एनसीईआरटीने संवाद साधला नाही, तर जे घडत आहे, ते योग्य नाही, अशी शंकेची पाल चुकचुकत राहील
पडघम - विज्ञाननामा
संपादकीय, नेचर
  • ‘नेचर’ या साप्ताहिकाच्या १ जून २०२३च्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 17 July 2023
  • पडघम विज्ञाननामा नेचर Nature उत्क्रांती Evolution एनसीईआरटी NCERT

१९७६मध्ये ‘वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि शोध व सुधारणेची प्रवृत्ती विकसित करण्यासाठी’  भारतीय राज्यघटनेत सुधारणा करून या शब्दांची भर घालण्यात आली होती. पुरावा, तर्क व मानवतावादाची कास धरणे, ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुमारे तीन दशकांच्या काळात अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर येणाऱ्या भारताच्या, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे घटनाकारांचे मत होते. आणि ते योग्यही होते. आता मात्र या मूल्यांचे महत्त्व कमी होत चालल्याचे दिसत आहे. निदान देशाचे शैक्षणिक धोरण आखणाऱ्यांसाठी तरी ही मूल्ये तेवढी महत्त्वाची राहिलेली नाहीत.

विज्ञानाच्या शालेय अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांच्या मालिकेमुळे १४-१६ वयोगटातील माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांतून आधुनिक आवर्तसारणी वगळली गेली आहे. उत्क्रांती व विद्युतचुंबकीयत्वाची स्पष्टीकरणे पाठ्यपुस्तकांतून नाहीशी झाली आहेत. तसेच नैसर्गिक स्त्रोतांच्या शाश्वत वापराबद्दलच्या चर्चांनाही पाठ्यपुस्तकात स्थान उरलेले नाही.

कोविड-१९ महासाथीमुळे शिक्षणामध्ये पडलेल्या खंडाच्या पार्श्वभूमीवर, विद्याथ्यांवरील अभ्यासाचा ताण हलका करण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी ही सर्व प्रकरणे अभ्यासक्रमांतून वगळण्यात आली होती. मात्र, ही प्रकरणे आता थेट पाठ्यपुस्तकांतूनच वगळण्यात आली आहेत. भारतात पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ (एनसीईआरटी) या सरकारी निधीच्या पाठबळाने, पण स्वायत्तरित्या काम करणाऱ्या संस्थेवर सोपवलेली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

३ कोटी ८० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर परिणाम करणाऱ्या या बदलांविषयी एनसीईआरटीने पालक, शिक्षक किंवा संशोधक यांपैकी कोणाशीही चर्चा केलेली नाही. पाठ्यपुस्तकांत करण्यात आलेले बदल योग्य आहेत की नाही, हा पुढील मुद्दा झाला, पण मुळात त्याबद्दल कोणतीही चर्चा न करणे, हेच धक्कादायक आहे, असे मत विज्ञानाच्या शिक्षणाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

भारताच्या वारशाबद्दल अभिमान

अभ्यासक्रमात अन्यत्र समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांमुळे आशयाची (काँटेण्ट) पुनरावृत्ती होत असेल किंवा वर्तमानकाळात आशयाचे महत्त्व तेवढे उरले नसेल, तर अभ्यासक्रमाचे ‘सुसूत्रीकरण आवश्यक ठरते’, असे एनसीईआरटीचे म्हणणे आहे. शिवाय, विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची व मुळातून विचार करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, यावर २०२०मधील भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा भर आहे. यामध्ये आशय स्मरणात ठेवणे किंवा त्याचे पाठांतर यात अपेक्षित नसून, अधिक सक्रिय अध्ययनाचा पुरस्कार केलेला आहे.

अभ्यासक्रम आपल्या मातीत रुजलेला असावा आणि त्यात भारताबद्दल तसेच भारतातील समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन व आधुनिक संस्कृती, ज्ञानप्रणाली आणि परंपराबद्दल अभिमान असावा, असा एनसीईआरटीचा आग्रह आहे. त्याचमुळे चार्ल्स डार्विन व मायकल फॅदेडे यांचे सिद्धान्त काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी भारतातील वसाहतपूर्व विज्ञानाचा इतिहास शिकवला जाणार आहे, असा याचा अन्वयार्थ लावला जात आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

प्राचीन किंवा एतद्देशीय ज्ञानप्रकारांना शालेय अभ्यासक्रमांतून मान्यता व सन्मान कसा द्यायचा, हा प्रश्न एकेकाळी वसाहत असलेल्या भारतासारख्या अनेक राष्ट्रांना सतावत आहे हे खरे. न्यूझीलंडमध्येही काही निवडक शाळांतून ‘माटयअंगा माओरी’ या माओरी ज्ञानप्रकारांचे शिक्षण देण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र, हा नवीन आशय समाविष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सिद्धान्त वगळण्याचा खटाटोप न्यूझीलंडने केलेला नाही.

नैसर्गिक निवडीच्या तत्त्वावर झालेली उत्क्रांतीची प्रक्रिया आणि आवर्तसारणीतील अंगभूत तत्त्वे, या दोन्ही मूलभूत संकल्पना आहेत. या संकल्पना जगाचे व्यापक स्पष्टीकरण देतात आणि व्यापक दृष्टीकोनातून जगाचा विचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही देतात. आपले जीवन आणि त्यातील भव्य संगती व क्रमपरिवर्तने हा उत्क्रांतीच्या प्रक्रियांचा परिपाक आहे.

त्याचप्रमाणे, रासायनिक घटकांचा एक आश्चर्यकारकरित्या छोटा समूह आपले भौतिक जग उभे करतो. अशा प्रसंगी एनसीईआरटीने काढून टाकलेल्या संकल्पनात्मक चौकटींमधील हे घटक भारतीय विद्यार्थ्यांना कसे समजावून दिले जाणार आहेत?

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पर्यायी पद्धती

वैज्ञानिक संकल्पना घोकंपट्टीच्या पद्धतीने न शिकवता, व्हिडिओ व ॲनिमेशन यांसारख्या दृश्य पद्धतीने कशा शिकवल्या जाऊ शकतात, हे सांगणारे विपुल शैक्षणिक साहित्य व पद्धती आताच्या काळात उपलब्ध आहेत. वास्तववादी कथाकथनातून संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा पर्याय आहेच. आवर्त सारण्यांबाबत सांगायचे तर, व्यक्तीमधील घटक या सारणीत कुठे आहेत याचे तपशील आहेत : संशोधकांनी हे सत्य शोधताना आणि त्यांच्या संशोधनांना मान्यता मिळवताना आलेले चढउतार, नाट्य, आवाजांतील चढउतारांचे बिंदू यात आहेत.

अशा वेळी गाभ्याच्या वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे, समस्या सोडवण्याचा सराव करणे आणि विज्ञानाच्या इतिहासात खोलवर शिरणे, हे सर्व स्थानिक व जागतिक पातळीवर दोन्हीकडे, विलगीकृत करणे गरजेचे नाही. वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, हे दोन्ही एकाच वेळी करणे सहज शक्य आहे. पूर्वी काय झाले होते, यावर घट्ट पकड येत नाही, तोवर संशोधन पुढे जाऊ शकत नाही, हे तर स्पष्ट आहे. थोडक्यात, विज्ञान आणि इतिहास एकमेकांना पूरक आहेत.

विज्ञानावर टीका करणाऱ्या संस्थाच पाठ्यपुस्तकांतील या बदलांचा पुरस्कार करत आहेत किंवा त्यांचाच पाठ्यपुस्तकांवर प्रभाव आहे, असे भारतातील शिक्षण धोरणाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचे ‘नेचर’ला सांगणे आहे. त्यांचा रोख प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे. संघाचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी घनिष्ट संबंध आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर, एनसीईआरटीने संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी मते ऐकून घेण्याची आवश्यकता आहे; मात्र, एक स्वायत्त संस्था म्हणून निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत आणि हे निर्णय उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर आधारित घेतले पाहिजेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक व संशोधक या सर्व संबंधितांशी एनसीईआरटीने संवाद साधला, तर त्यांच्या निर्णयांबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल. हे झाले नाही, तर जे घडत आहे, ते योग्य नाही, अशी शंकेची पाल चुकचुकत राहील.

पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबद्दल एनसीईआरटीने मौन सोडले पाहिजे. असे झाल्यास, मुलांमधील मूलगामी विचाराला प्रोत्साहन देण्याच्या आणि त्याद्वारे अध्ययनाला उत्तेजन देण्याच्या संस्थेच्या महत्त्वाकांक्षेबाबत किंवा मुलांना शिक्षणाचा आनंद मिळावा या इच्छेबाबत, कोणाला फारसा संशय राहणार नाही. भारताच्या समृद्ध वसाहतपूर्व व वसाहतउत्तर इतिहासातील संशोधन आणि नवोन्मेष हे सर्व एकाच वेळी सहज घडू शकते, असे आमचे स्पष्ट मत आहे.

.................................................................................................................................................................

हे मूळ इंग्रजी संपादकीय ‘नेचर’ या जगप्रसिद्ध पर्यावरणविषयक मासिकाच्या १ जून २०२३ च्या अंकात प्रकाशित झाले आहे. मूळ लेखासाठी पहा – https://www.nature.com/articles/d41586-023-01750-2

अनुवाद : सायली परांजपे

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या जुलै २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......