ब्रिटिश राजघराणे आणि त्यातील राजेशाही कुटुंबीयांवर टीव्ही आणि आता सोशल मीडियाचा ‘स्पॉटलाइट’ कायम असतो!
पडघम - विदेशनामा
गायत्री चंदावरकर
  • प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल
  • Tue , 21 February 2023
  • पडघम विदेशनामा स्पेअर Spare प्रिन्स हॅरी Prince Harry मेगन मार्कल Meghan Markle

एकविसाव्या शतकातले हे जग आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जागतिकीकारणामुळे तसेच इंटरनेट आणि माध्यमांच्या एकत्रित ताकद नि प्रभावाने अधिकाधिक आधुनिक, सर्वसमावेशक, धीट आणि मोठे धडाडीचे झाले आहे. त्यातही मीडिया सोशल मीडियाची ताकद ओळखून स्वतःचा ब्रँड तयार करणारे, अमाप पैसा मिळवणारे आणि मुख्य म्हणजे प्रभावशाली व्यक्ती म्हणून, या नव्या जगात स्वतःची ओळख तयार करणारे काही धाडसी आणि मोठे चाणाक्ष स्टार्स सध्या आपल्या अवतीभवती आहेत.

अधोरेखित करायचा मुद्दा म्हणजे, सांस्कृतिक जागतिकीकरणाने जगभर नवीन आयकॉन्स तयार झाले आहेत. ‘फ्रेंड्स’ मालिकेतील जेनिफर ॲनिस्टर जगातील एक अतिप्रसिद्ध स्टार बनते. तर मुलाखतकार ऑप्रा विन्फ्री लोकांची अत्यंत लाडकी ‘ओपिनियन लीडर’ बनते. लेस्बियन एलिन डिजेनरेस तिच्या मुलाखती आणि रंजक कार्यक्रमांतून जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकते. ‘BTS’ या आशियाई रॉक बॉय बँडच्या युंग कुक या गायकाला जगभरातील चाहते मिळतात, तर ट्विटर विकत घेऊन त्याचा विचका करणारा इलॉन मस्क सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. दुसरीकडे, भारतीय वंशाचा, मात्र जन्माने ब्रिटिश असणारा ब्रिटनचा पंतप्रधान ऋषी सुनक लक्षवेधी ठरतो, तर आयर्लंडचा गे पंतप्रधान लिओ वराडकर जगभरातील लोकांना आपलासा वाटू लागतो.

सांस्कृतिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने जगभर इतरही अनेक चांगले-वाईट सामाजिक आणि कौटुंबिक बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, फेसबुकचा मार्क झुकरबर्ग आणि त्याची चिनी जोडीदार प्रिसिला चॅन यांनी आंतरवंशीय विवाह केल्याने आणि चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार - तंत्रज्ञान युद्धातून चाललेल्या राजकीय चढाओढीच्या दृष्टीने एक वेगळा पायंडा पाडणारे म्हणून लोकांना महत्त्वाचे वाटतात. आंतरवंशीय लग्न केलेला ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्याची मिश्रवंशीय अमेरिकन नटी-कार्यकर्ती जोडीदार मेगन मार्कल हे जगातील मिश्र विवाह करणाऱ्यांचे आयकॉन्स बनतात. २३ ग्रणड स्लॅम चषके जिंकणारी टेनिस स्टार सेरेना विल्यम्स तिच्या आंतरवंशीय विवाहामुळे अधिक लोकप्रियता प्राप्त करते. आंतरवंशीय विवाह करणारे प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे जोडपेदेखील ग्लॅमरच्या दुनियेत लोकप्रिय होते. हॉलिवुडचा मोठा स्टार जॉर्ज क्लुनी आणि त्याची जोडीदार क्लुनी ही प्रसिद्ध मानवाधिकार वकील आहे. त्यांचाही आंतरवंशीय आणि आंतरधर्मीय विवाह आहे. जॉर्ज आणि अमल हे आयकॉन्स आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वर उल्लेख केलेले हे सगळे आयकॉन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड तयार करतात. आपल्या ब्रँडची किंमत सतत वाढती ठेवतात, तसेच तरुणाईला जोडून ठेवत त्यासाठी लागणारी सगळी गुंतवणूक करतात. याचे वर्तमानातले चपखल उदाहरण म्हणजे, ब्रिटनचा प्रिन्स हॅरी आणि त्याची प्रभावशाली जोडीदार मेगन मार्कल! राजघराण्याचा जुनाटपणा, जाच, काच आणि अन्यायकारक रचनेला योग्य वेळी टाटा करून त्यांनी धाडसी पावले उचलत स्वतः ब्रँड- ‘हॅरी अँड मेग’ (Harry and Meg) तयार केला आहे. तो मोठा (बाजारपेठेच्या भाषेत : सेलेबल) होत राहील याची पूर्ण व्यवस्थाही केली आहे.

इंग्लंडच्या राजघराण्याचा ब्रँड बाजा

काही शतके जगावर राजकीय, सांस्कृतिक अधिपत्य असणारे इंग्लंड हे राष्ट्र आता जागतिक राजकारण, समाजकारण, आरोग्य व्यवस्था, मनोरंजन, संगीत, चित्रपट, खेळ आणि तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रांत आपले वर्चस्व गमावत चालले आहे. अर्थात पिछाडीवर चाललेल्या या ब्रिटिशांनी लोकशाहीबरोबरच राजघराणे जपले आणि त्याचा मोठा जागतिक ब्रँड केला. त्यामुळे फक्त राजघराणे हाच एक मोठा ब्रँड म्हणून त्याची झांज वाजवणे, त्याला प्रसिद्धी देणे आणि सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवणे, हे काम तेथील वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स सातत्याने करत आले आहेत.

ब्रिटिश वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजनवर राजघराण्यातील बातम्या असतात आणि त्यावर अखंड चर्चा केली जाते. वर्तमानपत्रात रोज ठराविक स्तंभ आणि बातम्यांचा रतीब किंवा ‘रोटा’ (ROTA) छापण्याचा प्रघात तर गेली अनेक दशके सुरू आहे. थोडक्यात, काय तर राजघराणे आणि त्यातील राजेशाही कुटुंबीयांवर टीव्ही आणि आता सोशल मीडियाचा स्पॉटलाइट कायम असतो.

एक काळ असा होता, जेव्हा प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचं कोट्यवधी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले ते लग्न, तसेच कमालीच्या आबदार लेडी डायनाने लग्नात घातलेला गाऊन, आणि त्यानंतर तिचे छानसे स्टायलिश पेहराव आणि तिचं सामाजिक काम कायम चर्चेत असे. त्यांच्या दोन्ही मुलांचे जन्म, पुढे डायना आणि चार्ल्स यांचा घटस्फोट, १९९७मध्ये युवराज्ञी डायनाचा दुर्दैवी मृत्यू यांचं टीव्हीवरील प्रक्षेपण साऱ्या जगाने पाहिले. राजघराण्याच्या ब्रेडचे मूल्य अंशाअंशाने वाढत गेले. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन यांचे राजेशाही परंपरेला साजेसे लग्न, त्याच्या मुलाचा जन्म आणि नंतर प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन मिश्रवंशीय निमगोरी नटी मेगन मार्कल यांचं लग्न, राणीची गोल्डन ज्युबिली, आदी वलयांकित घटनांचे रसभरीत चर्चासह जगभरातील टीव्हीवर प्रक्षेपण करण्यात आले.

डॉक्यु-सीरिजचा प्रभाव

२०२२च्या सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्यानंतर १० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेला. राणीच्या पार्थिवाची शवपेटी स्कॉटलंड आणि लंडनमध्ये दर्शनार्थ ठेवली गेली. त्या आधी शवपेटीची मोठ्या सन्मानाने आणि शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. १० दिवसांत लाखोंच्या संख्येने ब्रिटिश नागरिकांनी आणि प्रवासी लोकांनी शवपेटीचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. राणीचे पार्थिव ज्या राजवाड्यात ठेवले होते, तिथे जागता पहारा ठेवला गेला. त्यासाठी राणीच्या सगळ्या नातवंडांनादेखील काही काळ पहारा द्यायला पाचारण करण्यात आले. राणीच्या मृत्यूचा एक प्रकारे भव्यदिव्य सोहळा साधून ब्रिटिश राजघराण्याची सांस्कृतिक पकड पुन्हा मजबूत केली गेली. हे सारे टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात कुतूहलाने पाहिले गेले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर २०२२मध्ये नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिजच्या निमित्ताने हे घराणे पुन्हा चर्चेत आले. ब्रिटिश राजघराण्यावर बेतलेली ‘क्राऊन’ ही सीरिज लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे, असं वाटत असताना प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्यावर बेतलेल्या ‘हॅरी अँड मेगन’ या सहा भागांच्या डॉक्यु-सीरिजने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली. मग जगभरातील प्रेक्षकांनी ‘क्राऊन’ सीरिज सोडून या नव्या सीरिजकडे लक्ष वळवलं. त्यात हॅरी आणि मेगन यांचं ट्रान्स अटलांटिक प्रेम, त्यांचा खास ब्रिटिश राजघराण्यातील परंपरेनुसार झालेला विवाह, राजघराण्यातील कलह, समज-गैरसमज, अपप्रचार यांचा रतीब आणि शेवटी त्यांचे राजघराण्यातील जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन ब्रिटन सोडून कॅलिफोर्नियातील मॉन्टेचिटो या नितांत सुंदर भागात स्थायिक होणे, हा सगळा प्रवास अत्यंत सफाईदारपणे दाखवण्यात आला. जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांनी त्यावर पसंतीची मोहर उठवली.

राजघराण्यातील कुटुंब कलह

राजघराण्याने राजकारणावर बोलायचे नाही, त्यापासून दूर राहायचे असा दंडक असल्याने बहुधा हे राजघराणे टिकले. तसेही ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि पती प्रिन्स फिलिप यांचं आयुष्य वादग्रस्त नव्हे, शांत होते. राणीची तीन मुले आणि एक मुलगी आणि त्यांची मुले, तसेच भरपूर नातवंडे आणि पंतवंडे असे भले मोठे हे कुटुंब आहे. सोबतच राणीची बहीण प्रिन्सेस मार्गरेटची मुले, नातवंडे आहेतच. बाकी, जगभरातील असंख्य कुटुंबात असतात तसे याही कुटुंबात हेवे-दावे, धुसफूस, समज-गैरसमज आणि राजी-नाराजी नाट्ये होती आणि होत आहेत. त्यात काहीही जगावेगळं नाही. मात्र, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध यावरून जे काही वाद किंवा समज-गैरसमज आणि धुसफूस होते, त्यांची रसभरीत वर्णने ब्रिटिश टॅब्लॉइडमध्ये सर्रास छापून येतात. त्यामुळे राजघराणे, त्यातील व्यक्ती या कायम प्रसिद्धीच्या झोतात राहतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिमा ब्रिटिश लोकांमध्ये तयार होते. मुख्य म्हणजे, त्यांना रेटिंगदेखील देण्यात येते. गंमत म्हणजे, या खेळात राणीला कायम उच्च रेटिंग मिळे.

डायनाच्या मृत्यूच्या वेळी मात्र तिची लोकप्रियता फारच घटली होती. तसेच अनेक वर्षे प्रिन्स चार्ल्स आणि त्याची द्वितीय पत्नी कमिला यांचे रेटिंग फार खाली होते. ते हळूहळू सुधारून आता वर गेले आहे. प्रिन्स विल्यम आणि बायको केट यांचेही रेटिंग कायम चांगले राहिले आहेत. प्रिन्स हॅरी त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून फार चांगली प्रतिमा नसलेला राजपुत्र होता. पार्टीमध्ये ड्रग घेणारा, स्वभावाने बंडखोर, तसेच एकही गर्लफ्रेंड टिकवू न शकणारा अस्थिर नि चंचल मनाचा पुरुष अशी त्याची प्रतिमा होती.

जेव्हा राजघराणे एक फर्म बनते

एकंदरीत आधुनिकता आणि जागतिकीकरणामुळे कुटुंब संस्थ्येची पडझड, सदोष (dysfunctional) कुटुंब व्यवस्था आणि त्रासदायक नातेसंबंध जसे जगभर दिसून येतात, अगदी तसेच या राजघराण्यातही दिसून येतात. सुदैवाने जगातील कुटुंबे अजूनही एखाद्या कॉर्पोरेट कंपनी किंवा इन्स्टिट्युशनसारखी झालेली नाहीत. दुर्दैवाने राणीचे कुटुंब मात्र एक इन्स्टिट्युशन आणि एखाद्या कॉर्पोरेट फर्मसारखे झाले आणि तिथेच सगळी मेख आहे.

राणीच्या बकिंगहॅम पॅलेस येथे एक मोठे ऑफिस आहे. त्यात अगदी HR आणि PR डिपार्टमेंट्स आहेत. तसेच सगळे व्यवस्थापन विंड्सर कॅसल आणि केन्सिंग्टन पॅलेस येथेही आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये असते, तशीच इथेही राजघराण्यातील व्यक्तींच्या श्रेण्या, वतने आणि पदक्रम आहेत. त्यासंबंधीचे नियम आणि नियमावली अत्यंत कडक आहे. म्हणजे राणीला किंवा आता राजा चार्ल्स यांना पुरुष आणि स्त्रियांनी सलाम (courtesy and bow) कसा करायचा इथपासून ते कोण, कुठे वास्तव्य करेल, काम करेल, त्याला कोणती श्रेणी, वतन आणि वेतन मिळेल, याउप्पर तर ती व्यक्ती जेवायला कुठे बसेल इथपर्यंत सगळे ठरलेले असते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राजघराणे जेव्हा एक इन्स्टिट्युशन आणि फर्म बनले, तेव्हा जसे अन्याय किंवा पक्षपात कॉर्पोरेट किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये दिसून येतात, तसेच इथेही घडून येऊ लागले. आता तो दोष राजघराण्याच्या मूळ रचनेचा तर आहेच, पण तो इन्स्टिट्युशनल दोषही आहेच. उदाहरणार्थ, पंचम जॉर्ज यांची मोठी कन्या एलिझाबेथ ही राजगादीची प्रथम वारस असल्याने तिला वेगळे शिक्षण देण्यात आले. तशा प्रकारचे शिक्षण आणि मार्गदर्शन तिची लहान बहीण प्रिन्सेस मार्गरेटला मिळाले नाही. तीच गत राणीच्या इतर मुलांची आणि नातवंडांचीही!

राजगादीच्या प्रथम वारसाला वेगळे शिक्षणच नव्हे, तर वेगळं स्थान आणि मान मिळतो. त्यामुळे राणीची बहीण, प्रिन्स चार्ल्स यांची तीनही भावंडं आणि प्रिन्स हॅरी यांना वैष्यम्य, असुरक्षितता आणि असूया वाटणं साहजिक आहे. प्रथम वारसाला वेगळा मान आणि त्याची शान आणि उर्वरित वारसांना दुय्यम वागणूक, अशी पक्षपाती रचना आणि धोरण हीच मुळात चूक आहे. हा अन्याय आहे आणि गेली अनेक दशके काय, शेकडो वर्षे सुरू आहे. साहजिकच राजी-नाराजी, रोष, राग-द्वेष, असूया, हेवा आणि दुःख अशा नकारात्मक गोष्टी उफाळून येऊन कुटुंब कलह झाले. त्यामुळे अंतर्गत वाद-भांडणे याची बाहेर वाच्यता होणे हेही साहजिकच. तेच तर टॅब्लॉइड्स आणि चॅनेल्सचं खाद्य झालं.

दुसरी अन्यायकारक बाब म्हणजे पूर्वी फक्त राजघराण्यातील व्यक्तींशी लग्न करावं लागे. न केल्यास राजघराण्यातील सगळे हक्क सोडून द्यावे लागत. पंचम जॉर्ज यांचे मोठे बंधू एडवर्ड हे खरे तर राजगादीचे वारस, मात्र त्यांनी एका सर्वसामान्य अमेरिकन स्त्रीशी लग्न केलं. त्यामुळे पंचम जॉर्ज यांना राजगादी मिळाली आणि पुढे ती त्यांच्या प्रथम कन्येला म्हणजे, एलिझाबेथला मिळाली. राणीने प्रिन्स फिलिप यांच्याशी विवाह केला. प्रिन्सेस मार्गरेट यांचे एका मिलिटरी अधिकाऱ्यावर प्रेम होते. मात्र तो राजघराण्यातील नसल्याने त्यांचे लग्न होऊ शकले नाही. राजघराण्याने मात्र आता विवाह करण्यासंबंधीचे नियम शिथिल केले असल्याने प्रिन्स हॅरी आणि सामान्य घरातील, घटस्फोटित नटी मेगन मार्कल यांचा विवाह होऊ शकला.

या राजेशाही कुटुंबव्यवस्थेतली आणखी एक मेख अशी आहे, राजघराण्यातील व्यक्तींच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक राजघराणे नामक इन्स्टिट्युशनमध्ये काम करतात. त्यामुळे गॉसिप आणि चर्चांना उधाण न आले तर नवलच. तसेच Royal ROTA सिस्टिममुळे टॅब्लॉइड्स, वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सना रोज बातम्या पुरवाव्या लागतात. त्यातूनच मग सुरू झाला, कौटुंबिक राजकारण, राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा वर्तन आणि वार्तांकन यांच्यातील जीवघेणा खेळ!

ब्रिटिश टॅब्लॉइड्सची विषारी पत्रकारिता

प्रिन्सेस डायना लग्न करून राणीची सून झाली, तेव्हा एक ब्रिटिश गुलाब म्हणून तिच्या सौंदर्य आणि करिष्म्याने लोकप्रियतेने शिखर गाठले. मेरलिन मन्रोनंतर जगातील सगळ्यात जास्त वेळा फोटो घेतली जाणारी व्यक्ती म्हणून तिचे स्थान १९९७ ऑगस्टपर्यंत म्हणजे, तिच्या अपघाती मृत्यूपर्यंत अढळ राहिले. राणी आणि संपूर्ण राजेशाही कुटुंबाला तिच्या लोकप्रियतेने झाकोळून टाकले. त्यामुळे तिच्याविषयी कुटुंबांत असूया निर्माण झाली. त्यात भर घातली, ती कुठलाही धरबंद न पाळणाऱ्या ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी सतत तिच्या मागावर असलेल्या या टॅब्लॉइड्सनी तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले. तिच्या डागाळलेल्या चारित्र्यामुळे राजघराण्यातील ती अत्यंत नावडती व्यक्ती बनली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एकीकडे, डायनाचे चारित्र्यहनन होत असताना विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या प्रिन्स चार्ल्सवर मात्र या टॅब्लॉइड्समधून फारसे काही लिहून येत नसे. त्याच्या प्रेमसंबंधांना राजघराण्यातून आणि ब्रिटिश समाजातून विरोध होत नसे. प्रिन्सेस डायनाच्या प्रेमसंबंधांवर मात्र आक्षेप घेतला जात असे. ब्रिटिश राजघराणे आणि ब्रिटिश समाजाची पुरुषसत्ताक मानसिकताच त्यातून उघड होई.

प्रिन्सेस डायनाच्या मागे २५-३० फोटोग्राफर्स, पापराइझी (चोरून फोटो घेणारे व्यावसायिक) असत. ती कुठेही गेली, अगदी बोटीवर तरीही तिचे फोटो काढले जात. ब्रिटिश माध्यमांनी तिचा कायम पाठलाग करत, तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करत तिला अक्षरश: एक सुंदर सावज बनवले. सरतेशेवटी डायनाचा करुण मृत्यू पापराइझींच्या पाठलागाने झाला. ब्रिटिश टॅब्लॉइड्स, वर्तमानपत्रांचा तोच जीवघेणा खेळ अजूनही सुरूच आहे. प्रिन्सेस केटचे अर्धनग्न आणि जवळजवळ नग्न फोटो या लोकांनी छापले. तेव्हा प्रिन्स विल्यमने हे अति होतंय म्हणत कोर्ट केसेस दाखल केल्या. नोटीस पाठवल्या. पुढे त्यांना अपत्य झाल्यावर मात्र हा खोडसाळपणा थांबला.

मात्र लगोलग दुसरा खोडसाळपणा सुरू झाला. तो म्हणजे राजघराण्यातील व्यक्तींबाबत अश्लाघ्य लिहिणे सुरु झाले. राजघराण्यातील व्यक्तींमध्ये विशेषतः बायकांमध्ये भांडणे लावणे, द्वेषपूर्ण लिहिणे आणि वरताण म्हणजे वर्णद्वेषात्मक लिहिणे हेही अगदी राजरोसपणे सुरू झाले. अर्थात, एका हाताने टाळी वाजत नाही, तद्वत राजघराण्यातील कुटुंबीयदेखील पत्रकारांमार्फत कंड्या पिकवत, खोट्या बातम्या देणे, असा खोडसाळपणा करण्यात राजघराण्यातील अनेक व्यक्तीही सामील असल्याची टीका प्रिन्स हॅरीने त्याच्या सध्या गाजत असलेल्या ‘स्पेअर’ (spare) या आत्मचरित्रात केली आहे.

हॅरी आणि मेगन यांची बंडखोरी

२०१८मध्ये प्रिन्स हॅरी याचे मेगन मार्कल या एका सामान्य अमेरिकन कुटुंबातील नटी आणि कार्यकर्तीशी लग्न झाले. मेगन सुंदर असली, तरी ती मिश्रवंशीय असल्याने निमगोरी आहे. तसेच ती घटस्फोटीतदेखील आहे. सुरुवातीला ब्रिटिश टॅब्लॉइड्स आणि माध्यमांनी तिचे वारेमाप कौतुक केले. नव्याच्या नवलाईत प्रिन्स विल्यम, प्रिन्सेस केट आणि प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना ‘फेमस ४’, तसेच ‘awesome foursome’ अशी स्तुतीसुमनंही उधळली गेली. या सगळ्या घडामोडीत मेगनचं लोभसवाणं व्यक्तिमत्त्व, तिचं वाक्चातुर्य आणि तिने न घाबरता ‘मी टू’ चळवळीवर बोलणं, राजघराण्याने राजकारणापासून दूर राहण्याचा पायंडा अनवधानाने मोडणं, या गोष्टींमुळे तिची लोकप्रियता वाढू लागली होती. त्यामुळे मात्र राजघराण्यातील अनेक जण असूयाग्रस्त तसेच चिंताग्रस्तही बनले. दुसरी डायना तयार होते आहे की काय, या भीतीने मेगनविषयी अनेक कंड्या पिकवण्यास इथूनच सुरुवात झाली.

कंड्या पिकवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून यथावकाश माध्यमांचा वापर करून केट आणि मेगन यांच्यात भांडणे लावण्यात आली. तिच्यावर ‘नावडती कनिष्ठा’ असा शिक्का मारून अतिशय बदनामीकारक मजकूर लिहायला सुरुवात झाली. तिचे अमेरिकन असणे, घटस्फोटित असणे आणि मिश्रवंशीय असणे यावर आकसाने लिहिले गेले. मेगनला कौटुंबिक राजकारण आणि टॅब्लॉइड्सच्या कंड्यांचा मानसिक त्रास होऊन तिचे एक मिसकॅरेजही झाले. त्या धक्क्यातून मनात आत्महत्येचे विचार येऊ लागल्यावर मेगनने इन्स्टिट्यूशनच्या एचआर डिपार्टमेंटकडे धाव घेत मदत मागितली. मात्र तिला कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पक्षपाती वागणूक आणि मेगनवरील ब्रिटिश टॅब्लॉइड्सचे हल्ले, यामुळे हॅरी आणि मेगन अधिकच दुखावले. परिणामी, मेगन आणि हॅरी यांनी २०२० साली राजघराण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. राजघराण्यातील जबाबदाऱ्यांतूनही त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली. ब्रिटिश माध्यमांनी त्याला ‘ब्रेक्झिट’च्या धरतीवर ‘मेग्झिट’ असे म्हटले.

एरवीसुद्धा प्रिन्स हॅरी वारस असूनही सातत्याने मिळालेल्या पक्षपाती वागणुकीमुळे दुखावला होता. वडील प्रिन्स चार्ल्स त्याला सांगत की, त्याचा जन्म झाल्यावर ते डायनाला म्हणाले होते की, ‘तू मला एक वारस तर दिला आहेस, पण दुसरा अतिरिक्त वारसही दिला आहेस’. तसे तर ब्रिटिश राजघराण्यात दुसरा, तिसरा वारस होऊ देण्याची प्रथा आहे. कारण असे की, थोरल्या वारसाला गरज पडल्यास अतिरिक्त वारसांचे अवयव त्याला देण्याची सोय व्हावी किंवा जर प्रथम वारस वारला तर दुसरा तयार असावा. मात्र, दस्तुरखुद्द वडलांनी ‘दुसरा अतिरिक्त’ (‘स्पेअर’ अशा अर्थाने) वारस म्हणून हिणवण्याचे दुःख हॅरी आजतागायत विसरू शकला नाही. कदाचित तेच त्याचं दुःख नुकत्याच प्रकाशित आत्मचरित्राला देण्यात आलेल्या नावामधून प्रतिबिंबित होताना दिसत आहे.

त्याच्या आत्मचरित्रात प्रिन्स हॅरी म्हणतो की, त्याचे वडील त्याला एकदा म्हणाले की, ‘मी खरा वारस आहे की नाही कोण जाणे. तू तरी खरा वारस आहेस कशावरून?’ हॅरीचे लालसर सोनेरी केस बघून अनेक जण म्हणत की, तो जेम्स हेविट यांचा मुलगा असावा. या विषयावर कायमचा पडदा टाकत हॅरी लिहितो की, त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्याची आई (२००५मध्ये हॅरी डीएनए टेस्ट केली गेली. पुढे विल्यम याचीही डीएनए टेस्ट केली गेली. तेव्हा ती दोघेही प्रिन्स चार्ल्स यांचीच मुले आहेत, हे सिद्ध झाले होते.) राजघराण्याचा अधिकारी जेम्स हेविट यांच्या प्रेमात पडली होती आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.

ब्रँड हॅरी अँड मेग

हॅरी आणि मेगन यांनी प्रथम कॅनडात आश्रय घेतला आणि मग कॅलिफोर्नियातील निसर्गरम्य मॉन्टेचिटो येथे मोठ्या जागेवर वास्तव्यास सुरुवात केली. हॅरी आणि मेगन यांनी त्यांची ‘ड्यूक’ आणि ‘डचेस ऑफ ससेक्स’ ही वतने सोडलेली नव्हती. मात्र त्यातून त्यांना फारसे आर्थिक पाठबळही मिळत नव्हते. त्यामुळे विलासी चरितार्थ चालवण्यासाठी हात-पाय हलवणे दोघांनाही भागच होते.

प्रिन्स हॅरी हा बोलून चालून राजपुत्रच. त्यामुळे तो जन्मजात स्टार आहेच. मेगन ही अमेरिकन टीव्हीवरील बऱ्यापैकी यशस्वी नटी आहे. दोघांचे लग्न झाल्यावर आपण आयकॉन्स झालो आहोत, हे लक्षात न येण्याइतके दोघे दूधखुळे नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम ऑप्रा विन्फ्रीला मुलाखत देऊन त्यांनी बरीच माया जमवली. मग त्यांनी मुलगा आर्चीच्या नावावर ‘आर्चवेल फॉउंडेशन’ सुरू केले आणि त्या बॅनरखाली आपल्या नजरेतलं आयुष्य जगापुढे आणण्यासाठी नेटफ्लिक्सवर सहा भागांची ‘हॅरी अँड मेगन’ नावाची डॉक्यु सीरिजही तयार केली. त्यासाठी त्यांना प्रचंड पैसा म्हणजे १० कोटी डॉलर्स मिळाल्याची नोंद आहे. जगभर ही डॉक्यु सीरिज खूपच गाजली. मेगनचा वर्णद्वेष हा ब्रिटिश लोकांच्या आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या मनात खोलवर रुजला आहे, अशी कबुली हॅरीने यात दिली. मेगन आयुष्यात येण्यापूर्वी आपणही वृत्तीने कट्टर होतो, असेही त्याने प्रामाणिकपणे कबूल केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्याचबरोबर प्रिन्स हॅरी या डॉक्यु सीरिजमध्ये असेही म्हणतो की, मेगनचे मिश्रवंशीय असणे तसेच त्यांची मुलंही मिश्रवंशीय आहेत याचा त्याला फार अभिमान आणि समाधान आहे. बाकी, या सीरिजमध्ये राजघराणे, त्यांचे परंपरावादी असणे आणि त्यांच्यातील दुरावा आणि अन्यायकारक वागणूक यावर प्रकाश टाकला आहे. आर्चवेलचे पुढचे प्रॉडक्शन म्हणून प्रिन्स हॅरी याचे ‘स्पेअर’ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध लेखक जे. आर. मोन्हीन्जर यांच्या मदतीने लिहिले. मोन्हीन्जर यांनी आन्द्रे अगासी याचे ‘ओपन’ नावाचे आत्मचरित्रदेखील लिहिले आहे.

एकीकडे डॉक्यु-सीरिजची सर्वत्र चर्चा होत असताना काही दिवसांपूर्वीच एका ब्रिटिश टॅब्लॉइडमध्ये जेरेमी क्लार्कसन नावाच्या लेखकाने ‘मेगनची निर्वस्त्र धिंड काढावी आणि लोकांनी तिच्यावर विष्ठा फेकावी अशी ती आणि तिची कृत्ये आहेत’ इतकं अश्लाघ्य लिहिले होते. अर्थात, उपरती होऊन या क्लार्कसन महाशयांनी हॅरी आणि मेगन यांची वैयक्तिक स्तरावर आणि सार्वजनिक पातळीवर माफीही मागितली. परंतु हे सारं पाहता, मोक्याच्या क्षणी ब्रिटिश मीडिया आणि राजघराण्याने धारण केलेल्या मौनाबद्दल प्रिन्स हॅरीला वाटणारा तीव्र संताप समजून येतो. इथे गंमत अशी आहे, क्लार्कसनच्या पिढीतले लोक मेगनचा दुस्वास करत असले, तरीही नव्या पिढीच्या नजरेत ती नव्या सर्वसमावेशक जगातली ‘प्रिटी कूल’ स्त्री आहे.

हॅरीच्या आत्मचरित्राचा बोलबाला

प्रिन्स हॅरी याच्या स्पेअर या आत्मचरित्राच्या ४ लाख प्रती ब्रिटनमध्ये पहिल्या दिवशीच खपल्या आहेत, तर जानेवारीच्या मध्यापर्यंत १४ लाख प्रती जगभरात विकल्या गेल्या. नॉन फिक्शन या प्रकारातील हे आत्मचरित्र सध्या सर्वाधिक खपणारे पुस्तक ठरले आहे. इतकेच नव्हे, सर्वाधिक वेगाने विकले गेलेले अ-काल्पनिक पुस्तक म्हणून ‘स्पेअर’ची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. पहिल्या आवृत्तीसाठी प्रिन्स हॅरीला १.५ कोटी डॉलर्स मिळाले असल्याचीही चर्चा आहे.

या पुस्तकात प्रिन्स हॅरीने त्याच्या आईचा अपघाती मृत्यू, आईविना मोठं व्हावं लागल्याचं दुःख, याविषयी फार हळुवारपणे आणि संवेदनशीलपणे लिहिलं आहे. त्याची आई किती प्रेमळ होती, किती लोभसवाणी आणि सक्षम होती; तिचा सुंदर, प्रेमळ वावर आणि तिचं निरतिशय प्रेम, तसेच ती अजूनही कसं त्याचं मनोविश्व आणि आयुष्य व्यापून आहे, यावर त्याने भरभरून लिहिलं आहे. तसेच प्रेम आणि ओलावा व्यक्त न करू शकणारे वडील, एकल पिता म्हणून ते कमी पडले, याचं दुःखही तो व्यक्त करतो. त्याच सुरात तरुण वयात कधीतरी कोकेन घेणे आणि पुढे खूप वर्षे गांजा ओढणे, तसेच एका पार्टीत नाझी स्वस्तिकाचा बँड लावून जाण्याची घोडचूकही कबूल करतो.

विल्यम आणि त्याच्यातील प्रेमाचे बंध आणि त्यांनी केलेल्या गमतीजमती, त्यांचा निखळ आनंद यावरही आत्मचरित्रात आले आहे. मोठं होऊ लागल्यावर दोहोंत निर्माण झालेलं अंतर आणि मेगनच्या येण्याने निर्माण झालेला ताण आणि दुरावा याची व्यथाही त्याने यात अत्यंत संयमीपणे व्यक्त केली आहे.

एका बाजूला सगळ्या सुविधा आणि विलासी आयुष्य मात्र राजघरण्यातील व्यक्ती असल्याने होणारा जाच, व्यक्ती स्वातंत्र्याचा होणारा संकोच तसेच राजपुत्राचे जगणे म्हणजे सोनेरी पिंजऱ्यातील जगणे, यावरही त्याने कळवळून लिहिले आहे. मात्र, ब्रिटिश टॅब्लॉइड्स आणि वर्तमानपत्रे आणि मीडियाविषयी तो अतिशय उद्वेग आणि संतापाने या आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. तो म्हणतो की, पीतपत्रकारिता करणाऱ्यांच्या दृष्टीने आम्ही सोनेरी कीटक आहोत आणि ते केव्हाही आमचे पंख छाटू शकतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे खरेच की, हॅरीचे आत्मचरित्र प्रामाणिक आहे. त्यात अभिनिवेश नाही. असलाच तर ब्रिटिश प्रेसविषयी आकस आणि संताप आहे. त्याच्या जखमा, दुःख आणि व्यथा त्याने जगापुढे कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितल्या आहेत. अर्थात, त्याच्या या आत्मचरित्रावर टीकाही फार झाली आहे. विशेषतः ब्रिटिश टॅब्लॉइड्स आणि वर्तमानपत्रांनी त्याला स्वार्थी, स्वतःच्या कुटुंबांचा बळी देणारा घरभेदी आणि स्वतःच्या कौटुंबिक गोष्टींची लक्तरे वेशीवर टांगून त्यावर पैसे कमावणारा बेफिकीर मुलगा, अशी प्रखर टीका केली आहे.

सर्वसमावेशक जगातील आयकॉन्स

आँप्रा बरोबरची मुलाखत, डॉक्यु-सीरिजद्वारे त्यांचं प्रेम, लग्न आणि राजघराण्यापासून दूर जाण्याचा निर्णय आणि आता ‘स्पेअर’ या आत्मचरित्रातून सगळ्या व्यथा, दुःख जगापुढे आणून हॅरी आणि मेगनने जगभरातील लोकांशी संवाद साधला आहे. आपली बाजू आणि कैफियत मांडली आहे. त्यात त्यांच्या चुकाही दिसतात, तसेच अपरिहार्यता आणि परिस्थितीची अटळताही दिसते. अधोरेखित करण्याचे काही मुद्दे म्हणजे हॅरीने बंडखोरी करून मोठ्या धाडसाने दुसरा किंवा अतिरिक्त वारस होणे नाकारले आहे. तसेच वीस वर्षे हेलिकॉप्टर पायलटची नोकरी करून आता अत्यंत सक्षम आणि संवेदनशील बायकोच्या मदतीने दोन लहान मुलांसह त्याच्या अत्यंत प्रिय ब्रिटन या देशापासून दूर अमेरिकेत स्वतः घर उभे केले आहे. राजघराण्याला आणि त्यातील कालबाह्य परंपरा आणि तद्दन बेगडी जगण्याला एकप्रकारे रामराम ठोकला आहे. तसे करून ते ब्रिटिश राजघराण्याच्या तोडीचा स्वतःचा असा एक मोठा ब्रँडही निर्माण करू पाहत आहेत.

त्याच वेळी राजघराण्याने हॅरी आणि मेगन यांची नेटफ्लिक्सवरील सीरिज आणि हॅरीच्या आत्मचरित्रावर काहीही प्रतिक्रिया त्यांच्या ‘never complain, never explain’ या धोरणानुसार दिलेली नाही. हॅरी आणि मेगन यांनी त्यांचा स्वतः ब्रँड सध्या तरी ब्रिटिश राजघराण्यावर टीका आणि आरोप करत उभा केला असला, तरी त्यांचा हा खटाटोप त्यांच्या चरितार्थासाठी आहे, हे राजघराणेही जाणून आहे. हॅरीनेदेखील सांगितले की, राजघराणे संपावे अशी त्याची इच्छा नाही. त्याने राजघराण्यावर हल्ला केलेला नाही, त्याने फक्त त्याची आणि त्याच्या बायकोची बाजू मांडली आहे.

६ मे रोजी प्रिन्स चार्ल्स यांचा राज्यारोहण समारोह आहे. त्यामुळे तोपर्यंत राजघराणे आणि हॅरी-मेगन यांच्यात समेट होईल, अशी चिन्हे आहेत. त्या अर्थाने एका जागतिक कीर्तीच्या प्रस्थापित कॉर्पोरेट फर्मशी स्वतःचं एका नव्या इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर घडवून पाहणाऱ्यामध्ये घडून आलेला तो एक समेट असणार आहे. त्या वेळी दोन्ही बाजूंकडील राजेशाही कुटुंबीयांमध्ये उचंबळून येणाऱ्या प्रेमाला, आदराला, मनातल्या उद्वेग आणि संतापाला कॉर्पोरेट विश्वातल्या विघातक चालीरितींचं अस्तरही आपसूक असणार आहे.

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या फेब्रुवारी २०२३च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखिका गायत्री चंदावरकर सामाजिक-सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक असून सध्या संतसाहित्यावर पी. एचडी. करत आहेत.

gayatri0110gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Ram Jagtap

Wed , 22 February 2023

@ Dilip Chirmuley - ती चूक ‘अक्षरनामा’कडून झालेली आहे, लेखिकेकडून नाही. तुम्ही लक्षात आणून दिल्याने दुरुस्ती केली. मन:पूर्वक धन्यवाद!


Dilip Chirmuley

Wed , 22 February 2023

लेखिकेने लेख लिहिण्यापूर्वी पाश्चात्य नावे कशी लिहावीत याचा अभ्यास करायला हवा होता. उदा: मुलाखतकार ओप्रा विंफ्री आहे ओप्रा विक्री नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......