हे गैरसोयीचं सत्य कुणासाठी गैरसोयीचं आहे? तर सांप्रदायिक, वर्चस्ववादी आणि दमनकारी सत्ताव्यवस्थेसाठी. एका मोठ्या समूहासाठी हे लेखन अडचणीचं ठरणारं आहे
ग्रंथनामा - झलक
श्रीधर नांदेडकर
  • ‘गैरसोयीच्या सत्याबद्दल’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 25 April 2023
  • ग्रंथनामा झलक गैरसोयीच्या सत्याबद्दल राजक्रांती वलसे

गेल्या काही वर्षांतल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृितक घडामोडींवरील इंग्रजीतील निवडक लेखांचा मराठी अनुवाद राजक्रांती वलसे यांनी ‘गैरसोयीच्या सत्याबद्दल’ या नावाने केला आहे. हे पुस्तक नुकतेच हरिती पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला कवी श्रीधर नांदेडकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

गैरसोयीच्या सत्याबद्दल’ ही एक विचारमालिका आहे. सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या अल्पसंख्य समूहाची ही प्रखर अभिव्यक्ती आहे. तिचा स्वर विद्रोहाचा आहे. हा विद्रोह समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीसाठी वर्गवादी, वर्णवादी, ब्राह्मण्यवादी प्रस्थापित व्यवस्थेवर साहित्य, कला व वैचारिक लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रहार करतो. या ग्रंथात मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या लेखनाची अत्यंत चोखंदळ निवड संपादक आणि अनुवादक राजक्रांती वलसे यांनी केली आहे.

सांप्रदायिक, वर्चस्ववादी आणि दमनकारी सत्ताव्यवस्थेत या ग्रंथातील परिवर्तनवादी लेखन बुद्धिजीवी, विवेकवादी तसेच सामान्य वाचकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. राजकीय लाभार्थ्यांच्या गदारोळात प्रसिद्धीपासून कायम दूर राहून, शोषणमुक्त समाजाच्या स्वप्नपूर्तीसाठी सतत परिश्रम घेत, एकाकी संघर्ष करत, चिकाटी न सोडता वलसे यांनी अत्यंत कष्टपूर्वक या ग्रंथातील सामग्री परिवर्तनवादी युवावर्गासाठी उपलब्ध केली आहे. तरुणांनी या विद्रोही सामग्रीवर चिंतन मनन केलं, तर ही ठिणगी ‘उलगुलान’ व्हायला वेळ लागणार नाही.

या ग्रंथातील पहिलाच लेख आंबेडकरी विचारव्यूहातून ‘सैराट’ या क्रांतिकारी चित्रपटाचं सामाजिक, राजकीय विश्लेषण करतो. आंबेडकरांच्या स्वप्नातील आदर्श समाजाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना कोणत्या भयकारी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याचा धाडसी उद्गार किती प्रत्ययकारी असू शकतो, याचा पुरावा सुहास भस्मे यांच्या या लेखातून मिळतो. परंतु त्याच वेळी हा लेख ब्राह्मणवादी धुरीणत्वाला वर्गवादी आणि लिंगभेदी तत्त्वांना आव्हान देऊन ‘सैराट’ डॉ. आंबेडकरांच्या समतावादी आणि न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या समाजाचं प्रतिबिंब दर्शवतो, याचीही नोंद घेतो.

कांचा इलाया शेफर्ड हे समाजशास्त्रज्ञ आणि तेलंगणातील सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या ‘टी-मास’ संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सीपीएम परिषदेच्या निमित्ताने मांडलेले विचार भविष्यातील डाव्या व आंबेडकरवादी जनसमूहांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवत, पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करण्याची निकड व्यक्त करतात. पश्चिम बंगालमधील दीर्घकालीन सत्तेचा दाखला देत कम्युनिस्ट विचारवंत व कार्यकर्ते भ्रष्टाचाराचे बळी ठरत नाहीत, ही जमेची बाजू उजागर करत लोकशाहीच्या केंद्रस्थानी असलेल्या समता व स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन आंबेडकर व मार्क्स यांच्या विचारांचा मेळ घालत, नव्या समीकरणांकडे संकेत करतात. या ग्रंथातील लेख कल्याणकारी राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी विचारव्यूहांचे अनेक दृष्टीकोन समोर ठेवतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

विकासाच्या सर्वसमावेशक संकल्पनेचा अभाव, आदिवासींचे शोषण, विस्थापन, मागील तीन दशकात वाढत गेलेला असंतोष, विकासातून वगळलेला सामान्य माणूस यावर प्रखर भाष्य व्हर्जिनिअस खाखा यांनी ‘जबरदस्तीचा विकास’ या लेखात केले आहे.

समता, मार्क्स आणि आंबेडकरी विचारांचे पुनर्वाचन, विकासाच्या भ्रामक संकल्पनेवर आघात, लिंगभेदाच्या मानसिकतेतून बाहेर न पडणारा बंदिस्त समाज, सांप्रदायिक शक्तीकडून होणारं प्रतीकांचं अपहरण, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा धोका, भारत-पाकिस्तान संबंधातील दुष्टतामूलक राजकीय स्वार्थाचे कटकारस्थान, नवउदारमतवादाच्या अंतानंतर मानव जातीच्या भवितव्याचा अदमास घेताना समोर दिसणारी आव्हाने, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (२०२०) चिकित्सा, भारतीय समाजातील हिंदू-मुस्लीम संघर्षाची चिकित्सा, उच्च जाती व निम्न जातींमधील संघर्ष, करोना आणि नवउदारमतवादाचा राक्षसी चेहरा, क्रांती खरंच भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांची पुर्नरचना करते का? याबाबत पी लंकेश यांचा विचार, भारतीय विवाहसंस्थेची चिकित्सा, संघ आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील द्वंद्व इत्यादी अनेक विषयावर हा ग्रंथ मूलभूत चिंतन व्यक्त करतो.

या ग्रंथातील प्रत्येक लेख खरंतर गैरसोयीच्या सत्याबद्दल पुराव्यानिशी काही सांगू पाहतो. हे गैरसोयीचं सत्य भारतीय समाजातील स्त्री-पुरुष असमानता, लिंगभेद आणि कर्मठ मानसिकतेवर कठोर भाष्य करत आधुनिक भारतीय सामाजिक स्थितीचा समाचार घेत सामाजिक परिप्रेक्ष्यातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी उघड करतं.

हे गैरसोयीचं सत्य कुणासाठी गैरसोयीचं आहे? तर सांप्रदायिक, वर्चस्ववादी आणि दमनकारी सत्ताव्यवस्थेसाठी. ‘सनातनी’ चौकट अभेद्य ठेवू पाहणाऱ्या एका मोठ्या समूहासाठी हे लेखन अडचणीचं ठरणारं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

वलसे यांनी या लेखांचे इंग्लिशमधून मराठीत अनुवाद करून, त्यांचे संकलन करून त्यांचे संपादन करून हा ग्रंथ सिद्ध केला आहे. हे काम यासाठी अधिक महत्त्वाचं वाटतं कारण या ग्रंथातून आर्थिक, सामाजिक, राजकीय पेचप्रसंगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

मराठी वाचकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखक भारतीय आणि जागतिक समस्यांचा कशा प्रकारे विचार करतात, याबाबतचे अनेक अपरिचित कंगोरे या ग्रंथात उपलब्ध करून देण्याचे श्रेय लेख वलसे यांना द्यायलाच हवे. एरवी रूक्ष वाटणारे हे विषय त्यांनी मराठीत अनुवाद करताना अधिकाधिक सोप्या भाषेत कसे मांडता येतील, यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे जाणवते.

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता लोकशाही विचारमूल्यांचा होणारा संकोच स्पष्टपणे जाणवतोय. हुकूमशाहीचा अदृश्य वावर जाणवतोय. बहुमताच्या नावाखाली गुप्त योजनांना कायद्याचा आधार घेत कार्यान्वित करण्याचा उघड उघड प्रयत्न होताना आपण पाहत आहोत. विरोधकांचा आवाज अधिकाधिक क्षीण करण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच काळात होताहेत. स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत नैतिकतेची किमान पातळीही सोडल्या जातेय. श्रमिक, शेतकऱ्यांचं शोषण होतंय. सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या सगळ्या पार्श्वभूमीवर संपादक वलसे यांनी ज्या अनेक गैरसोयीच्या सत्याबद्धल ‘ब्र’ उचारण्याचं धाडस दाखवलंय, ते खरोखरच विरोधाचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी अत्यंत मोलाचं कार्य आहे, हे या ग्रंथातील लेख वाचून वाचकाला पटल्याशिवाय राहणार नाही.

या ग्रंथातील लेखांना एक प्रकारे सामूहिक शक्तीचा दस्तऐवज म्हणता येते. या लेखनातून प्रेरणा घेऊन युवावर्गाला वर्तमानकालीन राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे भान आल्याशिवाय राहणार नाही. हे भानच भविष्यातील आव्हानांना सामोरं जाताना युवावर्गाची वैचारिक बैठक पक्की करण्यास साहाय्यभूत ठरेल असा सार्थ विश्वास वाटतो.

विद्रोहाची दोन रूपं असतात. एक रूप हे वास्तववादी, प्रत्यक्ष भूमीवर कार्यरत असणारं, प्रत्यक्ष कृती करणारं, विरोधासाठी प्रसंगी हिंसक होणारं. दुसरं रूप अप्रत्यक्ष, अदृश्य स्वरूपात असतं. त्याचं स्वरूप प्रत्यक्ष विद्रोहासाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक अथवा पार्श्वभूमी तयार करण्याचं कार्य करतं. या विद्रोहाचं स्वरूप अंतप्रवाहाचं कार्य करतं. चेतना पुरवण्याचं कार्य करतं किंवा स्फुल्लिंग जागवण्याचं कार्य करते.

या ग्रंथातील लेखन हे अप्रत्यक्ष विद्रोहाचं कार्य करणाऱ्या अंत:प्रवाहासारखं आहे. हे लेखन व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायला बळ देतं. चेतना देतं पाठिंबा देते. म्हणून अशा अंधांचा प्रसार अधिक जोमाने होणं गरजेचं असत. मागील तीन वर्षांपासून वलसे यांनी परिवर्तनवादी साहित्याची अपरिचित सामग्री मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. एखाद्या कार्यात तन मन धनानं समर्पित होऊन निःस्वार्थपणे स्वताला झोकून देताना वलसे यांना मी जवळून पाहिलं आहे.

सर्व प्रकारची विषमता नष्ट होऊन एका सुखी, आनंदी समाजाचे स्वप्न पाहणारा हा शिक्षक सतत कृतीशील राहून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावताना दिसतो.

या ग्रंथाच्या वाचनातून युवापिढीला प्रेरणा मिळेल. वैचारिक बळ मिळेल, विवेकदृष्टी प्राप्त होईल, परिवर्तनवादी चळवळीकडे युवापिढी ओढली जाईल आणि शोषक व्यवस्थेला प्रतिरोध करण्याची ताकद युवा पिढीत निर्माण होईल, असा मला विश्वास वाटतो,

‘गैरसोयीच्या सत्याबद्दल’ - अनुवाद - राजक्रांती वलसे

हरिती पब्लिकेशन्स | पाने - १४४ | मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......