मे २०२३मध्ये कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात भाजपचा दणदणीत पराभव झाला. २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या. भाजपला फक्त ६६ जागा मिळाल्या. जनता दल युनायटेड या प्रादेशिक पक्षाला १९ जागा मिळाल्या.
भाजपच्या दृष्टीने हा पराभव अत्यंत दारुण असा होता. २०१८च्या निवडणुकीत त्यांना १०८ जागा मिळाल्या होत्या. पूर्ण बहुमत मिळाले नाही, तरी सगळ्यात मोठा पक्ष तोच होता. आता त्यांना ३८ जागा कमी मिळाल्या. जनता दल युनायटेड या प्रादेशिक पक्षाला २०१८मध्ये मिळाल्या होत्या, त्यापेक्षा १८ जागा कमी मिळाल्या. काँग्रेसला २०१८च्या निवडणुकीत ८० जागा मिळाल्या होत्या. म्हणजे २०२३मध्ये त्यांच्या ५५ जागा वाढल्या.
मोदीजींच्या भक्त-मंडळींना हा फटका सहन झाला नाही. खरं तर निवडणुकीच्या खूप आधीपासून भाजपची परिस्थिती अवघड आहे आणि काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार, असे अनेक ‘ओपिनियन पोल्स’नी सांगितले होते, पण भक्त लोकांनी त्याकडे लक्ष दिले नव्हते. काही विकले गेलेले पोल्स होते, त्यांनी भाजप निसटता विजय मिळवेल असे; तर काही ‘गोदी पोल्स’नी त्रिशंकू विधानसभा निर्माण होईल, असे सांगितले होते. त्यामुळे शेवटी मोदीजी आणि अमित शहा काहीतरी जुगाड करतील आणि भाजपचे सरकार स्थापन होईल, असे भक्त मंडळींना वाटत होते. प्रत्यक्षात काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवले आणि भक्तांच्या स्वप्नांवर पाणी पडले.
११३ हा बहुमताचा आकडा असताना काँग्रेसने १३५ जागा मिळवल्या. आता कसला ‘जुगाड’ आणि कसली ‘चाणक्यनीती’?
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत मोदीजी स्वतः कर्नाटकात अक्षरशः ठाण मांडून बसले होते. त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि अनेक रोड शो केले. भक्तांना वाटत होते की, मोदीजींनी फिरवली निवडणूक! त्यांच्या दृष्टीने मोदीजी हे जगातील सर्वाधिक करिश्मा असलेले नेते. पाकिस्तान, चीन, अमेरिका, जर्मनी, सगळे प्रगत देश आणि सगळे अप्रगत देशसुद्धा मोदीजींनी आपले नेतृत्व करावे म्हणून तरसत आहेत, असे त्यांना वाटत होते. त्यांना वाटत होते की, जगातील कुठल्याही देशात मोदीजी उभे राहिले तरी सहज निवडून येतील. अमेरिकेत मोदी उभे राहिले, तर अमेरिकेचे आजी आणि माजी अध्यक्ष जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प या दोघांनाही हरवतील. रशियामध्ये पुतीन यांना हरवतील, चीनमध्ये शी जिन पिंग यांना हरवतील आणि जपानमध्ये फुमिओ किशिदा यांना हरवतील. बाकीच्या छोट्या देशांची तर बातच करायला नको, असे त्यांना वाटत असे.
इस्लामची जन्मभूमी असलेल्या सौदी अरेबियाचा कारभार मोहम्मद बिन सलमान मोदीजींना विचारून करतात, अशा स्वरूपाचे व्हॉट्सअॅप मेसेजेस त्या काळी भक्तांच्या ग्रूपमध्ये फिरत असत. इतकेच काय, त्या काळी रशिया-यूक्रेनसारखी अनेक युद्धे सुरू होती. या सगळ्या युद्धातले डावपेच दोन्ही बाजू मोदीजींना विचारून ठरवत आहेत, असेही मेसेजेस भक्तांच्या ग्रूपमध्ये फिरत होते. एकमेकांच्या विरुद्ध हितसंबंध असलेल्या दोन्ही बाजूंचे हित बघणारे सल्ले मोदीजी कसे देत आहेत, असा प्रश्न विचारला, तर भक्त लोक अत्यंत प्रगल्भता व्यक्त करणारे स्मित करून – ‘तेच तर सीक्रेट आहे’ असे वाक्य प्रश्नकर्त्याच्या तोंडावर फेकत असत.
या भक्त लोकांची मोठी मौज आज २२व्या शतकातील वाचकांना वाटत असेल. एक संपादक म्हणून आम्हालाही वाटत आहे. असा विचार करणारे लोक ‘मोदीकालीन भारता’त होते, यावर आज विश्वास बसणे कठीण आहे. आज या सगळ्याला शंभर वर्षे झालेली असताना दुसऱ्या कोणी हा वृतान्त लिहिला असता, तर कुणाचाच विश्वास बसला नसता. पण सत्याचे अनावर प्रेम असलेला शिरोजीसारखा इतिहासकार हे सारे लिहितो आहे, म्हणजे ते खरेच असणार, असे आज म्हणावे लागत आहे. असो.
तर अशा या मोदीजींचा पराभव राहुल गांधी यांनी कर्नाटकात केला, तेव्हा भक्त मनातून सैरभैर झाले. त्यांना काही समजेना. हे झालेच कसे? ‘हिंदुत्वाचा गड’ असा पडलाच कसा? काही ‘देशद्रोही हिंदू’ भाजपच्या विरोधात आहेत, पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे, असे त्यांना वाटत होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
कर्नाटकात मुस्लीम लोकसंख्या १३ टक्के आहे, हे त्यांना माहीत होते. आणि कर्नाटकात काँग्रेसला जवळजवळ ४५ टक्के मते मिळाली. म्हणजे खूप साऱ्या हिंदू लोकांनी काँग्रेसला मते दिली, असे दिसते. भक्त लोकांना हे दिसत होते, पण मनातून मान्य होत नव्हते. मोदीजींसारखा नेता असताना कुठलाही हिंदू काँग्रेसला आपले मत देऊच कसे शकतो, हे त्यांना कळत नव्हते. कर्नाटकात काँग्रेसला मते देणारे जवळ जवळ ३०-३२ टक्के हिंदू होते. या सगळ्यांना ‘देशद्रोही’ कसे म्हणावे? चिमूटभर ‘लिबरल’ लोकांना ‘देशद्रोही’ म्हणणे वेगळे आणि इतक्या मोठ्या लोकसमूहाला ‘देशद्रोही’ म्हणणे वेगळे! भक्त संभ्रमात पडले. त्यांना फार मोठा प्रश्न पडला होता.
या शिवाय शिरोजीच्या बखरीच्या हिंदुत्ववादी नायकांसमोर अजून एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. आपणच पैज जिंकणार म्हणून तीर्थरूप नानांनी भावनेच्या भरात ‘बास्किन अँड रॉबिन्स’चे आईसक्रीम, ‘पिज्झा हट’चा मोठा पिज्झा आणि चार प्लेट बटाटावडे, अशी घसघशीत पैज लावली होती आणि नाना, अविनाश आणि अच्युत यांचा हिंदुत्ववादी ग्रूप कधी नव्हे, तो ही पैज हरला होता. सगळा ऐवज दीड-दोन हजारांच्या घरात जात होता. भास्कर, समर आणि पांडेजी यांनी एवढाच खर्च गुजरात निवणुकीची पैज ते हरले, तेव्हा केला होता. पण तो खर्च त्यांनी हिमाचलमध्ये आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला विजय मिळाला म्हणून उत्स्फूर्तपणे केला होता. हिंदुत्ववाद्यांना चिडवायचा हेतू त्यात होता. त्यांना त्या खर्चातून नाना, अविनाश आणि अच्युतला चिडवण्याचा आसुरी आनंद मिळाला होता. इथे त्या खर्चातून हिंदुत्ववादी ग्रूपला काय मिळणार होते? नुसताच खर्च आणि ‘देशद्रोही’ लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा दुष्ट आनंद! थोडक्यात, राष्ट्रीय आणि पांडेजींचा ठेला, अशा दोन्ही पातळींवर प्रचंड गडबड माजली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये सतत पैज जिंकणारी पार्टी आज पैज हरली होती. खरं तर, या लोकांना पराभव नवीन नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही अपवाद वगळता सलग सत्तर वर्षे, हे लोक सतत हरतच होते. आता गेल्या आठ-नऊ वर्षांत त्यांना विजयाची चव प्राप्त झाली होती. इतक्या कमी वर्षांत आपण अजेय झालो आहे, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. ती योग्य आहे, असे त्यांनाच काय, परंतु त्यांच्या ‘बुझदिल’ विरोधकांनासुद्धा वाटू लागले होते. इतिहासाची आवर्तने मोठी असतात, याची जाण भाजपच्या या तत्कालीन ‘बुझदिल’ विरोधकांना नव्हती, इतकेच यावर आपल्याला म्हणता येते. मोठी असली म्हणून काय झाले? आवर्तनेच ती! कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर एका नव्या आवर्तनाला सुरुवात झाली आहे की काय, असा विचार इतिहासाच्या आवर्तनांचे तटस्थ निरीक्षण करणाऱ्या शिरोजीसारख्या इतिहासकारांच्या मनात येऊन गेला. आणि पुढे घडलेल्या घटना आपण बघितल्या, तर तो फारसा चुकीचा नव्हता, असे आपल्या लक्षात येते.
असो. आता प्रस्तावना फार लांबवत नाही. इतिहास आपली करवट बदलत असताना शिरोजी काय म्हणत होता, हे बघणे फार महत्त्वाचे आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
शिरोजीची बखर : प्रकरण १३
कर्नाटकाचा विजय काँग्रेस आणि विरोधकांच्या दृष्टीने मोठा होता. २०१८च्या पेक्षा काँग्रेसला पंचावन्न जागा जास्त मिळाल्या होत्या. १३ मे रोजी मतमोजणी सुरू झाली, तेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास काँग्रेस आणि भाजप समसमान होते. त्यामुळे अविनाश फार एक्ससाइट झाला होता. समसमान वाटणी होणार आणि जनता दल युनायटेडला घेऊन भाजपचे सरकार येणार, असे त्याला वाटत होते. शेवटी मोदीजींनी नेहमीप्रमाणे निवडणूक फिरवली, असे त्याला वाटत होते. त्याने तसे मेसेज भास्कर, समर आणि पांडेजींना केले होते. परंतु दुपारी अकरा-बारानंतर काँग्रेसचे लीड वाढत गेले. त्यानंतर भास्कर आणि समर त्याला चेकाळून मेसेज करत राहिले. तोसुद्धा अजूनही बाजी फिरू शकते, असे मेसेजेस करत राहिला. दुपारी भाजपने हार कबूल केली, तरी अविनाश ‘अजूनही बाजी फिरू शकते’ असे म्हणत राहिला. शेवटी सगळे निकाल लागले आणि काँग्रेसला १३५ जागा मिळाल्या, तेव्हा त्याने हातातला कोकाकोलाचा टीन टीव्हीला फेकून मारला. त्याने संध्याकाळी शेवटचा मेसेज केला – ‘लोकसभेला आयेगा तो मोदीही!’ त्यावर भास्करने पैजेची पार्टी कधी देतो आहेस, असे विचारले! त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘लोकसभेला मोदी जिंकले की आपण दोन पार्ट्या करू. एक कर्नाटक काँग्रेस विजयाची आणि लोकसभेच्या मोदींच्या विजयाची!’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
देशद्रोही लोकांना पार्टी द्यायला अविनाशचा विरोध होता, पण नंतर नानांनी त्याची समजूत घातली. आपण सतत पार्ट्या घेतल्या आहेत, तेव्हा आत्ता आपल्याला पार्टी द्यायला लागणार, असे त्यांनी त्याला सांगितले. मोदीजी हरले असतानाही आपण पार्टी देऊ, असे नाना म्हणत होते, म्हणजे यांना मोदीजींपेक्षा पार्टी आवडते आहे काय, असा विचार अविनाशच्या मनात येऊन गेला. पण नाना अतिशय आदरणीय असल्याने त्याने तो बाजूला ढकलला. थोडा विचार करून अविनाश म्हणाला, ‘ठीक आहे, देऊ या आपण पार्टी, पण तिचे पैसे मी पैसे देणार नाही. मोदीजींच्या पराभवाची पार्टी देणे माझ्या तत्त्वांमध्ये बसत नाही.’
त्यावर नाना म्हणाले, ‘तू नको देऊस, अच्युत देईल’. सगळा खर्च अच्युतच्या गळ्यात घालून सगळे पार्टीला आले. तरीसुद्धा आपण मोदींच्या पराभवाच्या पार्टीला जातो आहोत, याचे खोल शल्य त्याला वाटत राहिले, पण त्याच वेळी आपण मोदीजींच्या पराभवाच्या पार्टीसाठी पैसे दिले नाहीत, याविषयी त्याला स्वतःचा अभिमान वाटत राहिला!
पार्टी सुरू झाली, तेव्हा अच्युत मोठ्या मनाने म्हणाला -
अच्युत - फार मोठा पराभव झाला. मला वाटले नव्हते.
समर - मला वाटले होते.
