‘ते पन्नास दिवस’ : ही कादंबरी काय सांगते, ते महत्त्वाचे आहेच; परंतु ती जे काही सांगत नाही, ते जास्त महत्त्वाचे आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राकेश वानखेडे
  • ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 24 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस ते पन्नास दिवस Te Pannas Divas पवन भगत Pavan Bhagat करोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड 19 Covid 19

सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी हातात घेतल्यानंतर ‘हे कोणते पन्नास दिवस?’ असा प्रश्न पडतो? तर हे ५० दिवस आहेत करोना लॉकडाऊन कालावधीत झालेल्या अवर्णनीय अशा होरपळीचे, भूकबळीचे स्थलांतराचे आणि आजच्या संवेदनाहीन अशा अमानवी संहाराचे.

ही कादंबरी म्हणजे रिपोर्ताज आहे दोन जगांमध्ये सापडलेल्या भूकबळींचा. दुसरे वैशिष्ट्य असे की, तिचे तोंड समष्टीकडे आहे. मराठी कादंबरीने जोपासलेला स्व-पुरता वास्तववाद, अस्तित्ववाद न जुमानता, ती समूहाच्या वास्तवाचे प्रखर भान द्यायच्या प्रयोजनाने सज्ज आहे.

या भारतीय समूहात काहीही घडले, तरी कुणाला पापाची टोचणी लागत नाही. परिमार्जन करून मोकळे होण्याची आध्यात्मिक सोय असल्याने नेहमीच्या ‘पळवाटा’ ठरलेल्या आहेत. अशा समकालात ही कादंबरी एक सवाल म्हणून उभी राहते. ती आपल्या समकालाचे केविलवाणे आक्रमण मोजते. मुंबईपासून उत्तर प्रदेशापर्यंतचा सारा भूगोल एका वेदनेच्या सूत्रात बांधते. ब्राह्मणी-अब्राह्मणी अशा चालत आलेल्या ‘डिस्कोर्स’चा मानवी पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न करते. या दोन परस्पर भिन्न ध्रुवांमधल्या आंतरक्रिया संवेदनेने आणि सहृदयतेने टिपण्यासाठी पुढाकार घेते. ही कादंबरी काय सांगते, ते महत्त्वाचे आहेच, परंतु ती जे काही सांगत नाही, ते जास्त महत्त्वाचे आहे!

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

करोना महामारीने जगाची दोन भिन्न अशा गटांमध्ये वर्गवारी केली. तिचा सामाजिक-राजकीय पोत स्पष्ट करणे, हे या कादंबरीचे गृहीतक आहे. ती आपल्या या ध्येयापासून हटत नाही. बेरोजगारी आणि त्यासोबत येणारी लाचारी, स्वाभिमानास बाधा आणते. मात्र जागोजाग मृत्यू झाले, तरी लोकांचा स्वाभिमानी स्वभाव बदलत नाही. मानवी स्वाभिमानाचे शब्दचित्र किंवा भाषालिपी म्हणून या कादंबरीकडे पाहता येते.

ही कादंबरी पाण्यासाठीचा अखंड संघर्ष पुकारते. सर्वहारा वर्गाच्या अन्नसंस्कृतीचे दर्शन घडवते. आभावातदेखील कणखर होणाऱ्या माणसाच्या जिद्दीची ही कहाणी आहे. काळ थांबत नाही, वेळ थांबत नाही, तशी या कादंबरीतली माणसेदेखील थांबत नाहीत… ती एक एक पाऊल पुढे टाकत राहतात.

दुर्दम्य आशावादाच्या वाटेने जाणारी ही कादंबरी आहे. भौगोलिक तपशिलांशी मानवी संवेदना जोडत गुंफलेली आशयसूत्रे बहुसंवादी होऊन पृष्ठभागावर येतात. इथल्या ब्राह्मणी-अब्राह्मणी ‘डिस्कोर्स’चा पदर विसंवादाकडे न जाता संवादाच्या गाठी मारत पुढे सरकत राहतो. सारेच विस्कळीत झाल्यावर कोलमडून पडणाऱ्या व्यवस्थेला भरभक्कमपणे तोडू पाहणाऱ्या श्रमिकांच्या शक्तिशाली जगाचा ती वाचकांपुढे आरसा धरते.

गर्दी असूनदेखील तिच्यासोबत चालणारा बकालपणा अंगावर येतो. रामस्वरूप नावाच्या प्रातिनिधिक आवाजाला ती बुलंद करते. मुंबईसारख्या महानगरापासून सुरू होत, गाव-खेडेपाडे-वस्त्या ओलांडत रिवा शहर ओलांडून उत्तर प्रदेशापर्यंत जाते. यामुळे या कादंबरीला महानगरी- शहरी- ग्रामीण- दलित अशा कोणत्या संवर्गात बसवता येणे शक्य नाही. भारतीय समूह मनाची कादंबरी म्हणून हिचे मोल कितीतरी पटीने जास्त आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ही कादंबरी रस्त्यावर उभी राहते आणि कुटुंबसंस्था, जातीसंस्था, विवाहसंस्था, नोकरशाही, इतिहास, भूगोल मापत राहते. कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य यांच्यामध्ये स्वभावत:च असणारा दुजाभाव रेखांकित करते. कायदे मोठे की माणसे, हा मोठा अवघड प्रश्न उभा करते. ५० दिवसांचा दैनंदिन क्रम यात असला तरी ती पन्नास वर्षे मागे जाते आणि आपल्याला यापुढील ५० वर्षं चटके सहन करावे लागतील, हेही अधोरेखित करते.

शेरोशायरी, लालित्य अशी लेखकाची विचारधारा प्रवाहीपणे पात्रांच्या मुखातून नांदते. आशयाने स्वीकारलेल्या शैलीचे ती बोट सोडत नाही. भाषेच्या पातळीवर अनेकदा मिश्किलपणा स्वीकारते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या उतरंडी एका सरळ रेषेत करून मार्गानुगामी करते. अपरिहार्यता आणि जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती सूचित करते.

भारताच्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी अशा ‘गंगाजमनी तहेजीब’चे स्वप्न रेखाटण्याचा, कृती करण्याचा ध्यास घेते. काशीच्या घाटावर येऊन मृत झालेल्या मिश्राजींमुळे आपण भूस्वामी आहोत आणि आपल्याला लोकांनी देवाचे प्रेषित मानावे, अशा भ्रमात वावरणाऱ्या समूहाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे किंवा ब्राह्मण असल्याने त्यास नेमकी काशीच्या घाटावरच मुक्ती मिळाली म्हणून, या कादंबरीने स्वीकारलेल्या प्रागतिकतेच्या व्यूहाला धक्कादेखील बसण्याची शक्यता आहे.

या कादंबरीने प्रांतवार केलेली परिक्रमा भौगोलिक नसून सामाजिक सांस्कृतिक आहे. मोठ्या भूभागाला ती आपल्या कवेत घेते. त्यामुळे ही बहुभाषिक समूहाची कादंबरी आहे. अनेक अनोळखी प्रदेशांचे का होईना प्रातिनिधीक चित्र या कादंबरीत येते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..............................................................................................................................................................

लेखकाने जागोजागी केलेली शेरोशायरी जरी आशयाला पुढे ढकलणारी असली, तरी ती अनावश्यक वाटते. कारण वाचकाला तेथे निवेदक मागे हटून लेखक सक्रिय झाल्याचा भास होतो. सामाजिक दायित्वाच्या भावनेने ओतप्रोत कार्यकर्त्याच्या मजबूत बैठकीने केलेल्या कामापुढे अशा थोड्याबहुत त्रुटी आपल्याला डोळ्याआड करता येतात.

ही सामाजिक न्यायाचा आक्रोश शब्दबद्ध करणारी साहित्यकृती आहे. प्रत्यक्ष अनुभव आणि कार्यकर्ता म्हणून निभावलेल्या आजवरच्या वाटचालीतल्या संचितांचे गाठोड घेऊन लेखकाने केलेली ही मेहनत अस्सल वाटते. या अस्सलपणातच या कादंबरीचे यश आहे. राजकीय भूमिकेपासून दूर पळणाऱ्या आणि आत्ममुग्ध अशा पांढरपेशी कादंबरीकारांच्या पंक्तीत आपल्या वेगळेपणाच्या, परिवर्तनाचा आग्रह लावून धरणाऱ्या भूमिकेमुळे ही बाब उठून दिसणारी आहे. हे दायित्व लेखकावर कोणी लादलेले नसून त्यांनी ते आपल्या सामाजिक जीवनजाणीवांचा भाग म्हणून स्वीकारलेले आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी लालित्यपूर्ण आणि वाङ्मयीन कामगिरी केल्याची गोष्ट दुर्मीळ होत जाण्याच्या काळात ही कादंबरी आली आहे. त्यामुळे तिचे मोल आहे. यापूर्वीदेखील मराठीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखन केले आहे, परंतु त्यांच्या लेखनातला वाङ्मयीन मूल्यांचा अभाव, सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे. चळवळी साहित्याशी जोडायच्या असतात, याचे भान नसल्यामुळे आपण आपला सांस्कृतिक अवकाश गमावून बसलो आहोत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

सांस्कृतिक युद्ध अनेक पातळ्यांवर लढायचे असते. त्यात कादंबरीसारखा लोकशाहीसोबत आलेला प्रकार आपली मदत करू शकतो, तो आपले हत्यार होऊ शकतो. कारण कादंबरी हा अत्यंत खुला असा प्रकार असून, तो अनेक शक्यता मांडत असतो, अनेक जागा खुल्या करतो आणि अनेक पातळींवरच्या चर्चांच्या शक्यता मागे ठेवतो.

कादंबरीचे हे मोठेपण चळवळींनी न ध्यानात घेतल्यामुळे आम्ही सांस्कृतिक युद्धाला सज्जदेखील झालेलो नाही. या सगळ्या बाबी विचारात घेता, मला ही मराठीतली अत्यंत लक्षवेधी अशी कादंबरी वाटते. तिचे आपण मराठी वाचक म्हणून सहृदयतेने स्वागत केले पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीचा काही एक शोध घेऊन, त्याचे नीटनेटके आकलन करून, त्याचे विश्लेषण करण्याची आणि ज्याची जी चूक असेल, त्याच्या ती पदरात घालण्याची एक भूमिका, ही कादंबरी पार पाडते.

हे असे आराजक डोळ्यासमोर घडत असताना मी गप्प नव्हतो, विरोधासाठी म्हणून माझी तर्जनी उंच होती, हे साहित्यिकाने आपले आद्य कर्तव्य समोर ठेवले पाहिजे. या अपेक्षेला उतरत पवन भगत यांनी या कादंबरीद्वारे सामाजिक न्यायाचे-राजकीय कृतीचे मोठे ‘स्टेटमेंट’ केलेले आहे, असे म्हणता येते.

‘ते पन्नास दिवस’ : पवन भगत

मैत्री पब्लिकेशन, पुणे | पाने : १६८ | मूल्य : ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......