जातीव्यवस्था हे भारतीय समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे, हे खरेच आहे, पण पूर्ण सत्य नव्हे!
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 18 April 2023
  • पडघम देशकारण हिंदू धर्म Hindu Dharma जात Caste जातिव्यवस्था Caste System भारत India पाकिस्तान Pakistan बांगलादेश Bangladesh श्रीलंका Shri Lanka नेपाळ Nepal

बरेचसे विद्वान भारतीय समाजव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणून जातीव्यवस्थेचा उल्लेख करत असतात, किंबहुना जातीव्यवस्था हेच भारतीय समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे, असे म्हणतात. मर्यादित अर्थाने ते खरेही आहे, पण पूर्ण सत्य नव्हे! त्याचे कारण असे की, जातीव्यवस्था भारताजवळील इतर देशांत, किंबहुना भारतीय उपखंडातल्या जवळपास सगळ्या देशांत कमी-अधिक फरकाने पाहायला मिळते. पण हे वास्तव मान्य करणे बहुतेक भारतीय विद्वानांना कठीण जाते. कारण तसे म्हटल्यास मग भारताचे वैशिष्ट्य ते काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे इतर देशांतल्या जातीव्यवस्थेकडे ते दुर्लक्ष करतात.

भारतातही स्थल-काल-परिस्थितीअन्वये जातिव्यवस्था बदलत व विस्तारत गेलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ती पूर्वी जशी होती, तशीच आज नाही. त्या त्या राज्यांतील भौगोलिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या उत्पादन पद्धतीनुसार, तेथील उपलब्ध उत्पादनाच्या साधनांनुसार जाती- व्यवस्थेच्या स्वरूपात वेगळेपण राहिलेले आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जातीव्यवस्थेला मुख्यत्वे हिंदू धर्मानेच वैचारिक व धार्मिक आधार दिला आहे. मुख्यत्वे करून हिंदू धर्म भारतात असला तरी तो बाहेरही कमी-अधिक प्रमाणात गेलेला आहे. भारतीय लोक ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथे तिथे ते आपल्यासोबत जातिव्यवस्थासुद्धा घेऊन गेलेले दिसतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, श्रीलंकेत भारतीय तामिळ लोकही मोठ्या संख्येने आहेत. श्रीलंकेत ते आपली जातीव्यवस्था घेऊन गेले. त्याबाबत एक सविस्तर लेख सौ.विमल थोरात (‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या पत्नी) प्रसिद्ध करत असलेल्या एका मासिकात आलेला आहे. अर्थात श्रीलंकेतील परिस्थितीनुसार त्यात थोडाफार बदल झाला असेल, एवढाच काय तो फरक!

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, स्वातंत्र्यापूर्वी भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे तिन्ही मिळून एकच देश होता. स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली आणि १९७१नंतर बांगलादेश या तिसऱ्या देशाची भर पडली. पाकिस्तान, बांगलादेश येथे स्वातंत्र्यापूर्वी जातीव्यवस्था नव्हती का? जर होती, तर हे देश वेगळे झाल्यानंतर ती एकाएकी नष्ट झाली का? ती शक्यता कमीच आहे.

तेथील बहुसंख्य लोक मुस्लीम धर्मीय आहेत आणि या धर्मात जातीव्यवस्थेला वैचारिक आधार नाही, तरी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेला कंटाळून जे लोक मुस्लीम वा ख्रिश्चन धर्मात गेले, ते आपली जातीव्यवस्था सोबत घेऊन गेलेले आहेत.

फाळणी झाली, त्या वेळेस पाकिस्तानातील अस्पृश्य लोक भारतात हिंदू धर्मियांबरोबर स्थलांतर करत होते. भारत सरकारने त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था केली होती. पण तिथे अस्पृश्य, मागास जातींच्या लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे आल्या, तेव्हा त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उलट पाकिस्तानातून हे मागास जातींचे लोक भारतात गेले, तर आपल्या येथे ते करत असलेले घाण काम कोण करणार, असा प्रश्न तेथील प्रस्थापित समूहापुढे निर्माण झाला होता. म्हणून त्यांचा या मागास जातींनी भारतात परत जाण्याला विरोध केला होता. पाकिस्तानातील काही अस्पृश्य किंवा मागास जातींचे लोक भारतात आले असले, तरी तेथील जातीव्यवस्था नष्ट झाली आहे, असे म्हणता येणार नाही. हीच बाब बांगलादेशालासुद्धा लागू होते.

भारत हा बहुसंख्य हिंदूधर्मीय लोकांचा देश असला, त्याला ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचे प्रयत्न चालू असले, तरी अजूनही तो संविधानानुसार ‘धर्मनिरपेक्ष’ आहे. २० वर्षांपूर्वी नेपाळ हे जगातील एकमेव ‘हिंदू राष्ट्र’ होते. आता ते संविधानानुसार ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ म्हणून घोषित झाले असले, तरी तेथील हिंदू धर्माशी जैविकरित्या संबंधित असलेली जातीव्यवस्था तडकाफडकी नष्ट झाली असण्याची शक्यता कमीच आहे.

भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि १९५० साली आपण ‘धर्मनिरपेक्ष’ संविधान स्वीकारले, तरी अजूनही आपल्या इथे बदलत्या स्वरूपात जातीव्यवस्था कायम आहे. तशी ती ‘धर्मनिरपेक्ष’ झालेल्या नेपाळमध्येही आहे. मग आपण असे म्हणू शकतो का की, जातीव्यवस्था ही फक्त भारतातच आहे किंवा ते फक्त भारताचेच वैशिष्ट्य आहे?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

भारतातही सर्व राज्यांत एकसारखी जातीव्यवस्थासुद्धा नाही. काही राज्यांत जमीनदारी, काहींत रयतवारी आणि काहींत महालवारी पद्धत अस्तित्वात होती. त्यांचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या पद्धतींनुसार त्या त्या ठिकाणच्या जातीव्यवस्थेचे स्वरूप कमी-जास्त, सौम्य-तीव्र असल्याचे दिसते. एका राज्यातील जातीचे नाव दुसऱ्या राज्यातील त्याच प्रकारचे काम करणाऱ्या जातीशी जुळेल असे नाही, पण त्यांच्या कामात एकसारखेपणा दिसतो. उदा., उत्तर भारतात अस्पृश्यांत असलेले ‘धेड’ हे नाव महाराष्ट्रात नाही. पण उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेले (परदेशी, मारवाडी इत्यादी) लोक येथील महारांना ‘धेड’ या नावानेच संबोधतात.

म्हणजे नावात बदल असला तरी ज्या त्या समूहाच्या कामानुसार, जगण्याच्या पद्धतीनुसार, सामाजिक बंधनांनुसार, रूढी-परंपरेनुसार जातीचे स्वरूप आपल्या लक्षात येऊ शकते. पूर्वी जातीव्यवस्था जशी होती, तशीच आजदेखील आहे असेही नाही. तिचे स्वरूप बदललेले आहे… बदलत राहणार आहे.

भारतात लोकशाही पद्धतीच्या निवडणुकांचा जातीव्यवस्थेवर बराच गंभीर परिणाम होत आहे. आपापल्या जाती संघटित करून जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी किंवा आपल्या जातींची मते आपल्याला मिळावी यासाठी, ज्या रितीच्या संघटनात्मक बाबी केल्या जातात, त्यातून जातिव्यवस्थेचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात बदललेले आहे. पूर्वीपेक्षा ती जास्त संघटित व बळकट होत आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सध्याच्या अनुभवातून असे म्हणता येते की, जो बदल झालेला आहे, तो अस्पृश्यतेच्या स्वरूपात झालेला आहे. अस्पृश्यता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असली, तरी त्याचा अर्थ जातिव्यवस्था कमी झाली आहे असा होत नाही. जातिव्यवस्था व अस्पृश्यता या भिन्न बाबी आहेत. अस्पृश्यता बऱ्याच प्रमाणात जातिव्यवस्थेची संबंधित असली तरी अस्पृश्यता म्हणजेच जातीयता नव्हे.

सध्या जातिव्यवस्था आयटी क्षेत्रात तसेच नोकरी-धंद्यात दिसून येऊ लागली आहे. आरक्षणातून शिक्षण घेत असलेल्यांकडे वा त्यामुळे नोकरी लागलेल्यांकडे ‘हे कोट्यातून आले आहेत’ असे म्हणत तुच्छतेने पाहिले जाते. त्यांच्याशी भेदभाव केला जातो. अनेक विद्यार्थ्यांनी या जाचामुळे आत्महत्या केल्या आहेत.

शिक्षणामुळे, धर्म बदलण्यामुळे, देशांतरामुळे, सहभोजनामुळे किंवा आंतरजातीय विवाहामुळे जशी जातीव्यवस्था नष्ट होत नाही, तशीच ती आधुनिकीकरणातून किंवा नव-उदारीकरणाच्या धोरणातूनही नष्ट होत नाही, फक्त तिचे स्वरूप बदलते.

थोडक्यात, मुद्दा हा आहे की, जातीव्यवस्था हे केवळ भारताचेच नाही, तर कार्ल मार्क्स यांनी भारतीय उपखंडातील उत्पादन पद्धतीची म्हणून जी काही खास वैशिष्ट्ये सांगितली आहेत, त्यापैकी जातीव्यवस्था हे एक आहे, असे आपण नक्की म्हणू शकतो.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......