माझ्या पिढीत अनेक सुशिक्षित महिला आहेत, पण त्यांनी वैयक्तिक कारकिर्दीपेक्षा घराची जबाबदारी महत्त्वाची मानली, कदाचित अशा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी माझी कथा आहे
पडघम - विज्ञाननामा
मंगला नारळीकर
  • ‘लीलावतीज् डॉटर्स’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि डॉ. मंगला नारळीकर
  • Thu , 20 July 2023
  • पडघम विज्ञाननामा लीलावतीज् डॉटर्स Mangala Narlikar मंगला नारळीकर Lilavati's Daughters

ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं नुकतंच निधन झालं. २००८ साली इंडियन अ‍ॅकडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेने ‘लीलावतीज् डॉटर्स’ हा भारतातील महिला शास्त्रज्ञांच्या मनोगतांचा समावेश असलेला ग्रंथ प्रकाशित केला आहे. डॉ. रोहिणी गोडबोले आणि राम रामास्वामी यांनी संपादित केलेल्या या ग्रंथात भारतातील विविध महिला शास्त्रज्ञांचे लेख आहेत. त्यातील हा नारळीकरांच्या लेखाचा अनुवाद...

..................................................................................................................................................................

जर गणितज्ञाला आपण पूर्णवेळ शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक म्हणत असू, तर मी स्वतःला केवळ ‘अर्ध-वेळ शास्त्रज्ञ’ म्हणवून घेईन. माझ्या काळातील महिलांचे मी प्रतिनिधित्त्व करत असल्याने माझ्या अनुभवांबद्दल लिहिते. 

शाळा आणि महाविद्यालयात मला हुशार विद्यार्थी समजले जायचं. विशेष काही प्रयत्न न करता मला शासकीय शिष्यवृत्त्या मिळत गेल्या. शाळेतील शिक्षिका श्रीमती कामत माझ्यावर अतिशय प्रेम करत. त्यांना वाटायचं की, मी महत्त्वाकांक्षी नाही. त्यांचं असं निरीक्षण होतं की, इतर विद्यार्थी अधिक महत्त्वाकांक्षी आहेत, ते कठोर परिश्रम करतात आणि मी मात्र हसत-खेळत जगते.

मला गणिताचा अभ्यास करण्यात विशेष रस होता. मला असा सल्ला देण्यात आला होता की, विज्ञान आणि कला शाखेतील गणिताची पदवी सारखीच आहे. त्यामुळे एम.ए. आणि एम.एस्सी.ला समान किंमत आहे. म्हणूनच मी कला शाखेत प्रवेश घ्यावा आणि दिवसभर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांचे प्रयोग करत बसू नये. मग मी तेच केलं. त्यामुळे मला वाचन आणि चित्रकलेला वेळ देता आला.

महाविद्यालयाच्या पहिल्या दोन वर्षांत मी इतिहास, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि संस्कृत हे इतर विषय घेतले होते. ते सर्व मला आवडायचे. नंतर मला असं जाणवलं की, जरी गणित आवडत असलं, तरी त्यातील अनेक उपयोजित सिद्धान्त मला माहीत नाहीत, कारण मी भौतिकशास्त्र शिकले नव्हते. आता मी कुणालाही हाच सल्ला देईन की, जर तुम्हाला गणित शिकायचं असेल, तर तुम्ही एम.एस्सी. करावं, कारण त्यात एका ठराविक पातळीवर भौतिकशास्त्रसुद्धा शिकावं लागतं. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मी ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’(TIFR)मध्ये संशोधनासाठी गेले. एम.ए.ला असताना माझे कुटुंबीय माझ्या लग्नाचा आग्रह धरत होते. मुलगी २० वर्षांची होते, तेव्हा तिने लग्न करून कुटुंब सांभाळावे, अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते. मला गणित विभागात संशोधन सहायक म्हणून नेमण्यात आले, तेव्हा मला लग्नाचे एक चांगले स्थळ आले, आणि मी त्याला होकार दिला.

तरुण महिलेची पहिली जबाबदारी तिचं कुटुंब असलं पाहिजे आणि उरलेल्या वेळात आपलं शिक्षण, छंद यांना द्यावा, हा माझ्या पालकांचा दृष्टीकोन मी मानला. ते मी कुटुंबापेक्षा करिअरला महत्त्व द्यावे, या मताचे नव्हते, पण सुदैवाने माझ्या सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पतीने माझी गणितात अभ्यास करण्याची इच्छा मानली. केंब्रिजमध्ये मी काही अभ्यासक्रम शिकले आणि तिथं काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं. पण माझं संशोधन थांबलं होतं. कुटुंबाची घडी बसवण्यात मी व्यग्र होते. स्वयंपाकातील प्रयोग, समाजात मिसळणं आणि प्रवास करणं, हे सगळं चालू होतं. केंब्रिजमध्ये असतानाच आमच्या दोन मुलींचा जन्म झाला.

नंतर आम्ही कायमस्वरूपी भारतात आलो. तेव्हा माझे पती ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’मध्ये प्राध्यापक झाले. आम्हाला जवळच राहायला घर मिळालं. तो माझ्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. तिथल्या गणित विभागाला भेट देऊन फावल्या वेळात गणितातील संशोधन संकल्पनांचे काही धागेदोरे जुळतात की नाही, हे मला अजमावून पाहता आलं.

त्यानुसार गणित विभागाला भेट देऊन हळूहळू तिथल्या व्याख्यानांना उपस्थित राहणं सुरू केलं. प्रा. रामचंद्र यांच्या संशोधन गटामध्ये मी ‘अॅनॅलिटिक नंबर थिअरी’वर काम करणं सुरू केलं. वृद्ध सासू-सासरे आणि दोन लहान मुलींची देखभाल करायची असल्याने, माझ्या कामाला तेवढी गती नव्हती. मी पीएच.डी. झाले, मला पदवी मिळाली, तेव्हा आमच्या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला होता. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

टीआयएफआरमध्ये मी ‘Pool Officer’ म्हणून दोन वर्षं काम केलं आणि काही शोधनिबंध प्रसिद्ध केले. काही काळ मुंबई विद्यापीठात गणित शिकवलं. त्या वेळी विद्यापीठ उत्तरेकडील उपनगराकडे स्थानांतरित झालं होतं. मी आठवड्यातून एकदा विद्यापीठात ‘अतिथी प्राध्यापक’ म्हणून जात असे आणि एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना शिकवत असे. १९८९मध्ये आम्ही कायमस्वरूपी पुण्याला आलो. मग मी पुणे विद्यापीठातील गणित विभागात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केलं.

मला मागे वळून पाहताना असं वाटतं की, मी आणखी परिश्रम करून संशोधन पुढे चालू ठेवायला हवं होतं. माझ्या शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे कदाचित माझा स्वभाव महत्त्वाकांक्षी नसल्यामुळे माझी प्रगती खुंटली असावी. त्यामुळे मी कोणाला दोष देऊ शकत नाही.

माझी सर्वांत धाकटी मुलगी लीलावती शाळेतून घरी यायची आणि जर मी तिच्या स्वागताला नसेल, तर नाराज व्हायची. पण चार-पाच वर्षांनी तीच मला म्हणायला लागली की, माझ्या सर्व मैत्रिणींच्या आई दिवसभर काम करतात, मग तू का नाही करत!

आम्हाला तीन मुली आहेत. त्या त्यांची त्यांची कारकीर्द कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत घडवत आहेत. सर्वांत थोरली जीवरसायनशास्त्र विषयाची प्राध्यापक आहे आणि इतर दोन संगणकविज्ञानात संशोधन करतात. त्यांचं आयुष्य अत्यंत व्यग्र आहे, पण त्यांच्या पतींची त्यांना चांगली साथ आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

मला हे सांगितलंच पाहिजे की, मी पूर्णवेळ शास्त्रज्ञ (वैज्ञानिक) जरी बनू शकले नाही, तरी मला घरच्या काम करताना, मुलांचं संगोपन करताना, त्यांचे कपडे शिवताना, प्रवास करताना आणि त्यांचं संगोपन करून त्यांना मोठं करताना समाधान मिळालं.

माझ्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाबरोबर मला बराच वेळ घालवता आला. मी जशी मोठी झाले, तसं जाणवलं की, मला मुलांना गणित शिकवायला आवडतं. शाळेतील मुलांना अवघड गणित विषय समजण्यात मदत करणं, समाधानाचं आहे. म्हणून मी ज्यांना गणिताची भीती वाटते, अशा मुलांसाठी गणित अधिक रंजक करून सांगणारं एक पुस्तक लिहिलं.

माझ्या पिढीत अनेक सुशिक्षित महिला आहेत, पण त्यांनी वैयक्तिक कारकिर्दीपेक्षा घराची जबाबदारी महत्त्वाची मानली, कदाचित अशा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी माझी कथा आहे.  

मराठी अनुवाद : राहुल विद्या माने 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......