माया अँजेलोचं बालपण जाणून घेतल्यावर ‘केज्ड बर्ड’ या कवितेतील वेदना समजते. आणि त्यानंतर ‘स्टिल आय राईज’ वाचली, तर त्यातील बंड, स्वातंत्र्याचे पूजन आणि आनंद, हे सारे समजून घेता येते!
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • आफ्रिकन-अमेरिकन कवयित्री माया अँजेलो
  • Tue , 04 April 2023
  • पडघम साहित्यिक माया अँजेलो MAYA ANGELOU स्टिल आय राईज Still I Rise केज्ड बर्ड Caged Bird

आफ्रिकन-अमेरिकन कवयित्री माया अँजेलो (१९२८-२०१४) ही स्त्री मनाची सगळी रूपे अत्यंत मनस्वीपणाने मांडणारी कवयित्री. क्लब डान्सर, सेक्स वर्कर, हॉटेलात कुक इथपासून सगळी कामं या आफ्रिकन-अमेरिकन कवयित्रीला करावी लागली. हे सर्व भोग भोगत असताना तिने आपली संवेदना प्राणपणाने जपली. ती मनस्वी कविता लिहीत राहिली. आपल्या कर्तृतवाने पुढे ती अमेरिकेची सगळ्यात लाडकी कवयित्री झाली. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची ती स्फूर्तिस्थान ठरली.

आज माया अँजेलो यांचा जन्मदिवस. त्या निमित्तानं त्यांच्या दोन ‘आयकॉनिक’ कवितांवरील हा लेख...

..................................................................................................................................................................

प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन कवयित्री माया अँजेलो यांचा जन्म १९२८ चा. अमेरिकेच्या दक्षिण भागात त्या जन्माला आल्या. हा भाग अत्यंत वर्णद्वेष्टा भाग समजला जातो. वंशद्वेषाची प्रदीर्घ परंपरा या भगात खूप खोलवर रुजली होती.

अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्यांमध्ये कृष्णवर्णीय जनतेवर गुलामी लादलेली होती. गुरांची व्हावी, तशी गुलामांची खरेदी-विक्री होत असे. हा सगळा प्रकार संपावा म्हणून उत्तरेतील राज्ये आणि दक्षिणेतील राज्ये यांच्यात अमेरिकन सिव्हिल वॉर झाले. १८६१ ते १८६५ या काळात हे युद्व झाले. १ जानेवारी १८६३ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी ‘मुक्ततेचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. त्यामुळे सगळ्या गुलामांची गुलामगिरीमधून मुक्तता झाली. पुढे दोन वर्षांनी म्हणजे १८६५मध्ये अमेरिकन ‘सिव्हिल वॉर’ संपले. अमेरिकेच्या दक्षिणेतील वर्णद्वेष्टी राज्ये हे युद्ध हरली. आता गोरे आणि कृष्णवर्णीय अशी समता स्थापन होणे अपेक्षित होते.

परंतु, तसे झाले नाही. या ना त्या स्वरूपात वंशवाद आणि अन्याय जिवंत राहिला. युद्ध जिंकले तरी वंशवादी लोकांची मने कशी जिंकली जाणार? दक्षिणेतील राज्यांनी १८७० ते १८९० या काळात अनेक वंशवादी कायदे केले. त्यात कृष्णवर्णीयांवर अनेक निर्बंध लादले गेले. कृष्णवर्णीय लोकांना वेगळ्या वस्त्यांमध्ये राहावे लागेल. त्यांना मतदान करता येणार नाही. प्रेक्षागारे, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजे, विश्वविद्यालये आणि इतर ‘पब्लिक प्लेसेस’मध्ये त्यांना वेगळे बसावे लागेल. अशा स्वरूपाचे हे सर्व कायदे होते. यांना ‘जिम क्रो’ कायदे म्हटले जाते. त्या काळी कृष्णवर्णीय लोकांना ‘जिम क्रो’ या तिरस्कारव्यंजक नावाने हाक मारली जायची. आपल्याकडे अजूनही दलितांमधील ‘कॉमन’ आडनावांवरून त्या त्या जातीतील लोकांना संबाेधित करून हिणवले जाते, हे आपण पाहतोच. कृष्णवर्णीयांना ‘जिम क्रो’ या नावाने संबोधणे, हा त्यातलाच अजून विखारी प्रकार! कारण त्यात काळ्या रंगाकडचा निर्देश अध्याहृत आहे. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

१८९६ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना मान्यता दिली. कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोक समान आहेत, पण त्याच वेळी ते एकमेकांपासून ‘वेगळे’सुद्धा आहेत, हे आपण मान्य केले पाहिजे, असा युक्तिवाद त्या वेळी न्यायालयाने केला. त्याला ‘seperate but equal legal doctrine’ म्हणतात. हे कायदे या ना त्या स्वरूपात १९६०च्या दशकापर्यंत अमेरिकेत अस्तित्वात होते.

अशा तीव्र वंशवादी दक्षिण अमेरिकेत माया अँजेलो या विलक्षण व्यक्तीचा जन्म झाला आणि सुरुवातीची वर्षे गेली. त्यांनी वंशवाद, तिरस्कार, अन्याय, स्त्री-द्वेष गरिबी या सगळ्यांच्या झळा झेलल्या. या दारुण वास्तवातून त्या एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून उभारी घेत राहिल्या. आपले जीवन जगत राहिल्या. त्यांनी हॉटेलमध्ये कुक म्हणून काम केले, कॅबरे केले, गाणी गायली.

एक स्त्री म्हणून त्यांनी काय जग पाहिले असेल याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. मानसिक आणि शारिरीक अशा दोन्ही पातळीवरील किती अन्याय त्यांनी भोगले असतील, याचीही कल्पना आपल्याला करवत नाही. या सगळ्यातून त्या तावून सुलाखून बाहेर पडल्या. ‘स्टिल आय राईज’सारखी ‘आयकॉनिक’ कविता लिहू शकल्या. कारण या कवितेतील दुर्दम्य उमेद त्यांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक कणात बिंबवली होती. मानवाला दिल्या गेलेल्या दुर्दम्य जीवनशक्तीचा आविष्कार आपल्या आयुष्यात त्यांनी अत्यंत मनस्वीपणे अनुभवला होता. सगळे मानवी उन्माद आणि आनंद त्यांनी अतिशय उन्मुक्तपणे अनुभवले होते. आणि हे सगळे त्यांनी अत्यंत दुःखदायक आणि संघर्षमय परिस्थितीचा सामना करता करता केले होते.

या सगळ्या भोगांमधून त्या बाहेर पडूच कशा शकल्या? 

Still I Rise

You may write me down in history

With your bitter, twisted lies,

You may trod me in the very dirt

But still, like dust, I'll rise.

Does my sassiness upset you?

Why are you beset with gloom?

’Cause I walk like I've got oil wells

Pumping in my living room.

Just like moons and like suns,

With the certainty of tides,

Just like hopes springing high,

Still I'll rise.

Did you want to see me broken?

Bowed head and lowered eyes?

Shoulders falling down like teardrops,

Weakened by my soulful cries?

Does my haughtiness offend you?

Don't you take it awful hard

’Cause I laugh like I've got gold mines

Diggin’ in my own backyard.

You may shoot me with your words,

You may cut me with your eyes,

You may kill me with your hatefulness,

But still, like air, I’ll rise.

Does my sexiness upset you?

Does it come as a surprise

That I dance like I've got diamonds

At the meeting of my thighs?

Out of the huts of history’s shame

I rise

Up from a past that’s rooted in pain

I rise

I'm a black ocean, leaping and wide,

Welling and swelling I bear in the tide.

Leaving behind nights of terror and fear

I rise

Into a daybreak that’s wondrously clear

I rise

Bringing the gifts that my ancestors gave,

I am the dream and the hope of the slave.

I rise

I rise

I rise.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठी अनुवाद : 

तरीही मी उभारी घेत राहाते

तुम्ही करा बदनामी इतिहासात माझी

वापरून तुमचा कडवा आणि विकृत खोटेपणा

तुडवा तुम्ही मला मातीत पायधुळीप्रमाणे

तरीसुद्धा घेत राहीन मी उभारी धुळीप्रमाणे

खटकतो तुम्हाला माझा गर्विष्ठ उद्धटपणा?

घेरले आहे का विषादाने तुम्हाला, 

मी चालते म्हणून उत्स्फूर्त उत्साहाने?

मी चालते अशा उत्साहात जणू रोज ओतत असतात

श्रीमंती दिवाणखान्यात माझ्या अनेक विहिरी तेलाच्या

भरतीच्या नियमितपणाने,

चंद्राप्रमाणे आणि सूर्यांप्रमाणे,

उसळून येणाऱ्या आणि आशेप्रमाणे

उभारी घेत राहाते मी

तुम्हाला पाहायचे आहे का मला तुटून पडलेले?

झुकलेली मान आणि आणि डोळेसुद्धा झुकलेले?

खांदे ओघळलेले ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे,

क्षीण झालेली मी माझ्या आत्म्यात उमाळून येणाऱ्या क्रंदनाने?

गर्वोद्धत उत्साह माझा खटकतो आहे का तुम्हाला?

हास्य माझे उत्फुल्ल तुम्ही नका लावून घेऊ मनाला.

मी हसते अशी की जणू चमकत आहेत

अंगणात माझ्या साक्षात खाणी सोन्याच्या.

मारा तुम्ही मला तुमच्या शब्दांच्या गोळ्यांनी,

वार करा तुम्ही माझ्यावर तुमच्या नजरांनी,

ठारसुद्धा मारा मला तुमच्यामधल्या द्वेषाने तुम्ही,

घेत उभारी राहीन मी हवेच्याप्रमाणे तरीही.

माझ्यातला उत्फुल्ल काम अस्वस्थ करतो का तुम्हाला?

मी नाचते अशी की जणू जडवले आहेत हिरे

माझ्या मांड्या मिळतात जिथे तिथे -

म्हणून खूप आश्चर्य वाटत वाटत राहते का तुम्हाला?

इतिहासाच्या लाजिरवाण्या झुग्गी-झोपड्यांमधून मी उभारी घेते

वेदनांच्या मातीत रुजलेल्या भूतकाळातून मी उभारी घेते

मी आहे एक काळा समुद्र, विस्तीर्ण आणि उसळणारा,

उमडून येत, भरून येत, सहन करते मी प्रत्येक भरती,

दहशतीच्या आणि भीतीच्या रात्रींना मागे सोडून देऊन मी उभारी घेते,

निर्मलतेवर ज्याच्या विश्वास ठेवणेसुद्धा अवघड बनून जाते

अशा सूर्योदयाबरोबर मी उभारी घेते.

दिलेल्या पूर्वजांनी माझ्या, सर्व भेटी मी घेऊन येते,

सर्व गुलामांचे मी स्वप्न आहे आणि आशाही आहे

मी उभारी घेते

मी उभारी घेते

मी उभारी घेत राहते.

अन्याय आणि पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन, या दोन गोष्टींचा सामना या जगातील प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो. तुम्ही स्त्री असाल तर या गोष्टींचा विखार खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यात तुम्ही वंचित समाजातील असाल तर तो अजून वाढतो. त्यात तुम्ही कृष्णवर्णीय असाल तर मग संपलेच सगळे.

तुम्ही स्त्री असाल, तर केवळ तुम्ही स्त्री-देहात आहात, या कारणासाठी तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही वंचित समाजात असाल, तर केवळ तुम्ही त्या समाजात जन्म घेतला आहे, म्हणून तुमच्यावर अन्याय होतो. आणि तुम्ही कृष्णवर्णीय असाल, तर केवळ तुमच्या वर्णासाठी तुमचा द्वेष केला जातो.

स्वातंत्र्याच्या आणि मुक्ततेच्या ऊर्मी तुमच्या मनात इतर कोणत्याही व्यक्तीच्या मनात उमटत असतात, त्याचप्रमाणे तुमच्याही मनात उमटत असतात. तुमच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद इतर कुणाच्याही चेहऱ्यावर उमलणाऱ्या आनंदाइतकाच उत्फुल्ल असतो. तुमचे शरीर इतर कोणाही व्यक्तीच्या शरीराप्रमाणे निरोगी आणि उत्साहाने रसरसलेले असते. पण तुम्ही स्त्री असाल, तर तुमच्या उत्फुल्ल आनंदाचा इतरांना त्रास होतो. तुमच्या रसरसलेपणाचा इतरांना राग येतो. खरं तर तुमच्या आनंदासाठी तुमचा राग राग होण्याचे काही कारण नसते, पण पुरुषप्रधान संस्कृतीच्या अपेक्षा वेगळ्या असतात.

स्त्रीचा आनंद हा शालीनतेच्या आणि मर्यादेच्या पदरात पेश झालेला बहुतांश लोकांना हवा असतो. नाहीतर त्याला उठवळपणा म्हटले जाते. सगळीकडे सारखीच परिस्थिती. आपल्याकडे स्त्रीकडून मर्यादेची अपेक्षा असते. पाश्चात्य जगतात मॉडेस्टीची!

जीवनाने रसरसलेले तुमचे शरीर बहुतेक लोकांना फक्त भोगासाठी हवे असते, आणि ते शरीरसुद्धा नम्रपणे लाजत वगैरे पेश झालेले लोकांना हवे असते. नाहीतर तुम्हाला ‘बेहया’ वगैरे म्हटले जाते. स्वातंत्र्याने रसरसलेली स्त्री तिच्या स्वातंत्र्यासह एन्जॉय करायची औकात किती पुरुषांमध्ये असते, हा एक संशोधनाचाच विषय आहे.

कित्येक वेळा मी विचार करत राहतो की, ‘माझ्या मांड्या जेथे जुळून येतात तेथे हिऱ्यांच्या खाणी आहेत’ असा आत्मविश्वास असलेल्या माया अँजेलोला एक प्रियकर म्हणून सामोरे जायची वेळ आली असती, तर मी आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकलो असतो का? मला वाटत राहते की, मी गडबडून गेलो असतो. एका ‘लिबरल’ पुरुषाच्या मनात गोंधळ उडवून द्यायचे सामर्थ्य माया अँजेलोच्या शब्दांत आणि प्रतिमांमध्ये पदोपदी दिसून येते. त्यामुळेच तिला स्त्री-मुक्तीच्या चळवळीमध्ये एवढे मानाचे स्थान दिले गेले आहे. तिच्या आविष्काराशिवाय स्त्रीमुक्तीची चळवळ अपूर्ण राहून जाईल की काय, असे वाटत राहते. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एक स्त्री म्हणून जगताना तुमचा आनंद, तुमची मुक्तता, तुमचा उन्मुक्त आविष्कार संस्कारांच्या साच्यांमधून वाहत आलेला लोकांना हवा असतो. या सगळ्या अन्यायाला तोंड देण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा आत्मविश्वास असतो, तुमची जगण्याची ऊर्मी असते आणि तुमच्यातील चैतन्य असते, अशी संवेदना माया अँजेलो व्यक्त करत राहाते.

या जगात जन्मलेल्या प्रत्येकाला एक जबरदस्त चैतन्य दिले गेलेले असते. बहुतांश स्त्रिया या अक्षय आणि अविकारी चैतन्याच्या आधारावर तरून जातात. कितीही अन्याय झाला, तरी त्या जीवनाला सोडत नाहीत, त्या जीवनावर प्रेम करत राहतात, या वस्तुस्थितीकडे ‘स्टिल आय राईज’ या कवितेत माया अँजेलो आपले लक्ष वेधते.

जी गोष्ट स्त्रियांची तीच दलितांची, पतितांची आणि गुलामांचीसुद्धा! ही कविता दलितांच्या आणि पतितांच्या आणि गुलामांच्या अक्षय जीवनशक्तीबद्दलसुद्धा आहे. दक्षिण आफ्रिकेचे स्वतंत्र्ययोद्धे नेल्सन मंडेला यांना वर्णद्वेषी गोऱ्या सरकारने २७ वर्षे तुरुंगात ठेवले. शेवटी वर्णद्वेषी राजवटीला जावे लागले. मंडेला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून शपथग्रहण करताना नेल्सन मंडेला यांना माया अँजेलो यांच्या या कवितेची आठवण झाली.

आपण ‘स्टिल आय राईज’मागची स्त्रीवरील अन्यायाची पार्श्वभूमी पाहिली. त्यात अध्याहृत असलेली गुलामांच्या दुःखाची वेदना पाहिली. कृष्णवर्णीय वंशाच्या अंतरात उमडणारा काळा समुद्र पाहिला. गुलामीच्या आणि वंशवादाच्या दुःखाने त्या काळ्या समुद्रात आणलेली ओहोटी बघितली. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्मळ जीवनेच्छेने त्या काळ्या समुद्राला आणलेली भरतीसुद्धा पाहिली. पण याच्याही पुढे जाऊन आपण माया अँजेलो यांच्या अत्यंत वेदनादयक बालपणात उतरलो, तर या कवितेतील भावनेमागची खरी ‘गहराई’ आपल्या लक्षात येते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माया अँजेलो यांचा जन्म ४ एप्रिल १९२८ रोजी सेंट लुईस येथे झाला. अमेरिकेच्या दक्षिण भागातील मिसुरी राज्यात हे शहर आहे. त्यांचे नाव मार्गरीट अॅन जॉन्सन. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना माया हे नाव बहाल केले. अँजेलो हे आडनाव त्यांनी आपला नवरा टॉस अँजेलॉस याच्या नावावरून तयार केले आणि स्वीकारले. तीन वर्षांत घटस्फोट झाला, तरी त्यांनी शेवटपर्यंत हे नाव कायम ठेवले.

