भाजपला मोठं, तर काँग्रेसला थोडंसं यश!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचं बोधचिन्ह आणि राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांचे नकाशे; राहुल गांधी, काँग्रेसचं बोधचिन्ह आणि तेलंगणाचा नकाशा
  • Mon , 04 December 2023
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress राजस्थान Rajasthan मध्य प्रदेश Madhya Pradesh छत्तीसगड Chhattisgarh तेलंगणा Telangana

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुका ‘सेमी फायनल’ (उपांत्य फेरी) समजायची असेल, तर भारतीय जनता पक्षानं त्यात दणदणीत विजय संपादन केलेला आहे आणि अंतिम फेरी जिंकण्याचेही स्पष्ट संकेत दिलेले आहेत, हे मोकळेपणानं मान्य करायला हवं. पराभवाचं विश्लेषण करायला आणि त्या निमित्तानं वेगवेगळी समीकरणं मांडायला नंतर भरपूर वाव आहे.

२०१८च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, त्यादिवशी या चार राज्यांतील ६४७पैकी तब्बल ३८० जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या (नंतर मध्य प्रदेशातील काही आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेले आणि काँग्रेसला पायउतार व्हावं लागलं!) २०२३च्या विधानसभा निवडणुकीत या चार राज्यांत काँग्रेसचं एकूण संख्याबळ तेलंगणात सत्तापालट करूनही २३४ इतकं कमी झालेलं आहे.

२०१८च्या विधानसभा निवडणुकीत या राज्यांत भाजपला केवळ १९८ जागा मिळाल्या होत्या आणि या म्हणजे, आज निकाल लागलेल्या २०२३च्या निवडणुकीत भाजपचं संख्याबळ ३३८च्या आसपास जाईल, असं सध्याचं चिन्ह आहे. या चारही राज्यांत हा मजकूर लिहीत असताना भाजपच्या जागांत घसघशीत वाढ झाली आहे, तर काँग्रेसची तेलंगणा वगळता अन्य तीन राज्यांत मोठी पीछेहाट झालेली आहे. हा काही केवळ काँग्रेसलाच नाही, तर आगामी म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीलाही मतदारांनी दिलेला जोरदार धक्का आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एक लक्षात घ्यायला हवं, २०१८च्या विधानसभा निवडणुकीत या राज्यांत भारतीय जनता पक्षाची जबर पीछेहाट झाली, तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या चारपैकी तीन म्हणजे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला होता. या राज्यांत मिळून लोकसभेच्या एकूण ८२ जागा आहेत आणि त्यापैकी तब्बल ६५ जागी (राजस्थान २४, मध्य प्रदेश २८, छत्तीसगड ९ आणि तेलंगणा ४ जागी) भाजपनं विजय संपादन केलेला होता. ही विधानसभा निवडणूक जर लोकसभेची ‘सेमी फायनल’ समजायची(च) असेल, तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला यशाची खात्री या चार राज्यांनी तरी दिलेली आहे, असं म्हणायला हवं.

हा मजकूर लिहिताना हाती आलेली आकडेवारी लक्षात घेता, या विधानसभा निवडणुकीत या चार राज्यांत भाजपचं विधानसभेतील संख्याबळ कसं वाढलेलं आहे, याची आकडेवारी अशी आहे (कंसातील आकडे २०१८तील विजयाचे) - आहेत. राजस्थान ११५ (७२), मध्य प्रदेश १६६ (१०९), छत्तीसगड ५७ (१५) आणि आंध्र प्रदेश १ (९).

याउलट तेलंगणा या राज्याचा अपवाद वगळता काँग्रेसची अन्य तीन राज्यांत मोठी पीछेहाट झाली आहे. तेलंगणात गेल्या विधानसभेत काँग्रेसला १९ जागा होत्या आणि त्या वाढून ६३ झालेल्या आहेत, म्हणजेच काँग्रेसला या राज्यात सत्तास्थापनेसाठी निर्विवाद कौल मिळालेला आहे. मात्र राजस्थानात ९९वरून ७७ वर, मध्य प्रदेशात १९४ (फुटीपूर्वीचा आकडा)वरून ६३ वर आणि छत्तीसगडमध्ये ६८वरून ३३वर येताना दिसत आहे.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

ही आकडेवारी काँग्रेसलाही उमेद देणारी नाही, हे निश्चित. पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेसला परखड आत्मपरीक्षण करावं लागणार आहे, हाच याचा एक अर्थ आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाचं पाठिंब्यात रूपांतर करवून घ्यायचं असेल, तर वर्षानुवर्षे पद अडवून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे आणि ‘बलाढ्य’ भाजप व नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासही तळागाळापासून संघटित व्हावं लागणार आहे, हा या विधानसभा निवडणूक निकालाचा दुसरा एक अर्थ आहे. 

या निवडणुकीत ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ हा सामना होता असं वरवरच म्हणता येईल. ही लढत खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी अशीच होती, कारण या राज्यांत ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही राजकीय आघाड्यांतील घटक पक्षांचं स्थान ‘लिंबू-टिंबू’ असंच होतं. त्यामुळे या उपांत्य लढतीचे सामनावीर नरेंद्र मोदी आहेत, आणि या यशाने केवळ त्यांच्यासह संपूर्ण भारतीय जनता पक्ष उन्मादित झाला, तर आश्चर्य वाटायला नको.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पराभूत झाल्यावरही जो पाठिंबा कप्तान रोहित शर्मा आणि भारतीय संघाला मिळाला तसं, काही इथे राहुल गांधी यांच्याबाबत घडताना दिसलेलं आहे, असं म्हणता येणार नाही.

शेवटी-बेडकांची उपमा देण्याचा मोह आवरून सांगतो- तेलंगणात टीआरएस चंद्रशेखर आणि त्यांच्या ‘बीआरएस’ या पक्षाला मतदारांनी चांगलीच चपराक लगावली आहे. चंद्रशेखर यांचा स्वकर्तृत्वाचा त्यांनीच प्रमाणाबाहेर फुगवलेला फुगा मतदारांनी टचक्न फोडला आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......