अजूनकाही
काल नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांच्या दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख...
.................................................................................................................................................................
स्वातंत्र्यलढ्यासाठी अविरत झगडणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सावरकर आणि जिना या दोघांनी निराश केले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्या मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेबद्दल ते म्हणतात -
“मिस्टर जिना इंग्रजांच्या मदतीने फक्त पाकिस्तानची आपली कल्पना कशी प्रत्यक्षात आणायची याचाच विचार करत होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी काँग्रेससोबत संयुक्त लढा उभारण्याची कल्पना त्यांना आवडली नाही… श्री सावरकर… हिंदुस्थानातील ब्रिटनच्या सैन्यात प्रवेश करून फक्त लष्करी प्रशिक्षण कसे मिळवता येईल याचा विचार करत होते. या मुलाखतींवरून मी असा निष्कर्ष काढला की, मुस्लीम लीग किंवा हिंदू महासभेकडून काहीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.” (“The Indian Struggle” by Netaji Subhas Chandra Bose)
त्या काळातदेखील मुस्लिमांची परिस्थिती मागासलेली होती. जेव्हा नेताजी कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले, तेव्हा त्यांनी लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंपेक्षा जास्त मुसलमानांची नेमणूक कॉर्पोरेशनमध्ये केली होती. केवळ आणि केवळ हिंदूंची एकाधिकारशाही संपवण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल उचलले होते. त्यामुळे एकीकडे हिंदुत्ववादी त्यांच्यावर खूप चिडले होते, तर दुसरीकडे महात्मा गांधी आणि सी.आर. दास यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांची स्तुती केली होती.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
त्या वेळी त्रस्त झालेले सावरकर त्यांची टीका करतात - “बोस काही गांधींपेक्षा फार वेगळे नव्हते, त्यांनी मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी आणखीन पुढचे पाऊल टाकले.”
पुढे पुन्हा एका ठिकाणच्या चर्चेनंतर सावरकर म्हणतात - “(नेताजींना) हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या या मृगजळाने वेड लावले आहे."
वेड? सावरकरांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा नेता वेड लागल्यासारखा का वाटावा?
नेताजी आणि गांधी यांना कित्येकदा एकमेकांचे शत्रू असल्यासारखे दाखवण्यात येते. त्याविरोधात एकच उदाहरण पुरेसे ठरावे. नेताजी यांना महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि चंद्रशेखर आझाद यांबाबत प्रचंड आदर होता. म्हणूनच ‘आझाद हिंद फौजे’मध्ये गांधी, नेहरू आणि आझाद यांच्या नावाच्या तुकड्या होत्या. (सावरकर किंवा तत्सम कोणत्याही नेत्यांच्या नावाने तुकड्या नव्हत्या.)
इंग्रजांनी लिहिलेल्या धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या इतिहासाला फाट्यावर मारून सुभाषचंद्र बोस म्हणतात - “इंग्रजांच्या आगमनापूर्वीच्या भारतातील राजकीय व्यवस्थेचे वर्णन करताना ती संपूर्णतः मुस्लीम राजवट होती, असे म्हणणे चुकीचे ठरेल. दिल्लीतील मुघल सम्राटांचीच गोष्ट घ्या... आपल्याला आढळून येईल की, प्रशासन हिंदू आणि मुस्लीम एकत्रितपणे मिळून चालवत होते. अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्री आणि सेनापती हिंदू होते.”
१८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीद बहादूर शाह जफर यांना वंदन करण्यासाठी ते स्मारकाला भेट देतात. आज टिपू सुलतानचा द्वेष करणाऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे की, टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात दिलेल्या लढ्याचा आदर राखत त्यांच्या राजवटीतील वाघाच्या निशाण्याचा वापर आझाद हिंद सेनेच्या गणवेशात केला. पुढे ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या आपल्या पक्षाच्या झेंड्यावरही तोच वाघ वापरला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
‘All-Party Nehru Report’ (१९२८) दरम्यान लोकांना संबोधित करताना सुभाषचंद्र बोस म्हणतात - “आर्थिक जाणीवेची पहाट धर्मांधतेचा विनाश दर्शवते. मुस्लीम शेतकरी आणि मुस्लीम जमीनदार यांच्यापेक्षा हिंदू शेतकरी आणि मुस्लीम शेतकरी यांच्यात जास्त साम्य आहे.”
यावरून हे स्पष्ट होते की, नेताजी केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्यच नाही, तर समाजवादी - समतावादी विचाराने प्रेरित होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांची एकजूट करण्याचे प्रयत्न केली. त्यातूनच ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या खेम्यात ओढण्याचा कावेबाजपणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम मंडळी करत आहेत. त्यामुळे नेताजी यांचा खरा इतिहास पुन्हा पुन्हा सांगण्याची आज नितांत गरज आहे.
संदर्भ -
https://www.southasiamonitor.org/spotlight/appropriating-subhas-chandra-bose-he-was-equally-critical-both-muslim-and-hindu-communal
https://janataweekly.org/modis-portrayal-of-netaji-as-a-hindu-militarist-does-the-secular-socialist-bose-a-disservice/
https://tigerofmysore.wordpress.com/2021/01/24/tipus-mysore-tiger-into-the-flag-of-azad-hind-fauj-of-bose/
.................................................................................................................................................................
लेखक शुभम हाळ्ळे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ‘लोकायत’ संघटनेसोबत कार्यरत आहेत.
halleshubham@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment