पत्रकारच व्हायचं असं माझं काही निश्चित नव्हतं...
ग्रंथनामा - आगामी
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 30 December 2023
  • ग्रंथनामा आगामी लेखणीच्या अग्रावर Lekhanichya Agravar प्रवीण बर्दापूरकर Pravin Bardapurkar

ज्येष्ठ संपादक, लेखक, ब्लॉगर प्रवीण बर्दापूरकर यांचं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे नवीन पुस्तक लवकरच नांदेडच्या ‘आनंद मीडिया’च्या वतीनं प्रकाशित होत आहे. त्यासाठी लिहिलेलं लेखकांचं ‘खरं हे मनोगत…

............................................................................................................................................

खरं तर पत्रकारच व्हायचं, असं मी काही निश्चित केलेलं नव्हतं. बालपण ते वयाची तिशी हा माझा काळ अतिशय खडतर होता. त्यातला बराचसा विपन्नावस्थेतलाही होता. त्यातली (आजही सोबत असणारी) सुखद बाजू म्हणजे माझ्यावर वाचनाचा संस्कार माई- माझ्या आईनं केला आणि पुढे बेगम मंगलानं तो वाचनसंस्कार समृद्ध केला. बेगममुळे शब्दांना लळा कसा लावावा हे, तसंच इंग्रजी वाचनाकडे मी वळलो. माझ्या जडणघडणीत या दोन स्त्रियांना अनन्यसाधारण स्थान आहे.

पौंगढावस्थेतच मी काहीबाही लिहायला सुरुवात केली. मग कसा कोण जाणे कथालेखनाकडे वळलो. त्या कथा प्रकाशितही होऊ लागल्या. विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या ‘युगवाणी’सह काही परितोषिकंही कथांना मिळाली.

तर, तेव्हा बांधकाम आणि इमारती आणि आताच्या सार्वजनिक खात्यात रोजंदारीवर काम करत होतो, सोबतच अनेक चळवळीत सक्रिय होतो. अक्षर चांगलं असल्यानं प्रत्यक्ष कामावर न जाता कारकुनीची कामं माझ्याकडून करवून घेतली जात आणि भविष्यात रोड कारकून म्हणून नोकरी मिळण्याची शाश्वती होती. म्हणजे व्यवस्थेचा एक भाग होऊन जमेल तसा भ्रष्टाचार वगैरे करून नवीन औरंगाबादमध्ये घर बांधून आणि त्याला ‘मातृछाया’ वगैरे नाव देऊन निवृत्तीनंतरचं आयुष्य ‘सुखात’ कंठण्याची सोय नक्कीच होणार होती. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

याच दरम्यान पत्रकारितेतही माझी ‘लेखन लुडबूड’ सुरू झालेली होती. त्यातून तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या आकाशवाणीच्या औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) केंद्राच्या काही असाईनमेंट्स तत्कालीन वृत्तविभाग प्रमुख वसंतराव देशपांडे यांच्यामुळे मिळाल्या. आकाशवाणीसाठी केलेल्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद बघून पत्रकारितेकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे माझ्या कथा लेखनाला प्रसिद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, हा स्वार्थी विचारही त्यामागे होता, हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं.

वसंतराव देशपांडे यांनीच एक पत्र देऊन मला तेव्हा ‘गोमंतक’चे संपादक असलेल्या माधवराव गडकरी यांच्याकडे पणजीला पाठवलं. अशा रितीनं १९७७साली मराठी पत्रकारितेत मी प्रवेश केला; आता २०२३मध्ये त्याला ४५ वर्षे पूर्ण झाली.

पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण असं प्रवास करत १९८१ साली माझा पडाव नागपुरात पडला. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकांचा दोनच वर्षात मुख्य वार्ताहर होण्यापर्यंत मी मजलही मारली. शिवाय मंगलासोबत रविवार पुरवणीच्या कामाची अतिरिक्त जबाबदारीही माझ्याकडे होती. एकूण ठरवलं त्याप्रमाणं मजेत चाललं होतं.

अचानक माझ्या पत्रकारितेला वेगळं आणि निर्णायक वळण लावलं, ते माधव गडकरी यांनी. तेव्हा ते ‘मुंबई सकाळ’चे संपादक होते. त्यांच्यामुळेच मी मुंबई सकाळ’चा नागपूर वार्ताहर म्हणूनही काम करत होतो. एका नागपूर भेटीत माधवराव गडकरी यांनी अक्षरक्ष: रागावून कथा-कविता लेखन बंद करायला लावून राजकीय वृत्त संकलनाच्या बीटमधे माझी रवानगी केली.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पुढे माधवराव तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या ‘लोकसत्ता’ या दैनिकाचे संपादक झाले आणि माझ्या पत्रकारितेचा प्रवास  एका व्यापक अवकाशात सुरु झाला. नागपूर, मुंबई, दिल्ली अशा महत्त्वाच्या सर्व शहरात काम करण्याची संधी मिळाली. एक अर्धवेळ वार्ताहर ते ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि मग संपादक असा हा प्रवास आहे. नंतर ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचा राजकीय संपादक म्हणून नवी दिल्लीतही पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. ‘साल्सबर्ग सेमिनार’ची प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली. मराठीसोबतच हिन्दी आणि इंग्रजीतही लेखन करता आलं. केवळ देशच नव्हे, तर जगातील ४०पेक्षा जास्त देशांचे दौरे करता आले. विधीमंडळ आणि संसदेच्या कामाचंही वृत्त संकलन करता आलं.

एकूण काय तर, एक पत्रकार म्हणून माझी पोतडी गच्च भरलेली आहे. प्रांजळपणे सांगतो, पत्रकारितेचा प्रवास असा संपन्न होईल, असं माझ्या स्वप्नातही कधी आलेलं नव्हतं. हा जसा एक पत्रकार म्हणून अजूनही सुरूच असलेला माझा प्रवास आहे, तसंच ते पत्रकारितेच्या ‘मिशन टू  प्रोफेशन टू बिझिनेस’ असं झालेलं (माझ्या पिढीला अवमूल्यनात्मक तसंच वैषम्यही वाटणारं) ते स्थित्यंतरही ‘बटविन द लाईन्स’ या कथनात आहे.

माईनं ओंजळीत टाकलेल्या महात्मा गांधी यांच्यावर श्रद्धा आणि समाजवादी विचारानं भारलेला मी होतो, अजूनही आहे. पण पत्रकारिता करतांना ‘News is sacred , comment is free’ हा संस्कार माझ्या पिढीवर झालेला आहे आणि माझ्यापुरता तरी तो आजही तेवता आहे. बातमीत राजकीय भूमिका न आणल्यानं सर्वच राजकीय पक्षात माझा वैपुल्यांनं केवळ संचार राहिला नाही, तर व्यापक घनिष्ट संपर्क निर्माण झाला.

‘दिवस असे की...’ (प्रकाशक - ग्रंथाली) या माझ्या अनुभव कथनाचा हा विस्तार आहे. त्यात ‘लोकसत्ता’च्या आधीचे आणि नंतरचे म्हणजे लोकमत वृत्तपत्रसमूहातील अनुभव आलेले नव्हते. ते दिवस या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक पत्रकार समाज आणि भावजीवनातही एकाच वेळी जगत असतो. पत्रकारांनं तटस्थ असावं, हे म्हणायला सोपं असतं; दु:ख नको तुटताना, अश्रु नको वळताना, हे कवितेत शोभून दिसतं. कुणालाही प्रत्यक्ष जगताना असं वागताच येत नाही, कारण येणारे अनुभव प्रपातासारखे कोसळत असतात. त्यामुळे  भोवंडून जायला होतं. पत्रकारही त्याला अपवाद नाहीतच.

‘हिंदुत्ववादा’ला माझा विरोध असूनही त्यांच्यातील अनेकांशी जीभावाचं मैत्र निर्माण झालं. आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणा माझ्यात जन्मजात आहे, पण पत्रकारिता करताना आक्रमकता कधीच आततायीपणाकडे किंचितही झुकू न देण्यात आणि एकांगीपणा टाळण्यात मला यश आलं. त्यामुळे अनेकांशी पंगे घेऊनही संपर्क कायमच बहुस्तरीय आणि विचारिय राहिला.

