१.
शाळेला महत्त्व की कोचिंग क्लासला, हा आता सोप्पा प्रश्न झालाय. साऱ्यांना त्याचं उत्तर तोंडपाठ आहे. पूर्वी ‘ट्युशन’ वा ‘शिकवणी’ असं या प्रक्रियेचं नाव होतं. अभ्यासात काही कारणाने मागे पडलेला विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याच्या कच्छपी लागत. शक्यतो शिकवणी इंग्रजी, गणित आणि शास्त्र याच विषयांसाठी असे आणि तीही शाळेच्याच शिक्षकांकडे!
शाळेला समांतर ‘ट्युशन’व्यवस्था मी विदर्भात लहानपणी पाहिली. वरील तीन विषयांच्या शिक्षकांकडे सकाळी दोन-तीन बॅचेस आणि सायंकाळी शाळा सुटल्यावर एक-दोन बॅचेस असं दमछाक (शिक्षकाची) करणारं ज्ञानसत्र (?) सुरू असे. कदाचित कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चणचण, शाळेतील समस्या, असं काहीतरी त्या शिक्षकांना ताबडवत असावं.
आता उलट झालंय - विद्यार्थी धावताहेत आयआयटीच्या स्वप्नामागे! त्यासाठी पालक आर्थिक ताण (‘पोटाला चिमटा’ वगैरे) सहन करताहेत आणि तरुण शारीरिक-मानसिक खच्चीकरणाच्या मागे धावताहेत.
मुलाला बरं वाटत नाही आणि तो क्लासला येत नाही, हे कळल्यावर ‘कोटा फॅक्टरी’चा शिक्षक म्हणतो- “आजारी पडण्याची चैन तुम्हाला परवडणार नाही.” फळ्यावर तो आकडेवारी लिहितो- कोटामध्ये ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असलेले किती टक्के विद्यार्थी, किती जणांमध्ये ‘व्हिटामिन बी १२’ कमी वगैरे! मुलं दवाखान्यात तपासणी करून घेतात. त्यांतल्या वैभव पांडेला चक्क कावीळचे निदान होते.
शिक्षकांनी जबरदस्ती केल्यावर तो आईला कोटामध्ये बोलावतो. मग त्याची आणि मित्रांची चंगळ - रोज आईच्या हातचे जेवण. बाजारातून आईने निगुतीने आणलेली फळे! वैभव बरा झाल्यावर शिक्षक त्याला सांगतात- “आईला आता परत पाठव. तिचं काम झालं आहे. कायम थोडीच तिला इथं राहायला बोलाव, असं मी तुला सांगितलं होतं?”
आई परतते, जाताना मुलासाठी आणि त्याच्या मित्रांसाठी लाडूचा डबा ठेवून जाते. ‘श्यामच्या आई’मधील श्यामचे वडील असेच श्यामसाठी त्याच्या आईने पाठवलेले लाडू घेऊन शाळेत आलेले असतात- न सांगता. ‘वीर-जारा’मधला शाहरुख किरण खेरला म्हणतो, तसे- “जगातल्या सगळ्या आया यच्चयावत सारख्याच असतात.”
प्रेमाचे सिंचन झाल्यावर वैभव तरारतो.
आम्ही वालचंदला असताना वडील यायचे अधून-मधून! आई कधी नाही आली. आली ती एकदमच ‘कॉन्व्होकेशन’ला विद्यापीठात! वडील दिवसभर हॉस्टेलवर आणि रात्री गावातल्या त्यांच्या मित्राकडे झोपायला जात. माझ्या काही मित्रांचे ‘वरच्या ब्रॅकेट’मधील आई-वडील सांगलीला आले की, चक्क हॉटेलात राहत आणि मित्र दिवसभर त्यांच्या समवेत सैरसपाटा करत!
कोटामधील एक सर्रास प्रकार म्हणजे शिक्षकांची पळवापळवी - अर्थात चांगल्या! त्यांना खूप ‘मागणी’ असते. कोटाचा अध्याहृत नियम असा की, विद्याशाखा आयआयटीवालीच असायला हवी. हे वेगळ्या प्रकारचे ‘आरक्षण’! आयआयटीवाले कधीच ‘एक्स’ होत नाहीत, असं अभिमानाने कोटामधील शिक्षक सांगतो.
मी रायपूरला असताना एकदा एआयसीटीई व्हिजिटच्या आधी (‘इलिजिबल स्टाफ’ची कमतरता असल्याने) आमच्या इंजिनिअरिंग शाखेमध्ये असेच शिक्षक पळवापळवी प्रकरण झाले होते. स्पर्धक (?) महाविद्यालयाकडून एका रात्रीत चार ज्येष्ठ प्राध्यापक (पीएच.डी.) आयात करण्यात आले. यथावकाश (काम झाल्यावर) ते त्यांच्या मातृसंस्थेत परतले.
कोटा फॅक्टरीत या पळवापळवीला रूप दिलंय ‘संगीत खुर्ची’चं. एका क्लासमधील शिक्षक सोडून गेला की, हुशार (?) संस्थाचालक लगेच त्याच्या बदली शेजारच्या क्लासमधील शिक्षक पळवतात आणि तो क्लास मग आणखी वेगळ्या! कोटामध्ये अनेक कोचिंग क्लासेस असल्याने हे सत्र कायम सुरू असतं!
