‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल
पडघम - सांस्कृतिक
जवाहर सरकार
  • ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्यावरील पहिल्या टीव्ही मालिकांची पोस्टर्स
  • Sat , 02 December 2023
  • पडघम सांस्कृतिक रामायण Ramayan महाभारत Mahabharat

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही दोन पवित्र समजली जाणारी महाकाव्ये इतिहासावर आधारित आहेत, की निव्वळ पुराणकथा आहेत, हा नक्कीच भारताला छळणाऱ्या ज्वलंत प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. बुद्धिवाद्यांच्या आणि डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या लोकांच्या मते ही महाकाव्ये म्हणजे निव्वळ पुराणकथा आहेत, तर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ म्हणजे इतिहास नव्हे, हे मान्य करण्यास बहुसंख्य हिंदू धर्मीय तयार नाहीत. यात मध्यबिंदू कुठेच दिसत नाही. दोन्ही मते दोन ध्रुवांवर आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांची राजकीय शाखा असलेली भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संबंधित संघटनांनी भारतातील राजकीय वादाच्या केंद्रस्थानी रामाला आणून ठेवले नसते आणि त्यायोगे गांधी-नेहरूंनी जोपासलेल्या आपल्या एकसंध राष्ट्राला अस्थिर करून ठेवले नसते, तर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये ऐतिहासिक आहेत की पौराणिक, हा वाद केवळ अभ्यासकांमध्ये राहिला असता.

रामायणातील राम हा सध्याच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये एका ठरावीक ठिकाणी जन्मला होता की नव्हता, हा वादाचा एक धगधगता प्रश्न करून ठेवण्यात आला आहे. परिणामी, १९८८पासून कितीतरी हिंसक घटना या देशात घडल्या आहेत. बाबरी मशीद अगदी रामजन्मभूमीवरच बांधण्यात आल्याच्या दाव्यासह सुरू झालेल्या ‘हिंदू हक्क चळवळी’ला उदारमतवादी, तसेच सेक्युलर गटांनी विरोध केला खरा, पण त्यांना पहिल्याच फेरीत निर्णायक म्हणाव्या, अशा पराभवाला त्यांना तोंड द्यावे लागले, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसेल.

उदारमतवादी - सेक्युलर-गट किंवा भारत सरकार कोणालाही वादग्रस्त जमिनीवर ‘जैसे थे’ स्थिती राखता आली नाही आणि त्यांच्यापैकी कोणीही १९९२ साली मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर झालेल्या दंगली रोखू शकले नाहीत. त्यानंतर जवळपास दोन दशके भारतात सत्तेवर असलेल्या ‘सेक्युलर’ सरकारांच्या दीर्घ, सुस्त कार्यकाळांमध्येही परिस्थिती होती, तशीच राहिली. सांप्रदायिक पक्षांची शक्ती मात्र वाढत गेली आणि अखेरीस देश त्यांच्या हातात गेला.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

१९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतर पेटलेल्या भीषण दंगलींपासून ते २००२ साली गुजरातला होरपळून काढणान्या नृशंस जातीय दंगलींपर्यंत बरेच काही घडत असताना सौजन्यशील सत्ताधाऱ्यांचे लक्ष दुसरीकडेच होते. सांप्रदायिक शक्तींनी नाना युक्त्या वापरून न्यायालयीन खटल्यांतून स्वतःला मुक्त करून घेतले. द्वेषमूलक राजकारणाचे भूत दिवसागणीक अक्राळविक्राळ होत असतानाच त्याच्या हातात सत्तेच्या चाव्याही आल्या.

वैविध्याचा आव आणलेल्या राष्ट्राच्या दृष्टीने धर्म हा गुंतागुंतीचा, ‘मागास’ विषय होता. तर नेहरूवादी सेक्युलर आणि डाव्यांचे, उदारमतवाद्यांचे अनेकविध गट धर्माकडे जनतेला दुर्दैवाने लागलेल्या ‘अफूचे व्यसन’ म्हणून बघत होते. धर्मापासून स्वत:ला दूर करण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता का, याचा विचार आपण या लेखात करणार आहोत. हे सर्व जण धर्मापासून दूर गेल्यामुळे देवाला मानणाऱ्या विशाल जनसमुदायापासूनही दूर गेले का आणि याचा लाभ घेऊन सांप्रदायिक शक्तींनी या जनसमुदायाचा लाभ घेतला का, हेही आपण बघणार आहोत.

भारतात ‘सेक्युलॅरिझम’ ही संज्ञा अडचणीची

भारतात ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ घेतले जातात. यांपैकी पहिला ‘पाश्चिमात्य अन्वयार्थ’ आहे. यामध्ये ‘क्लिनिकल सेक्युलॅरिझम’वर भर देण्यात आला आहे. पंडित नेहरूंनी या अन्वयार्थाचा पुरस्कार केला. या संकल्पनेमध्ये धर्मापासून स्पष्ट अंतर ठेवले जाते. दुसऱ्या अर्थाला आपण ‘गांधीवादी सेक्युलॅरिझम’ म्हणू शकतो. याला सर्व धर्म आणि रूढी मान्य होत्या, पण तरीही तो पूर्णपणे तटस्थ होता. धर्म हा समाजाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या भारतासाठी नेहरूंचा सेक्युलॅरिझम अगम्य होता. आक्रमणे आणि जबरदस्तीने करण्यात आलेल्या धर्मांतराची काही उदाहरणे वगळता, भारताने गेल्या काही शतकांमध्ये धार्मिक संघर्षाचा किंवा रक्तपाताचा अनुभव घेतलेला नव्हता. तर्कबुद्धी, विज्ञान आणि प्रगतीच्या मार्गात अडथळा झालेल्या चर्चच्या म्हणजेच धर्माच्या भीषण वर्चस्वापासून मुक्त होण्याची आवश्यकता पाश्चिमात्य जगताला ज्या तीव्रतेने जाणवत होती, त्या तीव्रतेने ती भारतात म्हणूनच जाणवत नव्हती.