सुरुवातीला डावीकडे झुकलेलं माझं लेखन नंतर  जात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून होत गेलं; ही प्रक्रिया आपसूक घडली. ज्याचं जे चांगलं आहे, त्याचं कौतुक करताना कधी संकोच वाटला नाही आणि त्याच व्यक्तीच्या न पटलेल्या निर्णयाला विरोध करताना माझा हात कधी थरथरला नाही. थोडक्यात, माझं लेखन एका अर्थानं विवेकवादी होत गेलं, असं म्हणता येईल. म्हणूनच -

‘मेत्ती मे सर्व भूदेसु

वेंरम् मझं नं केणवी!’

(या भुतलावरच्या सर्वांशी माझी मैत्री आहे, माझं कुणाशीही वैर  नाही.)

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

भाजपची हडेलहप्पी!

विधिमंडळाचं अधिवेशन ‘…नुसतंच कंदील लावणं’ होऊ नये!

निवडणूक निकालाची आकडेवारी आणि वस्तुस्थिती!

भाजपला मोठं, तर काँग्रेसला थोडंसं यश!

..................................................................................................................................................................

‘दिवस असे की...’ (प्रकाशक - ग्रंथाली) या माझ्या अनुभव कथनाचा हा विस्तार आहे. त्यात ‘लोकसत्ता’च्या आधीचे आणि नंतरचे म्हणजे लोकमत वृत्तपत्रसमूहातील अनुभव आलेले नव्हते. ते दिवस या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रत्येक पत्रकार समाज आणि भावजीवनातही एकाच वेळी जगत असतो. पत्रकारांनं तटस्थ असावं, हे म्हणायला सोपं असतं; दु:ख नको तुटताना, अश्रु नको वळताना, हे कवितेत शोभून दिसतं. कुणालाही प्रत्यक्ष जगताना असं वागताच येत नाही, कारण येणारे अनुभव प्रपातासारखे कोसळत असतात. त्यामुळे  भोवंडून जायला होतं. पत्रकारही त्याला अपवाद नाहीतच.

बेगमच्या दीर्घ आणि असाध्य आजाराला मी एक पत्रकार आणि माणूस अशा दुहेरी भूमिका साकारत सामोरं गेलो. त्या दिवसांत खूप काही शिकता आलं, म्हणून बेगम ‘जाताना’चं ते सगळं इथं समाविष्ट केलं आहे. थोडक्यात, १९७७ ते २०२१ म्हणजे बेगम मंगलाचं निधन होईपर्यंतचा हा लेखनपट आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एक स्पष्ट करतो, हे लेखन आत्मचरित्र नाही. गेल्या साडेचार दशकातील पत्रकारितेच्या काळाचं इतिहास लेखन नाही, समकालाचा तो वेध किंवा ते एक सरसकट ‘स्टेटमेंट’ नाही, कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही किंवा पत्रकारितेतील योगदानाचा तो दावा नाही. पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश टाहोही नाही, तर पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचं हे काहीसं आत्मपर प्रांजळ कथन आहे.

पुस्तकाला ‘लेखणीच्या अग्रावर’ हे नाव आमच्या कुटुंबाचे ‘मेंटर’ महेश एलकुंचवार यांनी सुचवलेलं आहे. प्रस्तावना राम जगताप याची आहे. माझ्या पिढीनंतर पत्रकारितेबद्दल समतोल दृष्टी आणि डोहखोल आकलन असणारे जे मोजके पत्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणून राम जगतापकडे मी पाहतो. म्हणूनच त्यानं प्रस्तावना लिहावी, असा माझा आग्रह होता. हे पुस्तक सिद्ध होण्यात विवेक रानडे, भाग्यश्री  बापट-बनहट्टी, अर्चना अजय जोशी, डॉ. सुरेश सावंत हे नेहमीप्रमानं सोबत आहेत. हे सर्व माझ्या जीवाभावाचे आहेत, त्यांच्या प्रती आभार कसे व्यक्त करणार?

नांदेडचे धाकटे लाडके मित्रवर्य राम शेवडीकर आणि दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’ या पुस्तकाच्या निमित्तानं पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ‘आनंद मीडिया’चा शुभारंभ माझ्याच एखाद्या पुस्तकानं व्हावा असा आनंद आणि राम शेवडीकर यांचा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ‘आनंद मीडिया’ला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

आणखी काय सांगणार?

‘लेखणीच्या अग्रावर’ - प्रवीण बर्दापूरकर,

आनंद मीडिया, नांदेड | मूल्य - ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......