‘खिडकी कलेक्टिव्ह’चे पंचपंडित ही पुरोगामित्वाच्या नावाखाली शत्रूच्या वळचणीला बसून, त्याच्या गुलामगिरीचे पोवाडे गाणारी नवी जमात आहे!
संकीर्ण - वाद-संवाद
बालाजी चिरडे
  • हैद्राबाद संस्थानचा नकाशा
  • Sat , 21 October 2023
  • संकीर्ण वाद-संवाद खिडकी कलेक्टिव्ह Khidki Collective हैदराबाद संस्थान Hyderabad State निज़ाम Nizam मुक्तिसंग्राम

‘अक्षरनामा’वर २ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या काही लेखकांनी लिहिलेल्या पाच लेखांची मालिका प्रकाशित झाली आहे. ही मूळ इंग्रजी मालिका ‘द न्यूज मिनिट’ या ऑनलाइन इंग्रजी पोर्टलवर १५ ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झाली. तिचा हा अनुवाद आहे.

‘हैदराबाद मुक्तिदिना’च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘मुक्तिदिवस’ साजरा करण्याचे आवाहन जनतेला दिले, त्यानिमित्ताने या लढ्याची तिसरी बाजूही मांडली गेली पाहिजे, या हेतूने ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या डॉ. स्वाती शिवानंद, सी. यामिनी कृष्णा, प्रमोद मंदाडे, मोहम्मद आयुब खान, ए. सुनिता या तरुण लेखकांनी हे पाच लेख लिहिले आहेत.

यातील पहिली लेखिका स्वाती शिवानंद ही जवाहरलाल नेहरू (जेएनयु) विद्यापीठात इतिहास विषयात पीएच. डी. केलेली, पण आता अमेरिकेत स्थित झालेली अभ्यासक आहे. प्रमोद मंदाडे हे आयआयटी, मुंबई येथे असून समाजशास्त्र या विषयात पीएच. डी. करत आहेत. उर्वरित तीन लेखक अन्य क्षेत्रांत काम करणारे आहे. या लेखांबद्दलची माझी निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत -

हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन होण्यासाठी तयार नव्हते. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावयाचे होते, ही बाब या पंचपंडितांना मान्य आहे. त्याबद्दल ते या लेखांत काहीही म्हणत नाहीत. जर हैदराबाद स्वतंत्र झाले असते, तर भारताच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले असते का, आजचा महाराष्ट्र नकाशावर दिसला असता का, राज्यघटना अशीच राहिली असती का?

रझाकारांना क्षणभरासाठी वगळलं, तरी निझामाची स्वतंत्र राहण्याची मनीषा काही लपून राहिलेली नव्हती. जगभरातील पत्रकारांना घेऊन येऊन त्यांना लाच देऊन, खोट्या बातम्या प्रसारित करण्याची सुरूवात निझामाने केलेली होती. युरोपमध्ये आपला ‘एजंट’ बसवून तेथील प्रमुख नेत्यांना आणि काहींना ‘युनो’मध्ये आपल्या बाजूने बोलण्यासाठी कसे प्रयत्न करत होता, हे पंचपंडित सांगत नाहीत. एका बाजूला पाकिस्तानला आर्थिक मदत, तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीजांकडून गोव्यापासून हैदराबादपर्यंतचा कॉरिडॉर खरेदी करण्याची लगबग, ही काही लपून राहिलेली नव्हती. सिडनी कॉटन या कुख्यात आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्कराकडून शस्त्रे खरेदी केली गेली होती, हेही उघड सत्य होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे सर्व चालू असताना हैदराबाद शहरातून जाणाऱ्या रेल्वेवर अमानुष हल्ले, दगडफेक करून प्रवाश्यांना जीव मुठीत घ्यायला भाग पाडले जात होते आणि भारतभरातील तत्कालीन प्रसारमाध्यमे सरकारला प्रश्न विचारत होता की, हे काय नाटक चालू आहे? केंद्र सरकार काही करणार आहे का नाही? असा हा भारतविरोधी प्रांत भारताच्या पोटामध्ये राहू देणे, याला सरदार पटेल ‘भारताच्या पोटातील अल्सर’ म्हणत, पण ते या पंचपंडितांना झोंबलेले आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी लेखणीचे दिशाहीन फटकारे मारणाऱ्या या पंचपंडितांना त्या काळातील मुस्कटदाबी ज्ञात नाही, असे मुळीच नाही. पण त्यांना सोयीस्करपणे त्यावर पांघरून घालायचे आहे, कारण यांचा ‘अजेंडा’ तयार आहे. आम्हा मराठवाड्याच्या लोकांचे काय झाले असते, याचं यत्किंचितही भान यांना नाही. भारताच्या स्वातंत्र्याचे मुळी उद्दिष्टच मातीमोल करू पाहणाऱ्या निझामाच्या इच्छेबद्दल हे पंचपंडित मूग गिळून गप्प बसलेले आहेत.

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा या पंचलेखकांना मान्य नाही. १७२४ ते १९४८ या कालावधीत निझाम येथील ८७ टक्के लोकांवर राज्य करत होता. त्यातील शेवटची म्हणजे १९३८ ते १९४८ ही १० वर्षे भयानक अन्याय व अत्याचाराची होती. जवळपास दोन लक्ष रझाकारांनी येथील हिंदूंचे जगणे कठीण केलेले होते. रझाकारांनी निझामी पोलीस आणि लष्कराच्या मदतीने एक अराजक निर्माण केलेले होते. एक समकक्ष यंत्रणा उभी केलेली होती. निझामाविरुद्ध हिंसक-अहिंसक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कसलीही कृती करणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना छळणे, महिलांवर अत्याचार करणे, त्यांना पळवणे, त्यांची जबरदस्तीने लग्ने लावणे, धर्मांतर करणे, नग्न धिंड काढणे, नाचायला लावणे, पुरुषांना ठार करणे, हात-पाय छाटणे, डोळे काढणे, जिवंत जाळणे, विहिरीत फेकून देऊन वरून आग लावणे, झाडांना जिवंत लटकावून खालून जाळ लावणे, गावच्या गाव जाळून टाकणे, असे अत्याचार शेवटच्या १० वर्षांत झाले.

त्यामुळेच हैदराबाद येथील जनतेला म. गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्यालाही हिंसक लढ्याची परवानगी द्यावी लागली होती. हे सगळे अत्याचार लिखित, सर्व शासकीय दस्तावेजात नमूद असलेले आहेत. संपूर्ण हैदराबाद संस्थानाच्या आठवणी अजूनही लोकस्मरणात आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांत अशा असंख्य आठवणी आहेत.

पण प्रस्तुत पंचपंडितांना हा अत्याचार मान्य नाही. त्यांच्या मते वरील सगळे अत्याचार हे हिंदूंच्या विरोधात असल्यामुळे आणि हिंदू मुळातच शोषक असल्यामुळे, अत्याचारी असल्यामुळे व बहुसंख्याक अत्याचारी असल्यामुळे त्यांची नोंद घेण्याची गरज नाही. त्यामुळे या पंचपंडितांनी कोठेही या अत्याचाराची नोंद केलेली नाही. 

..................................................................................................................................................................

‘खिडकी कलेक्टिव्ह’ची पाच लेखांची मालिका -

हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास

तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…

हैदराबादमधील ‘दलित रझाकार’ नावाचा त्रासदायक भूतकाळ, अल्पसंख्याकांची युती आणि ‘पोलीस ॲक्शन’

१९४८च्या ‘पोलीस ॲक्शन’चे ध्रुवीकरण केले जात आहे. या काळातली जातीय सलोख्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. ती उजागर करण्याची गरज आहे!

दिवसा रझाकार यायचे, रात्री ‘ते’ यायचे : तेलंगणातील स्त्रियांच्या आठवणीतली ‘पोलीस ॲक्शन’

..................................................................................................................................................................

यातून अजून एक बाब स्पष्टपणे जाणवते, ती ही की, १९४८मध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची एकतर नोंद घ्यायचीच नाही किंवा घ्यायची गरज पडली, तर तो अत्याचार कसा नव्हता, हे सांगण्यासाठी आपली ऊर्जा खर्ची घालायची. हैदराबाद संस्थान हिंदूंची पिळवणूक करणारे होते, हे या पंचपंडितांना मान्य नाही.

हिंदू हे अस्पृश्यांवर अत्याचार करत होते, त्यामुळे त्यांच्यावर जर मुसलमान अत्याचार करत असतील, तर त्याची चर्चा आपण का करायची, या पूर्वगृहाने पछाडलेल्या मनोवृत्तीमधून भूतकाळाकडे पाहण्याची ही नवी पद्धत या पंचपंडितांनी स्वीकारलेली दिसते. त्यामुळे निझामाच्या कोणत्याही अत्याचारवर ते काहीही बोलत नाहीत. त्यांना ‘स्टेट काँग्रेस’, ‘हिंदू महासभा’, ‘आर्य समाज’ या सगळ्या एकजात ‘जातीयवादी’ संघटना वाटतात आणि लोककल्याणकारी निझामाची बदनामी करण्याचा विडा उचलणाऱ्या संघटना वाटतात.

शेतकऱ्यांचे हक्क, लोकांचे धार्मिक हक्क, नागरी हक्क, विविध संरचनात्मक, संघटनात्मक आणि सकारात्मक बाबींची ते नोंदच घेत नाहीत. ९५ टक्के बिगर उर्दू बोलणाऱ्यांना उर्दू शिकावी लागणे, यात या पंचपंडितांना काहीही अन्याकारक वाटत नाही. उलट उर्दू ही कशी सगळे जण बोलत होते, अशी मखलाशी ते करतात.

२२४ वर्षे १३ टक्के मुसलमान (१९४८ची आकडेवारी) असलेल्या निझामी राजवटीने सत्ता चालवण्याचे वास्तव असताना, या पंचपंडितांना मात्र निझामानंतर येणाऱ्या हिंदू बहुसंख्य़ाकांच्या राज्याची भीती वाटते. रुडयार्ड किप्लिंग असे म्हणाला होता की, जगातील सर्वाधिक उत्कृष्ट गुलाम कोठे सापडत असतील, तर ते भारतात होय. मला वाटते त्यांनी जर हैदराबादचा अभ्यास केला असता, तर त्याची नजर इकडे वळली असती.

निझाम २२४ वर्षे राज्य करतो, यात आक्षेपार्ह काहीही न वाटता भारतात विलीन झाल्यावर बहुसंख्याकांचे राज्य येण्याची भीती वाटते, यावरून या पंचपंडितांची लोकशाही मूल्यांवर किती प्रगाढ श्रद्धा आहे, हे कळते!

या पंचपंडितांचे भांडवल म्हणजे ए. जी. नुराणी यांचे ‘डिस्ट्रक्शन ऑफ हैदराबाद’ हे पुस्तक आणि त्या पुस्तकावर ‘ईपीडब्लू’मध्ये पुरुषोत्तम यांनी लिहिलेला परिचयपर लेख, शिवाय शासनाने कधीही न पाठवलेला, त्यामुळे स्वीकारण्याचा प्रश्नच नसलेला सुंदरलाल समितीचा कथित अहवाल होय.

२२४ वर्षांतील अन्यायाबद्दल चकार शब्द न उच्चारणारे हे पंचपंडित रझाकारांच्या १० वर्षांच्या अन्याय-अत्याचार-जुलुमानंतर जी ‘पोलीस अ‍ॅक्शन’ झाली, त्यात ४०,००० मुसलमानांना कशा पद्धतीने भारतीय लष्कराने मारले, याची मात्र पोटतिडकीने तक्रार करतात. भारतीय इतिहास, चित्रपट, साहित्य यांत या कथित हत्यासत्राचे वर्णन कसे आलेले नाही, ही त्यांची मूळ मुख्य तक्रार आहे.

या पंचपंडितांनी या लेखमालेचा प्रपंचच यासाठीच केलेला दिसतो. भारतीय लष्करावर या पंचपंडितांनी केलेली टीका, ही भारताचे शत्रूराष्ट्रही करण्यास धजावणार नाही, इतकी गंभीर आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या पंचपंडितांनी अशी भूमिका घेतलेली आहे की, दलित हा या स्वातंत्रलढ्यातील स्वतंत्र गट आहे, त्याचे स्वतःचे राजकारण आहे. दलितांचे तारणहार म्हणून रझाकार काम करत होते. तसे एक उदाहरणही एका पंडिताने दिलेले आहे. एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारतातील दलितांमध्ये नवचैतन्य निर्माण करत असताना आणि मुस्लिमांचा प्रश्न, त्यांचे राजकारण समजावून सांगत असताना, इकडे मात्र हिंदूंच्या मूळावर उठलेले रझाकार दलितांच्या उद्धारासाठी काम करत असल्याचे हे पंचपंडित नमूद करतात.

मूळामध्ये हिंदू-मुस्लीम संघर्षांत एक मोहरा म्हणून दलितांचा वापर करता येऊ शकतो, हे चाणाक्ष निझामाने ताडलेले होतेच. त्यासाठीच तो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना प्रलोभन देऊन हिंदूंच्याच विरोधात उभे करण्यासाठी या संसाधनाचा वापर करत होता. एका बाजूला दलितांना तुच्छ लेखणारी जातीव्यवस्था, तर दुसऱ्या बाजूला ‘पहा, आमच्या धर्मात कशी समता आहे’ म्हणून त्यांना भूलवून हिंदूंवर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांचा गुप्त बातम्या मिळवण्यासाठी रझाकारांनी वापर केला. याच्या असंख्य नोंदी सापडतात. म्हणून रझाकार ‘दलितांचे तारणहार’ होते, ही भूमिका पटणारी नाही.

आपण हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांची, अल्पसंख्याकांची भूमिका सांगत आहोत, त्यांचा दडपला गेलेला इतिहास सांगत आहोत, या आविर्भावात हे पंचपंडित नको त्या बाबींचे समर्थन करतात आणि एका मोठ्या अत्याचाराबाबत मात्र सोयीस्करपणे मौन बाळगतात.

बाबासाहेबांची शेवटी हैदराबाद संस्थानासंदर्भातील भूमिका काय होती, हे मात्र हे पंचपंडित सांगतच नाहीत. काहीतर गूढ, धुके निर्माण करतात. शेवटी बाबासाहेबांच्या भूमिकेच्या एकदम उलट भूमिका घेतात. हैदराबाद संस्थानामध्येच दलितांचे हित होते, या निष्कर्षाला येतात. हे निष्कर्ष बाबासाहेबांच्या स्वातंत्र्याबाबत, लोकशाहीबाबतच्या भूमिकेशी पडताळून पाहिल्यावर, या पंचपंडितांचा खोटेपणा सपशेल उघड पडतो.  

‘रझाकार - सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या मुहूर्तानिमित्त सी यामिनी कृष्णा यांनी जो लेख लिहिलेला आहे, त्यात ‘माँ भूमी’ या चित्रपटाचा उल्लेख केलेला आहे. पण तेलुगुमध्ये ते ‘मा भूमी’ आहे. ‘मा भूमी’ म्हणजे ‘आमची भूमी’. ‘माँ भूमी’ म्हणजे ‘आई भूमी’ असा होतो. हा खरे म्हणजे तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा इतिहास कथन करणारा १९७९चा कृष्ण-धवल चित्रपट आहे. तो तेथील भयानक वर्गसंघर्ष चित्रित करतो. त्याला हैदराबाद मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी आहे. पण त्याला २०१०च्या ‘वीरा तेलंगाणा’ आणि २०११च्या ‘राजन्ना’ या चित्रपटांशी जोडून यामिनी कृष्णा यांनी आपल्या मनातली मळमळ ओकली आहे.

..................................................................................................................................................................

‘खिडकी कलेक्टिव्ह’ची पाच लेखांची मालिका -

हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास

तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…

हैदराबादमधील ‘दलित रझाकार’ नावाचा त्रासदायक भूतकाळ, अल्पसंख्याकांची युती आणि ‘पोलीस ॲक्शन’

१९४८च्या ‘पोलीस ॲक्शन’चे ध्रुवीकरण केले जात आहे. या काळातली जातीय सलोख्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. ती उजागर करण्याची गरज आहे!

दिवसा रझाकार यायचे, रात्री ‘ते’ यायचे : तेलंगणातील स्त्रियांच्या आठवणीतली ‘पोलीस ॲक्शन’

..................................................................................................................................................................

निझामाच्या विरोधात अस्तित्वाचा संघर्ष करणारे, त्यासाठी जंगल तोडणारे, रेल्वे रुळ उखडणारे स्वातंत्र्यसैनिक या पंचपंडितांना हैदराबाद संस्थानातील मालमत्ता आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करणारे वाटतात, हा या पंचपंडितांच्या अभ्यास वा संशोधनाचा निष्कर्ष!

एका स्वतंत्र लेखात दलित रझाकारांची चर्चा केलेली आहे. त्यात १९७८ची मराठवाड्यातील ‘विद्यापीठ नामांतराची चळवळ’ आणि १९४८ची ‘पोलीस अ‍ॅक्शन’ यांची तुलना केलेली आहे. बाबासाहेबांची दलित राजकारणाबाबत एकंदर भूमिका स्पष्ट न करता, हैदराबाद संस्थानामधील ‘हैदराबाद स्टेट शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना, भूमिका, कामगिरी काहीही न सांगता बाबासाहेब येथील दलितांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय करण्यासाठी चर्चिलशी चर्चा करती होते, डब्लू. बी. बोइस या विचारवंताशी करत होते, अशी सैल विधाने करतात. तर कधी १९४६, तर मध्येच मागे १९३२, असे पुढे-मागे जात मुस्लिमांना आणि दलितांना हिंदू बहुसंख्याकांच्या सत्तेची भीती वाटत होती, अशी हास्यास्पद विधाने करतात. 

स्वातंत्र्याच्या १३ महिन्यानंतरही निझाम भारतात यायला तयार नव्हता आणि आझाद हैदराबाद होण्यासाठी जंग जंग पछाडण्यासाठी प्रयत्न करत होता. या काळात भारतभरातील मुस्लीम गुंडांना मुद्दाम हिंदूंच्या संपत्तीचा ताबा घेण्यासाठी बोलावत होते. अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये १३ ते १७ सप्टेंबर १९४८ या कालावधीत ‘पोलीस अ‍ॅक्शन’अंतर्गत कारवाई केली गेली.

याबद्दल या पंचपंडितांमधील मोहम्मद आयुब खान काय म्हणतात पहा. ते म्हणतात, “भावना जेव्हा समुदायाचा ताबा घेतात आणि विवेकाला वाऱ्यावर सोडले जाते, तेव्हा काय होते, याचे एक उदाहरण म्हणून हैद्राबाद ‘पोलीस अ‍ॅक्शन’कडे पाहायला पाहिजे.” स्वतःचा विवेक वाऱ्यावर सोडल्याचे हे लक्षण नव्हे का? हैद्रबाद मुक्तिसंग्रामाची घटना या पंडिताला ‘दुर्दैवी’ वाटते.

सुंदरलाल समितीचे तुणतुणे येथेही वाजवण्यात आले. एकेकाळी रद्दीत टाकलेला हा अहवाल नंतरच्या काळात तत्कालीन नेते काळाच्या पडद्याआड गेल्यावर डोक्यावर घेऊन नाचत सुटलेले आहेत. हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे संदर्भ वगळून केवळ मुसलमानांवरील अत्याचाराची आकडेवारी - तीही बहुतांशी खोटी - सुंदरलाल समितीच्या अहवालात आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रझाकार अत्याचार का करत होते, याबद्दल मोहम्मद आयुब खान सुंदरलाल समितीच्या अहवालातील वाक्य उदधृत करतात : “रझाकार अत्याचारांमध्ये मुख्यतः प्रत्येक शहर आणि गावावर मासिक रक्क्म आकारण्यात येत असे. जेथे ही रक्कम स्वेच्छेने भरली गेली, तेथे सामान्यतः कोणताही त्रास झाला नाही. पण ज्या ठिकाणी प्रतिकार झाला, तेथे लूट करण्यात आली. लुटीनंतरही रझाकारांना प्रतिकार झाला, तर खून आणि बलात्कारच्याही  काही घटना घडल्या.” वाह! याला म्हणतात अभ्यास! संशोधन!!

रझाकार दोन लाख नव्हते, त्यामध्ये सामान्य गरीब मुस्लीम नव्हते, हे सिद्ध करण्यासाठी एक नवे कथन घडवण्याचा प्रयत्न खान यांनी केला आहे. एमआयएम हा केवळ २००० जमीनदार कुटुंबियांचा पक्ष असून सामान्य मुसलमानांची स्थिती हिंदूंप्रमाणेच होती, हे सांगण्याचा किती हा अट्टाहास!

या लेखात सामान्य मुसलमानांची कोणतीही भूमिका नसताना त्यांना लष्कराने कसे मारले, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जणू रझाकारांनी यापूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये चालवलेला नरसंहार न्यायालयाच्या निकालानंतरच केलेला होता आणि स्वातंत्र्यासाठी लढणे, ही भूमिकाच चुकीची होती! रझाकारांनी हैद्राबाद संस्थानात हिंदूंवर केलेल्या भीषण अत्याचाराची इतर कशाशीही तुलना करता येणार नाही, इतके ते सूडबुद्धीचे आणि भयंकर होते.

थोडक्यात, काय तर नव्या पिढीतील तरुण लेखक किती दिशाभूल करतात, याचा उत्तम नमुना म्हणून या पंचपंडितांच्या या पाच लेखांकडे पाहायला पाहिजे. काही विकृत मानसिकतेचे लोक आपण काही वेगळे सांगत आहोत, अशी बतावणी करून मराठवाडा ज्या धैर्याने निझामाच्या विरोधात लढला, त्याचा मनोभंग आणि तेजोभंग करण्याचे काम करत आहेत. हे पंचपंडित त्यांपैकीच एक म्हणावे लागतील.

हैदराबाद संस्थानामध्ये विद्रोह करणाऱ्यांना मध्ययुगीन दंड आणि शिक्षा दिली जात असे. तरीही अनेक स्वातंत्र्यसैनिक निर्भयपणे निजामाविरोधात लढले. त्याची भयानक मोठी किंमतही त्यांनी मोजली. काहींना आपले प्राण गमवावे लागेल, काहींना आपले नातवाईक गमवावे लागले. त्यांच्याबाबत या पंचपंडितांची काय भूमिका आहे, तर ते अन्यायी, अत्याचारी होते, ही! व्वा, रे संशोधन, वा रे अभ्यास!

भारतामध्येही दारिद्र्य, विषमता, भेदाभेद होते, आहेत, राहतील. त्यासाठी सातत्याने लढायला हवे, याबाबत शंकाच नाही. मात्र एखाद्या लढ्याचे - ज्यातील लोकांशी आज आमचे वैर आहे म्हणून - योगदान नाकारणे आणि त्या लढ्यातल्या अन्यायकारक-जुलमी शत्रूच्याच वळचणीला बसून त्याच्या गुलामगिरीचे पोवाडे गाणे, तेही पुरोगामित्वाच्या नावाखाली, हे केवळ आणि केवळ लांच्छनास्पदच आहे!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......