१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या
अर्धेजग - महिला दिन विशेष
रमेशचंद्र पाटकर
  • बायजाबाई शिंदे, बेगम हजरत महल, झलकारी बाई, राणी लक्ष्मीबाई आणि उदादेवी
  • Thu , 09 March 2023
  • अर्धेजग महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day महिला दिन Women's Day १८५७चा उठाव revolt of 1857 राणी लक्ष्मीबाई Rani Lakshmibai ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी British East India Company

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला १८५७च्या बंडाने दिलेला हादरा हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ होता. या लढ्याचा महत्त्वाचा विशेष होता- हिंदू व मुस्लीम यांची ब्रिटिशांच्या विरोधात झालेली एकजूट. शिवाय सर्वसामान्य जनतेचा त्यात सहभाग होता. या लढ्याने पुढील लढ्यांना प्रेरणा दिली. हा लढा उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता, तर दक्षिणेतील महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता.

या लढ्याचा दुसरा विशेष म्हणजे त्यात असलेला स्त्रियांचा सहभाग. त्यात बेगम हजरत महल आणि राणी लक्ष्मीबाई या राजघराण्यातील स्त्रियांबरोबरच कित्येक स्त्रियांनी भाग घेतला होता. त्यात दलित किंवा वंचित स्त्रियांबरोबरच कोठ्यात नाचणाऱ्या, गाणाऱ्या स्त्रियांही (वारांगना) सामील झाल्या होत्या. त्यांच्या कोठ्यात लढ्याचे डावपेच आखले जात. त्यांच्याद्वारा बंडखोरांना निरोप पाठवले जायचे. या स्त्रिया त्यांना आर्थिक मदतही करायच्या. बऱ्याच तवायफांचे कोठे बंडखोरांना भेटण्याची जागा होती.

परिणामी १८५७नंतर ब्रिटिशांची या कोठ्यांकडे नजर वळली. नृत्य, गायन करणाऱ्या या तवायफांवर ‘वेश्या’ असा ठसा मारला गेला आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आशादेवी, भक्तावरी, हबीबा भगवती, देवी त्यागी, इंद्र कौर, जमीला खान, मान कौर, रहीमी, राज कौर, शोभा देवी आणि उमदा या बंडखोर तवायफांनी तलवारी चालवून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. असगरी बेगमचा अपवाद वगळता बाकीच्या तवायफ वीसएक वर्षांच्या होत्या. काहींना ब्रिटिशांनी फाशी दिले, काहींना तुरुंगात डांबले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

ज्या स्त्रियांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंड केले, त्यापैकी एक होती बेगम हजरत महल. हे बंड झाले त्या वेळी मोगल बादशहा बहादूर शाह जफर (दुसरा) राज्य करत होता. त्याच्या बाजूने ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे शिपाई बंडात सामील झाले. बंडखोरांनी बादशहा जफरला ‘शहेनशाह-ए-हिंद’ हा किताब दिला होता. बंडखोरांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला, तेव्हा त्यात राजे, सरदार, जमीनदार, शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य लोक होते.

अवधचा नवाब वाजिद अली शाहच्या निधनानंतर त्याची पत्नी बेगम हजरत महलने ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध दोन हात केले. बेगम आणि तिच्या सरफद-दुल्ला, महाराज बाळकृष्ण, राजा जयलाल आणि मम्मू खान या तिच्या विश्वासू सरदारांनीही कडवा संघर्ष केला. त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला माघार घ्यावी लागली आणि बेगमशी तह करावा लागला.

या लढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हजरत महलने या उठावाचे नेतृत्व केले होते. तहात झालेल्या करारानुसार कंपनीला बळकावलेला प्रदेश परत द्यावा लागला. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला कंपनी सरकारने दिलेला नकार, या संघर्षामागे होते. हजरतने आपल्या अकरा वर्षांच्या मुलाला अवधच्या गादीवर बसवले आणि ती त्याच्या नावाने राज्य करू लागली.

ब्रिटिशांना कर देण्यास नाखूश असणारे जमीनदार व शेतकरी बेगमला कर देऊ लागले. पण हे स्वातंत्र्य काही काळ टिकले. ब्रिटिशांशी शेवटपर्यंत लढणाऱ्या बेगम हजरत महलला शेवटी नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथे १८५९ साली तिने शेवटचा श्वास घेतला.

राजघराण्याशी संबंधित असलेली दुसरी स्त्री म्हणजे राणी लक्ष्मीबाई, मनकर्णिका. त्यांचा जन्म वाराणसीच्या ब्राह्मण पुरोहिताच्या घरात झाला. झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह मे १८४१मध्ये झाला. विवाहानंतरचे त्यांचे नाव ‘लक्ष्मीबाई’ ठेवण्यात आले. त्यांच्या पतीचे वर्षभराने म्हणजे मे १८४२मध्ये निधन झाले. त्यानंतर लक्ष्मीबाईला दत्तकपुत्र दामोदर रावच्या नावाने राज्यकारभार करण्यास ब्रिटिश सरकारने संमती दिली नाही. त्यांनी तिचे राज्य खालसा केले. नाईलाजाने तिला निवृत्ती वेतनावर गुजराण करावी लागली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मार्च १९५८मध्ये ब्रिटिश फौजांनी झाशीवर हल्ला चढवला. त्याचा तिने प्रतिकार केला. ब्रिटिश फौजेची सरशी होत असल्याचे पाहून लक्ष्मीबाई आपल्या पुत्राला बरोबर घेऊन किल्ल्यातून निसटली. ती काल्पीला गेली आणि तात्या टोपेंना जाऊन मिळाली. त्या दोघांनी पुन्हा ग्वाल्हेर जिंकले. ग्वाल्हेरच्या किल्ल्याबाहेर राणीची फौज आणि ब्रिटिशांची फौज यांच्यात घमासान लढाई झाली. त्यात आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात आल्यावर ग्वाल्हेरपासून काही मैलांवर असलेल्या काठा-की-सराई येथून (१० जजून १८५८ रोजी) लक्ष्मीबाई पुरुषी वेशात घोड्यावर स्वार झाली, पण पळून जाण्यात यशस्वी झाली नाही. ब्रिटिश सैनिकाच्या गोळीला ती बळी पडली.

ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या आणखी एका वीरांगनेचे नाव आहे- झलकारी बाई. दुर्गादल ही स्त्रियांची फलटण होती. झलकरीबाई ही त्या फलटणीचा भाग होती. तिचा नवरा झाशीच्या फौजेतील एक शिपाई होता. झलकरीबाई तलवारबाजीत पटाईत होती. ती लक्ष्मीबाईसारखीच दिसायची. तिचा पोशाखही तिच्यासारखाच होता. त्यामुळे ब्रिटिश फौजेला चकवा देण्यासाठी तिचा लष्करी डावपेच आखण्याच्या बाबतीत उपयोग व्हायचा. लक्ष्मीबाई व झलकरीबाई या दोहांतील साम्यांमुळे तिच्याविषयी बऱ्याच दंतकथा प्रचलित झाल्या होत्या. १९८० साली तिने या जगाचा निरोप घेतला.

नोव्हेंबर १८५७ साली लखनौच्या सिकंदर बागेत ब्रिटिश सैनिकांबरोबर कडवी लढाई झाली. सिकंदर बाग बंडखोरांच्या ताब्यात होता. कोलिन कॅम्पबेल रेसिडेन्सीमध्ये अडकून पडलेल्या युरोपियन कुटुंबांना तिथून दुसऱ्या जागी घेऊन जात असताना बंडखोरांच्या तावडीत सापडला. बंडखोर आणि कॅम्पबेलच्या सैनिकांत तुंबळ लढाई झाली. त्यात शेकडो भारतीय सैनिक ठार झाले.

त्या वेळी एका झाडावर बसून एक ‘पुरुष’ ब्रिटिश सैनिकांवर गोळ्या झाडत होता. गोळ्या झाडता झाडता तो झाडावरून खाली पडला. जेव्हा त्याची झाडाझडती घेतली, तेव्हा तो पुरुष वेशीतील स्त्री असल्याचे लक्षात आले. ही स्त्री म्हणजे उदादेवी. ती पासी या दलित समाजातील होती. या पराक्रमी स्त्रीचा लखनौच्या सिंकदर बागेबाहेर पुतळा आहे.

अजून दोन रणरागिणींच्या उल्लेख केला पाहिजे. त्या म्हणजे मंदार व काशी. राणी लक्ष्मीबाईंबरोबर या दोघी ब्रिटिश सैनिकांशी लढल्या. त्या पुरुष वेशात होत्या, पण दोघींची लढण्याची लकब राणीसारखीच होती.

या रणरागिण्या महाराष्ट्राबाहेरच्या – विशेषत: उत्तर प्रदेशच्या आहेत. पण महाराष्ट्रातही धडाडीची एक रणरागिणी होऊन गेली. तिचे नाव बायजाबाई. ती शिवाजीराव धाडगे यांची मुलगी आणि दौलतराव शिंदे यांची पत्नी. दौलतराव वारस मागे न ठेवता वारले, म्हणून बायजाबाईने अकरा वर्षांच्या जनकोजीला दत्तक घेतले. पण त्याचे वय लहान असल्यामुळे त्या ग्वाल्हेर राज्याची मुख्त्यार म्हणून कारभार पाहू लागली. जनकोजी वयात आल्यावर त्याने राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.

................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

बायजाबाईचे व ब्रिटिशांचे हाडवैर होते. ब्रिटिशांनी तिची रवानगी ग्वाल्हेरहून इंदोरला केली, ती तेव्हापासून म्हणजे १९३८पासूनच ब्रिटिशांविरुद्ध बंडाची योजना आखत होती. इंदूरला तिची भेट नानासाहेब पेशवे यांचे गुरू दासबुवा यांच्याशी झाली. बंडाच्या योजनेविषयी तिने त्यांच्याशी विचारविनिमय केला. तिने होळकरांशी संबंध वाढवले आणि त्यांना आपल्या गटात सामील करून घेतले. दिल्ली, आग्रा इत्यादी ठिकाणचाही दौरा केला. ब्रिटिश शासकांचा बंडाच्या बाबतीत कल कसा असेल, हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले. या दौऱ्यात होळकर बायजाबाईंबरोबर होते. दौऱ्यावरून परतल्यावर मात्र होळकरांचा धीर सुटला. त्यामुळे त्यांनी बायजाबाईंशी असलेले संबंध तोडले आणि इंग्रजांनी मदत करायचे ठरवले.

ग्वाल्हेरशिवाय बायजाबाई उज्जैन, नाशिक, सातारा राज्यांत गेल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मराठा साम्राज्याची पुनर्स्थापना केली. सगळीकडे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत होता. आपला उद्देश यशस्वी करण्यासाठी त्यांनी गुजरातला भेट देऊन तिथल्या शासकांना व सैनिकांना प्रभावित केले.

बायजाबाईंनी सर्व मराठा राज्यांच्या शासकांकडे आपले दूत पाठवून शस्त्र हाती घेऊन छत्रपतींच्या राज्याची पुन्हा स्थापना करण्याचे आवाहन केले. ब्रिटिशांविरुद्ध चिथावणी देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणून ब्राह्मणांचाही तिला पाठिंबा होता. (१९५७च्या बंडाने दिलेली प्रेरणी तिच्या प्रयत्नांमागे होती.)

… तर १८५७च्या उठावातल्या अशा या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या. इतिहासकार विल्यम डेलरीम्पल यांनी ‘द लास्ट मुगल’ या आपल्या पुस्तकात १८५७च्या उठावातल्या स्त्रियांच्या सहभागाविषयी लिहिले आहे - “अनेक वेळा स्त्रिया आपल्या हाती तलवारी घेऊन सैनिकांना दिशा दाखवत होत्या. त्यांना ‘भित्रे, घाबरट’ असे टोमणे मारत होत्या- ‘स्त्रिया तुमच्यापुढे जात आहेत आणि तुम्ही मागे सरकत आहात. आम्ही गोळीबाराच्या वर्षावात तुम्हाला दारूगोळा आणण्यासाठी जात आहोत. तुम्ही थांबा आणि लढा’. गोळ्यांच्या वर्षावात स्त्रिया लढाईच्या आघाडीवर होत्या.”

.................................................................................................................................................................

लेखक रमेशचंद्र पाटकर कलासमीक्षक आणि मराठी साहित्यिक आहेत.

annapatkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......