फार कमी लोकांना हे माहिती असतं की, रागाचं नियोजन करता येतं. ते केलं, तर त्यापायी होणारं नुकसान टाळता येऊ शकतं
पडघम - विज्ञाननामा
स्वप्निल पांगे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 20 April 2023
  • पडघम विज्ञाननामा समुपदेशक Counsellor समुपदेशन Counseling मानसशास्त्रज्ञ Psychologist मानसोपचारतज्ज्ञ Psychiatrist राग Anger रागाचं व्यवस्थापन Anger management

प्रत्येकाला कधी ना कधी राग येतोच. काहींना लवकर येतो, तर काहींच्या संयमाचा बांध उशिरानं फुटतो. राग व्यक्त करण्याची तऱ्हा प्रसंगानुरूप आणि व्यक्तिगणिक बदलत राहते. राग ही आदिम भावना आहे. प्रत्येक प्राण्याची स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड चालू असते. समोर असणारं संकट जर जीवावर बेतणारं असेल, तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी राग हवाच. तो आलाच नाही, तर समोरील संकटापासून बचाव कसा होणार? म्हणून भीतीसोबत राग ही भावना मानवी उत्क्रांतीच्या विकासाच्या टप्प्यावर महत्त्वाची ठरली. हिंस्र पशु किंवा इतर टोळ्यांपासून संरक्षणार्थ आणि स्वत:चं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अश्मयुगीन मानवाला प्रचंड राग येणं अपरिहार्य होतं. त्यामुळेच त्याला स्वतःचा बचाव करणं शक्य झालं.

पुढे उत्क्रांतीचे टप्पे पार करून मानव प्रगत झाला, परंतु मेंदूमधील मूळ बचावाची ‘सिग्नल’ यंत्रणा अजूनही जुन्याच ‘सिस्टिम’प्रमाणे चालू आहे. आता आपल्या दैनंदिन आयुष्यात पूर्वीसारखी ‘जगा अथवा मारा’ अशा स्वरूपाची आव्हानं नाहीत, पण त्यांना सामोरं जाताना मात्र शरीरात होणारे रासायनिक बदल आणि निर्माण होणारी ऊर्जा जरुरीपेक्षा जास्त असते.

एकाच घरातल्या सदस्यांमध्ये संपत्तीसाठी होणारे वाद, क्षुल्लक कारणामुळे शेजाऱ्या-शेजाऱ्यांमध्ये होणारे तंटे किंवा दोन भिन्न समूहाच्या, तसंच प्रसंगी दोन देशांमध्ये होणारे संघर्ष, हे सर्व या संतापाचेच रंग!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राग या भावनेत प्रचंड ऊर्जा असते. खरं तर आनंद, दुःख, नैराश्य, भीती या सर्वच भावनांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ऊर्जा असते. ती जेव्हा आपल्या शरीरामधून बाहेर पडते, तेव्हा पुष्कळदा विघातक गोष्टी घडतात. रागाच्या भरात एखाद्याला अपशब्द बोलण्यापासून शारीरिक इजा होण्यापर्यंत. मात्र फार कमी लोकांना हे माहिती असतं की, रागाचं नियोजन करता येतं. ते केलं, तर त्यापायी होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

राग या भावनेबाबत सर्वसामान्यपणे काही गैरसमज असतात. उदा., ‘माझा राग योग्यच असतो’, ‘मी काय उगाचच चिडचिड करत नाही’, ‘या लोकांमुळेच माझी तळपायाची आग मस्तकात जाते.’ म्हणजे भोवतालच्या घटना किंवा इतर लोक हेच आपल्या रागाला जबाबदार आहेत, असं अनेकांना वाटतं. हे घटक आपल्या रागाचे ‘ट्रिगर’ ठरू शकतात, पण पूर्णतः जबाबदार नसतात. कारण तसं असतं, तर प्रत्येकाचा रागाचा अनुभव समान पातळीवर असायला हवा, पण तसं नसतं. संतापाच्या भावनेला अविचाराची सतत फुंकर घातल्यामुळे त्याचा भडका उडतो. तेव्हा रागावर मात करण्यासाठी आधी आपल्या मनातल्या विचारांची उजळणी केली पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

रागीट किंवा सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्तीचं शारीरिक किंवा मानसिक पातळीवर नुकसान होतंच, पण त्याचा जवळच्या प्रिय व्यक्तींवर आणि नातेसंबंधांवरही अनिष्ट परिणाम होतो. राग ओसरून गेल्यावर काही जणांना त्याबद्दल अपराधी वाटतं, पण तोवर वेळ निघून गेलेली असते. काही जणांना तेवढ्यापुरतं वाईट वाटतं, काही काळानंतर त्यांचं परत ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होतं.

पुष्कळदा आपण आपल्या रागासाठी इतरांना जबाबदार धरतो. जोपर्यंत समोरची व्यक्ती सुधारत नाही, तोपर्यंत माझा राग मी कसा ‘कंट्रोल’ करणार, असं म्हणून स्वतःच्या रागाचं खापर आपण इतरांवर फोडून मोकळे होतो.

आपण चिडचिड, संताप, राग किंवा क्रोध या एकाच भावनेच्या विविध छटा अनुभवत असतो. कधी त्याला शाब्दिक चकमकीपुरतं मर्यादित स्वरूप असतं, तर कधी कधी त्याचं रूपांतर महाकाय अशा युद्धसंघर्षात होऊन लोकांच्या जीवावरही बेततं. काही वेळेस राग प्रत्यक्षपणे व्यक्त होत नसला, तरी मनाच्या आत तो खदखदत राहतो आणि निमित्त मिळताच ‘ज्वालामुखी’चा उद्रेक होतो. अशा या रागाला आवर घालावा तरी कसा?

‘क्रोधाद्भवति संमोहः संमोहातस्मृतीभ्रमः ! स्मृतभ्रंशादबुद्द्धीनाशो बुद्धिनाशतप्रणश्यति !!’

(क्रोधामुळे मनुष्याची विवेक शक्ती लोप पावते. इतकंच नव्हे तर मूढभाव उत्पन्न होऊन हितकारक अशा ज्ञानाच्या गोष्टींचं विस्मरण होतं आणि सद्सदविवेक बुद्धी क्षीण होऊन शेवटी मनुष्य आपला विनाश करून घेतो.) ‘भगवतगीते’मधील हे वचन रागाचे परिणाम अचूक रितीनं सांगतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपल्याला राग येणारच नाही, असं शक्य नाही, पण त्याचं थोडं परिणामकारक नियोजन केलं, तर होणारं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक नुकसान टाळता येतं. हे शक्य आहे, पण त्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात.

राग ही भावना समजून घेण्यासाठी आपण आधी त्याचे प्रकार लक्षात घेऊया. पहिला प्रकार तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असलेला. त्याला ‘हानिकारक संताप’ म्हणूया. हा स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांसोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधासाठी घातक ठरतो, आपल्याला मूळ मुद्द्यापासून भरकटत नेतो.      

एक विवाहित जोडपं माझ्याकडे समुपदेशनासाठी आलं होतं. त्यातील स्त्रीची नवऱ्याच्या रागीट स्वभावाबद्दल तक्रार होती. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुटुंबियांवर चिडायचा. त्याच्या या चिडचिड्या स्वभावामुळे नातेवाईक किंवा शेजारीपाजारी त्यांच्याकडे येत-जात नव्हते. कामाच्या ठिकाणीसुद्धा त्याचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध नव्हते. त्याच्या मनासारखं कोणी वागलं नाही की, त्याची तार सटकायची, मग भांडण, शिवीगाळ किंवा मुलांना मारहाण...

असा राग नक्कीच अपायकारक आणि अयोग्य आहे. कारण गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जरी घडत असल्या, तरी राग व्यक्त केल्यानं त्या बदलतात असंही नाही. उलट त्या व्यक्तीची ‘कटकटी’,  ‘संतापी’, अशी ओळख निर्माण होऊन ती इतरांपासून दूर जाते. बऱ्याच वेळेस मूळ मुद्दा बाजूला राहून इतर नको त्या विषयाला फाटे फुटतात किंवा इतरांवर दोषारोपण होतं. वरील उदाहरणातला नवरा रागाच्या  भरात इतरांना ‘मूर्ख’, ‘बेअक्कल’, ‘बावळट’ यांसारखी अनेक विशेषणं लावून मोकळा होत असे.

कित्येकदा रागाच्या भरात माणूस नेहमी एक वाक्य मनाशी घोळवत असतो- ‘आवाज चढवल्याशिवाय किंवा आकांडतांडव केल्याशिवाय या लोकांना अक्कल येणारच नाही’. खरं तर अक्कल कोणाला यायला हवी?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्यामुळे अशा लोकांचं कोणाशीच पटत नाही. सगळ्यांशी संबंध बिघडल्यामुळे गरजेच्या वेळेस मदत करणारे हातही कमीच असतात. मुळातच आपल्याला येणारा राग ‘अपायकारक’ आहे, याचीच त्यांना जाणीव नसते. ही भावना अनुभवत असताना आपण इतरांना नियंत्रणामध्ये आणू शकतो किंवा परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, असा अनेकांचा गैरसमज असतो. अशा चिडचिड्या स्वभावामुळे शरीरावर त्राण येऊन उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात

‘रागाचं नियमन’ या कार्यशाळेत मी नेहमी सहभागी श्रोत्यांना प्रश्न विचारतो, समजा तुम्हाला इतरांच्या वागण्याचा त्रास होत असेल, तर मग कोणी बदलायला हवं? आपण की इतरांनी?

इथूनच सुरुवात होते ‘रागाचं नियमना’ची. सर्वांत पहिली पायरी म्हणजे मला राग येतो, याची ‘जाणीव’. ती झाली किंवा इतरांनी करून दिली की, दुसरी पायरी म्हणजे ‘स्वीकाराची’. ‘आपला राग हा आपल्या विचारांतून निर्माण झालेला आहे. इतर लोक किंवा परिस्थिती त्याला कमी-जास्त करण्यात कारणीभूत असू  शकतात, पण मीच माझ्या अविवेकी विचारांनी त्यावर सतत फुंकर मारत असतो. तेव्हा माझा राग शांत करण्याची जबाबदारी माझीच’, एकदा या जबाबदारीचं भान आलं की, मग स्वभावात सुधारणा करण्यासाठी पुढचे प्रयत्न करायचे.

राग या भावनेबद्दल बरेच गैरसमजही आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की, राग हा मुळातच वाईट, म्हणून तो संपूर्ण मुळासकट उपटून काढला पाहिजे. पण ते शक्य नाही. कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या प्रसंगी आपल्याला राग येणं स्वाभाविक आहे. परंतु तो ‘हानिकारक’ नसेल, याची काळजी घ्यायला हवी.

राग ‘स्वीकारण्या’ची प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. आपला राग इतरांसमोर कबुल करणं, अनेकांना कमीपणाचं वाटतं. मात्र उदार मनानं आपल्या रागाची ‘मालकी’ स्वीकारण्यातच शहाणपण आहे.

बरेच जण ‘मी असाच आहे, काय करू? स्वभावाला मी काहीच करू शकत नाही’, असं म्हणून आपल्या रागाची अपरिहार्यता इतरांना पटवून देतात. तर ‘मग काय झालं, बोललो रागाच्या भरात. त्यात काय एवढं!’, असं म्हणून वेळ मारून नेतात. आपण काय बोललो, यापेक्षा रागाच्या भरात कसे वागलो, त्यामुळे इतरांच्या मनावर कायमच्या जखमा होऊ शकतात आणि त्यातूनच पुढे नात्यात कायमस्वरूपी तणाव येण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्यायला हवं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वर उल्लेख केलेला ‘हानिकारक संताप’ हा नेहमी दुसऱ्यावर दोषारोप करतो. इतरांनी अमुक असं वागलं पाहिजे किंवा असं वागू नये, असा त्यात अट्टाहास असतो. अशा वेळी मागे-पुढे न पाहता आपण इतरांवर थेट शाब्दिक किंवा शारिरिक हल्ला करतो. बऱ्याच वेळेस क्षुल्लक चुकीवरून रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीला कायमचं ‘ब्लॅक लिस्ट’ करून टाकतो किंवा अमुक एका निष्कर्षावर पोचतो. काही वेळा पुरेसे पुरावे नसतानादेखील आपण एखाद्याबद्दल पूर्वग्रह तयार करतो.

या अपायकारी संतापाच्या मागे त्या वेळी आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं अवलोकन केल्यास लक्षात येईल की, त्या वेळी आपण रागाच्या भरात आपल्या मनाशी काय काय बोललो होतो. समोर बसलेल्या त्या पुरुषाला मी प्रश्न केला, तेव्हा तो म्हणाला, ‘हिने असं वागायलाच नको ना. मी सांगतो तसं वागयला पाहिजे. तिच्याच भल्यासाठी तर सांगतो’. ‘मग पुढे काय?’ मी प्रश्न केला. त्यावर ‘अजिबात सहनच होत नाही मला ते’ असं त्याचं उत्तर आलं.

असले विचारच आपल्या रागाची तीव्रता वाढवतात. भूतकाळात एखाद्यानं केलेला अपमान किंवा केलेली चूक आपण प्रत्येक वेळेस आठवताना नव्यानं उजाळत असतो. त्यात आपल्या नकारात्मक विचारांचं इंधन घालून तो सतत धुसमसत ठेवतो. खूपदा आपण रागाच्या भरात एखाद्या घटनेला अवास्तव पातळीवर नेवून ठेवतो. ‘सगळ्या स्टाफसमोर माझा अपमान केला. समजतो काय स्वतःला? बघून घेईनच. सोडतो की काय?’ अशा प्रसंगी रागाची गाडी हळूहळू सूडाच्या ‘ट्रॅक’वर जाते. आणि पुढचे सारे प्रयत्न समोरच्याचा कसा पराभव करता येईल, या विचारानं मन अस्वस्थ होत जातं. सूडाचं राजकारण आपण ‘रामायण’, ‘महाभारता’सारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ऐकलं\वाचलं असेलच.

माझ्यासमोर बसलेला तो नवरा त्यांच्या मुलाबद्दलचा एक किस्सा सांगत होता. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा एकदा क्लासला जातो, असं खोटं सांगून मित्रांसोबत फिरायला गेला होता. हे त्यांना समजतात त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘तुम्हाला सांगतो सर, उभ्या आयुष्यात एक शब्दही मी कधी खोटं बोललो नाही, आणि हा मुलगा असा खोटारडा निघाला. काय राहिली आमची इज्जत! तुम्हीच सांगा…’ या घटनेमध्ये मुलाचं खोटं बोलणं ही वर्तणूक आक्षेपार्ह आहेच. पण तसं वागल्यामुळे तो कायमच खोटारडा होणार आणि आता लोकांना कळलं, तर आपली अब्रू जाईल, असा एक अवाजवी विचार त्यांच्या मनात थैमान घालत होता. त्यामुळे त्यांचा क्रोधाग्नी अधिक भडकला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

रागाच्या ‘ट्रॅक’वर असताना बऱ्याच वेळेला एक चूक अशी होते की, ‘मी तेवढा शहाणा आणि इतर मूर्ख!’ आपल्या बायकोच्या वागण्यात सतत चुका दाखवणारा नवरा ‘आपण बरोबरच आहोत, दोष पत्नीचाच आहे’, या विचारानं धुंद होऊन तिला अपमानास्पद वागणूक द्यायचा. आपण कधी तरी चुकू शकतो किंवा समोरच्याशी आपले मतभेद असू शकतात. समोरचा चुकला, तरी त्या वेळेस त्याची बाजू समजून न घेण्याची आणखी एक चूक होते. किंबहुना रागाच्या भरात समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेता ‘कॉमेंट्स’ केल्या जातात.

‘मग या रागावर उपाय काय?’ नवऱ्याचा प्रश्न

मी त्यांना रागाच्या दुसऱ्या प्रकाराची ओळख करून दिली.

दुसऱ्या प्रकारचा रागाला आपण ‘निकोपी राग’ म्हणूया. तो भावनेच्या दृष्टीनं थोडा उपयोगी असल्याने त्यामुळे आपल्याला कमी त्रास होतो.

या रागात आपण जर समोरची व्यक्ती चुकीचं वागली, तर त्याच्या त्या वर्तणुकीवर आक्षेप घेऊ. पण त्या तिला ‘नालायक, मूर्ख, xxx’ अशी विशेषणं लावणार नाही. इथं आपल्याला समोरच्याचं जे वागणं खटकलं आहे, त्यावरच भाष्य करायचं आहे. घडून गेलेल्या किंवा इतर चुकीच्या वर्तनाची उजळणी करायची नाही. आपल्याला काय त्रास झाला आणि काय वागणं अपेक्षित आहे, हे सांगायचं. समजा पुढे जर त्या व्यक्तीनं आपल्या वागण्यात सुधारणा केली, तर त्याची दखल मात्र नक्की घ्यायची.

‘तू खोटं बोलला हे मला अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. तू खोटारडा आहेस, असं माझं म्हणणं नाही, पण तुझ्या अशा वागण्यामुळे मला त्रास झाला. पुढच्या वेळेस एखादी गोष्ट लपवून माझ्या तुझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. खरं बोललास तर आपल्याला काही तरी मार्ग काढता येईल’, असं जर का त्या बाबाने आपल्या मुलाला सांगितलं, तर कदाचित त्याला आपल्या चुकीच्या वागण्याचा काय परिणाम होतोय, हे कळेल.

म्हणजे खोटं बोललेल्या व्यक्तीला ‘तू खोटारडा आहेस’ असं म्हणण्यापेक्षा ‘तुझं खोटं बोलणं मला आवडलं नाही आणि परत असं वागू नयेस अशी अपेक्षा आहे’, असं सांगून, कोणतंही ‘लेबल’ न लावता, आपण तिच्या वागण्याविषयीची आपली हरकत निग्रहानं व्यक्त करता येऊ शकते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या संवादाचा महत्त्वाचा फायदा हा की, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहतो, तेही दुसऱ्याला नावं न ठेवता किंवा कमी न लेखता. इथं वर्तणुकीवर आक्षेप राहतो, व्यक्तीवर नाही. समोरच्यानं अमुक असं वागावं, ही इच्छा असते, पण हट्ट नाही. दुसऱ्यावर हल्ला ना करता शांतपणे आपलं म्हणणं मांडता येतं, तसंच समोरच्याची बाजू ऐकता येते.

‘एवढं सगळं करूनसुद्धा तो परत खोटं बोलला तर’ वडिलांनी प्रश्न केला, जो मला अपेक्षितच होता. त्यावर मी उत्तर दिलं, ‘तुमच्याकडे संतापाचे दोन पर्याय आहेतच. ज्या पर्यायानं, आपला त्रास कमी होतो, तो पर्याय निवडा.’

‘म्हणजे दुसऱ्या प्रकारचा ना?’ त्याच्या बायकोनं हसत हसत विचारलं.

‘हे बघा, Getting angry or not is your choice.’ मी उत्तर दिलं.

संतापाची ही दुसरी भूमिका आपल्याला आपल्या मतावर ठाम व खंबीर राहायला शिकवते. त्यात आपण फक्त आपलीच बाजू न बघता समोरच्याचं हितसुद्धा बघायला शिकतो. संयम शिकवतो. आपल्या हातात काय आहे आणि काय नाही, याची जाणीव आपल्याला होते.

समोरची व्यक्ती आपल्या म्हणण्याला होकार किंवा नकार देण्याच्या दोन्ही शक्यता आहेत. आणि त्या दोन्ही मान्य करायला हव्यात, हे आपल्याला कळतं. सर्वांत मुख्य म्हणजे आपल्या मनावरचं रागाचं ओझं कमी करते. माझ्या म्हणण्याप्रमाणे समोरचा माणूस वागेलच असं नाही, हे स्वीकारायला शिकवते.

ही सगळी कसरत करत असताना कधीतरी आपली गाडी रुळावरून घसरू शकते, हे वास्तवसुद्धा स्वीकारायला हवं…

           .................................................................................................................................................................

लेखक स्वप्निल पांगे समुपदेशक आणि मानसतज्ज्ञ आहेत.

manaswapnil20@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......