सीमाताई साखरे : सासूनं नव्वदी ओलांडली!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्त्री-शक्ती पुरस्कार स्वीकारताना डॉ. सीमाताई साखरे
  • Sat , 19 August 2023
  • पडघम राज्यकारण सीमाताई साखरे Simatai Sakhare

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातला बुलंद आवाज असलेल्या डॉ. सीमाताई साखरे यांनी काल (१८ ऑगस्टला) वयाची नव्वदी पूर्ण केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला, तर नाव सांगताच सीमाताई एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला भेटल्या, तेव्हा ज्या उत्साहानं बोलत अगदी तशाच बोलल्या. नव्वदीतही सीमाताईंचा आवाज आणि स्मरणशक्ती ठणठणीत असल्याचं जाणवलं. खरं तर खूप वर्षांनी आम्ही बोलत होतो, पण नाव सांगताच त्यांचं खळाळणं लगेच सुरू झालं.

नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात मी रुजू झालो ते वार्ताहर म्हणून. मला खरं तर उपसंपादक व्हायचं होतो, पण कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणाले नरेश गद्रे म्हणाले, ‘तू सिटी रिपोर्टिंगमधे जॉईन हो’ आणि पर्याय नसल्यानं मी वार्ताहर झालो.

नोकरीच्या पहिल्याच दिवशी पहिली असाईनमेंट केली ती रूपाताई कुलकर्णी यांची. तेव्हा धंतोलीतल्या आनंदाश्रम या लॉजवर उतरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी येताना पत्रकार भवनातली सीमाताई साखरे यांची पत्रकार परिषद करून, या असं आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी सांगितलं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

रूपाताई आणि सीमाताई या दोघी तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होत्या. दोघीही स्त्रियांच्या हक्कासाठी आणि अत्याचारच्या विरोधात लढत होत्या. दोघीही उच्च विद्याविभूषित होत्या, मात्र दोघींच्याही कामाचा बाज पूर्णपणे वेगळा होता. रूपाताई म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी लढणारी तेजस्वी ज्योत, तर सीमाताई साखरे म्हणजे धगधगती मशाल. गेली सहा दशकं ही मशाल पेटलेली आहे!

नंतरच्या काळात सीमाताई आणि रूपाताई यांच्याशी निकट संपर्क आला. त्यांची अनेक आंदोलनं, पत्रकार परिषदा, सभा कव्हर केल्या. दोघींच्याही जवळच्या गोटात माझा समावेश झाला. मंगला आणि मी आम्हा दोघांनाही या दोघींचं अपार ममत्व लाभलं.

कुणा महिलेवर अत्याचार झाल्याची केस आली की, सीमाताई न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक होत. त्यांच्यात जणू बिजली संचारत असे. समोरचा माणूस कुणी बडा धनवान आहे की बडा अधिकारी की राजकारणातलं बडं धेंड, यांचा सीमाताईंवर कोणताही परिणाम होतं नसे; कोणी कितीही दबाव आणला तरी पीडितेच्या बाजूनं सीमाताई हिंमत बांधून ठामपणे उभ्या राहात आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान  करत. त्यांच्यातल्या ऊर्जेसाठी ‘अफाट’ हा एकच शब्द आहे. हातात आलेल्या केसचा केलेला सखोल अभ्यास, खणखणीत आवाज आणि आक्रमकता हे सीमाताईंचं भांडवल असायचं. त्यामुळे समोरचे लोक त्यांना वचकून असत. पोलीस, कायदा आणि आंदोलन अशा तिन्ही पातळ्यांवर सीमाताई एकाच वेळी लढत असत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

राजकारण हा शक्यतांच्या जुळवाजुळवीचा खेळ असतो आणि त्यात अर्ध कच्च्या किंवा सोडून दिलेल्या बातम्यांचा मोठाच वाटा असतो!

भारतीय राजकारणात जबरदस्त उलथापालथ होऊन सगळी समीकरणं बदलली, तरीही ओडिशा राज्यात एक मुख्यमंत्री २३हून अधिक वर्षं टिकून राहिला, त्याची गोष्ट...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

विरोधी ऐक्यातील सर्वांत कमजोर कडी अन्य कुणी नसून ‘काँग्रेस’च आहे

कालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूलने आपली राज्यावरील पकड आणखी मजबूत केली आहे!

कर्नाटक विजयानंतर काँग्रेसने तेलंगणात कात टाकली आहे. त्यामुळे भाजप व केसीआर यांच्यासमोर पेच उभा राहिला आहे

.................................................................................................................................................................

अशी त्रिस्तरीय लढाई आणि त्यासाठी पायाला चाकं लावून कायम दौऱ्यावर असतानाच वृत्तपत्रांतून सातत्यानं लेखन करत जनमन जागृतीचाही सीमाताई यांचा प्रयत्न सुरू असे. जात-पात आणि धर्माच्या सीमा मोडीत काढत स्त्रीहक्काच्या संघर्षासाठी आवश्यक असणारं धवल चारित्र्य आणि अफाट लोकसंग्रह सीमाताईंच्या गाठीशी कायमच राहिला.

खरं तर, एखाद्या वृत्तपत्रात स्तंभ लेखन करणाऱ्याचं लेखन (क्वचित बातमीही) अन्य वृत्तपत्रांत प्रकाशित न होण्याचा साधारण संकेत त्या काळात होता (सीमाताई तेव्हा ‘लोकमत’ या दैनिकात स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात स्तंभलेखन करत) पण, सीमाताई त्या संकेताला एकमेव सन्माननीय अपवाद होत्या. नंतरच्या काळात या सर्व अनुभवांवर आधारित एक पुस्तकही त्यांनी लिहिलं. त्या काळात संध्याकाळी प्रेस-नोट देण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात सीमाताई येत आणि संपादकीय विभागात काही काळ ठिय्या ठोकत. संपादकीय विभागातील प्रत्येकाशी दोन शब्द तरी बोलण्याचा त्यांचा रिवाज असायचा कारण प्रत्येकाशी त्यांची ओळख होतीच.

इतक्या बिझी असल्यावर सीमाताईंना संसार, नोकरी आहे का, असल्यास प्रपंच, नोकरी त्या केव्हा करतात आणि ते करायला त्यांना वेळ केव्हा मिळतो याचं आम्हाला आश्चर्य वाटत असे. त्या सुरुवातीच्या काळात सीमाताईंच्या प्रेमविवाहाची कथा एकदा ज्येष्ठ पत्रकार वामनराव तेलंग आणि आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी आम्हाला रंगवून सांगितली. लक्ष्मी भवन चौकातल्या एका चाळीतील त्यांच्या वास्तव्याच्या काळातल्या श्री आणि सौ. साखरेंच्या संसाराच्या कथा सांगितल्या. पुढे सीमाताईंच्या घरी जाणं-येणं वाढलं आणि वामनराव तेलंग, तसंच दिनकर देशपांडे यांनी जे काही सांगितलं होतं, त्यावर विश्वास बसला. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

सीमाताईंशी माझं बाँडिंग जरा वेगळं निर्माण झालं. तो प्रसंग मला अजूनही लख्ख आठवतो. त्या माझ्या आधीपासूनमंगलाला ओळखत. आमच्या दोघांत कांही तरी ‘गुफ्तगू’ सुरू असल्याची चाहूल त्यांना लागलेली होती. वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेरही त्यांनी आम्हा दोघांना पाहिलेलं होतं, पण विवाहाची नोटीस दिल्यानंतरच काय व्हायचा तो बोभाटा होऊ द्यायचा, हे आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं.

१९८४च्या जानेवारी महिन्यात नागपूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वसूचनेची नोटीस देऊन मंगला, मी आणि आमचा दोस्तयार प्रकाश निंबेकर बाहेर आलो, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आणि तेही अगदी आमच्या समोरच सीमाताई उभ्या. त्यांच्यासोबत काही महिला होत्या आणि सीमाताई नक्कीच त्यांचं काही गाऱ्हाणं घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या होत्या. त्या लगाबगीनं लगेच आमच्याकडे आल्या आणि त्यांनी विचारलं, ‘काय करताय रे तुम्ही दोघं इथं?’

क्षणभर गप्प राहून ‘आम्ही दोघं विवाहाची नोटीस  द्यायला आलो होतो’, हे मी सांगून टाकलं. आमचं अभिनंदन करून, ‘घरून काही प्रॉब्लेम नाही नं? पण, काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी ठाम’ असं त्या म्हणाल्या. ‘काही प्रॉब्लेम नाही, एकच राहिलं आहे आणि ते म्हणजे मंगलानं अजून हुंडा दिलेला नाही’, असं मी गमतीनं म्हणालो. मंगलाला जवळ घेत सीमाताई म्हणाल्या- ‘माझी लेक मोठी गुणांची आहे. हुंडा तू नुसता मागितला तरी तुला धडा शिकवेन’. मी म्हटलं, ‘ती नाही तर तुम्ही द्या मला हुंडा. फार नको मला एक सूट हवा आहे’. ‘हुंडा म्हणून नाही, तर भेट म्हणून तुला सूट देईन’, असं मग सीमाताईंशीनी सांगितलं.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...........................................................................................................................................................

तेव्हापासून त्यांना मी कायमच सासूबाई म्हणू लागलो. काल त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संवादाची सुरुवातही मी ‘काय म्हणता सासूबाई?’ अशीच केली. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या लाडक्या लेकीचा अकाली झालेला मृत्यू, मंगलाचं नसणं असे काही हळवे पक्षी बोलण्याच्या ओघात स्वाभाविकपणे पिंगा घालून गेले आणि आम्हा दोघांच्याही आवाजात दर्द आला...

तो मूड घालवण्यासाठी इकडचं तिकडचं बोलून त्यांच्याकडून न मिळालेल्या सूटची आठवण करून दिली. सीमाताई म्हणाल्या, ‘तू ये एकदा नागपूरला, घेऊन देते मी सूट’. मीही आता वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर आलोय, कधी भेट होईल, का होणारच नाही, हे सांगता येत नाही... पण ते असो.

सुमारे साडेचार दशकापूर्वी जगण्यात आलेल्या सीमाताई नावाच्या माझ्या सासूबाई आता वयाच्या नव्वदीत पोहोचल्या आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......