अजूनकाही
कालची घटना
दिग्दर्शक अमित राय यांचा ‘ओमजी २’ हा हिंदी चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच चर्चेत आला होता. कारण सेन्सॉर बोर्डाने त्यातील २७ दृश्यांना कात्री लावली आणि त्यानंतरही त्याला ‘A’ सर्टिफिकेट देण्यात आले- म्हणजे ‘१८ वर्षांपुढील व्यक्तींसाठी’ म्हणून मान्यता देण्यात आली.
हा चित्रपट धर्म, न्यायव्यवस्था, सामाजिक दांभिकता, किशोरवयीन संताप, लैंगिक शोषण, लैंगिक शिक्षण आणि जनजागृतीचे महत्त्व, या विषयांवर भाष्य करतो. यातील कांती मुगदल (पंकज त्रिपाठी) या पात्राचा एक छोटासा व्यवसाय असतो. तो आपले काम आणि घर यात सुखी-समाधानी असतो. मात्र एके दिवशी त्याच्या लहान मुलाला शाळेतून काढून टाकले जाते. कारण काय, तर तो शाळेत ‘हस्तमैथुन’ करताना पकडला जातो. त्याची शाळेत बदनामी होतेच. त्याचा तो व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यामुळे शहरातदेखील बदनामी होते.
खरं तर, या मुलाला समजून घेण्याची आणि त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असते, पण आपला समाज त्याच्याकडे ‘गुन्हेगार’ म्हणून बघतो. जणू काही त्याने ‘इंडियन पिन कोड’ खाली येणारा एखादा भयंकर गुन्हाच केला आहे.
ही घटना आहे, एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकातली.
आता विसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकातली एक घटना पाहू.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
परवाची घटना
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री-शिक्षण आणि विधवा प्रथा बंद करण्यासाठी मूलभूत स्वरूपाचे काम केले. तोच वारसा त्यांचा मुलगा र.धों. कर्वे यांनी पुढे चालवला. संतती नियमन, लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती, स्त्रीच्या लैंगिक इच्छा, स्त्री-शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यासाठी र.धों.नी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी १९२१मध्ये भारतातील पहिले गर्भनिरोधक क्लिनिक सुरू केले. १९३०मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक सुरू केले. ते १९५३पर्यंत म्हणजे २३ वर्षे नेटाने चालवले. त्यातून व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर स्वत: आणि इतरांचे लिखाण प्रकाशित केले.
र.धों.नी कामवासना, गुप्तरोग, नपुसंक, बलात्कार, हस्तमैथुन, धर्म आणि नीती, संतती नियमन, स्त्री स्वातंत्र्य, मासिक पाळी यांसारख्या अनेक विषयांवर लिहिले. त्यांनी लैंगिक साक्षरता नसल्यामुळे स्त्री-पुरुषांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर कसा दुष्परिणाम होतो, याची सप्रमाण मांडणी केली. र.धों.नी निर्भिड आणि बेधडकरित्या आपले विचार मांडल्यामुळे त्यांच्यावर १९३१मध्ये व्यभिचाराचे अनेक अनेक खटले दाखल केले गेले, तरीही त्यांनी त्यांचे लेखन थांबवले नाही.
त्यांनी समलैंगिक संबंधाबद्दलही उघड भाष्य केले होते. १९३४मध्ये त्यांच्यावर ‘अश्लील’तेचे लेबल लावून पुन्हा नवीन खटला दाखल झाला. या वेळी व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्यांचे वकील म्हणून न्यायालयात उभे राहिले. त्यांनी र.धों.ची बाजू खूप नि:पक्षपणे मांडली. तेव्हा नायमूर्तींनीदेखील ‘लैंगिक शिक्षण कशाला पाहिजे? कशाला ती विकृती?’ असे बोलत अनेक प्रश्न उभे केले. तेव्हा बाबासाहेबांनी ‘जर हे प्रश्न विकृती असतील, तर ती विकृती ज्ञानाने दूर होईल’ अशा पद्धतीने त्यांची बाजू मांडली होती. र.धों.चं लिखाण अश्लील नसून काळाला सुसंगत आणि समाजपरिवर्तनासाठी गरजेचं आहे, हे बाबासाहेबांनी न्यायालयात पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण धर्माच्या बेडीत अडकलेल्या आणि शारीरिक संबंधांना ‘शांतम् पापम्’ मानलं जाणाऱ्या तत्कालिन काळात त्यांचं म्हणणं ऐकणार कोण? अखेरीस र.धों. केस हरले आणि त्यांना दंड स्वरूपात शिक्षा झाली.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
भारतीय राजकारणात जबरदस्त उलथापालथ होऊन सगळी समीकरणं बदलली, तरीही ओडिशा राज्यात एक मुख्यमंत्री २३हून अधिक वर्षं टिकून राहिला, त्याची गोष्ट...
विरोधी ऐक्यातील सर्वांत कमजोर कडी अन्य कुणी नसून ‘काँग्रेस’च आहे
कालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूलने आपली राज्यावरील पकड आणखी मजबूत केली आहे!
.................................................................................................................................................................
आजची घटना
सोशल मीडियामुळे तर ‘फॉरवर्ड जनरेशन’ म्हणून फेशनेबल कपडे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टी, फास्ट फूड, नवनवीन तंत्रज्ञान यांचा सहज स्वीकार आताच्या पिढीनं केलेला दिसतो. पण आजदेखील जर मोबाईलवर एखादा मेसेज किंवा व्हिडिओ आला आणि त्यात ‘सेक्स, मास्टर्ब्युशन, लैंगिक इच्छा’ यांच्याशी संबंधित शब्द जरी दिसले तर, लाजेमुळे मोबाईल कोपऱ्यात नेऊन, मग त्या पोस्टची लिंक आपण उघडून बघतो किंवा न बघताच ती पोस्ट डिलीट करून टाकतो. जर त्या वेळी आपल्या शेजाऱ्याने चुकून तो मेसेज किंवा व्हिडिओ पाहिला, तर लगेच आपल्याला ‘किती घाण/किती अश्लील आहे ही व्यक्ती’ या नजरेनं आपल्याकडे दोषी समजून पाहिले जाते. तुम्हाला पण असा अनुभव आला असेलच…
आपला आणि आपला दांभिक दृष्टीकोन
र.धों. कर्वे यांचा काळ आणि ‘ओमजी-२’ यांत ६०-७० वर्षांचे अंतर आहे. दरम्यानच्या काळात आधुनिकीकरणामुळे खूप कायापालट झालेला दिसतो. तरीही ‘लैंगिक शिक्षणा’बाबत आपल्या आणि आपल्या एकंदरीत समाजाच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही.
परिणामी र.धों.ना १९३०मध्ये विरोध झाला, तसाच आज, २०२३मध्ये होतो आहे. धर्मानं बांधलेली समाजाची घडी विस्कटेल, अशी भीती तथाकथित संस्कृतिरक्षकांना कायमच वाटत राहत आली आहे. आधुनिकतेचा पूर्णपणे स्वीकार केलेल्या समाजात लैंगिक शिक्षणाला आजही तितकाच विरोध होणे, ही अत्यंत खंतजनक आहे.
खरं तर, किशोरवयीन मुलांनी हा चित्रपट आवर्जून पाहायला पाहिजे, मात्र त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘बॅन’ करण्यात आला आहे. किशोरवयीन काळात मुलगा असो वा मुलगी, वयात येत असताना, त्यांच्यात संप्रेरकांमुळे (हार्मोन्स) शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल झपाट्याने होऊ लागतात. त्या बदलांशी जुळवून घेताना योग्य मार्गदर्शक मिळणे आवश्यक असते. अन्यथा अनेक संभ्रम आणि गैरसमज निर्माण होतात. भिन्न लिंगी किंवा समलिंगी आकर्षण, शॉर्ट टेम्पर, मोठे झाल्यासारखे वाटणे, स्वतःचे मत आणि अस्तित्व इतरांसमोर मांडणे, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धोकादायक प्रयोग करणे, यासारख्या अनेक गोष्टी या वयात वाटू लागतात. त्यांना नीट वाट मिळाली नाही, तर या वयातल्या मुलांकडून प्रसंगी गंभीर चुका होतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...........................................................................................................................................................
पॉर्न अॅडिक्शन, मादक पदार्थाचे व्यसन, गेम्स अॅडिक्शन, पिअर प्रेश्नर म्हणजे मैत्रीतील दबाव, असुरक्षित लैंगिक संबंध, त्याचे व्हिडिओ ‘व्हायरल’ करून बदनामी करणे, यांसारखे गंभीर गुन्हे घडू लागतात. यामुळे निराशा ते आत्महत्या यांसारखे गंभीर परिणामदेखील झालेले दिसतात.
हल्ली तर आपलं इतिहासाचं प्रेम फारच उफाळून आलेलं आहे. जेव्हा तेव्हा आपण आपल्या वैभवशाली इतिहासाचे दाखले देत असतो. आपल्या वात्स्यायनांनी लिहिलेला ‘कामसूत्र’ हा ग्रंथ जगभरात अभ्यासला जातो. आपल्या पूर्वजांनी कोरलेल्या खजुराहोंसारख्या शिल्पांमधून लैंगिकतेबाबतचा मोकळेपणा साधार स्वीकार केलेला दिसतो. पण हा आपला इतिहास आपण सोयीस्करपणे विसरतो.
एकीकडे आपण ‘मॉडर्न’ असल्याचे दाखवत सोशल मीडियावर स्वत:चे प्रतिमासंवर्धन करतो, तर दुसरीकडे ‘लैंगिकते’बाबत अतिशय जुनाट, बुरसटलेले विचार कवटाळून बसतो.
.................................................................................................................................................................
लेखिका अंजली प्रवीण नेशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली इथं ‘फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्रॅम’मध्ये ‘डेटा विश्लेषक’ म्हणून कार्यरत आहेत. तसंच ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम’च्या अभ्यासक आहेत.
amkar.anju@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment