‘सेक्सटॉर्शन’ हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याबद्दल पोलिसांत तक्रार करणं गरजेचं आहे
पडघम - तंत्रनामा
स्वप्निल पांगे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 December 2023
  • पडघम तंत्रनामा सेक्सटॉर्शन Sextortion

अमित (वय वर्षं २६) एका डेटिंग अ‍ॅपवर एका मुलीशी चॅटिंग करत होता. अर्थातच त्याने त्याची खरी ओळख सांगितली नव्हती आणि पलीकडील मुलगी ‘मुलगी’च आहे की नाही, हेही पडताळून पाहिलं नव्हतं. चॅटिंगच्या ओघात त्या मुलीने अमितकडे त्याच्या ‘नग्न छायाचित्रां’ची मागणी केली. त्या बदल्यात त्याला स्वत:ची काही छायाचित्रं पाठवली. मग त्याने आपलीही छायाचित्रं शेअर केली. त्यानंतर पुढच्या १०-१५ मिनिटांत त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. त्याने तो उघडताच त्याला धक्काच बसला. त्या मुलीसोबतचा त्याचा आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ होता.

अशा वेळी कोणाला सांगायचं? कसं सांगायचं? कसंही सांगितलं, तरी लोक नावं ठेवणार, आपल्या चारित्र्याविषयी शंका घेणार आणि आपलीच बदनामी होणार, म्हणून लाजेखातर तो गप्प बसला. त्याने घाबरून सुरुवातीला १० हजार, नंतर १५ हजार असं करत करत जवळ जवळ एक लाखापर्यंत रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. पण धमकी आणि भीती, काही त्याचा पिच्छा काही सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्याच्या मनात नकळतपणे आयुष्य संपवण्याचे विचार घुटमळू लागले. तो काहीही  करून आपली खासगी छायाचित्रं इंटरनेटवरून कशी काढता येतील, याचा मार्ग शोधू लागला.

या प्रकाराला ‘सेक्सटॉर्शन’ म्हणतात. यात इंटरनेटवर पीडित व्यक्तीची छायाचित्रं किंवा व्हिडिओ आक्षेपार्ह पद्धतीनं ‘मॉर्फ’ करून धमकावलं जातं आणि त्या बदल्यात खंडणी मागितली जाते. हा खंडणीचा नवा प्रकार आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एका अभ्यासानुसार करोना काळापासून जगभरात वाढत्या इंटरनेट आणि वेबकॅम वापराबरोबर, ‘सेक्सटॉर्शन’सारख्या सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जास्त करून पुरुषांना यात ओढलं जातं. त्यांना वेबकॅमसमोर लैंगिक कृत्यं करायला प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्या नकळतपणे ती ‘रेकॉर्ड’ केली जातात वा अयोग्य पद्धतीनं ‘मॉर्फ’ करून त्याचे व्हिडिओ तयार केले जातात.

बऱ्याच वेळेस पीडित व्यक्तीला याबद्दल कल्पना नसते. या डिजिटल रेकॉर्डिंग आणि छायाचित्रांचा वापर करून त्या व्यक्तीला धमकावलं जातं. पैसे न दिल्यास ती छायाचित्रं वा रेकॉर्डिंग सदर व्यक्तीच्या कुटुंब-सदस्यांना, कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना पाठवण्याची, नाहीतर इंटरनेटवर प्रकाशित करण्याची धमकी दिली जाते. हे गुन्हे जास्त प्रमाणात पोलिसांत दाखल न होण्याचं कारण म्हणजे अनेक पीडितांना हिंमत दाखवून तक्रार नोंदवण्याची लाज किंवा भीती वाटते.

काम, शिक्षण किंवा नोकरी निमित्त परगावात एकटी राहणारी, कुटुंबापासून दूर राहणारी वा सिंगल असणारी मंडळी डेटिंग अ‍ॅप्स जास्त करून वापरतात. त्याद्वारे ती अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येत असतात. अशा प्लॅटफॉर्मचा वापर लैंगिक इच्छा शमवण्यासाठी केला जातो. बऱ्याच जणांना एकटं वाटतं, जवळचं कुणी सोबत नसतं किंवा जवळची माणसं पटकन उपलब्ध नसतात, तेव्हा डेटिंग अ‍ॅपचा पर्याय सोपा वाटतो. आणि नेमकं हेच हेरून सायबर गुन्हेगार या डेटिंग अ‍ॅप्सवर आपली खंडणीची दुकानं उघडून बसलेले असतात.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

डेटिंग अ‍ॅप्स, सोशल मीडिया आणि पोर्नोग्राफी साईट्सवर वावरणाऱ्यांना ‘लक्ष्य’ करण्यासाठी सायबर गुन्हेगार तिथं ‘सुवर्ण मृगा’चं रूप धारण करून येतात. आपण सुंदर, तरुण आणि श्रीमंत असल्याचं भासवून संभाव्य ग्राहकांना ‘कॅटफिश’ करतात. म्हणजेच खोटी ओळख वापरून फसवतात. सावज ओळखून ‘सेक्स्टिंग’, म्हणजे लैंगिकरित्या उत्तेजक करणारं संभाषण वा संदेश पाठवतात. नाव बदलून आणि आकर्षक छायाचित्रं दाखवून जाळ्यात ओढतात.

कधी कधी खूप हलाखीत असल्याची बतावणी करून मदतीच्या बहाण्याने, तर कधी त्यांना तुमच्यामुळे खूप भावनिक आधार मिळाला, अशी मखलाशी करून ते तुमचा विश्वास मिळवतात. अनेकदा असं नातं आपल्याला जवळच्या मैत्रीसारखं वाटतं. परिणामी एखाद्या बेसावध क्षणी तुमच्यासोबत लैंगिक संभाषण करून एखादा व्हिडिओ कॉल किंवा खासगी छायाचित्राची मागणी केली जाते. आणि तुम्ही ते केल्याबरोबर तुम्हाला पुढच्या मिनिटाला खंडणीसाठी कॉल किंवा मेसेज येतो.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांची विशेष बाब म्हणजे पीडित आणि गुन्हेगार खऱ्या आयुष्यात कधी समोरसमोर येत नाहीत किंवा त्यांच्यात प्रत्यक्ष संवाद होत नाही. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी वैयक्तिक संपर्क नसतो. त्यामुळे त्यांचा शोध लावणं कठीण होतं.

अशा गुन्ह्यांमध्ये अपराधीपणाची भावना येऊन पीडित व्यक्ती स्वतःला मूर्ख, दोषी समजू लागते आणि त्यामुळे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक वा पोलीस यांच्याकडे मदत मागायला कचरतो. आपली अवहेलना केली जाईल, या भीतीनं जवळच्या लोकांना या गोष्टी सांगत नाहीत. परिणामी मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अशी मंडळी नैराश्येच्या गर्तेत जाऊ शकतात.

तरुण मुलामुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे की, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात वा नसलात, तरी आपली ‘खासगी’ छायाचित्रं किंवा व्हिडिओ फोनमध्ये ठेवू नयेत किंवा पार्टनरसोबत कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नयेत. त्याऐवजी प्रत्यक्ष सहवासावर भर द्यावा. समजा, ब्रेकअपच झालंच, तर ‘डिजिटल ब्रेकअप’ करणंही आवश्यक झालेलं आहे. त्यात दोघांनी एकमेकांसमोर बसून फोनमधील आपली खासगी किंवा आक्षेपार्ह छायाचित्रं आणि व्हिडिओ डिलिट करणं गरजेचं आहे.

बरीचशी माणसं प्रत्यक्ष आयुष्यात भिडस्त किंवा भित्र्या स्वभावाची असतात. त्यामुळे इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी सोशल मीडिया चॅटिंगचा पर्याय त्यांना सोपा वाटतो. काहींना असंही वाटत असतं की, डिजिटल संभाषण किंवा वर्तन हे पूर्णपणे निनावी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या वागणुकीवरचा संयम कमी होतो. ‘इथं कोण येतंय बघायला?’, ‘आपल्यातच आहे हे सगळं, बाहेर नाही कळणार कुणाला’, ‘डिलिट केलं की झालं’, अशी त्यांची समजूत होते. यातून सोशल मीडियावर अनेकदा स्वतःचं चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शन केलं जातं किंवा सतत लैंगिक कल्पनांमध्ये रममाण होतात. त्यातून त्यांच्याकडून सायबर गुन्हा घडतो किंवा ते सायबर गुन्ह्याचे बळी तरी ठरतात.

एका संशोधनानुसार अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाच्या बळी होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त असतो. कारण पुरुषांना ‘सेक्सटॉर्शन’साठी जास्त प्रमाणात सावज म्हणून पकडलं जात असावं. कदाचित पुरुषांचा ऑनलाईन वावर हा स्त्रियांपेक्षा जास्त मोकळाढाकळा असतो.

अर्थात, कोणीही ‘सेक्सटोर्शन’चा बळी बनू शकतो. बहुतेक १८ वर्षांखालील मुलं या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. बरीचशी किशोरवयीन मुलं सोशल मीडियावर इतरांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात किंवा फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात असतात. या वयात स्वतःची वेगळी ओळख बनवण्यासाठी त्यांची खटपट चालू असते. कधीकधी पालकांच्या नियमांविरुद्ध बंड करण्याच्या नादात ते इंटरनेटवर अनोळखी लोकांशी सहजपणे ‘कनेक्ट’ होतात. ही स्थिती त्यांना ‘भक्ष्य’ बनवण्यासाठी गुन्हेगारांना फायद्याची ठरते.

एका १६ वर्षांच्या मुलीने तिच्या इंटरनेटवर झालेल्या मित्राला त्याच्या आग्रहास्तव स्वतःची ‘खासगी’ छायाचित्रं शेअर केली आणि त्याने तिला ‘सेक्सटॉर्शन’च्या सापळ्यात अडकवलं. एक्सपोजर आणि हिंसाचाराच्या धमक्यांमुळे ती नैराश्येत गेली.

सेक्सटॉर्शनमध्ये गुन्हेगाराचा उद्देश फक्त खंडणी उकळणे, हा नसून बऱ्याच वेळी पीडितांना बदनाम करण्यासाठी किंवा बदल घेण्याच्या हेतूनेही त्रास दिला जातो. ‘रिवेंज पोर्नोग्राफी’चा प्रकारसुद्धा हल्ली वाढत चाललाय. बऱ्याच वेळेस रिलेशनशिपमध्ये असताना, डेटिंग करताना एकमेकांसोबत ‘खासगी’ छायाचित्रं आणि व्हिडिओ काढले जातात. पुढे ब्रेकअप झाल्यावर, ती छायाचित्रं आणि व्हिडिओ इंटरनेटवर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देणं, म्हणजेच ‘रेवेंज पोर्नोग्राफी’.

असे प्रकार आता फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यू-ट्यूब आणि बऱ्याचशा गेमिंग साईट्स वा अ‍ॅप्सवर वाढू लागले आहेत. त्यामुळे आपल्या किशोरवयीन मुलांना वेळीच सावध करायला हवं. गेमिंग आणि इंटरनेट आता लहान मुलांनाही सहज उपलब्ध होतं. ती समवयीन मुलांच्या दबावाखाली येण्याचा धोका जास्त असतो. तसंच इतर मुलांनी आपल्याला स्वीकारावं, यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे अशी मुलं इंटरनेटवरच्या लैंगिक हिंसाचाराला सहज बळी पडतात.

लहान मुलं किंवा प्रौढ माणसंच नव्हे, तर वृद्धसुद्धा ऑनलाईन किंवा सायबर लैंगिक शोषणाला बळी पडताना दिसू लागले आहेत. ६२ वर्षांच्या एका गृहस्थांना त्यांच्या व्हाट्सअ‍ॅपवर एक निनावी व्हिडिओ कॉल आला. त्यांनी तो उचलला. त्यात एक महिला स्वतःचे कापडे उतरवत होती. एकदम गांगरून त्यांनी तो व्हिडिओ कॉल कट केला, पण काही क्षणांत त्यांना एक व्हिडिओ आला, त्यात त्यांचा तो निनावी कॉल रेकॉर्डेड होता.

ते गृहस्थ खूप घाबरले. आता या वयात हे असले व्हिडिओ लोकांसमोर आले, तर आपली काय इज्जत राहील, या भीतीनं त्यांनी त्या खंडणीखोराला मागेल ती रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करायला सुरुवात केली. ती रक्कम लाखापर्यंत गेली. त्यांनी आयुष्यात जे काही कमावलं होतं, ते एका व्हिडिओमुळे गमावलं. मात्र त्यांनी वेळीच पोलिसात तक्रार केली असती, तर कदाचित नुकसान झालं नसतं. घरातल्यांना विश्वासात घेऊन खरी हकीगत सांगितली असती, तर पुढचं संकट टळलं असतं.

सेक्सटॉर्शनमध्ये गुन्हेगाराचा उद्देश फक्त खंडणी उकळणे, हा नसून बऱ्याच वेळी पीडितांना बदनाम करण्यासाठी किंवा बदल घेण्याच्या हेतूनेही त्रास दिला जातो.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

समुपदेशन म्हणजे ‘शिळोप्याच्या गप्पा’ किंवा ‘समुपदेशकाने केलेली बडबड’ नव्हे. अनेक उपचार पद्धतींसारखीच समुपदेशन हीदेखील एक उपचार पद्धत आहे!

फार कमी लोकांना हे माहिती असतं की, रागाचं नियोजन करता येतं. ते केलं, तर त्यापायी होणारं नुकसान टाळता येऊ शकतं

..................................................................................................................................................................

‘रिवेंज पोर्नोग्राफी’चा प्रकारसुद्धा हल्ली वाढत चाललाय. बऱ्याच वेळेस रिलेशनशिपमध्ये असताना, डेटिंग करताना एकमेकांसोबत ‘खासगी’ छायाचित्रं आणि व्हिडिओ काढले जातात. पुढे ब्रेकअप झाल्यावर, ती छायाचित्रं आणि व्हिडिओ इंटरनेटवर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देणं, म्हणजेच ‘रेवेंज पोर्नोग्राफी’.

त्यामुळे तरुण मुलामुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे की, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात वा नसलात, तरी आपली ‘खासगी’ छायाचित्रं किंवा व्हिडिओ फोनमध्ये ठेवू नयेत किंवा पार्टनरसोबत कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नयेत. त्याऐवजी प्रत्यक्ष सहवासावर भर द्यावा. समजा, ब्रेकअपच झालंच, तर ‘डिजिटल ब्रेकअप’ करणंही आवश्यक झालेलं आहे. त्यात दोघांनी एकमेकांसमोर बसून फोनमधील आपली खासगी किंवा आक्षेपार्ह छायाचित्रं आणि व्हिडिओ डिलिट करणं गरजेचं आहे.

चुकून तुम्ही कधी ‘सेक्सटॉर्शन’ला बळी पडलात, तर पुढील गोष्टी करा :

- घाबरून जाऊ नका. पुरावे गोळा करा, स्क्रीनशॉट घ्या. मेसेजेस आणि छायाचित्रं सांभाळून ठेवा. जिथं माहिती ऑनलाइन शेअर केली जात आहे, त्या यूआरएल (URL) लिंक्सची नोंद करून ठेवा

- खंडणी मागणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर करू नका.

- आपल्या विश्वासातल्या, जवळच्या व्यक्तीला याबाबत कल्पना द्या

- तातडीनं सायबर पोलिसांत तक्रार करावी. हा प्रकार सुरक्षित असतो.

- www.cybercrime.gove.inवर तक्रार ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येते.

- संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार करा

- त्रास देणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करा.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. म्हणून इंटरनेट किंवा डेटिंग साईट्स वापरताना खालील गोष्टींची काळजी घ्या :

- कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करू नका.

- सोशल मीडिया ‘गोपनीयता सेटिंग्ज’ वापरा.

- डेटिंग साइट्सवर टोपणनावं वापरा. तिथं सहजपणे आपली छायाचित्रं, मोबाईल नंबर किंवा पत्ता अशी संवेदनशील माहिती शेअर करू नका.

- अनोळखी लोकांच्या ‘फ्रेंड रीक्वेस्ट’ स्वीकारू नका.

- अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यास उचलू नका.

- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि तेथील फाइल्स डाउनलोड करू नका.

लक्षात घ्या, ‘सेक्सटॉर्शन’ हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याबद्दल पोलिसांत तक्रार करणं गरजेचं आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा मिळू शकते आणि पीडितांना न्याय मिळू शकतो.

‘रेस्पॉन्सिबल नेटिजम’ ही संस्था मुलं आणि महिला यांच्या इंटरनेट सुरक्षा आणि सायबर हक्कांसाठी गेली १० वर्षं सातत्यानं काम करत आहे. या संस्थेतर्फे ‘सायबर वेलनेस मोफत हेल्पलाईन’ सुरू आहे. त्यात इंटरनेटशी संबंधित गुन्हे ज्यांच्यासोबत घडले आहेत, अशा पीडितांना मानसिक, कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केलं जातं. हेल्पलाईन नंबर आहे – ७३५३१ ०७३५३.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. स्वप्नील पांगे मानसशास्त्रज्ञ असून ‘रेस्पॉन्सिबल नेटिजम’ या संस्थेत समुपदेशक विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात.

manaswapnil20@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......