माया अँजेलो यांच्या आई-वडिलांचे पटत नव्हते म्हणून अगदी लहान असताना त्यांना आपल्या आजीकडे राहायला जावे लागले. सातव्या वर्षी आपल्या आईकडे छोटी माया राहायला आलेली असताना, तिच्या आईच्या ‘बॉय-फ्रेंड’ने तिच्यावर बलात्कार केला. छोट्या मायाने न्यायालयामध्ये तो सगळा ‘ट्रॉमा’ कथन केल्यावर त्या बॉय-फ्रेंड ला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तो तुरुंगातातून बाहेर आल्यावर मायाच्या काकांनी त्याचा खून केला. छोट्या मायासाठी हा सगळा प्रकारच भयानक होता. ती स्वतःला या सगळ्या प्रकारासाठी जबाबदार धरू लागली. या मानसिक धक्क्यामुळे तिचे बोलणे बंद झाले. सहा वर्षे तिने एकही शब्द न बोलता काढली.

मनात विचार येत राहतो : लहानपणी त्या जेव्हा मूक झाल्या होत्या, त्या सहा वर्षांत स्वातंत्र्याचे गाणे त्यांच्या मनात कोण गात होते?

अशी व्यक्ती ‘केज्ड बर्ड’ ही कविता लिहिते, तेव्हा त्या कवितेतील वेदना आपल्याला वेगळ्या प्रकाशात दिसू लागते.

Caged Bird

A free bird leaps

on the back of the wind  

and floats downstream  

till the current ends

and dips his wing

in the orange sun rays

and dares to claim the sky.

But a bird that stalks

down his narrow cage

can seldom see through

his bars of rage

his wings are clipped and  

his feet are tied

so he opens his throat to sing.

The caged bird sings  

with a fearful trill  

of things unknown  

but longed for still   

and his tune is heard  

on the distant hill  

for the caged bird  

sings of freedom.

The free bird thinks of another breeze

and the trade winds soft through the sighing trees

and the fat worms waiting on a dawn bright lawn

and he names the sky his own.

But a caged bird stands on the grave of dreams  

his shadow shouts on a nightmare scream  

his wings are clipped and his feet are tied  

so he opens his throat to sing.

The caged bird sings  

with a fearful trill  

of things unknown  

but longed for still  

and his tune is heard  

on the distant hill  

for the caged bird  

sings of freedom.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मराठी अनुवाद :

पिंजऱ्यातील पक्षी

स्वतंत्र पक्षी नर्तन करतो

वाऱ्याच्या पाठीवर,

वाहत राहतो तो

वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर

प्रवाह तो संपत नाही तोवर,

आणि बुडवतो तो आपले पंख

नारंगी सूर्याच्या किरणांमध्ये

आणि असते त्याच्यात धैर्य

आकाशावर हक्क सांगण्याचे

नुसत्याच फेऱ्या घालत राहतो परंतु

पिंजऱ्यातला पक्षी,

पाहू शकत नाही फारसे तो 

आपल्या रागाच्या सळयांपलीकडचे,

कापलेले असतात त्याचे पंख

आणि बांधलेले असतात त्याचे पाय,

म्हणून स्फुरून येत राहतो त्याचा कंठ

गाणे गाण्यासाठी.

कंपयुक्त आवाजात गात राहतो पिंजऱ्यातला पक्षी,

कारण असते त्याच्या मनात भीती

अनुभवता न आलेल्या आणि तरीही हव्या असलेल्या गोष्टींची…

येते राहत ऐकू त्याचे गाणे दूरच्या टेकडीवरसुद्धा कारण पिंजऱ्यातला पक्षी गात असतो

स्वातंत्र्याचे गाणे.

स्वतंत्र पक्षी विचारात असतो त्याच्या अंगावर येऊ पाहाणाऱ्या अजून एका झुळुकीच्या,

आणि निःश्वासणाऱ्या झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या,

आणि चमकत्या पहाटवेळी गवतावर पहुडलेल्या जाडजूड कीटकाच्या,

आणि मुख्य म्हणजे मालक असतो स्वतंत्र पक्षी साऱ्या आकाशाचा. 

पिंजऱ्यातला पक्षी परंतु उभा असतो आपल्याच स्वप्नांच्या कबरीवर,

त्याची सावली ओरडत राहाते त्याच्या दुःस्वप्नाच्या किंकाळीवर,

त्याचे पंख कापलेले असतात आणि बांधलेले असतात त्याचे पाय,

म्हणून स्फुरून येतो त्याचा कंठ

गाणे गाण्यासाठी.

कंपयुक्त आवाजात गात राहतो पिंजऱ्यातला पक्षी

कारण असते त्याच्या मनात भीती

अनुभवता न आलेल्या आणि त्याला हव्या असलेल्या गोष्टींची…

येते राहते ऐकू त्याचे गाणे दूरच्या टेकडीवरसुद्धा

कारण पिंजऱ्यातला पक्षी गात असतो

स्वातंत्र्याचे गाणे!

आपण आपल्या बालपणात काय भोगले आहे, यावर माया अँजेलो यांनी ‘आय नो व्हाय् अ केज्ड बर्ड सिंग्ज’ हे आत्मवृत्त लिहिले आहे. या अनुभवावर पुढे त्यांनी ही कविताही लिहिली. ती वाचल्यावर आणि त्या कवितेला असलेल्या दारुण वेदनेची पार्श्वभूमी बघितल्यावर माया अँजेलो एक व्यक्ती म्हणून ‘स्टिल आय राईज’मधील मुक्ततेपर्यंत आणि त्या कवितेतील मुक्त आनंदापर्यंत पोहोचूच कशा शकल्या, याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते.

पिंजऱ्यातील पक्षी स्वातंत्र्याचे गाणे गात असतो, म्हणून ते खूप दूरवरच्या टेकडीवरसुद्धा ऐकू येत राहते. कारण स्वातंत्र्य हा मानवी जीवनाचा आत्मा आहे. माया अँजेलो २०१४ साली गेल्या. आपण आज त्यांच्या मृत्यूनंतरही खूप दूरच्या टेकडीवर बसून त्यांच्या ही कविता वाचत आहोत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

छोटी माया स्वतःच एक ‘केज्ड बर्ड’ होती. तिथून तिने आपल्या वेदनेवर कसा विजय मिळवला? मानसिक आघाताच्या पिंजऱ्यात लहान वयात कोंडला गेलेला एक पक्षी, मुक्त होऊन सूर्याच्या नारंगी प्रकाशात आपले पंख बुडवून, वाऱ्याच्या पाठीवर नर्तन कसे करू लागला?

ही कविता वाचल्यानंतर आपण ‘स्टिल आय राईज’ वाचली, तर आपल्याला ती कविता, त्यातील बंड, त्यातील स्वातंत्र्याचे पूजन आणि त्यातील माया अँजेलोचा आनंद, हे सारे एका वेगळ्याच प्रकाशात दिसू लागते.

माया अँजेलो यांचे एक छायाचित्र मी डाऊनलोड करून माझ्या मोबाईलमध्ये ठेवले आहे. तेच या लेखाच्या सुरुवातीला दिलं आहे. त्यांच्यामधील संवेदनशीलता, त्यांची बुद्धी, त्यांच्यामधून प्रतीत होणारी मानवता, त्यांच्यातील अपरिमित जीवनशक्ती, त्यांच्यात राहायला आलेला आनंद आणि त्यांच्यामध्ये उमडणारा कृष्णवर्णीय जीवनाचा काळा समुद्र, असे सर्व त्या छायाचित्रामधून प्रतीत होते, असे मला वाटते. ते पाहिले की, ओफ्रा विन्फ्री यांचे माया अँजेलो यांच्याबद्दलचे वाक्य आठवत राहते –

“She moved through the world with unshakeable calm, confidence and a fierce grace... She will always be the rainbow in my clouds.”

..................................................................................................................................................................

अनुवादक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......