अजूनकाही
२०१४ साली नादिया तिच्या आई व बहीण, भावांसोबत उत्तर इराकच्या शिंजा भागातील कोचु या गावात राहत होती. हे संपूर्ण गाव शेती करूनच आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. गावात साधारण १५०० याजिदी धर्माचे लोक रहायचे. ३ ऑगस्ट २०१४ रोजी इसिसच्या लोकांनी या गावासह आजूबाजूच्या गावांवर हल्ला केला. त्यानंतर काही लोक माऊंटसिंजा या भागात पळून जाण्यास यशस्वी झाले, मात्र नादियाचे गाव या भागापासून खूपच लांब होतं. त्यामुळे सगळं गावच इसिसच्या कचाट्यात सापडलं. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत सर्व गावातील लोकांना बंदी बनवलं गेलं. या दरम्यान सगळीकडे बातमी पसरली की, इसिसच्या आतंकवाद्यांनी ३०००पेक्षा जास्त लोकांना मारून ५०००पेक्षा अधिक लोकांना बंदी बनवून ठेवलं आहे. पुढे इसिसने या गावातील लोकांना एका शाळेत डांबले. पहिल्या मजल्यावर पुरुष आणि दुसऱ्या मजल्यावर महिला व मुलं.
त्यानंतर तिथे इसिसचा म्होरक्या आला आणि त्याने आदेश दिले की, या सर्वांकडचे पैसे, दागिने, मोबाईल सर्व काढून घ्या. तो बंदिस्त लोकांना म्हणाला, “जो कोणी इस्लाम धर्म स्वीकारणार असेल, त्याने ही खोली सोडून बाहेर जावे.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्याविषयी नादियाने २०१७ साली आलेल्या ‘द लास्ट गर्ल’ या आत्मकथनात लिहिलंय, “त्या वेळी आमच्यापैकी कुणीच बाहेर गेलं नाही. कारण आम्हाला माहीत होतं की, आम्ही खोलीच्या बाहेर गेलो, तरीही मारले जाणार. कारण त्यांच्या मते याजिदी लोक खरे मुसलमान नसतात. म्हणून ते आम्हाला धर्मांतर करून मारून टाकतात. आमच्या गावातल्या पुरुषांसोबत त्यांनी तेच केलं. सगळ्यांना बाहेर नेऊन कुठलीही तमा न बाळगता गोळ्या घातल्या. त्यांना फक्त लोकांना मारायचे होते. आमच्या कानावर जेव्हा तो गोळीबार पडला, तेव्हा काळीज दडपलं. आम्ही विचार करत असायचो की, आता ज्याला मारलं ते आमचे वडील किंवा भाऊ नसावेत, पण दुर्दैवानं तसं झालं नाही.
एका छोट्या मुलानं आम्हाला येऊन सांगितलं की, त्यांनी सर्व पुरुषांना मारून टाकलं. पण एक महिला म्हणून आम्हाला खात्री होती की, ते आम्हाला मारणार नाहीत. ते आमचा दुसरा काहीतरी उपयोग करतील...”
आणि झालंही तसंच. इसिसेने सर्व महिला व मुलांना दुसऱ्या गावात नेलं. तिथं त्यांची तीन गटांत विभागणी केली- तरुण मुली, लहान मुलं आणि इतर महिला. प्रत्येक गटासाठी वेगळी योजना होती. त्यांनी लहान मुलांना त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात नेलं, ज्या महिलांनी इसिसच्या आतंकवाद्यांशी लग्न करण्यास नकार दिला, त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं मारलं गेलं. त्यात नादियाची आईदेखील होती. तरुण मुलींच्या गटाला ते मोसुल या ठिकाणी घेऊन गेले, तिथं गेल्यावर त्या आतंकवाद्यांनी त्या मुलींवर बलात्कार करायला सुरुवात केली. यावर नादिया लिहिते, “त्या वेळी आम्ही कोणीच, आमच्याबरोबर काय घडतंय, हा विचार करण्यासाठी सक्षम नव्हतो.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
पुढे त्या आतंक्यानी मोसुलच्या इस्लामिक कोर्टात सर्व मुलींना नेलं. तिथं त्यांची छायाचित्रं काढली. तिथं आधीपासूनच हजारो छायाचित्रं लटकत होती. त्या प्रत्येक छायाचित्राबरोबर एक फोननंबर लिहिलेला होता. तो त्या माणसाचा होता, जो त्यांना घेऊन गेला आहे. तिथं वेगवेगळ्या भागांतून इसिसची माणसं यायची आणि त्यांना आवडतील त्या मुलींना विकत किंवा भाड्यानं घरी घेऊन जायची. कित्येकदा या मुलींना संबंधित आतंकवाद्यांची शारीरिक गरज पुरवण्यासाठी भेट स्वरूपातसुद्धा दिलं जायचं.
या याजिदी महिलांना ते ‘साबीया’ म्हणतं. म्हणजे युद्धात पकडलेल्या महिला. त्यांचा उपभोग घेऊन झाल्यावर त्यांना विकून टाकणं, हा इसिसच्या आतंकवाद्यांचा आवडता खेळ. अशा महिलांचा एक प्रकारचा बाजारच तिथं चालतो. १० वर्षांच्या कोणत्याही मुलीसोबत ते विवाह करू शकतात, कारण त्यांना तशी शिकवणच दिलेली असते. इसिस आतंकी कितीही महिलांसोबत विवाह करू शकतात. अशा कित्येक महिला या नरकात खितपत पडल्या आहेत. इसिस आतंकी खूप विकृत पद्धतीनं महिलाचा उपभोग घेतात.
त्याविषयी नादिया लिहिते, “पहिल्या वेळी जेव्हा मला एका आतंकी सोबत पाठवलं, तो खूप जाडा होता. माझी इच्छा नसताना त्याने मला फरफटत नेलं. मी हाथ जोडून दयेची भीक मागितली, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. त्याने एक आठवडा माझ्यावर बलात्कार केला. तो अगदी विचित्र गोष्टी माझ्याकडून करवून घ्यायचा.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्याच्या त्रासाला कंटाळून नादियाने तिथून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण तिला कल्पनादेखील नव्हती की, ती जेव्हा सापडेल, तेव्हा तिचा सोबत काय केलं जाईल. आठवल्यानंतर ती सापडली, तेव्हा रागावलेल्या मालकाने (आतंकीने) तिला चाबकाचे फटके मारले. त्यानंतर त्याच्या सुरक्षारक्षकांना एकामागोमाग तिचा बलात्कार करायला लावला.
नादिया लिहिते, “त्या दिवशी फक्त शरीरं बदलत होती. माझ्या जाणीवा थंड पडल्या होत्या. मी जोवर बेशुद्ध पडत नाही, तोपर्यंत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. त्या दिवशी त्यांनी शरीराचा नाही, तर संवेदनाचा बलात्कार केला. तिथून पुढे मला काही जाणवायचं नाही. मी मृतासारखी पडून रहायचे आणि ते इस्लामचे नाव घेऊन माझ्यावर बलात्कार करायचे. एके दिवशी तो आला. त्याने हळुवारपणे त्याचा गॅागल ड्रमवर ठेवला. त्याच्या लेखी त्या निर्जीव गॅागल एवढीही माझ्या जिवंत शरीराची किंमत नव्हती. पुढचे तीन महिने माझ्यासोबत असंच सुरू राहिलं. एकदा वाटलं मरण आलं तर बरं होईल, पण मला मरायचं नव्हतं. माझ्यासोबत जे काही घडलं, ते मला जगाला सांगायचं होतं. पण माझ्या दुर्दैवानं मला पळून जायची संधी मिळत नव्हती. माझ्या आजूबाजूस इसिसचे आतंकी पसरलेले होते.”
एक दिवशी नादियाचा मालक तिला घरी ठेवून तिच्यासाठी कपडे आणायला गेला. कपडे यासाठी की, त्याला नादियाचा सौदा करायचा होता. नेमकी हीच संधी साधून अंगात असलेलं उरलंसुरलं बळ एकवटून तिने वाट दिसले तिकडे पळ काढला. पळतापळता वाटेत तिने एक दरवाजा ठोठावला. ते सुन्नी मुस्लीम कुटुंबाचं घर होतं. नादियाने घडलेला सर्व प्रकार त्या कुटुंबाला सांगितला. ते कुटुंब कट्टर इस्लामाचं पालन करणारं नव्हतं. त्या कुटुंबाला नादियाची दया आली आणि नादियाला कुदरिस्थानच्या सीमारेषेपर्यंत पोहचवण्याचा चंग बांधला. पुढे अनेक संकट पार करत, शेकडो वेषांतर करत, वेळेप्रसंगी नवरा-बायको किंवा बहीण-भावाचं नाटक करून नादियाला सुरक्षितरित्या मोसुलमधून बाहेर पडायला मदत केली. आज नादिया एका अज्ञात स्थळी तिचा बहिणीसोबत राहते. इसिसमध्ये जे तिचा सोबत घडलं, ते सर्व तिने या तिचा आत्मचरित्रात अगदी सविस्तर सांगितलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
नादिया लिहिते, “माझ्यासोबत किंवा तिथं अडकलेल्या हजारो महिलांसोबत काय होतं, हे मला जगाला सांगायचं होतं. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता, माझ्याकडे कुठल्याच देशाची कागदपत्रं नव्हती. मी महिनोनमहिने नुसती भटकत राहिले. मोसुलमधील रस्त्यावरून लपतछपत एका सुन्नी कुटुंबाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहचवू शकले.”
नादियाच्या या धाडसीपणामुळे आज इसिसची महाभयंकर दहशत आणि त्यांनी इराकमध्ये चालवलेलं हत्याकांड किती क्रूर आहे, याची जगाला माहिती मिळाली. आजच्या घडीला नादिया संयुक्त राष्ट्राची ‘सदिछा राजदूत’ म्हणून काम पाहते. त्याशिवाय मानवी हक्कांसाठी काम करणारी एक समर्थ कार्यकर्ती बनली आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
नादिया आज मोठ्या धाडसानं इसिसच्या कचाट्यात सापडलेल्या ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणजेच ‘लैंगिक गुलाम’ स्त्रियांची बाजू आंतरराष्टीय स्तरावर मांडते. अशा पीडित स्त्रियांना अज्ञान स्थळी नेऊन त्यांना मानसिक आधार देऊन उपचार करते. तीला २०१८ साली या कामासाठी शांततेचा ‘नोबल पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं आहे.
मानवी समाजाविरुद्धची गुन्हेगारी व कत्तली या विरोधात इस्लामी राष्ट्राला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्यासाठी नादिया प्रयत्नशील आहे.
नादियाचं आत्मचरित्र वाचल्यावर इसिस ही संघटना किती भयानक आहे, याचा अंदाज बांधता येतो.
.................................................................................................................................................................
लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर मूळचे नागपूरचे असून एका आयटी कंपनीमध्ये काम करतात.
aniruddhanimkhedkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment