंकातल्या क्षितिज देसाई यांच्या ‘खबरबात घेई कुणी’ कथेतून रंगतदार पद्धतीनं मिळते. याच अंकातली स्वानंद जोशी यांची ‘भंकू आणि त्याचा चॅट जीपीटी’ ही कथा मजेशीर पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देते. ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तील ‘दुसरा इसाप’ ही सुनील सुळे यांची विज्ञान फॅंटसी कथा शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेते. ‘किशोर’मधली ‘मोबाईल गॅंग आणि परग्रहावरचे दुष्ट पाहुणे’ ही संजय भास्कर जोशी यांची विज्ञान फॅंटसीदेखील खूप धमाल झाली आहे. ‘पासवर्ड’ अंकातील ‘बेस्ट फ्रेंड’ ही मेघश्री दळवी यांची कथा अंतराळातली अॅक्शन दाखवते. या सगळ्या कथा कुमार वाचकांना अपील होतील अशा आहेत. त्यात कंटाळवाणी माहिती किंवा उपदेश नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

समीक्षा आणि रेखाटने

विज्ञानकथांची समीक्षा पुरेशा प्रमाणात होत नाही, ही तक्रार बऱ्याचदा होते. काही मोजक्या समीक्षकांनी मराठी विज्ञानकथांवर समीक्षात्मक लेखन केलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये दिवाळी अंकात या विषयावर लेख होते. या वर्षी समीक्षा वा आढावा घेणारे लेख दिसले नाहीत.

कथांसोबत येणारी रेखाटनं हीसुद्धा एक भाषा आहे. कथा, लेख लिहिताना वा कविता लिहिताना जशी अचूक शब्दयोजना करायला लागते. तशीच रेखाटनात कथेचा गाभा ओळखून पण रहस्योत्घाटन न करता वाचकाला कथेकडे आकर्षित करण्यासाठी अचूक चित्रयोजना करायला लागते. रेखाटन करणारे चित्रकार मुळात उत्तम वाचक असायला लागतात. कारण त्यांना कथा वाचकासारखी नाही, तर समीक्षकासारखी वाचावी लागते. त्याचा आस्वाद घ्यावा लागतो, आणि मग त्यांची त्यावर संस्कार करायची जबाबदारी पार पाडायची असते. आणि ती जबाबदारी सतीश खानविलकर, सतीश भावसार, भ. मा. पसावळे, रविकांत सोईतकर, सरिता बालकृष्णन, अनीश दाते अशा नव्या आणि प्रस्थापित चित्रकारांनी पार पडली आहे. 

‘धनंजय’ या प्रथितयश दिवाळी अंकाच्या संपादिका नीलिमा कुलकर्णी म्हणतात की, कथेची प्रकृती पाहून, त्याप्रमाणे त्या चित्रकाराची निवड करतात. चित्र कथेला समर्पक आणि कमीत कमी रेषांमध्ये उमटायला हवं, हे पाहतात. काही वेळा व्हिज्युअल मांडणी आणि शीर्षकलेखन एवढ्यातूनच कथेचं स्वरूप वाचकापर्यंत नेता येतं, तर काही वेळा तपशील भरलेलं रेखाटन जोडीनं लागतं. कुलकर्णी यांच्या मते मजकुराला चित्रमाध्यमाची अशी जोड मिळणं, हे दिवाळी अंकांचं वैशिष्ट्य आहे, मात्र अंकाची किंडल आवृत्ती करताना हे वैशिष्ट्य जपता येत नाही.   

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मी विज्ञानकथा का लिहितो? विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी!

यंदाच्या दिवाळी अंकातील विज्ञानकथा : वेगळी पार्श्वभूमी आणि आगळे विषय हे स्पेक्युलेटिव्ह कथांचं वैशिष्ट्य आहेच. त्या तुलनेत वेगळ्या शैलीतलं लेखन मात्र दिसलं नाही

दिवाळी अंक २०२१ : आपण ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’कडे वाटचाल करतो आहोत का?

दिवाळी अंक २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?

दिवाळी २०१९ : ‘विज्ञानकथा’ या लेबलखाली येणाऱ्या कथा खरोखरच ‘विज्ञानकथा’ म्हणाव्यात का?

आजची मराठी विज्ञानकथा कशी आहे?

..................................................................................................................................................................

काही महत्त्वाच्या नोंदी

मागील वर्षी नोंद केली होती, तशी याही वर्षी काही कथांमध्ये बरीच कृत्रिम भाषा पाहायला मिळते. दर वेळी शब्दाला शब्द असं न करता वाक्य सुटसुटीत करून नाही का लिहिता येणार? मराठीला समृद्ध करणारे काही बदल होत जाणं ठीक आहे, पण कृत्रिम शब्द वाचल्यावर आपण मूळ इंग्रजी शब्द शोधावा आणि त्यातून अर्थ समजून घ्यावा, असा द्राविडी प्राणायाम कशासाठी?

तसंच देवनागरी लिपीतल्या मराठी कथेत मध्येच रोमन लिपीत इंग्रजी शब्द दिसले. कथेच्या ओघात येणारे चिनी, तामिळ, बंगाली शब्द आपण देवनागरीत लिहीत असू, तर इंग्रजी शब्दही देवनागरी लिपीत हवे. तरच खंड न पडता वाचनाचा आनंद घेता येतो. एका कथेत पाहिलेलं नाटकातील सूचनांसारखं वर्तमानकाळातील लेखन निश्चितच खटकतं. काही वेळा असे लेखनप्रयोग विचारपूर्वक केलेले असतात, ते कथेला वेगळ्या पातळीवर नेऊ शकतात. इथं मात्र तसं झालं नाही. काही वेळा खूप जुने संदर्भ किंवा मागच्या शतकातली शैली दिसली, तेव्हाही आजच्या वाचकांचा विचार होतो आहे की नाही, असा संदेह वाटला.

प्रत्येक लेखकाची एक शैली असते. ओघवतेपणा सगळ्यांनाच पसंत पडतो, पण काही वेळा काही जणांची शैली अतिशय बालिश किंवा बाळबोध असल्याचं दिसलं. तर काही कथा वा संकल्पना लेखन खूप क्लिष्ट करतात, त्यामुळे रंजनाला हानी पोचते. आपापल्या क्षेत्रांतल्या विज्ञान संकल्पना वापरण्यावर भर दिला, तर विज्ञानकथेत नक्कीच वैविध्य येईल. विज्ञानकथेतून अंधश्रद्धा निर्मूलन होत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जाणीवपूर्वक त्यासाठी लिहिलेल्या कथेला प्रचारकी बाज येतो. मग ती विज्ञानकथा होत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

ढोबळ मानानं बघायला गेल्यास एक मतप्रवाह असा दिसतो की, कथा ही केवळ कथा म्हणून वाचली जावी. पण एक विचारप्रवाह असाही आहे की, विज्ञानकथा ललित असली, तरी तिला वेगळं ‘लेबल’ असण्याची गरज आहे. विज्ञानकथा नाती, भावभावना यातून माणसांच्या आयुष्यावर भाष्य करत मनोरंजन करत असली, तरी ती आणखीही बरंच काही देते. त्यातून विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांची माहिती मिळते. भविष्यविषयक जाणीवेतून आजच्या जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळतो. हे वेगळेपण कळण्यासाठी कथेला ‘लेबल’ असावं. समीक्षा आणि संशोधन यासाठीही ते उपयोगी ठरतं, पण त्यामुळे वाचक काही पूर्वग्रह करून कथा वाचायला घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीनं विज्ञानकथा वेगळी पहावी का, यावर अभ्यास व्हायला हवा.

२०२३च्या दिवाळी अंकांत एकंदर ४८ स्पेक्युलेटिव्ह कथा प्रकाशित झाल्या आहेत. शक्य तितक्या कथांचा आढावा घ्यावा म्हणून लेखकांनी आपल्या कथांची माहिती पाठवावी, असं आवाहन केलं होतं. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे व्यापक प्रमाणात कथांचा विचार करता आला. तरीही काही कथा राहून गेल्या असतील. काही अपवाद वगळले, तर या वर्षीच्या कथा बऱ्याच अंशी समाधान देऊन गेल्या. नवे विषय समोर आले. काही नवीन लेखक गवसले, तर काही लेखकांनी धरलेली नवी वाट आश्वासक वाटली.

.................................................................................................................................................................

लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

लेखिका स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.

potnissmita7@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......