थोर विचारवंत अजित डोभाल यांची नेताजींविषयीची विचारमौक्तिके ही ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’स दिलेली मौलिक भेटच!
पडघम - देशकारण
रवि आमले
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुभाषचंद्र बोस स्मृतिव्याख्यान देताना
  • Mon , 19 June 2023
  • पडघम देशकारण नेताजी Netaji सुभाषचंद्र बोस Subhashchandra Bose फाळणी Partition काँग्रेस Congress गांधी Gandhi नेहरू Nehru Sardar Patel

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर, त्यांनी देशाची फाळणी होऊच दिली नसती, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले. निमित्त होते सुभाषचंद्र बोस स्मृतिव्याख्यानाचे. उद्योजक आणि व्यावसायिकांची ‘असोचम’ नावाची शिखर संस्था आहे. तिने दिल्लीत याचे आयोजन केले होते. उद्योजक आणि व्यावसायिकांनाही सुभाषबाबूंचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा होते व ते त्यासाठी अजित डोभाल यांच्यासारख्या थोर अभ्यासकाचे व्याख्यान ठेवतात, ही मोठीच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

डोभाल यांनी ‘इंटेलिजन्स ब्युरो’तून निवृत्त झाल्यानंतर दिल्लीतील चाणक्यपुरीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’ हा विचारमंच स्थापन केला. तो स्वतंत्र आणि नि:पक्षपाती आणि राष्ट्रवादी विचारांचा असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येते. त्यांचा हा राष्ट्रवाद म्हणजे ‘हिंदू राष्ट्रवाद’. तर असा विचारमंच स्थापन करणारी व्यक्ती ही नक्कीच थोर अभ्यासक असणार. या मंचाचे नावही विवेकानंदांवर ठेवले आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सुभाषबाबूंवर मोठा प्रभाव होता. हे लक्षात घेतले म्हणजे ‘बादरायण’ न्यायाने डोभाल हे नेताजींवर बोलण्यासाठी प्रचंड योग्य व्यक्ती म्हणावे लागतील.

तर त्यांची विचारमौक्तिके जाणून घेण्याची संधी उद्योजक आणि व्यावसायिकांनी भारतास दिली, ही भारताच्या ज्ञान-जीडीपीत त्यांनी घातलेली भरच म्हणावी लागेल. डोभाल यांचे हे भाषण महत्त्वाचे तर आहेच, शिवाय ‘व्हॉट्सॲप विद्यापीठां’साठी ते मौलिक अशी भेट ठरणार असल्याने त्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

व्याख्यानाच्या काही मर्यादा असतात. त्यातील एक असते औचित्याची. म्हणजे असे की, ते एखाद्या नेत्याच्या स्मरणार्थ असेल, तर मग त्यात त्या नेत्यावर केवळ स्तुतिसुमनेच उधळावी लागतात. तोच एकमेवाद्वितीय असे सांगावे लागते. लोकही ते समजून घेतात. या भाषणात मात्र डोभाल यांनी नेताजींबाबत बोलताना असे काही केल्याचे दिसत नाही.

पं. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करायचा कट रचण्यात आला होता, म्हणून गांधीजींनी नेताजींना काँग्रेसबाहेर काढले. तसे झाले नसते, तर नेताजीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते. ते असते तर आजचा भारत म्हणजे एक समर्थ असे हिंदुत्त्ववादी राष्ट्र असते, ही जी तमाम उजव्यांचा श्रद्धा आहे, त्याबाबत डोभाल काही बोललेच नाही.

तसे झाले असते तर नेताजींचे संपूर्ण गुणगान गायल्याचे पुण्य त्यांना लाभले असते. या भाषणाच्या ज्या बातम्या उपलब्ध झाल्या, त्यावरून असे दिसते की, त्यांनी नेताजींबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक म्हणजे - त्यांच्यातील गांधीजींच्याही विरोधात जाण्याची धमक. हे सांगताना नेताजींच्या मनात गांधींबद्दल परम आदर होता, हेही त्यांनी सांगितले, हे विशेष. गांधींना अजून भारतीय राष्ट्रवादाने पूर्णतः अव्हेरले नाही, हे यातून जाणकारांनी समजून घ्यावे.

दुसरा मुद्दा नेताजींना स्वातंत्र्य हवे होते ते लढून. भीक मागून नव्हे. तिसरी बाब ही की, जीना हे नेता म्हणून केवळ सुभाषबाबूंचाच स्वीकार करू शकत होते. नेताजी हयात असते तर, फाळणी झाली नसती. या दोन वाक्यांतील संबंध नीट लक्षात घेण्याजोगा आहे. पण त्याविषयी पुढे. चौथी बाब, नेताजी हे सेक्युलर होते आणि धार्मिक होते ही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

यातील एकेक मुद्दा महत्त्वाचा आहे. नेताजी यांच्यात जी धमक होती ती निर्विवादच. ते गांधीजींच्या विरोधात गेले, पण ते एकट्या गांधीजींच्याच विरोधात होते? त्यांचा खरा विरोध तर सरदार पटेल आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील उजव्या गटाला होता. त्याचे मूलभूत कारण हा देश स्वातंत्र्यानंतर आधुनिक औद्योगिक समाजवादी देश असेल की नाही, हे होते.

सुभाषबाबूंची काँग्रेस अध्यक्षपदी फेरनिवड करण्यास पटेलांचा विरोध होता तो त्यावरून. सुभाषबाबू काँग्रेसबाहेर पडले ते त्या संघर्षातून. पण डोभाल यांना हे सांगण्याइतका अवसर मिळाला नसावा. ब्रिटिशांशी लढायचे की, सामंजस्याने त्यांना वाटाघाटींच्या टेबलावर आणायचे, हा नेताजी आणि काँग्रेस नेत्यांतील वादाचा एक मुद्दा होता. ब्रिटिशांकडून भीक मागून स्वातंत्र्य मिळाले, हा फोकनाड षड्‌यंत्र सिद्धान्त मांडणाऱ्यांना तथ्यांशी काहीही देणेघेणे नसते.

काँग्रेस ब्रिटिशांशी लढत नव्हती, असे म्हणता येईल काय? मग नेताजींना स्वातंत्र्य लढूनच हवे होते, या म्हणण्यात काय अर्थ आहे? त्यातून डोभाल आणि उजव्या कंपूला हेच ठसवायचे असते की, कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसने स्वातंत्र्य हे भीक मागून मिळवले. ते खरे रणानेच मिळायला हवे होते. पण अहिंसात्मक संघर्षाने मिळाले. या गोष्टीची फार वेदना होते त्यांना. त्यातूनच मग पुढे जाऊन ते हे सांगत असतात की, स्वातंत्र्य काय एकट्या गांधींनी मिळवले? त्यात अनेक क्रांतिकारकही होते.

ते बरोबरच आहे. सत्ता जशी एकट्या मोदींनी मिळवलेली नसते. त्यात ‘पन्नाप्रमुखा’चेही योगदान असते, तसेच हे. पण सर्वसाधारणतः बोलताना नाव घेतले जाते ते नेत्याचे, पण एवढा मेंदू कोण चालवणार? असो. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डोभाल भाषणातील पुढचा मुद्दा फाळणीचा. ‘सुभाषबाबू असते तर, देशाची फाळणी झाली नसती… जीना म्हणाले होते, मी फक्त एकच नेता स्वीकारीन. तो म्हणजे सुभाषचंद्र बोस,’ असे डोभाल म्हणाले. एका श्वासात आलेली दोन वाक्ये एकमेकांतील अंतर्संबंध सांगत असतात. डोभाल यांच्या या वाक्यांचा भावार्थ असा की, बोस हे फाळणीच्या विरोधात होते.

ते खरेच आहे. या देशात १९३३ पासून ‘द्विराष्ट्र सिद्धान्त’ नांदत होता. सर सय्यद अहमद खान, चौधरी रहमत अली ही त्याची अध्वर्यू मंडळी. वि. दा. सावरकरांनी हिंदूराष्ट्राचा सिद्धान्त मांडला. फाळणीची बीजे आहेत ती यात. याला काँग्रेसचा विरोधच होता. नेताजी हे तर मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांच्या विरोधात होते. याचे कारण एक तर ते काँग्रेसी होते आणि कमालीचे सेक्युलर होते. त्यामुळे ते १९४७मध्ये असते, तर त्यांनी फाळणीला विरोध केलाच असता.

पण - आता जर ‘जर-तर’च्या भाषेतच बोलायचे आहे, तर - तेव्हाची हिंदुस्थानातील परिस्थिती पाहता त्यांनाही नाईलाजाने होकारच द्यावा लागला असता. जसा तो सरदारांनी, नेहरूंनी आणि सरते शेवटी महात्मा गांधींनी दिला. हिंदू आणि मुस्लीम कट्टरतावाद्यांनी एकमेकांचे गळे चिरावेत, एकमेकांना हाकलून देण्याची मागणी करावी, त्यातून राष्ट्र दुभंगावे. आणि ते दुभंगले की त्याचा दोष कुणाचा, तर काँग्रेसचा?

हे हिंदुत्ववाद्यांनी भलेही मानावे, पण ते तार्किकतेच्या आणि तत्कालिन वास्तवाच्या कुठल्याही कसोटीवर खरे ठरत नाही, हे सर्वांनी ध्यानात घ्यावे. जीना नेताजींना नेता म्हणून स्वीकारण्यास तयार होते, म्हणून नेताजी असते, तर फाळणी टळली असती, असे म्हणणे यात शुद्ध लबाडी आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ब्रिटिशविरोधी लढ्यात काँग्रेस, हिंदू महासभा, मुस्लीम लीग यांनी एकत्र यावे, हे सुभाषबाबूंचे आवाहन होते. त्याला जीनांनी किती साथ दिली आणि हिंदू महासभेने हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण तरीही डोभाल असे म्हणतात, याचे कारण त्यांना हे सांगायचे असते की, नेहरूंमुळे फाळणी झाली. फाळणीचे खरे गुन्हेगार तेव्हा एकमेकांची डोकी फोडणारे धार्मिक कट्टरतावादी होते, हा इतिहास लपवून, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे एक कारस्थान वर्षानुवर्षे येथील कुजबुज आघाड्यांनी चालवले. त्याचाच हा भाग. हे म्हणजे मुला-सुनांनी एकमेकांशी भांडून घर फोडावे आणि दोष म्हातारा-म्हातारीला द्यावा, तसेच झाले.

नेताजी हे सेक्युलर होते हे खरेच. ‘धार्मिक बाबतीत जगा आणि जगू द्या हे तत्त्व आणि आर्थिक व राजकीय मुद्द्यांवर एकमेकांना समजून घेणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे,’ असे म्हणणारे नेताजी. ‘वंदे मातरम्’ची कडवी गाळण्याच्या वादात गांधीजी आणि रविंद्रनाथांच्या बाजूने ठाम उभे राहणारे नेताजी. समाजवादी विचारांचे काँग्रेसी नेताजी. ते सेक्युलरच होते आणि धार्मिकही होते. ‘गीता’ वाचत असत ते. सेक्युलर व्यक्ती धार्मिक नसते, असे कोण म्हणाले? सेक्युलरॅझिम म्हणजे काही नास्तिकवाद नाही. धर्म घरातच ठेवा, राज्य कारभारात आणू नका, जगा आणि जगू द्या, एवढेच सेक्युलॅरिझम सांगत असतो. नेताजीही तेच सांगत होते. तेव्हा, महात्मा गांधी हे जसे धार्मिक होते, तसेच नेताजीही होते. त्यात विशेष असे काही नाही.

डोभाल यांनी त्यांच्या भाषणात एक बाब मात्र सांगितली नाही. १९४५नंतर नेताजी असते, तर फाळणीचे काय झाले असते, ते माहीत नाही, ते पंतप्रधान झाले असते की काय, हाही वादाचा मुद्दा आहे, कारण त्या वेळी सरदार पटेलांचा काँग्रेस संघटनेतील अख्खा गट त्यांच्या विरोधात होता, पण एक मात्र नक्की की, समजा ते पंतप्रधान झाले असते, तर त्यांनी पहिल्यांदा येथील कट्टरतावाद्यांचा कायमचा बिमोड केला असता. हा देश सेक्युलर आणि समाजवादी राहील, हेच त्यांनी पाहिले असते. त्याकरता प्रसंगी त्यांनी हातात अधिकारशाहीचा असूड घेतला असता.

.................................................................................................................................................................

लेखक लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, ‘मनोविकास’ प्रकाशित ‘बदलता भारत’ या महाग्रंथात त्यांच्या ‘नेताजींचे गूढ, काँग्रेस आणि उजवे राजकारण’ या प्रदीर्घ प्रकरणाचा समावेश आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......