आएल सीट मिळवलेल्या माझ्या शेजारच्या तरुण प्रवाशाने माझ्या हातात असलेलं मराठी पुस्तक पाहून ‘मराठी?’ असं विचारून माझं नाव विचारलं आणि आडनावही. त्याचं उत्तर दिल्यावर मलादेखील उपचारापुरतं ‘तुम्ही कुठे असता? काय करता?’ वगैरे जुजबी प्रश्न विचारणं भाग पडलं. अपेक्षेप्रमाणे त्याने ‘सिलिकॉन व्हॅली, सॉफ्टवेअर, ओरिजिनली फ्रॉम पुणे’ वगैरे सांगून लगोलग स्वतःचं नाव आणि मी विचारलं नसलं, तरी स्वतःचं आडनावही सांगून टाकलं. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तरी त्याने पुढे सांगणं चालूच ठेवलं, आणि वडिलांकडून पेशवाईत गाजलेल्या एका घराण्याशी नातं असल्याचंही सांगितलं. हे सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर अहंभाव थबथबत होता.
असा अनुभव बऱ्याचदा आलाय. आंतरराष्ट्रीय प्रवासात हातातलं मराठी पुस्तक पाहून किंवा मोबाइलवरचं मराठी बोलणं ऐकून कोणीतरी एखादा भारतीय माणूस ओळखीचं स्मितहास्य करत विचारपूस करतो. तो मराठी असला, तर हमखास स्वतचं गाव-नाव-आडनाव सांगून पुढे आपल्या घराण्यातल्या नामवंत लोकांची, नातेवाइकांची नावं सांगत, ती साखळी अगदी १८५७च्या स्वातंत्र्यसमरातल्या पूर्वजांपर्यंत नेतो.
एका फ्लाइटमध्ये माझ्या शेजाऱ्याने पानिपतला जितक्या लढाया झाल्या, तितके पेग्ज पिऊन होईपर्यंत त्याच्या पूर्वजांनी पानिपतच्या शेवटच्या लढाईत गाजवलेलं शौर्य ऐकवलं होतं! तीन लढायांनंतर पानिपतला लढाई झाली नाही, याबद्दल नियतीचे मी शाळेत आभार मानले होते, तसेच या वेळीही मानले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एकदा एका लाउंजमध्ये माझ्या हातात मराठी पुस्तक पाहून एकाने माझ्याबद्दल काहीही न विचारता स्वतःची ‘ओरिजनली फ्रॉम...’पर्यंत सर्व माहिती देऊन टाकली. पुढे त्याचे ‘ग्रेट ग्रँड फादर’ टिळकांच्या लढ्याशी ‘कनेक्टेड’ असल्याचं सांगून तो अमेरिकेत कुठल्या शहरात राहतो ते आणि तिथे ‘आपले’ बरेच लोक आहेत असं आवर्जून सांगितलं. वरून तिथे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो, असंही त्यानं ओथंबणाऱ्या अभिमानाने सांगितलं.
‘आपले लोक म्हणजे कोण?’ असं त्याला विचारल्यावर त्याच्या जातीतली सात-आठ आडनावं त्याने सांगितली. हे सारं तो मला का सांगतोय, याचं आकलन मला झालं नसलं, तरी त्याच्या ‘आपल्यात’ त्याने मला समाविष्ट केलं, यावरून माझं आडनाव त्याच्याही जातीत असावं, एवढा बोध मात्र मला झाला. मी त्याला ‘चहा घेणार का’ विचारल्यावर, “दट्स टिपिकल मराठी स्टाइल. यू नो, नॉलेज ऑफ मराठी पीपल अबाउट ब्रिव्हरेजेस इज रिस्ट्रिक्टेड टु ब्लडी टी!! चहा, दॅट्स ऑल!!” असं म्हणत तो मोठ्यांदा हसला. मग मी काही क्षण थांबून त्याला विचारलं, “टिळकांचं ‘चहा प्रकरण’ माहीत आहे का?” त्या प्रश्नाने तो काहीसा गडबडला आणि त्याने नकारार्थी मान हलवत मोबाइल स्क्रोल करायला सुरुवात केली...
शुक्लपक्षीयांचं बहिष्कारास्त्र
१८९०चा ऑक्टोबर महिना. गोपाळ विनायक जोशी (पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती) या तत्कालीन प्रागतिक विचारांच्या गृहस्थांनी पुण्यातील गुरुवार पेठेतल्या ‘पंचहौद मिशन’ या ठिकाणी एक व्याख्यान आयोजित करून, त्यासाठी लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, वि. का. राजवाडे अशा दिग्गजांसह अनेकांना निमंत्रित केलं. व्याख्यानानंतर चहापानाचा कार्यक्रम होता. त्यात टिळक-रानडे यांच्यासह अनेकांनी चहा घेतला.
नंतर ही बातमी ‘पुणे वैभव’ या दैनिकात छापून आल्याबरोबर ‘चहा पिणे, बिस्कीट खाणे’ हे धर्मबाह्य कृत्य केल्याबद्दल सनातनी खवळले. प्रथम हे ‘धर्मभ्रष्टते’चं प्रकरण शंकराचार्यांकडे नेलं गेलं, तेव्हा त्यांनी सोक्षमोक्ष लावण्यासाठी व्यंकटशास्त्री व बिंदुमाधवशास्त्री यांचं ‘ग्रामण्य कमिशन’ बसवलं. त्यांच्यासमोर वादी (सनातनी) आणि प्रतिवादी (टिळक-रानडे इत्यादी) यांनी आपापली बाजू मांडली. काही जणांनी प्रायश्चित्तही घेतलं. तथापि, पुढे या प्रायश्चित्ताबाबतदेखील वाद झाले आणि बहुसंख्य असलेल्या सनातनी मंडळींनी चहा प्यायलेल्या ४६ जणांना वाळीत (बहिष्कार) टाकलं.
‘ब्लडी टी’वाला असो की ‘पार्टी’वाला असो किंवा संपूर्ण मध्यमवर्ग ते आपापल्या पूर्वजांपैकी लोकोत्तर व्यक्तींबद्दल नुसता अभिमान बाळगत, त्यांची कीर्ती सांगत असते, तर समर्थांच्या उक्तीनुसार त्यांना ‘मूर्ख’ किंवा सध्याच्या त्यांच्याच भाषेत ‘मेंटली चॅलेंज्ड’ मानून दुर्लक्ष करून भागलं असतं. तथापि, हे सर्व लोक स्वतःच्या लोकोत्तर पूर्वजांच्या अभिमानापर्यंत थांबत नाहीत, तर ते आपल्या पूर्वजांनी केलेल्या दुष्कृत्यांना, इतरांवर केलेल्या अत्याचारांना नाकारतात, ही बाब कमालीची अनैतिक, इतरांवर अन्यायकारक ठरते.
हा बहिष्कार (तत्कालीन भाषेत: ग्रामण्य) इतका तीव्र होता की, टिळक, रानडे, गोखले प्रभृतींसकट सर्वांना ‘बाटलेले’ ठरवण्यात येऊन ‘कृष्णपक्षी’ संबोधलं जाऊ लागलं. कृष्णपक्षीयांशी संसर्ग टाळला जाऊ लागल्यामुळे त्यांच्यातल्या टिळकांसकट कोणालाही घरकाम करण्यासाठी माणसं मिळेनात. पुण्यात सनातन्यांची संख्या इतकी मोठी होती की, त्यांच्या दबावामुळे टिळकांच्या घराच्या कार्यासाठी आचारी आणि पुरोहित तयार होईनात. शेवटी शेजारपाजारच्या महिलांकडून गुपचूप जिन्नस तयार करवून आणि रानड्यांकडे आश्रित असलेल्या उपाध्यांकडून कसंबसं कार्य निभवावं लागलं.
