भारतात कलाविषयक जे प्रयोग आणि अभ्यास होत होता, त्याचं सर्वप्रथम शास्त्रीकरण ‘विष्णूधर्मोत्तर पुराणा’त झालं असावं
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
पंकज भांबुरकर
  • ‘विष्णुधर्मोत्तरीय चित्रसूत्रम्’चं मुखपृष्ठ
  • Thu , 13 July 2023
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक विष्णुधर्मोत्तरीय चित्रसूत्रम् Vishnudharmottariy Chitrasutra कृष्णद्वैपायन Krishandwaipayan श्रीकृष्ण ‘जुगनू’ Śrīkr̥ṣṇa Juganū

प्राचीन भारतीय चित्रकलेचे भौतिक पुरावे शीलाखंडांवर व गुहांमध्ये दिसून येतात. ही शैलचित्रं हाच भारतीय चित्रकलेचा श्रीगणेशा असू शकेल. परंतु त्याच्याही अगोदर आपलं संस्कृतसाहित्य चित्रकला व शिल्प यांच्यासंबंधीच्या संकेतांनी व उल्लेखांनी समृद्ध असल्याचं दिसतं. प्राचीन भारतीय चित्रकलेचा मानदंड काय होता किंवा प्राचीन काळी चित्रकलेचे नियम व सिद्धान्त सांगणारे ग्रंथ कोणते आणि कशा प्रकारचे होते, हे सांगणं आजमितीस कठीण आहे. पण एवढं अनुमान करता येतं की, भारतात चित्रकलेचा आदर्श अत्युच्च होता आणि चित्रकलेसंबंधीचे ग्रंथही होते. मात्र आजच्या घडीला ते उपलब्ध नाहीत.

पुराणं, महाकाव्य, संस्कृत नाटक इत्यादी वाङ्मयातून चित्रकलेसंबंधीचे जे ठायी ठायी उल्लेख आढळतात आणि कुठे कुठे त्याविषयीचा तपशीलही आढळतो, त्यावरून अशा प्रकारच्या शास्त्रग्रंथांच्या अस्तित्वाची साक्ष पटते. जशी इतर अनेक विषयांवरची ग्रंथसंपदा राजकीय उत्पातात आणि विधर्मी आक्रमणात नष्ट झाली, तसेच चित्रकलेवरचे शास्त्रग्रंथही नष्ट झाले असावेत. मानसार, अपराजित पृच्छा, शिल्परत्न, नग्नजीतकृत ‘चित्रलक्षणम’, वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’, सोमेश्वराचा ‘अभिलशितार्थ चिंतामणी’ आणि ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’ या ग्रंथांत चित्रकलेचे नियम, तत्त्व, प्रकार व गौरव याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. वात्स्यायन आणि सोमेश्वर यांच्यापेक्षाही चित्रकलेचं अधिक गंभीर विवेचन ‘विष्णूधर्मोत्तर पुराणा’त आहे.

या पुराणाचे तीन खंड असून पहिल्या खंडात २६१, दुसऱ्या खंडात १८३ आणि तिसऱ्या खंडात ११८ अध्याय आहेत. या पुराणाचा काल इ.स. पाचवं-सहावं शतक आहे. हा एक सांस्कृतिक ज्ञानकोशच आहे. त्यात व्यावहारिक, सांप्रदायिक, कला, शास्त्र, धर्म अशा अनेक विषयांची माहिती आहे. रामायण, महाभारत, गीता, उपनिषद, मनुस्मृति व गर्गादिकांचे ज्योतिष ग्रंथ यांतून शेकडो उतारे घेतलेले आहेत. म्हणजे ही स्वतंत्र निर्मिती नसून संकलित ज्ञानसंग्रह आहे. नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, मूर्ती या कलाप्रकारांचं वर्णन आणि त्या त्या कलासाधकांना तपशीलवार मार्गदर्शन, हे या ग्रंथाचं आगळं वैशिष्ट्य आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या पुराणाच्या तिसऱ्या खंडातील ३५ ते ४३ या अध्यायांना ‘चित्रसूत्र’ असं नाव आहे. या विषयाचं इतक्या सूक्ष्म पद्धतीनं वर्णन अन्य पुराणात नाही. परिणामी अन्य महापुराणं आणि उपपुराणांमध्ये ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’ सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः शिल्पशास्त्राच्या अध्ययनासाठी हा तिसरा खंड अपूर्व आहे. प्राचीन भारतातील ललितकलांवरील सर्वांगीण आणि महानतम शास्त्रात याची गणना नि:संदेहपणे केली जाऊ शकते.

विशेषतः हे चित्रसूत्र असलं तरी त्यातील काही विषय - उदा. मान, प्रमाण, रूप आणि लक्षण, रस, भाव, स्थान आणि क्षय-वृद्धी - जसेच्या तसे मूर्तीकलेलाही लागू होतात. ही लक्षणं या पूर्वीच्या अन्य कोणत्याही ग्रंथांमध्ये दिसत नाहीत. भारतात कलाविषयक जे प्रयोग आणि अभ्यास होत होता, त्याचं सर्वप्रथम शास्त्रीकरण ‘विष्णूधर्मोत्तर पुराणा’त झालं असावं.

‘मत्स्यपुराणा’त वास्तू व शिल्प विद्येचा; ‘गरुडपुराणा’त स्थापत्यशास्त्रासहित रत्नशास्त्र व अंगविद्या, वायू यांचा; ‘ब्रह्मांडपुराणा’त संगीतशास्त्र, अग्निपुराणात काव्य व प्रतिमादि शास्त्रांचा; ‘बृहन्नारदीय पुराणा’त ज्योतिषाचे त्रिस्कंध ल व्याकरणाचा आणि ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’त काव्य, नृत्य, प्रतिमा आणि चित्रा यांसारख्या शास्त्रांचा समावेश आहे.

‘सूत्र’ नाव यासाठी की, यातील सामग्रीचं भ्रमरवृत्तीनं सेवन आणि संपादन केलं आहे. परंतु हा ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यानं सर्वसामान्य वाचकांबरोबरच कलाभ्यासकांनाही त्याचं सहज आकलन होत नाही.

अलीकडेच या ‘चित्रसूत्र’चा हिंदी भाषेत अनुवाद प्रकाशित झाला आहे. संस्कृत आणि भारतीय विद्याक्षेत्रातील विद्वान डॉ. श्रीकृष्ण ‘जुगनू’ यांनी ‘विष्णुधर्मोत्तरीय चित्रसूत्रम्’ या नावानं हा अनुवाद व संपादन केलं आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अतिशय सरळ, सुस्पष्ट, सहज आकलनीय असा हा अनुवाद आहे. खरं तर पूर्वीही या अध्यायाचे इंग्रजीत अनुवाद झाले आहेत, पण ते केवळ शब्दश: अनुवाद या स्वरूपाचे होते! सर्वांत पहिला प्रयत्न १९१२मध्ये पंडित मधुसूदन आणि माधव प्रसाद सर्मा यांनी केला. त्यानंतर स्टेला क्रामरिश (१९२४), कुमार स्वामी (१९३२), प्रियबाला शहा (१९५८), सी. शिवराम मूर्ती (१९७८), पारुल दवे मुखर्जी (२००१) यांनी अनुवाद केले. पहिल्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ या न्यायानं या अनुवादांचा दर्जा उत्तरोत्तर उंचावत गेल्याचं दिसून येतं.

या सर्वांत जुगनू यांचा सटीप, विस्तृत विवेचनासह २०१९मध्ये प्रकाशित झालेला हा भावानुवाद सर्वार्थानं सरस उतरला आहे. यात चित्रसूत्रावर केलेलं अभ्यासपूर्ण, सोदाहरण भाष्यही आहे. स्टेला क्रामरिश आणि शिवराममूर्तींच्या अनुवादातील त्रुटी व मर्यादा पारुल दवे मुखर्जींनी त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नमूद केल्या आहेत. परंतु त्यांच्या अनुवादातही अनेक त्रुटी राहिल्या आहेत, त्या डॉ.जुगनू यांनी या अनुवादात दूर केल्या आहेत.

पूर्वसूरींनी चित्रसूत्राबाबत केलेलं भाष्य इंग्रजीत असलं, तरी ते केवळ अनुवादापुरतंच मर्यादित होतं. उलट पक्षी ‘चित्रसूत्र’ पूर्णतः पारिभाषिक शब्दांनी व्यापलेलं आहे. प्रत्येक शब्द आणि श्लोकाचा अचूक अन्वयार्थ लावण्यासाठी वेळोवेळी अन्य ग्रंथांचाही आधार घ्यावा लागतो. विशिष्ट अध्ययनाशिवाय ‘चित्रसूत्र’ समजणं कठीण आहे, हे लक्षात आल्यानंतर या ग्रंथावर भाष्य करण्याचं जुगनू यांनी निश्चित केलं.

‘चित्रसूत्राती’ल प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोकाचा विष्णुधर्मोत्तरसहित अन्य ग्रंथांच्या आधारे अचूक अर्थ पर्याप्त तळटिपांसहित देण्याचा प्रयत्न जुगनू यांनी केला आहे. या अनुवादामागचा त्यांचा हेतू सुलभीकरणाचा नसून संस्कृत ग्रंथातील चित्रकलेविषयक मांडणी, त्यामागचा तात्त्विक विचार पारदर्शकपणे सादर करण्याचा आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

जुगनू चित्रसूत्राचं विवेचन करताना पठडीबाज संस्कृत विद्वानाची भूमिका घेत नाहीत. त्यांनी संस्कृतातील विचार सूक्ष्मतेनं जाणून मग आधुनिक अनुभवाच्या आणि कलात्मक आविष्काराच्या संदर्भात ताडून पाहिले आहेत. त्यासाठी त्यांनी मूख्य विषयाला पूरक ठरणाऱ्या इतर संस्कृत ग्रंथांचाही आधार घेतला आहे.

कलाध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत नसूनही जुगनू यांनी कलानिर्मितीविषयी कुतुहूल असणाऱ्या वाचकाला कोणत्या जागा अवघड वाटतील, त्या नेमकेपणाने हेरून उलगडून दाखवल्या आहेत.

आजच्या काळातील वाचकांचं संस्कृत साहित्यशास्त्राशी नेमकं काय नातं आहे? संस्कृत वाचता येणारे व न येणारे सांस्कृतिक पर्यावरणातील भूमिकांपासून अलिप्त नाहीत. ‘संस्कृत ग्रंथांत सारं ज्ञान आहे’ या भूमिकेपासून ‘आता संस्कृत साहित्यशास्त्र अप्रस्तुत आहे’, या भूमिकेपर्यंत मतांचा लंबक हलत असतो!

जुन्याचं केवळ पुनरुज्जीवन करून परंपरेचा अपमान होतो आणि इतर संस्कृतीतून निर्माण झालेलं चिंतन तयार वस्तूसारखं आयात करून आपल्या साहित्यिक मातीचा अपमान होतो. चिंतन, मग ते आपल्या प्राचीन परंपरेतील असो की, परदेशातील, ते आपल्यासाठी प्रस्तुत व्हायला हवं. आपल्या राष्ट्रीय आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वाच्या अंगी लागायला हवं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

जुगनू यांचा हा ग्रंथानुवाद वैदिक वाङ्मयापासून पुराण आणि विविध संस्कृत ग्रंथांच्या प्रमाणावर आधारित आहे. ते म्हणतात की, ‘चित्रलक्षणम’ आणि ‘चित्रसूत्रम’ यांना केवळ संस्कृत भाषिक ग्रंथ म्हणून सोडून न देता, तांत्रिक आणि कलागत विषय मानून चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना त्यांचं अध्यापन करायला हवं. यासाठी विश्वविद्यालयांचे अभ्यासक्रम निर्धारक आणि व्याख्यात्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

‘विष्णुधर्मोत्तरीय चित्रसूत्रम्’ – कृष्णद्वैपायन व्यास

संपादक आणि अनुवादक – डॉ. श्रीकृष्ण ‘जुगनू’

चौखंबा प्रकाशन, वाराणसी | पाने – १९२ | मूल्य – २७५ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक पंकज भांबुरकर चित्रकार असून कालिदासीय साहित्यात संशोधन करत आहेत.

bhamburkar.pankaj@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......