‘म.फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग ३)’ हे सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि महात्मा फुले, महर्षि शिंदे यांचे अनुयायी रा. ना. चव्हाण यांच्या लेखांचे पुस्तक त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी नुकतेच संपादित व प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. व्ही. एल. एरंडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
...............................................................................................................................................................
‘महात्मा फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन’ (भाग ३) या ग्रंथाला रा. ना. यांचे सुपुत्र संपादक रमेश चव्हाण यांनी मला प्रस्तावना लिहायला लावून खऱ्या अर्थाने माझा सन्मानच केला आहे. ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना होऊन १५० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सदरील लेखसंग्रह प्रकाशित होतो आहे. परिवर्तनाच्या मोर्चातील एक निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांनी माझ्यावर टाकलेला हा विश्वास मला अत्यंत गौरवाचा वाटतो.
रमेश चव्हाण हे सत्यशोधक चळवळीतील एक अग्रगणी व्यक्तिमत्त्व रा. ना. चव्हाण यांच्या काही महत्त्वपूर्ण लेखांचा संग्रह संपादित करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. रा.ना. एक प्रामाणिक, विनयशील, साध्वीवृत्तीचे, सातत्याने बहुजन समाजाच्या हिताची काळजी वाहणारे, तत्त्वनिष्ठ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. एक सामाजिक व राजकीय विचारवंत म्हणून विसाव्या शतकात त्यांनी बहुजनवादी चळवळीचा वारसा महाराष्ट्रात पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपल्या समृद्ध लेखणीद्वारे संपन्न व समृद्ध केला. १९३६पासून ते अर्धशतकभर समाजप्रबोधनपर वैचारिक ८०० ते ९०० लेख लिहून त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
रा.ना. म्हणजे म. फुले, राजर्षी शाहू महाराज, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, कर्मवीर भाऊराव पाटील, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे आदि सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांच्या मालिकेतील व्यक्तिमत्त्व! त्यांचे समतोल लिखाण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ठेवा आहे. त्यांचा सामाजिक चळवळीशी संबंध राहिलेला आहे. म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची विचारपरंपरा जतन करत असताना, त्यांनी कुठेही आक्रमक भूमिका न स्वीकारता बहुजन समाजाच्या हिताची प्रामाणिक विचारपरंपरा जतन केली आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
प्रस्तुतचा ग्रंथ रा. ना. चव्हाणांसारख्या नितांत थोर समाजप्रबोधनकारकांच्या चारित्र्यास नवा आयाम देणाऱ्या लेखाचा संग्रह आहे. परिवर्तनवादी चळवळीच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रबोधन अत्यंत विश्वसनीय असून प्रांजळ नि सडेतोड आहे.
रा.ना. यांचे लिखाण अतिशय दुर्मीळ व मौलिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्व लेख ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहेत, ही बाब परिवर्तनवादी चळवळीत व समाजप्रबोधन करू पाहणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने आनंददायक, उत्साहवर्धक आणि दिशादर्शक आहे.
रा.ना. यांनी जोतीबा फुले, सत्यशोधक समाज, सामजिक प्रबोधन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून हा विषय अत्यंत कुशलतेने हाताळला व ते लेखन कार्यसिद्धीस पोहोचविले. या त्यांच्या वैचारिक लेखनामुळे सत्यशोधक समाजाचे स्वरूप, उद्देश आणि दिशा समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सत्यशोधक चळवळीमुळे एकूण समाजात झालेल्या परिवर्तनाचे आकलन होते.
सत्यशोधक चळवळ ही महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक महत्त्वाची चळवळ होती. या चळवळीमुळेच सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रवाह सुरू झाले. साधारणपणे सामाजिक चळवळी या सामाजिक परिवर्तनाच्या किंवा सुधारणेच्या दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या आहेत. सत्यशोधक चळवळ विशिष्ट जाती-जमातीसाठी निमंत्रित नव्हती, तर ती सर्व बहुजनवर्गाची चळवळ होती. कष्टकरी, भूमीहीन, स्त्रिया, शेतकरी, अस्पृश्य इत्यादीच्या उद्धारासाठी चालवलेली ती चळवळ होती. या चळवळीची मानवतावादी तत्त्वे होती, तसेच समतावादी तत्त्वज्ञान होते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
विशेषत: या चळवळीला म. जोतीराव फुलेंचा विचार व कार्याचा तात्त्विक आधार होता. सामाजिक विषमतेला दूर करण्यासाठी म. फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून नवीन विचारप्रणाली देण्याबरोबरच नवीन कार्यक्रमही दिला होता. या चळवळीचे लक्ष प्रचलित समाजपद्धतीचा बिमोड करून, समाजात आमूलाग्र बदल घडवून आणणे होते. जसे की, समाजरचनेत वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या समाजव्यवस्थेला मुळापासून उपटून फेकून देण्याचे त्यांचे ध्येय होते.
सत्यशोधक चळवळ ही जातीअंताची एकमेव चळवळ होती. ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिली चळवळ अशी होती की, जी कनिष्ठ जातीच्या लोकांनी स्थापन करून, कनिष्ठ जातीच्या न्याय हक्कासाठी लढणारी होती. आजही या चळवळीची गरज बहुसंख्य असलेल्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वोतोपरीने ग्रासलेल्या, पीडलेल्या जातीजमातींना आहे.
सत्यशोधक विचाराची चौकट काही अंशी महाराष्ट्राच्या विचारधारेवर प्रभावित असल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकात जोतीरावांनी चालवलेली ‘सत्यशोधक समाजा’ची चळवळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीसाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरलेली आहे, असा विश्वास रा. ना. यांच्या या लेखसंग्रहातून व्यक्त होताना दिसून येतो. जो सार्थ व प्रस्तुत असाच आहे.
सदरील लेखांच्या माध्यमातून रा. ना. यांनी म. फुलेंच्या परिवर्तनवादी विचारांना आणि कार्याला न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आजच्या बहुजनसमाजाची जी शैक्षणिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात प्रगती झाली, वा होत आहे, त्याला ‘सत्यशोधक चळवळ’ बऱ्याच अंशी साहाय्यभूत ठरली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सत्यशोधक चळवळ ही बहुजनांच्या सर्वांगणी प्रगतीचा पूर्वार्ध होता, हे विधान सत्यशोधक चळवळीचे परिवर्तनवादी चळवळीतील योगदान स्पष्ट करणारे आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
शेतकरी, कष्टकरी, भूमीहीन वर्ग आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर सत्यशोधक चळवळीने केंद्रित केलेले लक्ष्य. ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये घडवून आणलेली क्रांती महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. या चळवळीने सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वावर महाराष्ट्राची उभारणी केली. सत्यशोधक समाजाची चळवळ ही परिवर्तनाची चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या चळवळीने केलेली सामाजिक क्रांती महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासालाच कलाटणी देणारी ठरली. खऱ्या अर्थाने ती या देशातील मानवी हक्काची पहिली चळवळ होती.
सत्यशोधक चळवळ या देशातील समाजसुधारणेच्या विशाल प्रवाहाला येऊन मिळालेला एक लहानसा प्रवाह होता. परंतु आपल्या वैचारिकतेच्या आणि कार्य चिकाटीच्या जोरावर या चळवळीने सामाजिक क्षेत्रात परिवर्तनाची मोठी क्रांती करून दाखवली, अशी मांडणी रा.ना. यांनी सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांतून केली आहे.
प्रस्तुत अभ्यासपूर्ण लेख समाजपरिवर्तनाच्या क्षेत्राच्या संदर्भात अंतर्भूत विविध बाबींची चिकित्सा करणारे आहेत. ते केवळ माहिती देऊन थांबत नाहीत, तर सामाजिक प्रबोधनही करतात.
असे पुस्तक जसे अभ्यासकांना उपयुक्त ठरते, तसेच ते समाजधुरिणांसाठीही महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. समाजप्रबोधनाची दिशा काय असावी, या दृष्टीनेही हा ग्रंथ मार्गदर्शक आहे.