युरोपमधील ज्ञानशास्त्रीय परंपरेत रुजलेली धार्मिक युद्धे आपल्या मानसिक जडणघडणीमध्ये फारशी नव्हतीच, असे मार्क्सवादी इतिहासकार के.एन. पणीक्कर यांनी नमूद केले आहे. म्हणूनच तामीळनाडूतील द्रविडांची ब्राह्मणविरोधी चळवळ किंवा उत्तर भारतातील लोहियांचा समाजवाद, यांसारख्या एतद्देशीय बुद्धिवादी चळवळी जशा जनसामान्यांच्या कल्पनाविश्वावर जशी पकड घेऊ शकल्या, तशी पकड अभिजात नास्तिकवाद किंवा पाश्चिमात्यांपासून प्रेरित ‘अँटिसेप्टिक सेक्युलॅरिझम’, या संकल्पनाही घेऊ शकल्या नाहीत. एतद्देशीय चळवळी सुसंबद्ध आणि सेक्युलर राहिल्या. कारण भारतातील वास्तवाची जाण कदाचित त्यांना अधिक चांगली होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पं. नेहरूंनी नमूद केले आहे- ‘धर्म नावाने ओळखल्या जाणाऱ्या दृश्याची केवळ भारतातच नव्हे, तर अन्यत्र कुठेही मला भीती वाटते’, तसेच ‘धर्म नावाची ही संकल्पना संकुचित आणि अन्य मतांबाबत व कल्पनांबाबत असहिष्णू आहे; ती आत्मकेंद्री व अहंकारीही आहे.’ नेहरूंना गुरुस्थानी असलेल्या गांधींना मात्र धर्माचे आणि धार्मिकतेचे अजिबात वावडे नव्हते. तरीही ते पूर्णपणे सेक्युलर होते. ‘रामराज्या’सारख्या हिंदू संकल्पना गांधी राजकारणात सहजतेने वापरत होते. त्यांचे कडवे टीकाकारही कधी त्यांच्यावर ‘हिंदुत्वा’चे राजकारण केल्याचा आरोप करू धजावले नाहीत.

ओल्गा व्ही. मेझेंत्सेवा यांच्या निरीक्षणानुसार ‘त्यांच्या वसाहतवादविरोधी चळवळीने पारंपरिक हिंदू पायाभूत सत्यांची चौकट विस्तारली आणि धर्माच्या कक्षेत पूर्वी कधीही नसलेल्या नियमांची भर त्यांनी धर्मात घातली’. एखादी व्यक्ती रामायणावर किंवा कुराणावर संपूर्ण विश्वास टाकू शकते आणि तरीही ती सांप्रदायिकतेपासून स्वतःला दूर ठेवू शकते, यावर गांधींचा विश्वास होता आणि म्हणूनच ते जनतेशी अधिक सहजतेने जोडले जात होते. नेहरूंच्या डाव्या बुद्धिवादी आणि उदार लोकशाहीवादी अनुयायांनी धर्मविरोधी ‘सेक्युलॅरिझम’ची जोपासना केली आणि त्यामुळे ते हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील समर्पित अस्तिकांपासून दूर गेले.

पाच मुद्दे

रामायणातील एखादी कथा भारताला नाट्यमयरित्या मुळापासून कशी हलवून टाकू शकते आणि अवघे चित्र कसे पालटून टाकू शकते हे समजून घेण्यास इथला ‘अँटिसेप्टिक सेक्युलॅरिझम’ कसा असमर्थ होता, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांवर विचार करावा लागेल. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची मूलभूत कथा आणि नाट्यमय व्यक्तिरेखा सर्वांना माहीत आहेत, असे गृहीत धरून आपण पुढे जाऊ. आता आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे आणि भारतातील ही ‘पुराण विरुद्ध वास्तव’ विकृती अधिक समजून घेण्यासाठी काही प्रमुख मुद्द्यांचे परीक्षण करायचे आहे. या समस्येकडे बघण्यासाठी आपण या महाकाव्यांबाबतची, विशेषतः रामायणाबाबतची पाच गृहीतके समजून घेऊ.

ती थोडक्यात अशा पद्धतीने मांडली जाऊ शकतात -

१. ही महाकाव्ये खरे तर भारतीय धर्मांसाठी ‘बायबल’सारखी आहेत.

२. रामायणे अनेक आहेत आणि त्याच्या असंख्य लवचीक आवृत्त्या आहेत.

३. महाकाव्ये ही चर्चेची, स्पर्धेची आणि समावेशाची व्यासपीठे होती.

४. भारताला भौगोलिक आणि भावनिकरित्या जोडण्यात महाकाव्ये उपयुक्त ठरली.

५. महाकाव्यांच्या टीव्हीवर सादर झालेल्या आविष्कारांनी लोकांच्या कल्पनाविश्वावर गारूड केले आणि त्यामुळे राष्ट्र अस्थिर झाले.

ही महाकाव्ये नाहीत, तर भारतीय धर्मांसाठी ‘बायबल’ आहेत, या युक्तिवादाचे सार समजून घेण्यासाठी प्रत्येकाला तात्पुरते का होईना, पण या ग्रंथांकडे महाकाव्ये म्हणून बघणे थांबवावे लागेल. रामायण आणि महाभारतामध्ये महाकाव्याचा आकृतिबंध वापरण्यात आला आहे, हे खरे आहे, (रिट्झ आणि फिंकमान, २०२०) पण भारतीय महाकाव्ये ही अन्य काव्यात्मक किंवा पुराणात्मक कथनांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रतलावर आहेत.

पहिला मुद्दा म्हणजे ही महाकाव्ये वीररसाने ओतप्रोत भरलेले अलौकिक साहित्य किंवा प्राचीन वीररसयुक्त गीते नाहीत. अब्जावधी लोकांनी या महाकाव्यांना ‘दैवी ग्रंथ’ म्हणून स्वीकारले आहे. किमान दोन सहस्रके मानवातील मूल्यांच्या रक्षणकर्त्याची भूमिका अन्य कोणत्याही महाकाव्याने बजावलेली नाही. भारतीयांचा इतिहास व त्यांचा धर्म या महाकाव्यांशी आतून जोडलेले आहेत. या महाकाव्यांमधील प्रत्येक व्यक्तिरेखा हिंदूंच्या अस्तित्वामध्ये जिवंत आहे.

प्रत्यक्षात ‘वाल्मीकी रामायण’ हे एकमेव संस्कृत रामायण नाही. अनेक संस्कृत कवींनी रामायण संपूर्ण किंवा आंशिक स्वरूपात लिहिले आहे, असे जी. एस. घुर्ये यांनी स्पष्ट केले आहे. ‘अध्यात्म रामायण’ हा ब्रह्मानंद पुराणाचा भाग आहे. मात्र ‘वाल्मीकी रामायणा’प्रमाणे या रामायणात रामाकडे एक मानव म्हणून बघितले गेलेले नाही, तर त्याच्या दैवी गुणांवर भर देण्यात आला आहे. ‘योग वसिष्ठ’मध्ये संवादाच्या स्वरूपात रामायण प्रस्तुत होते, तर ‘आनंद रामायणा’मध्ये रामाच्या अखेरच्या दिवसांची कथा आहे. आपल्याकडे ‘अगस्त्य रामायण’ही आहे आणि संस्कृत पुराणांपैकी भागवत पुराणामध्येही रामायणाची कथा सांगितलेली आहे. विष्णू आणि अग्नी पुराणांमध्ये रामायण संक्षिप्त स्वरूपात येते. या महाकाव्यांच्या परंपरेचे वर्णन वेंडी डोनिजर यांनी ‘नको इतके प्रवाही’ (‘होपलेसली फ्युइड’) असे केले आहे.

मेसोपोटेमियातील जगातील सर्वांत प्राचीन महाकाव्य ‘द एपिक ऑफ गिल्गामेश’ हे अनेक सहस्रके इतिहासातून ‘हरवून’ गेले होते आणि एकोणिसाव्या शतकात त्याचा पुन्हा शोध लागला. भारतीय महाकाव्ये मात्र कधीच हरवली किंवा विसरली गेली नाहीत. ती काळासोबत अखंडपणे पुढे येत राहिली. ‘द एपिक ऑफ गिल्गामेश’मध्ये ज्या सुमेरियन संस्कृतीचे दर्शन घडते, त्याचा मागमूसही आजच्या इराक राष्ट्रात दिसत नाही आणि आजचे इराकी मुस्लीम या महाकाव्याशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाहीत.

आधुनिक काळातील ग्रीक आणि पाश्चिमात्य जगात इलियड आणि ओडिसी यांना असामान्य ठेवा समजले जात असले, तरीही ख्रिश्चन नागरी संस्कृतीत मात्र अशा मूर्तिपूजक कथांना काहीच स्थान नाही. व्हर्जिलचे ‘द एनीड’, ओव्हिडचे ‘मेटामार्फोसिस’, फिरदौसीचे ‘शाहनमेह’, इंग्रजीतील सुरुवातीची अभिजात साहित्यकृती ‘बोवुल्फ’, डाण्टेचे ‘द डिव्हाइन कॉमेडी’ आणि मिल्टनचे ‘पॅराडाइज लॉस्ट’, या सर्वांना मोलाचे स्थान आहे. महान साहित्यकृती म्हणून त्यांचा अभ्यास केला जातो. मात्र लोकांच्या आजच्या आयुष्यांवर या साहित्यकृतींचा नक्कीच प्रभाव दिसत नाही. त्यांच्यावरून दंगली वगैरे होत नाहीत.

एक धर्म म्हणून हिंदू धर्म भारतीय उपखंडात उत्स्फूर्त आणि नैसर्गिक पद्धतीने वाढत गेला. शेकडो वांशिक व एक धर्म म्हणून हिंदू धर्म भारतीय उपखंडात उत्स्फूर्त भाषिक समूहांना या धर्माने त्यांच्या वेगवेगळ्या श्रद्धा आणि दैवतांच्या उतरंडींसह सामावून घेतले. समायोजनकेंद्री हिंदू धर्माला धर्माचा मध्यवर्ती आधार म्हणून कुराणासारख्या एका पवित्र ग्रंथाची निवड करणे परवडण्याजोगे नव्हते.

ऋग्वेद किंवा उपनिषदे किंवा भगवद्गीता या ग्रंथांना मध्यवर्ती धार्मिक ग्रंथ किंवा हिंदूंचे ग्रंथ समजले जावे, अशा सूचना आधुनिक काळात अनेक धर्मसुधारकांनी केल्या आहेत. मात्र स्पष्टच सांगायचे, तर हे विद्वत्तापूर्ण साहित्य बहुतांश सामान्य हिंदूंनी वाचलेलेही नाही. नाही म्हणायला रामायण आणि महाभारत त्यांच्या परिचयाचे आहे, त्यातील गोष्टी त्यांना माहीत आहेत. महाभारत अद्याप भारतीयांच्या मनात जिंवत आहे आणि हृदयांत धडधडत आहे, असे विधान व्ही. एस. सुखटणकर यांनी महाभारताबद्दल केले आहे, आणि ते रामायणालाही लागू आहे.

विसंगती म्हणजे ही मालिका टीव्हीवर प्रदर्शित झाली ती जानेवारी १९८७ ते जुलै १९८८ या ‘सेक्युलर काँग्रेस’ सत्तेत असलेल्या काळात. १९८६ ते १९८९ या काळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांमध्ये गळ्यापर्यंत बुडालेले होते. रामायणाचे टीव्हीवरून प्रसारण करणे, हा त्या वेळी असुरक्षित झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी घेतलेला ‘राजकीय’ निर्णय होता आणि नुकत्याच हाती आलेल्या एका शक्तिशाली माध्यमाचा वापर बिनदिक्कत करण्याचा हा प्रकार होता, असे म्हटले जाते. हे महाकाव्य टीव्ही मालिकेच्या स्वरूपात बसवण्यासाठी त्याचे सांस्कृतिक मूल्य अगदीच निम्न स्तरावर नेण्यात आले.

असंख्य रामायणे

हिंदू महाकाव्यांबद्दलचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यातील अविश्वसनीय वैविध्य आणि असंख्य भाषा व आकृतिबंधांतील त्यांचा आविष्कार. इसवी सनपूर्व पहिल्या किंवा तिसऱ्या शतकातील संस्कृत भाषेतील वाल्मीकींचा ग्रंथ हा रामायणाचा मध्यवर्ती संदर्भ ग्रंथ आहे, याबद्दल साधारण सहमती आहे. हा ग्रंथ त्यापूर्वीच्या शतकांतील अनेक आख्यायिका व मजकुरांशी ताडून पाहण्यात आला आहे. या महाकाव्याचे कोणतेही मूळ स्वरूप नाही, याबाबतही विद्वानांमध्ये एकवाक्यता आहे. प्रत्येक आवृत्तीमध्ये मागून करण्यात आलेले बदल आणि प्रक्षिप्त मजकूर आहे. तरीही सत्ताधारी आणि त्यांना आव्हान देणारे, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना हे ग्रंथ उदधृत केल्यामुळे एक प्रकारची वैधता प्राप्त करणे सोपे गेले.

प्रत्यक्षात ‘वाल्मीकी रामायण’ हे एकमेव संस्कृत रामायण नाही. अनेक संस्कृत कवींनी रामायण संपूर्ण किंवा आंशिक स्वरूपात लिहिले आहे, असे जी. एस. घुर्ये यांनी स्पष्ट केले आहे. ‘अध्यात्म रामायण’ हा ब्रह्मानंद पुराणाचा भाग आहे. मात्र ‘वाल्मीकी रामायणा’प्रमाणे या रामायणात रामाकडे एक मानव म्हणून बघितले गेलेले नाही, तर त्याच्या दैवी गुणांवर भर देण्यात आला आहे. ‘योग वसिष्ठ’मध्ये संवादाच्या स्वरूपात रामायण प्रस्तुत होते, तर ‘आनंद रामायणा’मध्ये रामाच्या अखेरच्या दिवसांची कथा आहे. आपल्याकडे ‘अगस्त्य रामायण’ही आहे आणि संस्कृत पुराणांपैकी भागवत पुराणामध्येही रामायणाची कथा सांगितलेली आहे. विष्णू आणि अग्नी पुराणांमध्ये रामायण संक्षिप्त स्वरूपात येते. या महाकाव्यांच्या परंपरेचे वर्णन वेंडी डोनिजर यांनी ‘नको इतके प्रवाही’ (‘होपलेसली फ्युइड’) असे केले आहे.

वेगवेगळ्या रचनाकारांनी मूळ संस्कृत साहित्यकृतींचे भाषांतर करण्याऐवजी त्या आपल्या भागातील लोकांसाठी आपल्या भाषेत पुन्हा लिहिली असावीत, असे व्ही. व्ही. एस. अय्यर यांनी मूळ वाल्मीकी रामायणाच्या असंख्य प्रादेशिक आवृत्त्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. तामीळ भाषेतील बाराव्या शतकातील कंबन ही पहिली प्रादेशिक आवृत्ती आहे, तर तेराव्या शतकात कर्नाटकातील सुधारक जैनांनी त्यांच्या ‘कुमुदेंदू रामायणा’च्या आधाराने ब्राह्मणवादावर प्रश्न उपस्थित केले.

त्यानंतरच्या शतकात श्री रंगनाथ रामायण ही तेलुगू आवृत्ती, तसेच ‘कोथो रामायन’ आणि ‘उडिया दांडी रामायण’ या अनुक्रमे आसामी व उडिया आवृत्ती आल्या. त्यापुढील शतकात ‘बंगाली कृत्तीवासी रामायण’ लिहिले गेले. सोळाव्या शतकात रामायणाच्या प्रादेशिक भाषांतील अनेक आवृत्त्या आल्या. एक कोकणी, दोन मल्याळम, तसेच मराठी, कन्नड व उडिया भाषांतील आवृत्त्या या काळात आल्या. तुलसीदास यांचे अवधी भाषेतील ‘रामचरितमानस’ हा हिंदी भाषिक पट्ट्यातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. ‘बायबल’चीही जगभरात अनेक भाषांतरे झाली, हे तर सत्य आहे, पण त्याची अशी असंख्य वैविध्यपूर्ण रूपांतरणे झाली नाहीत. त्यात एवढ्या व्यापक स्तरावर स्थानिक आख्यायिका व संस्कृतींचे रोपण झाले नाही.

रामायण मालिकेनंतर महाभारतावरील मालिकाही प्रसारित झाली. १९८९पासून हिंदुत्ववाद्यांनी जी चळवळ सुरू केली, तिला या मालिका थेट जबाबदार नसल्या, तरी त्यामध्ये शक्तिशाली संप्रेरकांचे काम या मालिकांनी नक्कीच केले. अयोध्येतील बाबरी मशीद ज्या जागेवर आहे, ती रामजन्मभूमी असून ती मोकळी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीने लावून धरली. मशिदीच्या जागी मंदिर उभे करण्यासाठी चळवळ सुरू झाली. रामजन्मभूमी वाद खरे तर दीडेक शतकापासून उकळत होता.

चर्चा, स्पर्धा व समावेशाचे व्यासपीठ

ही दोन महाकाव्ये नेहमीच लवचीक होती आणि ‘ईशनिंदा’ ही संकल्पना भारतातील धर्मांमध्ये कधी नव्हतीच. अर्थात ‘विटंबना’ वगैरे संकल्पना आता अचानक डोके वर काढू लागल्या आहेत आणि त्यांना न्यायसंस्थेसारख्या यंत्रणा खतपाणी घालत आहेत, हेही नाकारण्याजोगे नाही. मात्र पूर्वी महाकाव्यांबाबतच्या लवचीक मानसिकतेमुळे ती चर्चा व टीका यांसाठी व्यासपीठ पुरवत होती. महाकाव्यातील एखाद्या भागाचा संदर्भ घेऊन चर्चांना वाट मोकळी करून दिली जात होती. भारतातील वैविध्यपूर्ण श्रद्धांमुळे गंभीर स्वरूपाच्या सामाजिक युक्तिवादांना व विचारमंथनाला बळ मिळत होते. ‘पावित्र्यभंगा’ची संकल्पना अधूनमधून आड येत होती.

वाल्मीकींच्या कालखंडाच्या पूर्वीही कथाकाव्याची परंपरा असल्याचे पुरावे आहेत, असे भाषातज्ज्ञ दिनेशचंद्र सेन यांनी नमूद केले आहे. हे मौखिक किंवा सादरीकरणाच्या परंपरांनाही लागू होते. भारताच्या दीर्घ परंपरेत लिखित साहित्य आणि कलांनी नेहमीच विचारांच्या संघर्षांना आवश्यक असलेला सार्वजनिक मंच पुरवला आहे आणि परस्परविरोधी कल्पनांना सामावून घेतले आहे. साहित्य आणि सादरीकरणांमधील अंगभूत ‘वैविध्य’ आणि त्यामुळे त्यांच्यात येणारी वादनिवारणाची क्षमता जेम्स हेगार्टी यांनी अधोरेखित केली आहे. संपूर्ण सहस्रकात भारतीय उपखंडामध्ये मार्गदर्शनासाठी किंवा शासनासाठी मध्यवर्ती यंत्रणा नव्हती आणि म्हणूनच या व्यवस्था किंवा समजुती सहसा महाकाव्यांभोवती गुंफल्या जात होत्या.