टिळक-रानडे यांना सुधारक मानावं की नाही, हा एक मुद्दा वेगळा असला तरी, टिळक हे त्या काळी सुधारकांपैकी मानले जात, हे त्या काळचं वास्तव होतं. तशा सुधारक म्हणवले जाणाऱ्यांची संख्या (४६) ही इतकी अत्यल्प होती की, त्या सर्वांची नावंदेखील उपलब्ध आहेत. या उलट सनातनी मंडळींची संख्या सुधारकांच्या शेकडो पट होती. या प्रकरणात तिसरा पक्ष नव्हता. सुधारक नसलेल्या बहुसंख्याकांनी (सनातनी - शुक्लपक्षीयांनी) अत्यल्पसंख्याकांवर (सुधारक - कृष्णपक्षीयांवर) बहिष्कार टाकला होता.
याचा अर्थ टिळकांच्याच जातीतल्या ऐंशी टक्यांच्या वर लोकांनी टिळकांवर बहिष्कार टाकला होता. अत्युच्च वर्णीयांनी एखाद्याला धर्मभ्रष्ट ठरवून त्याच्यावर बहिष्कार टाकल्यावर अन्य जातीयांना काय संदेश गेला असेल आणि त्यांना काय करावं लागलं असेल, ते सांगणं न लगे...
‘ब्लडी टी’वाला
“तुझ्या त्या ग्रेट ‘ग्रँड’ फादरचं नाव आहे का त्या सुधारकांच्या यादीत?” मी त्या ‘ब्लडी टी’वाल्याला विचारलं, तेव्हा तो गांगरून गेला आणि ‘लेट मी चेक’ असं म्हणून मोबाइल स्क्रोल करत निघून गेला. इतिहासातल्या व्यक्तींमध्ये लोकोत्तर असलेले टिळक काही एकमेव नव्हेत. तसंच, पूर्वजांचं ‘कनेक्शन’ मिरवणारा ‘ब्लडी टी’वालाही एकटा नव्हे. आणि पूर्वजांचं कर्तृत्व मिरवणारे लोक फक्त आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रवासातच आढळतात, असं तर नव्हेच नव्हे! पूर्वजन्माचा अहोरात्र गजर करत, झेंडा रोवत फिरणारे अगदी ‘मॉर्निंग वॉक’ व्हाया ‘हाय टी’पासून पार रात्री ‘हाय टॉक’ करण्यापर्यंतच्या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आढळतात.
“माय फॅमिली हॅज बिन व्हेरी प्रोग्रेसिव्ह अॅक्चुअली, अवर कम्युनिटी इज ऑल्वेज कन्सिडर्ड टु बी प्रोग्रेसिव्ह. माय ग्रँडपा वॉज इन्व्हॉल्व्ह इन सोशल रिफॉर्म मूव्हमेंट अँड नेव्हर फॉलोड कास्ट सिस्टिम ऑर अन्टचेबिलिटी इन हिज टाइम्स, ओव्हर अँड अबौव्ह, ही सपोर्टेड फॉर एज्युकेशन ऑफ अन्टचेबल्स.” एक आयफोनयुक्त सुटावृत - चषकधारी रेकारांत मध्यमवर्गीय, एका पार्टीत त्याच्या आजोबांचं कौतुक रेकत होता.
८०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या ज्ञानेश्वरांच्या आडनावाशी असलेल्या साधर्म्याचा दाखला देत, ‘ते आमच्यापैकी’ सांगत फिरणारे शेकडो लोक सापडतात, पण ज्या शेकडो लोकांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं, ‘ते आमच्यापैकी’ असं आजतागायत कोणी सांगितलेलं नाही. याचा अर्थ, ज्यांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं, ज्यांनी सावित्रीबाईवर घाण फेकली, ज्यांनी टिळकांवर बहिष्कार टाकला आणि बाबासाहेबांवर दगडफेक केली, त्या कोणालाही कोणी वंशजच नाहीत की काय? सावित्रीबाईवर घाण फेकणाऱ्यांपासून बाबासाहेबांवर दगड फेकणाऱ्यांपर्यंत सर्व अत्याचाऱ्यांचा निर्वंश झाला काय? की ते सगळेच्या सगळे निपुत्रिक होते?
‘त्यांच्या घरून विरोध नाही झाला का त्यांना?’ त्याचं अतिरेकलेलं कौतुक ऐकून झाल्यावर मी विचारलं. ‘‘ऑफ कोर्स! एव्हरी बडी वॉज अगेन्स्ट हिम इन द फॅमिली, इन्क्लुडिंग माय ग्रेट ग्रँड फादर, यू नो. इव्हन माय ग्रँड मॉम डिडंट लाइक इट. बिकॉज दे ऑल हॅड ए फिअर दॅट द कम्युनिटी विल बॉयकॉट अवर फॅमिली... बट, माय ग्रँडपा डिडंट बॉदर अबाउट कम्युनिटी, यू नो!’’ अत्यंत गर्वाळलेल्या आवाजात सांगत त्याने टायची गाठ घट्ट केली.
‘तुमच्या कुटुंबात किती जण होते तेव्हा?’ मी विचारलं. “ओह, दॅट टाइम द इंडियन फॅमिलीज वेअर टू लार्ज, यू नो!! माय ग्रँड फादर हॅड एट सिबलिंग्ज यू नो, फोर ब्रदर्स अँड फोर सिस्टर्स - माय गॉड - अँड दॅट्स नॉट द एंड ऑफ इट - हिज फादर - आय मीन माय ग्रेट ग्रँड फादर हॅड थर्टीन ऑफ देम... वी हॅड अॅन अँसेस्टरल ओल्ड ‘वाडा’ काइंड ऑफ थिंग इन ए स्मॉल टाऊन कॉल्ड नासिक... अँड ऑल दीज फिफ्टी-सिक्स्टी पीपल युज्ड टु स्टे इन दॅट वन सिंगल ‘वाडा’ यू नो!!!” त्याने मोठ्यांदा हसत त्याचा चषक रिकामा केला.
‘नाशिक?’ मी विचारलं. ‘यस्स्स्स....नासिक!’ त्याने त्याचा चषक पुन्हा भरला आणि मलाही ‘ऑफर’ केला. त्याकडे दुर्लक्ष करत मी विचारलं, ‘मग नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता का?’ हे ऐकून तो ‘पार्टी’वालादेखील ‘ब्लडी टी’वाल्यासारखाच चपापला आणि “ओह, आय रिअली डोंट नो सच डिटेल्स, लेट मी जस्ट चेक...” असं म्हणून आयफोन स्क्रोल करायला लागला...
चहा प्रकरणाच्या ३९ वर्षांनंतरचा १९२९ सालचा ऑक्टोबर महिना. त्या काळी भारतात अस्पृश्यता पाळली जात होती आणि अस्पृश्यांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेशबंदी होती. नाशिकमधल्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या अस्पृश्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संपर्क साधून चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रवेश नाकारल्यास सत्याग्रह करावा, असं ठरवून, त्यासाठी एका समितीची स्थापना केली.
‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ असं समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. समर्थ म्हणाले, तसा ‘तो’ मूर्ख एकच असता, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. ‘सांगे पूर्वजांची कीर्ती’- तो एक ‘ब्लडी टी’वाला किंवा ‘पार्टी’वाला, असं आता राहिलेलं नसून ‘सांगे पूर्वजांची कीर्ती’- ‘तो एक अखंड मध्यम- उच्चवर्गीय-वर्णीय समाज’ असं आजचं वास्तव आहे. एवढी मोठी लोकसंख्या समर्थांच्या भाषेत ‘मूर्ख’ ठरत असेल, तर त्याचे परिणाम किती भयानक होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी...
या समितीने अस्पृश्यप्रवेशाबाबत मंदिराच्या पंच मंडळींना नोटिस पाठवली, परंतु मंदिराच्या संबंधितांनी त्या नोटिशीची दखल घेतली नाही. सबब, ३ मार्च १९३० रोजी मंदिरात प्रवेश करायचा, असं अस्पृश्यांच्या समितीने ठरवलं. परंतु आदल्या दिवसापासून मंदिराचे चारही दरवाजे बंद करून चहूबाजूला हजाराच्यावर बंदूकधारी सैनिक तैनात करण्यात आले. त्यामुळे अस्पृश्यांना प्रवेश मिळाला नाही आणि त्यांनी संपूर्ण शांततामय मार्गाने सत्याग्रह सुरू केला.
हा सत्याग्रह पुढे महिनाभर सुरूच राहिला. या दरम्यान सनातनी आणि सत्याग्रही यांच्यात चर्चा होऊन ९ एप्रिल रोजी असलेल्या रामनवमीला अस्पृश्यांनादेखील रथ ओढण्याचा अधिकार मिळेल, असं सनातनींनी मान्य केलं. त्यानुसार बाबासाहेब रामनवमीच्या दिवशी मंदिरापाशी आले. तथापि सनातन्यांनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन रथ दुसरीकडे वळवला. फसवणूक लक्षात येताच सत्याग्रहींनी रथाचा पाठलाग करून तो थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सनातन्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच दगडफेक सुरू करून सत्याग्रहींना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात अनेक अस्पृश्य जखमी झाले आणि एक मृत्युमुखी पडला.
यात बाबासाहेबांनादेखील इजा झाली. त्यानंतरही अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश तर मिळाला नाहीच, उलट अस्पृश्यांच्या शाळा सनातन्यांनी बंद केल्या. पुढे हे आंदोलन चार वर्षं सुरूच राहिलं... अखेर निरुपायाने आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी भाऊराव गायकवाडांना पत्र लिहून कळवलं, ‘मंदिरप्रवेशासाठी शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शिक्षण आणि राजकीय हक्कांसाठी वापरता यावी, म्हणून हा सत्याग्रह थांबवावा’. परिणामतः अस्पृश्यांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, तो १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावरच.
काळाराम मंदिर सत्याग्रह तर ९३ वर्षांपूर्वीचा आहे - तर्कदृष्ट्या तेव्हा दगडफेक करणाऱ्या हजारोंपैकी (जे तेव्हा विशीत असतील) काहींची मुलं वृद्धावस्थेत का होई ना, पण आज हयात असण्याची शक्यता आहे आणि अनेकांची नातवंडं आज मध्यमवयात हयात असतील. मग त्यांपैकी कोणीच अद्याप कधी का सांगितलेलं नाही, की माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी बाबासाहेबांवर दगडफेक केली होती?
सांगे पूर्वजांची कीर्ती
‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ असं समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. समर्थ म्हणाले, तसा ‘तो’ मूर्ख एकच असता, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. ‘सांगे पूर्वजांची कीर्ती’- तो एक ‘ब्लडी टी’वाला किंवा ‘पार्टी’वाला, असं आता राहिलेलं नसून ‘सांगे पूर्वजांची कीर्ती’- ‘तो एक अखंड मध्यम- उच्चवर्गीय-वर्णीय समाज’ असं आजचं वास्तव आहे.
एवढी मोठी लोकसंख्या समर्थांच्या भाषेत ‘मूर्ख’ ठरत असेल, तर त्याचे परिणाम किती भयानक होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. तथापि, सबंध उच्चभ्रू वर्ग पूर्वज‘मग्न’ झाला आहे, एवढंच वास्तवाचं पूर्ण चित्र नाही. ‘पूर्वजांची कीर्ती’ सांगताना प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट खोलवर रुतलेली आणि पक्की असते. ती म्हणजे आपले पूर्वज म्हणजेच ‘स्वजातीय’! या वर्गातले बहुतांश लोक स्वदेशाचा किंवा स्वधर्माचा अभिमान कितीही उच्चरवात गर्जून जगाला दर्शवत असले, तरी त्यांच्या मनात स्वदेशी - स्वधर्मीय हिमालयापेक्षा ‘स्वजातीय’ सह्यकडाच पूजनीय असतो, हेही एक वास्तव अलाहिदा!
प्रत्येकाकडून पूर्वजनामाचा अव्याहत गजर ऐकून प्रश्न असा पडतो की, सगळ्यांचेच पूर्वज जर इतके थोर होते, तर मग टिळकांवर बहिष्कार टाकणारे कोणाचे पूर्वज होते? आपल्या पूर्वजांचं कुठलं ना कुठलं नातं टिळक - रानडे - गोखले प्रभृतींशी जोडून, त्याचा अभिमान मिरवणारे हजारो लोक भेटले आहेत, पण आपल्या पूर्वजांनी टिळक - रानडे - गोखले यांच्याविरुद्ध धर्मभ्रष्टतेचा दावा ठोकला होता, त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता, असं सांगणारा एकही महाभाग अद्याप भेटलेला नाही, हा निव्वळ योगायोग म्हणावा का?
असा अनुभव बऱ्याचदा आलाय. आंतरराष्ट्रीय प्रवासात हातातलं मराठी पुस्तक पाहून किंवा मोबाइलवरचं मराठी बोलणं ऐकून कोणीतरी एखादा भारतीय माणूस ओळखीचं स्मितहास्य करत विचारपूस करतो. तो मराठी असला, तर हमखास स्वतचं गाव-नाव-आडनाव सांगून पुढे आपल्या घराण्यातल्या नामवंत लोकांची, नातेवाइकांची नावं सांगत, ती साखळी अगदी १८५७च्या स्वातंत्र्यसमरातल्या पूर्वजांपर्यंत नेतो.
एका फ्लाइटमध्ये माझ्या शेजाऱ्याने पानिपतला जितक्या लढाया झाल्या, तितके पेग्ज पिऊन होईपर्यंत त्याच्या पूर्वजांनी पानिपतच्या शेवटच्या लढाईत गाजवलेलं शौर्य ऐकवलं होतं! तीन लढायांनंतर पानिपतला लढाई झाली नाही, याबद्दल नियतीचे मी शाळेत आभार मानले होते, तसेच या वेळीही मानले.
टिळक आणि तत्कालीन सुधारक मंडळींची संख्या फक्त ४६ होती, तर त्यांच्यावर बहिष्कार टाकणारी सजातीय मंडळी कैक हजारांत होती. या हजारो लोकांचा तीन-चार पिढ्यांचा काळ उलटून गेल्यावरही त्यांचा एकही वारस, वंशज सापडू नये?
काळाराम मंदिर सत्याग्रह तर ९३ वर्षांपूर्वीचा आहे - तर्कदृष्ट्या तेव्हा दगडफेक करणाऱ्या हजारोंपैकी (जे तेव्हा विशीत असतील) काहींची मुलं वृद्धावस्थेत का होई ना, पण आज हयात असण्याची शक्यता आहे आणि अनेकांची नातवंडं आज मध्यमवयात हयात असतील. मग त्यांपैकी कोणीच अद्याप कधी का सांगितलेलं नाही, की माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी बाबासाहेबांवर दगडफेक केली होती?
महात्मा फुलेंना शिक्षण संस्थेसाठी जागा आणि निधी देणाऱ्यांत काही मोजके उच्चवर्णीय होते, त्यांची नावं घेत ‘ते आमच्यापैकी’ असल्याचा दावा सांगणारे अक्षरश: हजारो लोक भेटत राहतात, पण ज्या उच्चवर्णीयांनी सावित्रीबाई फुल्यांवर घाण फेकली, ‘ते घाण फेकणारे आमच्यापैकी’ असं कोणी कधी सांगितलेलं नाही.
८०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या ज्ञानेश्वरांच्या आडनावाशी असलेल्या साधर्म्याचा दाखला देत, ‘ते आमच्यापैकी’ सांगत फिरणारे शेकडो लोक सापडतात, पण ज्या शेकडो लोकांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं, ‘ते आमच्यापैकी’ असं आजतागायत कोणी सांगितलेलं नाही. याचा अर्थ, ज्यांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं, ज्यांनी सावित्रीबाईवर घाण फेकली, ज्यांनी टिळकांवर बहिष्कार टाकला आणि बाबासाहेबांवर दगडफेक केली, त्या कोणालाही कोणी वंशजच नाहीत की काय? सावित्रीबाईवर घाण फेकणाऱ्यांपासून बाबासाहेबांवर दगड फेकणाऱ्यांपर्यंत सर्व अत्याचाऱ्यांचा निर्वंश झाला काय? की ते सगळेच्या सगळे निपुत्रिक होते?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
“काळाराम माहीत नसेल तर ठीक आहे, पण तुमच्या कुटुंबात त्या काळी एकूण ५०-६० लोक होते... त्यात अस्पृश्यता न पाळणारे तुमचे आजोबा एकटे होते, हे तर बरोबर आहे ना?” होकारार्थी मान हलवत त्याचा ग्लास त्याने त्याच्या नकळत टेबलावर ठेवला. “मग त्या उरलेल्या ४९ किंवा ५९ पूर्वजांबद्दल आणि त्या अगोदरच्या सर्व पूर्वजांबद्दल तुम्हाला काय वाटतं?” मी विचारलं. त्यानं ऐकलं न ऐकल्यासारखं करत ग्लासमध्ये बर्फाचा खडा टाकला. “तुमच्या आजोबांच्या काळात तुमच्या घराण्यातल्या साधारण ५०पैकी ४९ लोक जातिभेद आणि अस्पृश्यता पाळायचे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?” मी पुन्हा विचारलं.
“आय डोंट लाइक निगेटिव्ह थिंकिंग. माय थिंकिंग इज ऑल्वेज पॉझिटिव्ह!” तो ग्लास उचलत वैतागून म्हणाला. ‘यात मी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा थिकिंग यांपैकी काहीच करत नाहीये. फक्त तुम्हीच सांगितलेल्या आकडेवारीचं गणित मांडतोय...’ त्याने दुसरीकडे पाहत हातातला ग्लास त्याच्या तोंडाला लावला. त्याने कदाचित ऐकलं नसावं म्हणून मी पुन्हा विचारलं, “घराण्यात ९८ टक्के लोक अस्पृश्यता पाळत होते, केवळ दोन टक्क्यांनी अस्पृश्यता पाळली नाही, तर तुमच्यावर तुमची ‘कम्युनिटी’ बहिष्कार टाकण्याची शक्यता होती, तर मग तुमच्या घराण्याला आणि जातीला तुम्ही प्रागतिक कसं म्हणता?” उरलेला पेग एका घोटात संपवून त्याने ग्लास दाणदिशी आपटला आणि तशीच दाणदाण पावलं टाकत निघून गेला...
असत्याचा ढळढळीत मारा
‘ब्लडी टी’वाला असो की ‘पार्टी’वाला असो किंवा संपूर्ण मध्यमवर्ग ते आपापल्या पूर्वजांपैकी लोकोत्तर व्यक्तींबद्दल नुसता अभिमान बाळगत, त्यांची कीर्ती सांगत असते, तर समर्थांच्या उक्तीनुसार त्यांना ‘मूर्ख’ किंवा सध्याच्या त्यांच्याच भाषेत ‘मेंटली चॅलेंज्ड’ मानून दुर्लक्ष करून भागलं असतं. तथापि, हे सर्व लोक स्वतःच्या लोकोत्तर पूर्वजांच्या अभिमानापर्यंत थांबत नाहीत, तर ते आपल्या पूर्वजांनी केलेल्या दुष्कृत्यांना, इतरांवर केलेल्या अत्याचारांना नाकारतात, ही बाब कमालीची अनैतिक, इतरांवर अन्यायकारक ठरते.
स्वतःच्याच घराण्यातल्या ‘प्रोग्रेसिव्ह’, ‘इन्व्हॉल्व्ह इन सोशल रिफॉर्म्स’ असलेल्या एकुलत्या एक आजोबांची कीर्ती सांगणारा हा ‘चषकधारी’, त्याचे अन्य ४९ पूर्वज आणि त्या अगोदरच्या सर्व पिढ्या दलितांवर अन्याय, शोषण करत होते, हे माहीत असूनही ते विदारक सत्य नाकारत होता आणि त्यावर कडी म्हणून त्या आजोबांच्या एकुलत्या एक उदाहरणावरून ‘अवर कम्युनिटी इज ऑल्वेज कन्सिडर्ड टू बी प्रोग्रेसिव्ह’ हे ढळढळीत असत्य तो धादान्त सत्य म्हणून मांडत होता.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सबब, दोन पिढ्या अगोदर स्वतःच्या शहरात झालेली काळाराम मंदिर सत्याग्रहींवर दगडफेक आणि तीन पिढ्या अगोदर स्वतःच्या शहरात चहा पिण्यावरून सुधारकांवर टाकलेला बहिष्कार, याबद्दलचा इतिहास माहीत नसणं, त्या काळात स्वतःच्या आजोबा-पणजोबांनी काय केलं, तो तपशील ठाऊक नसणं, हे निव्वळ अज्ञान किंवा मूर्खपणा नव्हे. कारण दगडफेक आणि बहिष्कार माहीत नसलेल्या याच उच्चभ्रूंना आपले एखादे आजोबा ‘प्रोग्रेसिव्ह’ आणि एखादे पणजोबा ‘स्वातंत्र्यलढ्याशी कनेक्टेड’ असल्याचं मात्र पक्कं माहीत असतं!
कधीतरी एका शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला गेलो असताना, सभागृहाबाहेर रेशमी कुडता - शाल- मफलर यांनी मढलेल्या आयफोनी अभिजनांच्या घोळक्यात गझनवी आणि घोरी यांनी भारतीयांवर कसे अत्याचार केले, हे कोणीतरी तावातावाने बोलत असल्याचं ऐकू आलं. तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून, मी थांबून आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर तो तोच ‘स्क्रोलू’! मला पाहून त्याने त्याचं बोलणं आवरतं घेत, आयफोन कानाला लावून कॉल आल्यासारखं भासवत निघून गेला. तो निघून गेला, तरीही तिथल्या उच्चभ्रूच्या कोंडाळ्यात घोरी- गझनवीबाबतची खमंग चर्चा चालूच राहिली. त्यात अचानक कोणीतरी चंगीजखान-तैमूरचीदेखील फोडणी दिली. गायनाचा कार्यक्रम सभागृहात चालूच होता...
मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. कारण अभिजनांचे कार्यक्रम असलेल्या बहुतांश सभागृहांबाहेर हल्ली असे अनुभव येतात. बहुतांश उच्चभूंना आपल्याच गावात आपल्याच पूर्वजांनी गेल्या हजारो वर्षांपासून आजतागायत अस्पृश्यांवर, कनिष्ठ जातींवर, विधवांवर केलेल्या अत्याचारांची खंत सोडा, माहितीही नसते. पण एक हजार वर्षांपूर्वी मुहम्मद गझनवीने आणि आठशे वर्षांपूर्वीच्या मुहम्मद घोरीने आपल्या गावापासून हजारो किलोमीटर दूर केलेल्या अत्याचारांची मात्र इत्थंभूत माहिती असते. अर्थात, ती तथाकथित ‘इत्थंभूत’ माहिती ते स्क्रोल करत असलेल्या मोबाइलच्या व्हॉट्सअॅपवर दुसऱ्या कोणीतरी उच्चभ्रूने ‘फॉरवर्ड’ केलेल्या ‘फेक न्यूज’वर आधारित असते, हेदेखील एक संलग्न वास्तव आहेच.
आज जर समर्थ असते, तर आजचा उच्चभ्रू मध्यमवर्ग पाहून ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यापुढे ‘तो एक ढोंगी’ असं सर्रास म्हणाले असते की, ‘तो एक दांभिक’ असं म्हणाले असते की, ‘तो एक कोडगा’, हे ओळखणं कठीण आहे. पण ‘तो एक मूर्ख’ नक्की म्हणाले नसते.....
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या दिवाळी २०२३मधून साभार
.................................................................................................................................................................
लेखक लोकेश शेवडे नाशिकस्थित उद्योजक आहेत.
lokeshshevde@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment