मणिपूरमधील कुकी आदिवासींचा अस्तित्वासाठी जीवघेणा संघर्ष
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • मणिपूरमधील हिंसाचाराचं एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 05 August 2023
  • पडघम देशकारण मणिपूर Manipur मैतेई Meitei नागा Naga कुकी Kuki

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये आगडोंब उसळला आहे. त्यात आतापर्यंत १६० लोक मृत्युमुखी पडले आहेत, शेकडो जखमी, तर ६० हजाराच्यावर विस्थापित झाले आहेत. हे अराजक अचानक पसरलेले नसून, ते जणू काही पूर्वनियोजित असल्यासारखे दिसत आहे. ३ मे २०२३पासून मणिपूरमध्ये मैतेई या हिंदू बहुसंख्य समुदायाकडून ख्रिश्चन अल्पसंख्याक आदिवासी कुकी लोकांचा संहार चालू आहे. या वंशसहारात राज्य सरकारच्या पोलिसांचा आणि केंद्र सरकारच्या लष्कराचा पक्षपातीपणा एव्हाना उघड झाला आहे. यात मणिपूरमधील मीरा पाईबीसारख्या महिला संघटनांचाही पुढाकार असल्याच्या बातम्या आहेत.

मीरा पाईबी ही मैतेई समुदायांची महिला संघटना आहे. तिच्यातील हजारो महिलांनी मैतेई समुदायातील हिंसा करणाऱ्या नामांकित गुंडांना लष्कर अटक करून घेऊन जात असताना, त्यांना सोडून देणं भाग पाडलं. ‘पुढील हिंसक प्रकार टाळण्यासाठी आम्ही त्यांना सोडून दिले’, असे लष्कराचे म्हणणे आहे. ही संघटना पुरुषांच्या बरोबरीनं कुकांच्या पहाडी भागात धनधान्य, औषधं वा इतर कोणतंही साहित्य पोहोचू देत नाही. रस्त्यावर उभं राहून जागोजागी ‘पिकेटिंग’ करत आहे.

अफवा पसरू नये, या साठी ३ मे २०२३पासून मणिपूरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तरीही तेथील हिंस्त्र घटनांचे व्हिडिओ बाहेर येऊन, सत्य जगासमोर आलेच. त्यात दोन आदिवासी तरुण कुकी (ख्रिश्चन) महिलांना मैतेई (हिंदू) लोकांनी नग्न करून, त्यांची जाहीरपणे रस्त्यावरून धिंड काढली. मोठ्या जल्लोषात त्यांच्या शरीराशी अश्लील चाळे केले. विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांना कोणताही अटकाव केला नाही. इतकेच नव्हे, तर त्या दोन तरुणींनी ‘पोलिसांनीच आम्हाला या समुदायाच्या हवाली केले’ असे म्हटले आहे. त्या तरुणीपैकी एकीच्या लहान भावाने व वडिलांनी विरोध केला असता, त्यांना त्या समुदायाने तेथेच ठार मारले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

परंतु तरीही पंतप्रधानांनी त्या विरोधात कोणतीही कृती केली नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री एन विरेन सिंग यांनी मात्र ‘अशा शेकडो घटना घडलेल्या आहेत’ असे म्हटले आहे. त्यांच्या या म्हणण्यात तथ्य असले, तरी त्या विरोधात मात्र त्यांनीही कुठलीच कृती केलेली नाही.

‘द हिंदू’मधील एका वृत्तात म्हटले आहे की, इम्फाळच्या पूर्वेतील कुकी समुदायातील एका १८ वर्षीय मुलीने तिच्या एफआयआरमध्ये सांगितले आहे की, तिला ‘मीरा पायबी’च्या महिलांनी पकडले आणि हल्लेखोरांच्या स्वाधीन केले. पुढे जो प्रकार घडला, तो अत्यंत निंद्य असून त्याचा सविस्तर वृत्तांत बीबीसीने दिला आहे.

अशा परिस्थितीत तीन महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलले, त्यातून त्यांनी खरे म्हणजे मणिपूरमधील हिंसाचाराची विडंबनाच केली, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

मणिपूरमधील घटना आफ्रिकेतील रवांडातल्या तुत्सी व हुतू समुदायांमध्ये झालेल्या वंशसंहाराची आठवण करून देणाऱ्या आहेत. मोझांबिकमधील अशाच एका घटनेची प्रत्यक्ष मुक्तभोगी असलेली Ntewasse Gavuno नावाची महिला तिच्या वक्तव्यात म्हणते की,

“त्या लोकांना आम्हाला शिक्षा देण्यात आनंद मिळत होता. ते वस्तीतील १२ ते १४ वर्षांच्या मुलींची निवड करत. त्यांना कपडे काढून नग्न होण्यास भाग पाडत आणि आम्हा सर्व लोकांना उभे करून आमच्यासमोर त्यांच्यावर बलात्कार करत. बऱ्याचदा आम्ही आमचा चेहरा दुसरीकडे फिरवत असू, तेव्हा लगेच ते आमच्या गुप्तांगावर लाथा मारत. आमच्यावर थुंकत आणि बंदुकीच्या बटाने मारून आम्हाला बलात्कार पाहण्यास भाग पाडत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

अशाच आणखी एका प्रसंगी त्यांनी सोळा वर्षाच्या मुलाला सर्वांच्या समोर आपल्या बहिणीवरच बलात्कार करण्यास भाग पाडले आणि तेथे बाजूलाच ते स्वतः त्यांच्या आईवर बलात्कार करत होते. कधी कधी तर दहा दहा पुरुष आमच्यावर बलात्कार करत. आम्ही मरून जाऊ इच्छित होतो, कारण आम्हाला वाटत होते की, आता आम्ही कोणत्याच कामाचे राहिलो नाहीत.” (‘पश्चिम में फेमिनिझम’ - वी.के.सिंह, प्रलेक प्रकाशन, मुंबई.)

अर्थात इतका निंद्य प्रकार अजून भारतातील कोणत्याही राज्यात व मणिपूरमध्येही घडलेला नाही. मात्र पुढे घडणारच नाही, याची खात्री कोण देणार? ज्यांनी ती द्यायला हवी, ते माननीय पंतप्रधान मूग गिळून गप्प बसलेले आहेत. संसदेत बोलण्यापासून तर ते अक्षरशः पळ काढत आहेत. मग भारतीय नागरिकांनी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवावा?

मणिपूरमधील अराजकाबद्दल आतापर्यंत जगभरातल्या अनेक देशांच्या संसदेमध्ये चर्चा झालेल्या आहेत. इंग्लंड-अमेरिकेच्या संसदेतसुद्धा चर्चा झाली. त्यांनी या निंद्य कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील संघटनांनीसुद्धा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताची जगभर चांगलीच नाचक्की झाली आहे. अशाही परिस्थितीत भारतीय संसदेत मात्र सत्ताधारी पक्षाकडून अशी चर्चा होण्यास अडथळे निर्माण केले जात आहेत. म्हणून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. निदान त्यानिमित्तानं तरी संसदेत चर्चा होईल, अशी विरोधी पक्षांची अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मणिपूरच्या राज्यपाल अन्सुईया उईके म्हणाल्या आहेत की, “एवढी भयानक हिंसा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे.” त्या हिंसाग्रस्त भागात जाऊन आल्या. एकूण परिस्थितीचा त्यांनी अंदाज घेतला. असे असतानाही त्यांनी मणिपूरमधील ‘कायदा आणि सुव्यवस्था’ बिघडली आहे, त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असा अहवाल अद्याप राष्ट्रपतींकडे का पाठवला नाही?

तसेच देशाच्या राष्ट्रपती असलेल्या आदिवासी महिला द्रोपदी मुर्मु यासुद्धा अद्यापपर्यंत मणिपूरबद्दल काहीच बोलल्या नाहीत. अर्थात कोणत्याच कारणामुळे काहीच न बोलण्याची त्यांनी हळूहळू सवय करून घेतलेली दिसते! नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाचं त्यांना आमंत्रण न देता, पंतप्रधान मोदींनी एकट्यानेच सर्व सोपस्कार उरकले. त्याबद्दल जरी त्या काहीच बोलल्या नसल्या, तरी निदान मणिपूरमध्ये महिलांवर इतके भयानक अन्याय, अत्याचार, बलात्कार होत असताना, तरी एखादा निषेधाचा शब्द या आदिवासी महिला राष्ट्रपतींनी बोलणे आवश्यक होते. उलट मणिपूरला भेट देऊन आलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले, त्यावर ‘मी विचार करते’ एवढेच त्या म्हणाल्या.

मणिपूरमधील या अराजकात विदेशी शक्तींचा हात असल्याची शंका माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे. खरे तर सुरुवातीला म्यानमारमधून अशी घुसखोरी चालू असून, तेथील अतिरेक्यांचा अशा घटनांशी संबंध असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एन. वीरेंद्र सिंग यांनी केले होते. चीन हा या अराजकामागे असेल, असे नरवणे यांनी म्हटले आहे. पण त्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. तसे असेल तर, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली गुप्तचर संस्था काय करत आहे, असा प्रश्न पडतो?

पण मग या अराजकसदृश्य घटनांमागे कोण असेल, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

देशभरामध्ये मागास, दलित, आदिवासी अल्पसंख्याक समुदायांना भारतीय संविधानाने ज्या आरक्षणादी सवलती दिलेल्या आहेत, तशाच सवलती कुकी आदिवासींनासुद्धा दिलेल्या आहेत. त्याबद्दलची असुया उर्वरित बहुसंख्याक समुदायात देशभर दिसून येते. याचीही पार्श्वभूमी या दंग्याधोप्यामागे आहे. मणिपूरमधील बहुसंख्याक मैतेईंची मागणी आहे की, कुकींना आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सवलती आम्हालाही मिळाव्यात. तो राग त्यांच्या मनात आहे. तोही या अराजकातून त्यांनी व्यक्त केला आहे. याबद्दल देशभरातील आरक्षणविरोधी बहुसंख्य समुदायांना कदाचित सवलती मिळणाऱ्या लोकांची कशी जिरवली, याबद्दल उघड कोणी बोलत नसले, तरी मनातल्या मनात बरे वाटत असावे, असे दिसते.

वरवर तरी हा संघर्ष तेथील मैतेई (हिंदू) व कुकी (ख्रिश्चन, आदिवासी) अशा दोन समुदायांतील आहे, असे दिसते. त्याला जनजातीय व धार्मिक अल्पसंख्याक असाही पैलू आहे. संविधानानुसार सवलती मिळणारे आणि न मिळणारे समुदाय हा जसा सामाजिक पैलू आहे, तसाच जमिनीच्या मालकीहक्क संबंधाचे आर्थिक पैलूही याच्यामागे आहेत. पण या धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध पैलूंच्या आधारावर दोन समुदायांमध्ये विद्वेष पसरवण्याचे काम कोण करत आहे?

तसे पाहिल्यास महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या नग्न धिंडी जातीय द्वेषाने ग्रस्त असलेल्या हिंदुस्थानात नवीन बाबी नाहीत. फार पूर्वीपासून दलित, आदिवासी महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या नग्न धिंडी काढणे, त्यांची विटंबना करणे, यांचा या समुदायाला दडपून टाकण्यासाठी हत्यारासारखा वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नजीकच्या काळातील खैरलांजी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

तरीही मणिपूरमधील अशा नग्न धिंडीमुळे संपूर्ण देशात जर खरोखरच असंतोष पसरला असेल, तर ती चांगलीच बाब आहे, असे म्हणायला पाहिजे. पण या धिंडीविरोधात महिलांनी ठिकठिकाणी जे मोर्चे काढून निदर्शने केलेली आहेत, त्यात मुख्यतः मागासवर्गीय दलित महिलांचाच सहभाग आहे. ही तशी समाधानाची बाब असली तरी त्या महिला विशिष्ट समाजाच्या व अल्पसंख्यांक आहेत, हेही आपणाला विसरून चालणार नाही.

काही भाबड्या लोकांना असे वाटते की, दंग्याधोप्यासारखे प्रकार घडल्यामुळे देशातील जनतेचे मत मोदींच्या अथवा भाजप, संघाच्या विरोधात जाईल. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसते. बहुसंख्य लोकांचाही या कृत्यांना एक प्रकारचा मूक पाठिंबाच असतो. मणिपूरमध्ये ज्या लोकांनी महिलांची नग्न धिंड काढली, ते बहुसंख्यच लोक होते आणि मोठ्या जल्लोषात अश्लील चाळे करत होते.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......