वाल्मीकींच्या मूळ रामायणातील सीतेच्या व्यक्तिरेखेची तुलना तुलसीदासांच्या अवधी ‘रामचरितमानस’मधील सीतेच्या व्यक्तिरेखेशी, तसेच अन्य प्रादेशिक रचनांमधील सीतेच्या व्यक्तिरेखेशी केली जाते. स्त्रीत्व, पत्नीची भूमिका आणि पुरुषप्रधान समाजातील तिची स्वायत्तता या विषयांवर तावातावाने युक्तिवाद करण्यासाठी सीतेच्या व्यक्तरेखेचा संदर्भ घेतला जातो.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या १८६०मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सीताज एग्झाइल’ या ग्रंथात सीतेच्या हक्कांबाबत, अधिकारांबाबत चर्चा करण्यात आली आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सीतेचे आयुष्य कुणाच्या खिजगणतीतही नव्हते, केवळ रामालाच सर्व महत्त्व होते. सीता ‘खऱ्या अर्थाने एक अनाथ कन्या’ होती, असे स्त्रीवादी नबनीता देव सेन यांनी जाहीर करून टाकले, तर तिच्या अग्निपरीक्षेवरून तीव्र वाद पेटले.

उत्तर प्रदेशात ३० ऑक्टोबर १९९० रोजी अडवाणी यांच्या रथयात्रेला हिंसक वळण लागले. २० हिंदुत्ववादी निदर्शक त्यात मारले गेले. परिणामी, मुस्लीमविरोधी दंगलींना तोंड फुटले. या दंगलींमध्ये पुढील पाच दिवसांत कर्नाटकात ६६ जणांचा, गुजरातमध्ये ६३ जणांचा, तर उत्तर प्रदेशात ५० जणांचा मृत्यू झाला. महाकाव्यांवर आधारित टीव्ही मालिकांचा परिणाम म्हणून 'धार्मिक भावनांचे राजकारण कसे करण्यात आले, कट्टरपंथीय हिंदूंनी भारताच्या राष्ट्रीय ओळखीची व्याख्या स्वतःच्या सोयीने करण्यासाठी महाकाव्यांमधील विश्वाचा वापर कसा केला आणि क्षणिक भावना पेटवण्यासाठी भूतकाळाचा उपयोग केल्याचे हे धडधडीत उदाहरण कसे आहे, हे सर्व बार्बरा स्टोलर मिलर यांनी १९९१ साली बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणापूर्वीच सांगितले होते. बाबरी मशीद प्रत्यक्षात उद्ध्वस्त करण्यात आली, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

‘स्त्री ही कमकुवत व पापी आहे’ या महाकाव्यात व्यक्त झालेल्या मतावर उमा चक्रवर्ती यांनी ‘ब्राह्मनिकल पॅट्रिआर्की’वर हल्ला चढवला आहे. पॉला रिचमन यांच्या ‘क्वेशनिंग रामायणाज : अ साउथ एशियन ट्रॅडिशन’ (२००१) या पुस्तकातही लिंगभेदाचे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. तेलुगू लेखिका व्होल्गा यांच्या मते सीता अद्याप जिवंत आहे, तर देवदत्त पटनायक आणि अमिश त्रिपाठी यांनी त्यांच्या विपुल लेखनाद्वारे सीतेला आधुनिक वाचकांपर्यंत पोहोचवले आहे.

तामीळनाडूमध्ये ई. व्ही. रामसामी पेरियार यांनी रामायण नाकारून ‘द्रविडी चळवळ’ उभी केली. त्यांनी रामावर दुष्ट विचार व कृत्यांचा आरोप केला आणि त्याचे आयुष्य म्हणजे मूर्तीमंत खोटेपणा, फसवणूक, लबाडी व धूर्तपणा होता, अशी टीका केली. दुसऱ्या बाजूला पेरियार यांनी रावणाचा ‘महान विद्वान, उदार, शूर योद्धा, समर्थ व अत्यंत अदबशीर’ अशा विशेषणांनी गौरव केला.

हिंदू धर्माचा इतिहास बघितला, तर तो अन्य धर्मांच्या तुलनेत कमी ताठर होता. त्यात धर्मातील अंगभूत लवचीकता व समावेशक स्वरूपामुळे विरोधाभास आणि वैविध्यांना सामावून घेणे, या धर्माला नेहमीच सोपे गेले आहे. सरसकटीकरण आणि एकशैलीकरण यामुळे हिंदू धर्म मृत्युपंथाला लागू शकतो, हे इस्लामची नक्कल म्हणून ‘धार्मिक भावना दुखावल्या’चा कांगावा करणाऱ्यांना आणि ‘ईशनिंदे’सारख्या संकल्पनांवर भर देणाऱ्यांना समजत नाही.

भारताला भौगोलिकत्या व भावनिकरीत्या जोडणारा दुवा प्रमुख व्यक्तिरेखांना भारतीय उपखंडाच्या अज्ञात प्रदेशांमध्ये सोयीस्कररित्या दीर्घकाळ ‘प्रवास’ करायला लावून अनेक भौगोलिक प्रदेशांमध्ये विखुरलेल्या लोकांना एकत्र आणल्याचा दावा या महाकाव्यांखेरीज अन्य कोणताही धार्मिक ग्रंथ करू शकणार नाही. रामायणातील १४ वर्षांच्या अरण्यकांडात सीता व लक्ष्मणासोबत राम वनवासाला जातो. महाभारतात पांडवांनाही सर्व राजेशाही सुखांचा त्याग करून १२ वर्षे स्वतःच्या बळावर वनात राहावे लागते. शिवाय, त्यांना एक वर्षासाठी ओळख लपवून म्हणजेच अज्ञातवासातही राहावे लागते. भारतातील गंगेच्या खोऱ्याच्या पलीकडील काहीशा अज्ञात प्रदेशात या प्रमुख व्यक्तिरेखांना कराव्या लागलेल्या भटकंतीचा उपयोग रचनाकारांनी या विशाल देशाच्या दुर्गम कोपऱ्यांचे वर्णन करण्यासाठी केला. या महाकाव्यांमध्ये आलेली प्रदेशांची नावे त्यानंतरच्या शतकांमध्ये खूपच उपयुक्त ठरली.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा बहुतांश भारतीयांना वास्तवाची जाणीव झाली. वर्तमानकाळातील टेलिव्हिजनसारखे एक तंत्रज्ञानात्मक उत्पादन काल्पनिक विश्वाद्वारे सनसनाटी निर्माण करून ‘भूतकाळ' जागा करू शकते हे त्यानंतर काही महिन्यांनी शेल्डन पोलॉक यांनीही स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या गंभीर स्वरूपाच्या संशोधनामध्ये अरविंद राजगोपाल यांच्या कामाचा समावेश होतो. ‘पुराणा’चे रूपांतर स्फोटक वास्तवात होत असताना आणि चार दशकांपासून जोपासलेल्या ‘वैविध्यपूर्ण सेक्युलर’ तत्त्वांचा अंत होत असताना बहुतेक भारतीय उदारमतवादी असहाय्यपणे बघत होते. कोएनराड एल्स्ट म्हणतात त्याप्रमाणे, ‘अयोध्या वादाच्या सर्वोच्च बिंदूवर अनेक सेक्युलर विचारवंत हिंदू धर्माचे शिक्षक झाले. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या विपर्यस्त हिंदू धर्मापासून वेगळा ‘खरा हिंदुत्ववाद’ ते शिकवू लागले’.

महाकाव्यात उल्लेख असलेले स्थळ ते हेच, असा दावा नक्कीच अनेक स्थळांना करता येतो आणि त्यामुळे या स्थळांना आपोआपच ‘पवित्र’ दर्जाही प्राप्त होतो. अनेक दुर्गम व अज्ञात स्थळे अशा प्रकारे भारताच्या भूगोलाला जोडली गेली आहेत. राम आणि सीता यांची नावे दिली गेलेली कित्येक ठिकाणे आहेत. मनाली किंवा मणिपूरसारखी कित्येक स्थळे या महाकाव्यांमधील नायकांशी असलेला संबंध अभिमानाने मिरवतात. अशा स्थळांवर स्थानिक पर्यटनाची भरभराट होते आणि गाइड्स या व्यक्तिरेखांशी जोडलेल्या ‘नेमक्या’ जागा आवर्जून दाखवतात.

अयोध्या किंवा नेपाळच्या दक्षिण भागातील जनकपूर, अलाहाबाद (किंवा प्रयागराज) आणि बुंदेलखंडातील चित्रकूट यांसारखी स्थळे राम किंवा सीतेच्या सुरुवातीच्या आयुष्याशी जोडलेली आहेत. त्यानंतर राम दंडकारण्याच्या वनांमधून प्रवास करतो. ही स्थळे झारखंड, छत्तीसगढ आणि ओडिशा या वर्तमानकाळातील तीन राज्यांमध्ये आहेत. मग राम पश्चिमेकडे म्हणजे पंचवटीत जातो. हे स्थळ सध्याच्या नाशिकजवळ आहे. त्यानंतर तो दक्षिणेकडे जातो. वानरांच्या प्रदेशात म्हणजे तेव्हाच्या किष्किंधेत आणि आजच्या उत्तर कर्नाटकातील हम्पीजवळ जातो.

अंजनेय पर्वत, आजच्या आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील लेपाक्षी, रामेश्वर आणि तामीळनाडूच्या आग्नेय भागाला श्रीलंकेतील मन्नार बेटाला जोडणारी रामसेतू म्हणून ओळखली जाणारी चुनखडकांची साखळी, अशी असंख्य स्थळे ‘पवित्र’ समजली जातात. यातील बहुतेक स्थळांबाबत कोणता ना कोणता वाद आहे हेही खरे. हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करणारी अनेक स्थळे आहेत. कर्नाटकातील हम्पी, महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर यांच्यापासून ते झारखंडमधील गुमला, राजस्थानातील चुरूमधील लाक्ष पर्वतापर्यंत अनेक ठिकाणांचा यात समावेश होतो. अर्थात यामुळे सर्व स्थळांवर भाविकांची गर्दी जमते आणि त्यातील बहुतेक भाविक रामायणाशी भावनिकरित्या जोडलेले असतात.

रामायणात हनुमानाच्या उड्डाणाचे अनेक प्रसंग आहेत. त्यातून भूगोलावरील पकड दिसून येते. किष्किंधा खंडातील सीतेच्या शोधादरम्यान दख्खन भागातील असंख्य नद्या आणि महत्त्वाच्या डोंगरांचा उल्लेख येतो. राम प्रत्यक्ष या ठिकाणी गेला नसला, तरी ही सर्व ठिकाणे रामायणाशी जोडली जातात. त्यामुळे आजच्या भारतातील बहुतेक राज्ये अशा प्रकारे रामायणाशी थेट संबंध जोडून घेऊ शकतात. हे ‘ऐतिहासिक दुवे’ दाखवून देणारे तपशीलवार संदर्भाभिलेख आजवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रमुख व्यक्तिरेखांनी गंगा-यमुना पट्ट्यापलीकडे केलेल्या भ्रमंतीमुळे भारताच्या अनेक कोपऱ्यांना मध्यवर्ती भागाशी जोडण्याचे काम अन्य कोणत्याही महाकाव्यांनी केलेले नाही.

रामाच्या पुनरुज्जीवनामुळे काही वर्षांतच अटल बिहारी वाजपेयी यांना देशाच्या सत्तेवर येण्यात मदत झाली, पण त्यानंतर अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा बाहेर काढला आणि वेगवेगळ्या स्तरांवर त्याचा वापर केला. हा मुद्दा हिंदू ‘मर्यादे’शी (अभिमान) जोडण्यात आला आणि याच मुद्द्यावर स्वार होऊन मोदी यांनी २०१४मध्ये अहमदाबादहून दिल्लीला झेप घेतली.

महाकाव्यांचे टीव्हीवरील आविष्कार आणि त्यांचा परिणाम धार्मिक ज्ञानाचे रूपांतर शस्त्रांमध्ये कसे होत गेले, हे समजून घेण्यासाठी आपल्याला १९८८ सालाकडे जावे लागेल. त्या वेळी केवळ आठ वर्षांच्या असलेल्या भारतीय जनता पार्टीने ‘रामायण’ या टीव्ही मालिकेच्या अमाप लोकप्रियतेवर आपली पोळी भाजून घेण्यासाठी राम हा विषय चर्चेला आणला.

यातील विसंगती म्हणजे ही मालिका टीव्हीवर प्रदर्शित झाली ती जानेवारी १९८७ ते जुलै १९८८ या ‘सेक्युलर काँग्रेस’ सत्तेत असलेल्या काळात. १९८६ ते १९८९ या काळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांमध्ये गळ्यापर्यंत बुडालेले होते. रामायणाचे टीव्हीवरून प्रसारण करणे, हा त्या वेळी असुरक्षित झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी घेतलेला ‘राजकीय’ निर्णय होता आणि नुकत्याच हाती आलेल्या एका शक्तिशाली माध्यमाचा वापर बिनदिक्कत करण्याचा हा प्रकार होता, असे म्हटले जाते.

हे महाकाव्य टीव्ही मालिकेच्या स्वरूपात बसवण्यासाठी त्याचे सांस्कृतिक मूल्य अगदीच निम्न स्तरावर नेण्यात आले. दूरदर्शनवरील रामायण ही मालिका म्हणजे महाकाव्याचे अत्यंत सरधोपट स्वरूप कसे होते आणि त्यातून केवळ भारताच्या भूतकाळाचा सर्वांना समजेल, असा लेखाजोखा कसा मांडण्यात आला होता, हे जेम्स हेगार्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर टीव्हीवर मालिकेच्या स्वरूपात आलेल्या ‘महाभारता’नेही हीच संकुचित वाट पत्करली, पण तेही अमाप लोकप्रिय झाले.

प्रदीप भट्टाचार्य यांच्या मते पुराणकथाचे सर्वात व्यापक आक्रमण टीव्हीमार्फत झाले. यामुळे भारतातील जनतेला महाकाव्यांमधील व्यक्तिरेखा त्यांच्या घरात आल्यासारख्या वाटू लागल्या. त्यांचे अन्वयार्थ अनेक होते. श्याम बेनेगल, रामानंद सागर, संजय खान आणि बी. आर. चोप्रा प्रत्येकाचा अन्वयार्थ वेगळा होता. हिंदू धर्माच्या एकजिनसीकरणाच्या आणि सोयीस्कर कृत्रिम स्वरूपातील (पॉली-पॅकिंग) प्रस्तुतीकरणाच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा अर्थ यातून लावला जाऊ शकतो. हेगार्टी यांच्या मते यामध्ये दुसरा दृष्टीकोन समजून घेण्यास खरोखर जागाच नव्हती आणि ऐतिहासिक दृष्टीकोन न पटणाऱ्या सर्वांना यातून दूर करण्यात आले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रामायण मालिकेनंतर महाभारतावरील मालिकाही प्रसारित झाली. १९८९पासून हिंदुत्ववाद्यांनी जी चळवळ सुरू केली, तिला या मालिका थेट जबाबदार नसल्या, तरी त्यामध्ये शक्तिशाली संप्रेरकांचे काम या मालिकांनी नक्कीच केले. अयोध्येतील बाबरी मशीद ज्या जागेवर आहे, ती रामजन्मभूमी असून ती मोकळी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीने लावून धरली. मशिदीच्या जागी मंदिर उभे करण्यासाठी चळवळ सुरू झाली.

रामजन्मभूमी वाद खरे तर दीडेक शतकापासून उकळत होता. ब्रिटिश सत्तेच्या काळातही यावरून मोर्चे, बाद, याचिका आणि न्यायालयीन खटले सुरू आहेत. डिसेंबर १९४९मध्ये या वादाने गंभीर वळण घेतले. मशिदीच्या आतमध्ये राम व सीतेच्या मूर्ती सापडल्या होत्या आणि हा चमत्कार असल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांनी केला होता. तेथे प्रचंड गर्दी लोटली आणि सरकारला हा संपूर्ण प्रदेश सील करावा लागला. हे प्रकरण नंतर काहीसे शमले, पण सुमारे ४० वर्षांनंतर ‘रामायण’ या मालिकेला मिळालेल्या अभूतपूर्व लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमीबाबतची कळकळ आणि धार्मिक भाव अचानक पुन्हा उफाळून आला. ‘श्रीराम’ हे नाव कोरलेल्या ‘विशेष’ विटांच्या माध्यमातून कोट्यवधी जनतेचा पाठिंबा मिळण्याची विश्व हिंदू परिषदेची युक्ती प्रचंड यशस्वी ठरली.

रामाच्या मुद्दयावरून राजकारण आणि निवडणुका

१९८९ साली भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि रामजन्मभूमीवरून निर्माण झालेल्या वादाला त्याच वेळी हिंसक स्वरूप आले. १९८९ साली दंगलींच्या ७०६ घटना झाल्या आणि त्यात १,१७४ जणांचा मृत्यू झाला, अशी नोंद ख्रिस्तोफ जॅफ्रलॉ यांनी केली आहे. (२०१० : ३५९). विश्व हिंदू परिषदेच्या या पूजन कार्यक्रमाच्या पाठोपाठ १९९० साली भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींनी ‘रामरथयात्रा’ काढली. या रथयात्रेने नक्कीच लक्षावधी लोकांना आकर्षून घेतले आणि जनतेमध्ये उन्माद (मास हिस्टेरिया) निर्माण झाला.

मुस्लिमांनी पाडून टाकलेल्या भारतभरातील मंदिरांची यादी आपल्याकडे असल्याचा दावा अरुण शौरी आणि अन्य काही जणांनी केला. डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी रामायणाची ऐतिहासिकता खोडून काढण्यासाठी विद्वत्तापूर्ण सिद्धान्त मांडले, पण त्यामुळे ते हिंदू जनतेपासून अधिकच दुरावले. उत्तर प्रदेशात ३० ऑक्टोबर १९९० रोजी अडवाणी यांच्या रथयात्रेला हिंसक वळण लागले. २० हिंदुत्ववादी निदर्शक त्यात मारले गेले. परिणामी, मुस्लीमविरोधी दंगलींना तोंड फुटले. या दंगलींमध्ये पुढील पाच दिवसांत कर्नाटकात ६६ जणांचा, गुजरातमध्ये ६३ जणांचा, तर उत्तर प्रदेशात ५० जणांचा मृत्यू झाला. महाकाव्यांवर आधारित टीव्ही मालिकांचा परिणाम म्हणून 'धार्मिक भावनांचे राजकारण कसे करण्यात आले, कट्टरपंथीय हिंदूंनी भारताच्या राष्ट्रीय ओळखीची व्याख्या स्वतःच्या सोयीने करण्यासाठी महाकाव्यांमधील विश्वाचा वापर कसा केला आणि क्षणिक भावना पेटवण्यासाठी भूतकाळाचा उपयोग केल्याचे हे धडधडीत उदाहरण कसे आहे, हे सर्व बार्बरा स्टोलर मिलर यांनी १९९१ साली बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणापूर्वीच सांगितले होते. बाबरी मशीद प्रत्यक्षात उद्ध्वस्त करण्यात आली, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

धार्मिक विद्वेषाची लाट अत्यंत तीव्र असल्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये ठामपणे सेक्युलर / उदारमतवादी भूमिका घेणाऱ्या सरकारांनाही ती हाताळणे कठीण झाले. दंगलींपासून फायदा घेण्याच्या उद्देशाने आखलेल्या व्यूहरचनेची परिणती अखेर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणात झाली. त्यानंतर फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींसारख्याच दंगली देशभर उसळल्या.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा बहुतांश भारतीयांना वास्तवाची जाणीव झाली. वर्तमानकाळातील टेलिव्हिजनसारखे एक तंत्रज्ञानात्मक उत्पादन काल्पनिक विश्वाद्वारे सनसनाटी निर्माण करून ‘भूतकाळ' जागा करू शकते हे त्यानंतर काही महिन्यांनी शेल्डन पोलॉक यांनीही स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या गंभीर स्वरूपाच्या संशोधनामध्ये अरविंद राजगोपाल यांच्या कामाचा समावेश होतो. ‘पुराणा’चे रूपांतर स्फोटक वास्तवात होत असताना आणि चार दशकांपासून जोपासलेल्या ‘वैविध्यपूर्ण सेक्युलर’ तत्त्वांचा अंत होत असताना बहुतेक भारतीय उदारमतवादी असहाय्यपणे बघत होते. कोएनराड एल्स्ट म्हणतात त्याप्रमाणे, ‘अयोध्या वादाच्या सर्वोच्च बिंदूवर अनेक सेक्युलर विचारवंत हिंदू धर्माचे शिक्षक झाले. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या विपर्यस्त हिंदू धर्मापासून वेगळा ‘खरा हिंदुत्ववाद’ ते शिकवू लागले’.

रामाच्या पुनरुज्जीवनामुळे काही वर्षांतच अटल बिहारी वाजपेयी यांना देशाच्या सत्तेवर येण्यात मदत झाली, पण त्यानंतर अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा बाहेर काढला आणि वेगवेगळ्या स्तरांवर त्याचा वापर केला. हा मुद्दा हिंदू ‘मर्यादे’शी (अभिमान) जोडण्यात आला आणि याच मुद्द्यावर स्वार होऊन मोदी यांनी २०१४मध्ये अहमदाबादहून दिल्लीला झेप घेतली.

अर्थात बाबरी मशिदीच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिर बांधण्याचा संपूर्ण अधिकार हिंदुत्ववादी पक्षाला देण्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने नोव्हेंबर २०१९मध्ये देईपर्यंत मोदी सरकारने संयम राखला. आता या जागेवर मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले आहे आणि उद्घाटन सोहळा २०२४मध्ये निवडणुकांपूर्वी होणार आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार

आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली आहे. आता या मुद्द्यांचा सारांश काढू :

अ) भारतीय महाकाव्ये ही केवळ ‘महाकाव्ये’ नाहीत; त्यामध्ये नायक व त्यांचे संघर्ष दीर्घ काव्यात्मक कथांच्या स्वरूपात आले असले तरी प्रत्यक्षात ही महाकाव्ये म्हणजे हिंदू अस्तित्वासाठी केंद्रवर्ती ग्रंथांसारखी किंवा ‘बायबल’सारखी आहेत.

ब) म्हणून महाकाव्यांना जीवाष्म स्वरूपातील पुराणकथांच्या पंगतीत बसवणे चुकीचे ठरेल. ही महाकाव्ये जिवंत आहेत, काळासोबत पुढे चालत आली आहेत आणि अन्य कोणतेही महाकाव्याच्या स्वरूपातील साहित्याला साध्य न झालेले मार्गदर्शन लोकांना करत आली आहेत.

क) वर्तमान आयुष्यावरील त्यांचा प्रभाव दुर्लक्ष करण्याजोगा किंवा डाव्या / उदारमतवाद्यांप्रमाणे तुच्छतेने बघण्याजोगा नक्कीच नाही; मानवनिर्मित कथांचा उपयोग आपल्याला हव्या त्या पद्धतीने कसा केला जाऊ शकतो, हे समजून घेण्यात अपयश आल्याने डावे / उदारमतवादी ही लढाई हरले आहेत.

ड) मानवाच्या समस्यांचा किंवा मानवी जीवनाच्या नियमांचा वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून विचार करण्यासाठी आवश्यक ते व्यासपीठ या महाकाव्यांनी रचनाकारांना तसेच कलावंतांना पुरवले आहे; त्यावर युक्तिवाद झाले आहेत आणि अनेकदा उपयुक्त उपायही निघाले आहेत.

ई) अन्य कोणत्याही महाकाव्यांच्या तुलनेत विविध भाषांमध्ये, आकृतिबंधांमध्ये या महाकाव्यांचे आविष्कार झाले आहेत.

फ) महाकाव्यांतील कथांच्या माध्यमातून, विस्तृत अशा भारतीय उपखंडातील विविध ठिकाणे व स्थळे, भौगोलिक व भावनिक अशा दोन्ही पद्धतींनी जोडली जाण्यात मदत झाली आहे.

‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल, हाच आमच्या भूमिकेचा गाभा आहे.

साधेभोळे देवभिरू लोक कधीच मुळात सांप्रदायिक नसतात. त्याचमुळे त्यांची मने वळवली जाऊ शकतात; तर बुद्धिवादी व उदारमतवादी हे कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक विद्वान व सर्जनशील आहेत. अशा प्रसंगी पुराणकथा अनर्थ घडवून आणत आहेत, म्हणून ऊर बडवत बसण्याऐवजी आपली विद्वत्ता व सर्जनशीलता यांच्या जोरावर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना जागे करण्याची वेळ आज आलेली आहे.

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या दिवाळी २०२३मधून साभार

.................................................................................................................................................................

लेखक जवाहर सरकार ‘प्रसार भारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असून सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी ‘कॉट बिटविन मिथ अँड रिअ‍ॅलिटी ए नेशन कॉल्ड इंडिया’ या शीर्षकांतर्गत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’च्या उन्हाळी २०२३ अंकाच्या ५०व्या खंडात लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद आहे.

.................................................................................................................................................................

अनुवाद - सायली परांजपे.

sayalee.paranjape@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......