भास्कर - नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लीम दुही माजवायचा प्रयत्न करूनही कर्नाटकात काही उपयोग झाला नाही, ही विजयापेक्षाही समाधानाची गोष्ट आहे.
अविनाश - मोदीजी द्वेषभाव पसरवून कधीही जिंकलेले नाहियेत. लोक त्यांना भारताच्या विकासासाठी मतं देतायत.
भास्कर - मग कर्नाटकातल्या लोकांनी त्यांना का नाही दिली मतं? विकास करण्यात कमी पडले का मोदीजी?
अविनाश - मोदीजी कशातही कमी पडत नाहियेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
नाना - कर्नाटकात भाजपची मतं ३६ टक्के मतं कायम आहेत. जनता दलाची मतं काँग्रेसला मिळाली म्हणून त्यांचा ‘व्होट शेअर’ वाढला. जास्त काही झालेलं नाहिये.
अविनाश - मुसलमानांनी एकगठ्ठा मतं टाकली काँग्रेसला. जनता दल आणि काँग्रेस यांच्यामध्ये ‘स्प्लिट’ होऊ दिली नाहीत मुसलमानांनी त्यांची मतं.
भास्कर - कर्नाटकात मुसलमान १३ टक्के आहेत. ख्रिश्चन साधारण २ टक्के. काँग्रेसला जवळ जवळ ४५ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे निदान ३० टक्के हिंदूंनी मतं दिली आहेत. जनता दलाला १३ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे साधारण ४० टक्के हिंदू लोकांनी भाजपला मतं दिलेली नाहीत.
अविनाश - तीच गोची आहे. सगळे हिंदू भाजपला कुठेच मतं देत नाहीत.
अच्युत - का असं?
भास्कर - कारण भाजप ४०-५० टक्के हिंदूंना आपली वाटत नाही.
अच्युत - का असं?
भास्कर - कारण जगात कुठलाच धर्म कुठल्याच एका पक्षाला मतं देत नाही.
अच्युत - का असं?
अविनाश - कारण सगळ्या जगभर ‘लिबरल’ लोकांनी घाण करून ठेवली आहे.
पांडेजी - ऐसा काहे बोल रहें हो अविनाशजी? हरएक समाज में शांतताप्रिय लोग रहते हैं.
भास्कर - और युद्धखोर लोग भी रहते हैं.
अविनाश - आम्ही ‘युद्धखोर’ नाही आहोत. आम्हाला शांततेने जगायचे आहे, पण आमची शांतता जर कुणी भंग केली, तर आम्ही त्याचे मुंडके छाटणार आणि परत शांततेने जगायला लागणार.
भास्कर - यालाच ‘युद्धखोर मानसिकता’ म्हणतात!
अविनाश - आम्हाला शांततेत जगायचे आहे. आमची शांतता भंग करायचा अधिकार कुणालाही नाही. आमची शांतता भंग करायचा कुणी प्रयत्न केला की, आम्ही त्याचे मुंडके छाटणार.
भास्कर - यालाच ‘युद्धखोर मानसिकता’ म्हणतात.
अविनाश - कशी?
भास्कर – अरे, तू शांततेसाठी छाट नाहीतर दुसऱ्या कशासाठीही छाट, ज्याचे मुंडके छाटले आहे, त्याचे भाईबंद तुझे मुंडके छाटायला नाही का येणार?
अच्युत - म्हणजे झालेच की युद्ध सुरू!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
अविनाश - (चिडून) आम्ही शांततावादी आहोत, म्हणून आम्हाला युद्ध करायला लागते आहे. आता एकच युद्ध करायचं आहे आम्हाला – ‘भारतात कायमची शांतता आणण्यासाठी!’
भास्कर - जगातली सगळी युद्धे कायमची शांतता प्रस्थापित करण्यासाठीच होत असतात. युद्धांमुळे कायमची शांतता आल्याचे एकही उदाहरण नाही जगाच्या इतिहासात.
नाना - मानवाच्या रक्तातच आहे युद्ध! हे ओळखून आपण जगले पाहिजे.
भास्कर - अविनाशचे म्हणणे असे आहे की, त्याच्या रक्तात अजिबात युद्ध नाहिये, तो शांततावादी आहे.
अविनाश - मी शांततेचा पूजक आहे. मी शांततावादी आहे म्हणून मला युद्ध हवे आहे. कायमची शांतता आणण्यासाठी!
नाना - सावरकर म्हणाले होते की, इतिहास म्हणजे सूड आणि बदला यांची एक मालिकाच असते. आपण हे विसरता कामा नये. तुम्हाला शांतता हवी असेल, तर तुम्हाला युद्धासाठी सतत सज्ज राहायलाच लागते.
समर - जोरात हसतो!
अविनाश - (चिडून) तू तीर्थरूप नानांना हसतो आहेस.
समर - किती ‘कॉन्ट्रॅडिक्टरी’ बोलतायत ते!
अविनाश - जगच ‘कॉन्ट्रॅडिक्शन्स’नी भरलेले आहे. म्हणून आपल्याही तसाच विचार करायला लागतो. शांततेसाठी युद्ध करायला लागणार असेल तर आपण करायचे!
भास्कर - युद्ध करायचेच झाले, तर सैन्य आहे की आपलं! अणुबॉम्बनं सुसज्ज आहे!
पांडेजी - और ये अणुबॉम्ब काँग्रेस ने बनाया था!
समर - शिवाय तीन युद्धं जिंकली आहेत पाकिस्तान विरुद्ध आपण!
नाना - सावरकर अंतर्गत शत्रूविषयी बोलत आहेत.
भास्कर - त्यासाठी अंतर्गत ‘सिक्युरिटी’ आहे की! पोलीस आहे, आयबी आहे, सीआरपीएफ आहे. वेळ पडली तर स्वतः ‘मिलिट्री’ धावून येऊ शकते.
नाना - अंतर्गत गुप्त शत्रू आहेत. त्यांचे काय करायचे?
भास्कर - त्यासाठी अंतर्गत गुप्तहेर संघटना आहेत ना! आयबी आहे आणि इतरही गुप्तचर यंत्रणा असतात लोकल पोलिसांच्या!
अविनाश - वाट्टेल ते बोलू नकोस!
नाना - इतर धर्म त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. लोकसंख्या वाढीचे हे गुप्त युद्ध गुप्तहेर संघटना कशा थांबवणार?
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
भास्कर - आपण आपल्या चर्चेत अनेक वेळा बोललो आहे की, १४ टक्के मुसलमान जर २.४ या रेटने वाढत असतील आणि ८० टक्के हिंदू जर २.१ या रेटने वाढत असतील, तर मुसलमान हिंदूंना ‘ओव्हरटेक’ कसे करतील?
अविनाश - तू दर वेळी कसले रेट सांगत असतोस? कळेल असे बोल ना!
भास्कर - एखाद्या समाजाचा ‘फर्टिलिटी रेट’ काय आहे, यावर त्या समाजाची लोकसंख्या वाढणार का कमी होणार, हे ठरते.
अविनाश – ‘फर्टिलिटी रेट’ आणि लोकसंख्या वाढीचा काय संबंध?
भास्कर – ‘फर्टिलिटी रेट’ म्हणजे एखाद्या समाजातल्या सर्व स्त्रिया त्यांच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देत आहेत. त्या सरासरीने दोन अपत्यांना जन्म देत असतील, तर त्या समाजाची लोकसंख्या आहे तेवढी कायम राहाते. दोनपेक्षा हा रेट वाढला, तर लोकसंख्या वाढते.
समर - भारतात मुसलमानांचा ‘फर्टिलिटी रेट’ २.४ आहे आणि हिंदूंचा १.९४ आहे.
अविनाश - म्हणजे बघ ते आपल्यापेक्षा जास्त वेगाने वाढतायत.
नाना - या रेटने २१५० साली ते आपल्याला ‘ओव्हरटेक’ करतील.
भास्कर - तसे व्हायचे असेल तर मुसलमानांचा ‘फर्टिलिटी रेट’ ८ व्हायला हवा आणि आपला अजून १च्या खाली जायला हवा.
नाना - हे सगळे आकडे खोटे आहेत.
भास्कर - ठीक आहे. मग नव्याने सेन्सस घ्या.
अच्युत - हो हो घ्या! एकदा होऊन जाऊ दे ‘दूध का दूध पानी का पानी’!
भास्कर - सेन्सस खरे तर २१ सालीच व्हायला पाहिजे होती.
अच्युत - मग का नाही झाली?
पांडेजी - ये प्रश्न आप मोदीजीसे पूछिए, भास्कर से क्यूँ पूछ रहें हो!
अच्युत - मोदीजींनी का नाही घेतली सेन्सस, प्रश्न इतका महत्त्वाचा आहे तर?
भास्कर - जातीय जनगणना होऊ द्यायची नाहिये म्हणून!
अच्युत - म्हणजे?
भास्कर - भारतात विविध जातीचे लोक किती आहेत, त्याची पण गणना व्हायला हवी, अशी मागणी आहे.
अच्युत - तीसुद्धा करून टाका!
भास्कर - ओबीसी आणि शेड्यूल्ड कास्टची लोकसंख्या वाढली असली, तर काय करायचे?
अच्युत - त्यांची संख्या वाढली असेल तर चांगलेच आहे. हिंदूंचीच संख्या वाढली आहे ना?
समर - हो, पण मग त्यांनी आरक्षण वाढवून मागितले तर?
अच्युत - आयला, संख्या वाढली की, असले प्रॉब्लेम्ससुद्धा वाढतात का?
अविनाश - आरक्षण वाढवून मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तसा.
भास्कर - ओबीसी आणि एससींची संख्या वाढलेली दिसली आणि सर्वोच्च न्यायालयाने आपले मत बदलले तर?
अविनाश – अरे, काय देशाचा सत्यानाश करायचा ठरवले आहे का तुम्ही?
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
अच्युत - आरक्षण वगैरे ‘मायनर’ गोष्टी आहेत. मुसलमानांची लोकसंख्या आटोक्यात आहे की नाही, हे पहिले चेक करा.
भास्कर - मग सांगा तुमच्या मोदीजींना तसं!
अविनाश - कुणी काही सांगायला नकोय मोदीजींना. त्यांना कळते आहे काय करायचे आहे आणि काय नाही ते!
समर - का करत नाहियेत जनगणना मोदीजी?
भास्कर - आरक्षण वाढवायला लागले, तर उच्चवर्णीय मतदार चिडतील म्हणून?
पांडेजी - कास्ट-सेन्सस की जाय तो तकलीफ हैं, नहीं की जाय तब भी तकलीफ हैं.
समर - केली तर उच्चवर्णीय मते जाणार. नाही करणार असे म्हणून अडून बसलो तर ओबीसी आणि एससी चिडणार!
अच्युत - पण या नादात मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा मुद्दा मागे पडतोय ना?
भास्कर - उच्चवर्णीय, ओबीसी आणि मागासवर्गीय अशा सगळ्यांची मते मिळावीत म्हणून मुसलमानांच्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करायचे?
पांडेजी - आज अगर सेन्सस होती हैं और अगर पता चलता हैं की मुसलमानोंका ग्रोथ रेट कम हुआ हैं, तो नफरत का अजेंडा भी खत्म हो जाएगा!
अविनाश - नाही अजिबात नाही.
नाना - कुठल्याही सेन्ससला काही अर्थ नसतो. मुसलमान खोटी माहिती देतात.
अच्युत - च्यायला माझ्या लक्षातच आले नव्हते हे! असेसुद्धा होत असणार!
भास्कर - असे कसे खोटे बोलता येईल? आधार कार्ड डेटा बघून क्रॉस-व्हेरिफिकेशन नाही का करता येणार?
अच्युत - हो रे, च्यायला माझ्या हेसुद्धा लक्षात आले नव्हते? आधारचा सगळा डेटा बघितला, तर सगळे क्लिअर होईल.
भास्कर - आपले आयटी मिनिस्टर आणि सेन्सस कमिशनर म्हणाले की, सेन्सस करण्यासाठी आधारचा डेटा वापरायचा विचार नाहिये.
अच्युत - का नाहिये?
नाना - भारतातल्या सगळ्या लोकांनी घेतलेले नाहिये आधार कार्ड!
भास्कर - ९४ टक्के लोकांनी घेतली आहेत.
अविनाश - तुला काय माहिती?
भास्कर - सेन्सस कमिशनर म्हणाले आहेत तसे. (भास्करने ‘इकॉनॉमिक टाईम्स’मधली ५ एप्रिल २०२३ची बातमी आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करून दाखवली.)
अविनाश - त्या कमिशनरला काय कळते आहे?
भास्कर - त्याला काही कळत नाहिये, तर मोदीजींनी का ठेवले आहे त्याला तिथे?
नाना - खरेच या आयएएस आणि इतर आधिकाऱ्यांना काही कळत नसते. नुसते परीक्षा पास होऊन तिथे जाऊन बसलेले असतात.
अविनाश - सगळे काम एकटे मोदीजीच करतात.
समर - (मोठ्याने हसतो)
अविनाश - तू सारखा सारखा मोठ्याने हसू नकोस. राक्षस आहेस का?
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
समर - सेन्सस कमिशनरचे काम मोदीजी करत असतील, तर त्याला ते बोलू का देतायत?
अविनाश - मग काय त्यांनी स्वतः माहिती द्यायची का?
भास्कर – अरे, तो चुकीची माहिती देतो आहे ना?
अविनाश - त्याबद्दल त्याची हजामत करतील मोदीजी!
अच्युत - तुम्ही भरकटत चालला आहात. मुसलमान वाढत आहेत की नाहीत, याची खरी माहिती मिळाली पाहिजे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला.
भास्कर - त्यासाठी ‘इफेक्टिव्ह सेन्सस’ घेतली गेली पाहिजे.
अच्युत - आणि आधार डेटासुद्धा वापरला पाहिजे.
पांडेजी - उसके लिए कास्ट सेन्सस भी करनी पड़ेगी.
अच्युत - करो!
पांडेजी - फिर आरक्षण का झमेला हो जाएगा!
अविनाश - तुम्ही जास्त बडबड करू नका. मोदीजी पाहून घेतील काय करायचे ते! मोदीजींवर विश्वास ठेवा.
भास्कर - आपण डोळे उघडे ठेवून काहीही बघायचे नाहीये मोदीजींच्या राज्यात. आपल्याला सांगितले की, मनसोक्त द्वेष करायचा आहे फक्त मोदीजींच्या राज्यात! आपण द्वेष करायला शिकलो मनापासून की, संपली आपली जबाबदारी एक नागरिक म्हणून!
समर - आपली जबाबादरी संपली आणि आपले विचार करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा!
अविनाश - तुम्ही गप्प बसा फक्त! विश्वास ठेवा मोदीजींवर!
भास्कर - कर्नाटकातल्या लोकांनी नाही ठेवला!
नाना - तसे नाही म्हणता येणार! लोकांना काँग्रेसने गुमराह केले. मुसलमानांनी एकगठ्ठा मते टाकली काँग्रेसला?
भास्कर - म्हणजे मुसलमानांनी तुम्हाला द्यायला पाहिजे होती का मते?
अविनाश - जनता दलाला द्यायला पाहिजे होती!
भास्कर - म्हणजे काय झाले असते?
अविनाश - म्हणजे कर्नाटकात राष्ट्रवादी सरकार आले असते!
समर - (भयानक हसत) त्यापेक्षा मुसलमानांनी मोदीजींनाच मते द्यायला हवी होती डायरेक्टली, असे म्हण ना!
अविनाश - तेवढी कुठली अक्कल आहे त्यांना.
भास्कर – अरे, मुसलमान सोड, ४० टक्के हिंदूंनीसुद्धा मते नाही दिली आजवर मोदीजींना!
समर - कर्नाटकाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार होते भाजपचे!
समर – ‘फॉर्टी परसेंट सरकारा!’
अविनाश - तो सगळा अपप्रचार होता.
भास्कर - भाजपचं सरकार आले असते, तर त्या सरकारने ‘हिजाब बंदी’ कायम ठेवली असती, कशाला मते देतील मुसलमान तुम्हाला?
अविनाश - त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोदीजींसारखाच नेता हवा आहे! ‘कम्पल्सरी’ सुधारणा!
समर - मुसलमानांनी सुधारले पाहिजे हे खरे आहे, पण हिंदूनीसुद्धा सुधारले पाहिजे. आपण आपल्यातला जातीयवादसुद्धा संपायला पाहिजे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
नाना - अशा मोठ्या सुधारणा हळूहळू होत असतात. त्यासाठी शिक्षणाचा स्तर वाढावा लागतो समाजात.
समर - मग मुसलमानांमध्येसुद्धा शिक्षण वाढेल असे बघा.
भास्कर - कित्येक शिक्षित स्त्रिया हिजाब वापरत नाहीत भारतात.
अविनाश - चार स्त्रिया दाखवून दे!
भास्कर - चार काय कित्येक कोटी आहेत. नजमा हेपतुल्ला हिजाब घालत नसत. कित्येक मुस्लीम नट्या आहेत. कित्येक टीव्ही अँकर आहेत.
अविनाश - त्या अपवाद आहेत.
समर - त्या अपवाद नाहीत त्या शिक्षित आहेत.
भास्कर – ‘हिजाब बंदी’मुळे कर्नाटकातल्या १८,००० मुस्लीम मुलींना शाळा सोडायला लागली.
अविनाश - त्यांना शिकवूनसुद्धा काही उपयोग नाही म्हणा!
नाना - या लोकांना कायद्याचा धाक दाखवूनच सुधारणा करायला हव्यात.
अविनाश - तू ‘केरला स्टोरी’ बघ, म्हणजे यांच्यात किती सुधारणा व्हायला हवी आहे, हे कळेल तुला.
भास्कर - काय कळेल?
अविनाश – अरे, बत्तीस हजार हिंदू पोरींचं सक्तीने धर्मांतर केले गेले.
नाना - त्यांना ‘आयसीस’मध्ये टेररिस्ट केले गेले! त्यांची आयुष्य बरबाद केली गेली.
भास्कर - अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे फक्त ६६ भारतीय आयसिसमध्ये लढायला गेले आहेत.
अविनाश - ते खोटे बोलतायत. त्यांना भारत बरबाद झालेला हवा आहे. त्यांना सहन होत मोदीजी भारताची प्रगती करतायत ते.
भास्कर - आयसीसमध्ये ‘खूप कमी’ भारतीय आहेत हे भारत सरकारने लोकसभेमध्ये सांगितले आहे.
अविनाश - कशावरून?
भास्कर - ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या २ ऑगस्ट १६च्या अंकात बातमी आहे.
अविनाश - त्यानंतर वाढले असतील तर?
भास्कर - अमेरिकेच्या म्हणण्यानुसार फक्त ६६ भारतीय आयसिसमध्ये गेले आहेत. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या १७ डिसेंबर २१च्या अंकात बातमी आहे.
अविनाश - त्यानंतर या पोरी गेल्या असतील तर?
भास्कर - आयसिसचे ४० हजार ते ७० हजार सभासद आहेत सगळे मिळून. म्हणजे सगळे आयसिस भारतीय मुलींनीच भरलेले आहे काय?
अविनाश - तुला काय माहिती त्यांचे किती मेंबर्स आहेत ते, तुला सांगून जातात काय आयसिसमध्ये ते?
भास्कर - जगातल्या अनेक संस्था असतात जगातल्या अतिरेकी संघटनांवर लक्ष ठेवणाऱ्या. जगातले अमेरिकेसारखे सगळे प्रमुख देश लक्ष ठेवून असतात अशा संघटनांवर. त्या सगळ्या बातम्या नेटवर असतात.
समर - सगळे नेटवर आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप सोडून सिरियस वाचन करायला लागते!
अविनाश - दाखव मला कुठे लिहिले आहे ते!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
भास्कर – ‘कार्नेजी एन्डोवमेन्ट फॉर इंटरनॅशनल पीस’ नावाची एक संस्था आहे. त्यांचा १५ मार्च २२ रिपोर्ट बघ त्यांच्या वेबसाईटवर. (फोनवर ती साईट उघडून दाखवतो) हे बघ हे तर म्हणतायत की, २४ हजार ते ३० हजार परदेशी योद्धे आयसिसमध्ये सामील झाले आहेत म्हणून.
समर - आणि तुम्ही म्हणताय ३२ हजार हिंदू पोरी गेल्यात म्हणून.
अविनाश - कार्नेजी एंडोवमेन्ट म्हणे! फालतू साले! मुसलमानधार्जिणे लोक!
समर - त्यांच्यावर विश्वास नाहिये तर भारत सरकारने त्यांचा अंदाज व्यक्त करावा लोकसभेमध्ये!
अच्युत - आपल्या मोदीजींचे कडक लक्ष असणार आयसिसच्या परिस्थितीवर!
भास्कर - असणारच!
अच्युत - त्यांनी सांगायला पाहिजे किती लोक आयसिसमध्ये आहेत.
भास्कर - ते कशाला सांगतील? (जोरात हसतो)
समर - भक्तांना काही सांगायचे नसते. त्यांच्याकडून फक्त मते घ्यायची असतात, हे माहिती आहे त्यांना.
नाना - तुम्ही फार अपरिपक्व आहात. बालिश आहात. आयसिस हे फक्त रोगाचे तोंड आहे. आत तो किती पसरलाय, हे माहीत नाहिये तुम्हाला.
भास्कर - जगात १८० कोटी मुसलमान आहेत. त्यातले एक लाख धरा आयसिसमध्ये. एक लाख धरा तालिबान. अजून एक लाख इतर संघटना!
समर - सगळे मुसलमान टेररिस्ट आहेत असे कसे म्हणू शकतो आहे आपण?
भास्कर - आणि मुख्य म्हणजे इस्लामी देशच लढतायत आयसिसविरुद्ध!
समर - इराण, तुर्कस्तान, इजिप्त, सिरिया, लिबिया, अशा मुस्लीम देशांनीच आयसिसला संपवले आहे. अमेरिका, रशिया, युरोपातील सगळ्या देशांबरोबर हेच सारे देश उभे आहेत आयसिसविरुद्ध.
अविनाश - कशावरून?
नाना - सगळे मुसलमान आतून एक असतात.
भास्कर - सध्याच्या आयसिसच्या मुख्याला तुर्कस्तानच्या गुप्तहेर संघटनेने ठार मारले आहे. बीबीसीची बातमी आहे बघ.
अविनाश - विश्वास नाही.
(मोदीकालीन भक्तांची एक खासीयत होती. त्यांचा मोदींशिवाय दुसऱ्या कुणावरच विश्वास नव्हता. अगदी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्तावरसुद्धा नव्हता.)
नाना - सगळे मुसलमान आतून एक असतात.
भास्कर – अहो, थोडे डोळे उघडे ठेवून बघा. मुसलमान विरुद्ध मुसलमान अशी किती युद्धे झाली आहेत जगात.
समर - इराण-इराक युद्ध झाले आहे. इराण-सौदी अरेबिया अशी झकाझकी सुरूच असते.
समर - अगदी आजसुद्धा येमेन आणि सौदी अरेबिया असे युद्ध सुरू आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
अविनाश - मला एक सांग, आयसिससारख्या गोष्टी इस्लामी देशांमध्येच कशा निर्माण होतात?
भास्कर - एक सांग, आयसिसचे सैनिक कुठून आले?
अविनाश - कुठून आले?
भास्कर - अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केला. त्याचे सैनिक बेकार झाले. नंतर अमेरिकेने इराककडे लक्ष दिले नाही. इराकमध्ये ‘पॉवर व्हॅक्यूम’ तयार झाला. सद्दामचे बेकार झालेले सैनिक हुल्लडबाजी करू लागले. तेवढ्यात अमेरिकेच्या पाठिंब्याने लिबियात गद्दाफीची हत्या केली गेली. त्याचे सैनिक बेकार झाले. तेवढ्यात सिरियामध्ये पाश्चात्य देशांच्या पाठिंब्यामुळे यादवी माजली. तिथेही ‘पॉवर व्हॅक्यूम’ तयार झाला. या सगळ्या गोंधळात आयसिसच्या नेत्यांना संधी मिळाली.
समर - आणि आयते सैन्यसुद्धा!
भास्कर - हे सगळे अमेरिकेमुळे झाले आहे. इराक आणि लिबियामधली सरकारे आवडत नाहीत म्हणून ती पाडली आणि ‘पॉवर व्हॅक्यूम’ तयार करून हे अमेरिकन निघून गेले. तिथे आयसिस तयार झाली.
समर - रशिया अफगाणिस्तानात आला म्हणून अमेरिकेने अफगाणी मुजाहिदीन लोकांना भरमार शस्त्रे दिली आणि रशिया हरल्यावर अमेरिकन लोक निघून गेले ‘पॉवर व्हॅक्यूम’ मागे ठेवून. त्याचा फायदा तालिबानने उठवला.
नाना - करा अजून मुसलमान लोकांचा सहानुभूतीने विचार!
अविनाश - एक सांग मग, या सगळ्या हुल्लडबाजीला धर्माचा तडका का मिळाला?
भास्कर - बेकार शस्त्रधारी लोकांचा फायदा धर्मवेडे उठवतातच!
नाना - जे डोळ्याला उघड उघड दिसते आहे ते नाकारायचे. मोदीजी चांगले काम करत आहेत, त्यात खोडा घालायचा.
अविनाश - आणि आयसिसला चांगले म्हणायचे.
अच्युत - ते कुठे आयसिसला चांगले म्हणत आहेत?
अविनाश - तू गप बस रे!
समर - अमेरिकेच्या नीच राजकारणामुळे तीन-तीन देशांत ‘पॉवर व्हॅक्यूम’ तयार झाला आणि त्यातून आयसिसला बळ मिळाले, एवढेच आम्ही म्हणतो आहे.
भास्कर - आणि त्यांना संपवले गेले आहे, हेसुद्धा खरे आहे.
अविनाश - तालिबान आहे की अजून तिथे!
भास्कर – हो, पण ते मुख्यत्वेकरून पाकिस्तानच्या सैन्याशी लढतायत!
अविनाश - तुम्ही मुसलमान का होत नाही आहात?
भास्कर - इस्लामपेक्षा आम्हाला हिंदू धर्म आवडतो आहे म्हणून.
अविनाश - फार ‘निगेटिव्ह लोक’ आहात तुम्ही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अविनाश - तुम्ही साले इतके नालायक आहात ना की, जर भारतात इस्लामचे राज्य आले, तर तुम्ही नमाज पढ़ायला पहिल्या रांगेत उभे राहाल.
नाना - आणि बिर्याणी खाल मिटक्या मारत ईदची!
भास्कर - काही होत नाही असं. परवा ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये लेख आलाय. जगाच्या लोकसंख्येचा ‘ग्रोथ रेट’ कमी होतो आहे म्हणून!
अविनाश - बोला खोटे! मुसलमान लोकांना कव्हर करायला तुम्ही वाटेल ते बोलाल.
भास्कर - फोनमध्ये ‘द इकॉनॉमिस्ट’ची साईट उघडून दाखवतो. बघ १ जूनचा लेख आहे- ‘ग्लोबल फर्टिलिटी हॅज कोलॅपस्ड विथ प्रोफाऊंड इकॉनॉमिक कॉन्सिंक्वेन्सेस!’
समर – ‘ब्लॅक डेथ’नंतर जगाची लोकसंख्या इतिहासात पहिल्यांदाच कमी व्हायला लागली आहे.
अविनाश - कसला ‘ब्लॅक डेथ’?
भास्कर - १४व्या शतकात युरोपात, पश्चिम युरेशियात आणि उत्तर आफ्रिकेत प्लेगची साथ आली होती. साधारण अंदाजानुसार १० ते २० कोटी लोक मृत्यू पावले. त्यानंतर या शतकात पहिल्यांदाच जगभर मानवाची संख्या कमी होऊ लागली आहे.
अविनाश - कशी?
भास्कर - शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता आली की, लोकांना अपत्ये कमी असावीत, असे वाटते.
समर - भारतात मुसलमानांचा ‘फर्टिलिटी रेट’ यामुळेच कमी झाला आहे. १९९३ साली मुसलमानांचा फर्टिलिटी रेट ४.६ होता, तो आता २.४ झाला आहे.
अविनाश - जगभर कमी झाला आहे का?
भास्कर - कतारचा १.८४ आहे, तुर्कस्तानचा १.९४ आहे, मलेशियाचा १.८४ आहे. इराण, इंडोनेशिया यांचा २.१ आहे. तो कधीही दोनच्या खाली जाऊ शकतो.
समर - भारताचा ‘फर्टिलिटी रेट’सुद्धा दोनच्या खाली जाईल २०५०च्या सुमारास.
समर – ‘फर्टिलिटी रेट’ दोनच्या खाली गेला की, लोकसंख्या कमी व्हायला लागते.
भास्कर - भारतातल्या मुसलमानांना जगभरच्या इस्लामी देशातून भयंकर डिमांड येणार आहे.
अच्युत - मोदीजींना माहीत नाही का हे?
भास्कर - असणार.
अच्युत - मग ते सांगत का नाहियेत?
भास्कर - (गालातल्या गालात हसत) आम्हाला काय माहिती तुमचे मोदीजी तुम्हाला का सांगत नाहियेत ते? तुम्हीच विचार करा!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
नाना - हे सगळे पढत मूर्ख आहेत. अर्धवट माहिती आहे तुम्हा लोकांची. मुसलमान गुपचूप त्यांची संख्या वाढवत आहेत. एके दिवशी ते तुम्हाला सांगतील की, आजपासून आम्ही ‘मेजॉरिटी’मध्ये आहोत आणि आजपासून हा देश ‘शरिया कायद्या’नुसार चालेल!
अविनाश - आणि त्या दिवशी भास्कर खान आणि समरउद्दीन चार-चार बायका करायला मोकळे होतील!
भास्कर - (हसायला लागतो) तुम्ही नाही सुधारणार!
अविनाश - हसू नका, मोदीजी या सगळ्याला पुरून उरतील! शेवटी अवतार आहेत ते!
..................................................................................................................................................................
‘कॉन्सपिरसी थिअरी’ हे सर्व भक्तांचे एकमेव व्यसन होते. त्यावरच त्यांच्या भक्तीचे सगळे इमले उभे होते. सगळे जग आपल्याविरुद्ध सतत कट करते आहे, अशी त्यांची धारणा होती. या लोकांच्या समोर कितीही डेटा टाकला, तरी यांचे एकच पालूपद चालू असे – ‘एके दिवशी मुसलमान या देशात ‘मेजॉरिटी’मध्ये जातील’. अतिशय दारुण अशी ही मनोवस्था होती, असे आज ‘मोदीकालीन भारता’ला शंभर वर्षे पूर्ण होत असताना म्हणावे लागत आहे.
भारताचा गेल्या शंभर वर्षांतील इतिहास आज दाखवून देत आहे की, भास्कर, समर आणि पांडेजी यांची एकूण भूमिका योग्य होती. पण आज एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न तयार होतो. अविनाश आणि नाना सर्वस्वी चूक होते का?
‘मोदीकालीन भारता’तील एक तृतीयांश हिंदू जनतेला इस्लामच्या आक्रमणाची भीती वाटत होती. त्याला ऐतिहासिक कारणेही होती. इस्लामने भारतावर आक्रमण केले होते, हे सत्य होते. इस्लामी राजकारण्यांमुळे भारताची फाळणी झाली होती, हेसुद्धा खरे होते. फाळणी झालेल्या भारतात म्हणजे पाकिस्तान आणि बंगलादेशमध्ये राहिलेल्या हिंदूंची संख्या कमी झाली होती, हेसुद्धा खरे होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
पण त्याच वेळी १८५७ च्या संग्रामात हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांविरुद्ध लढले होते, हेसुद्धा खरे होते. धर्माचाच विचार झाला, तर सूफी इस्लाम आणि हिंदूंमधील भक्तिपंथ यांची वैचारिक आणि तात्त्विक देवाण-घेवाण मनोहारी होती, हेसुद्धा नाकारण्याजोगे नव्हते. २१व्या शतकाच्या सुरुवातीला इस्लामबद्दलची परिस्थिती खूप व्यामिश्र म्हणजे ‘कॉम्प्लिकेटेड’ होती.
या काळात भारतात आणि जगभर इतर देशात वहाबी इस्लामला म्हणजे कडव्या इस्लामला बळ देण्याचे प्रयत्न कडवे ‘इस्लामिस्ट’ करत होते, हे आज आपल्याला नाकारता येत नाही. त्याचबरोबर, आयसिस, तालिबान आणि अशा अनेक संघटनांचा उगम अमेरिका, रशिया आणि इतर पाश्चात्य देशांच्या बेपर्वा राजकारणात होता, हे जरी खरे असले तरी आयसिससारख्या संघटनांचे धर्मवेड २१व्या शतकातील इतर धर्मातील प्रगतिक लोकांना खुपत होते, हेसुद्धा तेवढेच खरे होते. परंतु, हे सगळे असे जरी असले तरी सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मुसलमान लोकांचा फर्टिलिटी रेट जगभर कमी होत होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती.
परंतु ही गोष्ट त्या काळी सर्वांना माहीत नव्हती, कारण या संदर्भातील संशोधन आणि डेटा या काळात अत्यंत हळूहळू प्रकाशित होत होता. जगाच्या लोकसंख्या वाढीच्या संदर्भातील ही नवी ‘थीम’ सर्व लोकांमध्ये अजून झिरपली नव्हती. ‘कॉमन नॉलेज’ बनली नव्हती. त्यामुळे अविनाश आणि नानांसारखे लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण, त्यांना हे सावध प्रकृतीच्या लोकांचे प्रतिनिधी होते. मानवातील ‘ट्रायबल-इंस्टिंक्ट’ हा त्यांच्या विचारांचा प्रमुख आधार होता.
भास्कर, समर आणि पांडेजी हे मानवातील उमेदीचे प्रतिनिधी होते. हे लोक डोळे उघडे ठेवून जग आणि जगातील बदल बघायला तयार होते. ‘मोदीकालीन भारता’त या दोन प्रवृत्तीमधील तुंबळ वैचारिक युद्ध अतिशय तीव्र होते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अविनाश आणि नाना वैचारिक पातळीवर निश्चितपणे कमी पडत होते. सावध प्रवृत्तीच्या लोकांप्रमाणे विचार करताना ते इतिहासाचा संदर्भ घेत होते. सावध प्रवृत्तीचे लोक इतिहासाचा आधार घेतात, कारण इतिहास निश्चितपणे समोर उभा असतो. या उलट, भास्कर, समर आणि पांडेजी भविष्याचा वेध घेत होते. त्यांना भविष्यामधील अनिश्चिततेची भीती वाटत नव्हती. त्यामुळेच भविष्याचा निश्चित वेध घेण्यासाठी ते वर्तमान धुंडाळत होते. समोर आलेला डेटा, त्याच्यावर विश्वास ठेवून पाहू शकत होते.
शिरोजी या दोन्ही प्रवृत्तींच्या वर होता. त्याला मानवातील या दोन प्रवृत्तींच्या मागील प्रेरणांचा अंदाज होता. कुठल्याही समाजाच्या अस्तित्वासाठी दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींची गरज असते, हे त्याला माहीत होते. शिरोजीला हेही माहीत होते की, कुठल्या तरी अबोध पातळीवर या विरुद्ध प्रवृत्तीच्या लोकांना एकमेकांचे आकर्षण असते. त्यामुळेच हे लोक प्रत्येक चर्चेत एकमेकांशी भांडत होते आणि तरीही ते पुढच्या वेळी अनावरपणे पांडेजींच्या ठेल्यावर एकत्र चर्चेसाठी एकत्र जमत होते. प्रत्येक चर्चेत दोन्ही बाजूंना मन:स्ताप होत होता, आणि तरीही ते पुढच्या वेळी पांडेजींच्या ठेल्यावर एकत्र जमत होते. कुठल्या तरी अबोध पातळीवर दोन्ही बाजूंना आपापल्या भूमिकांबद्दल थोडा अविश्वास वाटत होता असा तर या आनावर आकर्षणाचा अर्थ नव्हता?
पुढच्या काळात भास्कर, समर आणि पांडेजी म्हणत होते तसेच घडत गेले. मुसलमान हिंदूंच्या लोकसंख्येला गेल्या शंभर वर्षात ‘ओव्हरटेक’ करू शकले नाहीत. भास्कर वगैरे लोकांनी हे ओळखले, याचे कारण ते विरोधी बाजूपेक्षा जास्त हुशार होते, एवढेच नव्हते. या काळात मानवाच्या प्रगतीचा आलेख इतक्या वेगाने वाढत गेला की, मानवाचा आत्तापर्यंतचा इतिहास आणि त्यातील शतकानुशतकात गोळा केले गेलेले शहाणपण कामाला येईनासे झाले.
१८व्या शतकातील ब्रिटिश अर्थशात्रज्ञ माल्थसने लोकसंख्या वाढीची आपली थिअरी मांडली. त्यात मानवाच्या लोकसंख्येची वाढ अन्नधान्याच्या वाढीपेक्षा जास्त वेगाने होते, असे मानले गेले होते. युद्ध, दुष्काळ किंवा रोगराई यांच्यामुळे वेळोवेळी मानवाची संख्या कमी होते आणि त्याचमुळे अन्नधान्य पुरते, असे माल्थसच्या सिद्धान्तात मानले गेले होते. माल्थसची थिअरी २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रत्येक जण शिकला होता. लोकसंख्येचा विस्फोट प्रत्येकानेच गृहित धरला होता, पण एकविसाव्या शतकात झाले उलटेच! ‘ग्रीन रेव्होल्यूशन’मुळे अन्नधान्य मुबलक पिकू लागले. सुबत्ता आली. त्याचबरोबर या काळात कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हायची असेल, तर मुलेबाळे कमी हवीत, असे सगळ्यांच्या लक्षात आले. यामुळे सगळ्या जगाची लोकसंख्या कमी होऊ लागली! या परिस्थितीमुळे पुढे २१व्या शतकाच्या उत्तरार्धात भास्कर, समर आणि पांडेजी यांची भूमिका पुढे खरी ठरली.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
आर्थिक सुबत्तेमुळे लोकसंख्या कमी होईल, हे माल्थसच्या लक्षात कसे यावे? २०व्या शतकातील ‘ग्रीन रेव्होल्यूशन’ आणि इतर ‘टेक्नोलॉजी’मधील प्रगती त्याला १८व्या शतकात ‘दिसण्याचे’ काहीच कारण नव्हते.
अविनाश आणि नाना वैचारिकदृष्टया मागास असल्याने ते कळत नकळत माल्थसला चिकटून बसले. नव्या वातावरणात त्यांची भूमिका चुकीची ठरली! माल्थसचा सिद्धान्त खरा ठरला असता, तर अविनाश आणि नाना खरे ठरले असते.
असो. शिरोजीच्या दृष्टीने मानवातील या दोन्ही वृत्ती आवश्यक होत्या. समाजाची धारणा टिकून राहण्यासाठी ‘हिंदुत्ववादी’ अविनाश आणि नाना यांची वृत्ती आवश्यक होती; तर मानवाच्या प्रगतीसाठी भास्कर, समर आणि पांडेजी या ‘उदारमतवादी’ लोकांची वृत्ती आवश्यक होती!
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment