‘जग बदलणारे ग्रंथ’ : अगदी नेटकी पुस्तकांची ओळख करून दिल्याने हे पुस्तक वाचताना एखादा ‘माहितीकोश’ वाचल्याचा आनंद मिळतो!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 01 April 2023
  • ग्रंथनामा शिफारस जग बदलणारे ग्रंथ Jag Badalanare Granth दीपा देशमुख Deepa Deshmukh

दीपा देशमुख या वाचकाला चौकस आणि बहुश्रुत बनवणाऱ्या लेखिका आहेत. एखादा विषय निवडून त्यासंबंधी शेकडो पुस्तकं वाचायची आणि त्यांचा अर्क काढून वाचकांसमोर ठेवायचा, असा ज्ञानमार्ग त्यांनी निवडला आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांतून वाचकाला अनेक क्षेत्रांची ओळख होते.

त्यांचे ‘जग बदलणारे ग्रंथ’ हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. जगाच्या ज्ञानवर्धनाचा इतिहास लिहायचा झाला, तर त्यात जे काही महत्त्वाचे ‘ग्रंथ’ असतील, त्यातील ५० ‘ग्रंथां’चा संक्षिप्त परिचय या पुस्तकात करून दिला आहे.

‘रिपब्लिक’ लिहिणारा प्लेटो तत्त्वज्ञ मुलांनी पस्तिशीनंतर राज्य कसं चालवावं, याचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि राज्यकर्ते होण्यासाठी १५ वर्षांची अँप्रेन्टिसशिप केली पाहिजे, असं म्हणतो. म्हणजे माणसं दीर्घायुषी असतील, हे त्याचं गृहीतक होतं.

अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांची ओळख व पुस्तक परिचय वाचताना जाणवतं की, त्यांचा संघर्ष केवळ संशोधनापुरता नव्हता, तर जागतिक महायुद्धांचीही अहमहमिका होती, सत्ताधाऱ्यांचा रोष होता. एवढं सगळं असूनही संशोधनावर लक्ष केंद्रित करणं असामान्य धैर्याचं काम होतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यात आईनस्टाईनचंच एक सुंदर वाक्य आहे- ‘तुमची मुलं हुशार व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना गोष्टी सांगा; तुम्हाला खरंच तुमची मुलं जास्त हुशार व्हावीत असं वाटत असेल, तर त्यांना जास्त गोष्टी सांगा; आणि जर तुम्हाला तुमची मुलं जास्त हुशार आणि बुद्धिमान व्हावीत असं वाटत असेल, तर त्यांना आणखी जास्त गोष्टी सांगा.’   

बर्ट्रांड रसेल यांनी आपल्या ९८ वर्षांच्या दीर्घायुष्यात ६८च्यावर पुस्तकं आणि २०००च्यावर लेख लिहिले, हे वाचून आपण अचंबित होतो. लहान मुलांवर ६० वर्षे संशोधन करणाऱ्या पियाजेंचे प्रयोग किती नावीन्यपूर्ण आहेत, हे त्यांच्या ‘द मॉरल जजमेंट’ या पुस्तकाच्या परिचयातून उलगडतं. आपण त्यातले सोपे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष पडताळून पाहू शकतो. वैज्ञानिक किती डोळस दृष्टीकोनातून संशोधन करतात, याचा प्रत्यय मनोवैज्ञानिकांच्या पुस्तकांचा परिचय वाचताना येतो.

लिओ टॉल्स्टॉय, महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग ज्यु., या जगाला प्रभावित करणाऱ्या लोकांनी प्रभावित व्हावं, असं हेन्री डेव्हिड थोरोच्या ‘सिव्हिल डिसओबिडीयन्स’ या पुस्तकात काय आहे, हे कुतूहल थोड्याअंशी का होईना शमवण्याचं कामही हे पुस्तक करतं. अरब-इस्त्रायल वादाचं काय मूळ आहे, हे ‘बायबल’चा परिचय वाचताना लक्षात येतं.

याच पुस्तकात इंग्लिश शब्दकोशाचा उद्गाता डॉ. सॅम्युअल जॉन्सन भेटतो. तो म्हणतो- ‘लिहिताना लेखकाचा सर्वाधिक वेळ वाचनात जातो. एक पुस्तक लिहिण्यासाठी अर्धं ग्रंथालय पालथं घालावं लागतं.’     

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या पुस्तकात ‘भगवद्गीता’, ‘त्रिपिटक’, ‘कामसूत्र’, ‘अर्थशास्त्र’, ‘गीतांजली’, ‘सत्याचे प्रयोग’, या सहा भारतीय ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे.    

‘भगवद्गीता’ गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भावग्नी, भय नाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थ ज्ञानमंजिरी अशा १८ नावानं ओळखली जाते. ही माहिती अनेकांसाठी नवी असू शकते.

कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’चादेखील असाच संक्षिप्त परिचय होतो. तो म्हणतो- “कर गोळा करताना सरकारची भूमिका ही मध प्राशन करणाऱ्या मधमाशीसारखी असावी. मधमाशी फुलातला आवश्यक तेवढाच मध घेते, त्यामुळे मधमाशी आणि फूल, दोघंही आनंदाने तर राहतातच, आणि त्यांच्या अस्तित्वाला बाधा येत नाही.”     

गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देण आहे. त्यांच्या ‘त्रिपिटक’ या ग्रंथाचा आढावा घेताना लेखिकेने थोडक्यात बुद्ध तत्त्वज्ञानही सांगितलं आहे.

“तारुण्यात प्रवेश करण्याच्या वेळी मुलालाच नव्हे, तर मुलीलाही कामक्रीडेचं रीतसर शिक्षण मिळालं पाहिजे. तरच निकोप समाज घडू शकतो. अन्यथा एक मोठी विकृती समाजात तयार होऊन, ती समाजातली शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते”, असे विचार वात्स्यायनाने ‘कामसूत्रा’त मांडले आहेत. यावरून भारतीय संस्कृती किती उदारपणे ‘लैंगिक संबंधां’कडे पाहात होती, याची कल्पना येते.                 

या ५० ग्रंथात केवळ तीन स्त्री लेखिकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. ‘द सेकंड सेक्स’ लिहिणाऱ्या सिमॉन द बोव्हा, ‘सायलेंट स्प्रिंग’ लिहिणाऱ्या रॅचेल कार्सन आणि ‘द फेमिनाईन मिस्टिक’ लिहिणाऱ्या बेट्टी फ्राईडन. कदाचित जागतिक सामाजिक परिस्थितीचा ते आरसा ठरावे.  

देशमुख यांनी प्रत्येक पुस्तकाविषयी लिहिताना पार्श्वभूमीसाठी, अनुबंध उलगडण्यासाठी कर्त्याच्या चरित्रावर थोडा प्रकाश टाकला आहे. त्या त्या ग्रंथातील काही अवतरणेही लेखिकेने दिली आहेत. केवळ त्यातूनही हे ग्रंथ किती प्रगल्भ आहेत, याची कल्पना येते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे पुस्तक माहितीपर असलं तरी तितकंच प्रेरणादायीदेखील आहे. प्रत्येक ग्रंथकर्त्याला मानवी आयुष्यात संघर्ष करावा लागला, हाल, अपेष्टाही सहन कराव्या लागल्या. तरीही त्यांनी चिकाटीनं संशोधन, लिखाण केलं. त्यांच्या ठायी असलेली एकाग्रता, शिस्त, सातत्य हे गुण प्रत्येकासाठी अनुकरणीय आहेत.          

या पुस्तकाची रचना दोन कॉलममध्ये केलेली आहे. यात सुंदर चित्रांचा आहे. त्यामुळे एखादा माहितीकोश वाचल्याचा आनंद मिळतो. वाचकाचं कुतूहल जागृत राहील, अशा पद्धतीनं अगदी थोडक्यात म्हणजे प्रत्येकी तीन ते चार पानांत प्रत्येक पुस्तकाची नेटकी ओळख करून दिली आहे.

या ग्रंथांमध्ये विपुल पारिभाषिक संज्ञा आहेत. त्यांचं मराठीकरण करणं गुंतागुंतीचं झालं असतं, म्हणून त्या तशाच ठेवून फक्त देवनागरीत लिहिल्या आहेत. हा डीटीपी करणाऱ्यासाठी फार किचकट प्रकार. लेखिका आणि प्रकाशकाने त्यावर खूप मेहनत घेतली आहे.  

‘जनरलिस्ट’ आणि ‘स्पेशलिस्ट’ यांत नेमका काय फरक असतो? तर ‘वन हू नोज लेस अँड लेस ऑफ मोर अँड मोर इज अ ‘जनरलिस्ट’, आणि ‘वन हू नोज मोर अँड मोर ऑफ लेस अँड लेस इज अ ‘स्पेशलिस्ट’ ’. त्यामुळे आपल्याला कोणत्या विषयात ‘स्पेशलिस्ट’ व्हायचंय, हे ठरवण्याआधी बहुश्रुत असणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी विविध विषयांची ओळख करून देणाऱ्या अशा ‘जनरलिस्ट’ पुस्तकांची आवश्यकता असते.

‘जग बदलणारे ग्रंथ’ – दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ४३२ | मूल्य - ३९९ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......