जोसेफ पिंटो : आपल्या जीवनकार्याने हे जग चांगले बनवण्यासाठी, त्यातले चांगूलपण अबाधित राहण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता
संकीर्ण - श्रद्धांजली
अभय वैद्य
  • ‘अक्षरनंदन’ शाळेत जोसेफ पिंटो त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत (सौजन्य - स्नेहल सोनावणे-सावंत
  • Thu , 03 August 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली जोसेफ पिंटो Joseph Pinto पूना हेराल्ड Poona Herald महाराष्ट्र हेराल्ड Maharashtra Herald

पुण्यातील इंग्रजी पत्रकारितेतले एक प्रसिद्ध पत्रकार-संपादक जोसेफ मेलव्हिल पिंटो यांचे २९ जुलै २०२३ रोजी वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.

‘पूना हेराल्ड’ हे पुण्यातील पहिले इंग्रजी दैनिक. नंतर ते ‘महाराष्ट्र हेराल्ड’ या नावाने प्रकाशित होत असे. या वर्तमानपत्राने अनेक पत्रकार आणि लेखक तयार केले. एबेल डेव्हिड या दैनिकाचे संस्थापक-संपादक. नंतर एस.डी. वाघ संपादक म्हणून काम बघत. पुढच्या काळात नावाजलेले लेखक/पत्रकार फारुख धोंडी आणि दिलीप पाडगावकर विद्यार्थिदशेत या दैनिकासाठी लिहीत असत.

ऐंशीच्या दशकात जोसेफ पिंटो (जन्म ५ मार्च १९५१) ‘महाराष्ट्र हेराल्ड’चे संपादक झाले. ते पत्रकारितेच्या जगातील सर्वोत्तम संपादकांपैकी एक होते. खरं म्हणजे तेही स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर आपल्या समवयस्कांप्रमाणेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकाशनांसाठी काम करू शकले असते. किंवा बेनेट कोलमन अँड कंपनीच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या नामांकित इंग्रजी दैनिकातही जाऊ शकले असते. या कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष प्रदीप गुहा हे त्यांचे चांगले मित्र होते. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनची त्यांची मैत्री होती. पुढे आणीबाणीच्या विरोधात प्रतिकाराचा एक भाग म्हणून दोघांनी बारमाही दुष्काळी जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये सामाजिक कामही केले होते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

त्यातही पिंटो यांचा पिंड वेगळा होता. त्यांनी १९७३-८२दरम्यान कृषी संकट दूर करण्यासाठी, प्रौढ साक्षरतेचे वर्ग घेण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी ‘लोक विद्या संघटने’सह विविध संस्थांसोबत काम केले. १९८३मध्ये त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि शेवटपर्यंत ते ‘महाराष्ट्र हेराल्ड’शी एकनिष्ठ राहिले.

पिंटो आचार-विचाराने विवेकवादी होते. त्यांची शेवटपर्यंत तत्त्वे, मूल्ये आणि नीतिमत्ता यांच्याशी बांधिलकी राहिली. कदाचित म्हणूनच त्यांनी समाजाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि मोठ्या वृत्तपत्रांच्या हल्ल्याला तोंड देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्र हेराल्ड’सारख्या एका छोट्या वृत्तपत्रासाठी अथक परिश्रम घेतले.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

भारत हे बहु-धार्मिक, बहु-जातीय आणि बहु-सांस्कृतिक राष्ट्र आहे, या कल्पनेवर पिंटो यांचा प्रगाढ विश्वास होता. त्यामुळे त्यांचा सामाजिक समरसतेला नेहमीच पाठिंबा असायचा. पत्रकार म्हणून त्यांना पुण्यातील विविध संस्थांमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात विशेष रस होता. नंतरच्या काळात आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी संस्थांमधून शिकवणे बंद केले, परंतु तरीही ते ‘अक्षरनंदन’मधील साप्ताहिक ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग घेत होते. इंग्रजीत लिहू इच्छिणाऱ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पिंटो नेहमी प्रोत्साहन आणि प्रेरणा देत.

अलीकडच्या काही महिन्यांत आम्ही अनेकदा बोलत असू आणि जवळजवळ प्रत्येक पंधरवड्याला भेटत असू. तेव्हा आम्ही पत्रकारिता, लेखन आणि समकालीन विषयांवर सविस्तर चर्चाही केलेली आहे. स्ट्रंक आणि व्हाईट यांनी लिहिलेले संपादनावरील पुस्तक, ‘द एलिमेंट्स ऑफ स्टाईल’ आणि विल्यम झिन्सर यांचे ‘ऑन रायटिंग वेल’ या पुस्तकांची पिंटो जोरदार शिफारस करत. ते पत्रकारांना-लेखकांना नेहमी एक सल्ला देत : मनापासून लिहा, समजण्यास सोपे शब्द वापरा आणि अनावश्यक शब्द टाळा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

त्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी प्रा.कल्पना जोशी खडकाप्रमाणे उभ्या होत्या. त्यांची ‘लोक विज्ञान संघटने’च्या काळात भेट झाली होती. पिंटो प्रेमळ पिता आणि आजोबा होते. त्यांचे जीवन कुटुंब, नातू आर्यन, मित्र आणि विद्यार्थी यांच्याभोवती फिरत असे.

निःसंशयपणे, पिंटो यांनी आपल्या जीवनकार्याने हे जग चांगले बनवण्यासाठी, त्यातले चांगूलपण अबाधित राहण्यासाठी सदोदित प्रयत्न केले. आपले प्रियजन आपल्या अंतःकरणात कायम आपल्यासोबत राहतात, पिंटोही राहील.

..................................................................................................................................................................

लेखक अभय वैद्य ‘हिंदुस्थान टाईम्स’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या पुणे आवृत्तीचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.

abhaypvaidya@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......