या वाचनीय व उद्बोधक प्रबोधनपर ग्रंथाची चार विभागांत विभागणी केलेली आहे. ‘म. जोतीबा फुले’ या पहिल्या विभागात ‘सत्यशोधक जोतीराव फुले’, ‘शोषित जनतेचे पहिले पुढारी म. जोतीराव फुले’, ‘महात्मा फुले : एक आश्चर्य’.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘सत्यशोधक समाज’ या दुसऱ्या विभागात ‘सत्यशोधक समाजाचे स्पष्टीकरण’, ‘सत्य, सत्यशोधन व सत्यशोधक समाज परिषद’, ‘सत्यशोधक समाजाची १०४वी जयंती’ आणि ‘म. जोतीरावांच्या सत्यशोधक समाजाचा नवा विचार’, अशा वैचारिक व महत्त्वपूर्ण लेखांचा समावेश आहे.
‘सामाजिक प्रबोधन’ या तिसऱ्या विभागात ‘गणपती उत्सव’, ‘ब्राह्मण विध्वंसक आगरकर व ब्राह्मण्यरक्षक टिळक’, ‘शे. का. पक्ष : एक चिंतन’, ‘शे. का. प. + मार्क्सवाद’, ‘दलित समस्येची उकल : एक सामाजिक चिंतन’, ‘सामाजिक समतेचा नवा अर्थ’, ‘मंडल आयोग’ व ‘तर्कतीर्थ’ या लेखांचा समावेश आहे.
‘संकीर्ण’ या चौथ्या विभागामध्ये ‘बाबासाहेबांचे दर्शन : एक आठवण’, ‘तर्कतीर्थांच्या आठवणी’ आणि ‘परिशिष्टे’मध्ये ‘भारताला संविधानाशिवाय पर्याय नाही’, असे अत्यंत वाचनीय व विचाराला कलाटणी देणारे लेख आहेत.
सर्व लेखन मुद्देसूद, सोप्या, सरळ व सुबोधपद्धतीने केले आहे. ही लेखनशैली वाचकांना निश्चितच भावेल. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते वाचकांना स्वानुभवातून विचार व चिंतन करायला प्रवृत्त करते.
सहानुभूतीशून्य समाजात आजही मानवमुक्तीचा लढा पुढे न्यायचा असेल, तर रा. ना. यांनी त्यांच्या लेखातून जी वाट दाखवली, त्या वाटेकडे आपण निदान पाहतो तरी का? आणि कसे पाहतो? याविषयी या पुस्तकातील लेख मोलाचे मार्गदर्शन करतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
म. फुले यांचे वैचारिक वारसदार असलेल्या रा. ना. यांनी म. फुले यांच्या कार्याचा पट ‘सत्यशोधक समाज, सत्यशोधक परिषद’ या लेखात विस्तृत मांडला आहे. प्रबोधनाचे वारसदार कसे असतात आणि त्यांच्या कामाची पद्धत पुढे कशी न्यायची असते, याचे उत्तम उदाहरण पुस्तकातून पाहायला मिळते. एवढेच नाही, तर परिवर्तनवादी चळवळीचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
रा. ना. यांच्या विचारकक्षा अभ्यासनीय आणि संदर्भाकित आहेत. विचारांचा धागा पुढे गुंफत नेताना म. फुलेंच्या सामर्थ्याला वेगवेगळ्या लेखांमधून कवेत घेण्याचा प्रयत्न, परंतु नेमकेपणाच्या बांधीव शैलीतून त्यांनी हे सामर्थ्य मोठ्या कष्टाने पेलले आहे. हे पुस्तक म्हणजे म. फुलेंच्या कार्याची आणि विचारांची ‘लेणी’च आहेत. म. फुलेंच्या विचारकार्याला समजून घेत पुढेपुढे नेणारा हा प्रवाह परिवर्तनवादी माणसांच्या जीवन जाणीवेला जागं करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
पुन:पुन्हा विचारांवर घासून घेणं, ज्यांना जमतं, त्यांनाच प्रवाहित होता येतं. पायाभूत विचारांचा आवेग समजून घेऊन परिवर्तनाच्या दिशेने वाहणं, हे जमण्यासाठी तत्त्वांचं खूप मोठं बळ अंगी असावं लागतं. त्या बळावरच आपण उभं राहावं, यासाठीचा हा अट्टाहास आहे.
‘म.फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग ३)’ - रा. ना. चव्हाण
संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण \ पाने - ३३६ \ मूल्य - ४३० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment