मूळ चाणक्याने साम-दाम-दंड-भेद वगैरे ‘दबंगाई’ मान्य केली होती, परंतु सगळी तत्त्वे पायदळी तुडवावीत, असे तो कधीच म्हणालेला नव्हता, ही गोष्ट ‘मोदीकालीन भारता’तील लोक विसरले होते!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 08 May 2023
  • संकीर्ण व्यंगनामा शिरोजीची बखर भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अदानी Adani राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress हिंडेनबर्ग रीसर्च Hindenburg Research अदानी समूह Adani Group

आज शिरोजीच्या बखरीच्या बाराव्या प्रकरणाकडे येताना आम्हाला संपादक म्हणून अतिशय हर्ष होतो आहे.

गुजरात निवडणुकीनंतर भास्कर-समर-पांडेजी आणि अविनाश-अच्युत-नाना यांच्यात कलह माजला. त्यामुळे त्यांच्या चर्चा बंद पडल्या. खुद्द शिरोजीने यावर काहीही लिहिलेले नाही. एक मोठा इतिहासकार आपल्या पात्रांची पत्रास कशाला ठेवेल! ही पात्रे म्हणजे, शिरोजीसाठी इतिहासाचे ‘रिफ्रेशिंग’ पाणी वाहून नेणारे केवळ नळ होते. या पात्रांमध्ये भांडणे झाली, तर दुसरी पात्रे तयार करणे आपल्याला सहज शक्य आहे, हे शिरोजीला माहीत होते.

शिरोजीची बखर संपादक मंडळाला या भांडणांचा सुगावा शिरोजीने ‘अक्षरनामा’चे तत्कालीन संपादकांना लिहिलेल्या एका मेलवरून लागला.

झाले असे की, गुजरात निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ १५६ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या विरोधकांचे संपूर्ण पानिपत झाले. काँग्रेसला १७ आणि आम आदमी पार्टीला ५ जागा मिळाल्या. म्हणजे आपमुळे काँग्रेसचे अतोनात नुकसान झाले, तिने १२ टक्के मते खाल्ली. पण, गंमत अशी झाली की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्येसुद्धा विरोधकांनी बाजी मारली.

नाना, अविनाश आणि अच्युत चार प्लेट बटाटा-वड्यांची पैज जिंकले होते. ती वसूल करायला ते पांडेजींच्या ठेल्यावर आले, तेव्हा भास्कर, समर आणि पांडेजी तयारीत होते.

नाना, अविनाश आणि अच्युत आल्या आल्या पांडेजींनी त्यांना ‘बास्किन अँड रॉबिन्स’चे भारीमधले आईस्क्रिम दिले. ते झाल्यावर भास्करने भारीमधला पिझ्झा दिला.

ते सर्व खाऊन झाल्यावर पांडेजींनी त्यांना सांगितले की, बास्किन अँड रॉबिन्सचे आईस्क्रिम काँग्रेसच्या विजयानिमित्त होते आणि पिझ्झा विरोधक लोकसभेच्या पोटनिवडणूक जिंकले म्हणून होता.

त्यानंतर पांडेजींनी त्यांना गरमागरम वडे आणून दिले आणि म्हणाले – ‘हे घ्या गुजरात निवडणुकीची पैज आम्ही हरलो, त्याचे चार प्लेट वडे.’ त्यावर अविनाश अतिशय चिडला- ‘भाजपने एवढा मोठा विजय मिळवला आणि तुम्ही बटाटे-वडे देताय?’ त्यावर भास्कर म्हणाला, ‘पैज तर बटाटा-वड्यांचीच लागली होती.’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यावर अविनाश अजून चिडला. काँग्रेस जिंकली म्हणून बास्किन अँड रॉबिन्स आणि भाजप जिंकली म्हणून बटाटे-वडे?

नानासुद्धा चिडले होते. ते म्हणाले, ‘लोकसभेची फडतूस पोटनिवडणूक ती काय आणि तुम्ही पिझ्झा देताय?’

आपण खाताना न विचारता खाल्ले, याची बोच अविनाशच्या मनाला खूप लागली. त्याचा संताप संताप झाला.

भाजपला वडे आणि काँग्रेसला बास्किन अँड रॉबिन्स? आणि पिझ्झा तोसुद्धा महागातला? सहाशे रुपयांचा? अविनाश विचार करत राहिला.

यानंतर खालीलप्रमाणे संभाषण झाल्याचे ‘अक्षरनामा’च्या संपादकांना लिहिलेल्या पत्रात कळवले आहे-

अविनाश - आम्हाला नको आहेत वडे.

समर - तुम्ही वडे नाकारू शकत नाही, कारण वडे ही ‘स्वदेशी’ डिश आहे.

भास्कर - दोन परकीय डिश खाऊन तुम्ही ‘स्वदेशी’ डिश नाकारता आहात.

त्यावर नाना पटकन एक वडा उचलून खाऊ लागले.

नाना- (खात खात) बरोबर आहे. वड्याचा अपमान आपण करू शकत नाही. देशाचा अपमान केल्यासारखेच आहे ते!

अविनाश - नाही नाना, परकीय गोष्टींना आपल्या गोष्टींपेक्षा महत्त्व देण्याचे षडयंत्र आहे हे. सोनिया गांधी ‘इटालियन’ आहेत, म्हणून पिझ्झा दिला यांनी आपल्याला. गुलाम मेंटॅलिटी!

अच्युत - पण आपण सगळ्यांनीच मिटक्या मारत खाल्ला आहे पिझ्झा!, आणि आइस्क्रिमसुद्धा…

अविनाश - तू गप बस रे! इथं अपमान झाला आहे भाजपच्या विजयाचा. मुद्दाम केला गेला आहे अपमान!

नाना - (वडा खात) तुम्ही वडा देऊन भाजपच्या विजयाचा अपमान करायचा प्रयत्न करत आहात, पण ते शक्य नाहिये. भाजपचा विजय हा राष्ट्राचा विजय आहे.

अविनाश – ‘हिंदूराष्ट्रा’चा!

अच्युत - मग तुम्ही चिडताय कशाला?

अविनाश - राष्ट्राच्या विजयाचा अपमान करण्याचा नीच प्रयत्न केला जातोय आणि आपण चिडायचं नाही?

अच्युत - साधी गोष्ट आहे ही. एक आईस्क्रिम ते काय? एक पिझ्झा तो काय?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अविनाश - शत्रूंवर प्रेम करण्याच्या या मानसिकतेमुळेच आपण गुलामगिरीमध्ये लोटलो गेलो.

नाना - (वडा खात) अकराशे वर्षांच्या गुलामगिरीमध्ये.

भास्कर - आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जिंकलो आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकलो, म्हणून आम्ही प्रेमानं आणलं होतं, आईस्क्रिम आणि पिझ्झा!

अविनाश - तुम्हाला मोदीजींचा अपमान करायचा होता.

नाना - तो महात्मा आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे होतं.

अविनाश – ‘महात्मा’? नको ती ‘मनहूस’ उपाधी आपल्या मोदीजींना! मोदीजी अवतार आहेत.

भास्कर – अरे, किती द्वेषानं किती पछाडले गेले आहात तुम्ही?

अविनाश - (उठून आणि थरथर कापत) आम्ही देशप्रेमानं भारलेले लोक आहोत आणि तुम्ही आम्हाला द्वेषानं पछाडलेले म्हणताय? विकृत!

भास्कर - विकृत कोण आहे, ते इतिहास ठरवेलच!

नाना - इथून पुढचा इतिहास आम्हीच लिहिणार आहोत. (नानांच्या हातात पांडेजींनी तळलेल्या बटाटा-वड्याचे सोनेरी कव्हर होते. त्याच्याकडे बघत-) स्वर्णिम इतिहास!

अविनाश - तू आम्हाला विकृत म्हणतो आहेस?

भास्कर - मी कशाला म्हणू? आजच्या भारतात दोन पक्ष झगडत आहेत. यातले कोण कसे आहे, यावर पुढे इतिहासाला जे काही म्हणायचे आहे, ते तो म्हणेल, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे.

यावर अविनाश खूप चिडला. या देशद्रोह्यांची ही मजाल? या विचाराने त्याचा तीळपापड झाला. तो हातातला वडा टाकून नानांच्या नव्या कोऱ्या स्कॉर्पियोमध्ये जाऊन बसला. मग नाना आणि अच्युत यांनाही उठावे लागले. आता परत कधीही आपण या लोकांची तोंडे बघणार नाही, असे जाहीर करून त्याने नानांच्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमधल्या ड्रायव्हरला गाडी स्टार्ट करायला सांगितले.

नानांना खूप वाईट वाटले. त्यांना पांडेजींच्या हातचे वडे खूप आवडले होते. त्यात अविनाशची ही हाराकिरी!

एवढ्यात पांडेजी गाडी समोर आले आणि त्यांनी गाडी थांबवली. ते म्हणाले, “अरे, शर्त के बडे तो लेकर जाईए.” त्यांच्या ठेल्यावरच्या पोऱ्याने वडे पॅक करून आणले. अविनाशच्या निषेधाकडे दुर्लक्ष करून नानांनी वडे घेतले. शत्रू झाला म्हणून काय झालं. त्याचं मन मोडणं सहिष्णू नानांना शक्य नव्हतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पुढे अदानी प्रकरण झालं. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गौतम अदानी या उद्योगपतीच्या संपत्तीमध्ये अतोनात वाढ झाली. २०१४ साली साधारणपणे पन्नास हजार कोटींची संपत्ती असलेले अदानी आठ वर्षांत दहा लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक झाले. त्या काळी न्यू यॉर्कमध्ये ‘हिंडेनबर्ग’ नावाची एक ‘व्हिसल ब्लोअर’ रिसर्च फर्म होती. त्यांनी अदानी यांच्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणारा ‘हिंडेनबर्ग अहवाल’ प्रसिद्ध केला. संपूर्ण भारत देशात एकच हंगामा उडाला. अदानी समूहाचे शेअर्स सत्तर-सत्तर टक्क्यांनी कोसळले.

तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यावर टीकेची झोड उठली. मोदीजींची भक्तमंडळी भयंकर संतापली.

या गोंधळात एके दिवशी पांडेजी आणि नाना यांची भेट झाली. आता अदानी प्रकरणामुळे अविनाशजी आपल्याला भेटायला येणार नाहीत, असे भास्कर म्हणत असल्याचे पांडेजींनी नानांना गालातल्या गालात हसत सांगितले. ते सर्व नानांनी गालातल्या गालात हसत अविनाशला सांगितले. अविनाश भयंकर चिडला. एक तर हे लोक पंतप्रधानांच्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि वर आपल्या शौर्यावर संशय घेत आहेत. दुसऱ्याच दिवशी त्याने सगळ्यांना फोन केले आणि पांडेजींच्या ठेल्यावर बैठक बोलवली.

त्या काळचे हे भक्तलोक स्वतःला फार सुसंकृत, चलाख आणि ज्ञानाने मंडित वगैरे समजत असत. पण खरं तर ही मंडळी अत्यंत साधी-भोळी अशी होती. त्यांचा कशावरही विश्वास बसत असे. म्हणून तर हे ते अनेक भूलथापांना बळी पडत असत. पांडेजींनी टाकलेला ‘गुगली बॉल’ तसा सोपा होता, पण तो अविनाशच्या लक्षात आला नाही. मोदीजी यांनी दिलेली आश्वासने फोल आहेत, हे काही काळानंतर भक्त सोडून सगळ्यांनाच कळलेले होते, परंतु हे त्यांच्या भक्तांना शेवटपर्यंत कळले नाही. पुढे आश्वासनपूर्ती न झाल्यामुळे मोदीजींना सत्तेवरून जावे लागले, तरीही मोदीभक्तांना ते कळले नाही.

असो. अविनाशच्या लक्षात पांडेजींचा ‘गुगली बॉल’ आला नाही, हे चांगलेच झाले. त्यामुळे एक छोटी का होईना ‘बखर’ आपल्या हाती लागली.

या बखरीची प्रस्तावना लांबली आहे, याची जाणीव आम्हाला आहे. परंतु यात बरेचसे शब्द शिरोजीचेच आहेत, हे लक्षात घेऊन या लांबलेल्या प्रस्तावनेबद्दल शिरोजीचे बाविसाव्या शतकातील चाहते रागावणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.

- श्रीमान जोशी, संपादक शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

शिरोजीची बखर - प्रकरण बारावे

गुजरात निवडणुकीनंतर खूप दिवसांनी दोन्ही पक्ष पांडेजींच्या ठेल्यावर उपस्थित झाले. वातावरण अतिशय तणावपूर्ण होते. पैज वसूल करायला आलेले असताना काँग्रेस पक्षाच्या हिमाचल प्रदेशातील विजयाची पार्टी भास्कर, समर आणि पांडेजी यांनी दिली म्हणून अविनाश संतापला होता.

अविनाश - गुजरातमधील प्रचंड विजयाचा तुम्हाला राग आला होता आणि म्हणून तुम्ही हिमाचलमधल्या विजयाची मोठी पार्टी दिली.

भास्कर - असं काही नाही.

अविनाश - क्षुद्र मनोवृत्तीचे आहात तुम्ही!

अच्युत - तो विषय जाऊ दे आता.

समर - आपण अदानी प्रकरणावर बोलू.

अविनाश - गौतम अदानी हे कर्तृत्ववान देशभक्त आहेत.

भास्कर – ‘हिंडेनबर्ग अहवाल’ वाचला आहेस का?

अविनाश - कशाला वाचायचा परक्या लोकांचा अहवाल?

नाना - हे सगळे कारस्थान आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देदीप्यमान प्रगती करणाऱ्या भारताविरुद्ध.

भास्कर - अदानी यांच्या कंपनीत त्यांच्याच मोठ्या भावाने एक परकीय म्हणून पैसा लावला.

अविनाश - त्यात काय मग? परदेशातला भाऊ देशातल्या भावाच्या कंपनीत पैसा नाही गुंतवू शकत?

भास्कर - त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला?

अविनाश - कुठूनही आला असेल.

भास्कर - सांगायला काय हरकत आहे?

अविनाश - तुम्ही इतर परकीय लोकांना जाऊन विचारता का, तुमचा पैसा कुठून आला आहे म्हणून?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भास्कर - गौतम अदानी यांच्या मोठ्या भावाच्या कंपन्या खोट्या आहेत. त्यांच्यात कोणीही काम करत नाही, कोणी नोकरदार नाहीत. तरीही वीस-वीस हजार कोटी रुपये या कंपन्यांकडे येत राहतात आणि तो ते पैसे भारतात टाकत राहतो.

अविनाश - काय हरकत आहे? शेअर्सच घेतो आहे ना?

भास्कर - याला ‘मनी-लॉन्डरिंग’ म्हणतात.

अविनाश - म्हणजे?

भास्कर - काळा पैसा पांढरा करणे.

अविनाश - कुणाचा काळा पैसा?

भास्कर - कुणाचाही असू शकतो. भारतामधल्या कुणाचाही असू शकतो. राजकारणी, अदानी, ड्रगवाले कुणाचाही असू शकतो.

अविनाश - सगळे आरोप खोटे आहेत.

भास्कर – अरे, विनोद अदानी यांच्या खोट्या कंपन्यांमधून खरे खरे पैसे गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये आले, हे खरे आहे.

समर - धडधडीत सत्य आहे.

अविनाश - असेल!

भास्कर - हे पैसे कुणाचे आहेत, हे कळायला नको का?

अविनाश - भारतात पैसा आला आणि तो देशभक्त अदानी यांच्या कंपन्यांमध्ये लागला, चांगली गोष्ट आहे.

भास्कर - हा पैसा वापरून अदानींच्या कंपन्यांमधले तोटे लपवले गेले. ‘शेअर होल्डर्स’ना फसवले गेले. गरीब लोकांनी लावलेला कष्टाचा पैसा बुडाला!

अविनाश - बोलतोस काय तू हे? एक देशभक्त उद्योगपती असल्या गोष्टी अजिबात करणार नाही.

समर - या देशभक्त उद्योगपतीवर गेल्या पंचवीस वर्षांत आर्थिक गोंधळाच्या आणि अफरातफरीच्या डझनावारी केसेस झालेल्या आहेत.

भास्कर - त्या एकत्र केल्या तर एक लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये एवढी रक्कम होते.

अविनाश - कसली रक्कम?

समर - या सगळ्या केसेसमधून श्रीयुत अदानी यांनी या ना त्या प्रकारे एक लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांना सरकारला फसवले, असे आरोप आहेत.

अविनाश - शक्यच नाही. अदानी असे असते, तर मोदीजींनी त्यांच्याशी मैत्रीच केली नसती.

समर – ‘हिंडेनबर्ग अहवाल’ने अनेक केसेस दिल्या आहेत आपल्या अहवालामध्ये.

अविनाश - तो हिंडेनबर्ग चोर आहे एक नंबरचा. गांजा ओढणारा माणूस आहे तो.

भास्कर - कोण?

अविनाश - हिंडेनबर्ग. त्याचा गांजा ओढतानाचा फोटो आला होता.

भास्कर - कुठे?

अविनाश - व्हॉट्सअ‍ॅपवर.

भास्कर - हिंडेनबर्ग माणूस नाहीये, ते नाव आहे एका कंपनीचं.

समर - हिंडेनबर्गचा मालक आहे नेथन अँडरसन.

अविनाश - असं दुसऱ्याच्या नावानं स्वतःची कंपनी काढणाऱ्या माणसावर कशाला विश्वास ठेवायचा?

अच्युत - हो बरोबर आहे. कुलकर्णी नावाचा माणूस ‘पाटील आणि कंपनी’ अशा नावाची कंपनी कशाला काढेल?

नाना - सगळंच संशयास्पद आहे!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भास्कर - हिंडेनबर्ग नावाचं एअरशिप बनवलं होतं हिटलरनं, हायड्रोजननी भरलेलं. लोक सांगत होते की, हे धोकादायक आहे. हायड्रोजन पेट घेऊ शकतो. कुणी ऐकलं नाही. शेवटी पेटलं ते एकेदिवशी! ३५ लोक गेले!

नाना - म्हणजे हिंडेनबर्ग ही हायड्रोजननी भरलेली कंपनी आहे का? (हु हु हु)

भास्कर - शेअर मार्केटमध्ये हायड्रोजननी भरलेल्या धोकादायक कंपन्या कुठल्या आहेत, ते सांगतात हे हिंडेनबर्ग कंपनीवाले.

पांडेजी - अदानी ग्रूप की, कंपनीयां हायड्रोजनसे भरी हुई हैं, ऐसा बता रहा हैं हिंडेनबर्ग रिपोर्ट.

नाना - कंपनीत कसा भरता येईल हायड्रोजन? (हु हु हु)

पांडेजी - ये अदानी जो तैर रहा हैं हवा में, वो कर्जे के हायड्रोजन से तैर रहा हैं.

अविनाश - मतलब?

भास्कर - त्याला दोन लाख कोटी रुपयांची कर्जं दिली आहेत बँकांनी.

समर - सगळा फ्रॉडचा हायड्रोजन.

भास्कर - और मिस-मॅनेजमेंट का भी.

समर - मोदीजींनी चौकशी करायला पाहिजे होती, या सगळ्या प्रकरणाची. पण मोदी गप्प बसले आहेत.

अविनाश - त्यांनी केली असणार चौकशी गुपचूपपणे. काही मिळालं नसणार.

भास्कर - मग तसं जाहीर करायचं.

अविनाश - कशाला? तुम्हा माकडांना जोर यायला?

भास्कर - मोदीजींनी चौकशी समिती नेमली नाही, म्हणून शेवटी सर्वोच्च न्यायालयाला समिती नेमावी लागली.

अविनाश - या सर्वोच्च न्यायालयाला काय गरज आहे मधेमधे करायची, मोदीजी बघून घेतायत नं सगळं!

समर - असं कसं म्हणून चालेल? सरकारवर लक्ष ठेवायला नको का?

अच्युत - मोदीजी इतके चांगले आहेत, त्यांच्यावर कशाला ठेवायचं लक्ष!

नाना - चौकीदार चांगला असताना त्याच्यावर लक्ष ठेवायला कशाला पाहिजे अजून एक चौकीदार? (हु हु हु)

(मोदी यांच्या भक्तांची ही मते होती, यावर आज बाविसाव्या शतकात कुणाचाही विश्वास बसणार नाही. अशा विलक्षण प्रज्ञेचे मतदार असताना भारतातील लोकशाही वाचलीच कशी, असे विचार आज मनात येत राहतात. या ‘होलसेल भक्ती’पासून अनेक मतदारांनी स्वतःला दूर ठेवले होते, हे लोकशाही जिवंत राहण्यामागचे खरे कारण आहे.)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भास्कर – अरे, सर्वोच्च न्यायालयानं चौकशीचा आदेश दिला आहे, म्हणजे केसमध्ये काहीतरी अर्थ असेल की नाही?

समर - अदानी निष्पाप असेल, तर मोदीजींनी करावी चौकशी त्याची!

भास्कर - कर नाही त्याला डर कशाला?

पांडेजी - विरोधी पक्ष के नेताओंकी इन्क्वायरी होती हैं, तब यहीं कहतो हो ना आप लोग?

नाना - विरोधी पक्षनेताओंकी लायकीच वहीं होती हैं!

अच्युत - नाही नाही. अदानी प्रकरणाची होऊन जाऊ द्या चौकशी. कर नाही त्याला डर कशाला?

अविनाश - तू गप रे! तू मोदीजींचा भक्त आहेस की, देशद्रोही आहेस, हे एकदा सांगून टाक शेवटचं!

अच्युत – अरे, बरोबर म्हणतायत ते! मोदीजींनी करून टाकायला पाहिजे चौकशी. आहे काय आणि नाही काय त्यात? कर नाही त्याला डर कशाला?

अविनाश - म्हणजे देशद्रोह्यांनी मागणी केली म्हणून चौकशी करायची? तीसुद्धा अदानीसारख्या कर्तृत्ववान माणसाची?

अच्युत - हो काय हरकत आहे. श्री राम प्रभूंनी एक धोबी बोलला म्हणून सीतेची अग्निपरीक्षा नाही का केली? कर नाही त्याला डर कशाला?

भास्कर - सीझर्स वाईफ मस्ट बी अबाव्ह सस्पिशन!

अविनाश - काही गरज नाही. मोदीजी आणि अदानी या दोघांनाही खूप कामं आहेत.

अच्युत - मग लोकांना संशय येत राहणार, मोदीजी चौकशी का करत नाहियेत म्हणून.

नाना - कुणाला काही कळलेलं नाहिये अदानी प्रकरण. तेवढी अक्कलच नसते सामान्य लोकांना. (हु हु हु)

अच्युत - अदानीनं काही तरी गोंधळ घातलाय आणि मोदीजी चौकशी करत नाहियेत एवढं तरी कळतंय ना सामान्य लोकांना?

अविनाश - अरे सोड! मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे लोकांचा!

भास्कर - असे आरोप होतात तेव्हा जगभर चौकशा केल्या जातात.

अविनाश - हा मोदीजींचा भारत आहे. इथे मोदीजी म्हणाले की, भ्रष्टाचार नाही झाला, म्हणजे नाही झाला.

भास्कर - मोदीजी कुठं म्हणाले आहेत की, अदानीने भ्रष्टाचार नाही केला म्हणून?

समर - गप्प बसले आहेत मूग गिळून!

यावर अविनाश फार म्हणजे फार म्हणजे फारच संतापला! तो उठून उभा राहिला. त्याचं सर्व अंग थरथरत होतं. तोंडातून शब्द फुटत नव्हता. आदरणीय मोदीजींविषयी ही भाषा?

अविनाश - तू गप्प बस! मोदीजींच्या बाबतीत ही भाषा चालणार नाही. अशी भाषा त्यांच्या बाबतीत वापरायला मोदीजी म्हणजे राहुल गांधी नाहिये.

भास्कर - तू राहुल गांधी यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरू नकोस. तेही एक सन्मान्य व्यक्ती आहेत मोदीजींसारखेच.

यावर अविनाश भयंकर संतापला. मोदीजी आणि राहुल यांची तुलना?

अविनाश - (संतापाने ओरडत) काय बोलतो काय आहेस तू? मोदीजी आणि राहुलची तुलना?

तो उभा राहिला आणि संतापानं पाय आपटू लागला. त्याचं ब्लड-प्रेशर वाढलं.

अविनाशचा हा संताप पाहून आज बाविसाव्या शतकातील वाचकाला आश्चर्य वाटेल, पण मोदीजींच्या तत्कालीन भक्तांमध्ये संतापी लोकांची भरमार होती.

(परवा २०२०मध्ये जन्म झालेल्या एका वृद्ध गृहस्थांशी ओळख झाली. हे गृहस्थ आज २१२३मध्ये अर्थातच १०१ वर्षांचे आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले, “मोदीकालीन भारतामध्ये मोदीभक्त लोकांना विरोधी विचार अजिबात चालत नसत. विरोधी विचार ऐकला की, ते संतापामुळे बेशुद्ध पडत. त्या काळात एखाद्या कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा कुठेही चर्चा चालू असताना कोणी बेशुद्ध पडला, तर आजुबाजूचे लोक विचारत, ‘हा मोदी-भक्त आहे का? फार संतापी जमात होती ही!’

यातील खरे-खोटे आज २१२३मध्ये आपण करू शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एकमात्र खरे की, या मोदीभक्त लोकांच्या संतापाची भीती त्या काळात अनेक लोकांनी घेतली होती. विशेषतः व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये. हे लोक कुठल्याही गोष्टीनं संतापत. थैमान घालत. त्यामुळे अनेक ग्रूपमध्ये काही लोक, विशेषतः स्त्रिया, बोलणंच बंद करत! - संपादक.)

अविनाशला नाना आणि पांडेजी यांनी शांत करून खुर्चीवर बसवलं. तरीही तो बराच वेळ थरथरत होता. मोदीजी एका भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालत आहेत, हे तर हे लोक सुचवत नाहियेत ना, या विचारानं तो अस्वस्थ झाला होता. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे राहुल गांधी आणि मोदीजींची यांची तुलना? नॉनसेन्स!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पांडेजींनी कैरीच्या पन्ह्याचा एक थंडगार ग्लास त्याला आणून दिला. त्यामुळे अविनाश थोडा शांत झाला. नाना म्हणाले, त्यांनाही संतापामुळे काही सुचत नाहिये. म्हणून पांडेजींनी त्यांनाही एक ग्लास पन्हं दिलं.

सगळं शांत झाल्यावर भास्कर म्हणाला -

भास्कर - अविनाश एवढा संताप चांगला नाही.

अविनाश - तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला?

भास्कर - तुम्ही एकदा सार्वजनिक जीवनात आलात की, लोक तुम्हाला अनेक प्रश्न विचारणार.

अच्युत - अदानी प्रकरणाबाबत मोदीजींनी काहीतरी बोलायला पाहिजे, असं माझंसुद्धा मत आहे.

अविनाश - तू देशद्रोही आहेस!

पांडेजी - आप एक चीज समझ लीजिए अविनाशजी. प्रश्न तो मोदीजीने भी पूछे थे मनमोहनसिंगजी को.

अविनाश - त्याला तर प्रश्न विचारलायच पाहिजे होते. त्याची लायकीच ती होती.

भास्कर – अरे, आपले पंतप्रधान होते ते! त्यांना तरी ‘आहो-जाहो’ कर!

(मोदीजींना सर्वांनी अहो-जाहो करावं, अशी सर्व भक्तांची अपेक्षा होती, परंतु त्याच वेळी विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना हे लोक ‘अरे-तुरे’ करत! आपण आणि आपली विचारधारा तेवढी श्रेष्ठ आणि बाकी सगळे हीन, अशी ही वृत्ती होती. याशिवाय, माणसामाणसांमध्ये भेद करण्याची असहिष्णू वृत्ती यामागे होती.)

अविनाश - भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणारा पंतप्रधान! आरोप झाले की, मूग गिळून गप्प बसायचा.

नाना - त्याला मोदीजी ‘मौनमोहनसिंग’ म्हणत. (हु हु हु)

पांडेजी - बुरा मत मानिए नानाजी, लेकिन मोदीजी भी वहीं कर रहें हैं आज की तारीख में! 

अविनाश - अदानी भ्रष्टाचारी नाहिये.

समर – ‘पीएम केअर फंडा’ची अशीच बोंब आहे.

अविनाश - काय बोंब आहे?

समर - मोदीजींनी कोविडच्या वेळी प्रमोट केलेला ‘पीएम केअर फंड’ सरकारी नाहिये.

नाना - तो सरकारी फंड आहे.

समर - हा फंड सरकारी नाहिये, हा चॅरिटेबल फंड आहे, असं सरकारने दिल्ली उच्च न्यायालयापुढं मान्य केलं आहे.

अविनाश - नसेल!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भास्कर - तुम्ही ‘प्राईम-मिनिस्टर’ असं नाव लावून पैसे जमवता, तेव्हा तो फंड सरकारीच असायला पाहिजे.

समर - भारत सरकारचे तीन सिंहांचं सरकारी सीलसुद्धा वापरलं आहे फंडासाठी पैसे मागताना.

अविनाश - मग?

भास्कर - सरकारी ऑडिट लागू होत नाहिये या फंडाला.

अविनाश - गरज काय आहे?

समर - माहितीच्या आधिकाराखाली माहिती मागवू शकत नाही कोणी या फंडाची.

अविनाश - गरज काय आहे मोदीजींचा फंड असताना?

भास्कर - पब्लिक सेक्टर कंपन्यांनी तीन-चार हजार कोटी दिले आहेत या फंडाला!

अविनाश - ऑडिट नाहिये तर तुम्हाला कसं कळलं की, सरकारी कंपन्यांनी यात पैसे टाकले आहेत म्हणून?

भास्कर – ‘बिझनेस स्टँडर्ड’ने स्टॉक एक्सचेंजमधून काढली ही माहिती. कंपन्यांच्या वार्षिक अहवालांमधून.

अविनाश - मग?

भास्कर – अरे, मग मग काय करतो आहेस?

अविनाश - मोदीजी असतील तर सगळं योग्यच असणार. चर्चेची गरजच नाही.

भास्कर – अरे, तुम्ही लोकांकडून पैसे घेता आणि हिशोब गुप्त ठेवता?

समर - राहुल गांधी किंवा केजरीवालनं असं केलं असतं, तर तुम्ही काय म्हटलं असतं?

अविनाश - त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि मोदीजींची गोष्ट वेगळी आहे.

भास्कर - काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की, काही चिनी कंपन्यांनीसुद्धा पैसा दिला आहे या फंडाला.

अविनाश - राहुल किंवा केजरीवाल यांच्या फंडांना चीनी कंपन्यांनी पैसा दिला असता, तर तुम्ही लोक काय म्हणाला असता?

अविनाश - त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि मोदीजींची गोष्ट वेगळी आहे.

भास्कर - कशी?

अविनाश - मोदीजी प्रामाणिक आहेत, हे दोघं नाहीयेत.

भास्कर - असं कसं म्हणता येईल? त्यांना न्यायालयानं शिक्षा वगैरे केली आहे का?

अविनाश - कळेल कळेल तुम्हाला एके दिवशी की, हे लोक चोर आहेत आणि मोदीजी स्वच्छ आहेत म्हणून.

भास्कर – अरे, अदानी स्वच्छ आहे, मान्य. पण प्रश्न उपस्थित झालाय तर चौकशी करा ना.

अविनाश - गरज नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समर - आपण लहानपणी गणपतीसाठी शंभर रुपये वर्गणी जमवली, तरी आपले आई-वडील त्याचे हिशोब सगळ्या वर्गणीदारांना दाखवायला लावायचे. इथं तुम्ही ‘पीएम’ म्हणून पैसे गोळा करताय आणि हिशोब दाखवायला नकार देताय.

अविनाश - ज्यांनी वर्गणी दिली आहे त्यांना मागू देत हिशोब, मोदीजी दाखवतील.

नाना - तुम्ही दिली आहे का, वर्गणी ‘पीएम केअर्स’ फंडाला?

भास्कर - आम्ही नाही दिली, पण आम्ही दिलेल्या करांमधून तयार झालेल्या पब्लिक सेक्टर कंपन्यांनी दिली आहे.

नाना - मग त्याना जाऊन मागा हिशोब. (हु हु हु)

(लॉजिक वापरण्याची भक्तांची पद्धत बघून आज बाविसाव्या शतकातील वाचक हैराण होत असतील, याची आम्हाला जाणीव आहे. भक्तांचे ‘लॉजिक’ बघून कुणाला मानसिक अथवा शारीरिक आजारपण सुरू झाले, तर त्याची जबाबदारी संपादक मंडळावर नाही, हे आम्ही नम्रपणे जाहीर करतो, आणि शिरोजीची बखर बाविसाव्या शतकातील वाचकांनी आपल्या जबाबदारीवर वाचावी, असंही. - संपादक)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भास्कर - आम्ही सरकारला दिलेल्या करामधून या कंपन्या तयार झाल्या आहेत. आम्ही सरकारलाच हिशोब मागणार.

समर - पब्लिक सेक्टर कंपन्या आमच्या वर्गणीमधून तयार झाल्या असत्या, तर आम्ही त्यांना हिशोब मागितला असता.

अच्युत – हो, हे बरोबर आहे. हिशोब सरकारनेच द्यायला पाहिजे.

अविनाश - तू गप रे!

अच्युत – अरे, देऊन टाका म्हणावं हिशोब. बसवा सरकारी ऑडिट.

(अच्युत ही एक इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा शिरोजीने रेखाटली आहे. हा खरं तर मोदीभक्त, मोदीजींचा निष्ठावंत मतदार, पण गंमत अशी की, त्याच वेळी तो सरळ विचार करणारा होता. मोदीजी सरळ आणि प्रामाणिक आहेत, अशी त्याची मनोमन धारणा होती. त्यांनी त्याचप्रमाणे वागावे, अशी त्याची अपेक्षा होती. आपल्या या धारणेमुळे अच्युत इतर मोदीभक्तांची अत्यंत मोठी गोची करत असे. - संपादक)

अविनाश - काय गरज काय आहे?

अच्युत - अदानी प्रकरणावर समिती बसवून टाका आणि ‘पीएम केअर्स’वर ऑडिट बसवून टाका. आहे काय आणि नाही काय त्यात?

समर - कर नाही त्याला डर कशाला? 

अच्युत - सीझर्स वाईफ मस्ट बी अबाव्ह सस्पिशन!

नाना - (हु हु हु) तुम्हाला पाहिजे तेवढा संशय घ्या त्यांच्यावर. कुणीही विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर.

भास्कर - पैसा ही अशी गोष्ट आहे की, ती कुठल्याही राजकारण्याची विकेट घेऊ शकते.

अविनाश - तुला म्हणायचं काय आहे नक्की ?

भास्कर - आम्हाला म्हणायचे आहे की, अदानीची चौकशी करा आणि ‘पीएम केअर्स’चे हिशोब उघडे करा जनतेसाठी.

अविनाश - नाही केले तर काय करणार आहात तुम्ही?

भास्कर - आम्ही काहीच नाही करणार. कर्नाटकात भाजपची जी अवस्था झालीय, ती सर्वत्र होणार.

अविनाश - काय झालीय अवस्था?

समर - कन्नड लोक भाजप सरकारला ‘फॉर्टी परसेंट सरकारा’ असं म्हणू लागले आहेत. 

अविनाश - खोटं आहे हे.

भास्कर - ठीक आहे कळेलच निवडणूक निकालानंतर.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समर - लोक इतके विटले आहेत भाजपच्या भ्रष्टाचाराला की, काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार आहे तिथं.

भास्कर - सी-व्होटर, लोकनीती, सीएसडीएस असे सगळे पोल्स ‘काँग्रेस विजयी होणार’, हेच सांगतायत.

अविनाश - खोटे आहेत ते सर्व्हे.

नाना - आणि खरे असले तरी मोदीजींनी फिरवली आहे बाजी.

भास्कर - मला नाही वाटत. सीएसडीएसचे संजय कुमार म्हणत होते, मोदीजींची लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे.

अविनाश - (प्रचंड संतापत) शक्य नाही. मोदीजी आजन्म पंतप्रधान राहणार आहेत.

नाना - भाजप सरकार स्वच्छ आहे कर्नाटकातलं.

भास्कर - सरकारी कंत्राटदारांनी मोर्चा काढला होता. ‘४०-४० टक्के कमिशन’ द्यायला लागतंय म्हणून.

समर - भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं.

अविनाश - सगळे काँग्रेसचे दत्तू.

नाना - काँग्रेसच्या राज्यात मिळत होते तसे पैसे मिळत नाहियेत म्हणून मोर्चा.

समर - संतोष पाटील नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केली. भाजपच्या मंत्र्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले म्हणून मी बर्बाद झालो आणि म्हणून आत्महत्या करत आहे, असं पत्र लिहून ठेवलंय त्यानं. 

भास्कर - काँग्रेसने सांगितलं म्हणून कोण करेल आत्महत्या? खरी असणार परिस्थिती.

नाना - मानसिकदृष्टया अस्थिर असतात असे लोक.

समर - टुमकुर जिल्ह्यात अजून एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. टी. एन. प्रसाद नाव आहे त्याचं.

नाना - तोसुद्धा अस्थिरच असणार!

भास्कर - लोकांनी ‘४० परसेंट सरकारा’ असं नाव ठेवलं आहे भाजप सरकारचं.

समर – ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ असं म्हणाले होते मोदीजी.

भास्कर - या कंत्राटदारांच्या आत्महत्यांवर काही बोलले नाहीत मोदीजी.

समर - मौनमोहनसिंग भाग दुसरा!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अविनाश - मोदीजींना खूप कामं असतात. सारखं सारखं बोलायला मोकळे नसतात ते.

भास्कर - मग मनमोहनसिंग मोकळे होते का बोलायला? त्यांना नव्हती का कामं?

अविनाश - अजिबात नव्हती. नुसते गप्प बसून असायचे ते.

भास्कर - मनमोहनसिंग यांच्या काळातला साडेआठ टक्क्यांचा ‘ग्रोथ रेट’ अजूनही गाठता आलेला नाहिये मोदीजींना.

नाना - कर्नाटकात कळेल मोदीजींनी किती ‘ग्रोथरेट’ गाठला आहे, मतदारच सांगतील.

भास्कर - लागली पैज?

अविनाश - लागली.

समर - काय पैज?

अविनाश - भाजप जिंकला तर आम्ही तुम्हाला बास्किन अँड रॉबिन्स आणि पिझ्झा देणार. काँग्रेस जिंकली, तर तुम्ही आम्हाला चार प्लेट बटाटा-वडे द्यायचे.

नाना - मी काय म्हणतो आहे, आपण आईसक्रीम, पिझ्झा आणि बटाटे-वडे अशी पैज लावू.

अविनाश - का म्हणून?

नाना - (डोळा मारत) कारण नेहमी आपणच जिंकतो पैज. आईस्क्रिम आणि पिझ्झा आपण का सोडायचा?

त्यावर अविनाश खुश झाला.

अविनाश - म्हणूनच तुम्हाला ‘चाणक्य’ म्हणतात सगळ्या पुण्यात!

..................................................................................................................................................................

शिरोजीने ऐन ‘अँटिक्लायमॅक्स’च्या सर्वांत खालच्या बिंदूवर बखर संपवल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मोदी-काळात कुणालाही ‘चाणक्य’ म्हणायची प्रथा पडली होती.

पैसा आणि इतर दबंगाई करून मार्ग काढणाऱ्या कुणाही नेत्याला त्या काळी ‘चाणक्य’ म्हणायची पद्धत पडली होती. अजून एक म्हणजे विश्वासघात करून आपले राजकीय आणि आर्थिक हित साधणाऱ्या कुणाही तत्त्वहीन नेत्याला ‘मोदीकालीन भारता’त ‘चाणक्य’ म्हणण्यात येत असे.

मूळ चाणक्याने साममार्गाच्या बरोबर दाम-दंड आणि भेद वगैरे दबंगाई मान्य केली होती, ही गोष्ट खरी आहे. परंतु साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून सगळी तत्त्वे पायदळी तुडवावीत, असे तो कधीच म्हणालेला नव्हता, ही गोष्ट मोदीकालीन भारतातील लोक विसरले होते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसरा मुद्दा म्हणजे पैशाचा वापर. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात तो कुणालाच चुकला नव्हता. निवडणुका लढवायच्या म्हटलं की, त्या काळीसुद्धा आजच्या सारखाच बेफाम पैसा लागत असे. अघोरी पैशावाचून राजकारण करणं अशक्य बनून गेलं होतं.

परंतु गंमत अशी की, त्या काळी ही गोष्ट फार थोडे लोक मान्य करत असत. विविध पक्षांचे फंड कुठल्याही ऑडिटच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते. भाजप आणि काँग्रेससह सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन तशी व्यवस्था केली होती.

याशिवाय, या काळात काळा पैसा वापरण्याच्या नवनवीन पद्धती तयार केल्या गेल्या. या विषयी शिरोजीने पुढे लिहिलेलं असल्यानं त्या विषयात आत्ता आम्ही जात नाही.

आपल्या नेत्याचा पक्ष निवडणुकांमध्ये इतके पैसे कसे खर्च करत आहे, असा साधा विचार आपल्या नेत्यांच्या प्रामाणिकपणाविषयी भांडणारा तत्कालीन मतदार करत नसे. ज्या मतदारांना पैशाचा भरमसाठ वापर कळत होता आणि या पैशाचा उगम नक्की कुठे होतो आहे हे कळत होते, ते ‘तळे राखील तो पाणी चाखील’, असा विचार करून गप्प बसत असत. 

अमेरिकेसारखी लोकांकडून आणि विविध कंपन्यांकडून चेकने इलेक्शन फंडासाठी वर्गणी गोळा करण्याची पारदर्शक पद्धत भारतात २०७२ साली आली. तोपर्यंत संशयाचे ढग तत्कालीन भारतातील प्रत्येकच नेत्याच्या माथ्यावर तरळत राहिले.

सगळेच पक्ष त्या काळात एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असत. मतदारसुद्धा यावर चर्वितचर्वणं करत असत. परंतु, यातून सिद्ध काही होणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती होतं.

काँग्रेस पक्षावर आरोप करून भाजप पी सत्तेत आला, आणि पुढे भाजपवर आरोप करून विरोधक सत्तेत आले. परंतु कुठलाच मोठा भ्रष्टाचार कधीच सिद्ध झाला नाही, ही या काळाची मोठी शोकांतिका होती!

असो. शिरोजीने त्या काळामधील एका मोठ्या प्रश्नावर आपल्या नॉन-गंभीर शैलीत गंभीर प्रकाश टाकला आहे, ही गोष्ट ही बखर वाचल्यावर आपण नाकारू शकत नाही.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......