मध्यंतरी विदर्भात एका व्याख्यानाला गेलो असता, तेथील संयोजक म्हणाले- “अहो, आमच्या क्लाससाठी आम्ही मुंबई आयआयटीची फ्रेश पोरं लाख-दीड लाख रुपये महिना पगार देऊन इथे आणतो. इथल्या पोरांना त्यांची क्रेझ असते. त्यामुळे आमच्या अॅडमिशन्स चांगल्या होतात.” (विदर्भात पुण्या/मुंबई इतका पगार? आणि रोज तिकडची ‘फ्रेश पब्लिक’ पुण्या-मुंबईला नोकरीसाठी येते. मला काही ‘टोटल’ लागेना.)
“टिकतात का हो ही मंडळी? सो कॉल्ड ‘क्रीम ऑफ सोसायटी’?”
“नाही हो, विदर्भातील उकाडा, मुंबई-पुण्यात असलेलं/मिळणारं आयुष्य इथं नसतं ना? फार तर सहा-सात महिने टिकतात.”
शाळेला ‘समांतर यंत्रणा’ असलेली विदर्भातील ‘फॅक्टरी’ आता चक्क कोटात सुरू झालीय. सहा-सात आकडी पगार आणि त्यामुळे मागणी जास्त!
शिक्षकी पेशाला (किमान कोचिंग क्लासवाल्या) केवढी मागणी? आमच्या महाराष्ट्रात शिक्षकांचे पगारही वेळेवर होत नाहीत!
अगदी आयआयटीतून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीलाही कोटामध्ये खूप मागणी! त्याला (आयआयटीवाला असला म्हणून काय झालं?) शिकवता येत नाही, म्हणून मुलं संस्थाचालकांकडे तक्रार करतात.
हे आम्ही लहानपणी भुसावळला असताना आधीच केलेलं! शाळेच्या शिक्षकांना शिकवता येत नाही, म्हणून आम्ही चक्क त्या काळी मुख्याध्यापकांकडे गेलो होतो. त्यांचा मुलगा आमचा वर्गमित्र. तोही या प्रकरणात आमचा साथीदार! मग आम्हांला अधिक चेव चढला नसेल, तर नवलच! अपेक्षेप्रमाणे भुसावळसारखं कोटालाही काही होत नाही.
एक अफलातून प्रसंग. एक क्लास सोडून दुसऱ्या क्लासकडे जाताना (तेही शिक्षकानं समजवल्यावर) वैभव कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून सरांच्या घरी भेटवस्तू घेऊन जातो. जितूदादा (विद्यार्थीप्रिय शिक्षक) त्याला म्हणतात-
“चल आतमध्ये, तुला काहीतरी दाखवतो.”
आतल्या कपाटात असंख्य किमती भेटवस्तू! जितूदादा मुलांच्या नावांची आणि त्यांच्या भेटवस्तूंची जंत्री वैभवला ऐकवतो.
“बापाच्या पैशातून गिफ्ट घेऊन आलायस होय रे? तुझ्या स्व-कमाईतून भेटवस्तू आण - या सगळ्यांसारखी. मग मी स्वीकारेन.”
रायपूरचे निलेश सोनी, स्नेहा राठी, रिया चोरडिया या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांची मला आठवण आली. त्यांनीही मला स्वतःच्या पहिल्या पगारातून पुस्तकं/भेटवस्तू दिल्या-माझ्यावरील प्रेमाचं प्रतीक म्हणून!
शिक्षक या पेशाच्या वाट्यालाच असं निर्व्याज प्रेम येत असावं बहुधा.
२.
तारुण्याचे सांगाडे कोटाच्या उत्खननात आढळतात. शिक्षण कोणीही मनापासून, आनंदानं घेताना आढळत नाही. सगळे एका ध्येयाच्या मागे लागलेले. त्यामुळे यशापयशाची व्याख्या नव्या भाषेत सोपी- ‘ ‘क्रॅक’ केली का एंट्रन्स? मग गंगेत घोडे न्हाले!’ पण त्यांची टक्केवारी किती, याचा विचार ना पालक करत ना परीक्षार्थी! क्लासवाल्यांना मी दोष देत नाही, कारण ‘बकरे’ आपणहून त्यांच्या तावडीत सापडतात, अगदी शोधत शोधत येतात! मग कोटा फॅक्टरीतला रिक्षावाला त्यांचा गाईड बनतो आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसवर फिरवून आणतो. आम्हीही आजकाल प्रवेशाच्या वेळी ‘पर्याय (ऑप्शन्स) देतो- “तू नहीं तो और सही!” पण कोट्याहून रिकाम्या हातानं परतणार नाही. कोटा हे शहर आता देश-विदेशात नावाजलं गेलं आहे - शिक्षणाच्या पर्यायांबद्दल, सॉरी, क्लासच्या पर्यायांबद्दल!
पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध ‘अमृततुल्य’ची जागा जशी ‘सायबा’, ‘येवले’ अशा साखळी-उद्योगांनी घेतली, तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी ‘कोचिंग क्लासेस’ आले. या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे महाराष्ट्रात सर्वप्रथम ‘चाटे’ निघाले... आणि आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत.
गावोगावी अशा फॅक्टऱ्या सुरू आहेत- कोटा त्यातील अग्रणी एवढंच! बाकी हे सर्वदूर शहरांच्या शरीरात खोलवर पसरलंय. घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. इथं प्रत्येक ‘ईशान अवस्थी’ला निकुंभ सर भेटत नाही! दिवस-रात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथं मुलं शैत्रणिक अॅपवरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधूनमधून प्रयोग करायला जातात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कुठून उरणार? आणि तसंही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच. माझ्या मुलाने बारावीत पुण्यातील एका प्रथितयश महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर, त्याचे सर त्याला म्हणाले होते- “क्लास लावालच तुम्ही सगळ्या विषयांचा, मग इथं शिकवायची गरज काय?”
‘काला पत्थर’मधील नीतू सिंग जशी कोळसा खाणींच्या परिसरात सौभाग्याची स्वप्नं विकत फिरत असते, तसे हे क्लासेस आयआयटी आणि मग स्पर्धापरीक्षा JEE, NEET, TOFEL, GRE, OLYMPIAD, अशी काहीबाही स्वप्नं तरुणांच्या डोळ्यात पेरत असतात - क्वचितच खरी होणारी...!
आम्ही नशीबवान- एफवाय बीएस्सी झालो आणि मेरिटच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झालो. त्या काळी महाविद्यालयं कमी होती, संधी कमी असायच्या आणि पर्यायही मर्यादित! स्पर्धा त्या काळीही होती, पण स्पर्धा परीक्षा नव्हत्या. एकतर व्यावसायिक महाविद्यालयात सरळ प्रवेश किंवा नाही. अनेक परीक्षांच्या मांडवांखालून जायचे नाही की, पुन्हापुन्हा ‘अटेम्प्ट’ करायचे नाहीत.
मी एफवायला असताना भौतिकशास्त्र आणि गणित अशा दोन शिकवण्या लावल्या. तिसरा विषय रसायनशास्त्र तुलनेत सोपा, त्यामुळे वर्गात बसून समजायचा. ४००पैकी (गणिताला प्रॅक्टिकल्स नसायची) मार्क्स मिळवायचे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश. तिथंही सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल एवढेच पर्याय! किती सोपं होतं सारं! (आणि बाहेर पडण्यापूर्वी ‘कॅम्पस प्लेसमेंट’, म्हणजे तीही काळजी नाही!).
या साऱ्याला केव्हातरी दणकून दृष्ट लागली आणि तारुण्य रेसमधल्या घोड्यांसारखे संपू लागले. फक्त जीवापाड धावणे, जगणे नाही, मौजमजा नाही. रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या परीक्षेची तयारी. या ध्यासाचं रूपांतर मग दमछाकीमध्ये होतं. अशक्यप्राय स्वप्नांचा स्वतःच्या कुवतीचा विचार न करता फक्त पाठलाग!
कोटा आणखी एका (वाईट) कारणासाठी प्रसिद्ध आहे- अपयशी (?) विद्यार्थ्यांच्या आत्महत्या! मला आठवतं, इस्लामपूरला आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सेमिस्टर परीक्षेत नापास झाला, म्हणून हॉस्टेलच्या खोलीची कडी आतून लावून हाताची नस कापून घेतली होती. केवढी धावाधाव करून आम्ही त्याला वाचवलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक सेमिस्टरला हॉस्टेलमधील रेक्टरला डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याच्या सूचना प्राचार्यांनी दिल्या होत्या.
शिक्षक जमातीला तरी पाठीचे कणे असायला हवेत, नाहीतर कोणाकडे नवीन पिढ्यांनी आशेनं बघायचं? फक्त जुन्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वर्गात आयएमपी म्हणून सांगणं, पुस्तकातील सोडवलेले प्रश्न/गणितं वर्गात सोडवून घेणं, असेच हातखंडे शिक्षकांनी सुरू ठेवले, तर त्यांना ‘आदर’ कोठून मिळणार? येनकेनप्रकारेण अभ्यासक्रम संपवणं, यांवरच चरितार्थ टेकवून ठेवणारी मंडळी मग खऱ्या अर्थानं विद्यादान करणारे गुरू आणि आत्मज्ञान देणारे सदगुरू कधी बनतील? का बनणारच नाहीत? म्हणून नालंदा/तक्षशिला विसरून चॅप्लीनच्या ‘मॉडर्न टाइम्स’मध्ये दाखवली तशी संवेदनाशून्य ‘फॅक्टरी’ बनते कोटा शहर! आजच्या शिक्षणव्यवस्थेचं बकाल आणि विदारक चित्र!
१९८३ साली स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेली पिढी पाहायला, अनुभवायला सुरुवात झाली. सदैव भेदरलेले, आत्मविश्वासहीन, रात्रंदिवस रट्टा मारणारे (आमच्या इंजिनीयरिंगच्या काळात ‘घासणारे’), अगदी परीक्षा केंद्रात प्रवेश करेपर्यंत पुस्तके, नोट्स हातात बाळगणारे! या स्पर्धेने, अभ्यासक्रमांनी पाठीचा कणा काढून घेतला आहे. लाखो तरुण आपली मौल्यवान वर्षं अशा प्रकारे वाया घालवत आहेत. हे जे आपल्या देशाचं मोठं नुकसान आहे.
मग इथं हडप्पाच उरणार आणि अभ्यासातील आनंद संपून ‘फ्लेक्स’वर झळकण्याची, AIR (ऑल इंडिया रँक)ची चटक लागल्यावर शिक्षणाचं ‘मोहेंजोदारो’ होण्याला कितीसा वेळ लागणार! शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक मागे पडले आणि क्लासवाले सगळ्या श्रेयांचे धनीपण मिरवू लागले. अवघ्या ३०-४० वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राला ग्रासणारे हे महाकाय बदल झाले.
महाराष्ट्राने १९८३ साली एका रात्रीतून असंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयांना जन्म दिला. त्या काळचा विनोद होता- “तुला अभियांत्रिकीला प्रवेश हवा? सॉरी, तुला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायचं आहे - हे घे परवानगी पत्र!”
सर्वांनी या ‘वाहत्या गंगे’त हात धुवून घेतले आणि गंगा ‘मैली’ झाली. रायपूरला तर चक्क एका प्रसिद्ध जवाहिऱ्याने अभियांत्रिकी महाविद्यालय काढलं होतं.
कोटात मोठाले वर्ग, एकाच वर्गातील भलीथोरली विद्यार्थीसंख्या, अभ्यासक्रम उरकणं आणि पहिल्या भागातील रिक्षावाला उद्वेगानं म्हणतो तसे- “कोटा आता ‘बिग बॉस’चं घर झालेलं आहे.’ अशी भावना ही वेबसिरीज बघताना होते. त्यात माजुर्डे क्लासवाले दिसतात.
धनिकांच्या एका पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सचिवाने माझ्या वालचंदच्या शिक्षकांचा अपमान केला होता- त्यांनी तोंडी परीक्षेत मुलाला कमी गुण दिले म्हणून! सरांनीही तिथल्या तिथं मानधनाचा चेक फाडून टाकला होता. माझाच एक विद्यार्थी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख झाल्यावर मला वारंवार ‘गेस्ट लेक्चर’, स्पर्धेचा परीक्षक म्हणून बोलवायचा. एकदा म्हणाला - “विद्यापीठाच्या परीक्षेला परीक्षक म्हणून तुम्हाला बोलवायचं धाडस मला होत नाही, कारण कॉलेज नवं असल्यानं आमच्या व्यवस्थापनाची आम्हाला सक्त ताकीद आहे - विद्यार्थ्यांना भरपूर गुण देणारेच परीक्षक बोलवायचे. मी तुम्हाला ओळखतो- तुम्ही असं अजिबात करत नाहीत.”
‘कोटा से बच्चे तो निकल जाते हैं, लेकिन कोटा बच्चे कें अंदर से नहीं निकलता!’ आयआयटीत निवड झाली, तर सुकून अन्यथा जन्मभराची चुभन, जेलसी आणि ‘छिछोरे’ सिनेमाप्रमाणे पडणारा ‘लूझर’ हा जन्मभराचा शिक्का! हा विचार पालकांनी आणि तरुणांनी करायला नको का? दोन शिक्षण संस्थांमधील/कोचिंग इंडस्ट्रीमधील फरक काय? कोटा फॅक्टरी म्हणते- भिंतींचं रंग, बाकांची मोजमापं, फी कमी-जास्त, शैक्षणिक अॅप्स, वर्गखोल्यांमधील पंख्यांची संख्या? काय निकष असतात कोट्याला जायचे?
३.
कोट्यातच नव्हे, तर शोषण करणारे संस्थाचालक महाराष्ट्रालाही हडप्पा-मोहेंजोदारो करण्याच्या मार्गावर आहेत. याला कारणीभूत कोण? मला वाटतं, ज्या क्षणी द्रोणाचार्यांनी धृतराष्ट्राकडे शिक्षक ही नोकरी स्वीकारली, त्या क्षणापासून त्या पदाची अवमानना सुरू झाली आहे. त्यापूर्वी ‘गुरुकुल संस्कृती’त रामाला आणि कृष्णालाही गुरुगृही, आजच्या भाषेतील LIFE SKILLS शिकायला /अध्ययन करायला जावं लागलं होतं. म्हणूनच कोटा शहरात ‘इस शहर में हर शक्स परेशान सा क्यूँ हैंI’ हा प्रश्न पडत नाही.
वैभव पांडे या प्रातिनिधिक तरुणाच्या प्रश्नांचा प्रवास ‘कोटा फॅक्टरी’मध्ये आढळतो. ‘इनसाईड एज’ या मालिकेने जसं क्रिकेटविश्वाच्या पोलादी आणि श्रीमंत विश्वाचं विश्वरूप दर्शन घडवलं, तसंच ‘कोटा फॅक्टरी’ शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणाचे चित्र रंगवतं - ते भेदक आहे, त्रासदायक आहे, पण आयआयटीच्या ५२६३ जागांसाठी दरवर्षी १० लाखांहून अधिक तरुण (आणि पडद्याआडून त्यांचे पालक) जेव्हा त्यांची स्वप्नं, ऊर्जा, पैसे, वेळ पणाला लावतात, तेव्हा प्रश्नही त्याच तोडीचे पडतात.
अशा वेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवलेल्या आणि नोकरीची वाट बघत शेवटी फास लावून घेणाऱ्या एमपीएससीवाल्या स्वप्नील लोणकरची (जुलै २०२१) उगाच आठवण होते. आणि ‘रोटी, कपडा और मकान’मधला वडिलांना सुनावणारा अमिताभही आठवतो (‘जवानी के २०-२५ सालों की किमत’ वगैरे) मग जीवनातील अग्रक्रमांकडे बघायचं कधी?
कारण ‘कोटा से बच्चे तो निकल जाते हैं, लेकिन कोटा बच्चे कें अंदर से नहीं निकलता!’ आयआयटीत निवड झाली, तर सुकून अन्यथा जन्मभराची चुभन, जेलसी आणि ‘छिछोरे’ सिनेमाप्रमाणे पडणारा ‘लूझर’ हा जन्मभराचा शिक्का! हा विचार पालकांनी आणि तरुणांनी करायला नको का?
कोटात मोठाले वर्ग, एकाच वर्गातील भलीथोरली विद्यार्थीसंख्या, अभ्यासक्रम उरकणं आणि पहिल्या भागातील रिक्षावाला उद्वेगानं म्हणतो तसे- “कोटा आता ‘बिग बॉस’चं घर झालेलं आहे.’ अशी भावना ही वेबसिरीज बघताना होते. त्यात माजुर्डे क्लासवाले दिसतात. कोट्यातच नव्हे, तर शोषण करणारे संस्थाचालक महाराष्ट्रालाही हडप्पा-मोहेंजोदारो करण्याच्या मार्गावर आहेत. याला कारणीभूत कोण? मला वाटतं, ज्या क्षणी द्रोणाचार्यांनी धृतराष्ट्राकडे शिक्षक ही नोकरी स्वीकारली, त्या क्षणापासून त्या पदाची अवमानना सुरू झाली आहे. त्यापूर्वी ‘गुरुकुल संस्कृती’त रामाला आणि कृष्णालाही गुरुगृही, आजच्या भाषेतील LIFE SKILLS शिकायला /अध्ययन करायला जावं लागलं होतं. म्हणूनच कोटा शहरात ‘इस शहर में हर शक्स परेशान सा क्यूँ हैंI’ हा प्रश्न पडत नाही.
दोन शिक्षण संस्थांमधील/कोचिंग इंडस्ट्रीमधील फरक काय? कोटा फॅक्टरी म्हणते- भिंतींचं रंग, बाकांची मोजमापं, फी कमी-जास्त, शैक्षणिक अॅप्स, वर्गखोल्यांमधील पंख्यांची संख्या? काय निकष असतात कोट्याला जायचे?
रायपूरला एका शिक्षणतज्ज्ञाला मी बोलावलं होतं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. ते म्हणाले - “बाकी इमारती, सोयी-सुविधा, शिक्षकांना एसी खोल्या, हॉस्टेल, बस, कँटीन सगळं इन्फ्रा तुम्ही देखणं बनवलंय, पण ‘ह्यूमन इन्फ्रा’चं काय?”
डोळे खाडकन उघडणारा हा प्रश्न होता. कोटा फॅक्टरीमध्ये असे अंतर्मुख करणारे प्रश्न कोणी विचारत नाही, पण तरीही ते माझ्यासारख्याला पडतात. आणि हो तेथील विद्यार्थ्यांनाही! आणि वर्गात असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारून ते शिक्षकांची भंबेरी उडवतात. अकार्यक्षम शिक्षकांबाबत ठरवून नकारार्थी ‘फीडबॅक’ देतात. असे शिक्षक मग पगार कमी करा, खालच्या वर्गाला शिकवायला द्या, पण काढून टाकू नका, अशी विनवणी संस्थाचालकांकडे करताना दिसतात.
शिक्षक जमातीला तरी पाठीचे कणे असायला हवेत, नाहीतर कोणाकडे नवीन पिढ्यांनी आशेनं बघायचं? फक्त जुन्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वर्गात आयएमपी म्हणून सांगणं, पुस्तकातील सोडवलेले प्रश्न/गणितं वर्गात सोडवून घेणं, असेच हातखंडे शिक्षकांनी सुरू ठेवले, तर त्यांना ‘आदर’ कोठून मिळणार? येनकेनप्रकारेण अभ्यासक्रम संपवणं, यांवरच चरितार्थ टेकवून ठेवणारी मंडळी मग खऱ्या अर्थानं विद्यादान करणारे गुरू आणि आत्मज्ञान देणारे सदगुरू कधी बनतील? का बनणारच नाहीत? म्हणून नालंदा/तक्षशिला विसरून चॅप्लीनच्या ‘मॉडर्न टाइम्स’मध्ये दाखवली तशी संवेदनाशून्य ‘फॅक्टरी’ बनते कोटा शहर! आजच्या शिक्षणव्यवस्थेचं बकाल आणि विदारक चित्र!
प्रश्न उशिरा विचारले म्हणून त्यांचं महत्त्व कमी होत नाही. उत्खनन करताना काही नाजूक, हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात या कोटा गावात!
वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की, आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर ‘बघण्याची’ चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला, तरी स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम इथं भेटतं. मुलींचं हॉस्टेल/पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असली, तरी वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही. इथला तलमपणा ओटीटीवरील टिपिकल बीभत्सपणा किंवा उघड उघड लाज आणणारा नाही. फुलपाखरी दिवसांचं मऊ मुलायम चित्रण इथं आहे. एकत्र एखादा पदार्थ वाटून खाणं, दुचाकीवरील सैर, निरोपाचे क्षण आणि विशेषतः डोळ्यांमधून सारं सांगणं/व्यक्त होणं औरच! विरह तितकाच प्रगल्भ... एकमेकांच्या फोनची अनावर प्रतीक्षा, समोरच्यानं पुढाकार घेण्याची इच्छा, पण त्या व्यक्तीच्या अभ्यासाची, त्यातील व्यत्ययाची तितकीच काळजी!
१९८३ साली स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेली पिढी पाहायला, अनुभवायला सुरुवात झाली. सदैव भेदरलेले, आत्मविश्वासहीन, रात्रंदिवस रट्टा मारणारे (आमच्या इंजिनीयरिंगच्या काळात ‘घासणारे’), अगदी परीक्षा केंद्रात प्रवेश करेपर्यंत पुस्तके, नोट्स हातात बाळगणारे! या स्पर्धेने, अभ्यासक्रमांनी पाठीचा कणा काढून घेतला आहे. लाखो तरुण आपली मौल्यवान वर्षं अशा प्रकारे वाया घालवत आहेत. हे जे आपल्या देशाचं मोठं नुकसान आहे. मग इथं हडप्पाच उरणार आणि अभ्यासातील आनंद संपून ‘फ्लेक्स’वर झळकण्याची, AIR (ऑल इंडिया रँक)ची चटक लागल्यावर शिक्षणाचं ‘मोहेंजोदारो’ होण्याला कितीसा वेळ लागणार!
राजस्थानच्या वाळवंटातील हे थंड/आल्हाददायक कारंजं - खूप दिवसांनी प्रेमाचं हे हळुवार, अलवार रूप भेटलं. गुलज़ारची एखादी भावभिनी कविताच जणू!
आणखी एक हृदयाला भिडणारा प्रसंग- मित्रांच्या घट्ट मैत्रीतला, भूतकाळ आठवून देणारा! वैभव पांडे अनिश्चित असताना त्याचा मित्र त्याला म्हणतो- “घरी फोन लाव आणि बोल.” दुसरा मित्र पटकन ही कल्पना झटकतो आणि म्हणतो- “काय पण सल्ला आहे, तोही तुझ्याकडून? तू कधी बोलतोस का /ऐकतोस का वडिलांचं?”
पहिला मित्र विद्ध होऊन म्हणतो- “बोलतो रे, पण घरच्यांचं माझ्या डोक्यावरून जातं आणि तसं वागता येत नाही. पण हा सर्वस्वी माझा दोष आहे.”
नक्की कोठल्या टप्प्यावर कळत-नकळत मुलं आपल्या पालकांपासून (मनानं) दुरावतात, त्या नेमक्या क्षणाचं हे हृद्यदर्शन - तरुणपणातील ही ताटातूट (जी शरीरानं आधीच आणि अपरिहार्यपणे) झालेली असते, जी प्रत्येकाच्या वाटचालीतील भागधेय असते, ती या कबुलीजबाबातून खाडकन भेटते आणि स्वतःचा भूतकाळ आठवतो.
वैभव त्रासून म्हणतो - “काय बोलू? त्यांना काय कळणार?”
अनुभवानं शहाणा झालेला मित्र एक जुनं सत्य नव्याने सांगतो- “मित्रा, घरच्यांचे निर्णय तुला पटणार नाही कदाचित, पण त्यांचे इरादे चुकीचे खचित नसतात.”
आणखी एक प्रसंग. विद्यार्थीप्रिय शिक्षक ‘जितूदादा’ स्वतःचा कोचिंग क्लास सुरू करतो. त्यांच्या विद्यार्थ्यांची तगमग होते, स्वतःचा नावाजलेला क्लास सोडून, त्या नव्या क्लासमध्ये जाण्याची!
पुण्यातील एका प्रसिद्ध शिक्षण समूहातून नव्या संचालिकेने (समूह प्रमुखाच्या मुलीनं) समूहातील एका इन्स्टिट्यूटच्या नामवंत संचालकाला (ज्याने ती इन्स्टिट्यूट भारतात नावारूपाला आणली होती) उद्धटपणे (खरं तर मूळ ‘अनसेरिमोनिअसली’ या शब्दाचा हा फार बुळा मराठी भावार्थ आहे) अक्षरशः घालवलं, तेव्हा देशातील त्याच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याला आर्थिक मदत करून नवी शिक्षण संस्था काढायला लावली होती. आणि त्या शिक्षणतज्ज्ञानेही असं एक प्रयोगशील महाविद्यालय उभं केलं, जे मूळ शिक्षण समूहाशी अल्पावधीत स्पर्धा करू लागलं. एक चांगला शिक्षक एवढं नक्कीच करतो आणि शिक्षणतज्ज्ञांशी (?) दोन हात करू शकतो. म्हणजे वेळ आली की, गुरुदक्षिणा देण्यात मुलं हात आखडता घेत नाहीत. फक्त ‘समसमा संयोग’ व्हायला हवा.
तारुण्याचे सांगाडे कोटाच्या उत्खननात आढळतात. शिक्षण कोणीही मनापासून, आनंदानं घेताना आढळत नाही. सगळे एका ध्येयाच्या मागे लागलेले. त्यामुळे यशापयशाची व्याख्या नव्या भाषेत सोपी- ‘ ‘क्रॅक’ केली का एंट्रन्स? मग गंगेत घोडे न्हाले!’ पण त्यांची टक्केवारी किती, याचा विचार ना पालक करत ना परीक्षार्थी! क्लासवाल्यांना मी दोष देत नाही, कारण ‘बकरे’ आपणहून त्यांच्या तावडीत सापडतात, अगदी शोधत शोधत येतात! मग कोटा फॅक्टरीतला रिक्षावाला त्यांचा गाईड बनतो आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसवर फिरवून आणतो. आम्हीही आजकाल प्रवेशाच्या वेळी ‘पर्याय (ऑप्शन्स) देतो- “तू नहीं तो और सही!” पण कोट्याहून रिकाम्या हातानं परतणार नाही. कोटा हे शहर आता देश-विदेशात नावाजलं गेलं आहे - शिक्षणाच्या पर्यायांबद्दल, सॉरी, क्लासच्या पर्यायांबद्दल! ‘काला पत्थर’मधील नीतू सिंग जशी कोळसा खाणींच्या परिसरात सौभाग्याची स्वप्नं विकत फिरत असते, तसे हे क्लासेस आयआयटी आणि मग स्पर्धापरीक्षा JEE, NEET, TOFEL, GRE, OLYMPIAD, अशी काहीबाही स्वप्नं तरुणांच्या डोळ्यात पेरत असतात - क्वचितच खरी होणारी...!
‘सो कॉल्ड’ संस्थाचालकांना यांतून काय मिळतं? नेहमीच त्यांचं भाषण, सादरीकरण नामवंतांकडून तयार करून घ्यायचं आणि मग व्यासपीठावर जायचं, ही त्यांची खोड असते. तरीही ही मंडळी राजेशाही शिक्षण संस्था काढतात, त्यातून पैसे ‘पांढरे’ करतात. शिक्षण नावाचं आकर्षक कुरण आहे. त्यासाठी एक संस्थाचालक मला अभिमानाने म्हणायचे- “सर, मी बिझिनेसमन आहे, पण इतकी वर्षं मला कोणी फारसं ओळखत नव्हतं. पण आता तीन-चार महाविद्यालयं काढली, लगेच प्रवेशासाठी/नोकऱ्यांसाठी माझ्यामागे रीघ लागली. त्याहीपेक्षा शिक्षण क्षेत्रात कुठे काही खुट्ट झालं की, वर्तमानपत्रवाले/टीव्हीवाले माझ्याकडे बाईटसाठी धाव घेतात. माझ्या मुलाखती छापून येतात. ३० वर्षांत जी प्रसिद्धी मिळाली नाही, ती या पाच वर्षांत मिळाली.”
पुण्यातील एक शिक्षण महर्षी (?) प्रामाणिकपणे सांगायचे- “माझ्या चारही पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये मी शिकवत नाही. मुळात ही माझी महाविद्यालये ‘कोचिंग क्लासेस’ आहेत- बक्कळ फी घ्यायची आणि नोकरीची हमी मिळवून द्यायची, हा माझा धंदा आहे. म्हणून माझ्या अॅडमिशन्स फुल्ल असतात.”
४.
गावोगावी अशा फॅक्टऱ्या सुरू आहेत- कोटा त्यातील अग्रणी एवढंच! बाकी हे सर्वदूर शहरांच्या शरीरात खोलवर पसरलंय. घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. इथं प्रत्येक ‘ईशान अवस्थी’ला निकुंभ सर भेटत नाही! दिवस-रात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथं मुलं शैत्रणिक अॅपवरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधूनमधून प्रयोग करायला जातात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कुठून उरणार? आणि तसंही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच.
माझ्या मुलाने बारावीत पुण्यातील एका प्रथितयश महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर, त्याचे सर त्याला म्हणाले होते- “क्लास लावालच तुम्ही सगळ्या विषयांचा, मग इथं शिकवायची गरज काय?”
तेव्हा महाविद्यालयांनीही आता स्वतःच आक्रसलेलं आणि दुय्यम रूप स्वीकारलेलं आहे. आता महाविद्यालयं फक्त फी घेतात आणि शिक्षकांचं वेतन वाटप करतात! त्यांचं मूळ प्रयोजन हरवलं आहे आणि याबद्दल त्यांची तक्रारही नाही. ‘कोचिंग इंडस्ट्री’ने शाळा/महाविद्यालयं गिळंकृत केली आहेत आणि त्यांचं काम स्वतःवर घेतलं आहे. पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे. त्यामुळे महाविद्यालयाची फी आणि क्लासची फी, असा दुहेरी आर्थिक बोजा पालक आनंदानं (अथवा अगतिकतेने) स्वीकारताहेत.
अशामध्ये डॉ. लीलाताई पाटील यांनी कोल्हापुरात ‘सृजन आनंद शिक्षण’नामक प्रयोगशील शाळा काढली. तेथील विद्यार्थी (आणि शिक्षक) वेगळ्या तेजानं लकाकताना आम्ही पाहिली. शिक्षण आनंददायीच असलं पाहिजे, कारण त्याचा मूळ हेतू/प्रयोजन, आनंदी/हसरे चेहरे असा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुण्याची ज्ञानप्रबोधिनी विद्यार्थ्यांना ‘स्व’ शिकवते आणि जगण्याच्या सर्व शक्य अंगांना भिडायची संधी देते. तेथील मुलं इतर शाळांमधील मुलांपेक्षा वेगळीच असतात/विकसित होतात म्हणून उठून दिसतात. लहानपणापासून त्यांना ‘सो कॉल्ड’ म्हटली जाणारी ‘लाईफ स्किल्स’ हाताळता येतात. त्यामुळे जीवन उभं राहण्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे पाय बळकट/खमके होतात.
समस्या निवारण, प्रत्येक मूल स्वायत्त असणं, याचा अंगीकार आणि समाजाला समोरून भिडणं त्यांना शिकायला मिळतं. ही मुलं भलेही ‘मेरिट’मध्ये येत नसतील, पण अनेक संस्थांमध्ये उच्च पदावर आहेत आणि त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे /जडणघडणीमुळे पटकन ओळखू येतात.
गुजरातमधील वल्लभ विद्यानगरला गेलो असता, तेथील ‘अक्षर पुरुषोत्तम छात्रालय’मध्ये काही दिवस वास्तव्य करण्याची संधी मिळाली. अंगी शिस्त भिनणं म्हणजे काय, याचा नमुना दिसला. त्यांच्या मते समर्पण बालवयापासून शिकवण्याची संकल्पना आहे, निःस्वार्थ सेवेची चेतना आपल्याला अधिक चांगलं विश्व/समाज बनवण्यासाठी मदत करतं, या दृढ पायावर जगातील पाच खंडांमधील नऊ देशांमध्ये कार्यरत असणारी ही संस्था आहे.
माता अमृतानंदमयी माँ यांनी ‘अमृता विश्वविद्यालय’ सुरू केलं आहे. तेथील शिक्षणाचा पायाही साधना, सेवावृत्ती, आध्यात्मिक वाढ असाच आहे. अम्मांच्या सगळ्या शाळा, महाविद्यालयं किलबिल करत असतात. तेथील बाल्य-तारुण्य अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून चुरगळलेलं नसतं. चेहऱ्यावरील तेज, आवाजातील मार्दवात दडलेला आत्मविश्वास सारं सतत प्रत्ययाला येत असतं.
मुख्य म्हणजे या सगळ्या संस्था जागतिक नकाशावर नावारूपाला आलेल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी-पालकांसाठी तीर्थस्थानं बनली आहेत. कोटाप्रमाणे रँकर्सची आयआयटीची फी भरणं, गावभर त्यांचे फ्लेक्स लावणं, मुलाने क्लास सोडू नये, म्हणून फी परत करणं, वेगवेगळ्या नावाखाली शिष्यवृत्त्या देणं, असे काही हतखंडे या ‘तेजस्वी’ शिक्षणसंस्थांना करावे लागत नाही.
आणि या संस्था चालवतात कोण? संन्यस्त वृत्तीचे चालक किंवा दस्तुरखुद्द संन्यासी! प्रत्येक संन्यासी ‘गुरू’ असतोच अस नाही, पण प्रत्येक ‘गुरू’ हा संन्यस्त वृत्तीचा असलाच पाहिजे. आपण पुन्हा ‘सांदिपनीं’च्या गुरुकुल संकल्पनेकडे जायला हवं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
५.
मूल्यशिक्षणात हयात घालवलेल्या माझ्या श्वशुरांना माझ्या मुलाने बोलून दाखवलं होतं- “तुम्ही आसपास असला की, तुमच्या अस्तित्वातून आम्हांला मूल्यशिक्षण मिळतं. त्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही.” हे अंतर्बाह्य शिक्षक ‘असणं’ अगत्याचं असतं.
‘ज्ञान प्रबोधिनी’, ‘अक्षर पुरुषोत्तम छात्रालय’, ‘अमृता विश्वविद्यालय’ ही आजच्या काळातील नालंदा-तक्षशिला आहेत. त्यामुळे कोटा फॅक्टरीतील शोषण फार काळ टिकेल असं वाटत नाही. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील (किंबहुना देशातील) अनेक खासगी महाविद्यालयं आपल्या दुकानांना कुलूप लावून बसली आहेत, बरीच एआयसीटीईने बंद केली आहेत.
रोज सकाळी मी गणपती मंदिरात आरतीला जातो. तिथं नेमानं येणारी एक महिला कोणाशीही न बोलता हातात झाडू घेऊन आधी मंदिर परिसर साफ करते आणि मग आरतीसाठी आत प्रवेश करते.
आपणही शिक्षण मंदिराचा परिसर आधी साफ करू या आणि मगच गुरूचं वास्तव्य असलेल्या असलेल्या गाभाऱ्यात नव्यानं प्रवेश करू या.
एका वाक्यावर माझा कायम विश्वास आहे - ‘शिक्षकांना निराश होण्याचा अधिकार नसतो!’
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. नितीन देशपांडे शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक आहेत! त्यांची आजवर चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
deshpandenh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment